Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन वर्षांत २७ लाख जणांना रोजगार

$
0
0

Dhananjay.kulkarni@timesgroup.com

@dhananjaykMT

औरंगाबाद : बेकारीच्या गर्तेत कोसळलेल्या राज्यासाठी एक खूषखबर. गेल्या तीन वर्षांत शासनाने उद्योग वाढीला चालना देण्यासाठी अनेक धोरणे राबविली. त्यामुळे तीन लाख ५८ हजार उद्योगांतून सुमारे ८५ लाख ३६२ कोटींची गुंतवणूक झाली, तर २७ लाख ५५ हजार जणांना रोजगार प्राप्त झाला आहे.

आर्थिक पाहणी अहवालात उद्योगात भरीव योगदान झाले असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. २०१५ ते २०१७ या वर्षात शासनाने काही धोरणे बदलल्यामुळे विविध क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्यात टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये नामांकित कंपन्यांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे. याशिवाय परकीय गुंतवणूकदारांसाठी भारत मोठी बाजारपेठ झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत. पर्यायाने ते परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला पसंती देत असल्याने राज्य अव्वल राहिले आहे. राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अनेक नियम, अटी शिथिल केल्या आहेत. यामुळे ही सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

\Bउद्योग धोरण सप्टेंबरमध्ये

\Bराज्य शासन सप्टेंबर, २०१८मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार आहे. यादृष्टीने सरकार लवकरच पावले उचलत असून, आगामी काही महिन्यात उद्योग विभाग या धोरणावरच काम करणार आहे. यातून नवे उद्योग येतील आणि त्यासाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.

\B'मॅग्नेटिक महाराष्ट्र'ने चालना

\Bमॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत तीन हजारांहून अधिक उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे. गेल्या वर्षभरात राज्य सरकारने ९० उद्योग धोरणे राबवली आहेत. या धोरणामुळे विविध क्षेत्राला चालना मिळाळी आहे. इलेक्ट्रीकल व्हेइकल पॉलिसी राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. उद्योगक्षेत्रातील महिलांचे प्रमाण केवळ नऊ टक्के असून, ते २० टक्यांवर नेण्यासाठी उद्योग क्षेत्रात महिलांचा वाटा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

येत्या काही दिवसांत राज्य सरकार नवे उद्योग धोरण राबविणार आहे. नव्या धोरणाने अधिक फायदा होईल. 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' जे फेब्रुवारीत झाले. त्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटींचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. यामुळे आगामी काळ सुद्धा राज्यात उद्योगासाठी फार उत्तम काळ असेल.

- सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, औरंगाबाद एमआयडीसी

शहर - उद्योग - रोजगार - गुंतवणूक

मुंबई - ३० हजार १८३ - ४ लाख ७५ हजार - ९ हजार १५९ कोटी

पुणे - ६९ हजार ७०२ - ७ लाख २३ हजार - २५ हजार ३९९ कोटी

औरंगाबाद - ४४ हजार ५० - २ लाख ८६ हजार - ९ हजार ५६१ कोटी

नाशिक - ३४ हजार ३८९ - २ लाख ६० हजार - १० हजार १३१ कोटी

नागपूर - १ लाख ४६५८ - २ लाख ९३ हजार - ८ हजार १३३ कोटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लखपती यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

समाजवादी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी येथील शेख निजामोद्दिन इमामुद्दिन यांची निवड करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष अकबर पटेल उर्फ शब्बू लखपती यांनी ही निवड केली असून, शेख निजामोद्दिन यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या निवडीबद्दल शेख निजामोद्दिन यांचे अभिनंदन होत आहे. पक्षाच्या संघटनात्मक कार्यावर भर देऊन पक्ष बळकट करण्याचे काम या माध्यमातुन करावे, असे नियुक्तीपत्रात म्हंटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० हजार शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातील विद्यार्थी मूल्यावर आधारित शिक्षण घेऊन तयार व्हावा, आनंददायी शिक्षण घ्यावे, यासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या वर्गासाठी मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षी राज्यातील २१४ तालुक्यांमधील ४० हजार शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.

