Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दुचाकीस्वार मंगळसूत्र चोराने गंठण लांबवले

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हेल्मेटधारी दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता सातारा छत्रपतीनगरात हा प्रकार घडला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपतीनगरातील २२ वर्षाची विवाहिता सासू व जावेसोबत घराजवळ असलेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास या तिघी पायी परत येत होत्या. यावेळी एक हेल्मेट घातलेला दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला. या महिलेच्या गळ्यात असलेले ४० हजारांचे शॉर्ट गंठण व मंगळसूत्र हिसकावून पसार झाला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून या दुचाकीस्वाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय ओगले याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्राचार्यांच्या बैठकीचा फोटो

कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी प्रामुख्याने हॉटेस, मंगल कार्यालये, मोठे व्यावसायिक प्रतिष्ठानांना प्राधान्य दिले जाणार आहे. पालिकेने आतापर्यंत सुमारे ५० व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली असून, ५० हजारांपर्यंत दंड वसूल केला आहे.

शहरात विविध ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेने व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. हॉटेल, मंगल कार्यालये आणि मोठमोठी व्यावसायिक प्रतिष्ठाने यातून निघणारा कचरा वर्गीकरण करूनच संबंधितांनी महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीत दिला पाहिजे. त्याचबरोबर त्यावर प्रक्रिया देखील जागेवरच केली पाहिजे, अशी सक्ती महापालिकेने केली आहे. आतापर्यंत कठोर कारवाई केली जात नव्हती, परंतु आता कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याचे पालिकेच्या प्रशासनाने ठरविले आहे. यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका आयुक्तपदी डॉ. निपून विनायक ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. निपुण विनायक यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. विनायक यांच्या बदलीचे आदेश सायंकाळी उशिरा पालिकेला प्राप्त झाल्याची चर्चा होती, परंतु आदेश प्राप्त झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

महापालिका आयुक्तपदी डॉ. निपुण विनायक येणार असल्याची चर्चा एक महिन्यापासून आहे. डॉ. विनायक केंद्र सरकारमध्ये स्वच्छता अभियान या उपक्रमाचे सचिव आहेत. औरंगाबाद शहरात निर्माण झालेली कचराकोंडी लक्षात घेऊन त्यांना आयुक्त म्हणून पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. केंद्रातून राज्यात बदली करण्यासाठी काही प्रशासकीय कार्यवाही करावी लागते. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर डॉ. विनायक रूजू होतील असे बोलले जात होते. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे शासनाने डॉ. विनायक यांच्या बदलीचे आदेश काढल्याचे बोलले जात आहे. कचराकोंडीच्या मुद्यावरून राज्य शासनाने डी. एम. मुगळीकर यांची पालिका आयुक्तपदावरून बदली केली होती, तेव्हापासून आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ परीक्षांचा पोरखेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा म्हणजे पोरखेळ झाला आहे. ग्रामीण भागातील कॉलेजांमध्ये सर्रास कॉप्या केल्या जातात,. त्यामुळेच शहरातील परीक्षा केंद्रावरही असे प्रकार समोर येत आहेत,' असा आरोप प्राचार्यांनीच केला आहे. परीक्षार्थींनी आत्महत्येची धमकी दिल्याच्या घटनांनंतर गुरुवारी झालेल्या प्राचार्यांच्या बैठकीत 'होम सेंटर' व 'ओपन बुक एक्झाम' या मागणीबद्दल मतभेद समोर आले.

एमआयटी कॉलेजमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्येची धमकी देण्याचे प्रकार घडले. यामुळे प्राचार्य, प्राध्यापकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्राचार्य संघटनेने गुरुवारी डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमनमध्ये तातडीची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच प्राचार्यांची उपस्थिती होती.

या बैठकीत बोलताना उपस्थित प्राचार्यांनी आत्महत्यांच्या धमकीच्या प्रकाराबद्दल विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षाला कारणीभूत ठरविले. ग्रामीण भागात कॉपी करू दिली जात असल्याने शहरातील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचाही आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या धमक्यांमुळे प्राध्यापकांमध्ये भीती असल्याचे सांगत विद्यापीठाने सरंक्षण देण्याची मागणी डॉ. फारूकी यांनी केली. डॉ. प्रधान म्हणाल्या, अशा प्रकारांबाबत कायदेशीर बाजू तपासून प्राचार्यांनी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही केली गेली पाहिजे. डॉ. राव यांनी परीक्षेतील अडचणी मांडत विद्यापीठाच्या चुकांचा फटका बसत असल्याचे सांगितले. 'होम सेंटर'ची मागणी करत डॉ. साळवे यांनी ग्रामीण भागातील मोठ्या कॉपी होत असल्याचे सांगितले. शहरालगतच्या चौका, वाळूज येथील कॉलेजांमध्ये पदवी, पदव्युत्तर परीक्षांचा बाजार आहे. शहरात कॉपी करू दिली जात नसल्याचे धमकी दिली जाते. हे प्रकार रोखण्याची गरज प्राचार्यांनी व्यक्त केली.

