Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गारपिटीचे पंचनामे झाले, भरपाई कधी ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

काही दिवसांपूर्वी नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तब्बल १२०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यातील ९४६ हेक्टर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली आहे.

मराठवाड्यात एप्रिल महिन्यात नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याला अवेळी पावसाने झोडपल्यामुळे तब्बल १२०० हेक्टरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे, तर त्यापैकी ९४६.७५ हेक्टर पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे पंचनामे करून प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने राज्य शासनाला पाठवला आहे. अवकाळी तसेच गारपिटीमुळे शेतीपिके, फळबागांना झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे या आपत्तीग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

मार्च एण्डमुळे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीटीचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ मिळाले होते. पाऊस आणि गारपिटीमध्ये नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २१३.६० हेक्टर कोरडवाहू, ६१५.५५ हेक्टर बागायत तर ३७१.१० हेक्टर फळपिकांचे असे एकूण १२००.२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या आपत्तीमध्ये परभणी, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरीकांना जीवही गमवावा लागला होता. तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनाचेही मोठे नुकसान झाले होते. आता आपत्तीच्या निकषाप्रमाणे शेतकरी नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत आहेत.

३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित क्षेत्र

जिल्हा.......जिरायत.........बागायत...........फळपिके.....................एकूण

नांदेड........००................२३७..................५३.४०................२९०.४०

लातूर.........२१३.६०........८८.८५............२३७.५०.................५२९.९५

उस्मानाबाद...००............८१.७०...............३४.७०................११६.४०

एकूण..........२१३.६०..........४०७.५५...........३२५.६०.............९४६.७५

(क्षेत्र हेक्टरमध्ये)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडगावच्या सरपंचावर अविश्वास ठराव

0
0

वाळूज महानगर: बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथील सरपंच महेश भोंडवे यांच्यावर सोमवारी तहसीलदारांकडे बारा ग्रामपंचायत सदस्यानी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्य आहेत. सरपंचाचा मनमानी कारभार, सदस्यांना विश्वासात न घेणे, नागरिकांशी अरेरावी करणे, पर्यावरणाबद्दल बेफिकीरी, ग्रामपंचायत निधीचा गैरवापर आदी कारणांचा अविश्वास ठरावात उल्लेख आहे.

ठरावावर श्रीकृष्ण भोळे, मोहन गिरी, अरुण वाहुळे, सचिन गरड, रमाकांत भांगे, श्रीकांत साळे, अमित चोरडिया, उषा हंडे, अलका शिंदे, उषा साळे, मंदा भोकरे, वैशाली जिवरग यांच्या सह्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला बहुमत असून खासदार खैरे यांचे निकटवर्तीय उद्योजक हनुमान भोंडवे यांच्या मुलाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली आहे. त्यावेळी शिवसेनेच्या सर्व सदस्यांची बैठक घेउन एक वर्षानंतर दुसऱ्यास संधी दिली जाईल, असे आश्वासन खासदारांनी दिले होते. मात्र दोन वर्ष झाल्यानंतरही दुसऱ्या संधी मिळत नसल्याची तक्रार होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निबंध स्पर्धेत माधुरी बनकर प्रथम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. सौ. इं. भा. पा. महिला महाविद्यालयाच्या मूल्याधिष्ठित शिक्षणांतर्गत राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आली. त्यात माधुरी बनकर हिला प्रथम पुरस्कार मिळाला. व्यक्तिमत्व विकासात मूल्यशिक्षणाची आवश्यकता, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो, मानवी जीवनात मूल्यशिक्षणाचे स्थान, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे विषय निबंध लेखनासाठी देण्यात आले होते. त्यातील उत्कृष्ट तीन निबंधांना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यात प्रथम माधुरी बनकर (इंभापा महिला महाविद्यालय), द्वितीय राहुल बनसोड (सभु कला व वाणिज्य महाविद्यालय), तृतीय लक्ष्मी सुनीलकुमार (वाडिया महिला महाविद्यालय, सुरत) यांनी यश मिळविले. प्राचार्य डॉ. वसुधा पुरोहित यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समिती प्रमुख डॉ. सुजाता वाघमारे, डॉ. रमा दुधमांडे, डॉ. मीनाक्षी देव यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. परीक्षक म्हणून प्रा. प्रज्ञा देशमुख, प्रा. अर्चना सोनवणे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात असूनही पाणी मिळेना!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात असूनही पाणी मिळत नाही. नळ कधी येईल असे विचारताच महापालिका अधिकारी गोडगोड बोलून वापस पाठवतात. शेवटी कंटाळून माहिती अधिकारात माहिती मागवली. तेव्हा या भागाच्या पाण्यासाठी कसलिही योजना तयार नाही आणि नुसते आश्वासनावर आश्वासन देणे सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे परिसरातील नागरिक कमालीचे उद्विग्न झाले आहेत.