देशपातळीवर सर्वसाधारणपणे १४ लाख शाळा आहेत. त्यापैकी ८५ टक्के शाळा सरकारी आहेत. प्राथमिक शिक्षण घेताना अजूनही आपल्याकडे परंपरागत पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यातून आनंददायी शिक्षणाचा हेतू बऱ्याचअंशी साध्य होत नाही. भारतीय जैन संघटनेने जुनी पद्धती बदलण्यासाठी अभ्यास केला. त्याचे मॉडेल तयार केले. २००९मध्ये मूल्यवर्धन शिक्षण हा उपक्रम राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला सोपविला गेला. संपूर्ण शाळेचे ट्रान्सफॉर्मेशन करणे, मूल्याधारित शिक्षण देणे असे या मॉडेलचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाने शाळेचे वातावरणच बदलून गेले. ५०० शाळांमधून हा प्रयोग राबविला गेला. त्याचा प्रभाव व परिणाम तपासला गेला. सरकारी यंत्रणांनीही त्यांची तपासणी केली. त्यात आलेल्या सूचनांनुसार काही मूलभूत बदल केले गेले. जिल्हा परिषद शाळांमधील पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यास २०१५ पासून सुरुवात झाली. चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाची गोडी लागली. शाळांमधील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली.

\Bगोव्यातील शाळांचेही मूल्यवर्धन\B

'सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील एक क्लस्टर उपक्रमात घेण्यात आला. पहिल्या वर्षी ७५०, दुसऱ्या वर्षी २० हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. सरकारी यंत्रणेला 'बीजेएस'ने तयार करून दिलेल्या मॉडेलच्या आधारे हा उपक्रम राबविला जात आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पाहून यंदा जुलै २०१८ पासून २१४ तालुक्यांमधील ४० हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे पाहून गोवा सरकारनेही दोन वर्षांपासून तेथील सरकारी शाळांमध्ये हा उपक्रम राबविणे सुरू केले आहे,' अशी माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली

…………

मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जात आहे. मूल्यावर आधारित विद्यार्थी तयार व्हावा, आनंददायी शिक्षण मिळावे, असा या मागचा हेतू आहे.

- शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जैन संघटना

\Bमूल्यवर्धन उपक्रम

\B- १४ लाख एकूण शाळा

- ८५ टक्के सरकारी

- २००९मध्ये उपक्रम सुरू

- ५०० शाळांमधून प्रयोग

- २०१५पासून झेडपी शाळेत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार हजार शिक्षकांच्या बदल्या होणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची उत्सुकता लवकरच संपणार आहे. राज्यभरातील बदलीपात्र जिल्हा परिषद शिक्षकांनी पोर्टलवर आपापली मागणी नोंदविली होती. सोमवारी राज्यातील दोन ते तीन जिल्हे वगळता सर्व ठिकाणची माहिती मुंबईला पोचली आहे. सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक त्या नोंदी पूर्ण झाल्यानंतर शिक्षक बदल्यांचे आदेश दोन दिवसांत निघण्याची शक्यता आहे. यावेळी वापरलेल्या सूत्रानुसार; औरंगाबाद जिल्ह्यातील चार हजार शिक्षकांची बदली होऊ शकते. दरम्यान, बदल्यांचे निकष अडचणीचे असल्याने शिक्षक मोठ्या प्रमाणावर विस्थापित होणार आहेत.

ग्रामविकास विभागाने गेल्यावर्षी जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांसंदर्भात धोरण जाहीर केले. त्यात अनेक त्रुटी होत्या. शिक्षक संघटनांनी त्यास विरोध दर्शविला. न्यायालयात दाद मागितली. प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. त्यानंतर गेल्यावर्षीची बदली प्रक्रिया थांबली होती. यंदा बदल्यांची प्रक्रिया नियोजित वेळेनुसार सुरू झाली. बदल्यांसाठी संवर्ग एक ते चार असे वर्गीकरण केले गेले. बदलीपात्र शिक्षकांनी पोर्टलवर आपापली मागणी ऑनलाइन नोंदवायची होती. वेळेच्या आत इच्छुकांनी आपापली मागणी नोंदविली आहे. या एकत्रित माहितीचे वर्गनिहाय वर्गीकरण सॉफ्टवेअरद्वारे केले जाईल. त्यातून बदलीपात्र शिक्षकांच्या ऑर्डर काढण्यात येतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चार हजार शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात. संवर्ग एकमध्ये गंभीर आजार असलेले शिक्षक, जवान, माजी सैनिकाच्या पत्नी, विधवा माता, परित्यक्त्या, घटस्फोटित शिक्षिकांना प्राधान्य असेल. याशिवाय वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षकही बदली अर्जासाठी पात्र ठरविण्यात आले. संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, संवर्ग तीनमध्ये दहा वर्षे सेवा झालेले बदली पात्र शिक्षक तर संवर्ग चारमध्ये बदली अधिकार असलेले शिक्षक अर्जासाठी पात्र होते. याच बदलीच्या निकषामध्ये अवघड व सोपे क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. औरंगाबाद जिल्ह्यात १३४ अवघड गावे आहेत. याठिकाणी तीन वर्षे सेवा बजावलेले शिक्षकही बदली अर्जासाठी पात्र होते.