\Bकायद्याच्या नियमावलीत समावेश\B

नवीन विद्यापीठ कायदा आला, परंतु राज्यभरासाठी एकत्रित नियमावली (स्टॅट्यूट) तयार होत आहे. परीक्षार्थींच्या अशा प्रकरणांची दखल घेत प्राचार्य, पर्यवेक्षकांना सरंक्षण देण्याबाबत नियम करता येईल का, याचा विचार केला जात आहे. औरंगाबादमधील घटनांनंतर प्राचार्य महासंघ त्याबाबत प्रयत्न करते आहे, असे सांगण्यात आले. याबाबत प्राचार्यांनी सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले.

\Bया प्राचार्यांची उपस्थिती

\B

डॉ. बी. पी. भैरट, डॉ. मझहर फारूकी, डॉ. एस. आर. टकले, डॉ. विजय भोसले, डॉ. वैशाली प्रधान, डॉ. मुक्ती जाधव, डॉ. आर. पी. कासार, डॉ. आर. के. इप्पर, डॉ. सी. एम. राव, डॉ. उल्हास शिऊरकर, डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. उल्हास शिंदे, डॉ. शेख कबीर, डॉ. एस. डी. राठोड, डॉ. शहाबुद्दीन शेख, डॉ. सतीश सुराणा, डॉ. फातेमा, डॉ. के. एल. साळवे, डॉ. संतोष भोसले, डॉ. एन. जी. पाटील, एस. जी. देशमुख यांची उपस्थिती होती.

\Bप्राचार्यांची समन्वय समिती

\B

प्राचार्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून तिच्यात दहा प्राचार्यांचा समावेश राहणार आहे. विद्यार्थ्यांकडून आत्महत्येची धमकी देण्याचे प्रकार झाल्यानंतर प्राचार्य, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करू नयेत, यासाठी समिती प्रशासकीय बाजू पाहतील, असे सांगण्यात आले. प्राचार्यांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त, लोकप्रतिनिधींना निवेदन देणार आहेत.

आठवड्यात घडलेल्या दोन प्रकारांमुळे भीती आहे. ग्रामीण भागात तर, कॉपी करू द्या, असा दबाव अनेकदा आमदारांकडूनही येतो. त्यामुळे प्राचार्यांनी काय करावे ? शहरातील या प्रकारांमुळे ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. विद्यापीठाशीही चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

-डॉ. बी. पी. भैरट, प्राचार्य महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशीन खरेदीच्या निविदा आज अंतिम करणार

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

घनकचरा व्यवस्थापनासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीप्रसंगी महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. मशीन खरेदीच्या निविदा शुक्रवारी उघडण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सात जागांशिवाय नव्याने दोन जागांचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. न्या. संभाजी शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी याचिकेवर चार जूनला सुनावणी ठेवली.

झाल्टा येथील १६०० चौरस मीटर जागेवर महापालिका कचरा टाकत असून, जागेच्या मालकाने खंडपीठात याचिका दाखल करून मोबदला देण्याची मागणी केली असता. ही रक्कम खंडपीठात जमा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. शासन व महापालिकेच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करून खंडपीठाला कचरा विल्हेवाटीसंबंधी माहिती देण्यात आली. अशोक कचरू मुळे व इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर खंडपीठात सुनावणी झाली. महापालिकेला योग्य मार्गदर्शन कचरा विल्हेवाटीसंबधी करण्यात येत असल्याचे शासनातर्फे सांगण्यात आले. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत १२ एप्रिल रोजी बैठक घेण्यात आल्याचे खंडपीठात सांगण्यात आले. महापालिका बरखास्तीच्या याचिकेवर राज्यशासन व महापालिकेने वेळ मागून घेण्यात आला. झाल्टा येथील जागामालकाच्या वतीने सचिन पन्हाळे यांनी याचिका दाखाल केली. झाल्टा येथील आपल्या १६०० चौरस मीटर जागेवर महापालिकेच्या वतीने कचरा टाकण्यास प्रारंभ केला आहे. अद्याप जागेचा मोबदला महापालिकेच्या वतीने देण्यात आलेला नाही. ६१०० रुपये प्रति चौरस मीटर रेडिरेकनरचा दर आहे. या जागेसंबंधी एक आठवड्यात रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

