Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

$
0
0

औरंगाबाद: विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान कॉलेजमधील ५० गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले. महिंद्रा फायनांन्स मेरीट स्कॉलरशीपसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. शाम शिरसाठ, कंपनीचे अजय वडगावकर, अरुण दिवाण, जगन्नाथ पवार, संदीप कोठुळे, अभय अष्टुरकर, संतोष बिराजदार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश नागरारे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऑरिकच्या १६पैकी ११ प्लॉटसाठी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑरिक सिटीमधील (शेंद्रा एमआयडीसीती) औद्योगिक भूखंडाप्रमाणे निवासी बंगल्यांकरिता विशेष १६ प्लॉट खुले करण्यात आले होते. हे १६ प्लॉट विक्रीसाठी खुले केले आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. या १६ प्लॉटपैकी तब्बल ११ अर्ज आले असून, पाच प्लॉटसाठी पुन्हा जाहिरात दिली जाणार आहे.

ऑरिक सूत्रांनी सांगितले की, शेंद्रा डीएमआयसी अर्थात ऑरिक सिटीतील खासगी बंगल्यातील १६ प्लॉट नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. त्याची जाहिरात देण्यात आली होती. शेंद्रा येथील डीएमआयसीच्या पायाभूत सुविधांची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. वीज, पाणी, रस्ते आदी कामे जूनअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे निवासी प्लॉट विक्रीसाठी काढण्यात आले होते. साडेतीन हजार ते पाच हजार चौरस फुटांच्या या प्लॉटसाठी ९६० रुपये चौरस फूट असा दर जाहीर करण्यात आला आहे. www.auriccity.com या वेबसाइटवरून याची जाहिरात करण्यात आली आहे. मोजक्या ठिकाणीच जाहिरात दिल्याने १६ पैकी ११ प्लॉटसाठीच अर्ज आले आहेत. जमीन वाटप समितीची बैठक लवकरच घेतली जाणार असून, ते प्लॉट लवकरच वितरित केले जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक संस्था, उद्योजक; संवादाकरिता परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत कंपनीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा. उद्योगांची गरज ओळखून शिक्षकांना अभ्यासक्रमात बदल करणे सापे जावे, या हेतुने शैक्षणिक संस्था व उद्योजक एकत्र येणार आहेत. याकरिता शुक्रवारी 'संवाद परिषद'चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळत नाही, अशी नेहमी ओरड होते. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी आदी विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी मिळवूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करता यावे, थेट कंपनीत काम करण्याची संधी मिळावी, अभ्यासक्रम रोजगारक्षम करणे या उद्देशाने शिक्षण संस्था आणि उद्योजक यांच्यात समन्वय घडविण्यात येणार आहेत. दोघांनी एकाच पातळीवर एकत्र येऊन काम करण्यासाठी विभागीय संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संवाद परिषदेनंतर अभ्यासक्रमातील बदल, प्रशिक्षणाबाबतची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला 'सीएमआयए'चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, नितीन बागुल, रवींद्र वैद्य, किशोर राठी, आशिष गर्दे, मनीष गुप्ता, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, प्रमोद काळे, श्रीकांत शिराळकर, मिलिंद उमरीकर आदींची उपस्थिती होती.

\Bपरिषदेत यांचे मार्गदर्शन \B

वाळूज एमआयडीसी येथील मराठवाडा अॅटोक्लस्टर येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता परिषदेला सुरुवात होणार आहे. तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या विविध कॉलेजांमधील २०० प्राचार्य, उद्योगांमधील १५० प्रतिनिधी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, डॉ. अमीत दत्ता, डॉ. विनोद मोहितकर, उद्योजक राम भोगले, 'सीआयआय'च्या अध्यक्षा मोहिनी केळकर, प्रसाद कोकीळ हे मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५०० टन कचऱ्याची विल्हेवाट लावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात विविध ठिकाणी साठवण्यात आलेल्या ५०० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. येत्या तीन दिवसांत साचलेल्या सर्व कचऱ्याची विल्हेवाट लागेल, असे ते म्हणाले.

विविध झोन कार्यालयांतर्गत असलेल्या वसाहतींमधून गोळा होणारा कचरा साचवण्यात येत होता. साचवलेल्या कचऱ्याचे दहा ते पंधरा फुटांचे डोंगर तयार झाले आहेत. बुधवारी यापैकी बहुतेक ठिकाणाचा कचरा हलविण्यात आल्याचे महापौर म्हणाले. गुरुवारी सकाळपर्यंत या सर्व ठिकाणचा मिळून पाचशे टन कचरा अन्यत्र हलविण्यात येईल व या जागा मोकळ्या केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या अन्य भागात साचलेला तसेच रस्त्यांच्या बाजूने जमा झालेला कचरा येत्या तीन ते चार दिवसांत हलविण्यात येईल व शहर कचरामुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा दावा महापौरांनी केला. रात्रीच्या वेळी देखील कचरा उचलण्याचे काम केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने विभागीय आयुक्तांकडे ३५ हजार मास्क जमा केले आहेत. हे मास्क सफाईचे काम करणारे कामगार, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी, विशेष अधिकारी यांना दिले जाणार आहेत.