या सर्व निकषांच्या आधारे शिक्षकांनीअर्ज करताना २० गावांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन अर्जात दिला आहे. या फॉर्मच्या आधारे बदलीची गावे निश्चित केली जातील. एकूणच या प्रक्रियेत बऱ्याच ठिकाणी संदिग्धता आणि संभ्रम आहे. बदलीचे धोरण पूर्वी राबवित असल्याप्रमाणे निश्चित नसल्याने शिक्षक मोठ्या प्रमाणावर विस्थापित होणार आहेत. बदली धोरणातील त्रुटी दूर कराव्यात, या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी मोर्चे काढले पण त्याबाबत सरकारकडून अद्याप कुठलीच भूमिका जाहीर केली गेली नाही. त्यामुळे सरकारने ठरविल्यानुसारच बदल्या होण्याची शक्यता आहे.

\Bशिक्षकांनी काय करावे?\B

बदल्यांमध्ये गंगापूर तालुक्यातील एखाद्या शिक्षकाची बदली जर सोयगाव तालुक्यात झाली तर नियमाप्रमाणे बदलून मिळालेल्या पदस्थापनेवर शिक्षकाने रुजू होणे आवश्यक आहे. पण बदली झालेल्या गावातून ये - जा करणे, पाल्यांना नवीन शाळेत प्रवेश यासाठी धावपळ होणार आहे. पूर्वी दहा टक्के विनंती व दहा टक्के प्रशासकीय बदल्यांमध्ये कमी प्रमाणात बदल्या होत होत्या. पण आता चार हजार शिक्षकांची बदली झाली तर शिक्षक मोठ्या प्रमाणावर विस्थापित होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चांभार पाटील’चे आज प्रकाशन

$
0
0

औरंगाबाद : डॉ. विजय एम. वाडकर लिखित 'चांभार पाटील' पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (१ मे) गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी, सरस्वती भुवन कॉलेज, नाट्यशास्त्र विभाग येथे संध्याकाळी ५.३० वाजता होत आहे. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तर प्रमुख पाहुण्या म्हणून उपायुक्त वर्षा ठाकूर-घुगे असतील. ख्यातनाम विचारवंत व समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यावेळी पुस्तकावर भाष्य करतील. यावेळी डॉ. डी. डी. काचोळे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. संजय साळुंके आदींची प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कैलास पब्लिकेशन्सचे के. एस. अतकरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७६ वर्षांच्या आजीला नातवाने ठेवले डांबून

$
0
0

औरंगाबाद : मालमत्तेच्या वादावरून स्वत:च्या आजीला डांबून ठेवून तिला मारहाण करणाऱ्या नातवाच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन-पाच येथे राहणाऱ्या आकाश गोपाल शास्त्री यांच्याकडे त्यांची ७६ वर्षांच्या आजी राहत होती. मालमत्तेच्या वादावरून आकाश शास्त्री याने आजींचा छळ सुरू केला. आजीला मारहाण, तिला लाज वाटेल असे कृत्य करीत होता. याशिवाय या आजीला त्याने डांबूनही ठेवले होते. अखेर २६ एप्रिल रोजी परिसरातील नागरिकांनी या आजींची सुटका केली. या आजींनी २९ एप्रिल रोजी सिडको पोलिस ठाण्याला जाऊन आपल्या नातवाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक नलावडे हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मान जिलानी यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : रोशनगेट मकसुद कॉलनीतील रहिवासी मोहमद उस्मान गुलाम जिलानी (वय ७०) यांचे रविवारी (२९ एप्रिल) आजाराने निधन झाले. मध्यरात्री त्यांच्यावर कागजीपुरा येथील दफनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. दर्गाजवळील सिग्मा हॉस्पिटलमधील एचआर विभागातील मोहमद इब्राहिम यांचे ते वडिल होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे रूळावर आढळला मृतदेह