हर्सूल परिसरात असलेल्या म्हसोबानगराची ओळख नोकरदार, व्यापारी, मध्यमवर्गीय लोकांची वसाहत अशी झाली आहे. १९९० पासून या परिसरात नागरीवस्ती वाढण्यास सुरुवात झाली. आजघडीला म्हसोबानगरासह व्यंकटेशनगर, सद्गुरुनगर, उषाकिरण हौसिंग सोसायटी अशा अनेक कॉलनी येथे आहेत. लोकांनी बांधकाम करताना महापालिकेकडून आवश्यक त्या परवानग्या शुल्क अदा करत घेतल्या. महापालिका क्षेत्रात असल्याने सर्व पायाभूत सुविधा मिळतील, अशी आशा रहिवासांना होती, पण वारंवार पाठपुरावा करूनही पदरी काहीच न पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अधिकारी, पदाधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनाशिवाय ठोस अशी कोणतीही कार्यवाही तसेच माहितीही दिली जात नाही. त्यामुळे येथील लीला झोंड यांनी माहिती अधिकार कायद्याचा आधार घेतला. म्हसोबानगर हर्सूल एन४ -४४ वसाहतीमध्ये महापालिकेचे नळ कनेक्शन आलेले नाही. याबाबत आजपर्यंत काय उपाययोजना केल्या. पालिकेमार्फत नळाद्वारे पाणी कधी उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी मागिवली. त्यावर झोन ३, ४, ५ पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता तथा माहिती अधिकाऱ्यांनी या परिसरात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन संमातर प्रकल्पामध्ये समावेश केला आहे, असे दिलेल्या उत्तरात नमूद केले. तसेच नळाद्वारे महापालिकेचे पाणी केव्हा उपलब्ध होईल, याबाबत कुठलीही लेखी स्वरुपात माहिती उपलब्ध नसल्याचे झोंड यांना लेखी स्वरुपात कळविले. महापालिकेच्या या उत्तरामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक वर्षांपासून यातना सहन करत आहोत. आणखी किती वर्षांनी न्याय देणार, असा संतप्त सवाल त्यांनी पालिकेच्या कारभाऱ्यांना केला आहे.

शहरात राहत असूनही टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. कॉलनी शेजारीच पाण्याची टाकी आहे. तेथून इतरत्र पाणी दिले जाते. तसेच पाणी आम्हाला द्यावे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनेकदा आश्वासन मिळाले. त्यामुळे किमान काहीतरी उपाययोजना झाल्या असाव्यात, असे वाटले होते, पण आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही ठोस उपाययोजना अद्याप झालेल्या नसल्याचे समोर आले.

\B- लीला झोंड, आरटीआय कार्यकर्ते, म्हसोबानगर

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकोंडीला नवे जिल्हाधिकारीही वैतागले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नवनियुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना गुरुवारी पदभार स्वीकारल्यापासूनच शहरातील कचराप्रश्नाने घेरले आहे. कचराप्रश्नी अधिकाऱ्यांच्या बैठका; तसेच कचऱ्याचा आढावा घेण्यात मग्न असलेलेले जिल्हाधिकारी चार दिवसांत शहरातील कचराकोंडीला वैतागल्याचे चित्र असून, माझ्यासमोर अतिरिक्त कारभार हेच सध्या मोठे चॅलेंज असल्याचे त्यांनी सांगितले.

चौधरी यांनी सोमवारी (२३ एप्रिल) पत्रकारांशी संवाद साधला.