\Bगाड्यांसाठी कंत्राटदारांना फोन\B

कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेच्या मालकीची ३५ मोठी वाहने आहेत. याशिवाय १५ वाहने भाड्याने घेण्यातआली आहेत. ५० वाहनांचा ताफा कचरा वाहतुकीसाठी पालिकेकडे आहे, परंतु कचऱ्याची वाहतूक करून रस्ते कचरामुक्त करण्यासाठी पालिकेला आणखीन वाहनांची गरज आहे, त्यामुळे कंत्राटदारांना फोन करून गाड्या (ट्रक-हायवा) पाठवण्याचे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले करीत होते. किमान शंभर गाड्यांचा ताफा तयार व्हावा यासाठी बुधवारी दिवसभर प्रयत्न केले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यासाठी पोलिस कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

झाल्टा फाटा येथील जकात नाक्याच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला विरोध करणाऱ्या नागरिकांपैकी दोघांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, विरोध करणाऱ्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी नाक्याच्या परिसरात कचरा टाकण्यास परवानगी दिली. त्यानंतर सुमारे पाऊण एकर जागेत कचरा टाकण्याचे काम सुरू करण्यात आले.

कचरा निर्मूलनासाठी शासनाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समितीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी चार जागांची निवड केली आहे. त्यात झाल्टा फाटा येथील जकात नाक्याची जागा, सावंगी, मध्यवर्ती जकात नाका आणि रमानगर येथील जागेचा समावेश आहे. या चारही ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यावर लगेचच बायोकल्चरची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे कचऱ्याचे रुपांतर काही दिवसांतच खतात होणार आहे. कचरा डम्प करण्याला या समितीने परवानगी दिली नाही. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर आज झाल्टा येथील जागेवर कचरा टाकण्याचे काम पालिकेच्या यंत्रणेने सुरू केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त रवींद्र निकम, विशेषाधिकारी एम. बी. काजी, ए. बी. देशमुख, एस. एस. कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी कचऱ्याने भरलेल्या गाड्या घेऊन झाल्टा फाटा येथे दुपारी एकच्या सुमारास पोचले. त्यांच्याबरोबर पोलिसांचा देखील ताफा होता. महापालिकेचे पथक आल्याचे कळाल्यावर जकात नाक्याच्या जागेचे मालक श्यामराव बकाल व अन्य नागरिक पालिकेच्या पथकाला विरोध करण्यासाठी आले. सुरुवातीला त्यांनी तीव्र विरोध केला, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचे काहीही ऐकले नाही. त्या जागेवर कचरा डम्प केला जाणार नाही, कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे, असे अधिकारी नागरिकांना सांगत होते. निर्धारित वेळेनंतर जागा रिकामी करून दिली जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितले, पण तसे लेखी पत्र द्या, अशी मागणी बकाल यांनी केली.

त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त उदय चौधरी यांच्याशी संपर्क साधून बकाल यांची पत्राची मागणी त्यांना सांगितली. चौधरी यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर भालसिंग यांनी बकाल यांना पत्र दिले. पत्र दिल्यानंतर नागरिकांचा विरोध मावळला. त्यांनी जकात नाक्याच्या जागेवर कचरा टाकण्यास परवानगी दिली. दरम्यान, टोकाचा विरोध करणाऱ्या दोघांवर पालिकेतर्फे पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर एका मागून एक असा सुमारे १५ ट्रक कचरा रिकामा करण्यात आला. रात्रभर हे काम सुरू राहील, असे सांगण्यात आले.

\Bदोन महिन्यांत जागा रिकामी करणार\B

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी श्यामराव बकाल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाक्याची जागा कचरा टाकण्यासाठी २५ एप्रिल ते २५ जून २०१८ दरम्यान वापरली जाणार आहे. या काळात त्या जागेवर कचरा डम्प केला जाणार नाही, तर कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. दोन महिन्याच्या नंतर जागा पुन्हा तुमच्या ताब्यात दिली जाईल. सध्या जागेचे सपाटीकरण करण्यात आलेआहे, जागा परत करताना देखील जागेचे सपाटीकरण करूच जागा परत केली जाईल. प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारी जागा बकाल यांच्या मालकीची आहे. जिल्हाधिकारी व पालिका आयुक्त उदय चौधरी देखील झाल्टा फाटा येथे दाखल झाले होते, त्यांनी नागरिकांशी चर्चा केली.