\Bमहापौरांचे निवेदन\B

महापौर नंदकुमार घोडेले यांनी खंडपीठात निवेदन करण्याची विनंती केल्यानंतर त्यास मान्यता प्रदान करण्यात आली. पालिकेचे संभाजी टोपे यांनी आपण सकाळी साडेपाचपासून कचरा व इतर समस्यांचा आढावा घेत असल्याची माहिती दिल्याचे खंडपीठाने सांगितले. महापौरांनी नागरिकांकडून कराचा भरणा होत नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. केवळ १६ टक्के वसुली असल्याने विकासकामांना निधी प्राप्त होत नाही, असे घोडेले यांनी स्पष्ट केले. यावर खंडपीठाने एक लाख ३२ हजार नळजोडण्या अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. असे असेल तर वसुली कशी होईल, असा प्रतिप्रश्न खंडरपीठाने उपस्थित केल्याने घोडेलेंची बोलती बंद झाली. कांचनवाडी येथे कचरा टाकण्यात येत असल्याचे फोटो अॅड. प्रज्ञा तळेकर यांनी कोर्टात सादर केले. मिटमिटा येथे कचरा टाकण्यास दिलेली अंतरिम स्थगिती कायम केली. सुनावणीस विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेलिफला मारहाण; कुख्यात आरोपीचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोर्टाची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या बेलिफला मारहाण करुन घराबाहेर काढणाऱ्या कुख्यात आरोपी शेख अब्दुल बारी शेख अब्दुल रहीम याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी फेटाळला.

या प्रकरणी जिल्हा कोर्टाचा बेलिफ भालचंद्र भावराव देशमुख (५०, रा. रोहिदास कॉलनी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २ डिसेंबर २०१७ रोजी फिर्यादी हा आरोपी शेख अब्दुल बारी शेख अब्दुल रहीम (७०, रा. सिडको एन-१२, औरंगाबाद) व त्याच्या पत्नीच्या नावे कोर्टाने बजावलेली नोटीस आरोपीला देण्यासाठी गेला असता, आरोपीने त्याला घरात बोलावून मारहाण केली. तसेच आरोपीच्या पत्नीने फिर्यादीला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली व घराबाहेर काढले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन कलम ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये सिटी चौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला २४ एप्रिल रोजी अटक करण्यात येऊन आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, आरोपीने नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, आरोपीविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपीच्या दहशतीमुळे साक्षीदार व पंच पुढे येत नाही. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लुटमार करणाऱ्यास एक वर्ष सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाविद्यालयीन युवकास रेल्वे कॅबिनजवळ अडवून चाकुचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या आरोपी राहुल खरात याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांनी ठोठवली.

पोटुळ येथे राहणारा संदिप प्रधान व त्याचा मित्र अशोक प्रधान हे दोघे ८ ऑगस्ट २०१३ रोजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर उतरुन एमआयटी महाविद्यालयात रेल्वे पटरीने पायी निघाले होते. दोघे पायी जाताना पाठीमागून आरोपी राहूल खरात (रा. कबीरनगर) हा आला आणि 'मला तुमच्यासोबत येऊ द्या' असे म्हणत तिघे रेल्वे पटरीने जाताना रेल्वे कॅबिनच्या परिसरात कोणी नसल्याचे पाहून राहुल खरात याने शिविगाळ करत चाकू पोटाला लावत जिवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल व रोख रक्कम हिसकावून पळ काढला. अशोक प्रधान याच्या तक्रारीवरुन लोहमार्ग पोलिस ठाण्यात राहूल खरात याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सहाय्यक सरकारी वकील आशिष दळे यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने भादंवि ३९२ कलमान्वये दोषी ठरवून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोव्याच्या दारुची शहरात तस्करी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गोव्याच्या दारुची शहरात तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. बुधवारी रात्री पावणेअकरा वाजता एमआयडीसी वाळूज भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून विदेशी दारुचे ८४ युनिट तसेच ओम्नी व्हॅन व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळूज एमआयडीसी भागातील गुड इयर टायर कंपनीजवळील चौकात दोन संशयित विदेशी दारुची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. यावेळी जोगेश्वरी गावाकडून संशयित ओम्नी व्हॅन व दुचाकीवर एक तरुण येत असताना पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी या व्हॅनसह दुचाकी चालकाला ताब्यात घेतले. यावेळी व्हॅनची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातील गोणीमध्ये गोल्ड अँड ब्लॅक, ट्रीपल एक्स रमचे गोवा येथील ८४ युनीट जप्त करण्यात आले. संशयित आरोपी संतोष प्रल्हादराव जाधव (वय ३६ रा. मेवाड लॉजच्या बाजूला, नागेश्वरवाडी) तसेच पुण्यवर्धन चंद्रभान साळवे (वय २५ रा. एन ९, पवननगर, हडको) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, जमादार सुभाष शेवाळे, सतीश हंबर्डे, विजयानंद गवळी, सिध्दार्थ थोरात, सय्यद अशरफ, नितीन धुळे, कांबळे, बोरडे यांनी केली.