जिल्हाधिकाऱ्यांकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असल्याने; तसेच कचरा प्रश्नी न्यायालयात वारंवार सुनावणी होत असल्याने पदभार घेताच जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कचराप्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली होती. त्यामुळे चौधरी यांचा पहिलाच दिवस कचरा प्रश्नाने सुरू झाला होता, त्यानंतरही जिल्हाधिकारी सातत्याने कचराप्रश्नाचा आढावा घेत होते. त्यामुळे पदभारी स्‍वीकारल्यापासून जिल्हाधिकारी कचऱ्यात गुरफटल्याची अवस्था गेल्या चार दिवसांपासून आहे.

कचराप्रश्नी जिल्हाधिकारी म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून शहरात कचराकोंडीची समस्या असून, हा सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा आव्हानात्मक प्रश्न असल्याने जिल्हाधिकारी म्हणून आपले या विषयाकडे लक्ष आहे.

पर्यटन विकासाबाबत चौधरी म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक पर्यटन, तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक पर्यटनाला वाव आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला पर्यटनावर विषेश फोकस राहणार आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट असल्याचे सांगत सर्वांनी प्रयत्न केले, तर जिल्हा दुष्काळमुक्त करणे सहज शक्य होईल. जलयुक्त शिवार अभियान; तसेच जलसंधारणाची जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांचा उपयोग होणार आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये काही भागात केलेल्या दौऱ्यामध्ये आपण जलयुक्त शिवार अभियानात निवडण्यात आलेल्या गावांमध्ये भेटी दिल्या असून, कामे समाधानकाररित्या सुरू आहेत. जिल्ह्यात वॉटरकपसाठी निवडण्यात आलेल्या गावांमधील लोकांचा मोठा उत्साह दिसून आला. जलयुक्त शिवार अभियानाला वॉटरकपची जोड मिळाली तर निश्चित सकारात्मक बदल होतील.

\Bसमृद्धीचा विषय चर्चेतून सोडवणार

\Bराज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्गामध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी दरांमधील मोठ्या तफावतीमुळे जमीन देण्यास तयार नाही, या प्रश्नावर बोलताना चौधरी म्हणाले की, ज्यांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित होत आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनीच्या दराबद्दल बोलणे हा त्यांचा हक्क आहे, जिल्हा प्रशासन सर्व शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन समस्येवर मार्ग काढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेची शाळा फोर्ब्जला देण्याचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको एन ७ येथील महापालिकेची शाळ‌ा फोर्ब्ज कंपनीला देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.

सिडको एन ७ येथे महापालिकेची माध्यमिक शाळा आहे. या शाळेची इमारत मोडकळीस आली आहे. 'स्ट्रक्चरल ऑडिट'मध्ये ही इमारत धोकादायक दाखवण्यात आली आहे, असे प्रस्तावात नमूद केले आहे. शाळेची इमारत पाडून बांधणे आवश्यक आहे. फोर्ब्ज कंपनी सीएसआर फंडातून या शाळेची इमारत टप्प्याटप्प्याने तीन वर्षात बांधून देण्यास तयार आहे. दरवर्षी सरासरी ४० ते ५० लाखांचे बांधकाम होईल. बांधकामासाठीचा सर्व खर्च करण्यास कंपनी तयार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेली शाळेची इमारत महापालिकेने जमीनदोस्त करून द्यावी, त्यामुळे नवीन बांधकाम करणे सोईस्कर होईल, असा उल्लेखही प्रस्तावात करण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय आरोग्य योजनेत शहराचा समावेश करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र सरकारी वैद्यकीय योजनेमध्ये (सीजीएचएस) औरंगाबाद शहराचा समावेश करावा, अशी मागणी अखिल भारतीय टपाल कर्मचारी वर्ग तीन या संघटनेने केली आहे. सेवानिवृत्त धारकांसह केंद्र सरकारच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही यांचा लाभ होईल, असेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात खासदार चंद्रकांत खैरे यांना निवेदन देत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेत मराठवाडा व खान्देशातील दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीची सध्याची आरोग्य सुविधा योजना पुरेसी लाभादायक नाही. काही ठराविक हॉस्पिटलमध्येच उपचार घेता येतात. कॅशलेस सुविधा नसून कार्यपद्धत किचकट आणि वेळखाऊ असल्याने कर्मचाऱ्यांना सुविधेचा लाभ योग्य प्रमाणात घेता येत नाही, असे संघटनेने नमूद केले आहे. 'सीजीएचएस' अंतर्गत औरंगाबादचा समावेश झाल्यास कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम त्यांच्या पगारातून कपात करून कॅशलेस आरोग्य सुविधा घेता येणार आहे. टपालसह केंद्र सरकारच्या अन्य विभागाच्या कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच सेवानिवृत्तधारकांनाही त्यांचा लाभ घेता येईल. आजारपणात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष एस. बी. बुजाडे, शालिनी पवार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटी हॉस्पिटलमधून दोन कैद्यांचा पळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या हर्सूल कारागृहातील दोन दोन बंदीवानांनी सोमवारी सकाळी सव्वासात वाजता पलायन केले. वॉर्ड क्रमांक दहामध्ये बंदोबस्तावरील जमादाराला मारहाण करीत त्याला लॉकअपमध्ये कोंडून दोघांनी पोबारा केला. दोघांपैकी अक्षय श्याम आठवले (वय २३ रा. माळीवेस, बीड) याला रुग्णवाहिका चालकाच्या मदतीने पकडण्यात आले, तर दुसरा आरोपी सोनू दिलीप वाघमारे (वय २० रा. राजीवनगर, रेल्वे स्टेशन परिसर) हा पसार आहे.