\Bबायोकल्चरचा टँकर\B

कचऱ्याने भरलेल्या गाड्या झाल्टा फाटा येथील जकात नाक्याच्या जागेवर रिकाम्या केल्यावर कचऱ्यावर लगेचच बायोकल्चर फवारण्यात येत होते. बायोकल्चरचे मिश्रण असलेला टँकर पालिकेच्या ताफ्याबरोबर होता. बायोकल्चर फवारले जात असल्यामुळे कचऱ्यावर निश्चितपणे प्रक्रिया होईल, असे मानले जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारेगावा डेपोवर कचरा नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचरा डेपोवर केवळ १५ दिवस कचरा टाकू देण्याची विनंती नारेगाव, मांडकीवासीयांनी फेटाळली. कचरा डेपोवर साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र बसवा व कचऱ्याचे खत तयार करा. शेतकरी स्वखर्चाने ते खत नेतील, असेही गावकऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

कचरा डेपोवर कचरा टाकू देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त, संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यावेळी त्यांनी नारेगाव, मांडकीवासीयांना मध्यवर्ती जकात नाका येथे कचऱ्यावर सुरू असलेली प्रक्रिया पाहण्याची सूचना केली होती. यापुढे कचरा साचवला जाणार नाही, तर त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे, असे डॉ. भापकर यांनी स्पष्ट केले होते. डॉ. भापकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बुधवारी नारेगाव, मांडकीवासीयांनी मध्यवर्ती जकात नाका येथे कचऱ्यावर करण्यात येत असलेल्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी पुंडलिकअप्पा अंभोरे, मनोज गायके, रवी गायके व अन्य हजर होते.

यासंदर्भात माहिती देताना मनोज गायके म्हणाले, 'कचऱ्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियेमुळे आम्ही समाधानी आहोत, पण कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी १५ दिवसांचा अवधी द्या, अशी महापालिकेची विनंती आम्ही मान्य करू शकत नाही. १५ दिवस कचरा टाकण्यासाठी दिल्यास महापालिकेची यंत्रणा पुन्हा शिथिल होईल. त्यामुळे डेपोवर नव्याने कचरा न टाकता तेथे आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करा, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. अधिकाऱ्यांनी देखील ही मागणी मान्य केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या ७४ शाळा ‘सुपर क्लास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. औरंगाबाद जिल्ह्यातील ७४ शाळांमधील प्रगती १०० टक्के 'सुपर क्लास' गटात आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात या शाळांची स्वतंत्र यंत्रणा राबवून गुणवत्ता तपासून घेण्यात आली. त्यातही या शाळांनी अव्वल क्रमांक राखला. दरम्यान, जिल्ह्यातील २०७६ पैकी १५०१ शाळा प्रगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात २०७६ शाळा आहेत. शालेय शिक्षण विभागाने आदेश दिल्यानुसार, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी राज्यस्तरावरील अनेक उपक्रम राबविले जातात. शाळा प्रगत करण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करत ज्ञानरचनावादासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. गणित व भाषा विषयांची शंभर टक्के अपेक्षापूर्ती विद्यार्थ्यांकडून झाली. यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. जिल्हा परिषदेच्या ७४ शाळा १०० पैकी १०० गुणास पात्र ठरल्या आहेत.

या शाळा गुणवत्तेच्या कसोटीवर उतरल्या आहेत की नाही याची तपासणी मार्च महिन्यात करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र पथके नेमून विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. त्यात काही ठिकाणी तीन टक्के फरक आल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक सूरजप्रसाद जैस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले. शंभर टक्के गुणवत्तेच्या ७४, ६१ ते ८० टक्के गुणवत्तेच्या ८७८ तर ८१ ते ९९ टक्क्यांमध्ये ६२३ जिल्हा परिषद शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. एकूण २०७६ पैकी १५०१ शाळा प्रगत असल्याचे त्यातून सिद्ध झाले आहे. उर्वरित शाळांना प्रगत करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जैस्वाल यांनी स्पष्ट केले.

\Bतालुकानिहाय 'सुपर क्लास' शाळा

\B

वैजापूर २४, सिल्लोड १८, औरंगाबाद १२, पैठण ५, फुलंब्री ५, गंगापूर ४, कन्नड ४, खुलताबाद १ आणि सोयगाव १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डॉ. आंबेडकरांचे विचार माझ्यासाठी ऑक्सिजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार माझ्यासाठी ऑक्सिजनसारखे आहेत,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.

कैलास पब्लिकेशन्सतर्फे बुधवारी सायंकाळी मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात डॉ. कांबळे यांचा मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ. दादा गोरे हे होते.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना डॉ. कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मोठे होते. त्यांचा कायम विरोध करणारी विचारप्रणाली, विरोधी प्रवाहातील मान्यवरही त्यांचे योगदान आज मान्य करत आहेत. डॉ. आंबेडकरांचे विचार व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आज ऑक्सिजन ठरत आहेत. या महान मानवाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