पाचपट किंमतीत विक्री

या रमच्या एका युनिटची किंमत गोव्यात ९७ रुपये आहे. आरोपी या बाटलीवरचे लेबल काढून त्याची सैन्यदलातील मद्य असल्याचे सांगत किमान चारशे ते पाचशे रुपयाला ब्लॅकमध्ये विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात ६७ टक्के धान्य ई-पॉस द्वारे वाटप

$
0
0

मराठवाड्यात ६७ टक्के धान्यवाटप इ-पॉसद्वारे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने मोठा गवगवा करत मराठवाड्यातील प्रत्येक रेशन दुकानांवर 'ईपीओएस' (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) मशीन बसवल्या असून या द्वारे ६७ टक्के धान्यवाटपाचे व्यवहार करण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील धान्याचा काळाबाजार रोखून गोरगरीबांचे धान्य विक्री करून मलिदा लाटणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी ११ हजार ४४१ पैकी ११ हजार ४३० रेशन दुकानांमध्ये इ पॉस मशीन बसवण्यात आले. प्रत्येक कार्डधारकाचा योजनानिहाय डेटा या मशीनमध्ये अपलोड करण्यात येऊन हे मशीन सुरू करण्यात आले असून याद्वारे आतापर्यंत आधार इलेबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टिम (एईपीडीएस) च्या माध्यमातून २० लाख १२ हजार ९०१ (६७ टक्के) कार्डधारकांनी व्यवहार करून धान्य प्राप्त ‌केले आहे.

मराठवाड्यात विविध योजनांचे ३९ लाख ४५ हजार ८१९ ‌रेशनकार्डधारक असून यापैकी आधार कार्ड जोडणी केलेल्या लाभधारकांची संख्या ३० लाख २२ हजार ९०१ संख्या आहे. यापैकी मार्च अखेर २० लाख १२ हजार ९०१ लाभधारकांनी रेशनदुकानातुन इ-पॉस द्वारे व्यवहार केले. नवीन प्रणालीद्वारे धान्य घेणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी अद्यापही धान्याचा काळाबाजार रोखणार कसा असा प्रश्न मात्र कायम आहे.

मार्च अखेरपर्यंत सर्वाधिक ७४ टक्के व्यवहार हे नांदेड जिल्ह्यात झाले असून त्यापाठोपाठ जालना ७२ टक्के, उस्मानाबाद ७० टक्के, लातूर ६९ टक्के, बीड ६६ टक्के, हिंगोली ६६ टक्के, परभणी ६५ टक्के, औरंगाबाद ५२ टक्के असे व्यवहारांचे प्रमाण आहे.

शिल्लक धान्याचे काय?

मराठवाड्यात ३० लाख २२ हजार ९०१ इतके व्यवहार पुरवठा विभागाला अपेक्षित असून यापैकी २० लाख १२ हजार ९०१ व्यवहार झाले आहेत तर उर्वरित १० लाख व्यवहार हे जुन्या पद्धतीने झाले असल्याचे स्पष्ट होते. मात्र, जिल्ह्यामध्ये महिन्याभरात किती धान्य उरले याबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे. मराठवाड्यात विविध योजनांचे ३९ लाख ४५ हजार ८१९ ‌रेशनकार्डधारक असून यापैकी ज्यांनी आधार जोडणी केली नाही अशांना पावती द्वारे धान्याचे वाटप करण्यात येते, अशा किती कार्डधारक रेशन दुकानातून धान्‍य घेतात किती महिन्याला धान्‍य शिल्लक राहते याची आकडेवारी मात्र पुरवठा विभागाकडे नाही.

----.