$
0
0

औरंगाबाद, : मुकुंदवाडी झेंडा चौकापलिकडे रेल्वे रुळालगत ५५ वर्षांच्या पुरूषाचा मृतदेह २९ एप्रिलला रात्री पावणेअकराच्या सुमारास आढळला. या घटनेप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृताची ओळख अद्याप पटली नाही. गोरा वर्ण, पाच फूट सहा इंच उंची, सडपातळ बांधा, गोल चेहरा पांढरी दाढी; तसेच अंगात राखाडी पँट, लाल चौकडी पिवळा-निळ्या रंगाचा सदरा मृताच्या अंगात आहे. उजव्या हातावर संगीता व हनुमान गोंदलेले आहे. मृताची माहिती असल्यास ०२४० -२२४०५५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुकुंदवाडी पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्याला विशेष दर्जा देण्याची मागणी

$
0
0

औरंगाबाद : अकरा राज्यांना विषेश दर्जा देऊन लाखो कोटींचा अधिकचा निधी सरकार देत आहे. पुढील पाच वर्षांसाठी मराठवाड्याला विशेष दर्जा देऊन दहा लाख कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी मराठवाडा विकास सेनेने केली आहे. यासाठी मराठवाडा विकास सेना एक मेपासून मराठवाड्यात जनजागरण करणार आहे.

दरडोई सरासरी उत्पन्न, मानवी विकास निर्देशांक, पक्क्या घरांची संख्या, रोजगार उपलब्‍धता, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्व निकषांवर मराठवाडा मागासलेला आहे. संतपीठ असो की विद्यापीठ मराठवाड्याची चेष्टा केली जात असून, दुष्काळ आणि पाणीटंचाई मराठवाड्याची प्रतिकात्मक नावे झाली आहेत. मराठवाडा विकास सेना ठोस कार्यक्रम आणि मागण्या घेऊन खऱ्या अर्थाने राजकारण करीत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांनी कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसांआड पाणी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराकोंडीमुळे शहराला वेठीस धरणाऱ्या महापालिकेने आता पाणीपुरवठ्याच्या माध्यमातूनही नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणे सुरू केले असून, सध्या दोन दिवसांनी होणारा पाणीपुरवठा एक मेपासून तीन दिवसांनी केला जाणार आहे. संपूर्ण शहरासाठी उन्हाळा संपेपर्यंत दीड महिन्यांसाठी हे नियोजन करण्यात आले असले, तरी पूर्वानुभव लक्षात घेता नेहमीच तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जाईल, असे मानले जात आहे.

पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे की, शहरास उपलब्ध होणारे पाणी आणि पाण्याची वाढती मागणी यामुळे शहरातील वितरण प्रणाली विस्कळीत झाली आहे. पाणीपुरवठ्यात अनियमितता वाढू लागली आहे. या प्रकारामुळे रात्री उशीरापर्यंत पाणीपुरवठा करावा लागतो. जलकुंभ भरत नाहीत, त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. वितरण व्यवस्थेत सुसुत्रता यावी, सर्वांना पाणी मिळावे या उद्देशाने एक मेपासून होणारा पाणीपुरवठा (पाणी वितरण) एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. म्हणजेच ज्या भागात सध्या दोन दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो, त्या भागात तीन दिवसांनंतर चौथ्या दिवशी पाणी पुरवठा होईल.

\Bनियोजन कोलमडले

\Bज्या भागात एक मे रोजी पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात आता दोन मे रोजी पाणी येईल. ज्या भागात दोन मे रोजी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते, त्या भागात तीन मे रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ज्या भागात तीन मे रोजी पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे, त्या भागात आता चार मे रोजी पाणी येईल. सिडको - हडको भागात यापूर्वीच तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आला आहे. आता उर्वरित शहरासाठी देखील अशाच प्रकारचे नियोजन करण्याचे पाणीपुरवठा विभागाने ठरविले आहे.