डॉ. ऋषिकेश कांबळे व त्यांच्या साहित्याविषयी डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी भाष्य केले. 'डॉ. ऋषिकेश कांबळ हे सर्वसमोवशक लेखक-साहित्यिक आहेत. त्यांनी सर्व विषयावर लिखाण करून समकालीन कसे रहावे व समकालीन असताना व्यवस्थेलाही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी ग्रामीण, दलित, शहरी, राजकीय लेखन केले आहे. याशिवाय त्यांचे समीक्षण आणि मराठी भाषेवरील प्रभुत्व फार मोठे आहे, असे डॉ. काळुंखे म्हणाले. त्यांनी डॉ. कांबळे यांच्या साहित्यप्रवास व चळवळीचा आढावा घेतला. यावेळी डॉ. दादा गोरे, डॉ. कौतिकराव ठाले पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरूवातीला कैलाश पब्लिकेशन्सचे संचालक कुंडलिकराव अतकरे यांनी प्रास्ताविकातून सत्कारामागील भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास इंगळे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन दरोडेखोरांना १० वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वरखेडा विरो (ता. जाफ्राबाद, जि. जालना) येथील कुटुंबाच्या घरात मध्यरात्री घुसून सर्वांना बेदम मारहाण करीत साडेचार लाखांचा ऐवज लुटणाऱ्या दोघा आरोपींना प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १५ लाख ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी बुधवारी (२५ एप्रिल) ठोठावली. २०१२ मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील चार आरोपी अजूनही फरार आहेत, हे विशेष.

या प्रकरणी दत्तात्रय तुकाराम उबाळे (रा. वरखेडा विडो, ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २३ फेब्रुवारी २०१२ रोजी फिर्यादी हा रात्री घरात कुटुंबियांसह झोपला असता, मध्यरात्री एकच्या सुमारास वकिल्या उर्फ विलास बापुराव शिंदे (३२, रा. सिरजगाव विठोरा, ता. अंबड, जि. जालना), दिपक सायन्ना पवार (२५, रा. सिरजदाव विठोरा), शकल्या उर्फ अशोक लालू पवार, विजय उर्फ अजय सर्जेराव वाघ (रा. मंगरुळ खरात, ता. घनसावंगी, जि. जालना), रामदास बाबाशा पवार (रा. विठोरी सिरजगाव), बाबश्या उर्फ बाबाशा पवार (रा. कासापुरी, जि. परभणी), मारुती सायन्ना पवार (रा. पिठोरी सिरसगाव, ता. अंबड, जि. जालना) या आरोपींनी फिर्यादीच्या घराचे दार तोडून घरात प्रवेश केला आणि सर्व कुटुंबियांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. फिर्यादीने कपाटाची चावी दिली नाही म्हणून कपाट तोडले आणि रोख चार लाख रुपये तसेच १२ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने असा चार लाख ३० हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन जाफ्राबाद पोलिस ठाण्यात आधी भादंविच्या कलम ३९५, ३९७, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. घटनेनंतर दोन तासांनी पोलिस दाखल झाले आणि जवळच्या शेतामध्ये लुटीच्या पैशांची वाटणी करीत असताना पोलिसांनी आरोपी वकिल्या व आरोपी दीपक यांना ताब्यात घेतले, तर इतर पाच आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. तपासादरम्यान संघटित गुन्हेगारीचे स्वरुप लक्षात घेऊन मोक्का कायद्याअंतर्गत या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. जाफ्राबाद तहसिलदारांनी हर्सूल कारागृहात घेतलेली ओळख परेड महत्वाची ठरली. त्यात फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांनी आरोपींना ओळखले होते.

'चड्डी-बनियन गँग'ची दहशत

या प्रकरणातील आरोपींची ओळख ही चड्डी-बनियन गँग अशी होती. या गुन्ह्यामध्येही आरोपी चड्डी-बनियनवरच होते. चड्डी-बनियन गँग म्हणून या आरोपींची मोठी दहशत होती. न्यायालयीन प्रकरण सुरू असताना यातील आरोपी शकल्या उर्फ अशोक लालू पवार याचा मृत्यू झाला.

चार वेगवेगळ्या कलमांत शिक्षा

दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून दोन्ही आरोपींना कलम ३९२, ३९५ व ३९७ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, मोक्का कायद्याच्या कलम ३(१) (दोन) अन्वये दोन्ही आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी पाच लाख रुपये दंड, 'मोक्का'च्या ३(२) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व पाच लाख रुपये, तर 'मोक्का'च्या कलम ३(४) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व पाच लाख रुपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येक कलमात एक वर्ष अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा कोर्टाने ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीटर रिडिंगची प्रक्रिया काटेकोरपणे अंमलात आणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रिया दर महिन्यात वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची आखणी करावी तसेच त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, घेतलेल्या रिडिंगची क्रॉसचेकिंग करावी त्याचप्रमाणे रिडिंग एजन्सी घेणारे कामात दिरंगाई करीत असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी संचालक (बिलिंग व महसूल) श्रीकांत जलतारे यांनी दिल्या.