मार्चअखेरची धान्यवाटपाची स्थिती

जिल्हा...................... आधार जोडणी असलेले कार्ड................ इ-पॉसचे व्यवहार (टक्के)

नांदेड.................................५७०६१२..................................४२२५८१ (७४)

जालना.................................३२००६९................................२२९६४८ (७२)

उस्मानाबाद...........................२९८८७१.................................२०८४३८ (७०)

लातूर....................................३५९०५०...............................२४६९७४ (६९)

बीड.....................................५२३८९२.................................३४७०४३ (६६)

हिंगोली..................................१९०४४९.................................१२५४८३ (६६)

परभणी..................................२६७८२३.................................१७४३६७ (६५)

औरंगाबाद...............................४९२१३५...............................२५८३६७ (५२)

------------------------------------------------------------------.

एकूण.....................................३०२२९०१............................२०२२९०१ (६७)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विषय समित्यांवर ४४ नगरसेवकांची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या पाच विषय समितीवर गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ४४ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. शहर सुधार समितीसाठी फक्त आठ सदस्य नियुक्त करण्यात आले. अन्य समितीसाठी प्रत्येकी नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

विषय समिती आणि त्यावर नियुक्त करण्यात आलेले सदस्य पुढील प्रमाणे आहेत. महिला व बालकल्याण समिती : सुरेखा सानप, आशा भालेराव, मनिषा लोखंडे, माधुरी अदवंत, मनिषा मुंडे, शेख समीना शेख इलियास, सरवत बेगम आरेफ हुसैनी, राजू तनवाणी, मुल्ला सलीमा बेगम खाजोद्दीन. आरोग्य समिती : स्मिता घोगरे, मीना गायके, आत्माराम पवार, अप्पासाहेब हिवाळे, नितीन चित्ते, सय्यद मतीन रशीद, शेख जफर शेख अख्तर, कीर्ती शिंदे, सायली जमादार. शहर सुधार समिती : कमलाकर जगताप, नितीन साळवी, मनोज गांगवे, शोभा वळसे, शिवाजी दांडगे, साजेदा फारुकी सईद फारुखी, नसीम बी सांडू खान, खान अय्युब मोहम्मद हुसेन खान.

शिक्षण समिती : मनोज बल्लाळ, रावसाहेब आम्ले, ज्योती पिंजरकर, बबिता चावरिया, कमल नरोटे, जहागीरदार महोम्मद अय्युब, लता निकाळजे, सुनिता चव्हाण, शबनम बेगम कलीम कुरैशी. समाज कल्याण समिती : सीमा चक्रनारायण, सुभाष शेजवळ, जोहराबी नासेर खान, विमल केंद्रे, ज्योती नाडे, सरिता बोर्डे, गंगाधर ढगे, शोभा बुरांडे, अनिता साळवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयआयआयडी’ची शाखा स्थापनेसाठी शहरात तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंटेरियर डिझायनर्स, आर्किटेक्ट व ट्रेडर्स या व्यावसायिकांची संघटना, 'आयआयआयडी'ची शाखा लवकरच शहरात स्थापन करण्यात येणार आहे. त्याबद्दलची माहिती शहरात झालेल्या या तीन व्यावसायिकांच्या एका बैठकीत देण्यात आली.

यावेळी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आर्किटेक्ट जिग्नेश मोदी (सुरत), आर्किटेक्ट रवींद्र अंचुरी (हैद्राबाद), अहमदनगर शाखेचे आर्किटेक्ट चंद्रकांत तागड, माजी अध्यक्ष अमोल खोले, संचालक विशाल मुसळे हे उपस्थित होते. या संघटनेची स्थापना १९७२ मध्ये करण्यात आली आहे. इंटिरियर डिझाइन व्यावसायिकांचे प्रश्न सोडवणे, व्यावसायिक प्रदर्शन भरवणे, डिझाइन यात्रा या मोहिमेतून सामाजिक उपक्रम आदी कार्य देशातील ३० शाखांमार्फत केले जाते. शहरात संघटनेची शाखा दोन महिन्यांमध्ये सुरू होत असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावेळी जिग्नेश मोदी म्हणाले, सध्या सर्वसामान्यांनाही कमी खर्चात इंटेरिअर करून देण्याचे आव्हान व्यावसायिकांसमोर आहे. प्रा.अनंत देशपांडे यांनी शहरात आर्किटेक्ट संघटना आहे, परंतु इंटेरिअर डिझायनर्स व ट्रेडर्सची संघटना नसल्याचे सांगितले. बैठक यशस्वी करण्यासाठी गजानन चव्हाण, विशाल झंवर, सागर मंडलिक, दीपक बागुल, आनंद सूर्यवंशी, विपुल पटेल, दिव्येश कापडिया आदींनी परिश्रम घे​तले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळा कायदा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सहकार कायद्यातून गृहनिर्माण संस्थेचा कायदा वेगळा करावा, यासह अन्य मागण्यासाठी औरंगाबाद जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर वाहन मोर्चा काढण्यात आला.