\Bयेथे चौथ्या दिवशी पाणी

\B- गारखेडा

- सूतगिरणी परिसर

- शिवाजीनगर परिसर

- पुंडलिकनगर

- न्यायनगर

- सिडको एन ३

- सिडको एन ४

- चिकलठाणा

- संघर्षनगर

- उल्कानगरी

- जवाहरकॉलनी

- सिंधी कॉलनी

- पीरबाजार

- उस्मानपुरा

- खोकडपुरा

- गांधीनगर

- मुकुंदवाडी

- समर्थनगर

- नागेश्वरवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळ्यात वन्यप्राणी गणना सुरू

$
0
0

औरंगाबाद : गौताळा औट्रमघाट अभयारण्य, नायगाव तसेच येडशी अभयारण्य परिसरात सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून पाणस्थळावर आधारित वन्यप्राण्यांची गणना सुरू झाली आहे, अशी माहिती उप वनसंरक्षक (वन्यजीव) आर. आर. काळे यांनी दिली. जंगल परिसरातील विविध पाणवठा परिसरात ही गणना केली जात असून वन अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने अभ्यासकांसह वनप्रेमींनी सहभाग नोंदविल्याचे त्यांनी नमूद केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ही गणना केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदेड, पुण्यातील पोलीस भरती परीक्षा रद्द

$
0
0

नांदेड: राज्य राखीव पोलीस बलासाठी झालेल्या लेखी परीक्षेतील घोटाळा उघड झाल्यानंतर नांदेड आणि पुण्यात घेतलेल्या या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत या लेखी परीक्षांची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीत घोटाळा झाला होता. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं होतं. हा प्रकार उघडकीस आल्यानं नांदेड पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर यांनी नांदेडमध्ये घेण्यात आलेली ही लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं. नांदेडमध्ये ७१ जागांसाठी एकूण ११९८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. तर पुण्यात राज्य राखीव बल गट क्रमांक-२ च्या ८३ जागांसाठी ३१ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षाही रद्द करण्यात आली असून परीक्षेच्या नव्या तारखा संकेतस्थळावरून आणि एसएमएसद्वारे उमेदवारांना कळविण्यात येणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

या घोटाळ्याचा सूत्रधार प्रवीण भटकर आणि त्याच्या साथीदाराने एसआरपीएफच्या उमेदवारांकडून अडीच कोटी रुपये जमा केले होते, अशीही माहिती पोलीस तपासात उघड झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, भाटकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नायब तहसीलदारांना मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

शेत रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात गेलेल्या नायब तहसीलदार मोहनलाल हरणे यांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तालुक्यातील भडजी येथे घडली. याप्रकरणी नायब तहसीलदार हरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब होळकर व गंगुबाई भाऊसाहेब होळकर व होळकर यांच्या मुलाविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी भडजी येथील शेत गट क्रमांक १८० , १८१, १७७, १७८, १७९मधील नकाशामध्ये नमूद असलेला रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नायब तहसीलदार मोहनलाल हरणे, मोजणी ऑफिस भूमिअभिलेख जी. एस. भालेराव, तलाठी कृष्णा म्हसरूप, पोलिस नाईक नीलकंठ देवरे, कोठुळे, चव्हाण यांच्यासह पाच वाजता रस्ता मोकळा करण्यासाठी भडजी येथे पोचले. भडजी येथील पोलिस पाटील मच्छिंद्र वाकळे; तसेच संबंधित रस्त्याची गरज असलेले शेतकरी हजर होते. हजर असलेल्या शेतकऱ्यांना तहसीलदारांनी दिलेला आदेश वाचून दाखविल्यानंतर मोजणीदार जी. एस. भालेराव यांनी चुना टाकण्यास सांगितले. बाळा कुंडलिक गवळे यांनी जेसीबी आणला असता भाऊसाहेब एकनाथ होळकर व गंगूबाई भाऊसाहेब होळकर व त्यांचा मुलगा यांनी हा रस्ता काढू नका, असे म्हणत रस्ता मोकळा करण्यास अडथळा निर्माण केला.