बुधवारी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळ कार्यालया अंतर्गत येत असलेल्या मुख्य अभियंता, सर्व अधिक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व उपकार्यकारी अभियंते तसेच वित्त व लेखा अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये जलतारे यांनी सर्वांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थपकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दोषी नादुरुस्त मीटर बदण्याच्या कामात गती वाढवण्याच्या सूचना अभियंते व कर्मचाऱ्यांना दिल्या. दोषी मीटर जूनपर्यंत पूर्ण झाले पाहिजे. तसेच विजबिलाची वसुली, मीटर क्रॉस चेकिंग या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, बी. के. जनवीर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तांच्या नावे खंडणी मागणाऱ्यास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमिनीसंबंधीचा दावा मागे घेण्यासाठी पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांच्या नावे पाच लाख रुपये व स्वतःसाठी भूखंड मागणारा कुख्यात आरोपी शेख अब्दुल बारी शेख अब्दुल रहीम याला बुधवारी (२५ एप्रिल) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला शुक्रवारपर्यंत (२५ एप्रिल) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

या प्रकरणी नासेर खान गनी खान (४२, रा. कटकटगेट, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. घर व जमान मिळून १३ गुंठे जमिनीचा वाद महापालिका व फिर्यादीमध्ये सुरू आहे. या प्रकरणात महापालिका कोर्टाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणाशी संबंध नसताना आरोपी शेख अब्दुल बारी शेख अदु रहीम (७०, रा. सिडको एन १२, औरंगाबाद) याने महापालिका कोर्टात व सिटी सर्व्हे कार्यालयात जमिनीबाबत अर्ज दिला आणि ही जमीन महापालिकेची असल्याचे अर्जात म्हटले. याबाबत फिर्यादीने आरोपीला विचारणा केली असता, जमिनीची किंमत जास्त आहे व मी माझा अर्ज मागे घेईल; पण सेटलमेंट करावी लागेल. या संदर्भात, मी माझा दावा काढून घेतो, पण हे प्रकरण वरपर्यंत गेले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्ताला तीन लाख रुपये, तर सिटीचौक पोलिस निरीक्षकाला दोन लाख रुपये द्यावे लागतील व मला भूखंड द्यावा लागेल, असे आरोपीने दुसऱ्याच्या फोनवरुन फिर्यादीला सांगितले. दरम्यान, फिर्यादीने आरोपीचा हा संपूर्ण संवाद रेकॉर्ड केला व तक्रार दिल्यावरुन कलम ३८५, ३८७, ५०६, ३४ अन्वये सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

दहशतीमुळे साक्षीदार पुढे येईना

फरार आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, खंडणीच्या रुपात आरोपीने फिर्यादीकडून घेतलेले २० हजार रुपये जप्त करणे, आरोपीचा मुलाला अटक करणे बाकी आहे. तसेच आरोपीवर विविध गुन्हे दाखल असून त्याची दहशत असल्याने साक्षीदार पुढे येण्यास धजावत नाहीत. सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीचे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कठुआ व उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार पूजा सकट हिच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने क्रांतीचौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी दिनकर ओंकार, रमेशभाई खंडागळे,कैलास गायकवाड, कृष्णा बनकर,बंडू कांबळे,अरुण बोर्डे, सिद्धार्थ मोकळे, लक्ष्मण हिवराळे, डॉ.किशोर वाघ यांनी भाजप सरकारच्या पक्षपाती व धर्मांध धोरणावर हल्ला चढविला. धरणे आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की देशात आणि राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. महिलांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होण्याचे प्रमाण वाढतच चालली आहे. कठुआ येथील चिमुरडीवर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या घटनेने देशाची मान शरमेने खाली गेली आहे. दुसरीकडे विधिमंडळात जाऊन जनतेच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी निवडलेला भाजपचा लोकप्रतिनिधी उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेत आरोपी असून याप्रकरणी न्याय मागणाऱ्या पीडितेच्या वडिलांच्या हत्येचाही तो आरोपी आहे. आम्ही सर्व आंबेडकरवादी संघटना-कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहोत. महिलांवरील अन्यायाच्या प्रकरणात न्यायाची अपेक्षा भाजप सरकार कडून कशी करावी ? असा प्रश्न या देशातील जनतेला पडलेला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेला भाजपचा मुख्यमंत्री स्वतःकडे गृहमंत्रालय ठेवून गुन्हेगारांना क्लिनचिट देण्याचे काम करतात अशावेळी जनतेने न्याय मिळण्याची अपेक्षा कशी आणि कोणाकडून ठेवावी ? कोरेगाव भीमा हिंसाचारातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पूजा हिला जीवे मारण्याच्या धमक्या येत असताना पोलिसांनी तिला सरंक्षण दिले नाही. तिचा संशयापद मृत्यू हा आत्महत्या असल्याचे भासवण्याचे काम सरकार करीत आहे. मात्र हा सहेतूक केलेला खून असल्याचे आम्हा सर्व आंबेडकरवादी जनतेचे मत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रसंगी गौतम लांडगे, पंडित नवगिरे, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, प्रा. ऋषिकेश कांबळे, रामभाऊ पेरकर,राजू आमराव, शांतीलाल गायकवाड, राहुल सावंत, विजय वाहुळ, सचिन निकम, सखाहरी बनकर, मनोज वाहुळ, संदीप आढाव, मिलिंद बनसोडे,अरुण शिरसाठ,अशोक वाहुळ, सागर कुलकर्णी,सोनू नरवडे, नाना म्हस्के,किशोर जाधव,विजय चौधरी,अनिल सदाशिवे, कुणाल खरात,राहुल साळवे,संदीप जमधडे,वंदना उगले,मीनाक्षी शिरसाठ आदींसह कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदाराकडून दहा हजाराची खंडणी घेताना दोघे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दक्षता समितीचे सदस्य असल्याचे सांगत दुकानाचे निलंबन करण्याची धमकी देत रेशन दुकानदाराकडून दहा हजाराची खंडणी उकळण्यात आली. या दोन खंडणीखोरांना मंगळवारी सायंकाळी दर्गा चौकातील पाकिजा रसवंती येथे रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी शुक्रवारपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