गृहनिर्माण संस्थेच्या अडीअडचणी दूर करा, यासह अन्य घोषणा देत पैठण गेट येथून सकाळी नऊ वाजता मोर्चास सुरुवात झाली.

गृहनिर्माण संस्थेच्या समस्या, अडचणीकडे दुर्लक्षित होत असल्याने आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष जे. सी. फ्रान्सिस यांनी नमूद केले. औरंगाबादेत १ हजार ६०० गृहनिर्माण संस्था असून त्यापैकी ५० टक्के संस्था अवसायनात काढून बंद करण्यात आल्या आहेत. अडचणी समजावून न घेता फक्त लेखापरिक्षण केले नाही, निवडणुका घेतल्या नाही म्हणून कारवाई झाली असून या संस्था पुनर्जिवित कशा होतील, त्यांचे व्यवस्थापन वर्गणी, इमारत दुरुस्ती, मालकी हक्क व अन्य अडचणी भविष्यात होतील, याकडे संबंधित विभागाने काहीही केलेले नाही, असा आरोप त्यांनी केला. शहरात ४० हजार पेक्षा जास्त अपार्टंमेंट आहेत, परंतु त्यापैकी ५ टक्के गृहनिर्माण संस्थांचीही नोंदणी झालेली नाही. नोंदणी का होत नाही, असा सवालही त्यांनी करत सहकार कायद्यातून गृहनिर्माण संस्थेचा कायदा वेगळा व स्वतंत्र करावा अशी मागणी केली.

संस्थेची नोंदणी करण्यास दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करा, स्वत:च्या निधीतून साफसफाई, पाणी पुरवठा आदी कामे करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांकडून मनपाने ५० टक्के कर आकारणी करावी, विकसकाने भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या गृहनिर्माण संस्थांना भोगवटा प्रमाणपत्र विशेष योजनेखाली तात्काळ द्यावे, हे प्रमाणपत्र मिळाल्यावरच फ्लॅट व मिळकत धारकांना कर लावा यासह सहकार, महापालिका तसेच नोंदणी व मुद्रांक व महसूल विभागाशी निगडित प्रश्नांसंदर्भात लक्ष वेधण्याचा प्रयत्न मोर्चेकऱ्यांनी केला. गुलमंडी, जुना बाजार मार्गे महापालिकेवर मोर्चा गेला. त्याप्रसंगी मोर्चेकऱ्यांनी महापालिका प्रशासनास निवेदन सादर करण्यासाठी गेले, परंतु अर्ज आवक, जावक विभागात कोणीही उपस्थित नसल्याने मोर्चेकरी पुढे मार्गस्थ झाले. किलेअर्क मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. त्यावेळी महापौर नंदुकुमार घोडेले यांनी तेथे येत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत त्यांचे निवेदन स्वीकारले.

त्यानंतर विभागीय आयुक्तांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. जे. के. ग्रोव्हर, कैसर खान, गणेश देशमुख, नीलेश खरोटे यांच्यासह मोठ्या संख्येने गृहनिर्माण संस्थेचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, प्रश्न सोडविण्यासंदर्भात आज (शनिवारी) सहकार उपनिबंधक कार्यालयात बैठक होत असून सोमवारी महापालिका प्रशासनाने बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती फ्रान्सिस यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजस्थानी विप्र मंडल अध्यक्षपदी डॉ. उपाध्याय

$
0
0

औरंगाबाद: राजस्थानी विप्र मंडळच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश उपाध्याय यांची निवड करण्यात आली. मंडळाची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. उपाध्याय यांचे नाव संस्थापक आर. बी. शर्मा यांनी सूचवले, तर विजय प्रकाश आसोपा, विजय गौड व पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले. श्रीकृष्ण जोशी यांनी बालकृष्ण मंदिरात सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. यावेळी सर्व घटक समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधी, युवक अध्यक्ष मुकेश तिवारी उपस्थित होते. मंडळाच्या घटनेनुसार २०१८-२०२० या वर्षांसाठी साठी नवीन अध्यक्ष व कार्यकारिणी निवडण्यात आली. संस्थापक अध्यक्ष शर्मा व गायत्री नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आसोपा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साळी समाजाचा रविवारी वधू-वर परिचय मेळावा