'मकोका'च्या कारवाईत अटकेतील कच्चा कैदी अक्षय श्याम आठवले याला हर्सूल कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या छातीमधील छर्रा काढण्याच्या शत्रक्रियेसाठी तर, सोनू वाघमारे या बंदीवानाला पाठीत गाठ झाल्याने घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या दोघांनी सोमवारी सकाळी बंदोबस्तावरील जमादार योगेश जोशी (वय ५३) यांच्याकडे गोळी खाण्याकरिता पिण्याचे पाणी मागितले. त्यांनी पाणी दिल्यानंतर आणखी पाणी दरवाजा उघडून मागितले. जोशी यांनी दरवाजा उघडताच दोघांनी त्यांना गळा धरून खाली पाडले. अचानक झालेल्या हल्ल्याने जोशी घाबरले. जोशींना लॉकअपमध्ये बंद करीत या दोघांनी वॉर्डातून पाळ काढला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर झालेल्या आरडोओरडीनंतर रुग्णावाहिका चालकांनी दोघांचा पाठलाग केला. दोघांपैकी अक्षय आठवले याला घाटी क्वॉर्टरजवळ पकडण्यात आले, पण, सोनू वाघमारे पळून गेला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bदहा लाखांची ऑफर

\B

पळताना काही अंतरावर अक्षयला दम लागला. त्याल घाटी क्वॉटर्स परिसरात रुग्णवाहिका चालकांनी पकडले तेव्हा त्याने सोडून देण्यासाठी दहा लाखांचे आमिष दाखवले, मात्र चालकांनी हे आमीष धुडकावून त्याला रुग्णवाहिकेत घालून वॉर्ड क्रमांक १० मध्ये आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा वर्षांपर्यंतचे लसीकरण दहा टक्क्यांपर्यंतच

0
0

\Bलसीकरणाअभावी मृत्यूचे तांडव असे\B

………………………- जगभरातील दरवर्षीचे मृत्यू :१५ ते २० लाख (५ वर्षांपर्यंतची मुले)

- भारतातील दरवर्षीचे मृत्यू… : ४ ते ५ लाख (५ वर्षांपर्यंतची मुले)

- लसीकरणापासून वंचित राहणारी जगातील मुले… : १ कोटी ९० लाख मुले

- लसीकरणामुळे मिळणारे संरक्षण : ……२५ आजारांपासून

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात, देशात लसीकरणाचा शासकीय डंका जोरात पिटला जात असला आणि ठिकठिकाणी लसीकरणाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असल्या तरी देशातील लसीकरणाचे 'कव्हरेज' हे सरासरी ६० ते ७० टक्क्यांपुढे जात नसल्याचे दिसून येत आहे. इतर अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे कव्हरेज बरे म्हणण्याची वेळ येत असली तरी आपल्या राज्यात व विशेषतः ग्रामीण भागात हेच 'कव्हरेज' ५० ते ६० टक्क्यांपुढे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत लसीकरण असते, याचे भान अजूनही नगण्य आहे आणि असे लसीकरण पूर्ण करण्याचे प्रमाण दहा टक्क्यांच्या आत असल्याचेही पुरते स्पष्ट झाले आहे.