संजय भिकाजी साळवे (वय ४५, रा. पेशवेनगर, सातारा परिसर) यांच्या पत्नीच्या नावावर रेशन दुकान क्रमांक २४७ आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी त्यांच्या दुकानात दोन अनोळखी व्यक्ती आल्या. आम्ही दक्षता समीतीचे सदस्य असून तुमच्या विषयी आमच्याकडे तक्रार आली आहे. तुम्ही चारशे क्विंटल माल परस्पर विकला आहे, असे सांगत दुकानमालकाची विचारणा केली. साळवे यांनी त्यांना परिचय विचारला असता त्यांनी कल्याण अप्पासाहेब धुळे (रा. चिकलठाणा, हनुमान चौक) व राजीव मुकुंद वाकोडे (रा. उल्कानगरी) अशी नावे सांगितली. साळवे यांच्या पत्नीकडून त्यांनी रेशन दुकानाचा निरीक्षण टिपणी फॉर्म भरून घेतला व नंतर दुकान निलंबित करण्याची धमकी दिली. दुकान निलंबित करायचे नसेल तर साळवे पती-पत्नीकडे या दोघांनी एक लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. यावेळी घाबरून साळवे यांनी त्यांना दहा हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम २४ एप्रिल रोजी देण्याचे ठरले. यानंतर साळवे यांनी तहसील कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता त्यांनी तपासणी करण्याचे व पैसे घेण्याचे कोणालाही अधिकार नसल्याचे सांगितले. यानंतर या दोघांनी उर्वरित पैशासाठी तगादा लावला. मंगळवारी सायंकाळी दर्गा चौकातील पाकिजा रसंवतीजवळ त्यांना रक्कम घेऊन बोलावले. साळवे यांनी या संदर्भात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सातारा पोलिस ठाण्याचे पीएसआय डोईफोडे व पथकाने पाकिजा रसंवती येथे साध्या वेशात सापळा रचला. सायंकाळी आरोपी कल्याण धुळे व राजीव वाकोडे यांनी साळवे यांच्याकडून दहा हजार रुपये घेताच पोलिसांनी त्यांना जागेवर अटक केली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी

पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची राजकीय पार्श्वभूमी आहे. कल्याण धुळे याचे फेसबुकवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो देखील आहेत. आरोपींना क्रांतीचौकच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी नगरसेवकांसह इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

आरोपींना शुक्रवारपर्यंत कोठडी

या प्रकरणी दोन्ही आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी फिर्यादीकडून घेतलेले दहा हजार रुपये जप्त करणे बाकी असून, आरोपींनी या प्रकारे किती जणांकडून खंडणी घेतली, आरोपींचे कोणी साथीदार आहेत आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टपऱ्या हटवल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

$
0
0

शिष्टमंडळाचा महापौरांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहागंज, सराफा येथील टपऱ्या, हातगाड्या हटवू नका अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा हातगाडी व टपरी चालकांनी बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिला. भाडेकराराचा कालावधी (लीज) संपला असेल, तर टपऱ्या हटवण्यात येतील. असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

शहगंज, सराफा येथील हातगाड्या व टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश महापौरांनी मंगळवारी दिले होते. त्यानुसार शहगंज येथील चमनच्या भोवतीचे टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता व्यावसायिकांनी पथकाला विरोध केला. यावेळी पालिकेचे विरोधीपक्षनेते फेरोज खान उपस्थित होते. व्यावसायिकांनी बुधवारी फेरोज खान यांच्या नेतृत्वाखाली महापौरांची भेट घेतली व हातगाड्या, टपऱ्या हटविण्यास विरोध केला. हातगाड्या, टपऱ्या हटविण्याची कारवाई झाली, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही व्यावसायिकांनी दिला. टपऱ्यांचे लीज संपलेले असेल, तर टपऱ्या हटविण्यात येतील, असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. लीजची कागदपत्रे सादर करा, असे ते व्यावसायिकांना म्हणाले. व्यावसायिक मात्र कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.