$
0
0

औरंगाबाद: साळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा रविवारी (२९ एप्रिल० होत आहे. सिडको एन-५मधील जगदगुरु संत तुकाराम सिडको नाट्यगृहात हा मेळावा सकाळी १० ते सायंकाली ५ वाजेपर्यंत होईल. मेळाव्यास सुमारे तीनशे वधू-वराची नोंदणी झालेली आहे, असे संयोजन समिती प्रमुख संजय एकनाथ सरोदे यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन गाळे विक्रीसाठी बाजार समितीत नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे नव्याने बांधण्यात येत असलेल्या गाळ्यांच्या बुकिंगला प्रारंभ झाला आहे. एकूण किंमतीच्या ३५ टक्के अनामत रक्‍कम जमा करून घेतली जात आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जात असून, गाळ्यांच्या संख्येइतकेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

बाजार समितीच्या पिसादेवी रोडलगत असलेल्या जमिनीवर नव्याने १६० गाळे बांधण्यात येत आहेत. तळमजला आणि वर एक मजला, अशा पद्धतीने गाळ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. रस्त्याच्या बाजुने असलेल्या ४५० चौरस फुटांच्या एका गाळ्याची किंमत २० लाख, तर आतील गाळ्यांची किंमत १७ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. वरच्या मजल्यावरील गाळ्यांच्या किंमती तुलनेने कमी आहेत. भाजी मार्केटमध्येही २० गाळे बांधण्यात येत असून, प्रत्येकी २१ लाख ५० हजारांना त्यांची विक्री केली जाईल. पिसादेवी रोडवरील १६० आणि भाजी मार्केटमधील २०, असे एकूण १८० अर्जच स्वीकारले जाणार आहेत. गाळ्यांच्या किंमतीच्या ३५ टक्के अनामत रक्कम भरणे बंधनकारक आहे. आतापर्यंत पिसादेवी रोडवरील २५, तर भाजी मार्केटमधील ८ गाळ्यांची नोंदणी झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीतील फूल मार्केट पूर्णत्वाकडे

$
0
0

औरंगाबाद: बाजार समितीत बांधण्यात येत असलेल्या फूल मार्केटचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या जून महिन्यापासून हे मार्केट सुरू होण्याचे संकेत आहेत. जाधववाडी येथील बाजार समिती आवारात ३५ लाख रुपये खर्च करून १६ गाळ्यांचे स्वतंत्र फूल मार्केट उभारण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने दिलेल्या मुदतीत काम करण्याचे आव्हान बाजार समितीपुढे होते. आता हे काम अंतिम टप्प्यात असून जूनमध्ये हे मार्केट प्रत्यक्षात सुरू होईल, असे बाजार समितीचे सचिव विजय सिरसाट यांनी सांगितले. सिटी चौकातील फूल विक्रेत्यांना बाजार समितीमध्ये आणण्यासाठी हे मार्केट बांधण्यात येत आहे. आतापर्यंत १६ फूल विक्रेते समितीमध्ये येण्यास तयार झाले आहेत. या विक्रेत्यांना टप्प्या-टप्प्याने पैसे भरण्याची मुभा बाजार समितीने दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन हरभरा खरेदीस अल्प प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नाफेडमार्फत नऊ एप्रिलपासून हरभरा ऑनलाइन खरेदी करण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. सोमवारपर्यंत (२३ एप्रिल) फक्‍त ४२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांच्याकडील २९४ क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.

नाफेडतर्फे ऑनलाइन पद्धतीने खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर ११ मार्चपासून राज्यभरात ऑनलाइन नोंदणीला सुरवात झाली. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, औरंगाबाद, खुलताबाद, कन्नड येथेही हरभरा नोंदणी सुरू करण्यात आली. सोमवारपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू असली तरी शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. सध्यातरी नोंदणीवर भर दिला जात असला तरी प्रतिहेक्‍टरी उत्पादकता जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याने नोंदणीला वेग येत नसल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र चार लाख ४४ हजार ६३५ हेक्‍टर असून, यंदा नऊ लाख सात हजार८० हेक्‍टरवर पेरणी झाली. यंदा अनेक जिल्ह्यांत हरभऱ्यास एकरी चांगला उतारा मिळत असून आधारभूत किंमत प्रती क्विंटल चार हजार ४०० रुपये आहे. खुल्या बाजारात मात्र तीन हजार २०० ते तीन हजार ४०० रुपये दराने व्यापारी हरभरा खरेदी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या वर्षी जलमय झालेल्या मराठवाड्यात यंदा कडक उन्हामुळे औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. एकीकडे टँकरची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मराठवाड्यातील धरणांतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. अवघ्या महिन्याभरामध्ये तब्बल ११.६९ टक्के पाण्याची घट झाली आहे. यामुळे मराठवाड्याची भिस्त आता १६७६ दशलक्ष घनमीटर (२०.९१ टक्के) पाण्यावर राहिली आहे. सध्या ७४६ लघू प्रकल्पात केवळ ११.६७ टक्के, तर मध्यम प्रकल्पात २०.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