याच एकंदर स्थितीमुळे आणि लसीकरणाविषयी विकसनशील देशांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूनेच जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जागतिक लसीकरण सप्ताह पाळला जातो. 'डब्ल्यूएचओ'नुसार अजूनही जगातील १९ दशलक्ष मुले लसीकरणापासून वंचित आहे. २५ गंभीर आजारांपासून संरक्षण मिळत असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाल्यानंतरही लसीकरणाचे प्रमाण फारसे समाधानकारक नाही. यासंदर्भात शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार देशपांडे म्हणाले, 'खरे म्हणजे लसीकरण हे 'कॉस्ट इफेक्टिव्ह टूल' म्हणजेच फार मोठा आर्थिक भार कमी करणारे महत्त्वाचे आयुध आहे. लसीकरणाचा प्रभावी व परिणामकारक वापर झाला तर जगातील तब्बल १५ ते २० लाख बालकांचा जीव वाचवणे शक्य होऊ शकते. आता तर शासकीय यंत्रणेमध्येही पाच विविध गंभीर आजारांपासून संरक्षण देणार महत्त्वाची लस उपलब्ध झाली आहे, मात्र अजूनही लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहे. त्यातही दहा वर्षांपर्यंत लसीकरण होणे आवश्यक असताना याविषयीची जाणीव व भान फार कमी पालकांना असते. सर्वसाधारणपणे शहरांमध्ये दोन वर्षांपर्यंत लसीकरण केले जाते आणि लसीकरणाचा हळुहळु विसर पडत जातो. पाच वर्षांनंतर तर लसीकरण नसतेच, असा बहुतेकांचा समज आहे. उलट वयाच्या दहाव्या वर्षी ट्रिपल बुस्टर व इतर काही महत्त्वाच्या लसी असतात, ज्या देण्यामुळे संबंधित आजारांपासून आयुष्यभर बऱ्याच प्रमाणात संरक्षण मिळते, मात्र दहा वर्षांपर्यंत संपूर्ण लसीकरण करणारे पालक फारच कमी असतात. हे लसीकरण पूर्ण होत नाही म्हणूनच मोठ्या मुलांना डांग्या खोकला, गालफुगी, गोवर, कांजण्या यासारख्या आजारांचा फटका बसतो व उपचारांमध्ये मोठा कालावधी व पैसा खर्ची घालावा लागतो, शाळा-अभ्यासही बुडतो. हे ओपीडीवरुन नक्कीच दिसून येते, असेही डॉ. देशपांडे म्हणाले. यकृताचा कर्करोग किंवा यकृत निकामी होण्यामागे कावीळ 'ब' हे एक महत्वाचे कारण आहे; म्हणूनच 'ब'चे लसीकरण प्रौढांमध्ये वाढणे जितके महत्वाचे आहे, तितकेच गर्भवतींसाठीही 'स्वाइन फ्लू'चे लसीकरण वाढण्याची गरज आहे.