\Bकायद्यानुसार कारवाई करणार\B

फेरोज खान यांनी व्यावसायिकांचे नेतृत्व करताना मंगळवारी पालिकेच्या पथकाला दमदाटी केल्याची तक्रार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला असून, अहवाल प्राप्त झाल्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रृती कोल्हे यांचे निधन

$
0
0

श्रृती कोल्हे यांचे निधन

औरंगाबाद - बीड बायपास, दर्शन विहार येथील रहिवासी श्रृती अमोल कोल्हे (वय २७) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, सासू, सासरे, पती, मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी २६ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता निवासस्थानाहून निघेल. प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुढारीतील अधिकारी अमोल कोल्हे यांच्या त्या पत्नी होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पांडुरंग भांडेकर निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पांडुरंग संभाजी भांडेकर (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सुन, दोन मुली, सहा नातवंडे असा परिवार आहे. ते प्रा. भारती भांडेकर व अर्चना भांडेकर यांचे ते वडिल होते. त्यांच्यावर रात्री १० वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिका बसच्या धडकेत दोन ठार

$
0
0

वाळूज महानगर: कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर महिलांना घरी सोडणाऱ्या रुग्णवाहिकेला खासगी बसने मागून धडक दिली. या अपघातात दोन महिला ठार, तर नऊ महिला व एक मुलगा, असे दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद-पुणे महामार्गावर जिकठाण फाटा येथे झाला. ताराबाई ज्ञानेश्वर बहादुरे (५० रा. लहाण्याची वाडी ता. फुलंब्री), जानकाबाई जनार्धन पवार (६० रा डिघी ता. गंगापूर), अशी मृत महिलांचे नाव आहेत.

गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कुटुंब कल्याण शस्रक्रिया शिबिरात महिलांना जिकठाण आरोग्य केंद्रातून शस्त्रक्रियेसाठी नेले होते. शस्रक्रियेनंतर महिलांना रुग्णवाहिकेतून (एम एच २० डब्लु ९५७३) घरी पाठवले जता होते. रहीमपूर येथे जाण्यासाठी जिकठाण फाट्यावर वळण घेताना मागून आलेल्या खासगी बसने (एम एच ०९ बी सी ९५४०) जोराची धडक दिली. या अपघातामध्ये जनाबाई बाळकृष्ण थोरात (५०), लक्ष्मीबाई बंडु बोडखे (४५), अनिता संतोष वायसळ (३०), मनिषा सखाराम सावंत (२८), जनाबाई लक्ष्मण बारहाते (२६), वैशाली गोकुळ बोबडे (२६) अनिता संतोष घोडके (२०), कविता आसाराम थोरात (२८), अनिता बारसळे (२४), प्रसाद आत्माराम थोरात (०३) हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमीना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोन महिलांना मृत घोषित केले. गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. खासगी बसचा चालक शेख सरफराद (रा. सोलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाळूज पोलिस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार डी. एम. साठे हे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवीच्या मुलीची छेडछाड; आरोपीला सक्तमजुरी, दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद तालुक्यातील गावातल्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीची वारंवार छेडछाड काढणाऱ्या आरोपीला दोन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी ठोठावली.

या प्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १ सप्टेंबर २०१३ रोजी आरोपी गणेश रतन किर्तीकर (१९, रा. औरंगाबाद तालुक्यातील गाव) हा पीडित मुलीच्या घरात आला आणि त्याने मुलीच्या हाती चिठ्ठी देऊन 'उत्तर दे', असे सांगून निघून गेला. त्यात 'माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुही माझ्या प्रेम कर' या प्रकारचा मजकूर लिहिलेला होता. मुलीने घाबरुन चिठ्ठी फाडून टाकली. त्यानंतर मुलगी शाळेत जाताना-येताना आरोपी तिचा सातत्याने पाठला करत होता. ७ सप्टेंबर २०१३ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मुलगी तिच्या चुलत बहिणीसोबत दळण आणण्यास गेली असता, आरोपी तिचा पाठलाग करीत घरापर्यंत आला. कंटाळून मुलीने तिच्या वडिलांना प्रकार सांगितला व तिचे वडील आरोपीला समजावण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता आरोपी पळून गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन कलम ३५४ (ड) अन्वये एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान, आरोपीविरुद्ध पोस्को कायद्याच्या कलम ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल होऊन कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

... तर अतिरिक्त कारावास

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडित मुलगी, तिची चुलत बहीण तसेच मुख्याध्यापकाची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन आणि पोस्को कायद्याच्या पर्यायी शिक्षेच्या तरतुदीनुसार कलम १२ अन्वये दोन महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा कोर्टाने आरोपीला ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानदाराकडून दहा हजाराची खंडणी घेताना दोघे गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दक्षता समितीचे सदस्य असल्याचे सांगत दुकानाचे निलंबन करण्याची धमकी देत रेशन दुकानदाराकडून दहा हजाराची खंडणी उकळण्यात आली. या दोन खंडणीखोरांना मंगळवारी सायंकाळी दर्गा चौकातील पाकिजा रसवंती येथे रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी शुक्रवारपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