यंदा मराठवाड्यात तुलनेत मुबलक पाणी असले तरी औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. यासह नांदेड, जालना, बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. सध्या मराठवाड्यातील ३६३ गावे ७० वाड्यांची तहान ४७२ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या नकाशावर कायम दुष्काळी प्रदेश अशी काहीशी ओळख असलेल्या मराठवाड्यात गेल्यावर्षी दमदार पाऊस झाला. जायकवाडी धरणात पाणीपातळी ८५ टक्‍क्यांपर्यंत पोचली होती. यंदा मुबलक पाणी असल्याने पाण्याची अडचण होणार नाही, असा अंदाज होता. मात्र औरंगाबाद, नांदेड, बीड, जालना जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढल्याने प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले. मार्च तसेच एप्रिल महिन्यातील काही गारपिटीचे दिवस वगळता मराठवाड्यातील सरासरी तापमान ३८ अंश सेल्सियसच्या जवळपास आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. परिणामी, मोठे प्रकल्प, मध्यम तसेच गोदावरी, मांजरा नदीवरील बंधाऱ्यांमधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे प्रकल्पातील पाण्याची मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत प्रकल्पातील पाणीपातळी आणखी घसण्याची शक्यता आहे.

\B१००५ विहिरींचे अधिग्रहण

\B

एप्रिल अखेरीस मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ३२४, नांदेड जिल्ह्यात ६७, जालना ४९, परभणी १६, हिंगोली ११ तर बीड जिल्ह्यात पाच टँकर सुरू करण्यात आले आहेत. टँकरसोबतच विभागातील १००५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

\B

एकूण उपयुक्त पाणीसाठा

(२७ एप्रिल २०१८)\B

मोठे प्रकल्प .............................१२१५.९५ \Bदलघमी \B........................२३.६४ टक्के

मध्यम प्रकल्प ...........................१९२.८९६ \Bदलघमी\B.......................२०.५४ टक्के

लघू प्रकल्प .................................१९०.९६० \Bदलघमी\B.....................११.६७ टक्के

गोदावरी नदीवरील बंधारे...........५७.८०० \Bदलघमी\B...................२५.३१ टक्के

तेरणा, मांजरा नदीवरील बंधारे......१९.०४९ \Bदलघमी\B....................२६.२१ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या नावे मागितली खंडणी; कोठडीमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमिनीसंबंधीचा दावा मागे घेण्यासाठी पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकांच्या नावे पाच लाख रुपये व स्वतःसाठी भूखंड मागणारा कुख्यात आरोपी शेख अब्दुल बारी शेख अब्दुल रहीम याच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (२९ एप्रिल) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी दिले.

या प्रकरणी नासेर खान गनी खान (४२, रा. कटकटगेट, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. घर व जमान मिळून १३ गुंठे जमिनीचा वाद महापालिका व फिर्यादीमध्ये सुरू आहे. या प्रकरणात महापालिका कोर्टाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणाशी संबंध नसताना आरोपी शेख अब्दुल बारी शेख अदु रहीम (७०, रा. सिडको एन १२, औरंगाबाद) याने महापालिका कोर्टात व सिटी सर्व्हे कार्यालयात जमिनीबाबत अर्ज दिला आणि ही जमीन महापालिकेची असल्याचे अर्जात म्हटले होते. याबाबतचा दावा मागे घेण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या नावे तीन लाख रुपये, सिटीचौक पोलिस निरीक्षकांच्या नावे दोन लाख रुपये व स्वतःसाठी भूखंडाची मागणी केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन २५ एप्रिल रोजी अटक होऊन शुक्रवारपर्यंत (२७ एप्रिल) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या मुलाला अटक करणे व सखोल तपास करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images