\Bमहत्वाच्या लसींचा यंत्रणेत अभाव\B

लसीकरणाअभावी देशातील किमान चार ते पाच लाख बालकांचा दरवर्षी मृत्यू होतो. यामध्ये निमोनिया, डायरिया यासारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे आणि या आजारांच्या लसीकरणाचा समावेश अजूनही शासकीय लसीकरण कार्यक्रमात झालेला नाही. काही राज्यांच्या शासकीय लसीकरण कार्यक्रमात या लसीकरणाचा समावेश झालेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये तो झालेला नाही. या लसीकरणाचा समावेश आपल्या राज्यामध्येही व्हायला पाहिजे. त्याचबरोबर दहा वर्षांपर्यंत लसीकरण होणेही तितकेच गरजेचे आहे व याविषयी पुरेशी जनजागृती निर्माण केली पाहिजे, असे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष डॉ. राजेंद्र वैद्य म्हणाले. लसीकरण यंत्रणेमध्ये सर्व प्रकारच्या गुणात्मक सुधारणा होणे हे जास्त महत्वाचे आहे, जेणेकरुन लसीकरणाचे कव्हरेज वाढेल. हे कव्हरेज ९० टक्क्यांपुढे जाणे ही आजची गरज आहे, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. केदार सावळेश्वरकर यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील लसीकरणाचे 'कव्हरेज' नक्कीच झपाट्याने वाढत असून, ते ८० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. लसीकरणाबाबत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच आघाडीवर आहे, मात्र उसतोड कामगार किंवा भटक्या समाजातील बालकांना किंवा इतर तत्सम बालकांना लस देण्यात अडचणी येतात.

- डॉ. ऋषिकेश खाडीलकर, सहगोयी प्राध्यापक, पीएसएम विभाग, शासकीय कर्करुग्णालय

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणूकप्रकरणी एमआयएम नगरसेवकासह तिघांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छप्परबंद जातीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची फसवणूक करणारे एमआयएमचे नगरसेवक शेख जमीर अहमद रहीम अहमद कादरी व त्याचे दोन साथीदार जुबेर रहेमान मोहम्मद मुदस्सीर व सय्यद रफिक सयद अब्दुल सत्तार हे तिघे कोर्टात शरण आले होते. पोलिसांनी त्या तिघांना न्यायालयीन कोठडीतून तपासकामी हस्तांतरण करून घेतले. त्या तिघांना सोमवारी (२३ एप्रिल) कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत (२७ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले. या प्रकरणी तिघांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, गुन्ह्यात मदत करणाऱ्या अन्य साथीदारांना अटक करणे बाकी आहे, बनावट जात प्रमाणपत्र कुठे तयार केले, शिक्के कुठून आले याची चौकशी करावयाची असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने तिघांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिक्खुसंघाचे आंदोलन

0
0

बुद्ध जयंतीच्या निमित्ताने औरंगाबादच्या बुद्ध लेणीच्या परिसरात नवीन पाइप लाइन टाकून पाण्याची व्यवस्था करा, पथदिवे सुरू करा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करा आदी मागण्यांसाठी भिक्खुसंघाने भदंत विशुध्दानंद बोधी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर सोमवारी एक तास आंदोलन केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी लवकरात लवकर आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगावच्या गावकऱ्यांनी आयुक्तांसमोर मांडल्या समस्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नारेगाव येथील गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त; तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन गावातील साचलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न, आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पायाभूत सुविधांच्या समस्यांचा पाढा वाचला.

यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नारेगावात सध्या अस्तित्वात असलेल्या कचऱ्यावर शास्‍त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून खत शेतीसाठी दिले जाईल, असे आश्वासन दिले; तसेच लवकरच नारेगावला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधून पाण्याच्या प्रश्नांसह इतर समस्या सोडवणार असल्याचे त्यांनी नारेगावच्या शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी कचऱ्यासंबंधी आढावा बैठक घेतली; तसेच विलगीकरण केलेला ओला कचरा शेतकऱ्यांनी घेऊन जावे असे आवाहन केले. शहरामध्ये विलगीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे प्रतिदिन अंदाजे दीडशे टन ओला कचरा महापालिकेस प्राप्त होत आहे. हा कचरा शेतकऱ्यांनी कंपोस्ट खतासाठी घेऊन जाण्याचे आवाहन डॉ. भापकर यांनी केले. या बैठकीत कचरा प्रक्रीयेसाठी निवडण्यात आलेल्या जागांबाबत आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आळंदीच्या कीर्तनकारास कोरडगावात मारहाण