संजय भिकाजी साळवे (वय ४५, रा. पेशवेनगर, सातारा परिसर) यांच्या पत्नीच्या नावावर रेशन दुकान क्रमांक २४७ आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी त्यांच्या दुकानात दोन अनोळखी व्यक्ती आल्या. आम्ही दक्षता समीतीचे सदस्य असून तुमच्या विषयी आमच्याकडे तक्रार आली आहे. तुम्ही चारशे क्विंटल माल परस्पर विकला आहे, असे सांगत दुकानमालकाची विचारणा केली. साळवे यांनी त्यांना परिचय विचारला असता त्यांनी कल्याण अप्पासाहेब धुळे (रा. चिकलठाणा, हनुमान चौक) व राजीव मुकुंद वाकोडे (रा. उल्कानगरी) अशी नावे सांगितली. साळवे यांच्या पत्नीकडून त्यांनी रेशन दुकानाचा निरीक्षण टिपणी फॉर्म भरून घेतला व नंतर दुकान निलंबित करण्याची धमकी दिली. दुकान निलंबित करायचे नसेल तर साळवे पती-पत्नीकडे या दोघांनी एक लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. यावेळी घाबरून साळवे यांनी त्यांना दहा हजार रुपये दिले व उर्वरित रक्कम २४ एप्रिल रोजी देण्याचे ठरले. यानंतर साळवे यांनी तहसील कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता त्यांनी तपासणी करण्याचे व पैसे घेण्याचे कोणालाही अधिकार नसल्याचे सांगितले. यानंतर या दोघांनी उर्वरित पैशासाठी तगादा लावला. मंगळवारी सायंकाळी दर्गा चौकातील पाकिजा रसंवतीजवळ त्यांना रक्कम घेऊन बोलावले. साळवे यांनी या संदर्भात सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सातारा पोलिस ठाण्याचे पीएसआय डोईफोडे व पथकाने पाकिजा रसंवती येथे साध्या वेशात सापळा रचला. सायंकाळी आरोपी कल्याण धुळे व राजीव वाकोडे यांनी साळवे यांच्याकडून दहा हजार रुपये घेताच पोलिसांनी त्यांना जागेवर अटक केली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी

पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची राजकीय पार्श्वभूमी आहे. कल्याण धुळे याचे फेसबुकवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत फोटो देखील आहेत. आरोपींना क्रांतीचौकच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी नगरसेवकांसह इतर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

आरोपींना शुक्रवारपर्यंत कोठडी

या प्रकरणी दोन्ही आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपींनी फिर्यादीकडून घेतलेले दहा हजार रुपये जप्त करणे बाकी असून, आरोपींनी या प्रकारे किती जणांकडून खंडणी घेतली, आरोपींचे कोणी साथीदार आहेत आदी बाबींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैशाच्या मागणीवरून नेहमी होणाऱ्या छळाला कंटाळून सहा महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजता खोकडपुरा, बीडी कामगार सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. रुपाली स्वप्नील जोंधळे (वय १९) असे या विवाहितेचे नाव आहे. आरोपींच्या अटकेची मागणी करीत संतप्त नातेवाईकांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी याप्रकरणी पती व सासूला अटक करीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

क्रांतीचौक पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार गारखेडा भागातील रुपाली कीर्तीकर हिचा १ जून २०१७ रोजी स्वप्नील रमेश जोंधळे (रा. खोकडपुरा) याच्यासोबत विवाह झाला होता. स्वप्नील हा एमजीएममध्ये कंत्राटी कामगार म्हणून कामाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिल्यानंतर पती स्वप्नील व सासू मालकाबाई यांनी तिला माहेरून पैसे आणण्याची मागणी करीत छळ सुरू केला. रुपालीच्या माहेरची परिस्थिती हलाखीची होती तरी देखील तिच्या वडिलांनी तिला काही मदत केली. गेल्या चार महिन्यांपासून रुपालीचा अधिक छळ करण्यात येत होता. रुपाली गर्भवती असल्याचे सांगत तिच्या माहेरच्या मंडळीनी पती व सासूची समजूत देखील काढली होती. यानंतर काही दिवस मायलेक शांत राहिले. यानंतर पुन्हा त्यांचा छळ सुरू झाला. तीन दिवसांपूर्वी रुपालीच्या माहेरच्या मंडळींनी त्यांची पुन्हा समजूत काढली. मंगळवारी या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रुपालीने माहेरी फोन करून ही माहिती दिली. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास तिने गळफास घेतला. तिला घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता रात्री सव्वा अकरा वाजता तिला मृत घोषित केले. रुपालीच्या मृत्यूनंतर तिच्या माहेरच्या मंडळीनी संतप्त भूमिका घेतली. यामुळे काही काळ घाटीत वातावरण तणावग्रस्त झाले. क्रांतीचौक पोलिस ठाण्यात ही मंडळी येऊन धडकली. आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी त्यांची समजूत घातली. या प्रकरणी पती स्वप्नील व सासू मालकाबाई यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची माहिती निरीक्षक परोपकारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images