0
0

वैजापूर: मुलावर चोरी केल्याचा आरोप केल्याच्या कारणावरून आळंदी येथील एका कीर्तनकारास लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कोरडगाव येथे शनिवारी घडली. या प्रकरणी तालुक्यातील खरज येथील येथील पाच जणांविरुद्ध शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी येथे गोरख महाराज आहेर यांच्या ज्ञानोबा तुकाराम अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत खरज येथील किशोर दत्तात्रय कुंदे हा शिक्षण घेत होता. २० मार्च रोजी गोरख महाराज कीर्तनासाठी बाहेरगावी गेले असता किशोरने ४७ हजार रुपयांची चोरी केल्याचा आरोप आहे. त्यावरून आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. गोरख महाराज कीर्तनासाठी वैजापूर तालुक्यात आले असता कुंदे कुंटुबीयांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी किशोर दत्तात्रय कुंदे, दत्तात्रय कचरू कुंदे, भगवान रंभाजी कुंदे, बाबासाहेब गजानन कुंदे व विजय बाबासाहेब कुंदे (सर्व रा. खरज) या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चमाध्यमिक, ज्युनिअर कॉलेजांचा आज आढावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उच्च माध्यमिक, ज्युनिअर कॉलेजांच्या विषयांबाबत मंगळवारी सहविचारसभा होणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश, ऑनलाइन माहितीचा अभाव आणि इतर प्रश्नांबाबतची ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

देवगिरी कॉलेजच्या रविंद्रनाथ टागोर सभागृहात सकाळी ११ वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आढावा घेत, शिक्षण विभाग नियोजनाची तयारी करत आहे. शिक्षण विभागाकडे परिपूर्ण आकडेवारीचा अभाव आहे. संच मान्यतेनुसार रिक्त जागा, अतिरिक्त पदे, शिक्षकांची माहिती, बिंदूनामावली, वरिष्ठ, निवड श्रेणी प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्राबाबत पपत्र, सेवापुस्तिका, सेवानिवृत्ती प्रकरणाचा आढावा, विनाअनुदानित शाखा, तुकडी, विषय अनुदान आणणे प्रपत्र, ज्येष्ठता यादी, शिक्षकांना वाढीव पदांचा विषय, प्रलंबित वैयक्तिक मान्यता, गुगल फॉर्मवर माहितीसह स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर परवानगी दिलेल्या नवीन शाळा, दर्जावाढनुसार शाळांची माहिती, शाळा, वर्ग तुकड्याची माहिती याबाबत चर्चा होणार आहे.

\B

अकरावी ऑनलाइन प्रक्रिया गाजणार

\B

अकरावी प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेत औरंगाबादचा मागच्या वर्षीपासून समावेश करण्यात आला. पहिल्या वर्षी तांत्रिक त्रुटी, मार्गदर्शन केंद्रावर सोयीसुविधांचा अभाव यामुळे विद्यार्थी, पालकांची झालेली गैरसोय आणि ग्रामीण भागात झालेले प्रवेश यावरून बैठक गाजण्याची शक्यता आहे. शहरात प्रक्रिया ऑफलाइन करा, अन्यथा जिल्हाभरात ऑनलाइन करा अशी मागणी होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मंत्रालयात बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संजय गांधी निराधार योजनेचे शहरातील लाभार्थींवर झालेल्या अन्यायसंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. अनुदान योजनेचे अध्यक्ष विकास कुलकर्णी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकारी यावेळी उपस्थित असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाकप निदर्शने

0
0

भाकपचे निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कठुआ-उन्नाव येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने रिक्षाचालकांनी निदर्शने केली. पैठणगेट येथे ही निदर्शने करण्यात आली. देशात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप करण्यात आला. अश्फाक सलामी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार महिन्यांत डेंगीचे जिल्ह्यामध्ये २० रुग्ण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यामध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या घटती असल्याचे दिसून येत असतानाच, डेंगीचे रुग्ण मात्र कायम वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाचे म्हणजे केवळ चार महिन्यांत डेंगीच्या रुग्णांची संख्या २० वर पोहोंचली असल्याची नोंद हिवताप कार्यालयात झाली आहे. त्यातही सर्वाधिक डेंगीचे रुग्ण हे महापालिकेच्या हद्दीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

हिवताप कार्यालयाच्या अधिकृत नोंदीनुसार, मागच्या वर्षी २०१७ मध्ये डेंगीचे जिल्ह्यामध्ये ८२ रुग्ण आढळून आले होते. यंदाही चार महिन्यांत २० रुग्ण आढळल्याने डेंगीची स्थिती कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे. या वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये १३, फेब्रुवारी महिन्यामध्ये १, मार्च महिन्यामध्ये ४, तर एप्रिलमध्ये आतापर्यंत २ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचे रुग्ण मात्र यंदा शून्य असल्याची नोंद हिवताप कार्यालयात झाली आहे. आपल्याकडे हिवताप वाढण्यासाठी पूरक परिस्थिती नाही म्हणूनच मलेरिया कमी आहे, असेही जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले.

मलेरिया दिनानिमित्त आज फेरी

जागतिक मलेरिया दिनानिमित्त बुधवारी (२४ एप्रिल) सकाळी क्रांतीचौकापासून ते सिद्धार्थ उद्यानापर्यंत जनजागृती फेरी काढण्यात येत आहे. त्याशिवाय कार्यशाळा व विविध कार्यक्रम-उपक्रम जिल्ह्यामध्ये होणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टसिटी प्रकल्पातील कामांना गती द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहराचा स्मार्टसिटी प्रकल्पात समावेश झाला आहे. समावेशानंतर एक वर्षात एकाही प्रकल्पाला सुरुवात झालेली नाही, ही खेदजनक बाब आहे. स्मार्टसिटी प्रकल्पातील विविध कामांना गती द्या, तातडीने योग्य ती कार्यवाही करा, अशी मागणी करणारे निवेदन खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्मार्टसिटी प्रकल्पाच्या एसपीव्हीचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांना दिले आहे.

पोरवाल यांना दिलेल्या निवेदनात खैरे यांनी रस्ते विकास, शहर बस व्यवस्था, मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर, सोलार सिटी, स्मार्ट रस्ते, शहर सौंदर्यीकरणासाठी विशेष निधी, एलईडी लाईट्स, आदर्श उद्यान, पर्यटन विकास या बद्दल मुद्दे उपस्थित केले आहेत. या सर्व क्षेत्रातील कामांना तातडीने गती द्या, असे खैरे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाई कामगारांचे शिबिर

0
0

औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय, नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यातर्फे सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या बुधवारी सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात व शुक्रवारी सकाळी ११ छावणीतील आठवडी बाजारात शिबिर आयोजित केले आहे. यासाठी पासपोर्ट आकाराचा एक फोटो, आधारकार्डची छायाप्रत (मूळ प्रत देखील सोबत आणावी), आधारलिंक बँकखात्याची छायाप्रत, सफाई कामगार असल्याचा पुरावा आणावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापकांनी मांडल्या अडचणी

0
0

औरंगाबाद: प्रवेशात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, वारंवार मागविण्यात येणारी ऑनलाइन माहिती यामुळे कामाचा ताण वाढल्याचे मुख्याध्यापक प्राचार्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या सहविचार सभा आपल्या अडचणी, समस्या त्यांनी मांडल्या. उच्च माध्यमिक, ज्युनिअर कॉलेजांच्या विषयांसंदर्भात शिक्षण विभागातर्फे सहविचार सभा घेण्यात आली. देवगिरी कॉलेजच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात ही बैठक झाली. सहायक उपसंचालक एम. के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. संच मान्यतेनुसार रिक्त जागा, शिक्षकांची माहिती, वरिष्ठ, निवडश्रेणीचे प्रशिक्षण किती पूर्ण झाले, सेवापुस्तिका, सेवानिवृत्ती याबाबत माहिती भरून घेण्यात आली. मुख्याध्यापक, प्राचार्यांनी वारंवार अशा प्रकारची माहिती मागविण्यात येत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षण विभागाकडे माहिती असताना पुन्हा पुन्हा माहिती मागिवली जात आहे. त्यासह प्रवेशातील त्रुटी, अडचणी मांडण्यात आल्या.शिक्षण विभाग पुन्हा नव्याने गुगल फॉर्मावर माहिती पुन्हा नव्याने मागविली आहे. याबाबत ती माहिती कशी भरावयाची आहे. याचे प्रात्यक्षिक सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images