गंगूबाईने नायब तहसीलदार हरणे यांची शर्टची कॉलर धरून ओढले. भाऊसाहेब होळकर यांनी तहसीलदार मोहनलाल हरणे यांचा हात धरून तोंडावर थापड मारली. त्यामुळे हरणे यांच्या चष्माची काच फुटून उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली. तिघांनी मिळून खाली पाडून शिवीगाळ करत चापत बुक्क्यांनी मारहाण केली, असे या तक्रारीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेस अश्लील मॅसेज

$
0
0

औरंगाबाद : शहरातील २१ वर्षीय महिलेच्या मोबाइलवर मॅसेंजरद्वारे अश्लील संदेश पाठवून त्रास देणाऱ्या मॅसेंजर आयडीधारकाविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या मॅसेंजर आयडीवर १५ एप्रिल रोजी सव्वा सहापासून २३ एप्रिल रोजी रात्री अडीच दरम्यान एका मॅसेंजर आयडीवरून रोज अश्लील मॅसेज पाठविण्यात येत होते.

\Bखासगी फोटो कंपनीस मेल \B

दीपक सुरेशकुमार टिबरेवाला (रा. केटली गार्डन समोर) सध्या लॉसअँजेलली, अमेरिका येथे कार्यरत आहेत. पुण्यातील एका महिलेने त्यांच्या परवानगीशिवाय २३ मार्च २०१७ रोजी सकाळी नऊ वाजून १७ मिनिटे ते ७ एप्रिल २०१७ रोजी सकाळी नऊ वाजून ५६ मिनिटांदरम्यान मैत्रीणीसोबतचे फोटो त्यांच्या संगणकामधून काढले. हे फोटो टिबरेवाला कार्यरत असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना ई-मेल केले. याप्रकरणी टिबरेवाला यांच्या फिर्यादीवरून पुण्यातील महिलेवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत आजारी महिलेचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : केंब्रिज हायस्कूल जवळील पेट्रोल पंपासमोर बुधवारी पहाटे एक वाजता ट्रॅव्हल्स बसने कारला धडक दिली. या अपघातात कारमधील महिलेचा मृत्यू झाला. जयश्री भगवान मापारी (वय ५५, रा. चिखली, जि. बुलडाणा), असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक स्वप्निल अंभुरे (वय २५), मंगेश भगवान मापारी (वय ३३), नागेश भगवान मापारी (वय ३१), विलास मोदे (वय ५७), अरुण आंबेकर (वय ४०) अशी जखमींची नावे असून ते चिखली येथील रहिवासी आहेत.

तब्येतीच्या कारणामुळे जयश्री मापारी यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी चिखलीहून इनोव्हा कारने औरंगाबाद येथे आणले जात होते. रात्री एकच्या सुमारास चालक स्वप्निल अंभुरे हे केंब्रिज हायस्कूल परिसरातील भारत पेट्रोल पंपाकडे इनोव्हा कार वळवत होते. त्यावेळी हमसफर ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने कारला कट मारला. यानंतर बसची धडक बसली. या घटनेनंतर चिकलठाणा पोलिस घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

$
0
0

सिल्लोड : तालुक्यातील सारोळा (ता. सिल्लोड) येथील नारायण श्रीपत साखळे (वय ४५) या शेतकऱ्याचा बाळापूर शिवारात बुधवारी विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे सारोळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

साखळे हे मोलमजुरी व विहीर खोदकाम करतात. दोन दिवसांपासून विहीर खोदकाम बंद होते. बुधवारी भगवान सुखदेव सूर्यवंशी यांच्या बाळापूर शिवारातील गट क्रमांक १०३मध्ये विहिरीचे काम सुरू होते. कामाला सुरुवात करण्याअगोदर साखळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले. त्यावेळी तोल गेल्याने ते विहिरीत पडले. विहीर कोरडी असल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिस स्टेशनचे जी. पी. चव्हाण पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’ भूसंपादनात अडथळ्याची शर्यत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी अशा समृद्धी महामार्ग प्रकल्पात सध्या अडथळ्यांची शर्यत सुरू असून, वर्षभरापूर्वी दरनिश्चिती होऊनही जिल्ह्यात केवळ ९१० हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. यातील १०५ हेक्टर जमीन ही शासकीय असल्याने प्रशासनाला आतापर्यंत जिल्ह्यातून केवळ ८०० हेक्टर जमीनच मिळवता आली आहे.

जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद या तीन तालुक्यांत समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन सुरू आहे. वर्षभरापूर्वी दरनिश्चितीनंतर जुलै २०१७ मध्ये जिल्ह्यात प्रशासनाला पहिली रजिस्ट्री करण्यात यश मिळाले, मात्र त्यानंतर मोठ्या खंडानंतर पुन्हा जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार दर्शवला. सध्या समृद्धी महामार्गासाठी तिन्ही तालुक्यातुन आवश्यक असलेल्या १३४७.७२ हेक्टरपैकी ९१० हेक्टरचे (६८ टक्के) भूसंपादन करण्यात आले असले, तरी औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, कान्हापूर, फतियाबाद, तळेसमान, पालखेड, महालपिंप्री यासह इतर काही गावांमधील शेतकऱ्यांमध्ये दरातील मोठ्या तफावतीमुळे नाराजीचा सूर कायम आहे. दरातील मोठी तफावत दूर करावी, तसेच नव्याने दरनिश्चिती करण्यात यावी अशी मागणी आहे. यासाठी गावातील शेतकऱ्यांनी दरनिश्चितीसंदर्भात जिल्हाधिकारी, ‌विभागीय आयुक्त तसेच मंत्रालयातही दाद मागितली आहे. मात्र अद्यापही या शेतकऱ्यांना आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामाला प्रथम प्राधान्य असतानाही भूसंपादनाच्या कामाला जिल्ह्यात कासवगती आहे. भूसंपादन प्रक्रियेत अडकलेल्या अधिकाऱ्यांसह तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी समृद्धीच्या नावाखाली इतर दैनंदिन जबाबदाऱ्यांपासून पळ काढत असल्याने सर्वसामान्यांची कामेही पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

\Bप्रशासनाकडून सक्ती शक्य

\Bगेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध होत आहे. प्रशासनासोबत अनेक बैठका, चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतरही हा विरोध कायम असल्याने प्रशासनाकडून भूसंपादनासाठी सक्ती करण्याची शक्यता आहे. भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये केलेल्या बदलांच्या अध्यादेशानंतर जमिनी सक्‍तीने संपादित करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

\Bसंयुक्त मोजणी संशयास्पद

\Bवैजापूर तालुक्यातील पालखेड गावातील दर वाढवून मिळण्यात यावे तसेच येथे करण्यात आलेली संयुक्त मोजणी उच्चस्तरीय संस्थेमार्फत करण्यात यावी, या मागणीसाठी पालखेड येथील शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भेट घेतली व मागण्यांचे निवेदन दिले. गावामध्ये बागायती जमीन असताना मोजणीमध्ये सदर जमीन हंगामी बागायती दाखवण्यात आली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

\Bजिल्ह्यातील भूसंपादन (क्षेत्र हे.आर)

\Bतालुका........... आवश्यक क्षेत्र............. मिळालेले क्षेत्र............... टक्के

औरंगाबाद..............६२७.२४...................३९६.३९४४...............६३

वैजापूर...................४६६.६८................३२३.१०९५..................६९

गंगापूर.....................२५३.८................१९०.६६०२...................७५

-------------------------------------------------------------.

एकूण....................१३४७.७२.................९१०.१६४१...............६८ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतकुमार वाजपेयी यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : येथील ज्येष्ठ नागरिक संतकुमार वाजपेयी (वय ९२) यांचे बुधवारी (दोन मे) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (तीन मे) मूळ गावी उज्जैन (मध्य प्रदेश) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद मंडळाचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत वाजपेयी यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार कौन्सिलच्या मतमोजणीत साळुंके आघाडीवर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या २५ सदस्यांसाठी झालेल्या मतदानानंतर १९ एप्रिलपासून मुंबई येथील परिषदेच्या कार्यालयात सुरू आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा आणि बुलडाणा जिल्ह्यांतील काही तालुक्यांतील मतमोजणी पूर्ण झाली आहे. मराठवाड्यातील वसंत साळुंके प्रथम पसंतीची ८७५ मते घेऊन सर्वात पुढे आहेत. वकील परिषदेचे १९९७पासून अॅड. साळुंके हे सदस्य आहेत.

महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या सदस्यपदासाठी सुरू असलेल्या प्रथम पसंतीच्या मतांच्या मोजणीत सात जिल्हे पूर्ण झाले आहेत. इतर उमेदवारांमध्ये आशिष पंजाबराव देशमुख (अमरावती) ४७३, बाबुसिंह कर्तारसिंह गांधी (अकोला) ४६३, काळे अजित बाबुराव (औरंगाबाद) ४०६, अशोक विठ्ठल पाटील (नगर) ६४३, मोतीसिंह घनशामदास मोहता (अकोला) ६११, प्रवीण शेषराव पाटील (अमरावती) ५०७, गुणरत्न सदावर्ते (मुंबई) ४२४ आणि नितीन भगवान विखे (नगर) ५४१ मते घेऊन आघाडीवर आहेत. पसंतीची सर्व मतांची मोजणी २७ मे रोजी पूर्ण होणार आहे. सर्व मते मोजल्यानंतर कोटा ठरविला जाईल. प्रथम पसंतीची एकूण वैध मते भागिले २५ अधिक एक एवढी मते घेणारास विजयी घोषित केले जाईल. त्यानंतर अधिक मते घेणाऱ्या, परंतु कोटा पूर्ण न करणारांसाठी दुसऱ्या, तिसऱ्या, चोथ्या याप्रमाणे पसंतीची मते माजली जातील. एक मतदारास २५ पसंतीक्रम अनिवार्य करण्यात आला होता. त्यानंतर कोटा पूर्ण न केल्यास उर्वरित सर्वाधिक मते घेणाऱ्या उमेदवरास विजयी घोषित करण्यात येते. औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय करणारे अॅड. साळुंके यांनी यापूर्वीच्या तिन्ही निवडणुकीत कोटा पूर्ण केलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतिपदासाठी बारवालांची पुन्हा फिल्डिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गजानन बारवाल यांनी पुन्हा फिल्डिंग लावल्याचे वृत्त आहे. त्यांनीच पुन्हा सभापती व्हावे यासाठी त्यांच्या पक्षातील व पक्षाबाहेरील नेते - पदाधिकारीही अनुकुल असल्याचे बोलले जातआहे. दीडशे कोटींचे रस्ते, कचरा प्रक्रिया यंत्रांची खरेदी, स्मार्टसिटी योजने अंतर्गत करावयाच्या विविध कामांचा शुभारंभ नवीन सभापतींच्या काळात होणार असल्यामुळे बारवालांसारखा 'अनुभवी' सभापती असावा असा संदेश पालिकेच्या वर्तुळात फिरवला जात आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी गजानन बारवाल होते. त्यांची सभापतिपदाची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. आता नवीन सभापतींची निवडणूक दोन जून रोजी होण्याची शक्यता आहे. बारवाल यांची सभापतिपदाबरोबरच स्थायी समितीच्या सदस्यत्वाची मुदत देखील ३० एप्रिलला संपली, पण त्यांनी पुन्हा स्थायी समितीत स्वत:ची वर्णी लावून घेतली. मुळात अपक्ष म्हणून निवडून आलेले बारवाल नंतर भाजपमध्ये सामील झाले, पण त्यांच्या नावावर तेरा अपक्ष नगरसेवकांचा शहर विकास आघाडी या नावाने गट कायम आहे. ते या गटाचे प्रमुख आहेत. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला असला तरी अपक्ष नगरसेवक म्हणूनच त्यांचे अस्तित्व आहे. या अस्तित्वाच्या बळावर पुन्हा सभापती बनण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. दीडशे कोटींच्या रस्त्यांचे टेंडर, कचरा प्रक्रियेसाठी खरेदी करावयाची यंत्रे व अन्य सामुग्री, स्मार्टसिटी योजनेतील सिटीबससह अन्य उपक्रमांबद्दल घ्यावयाचा निर्णय यासाठी 'अनुभवी' सभापती असावा असे शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांचे मत आहे, त्याला भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मुकसर्मथन आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा बारवाल यांच्या नावाला पसंती देणार का यावर पुढची प्रक्रिया अवलंबून राहील असे मानले जात आहे.

\Bवैद्य, खैरे, शिरसाटही दावेदार

\Bशिवसेना - भाजपमध्ये झालेल्या करारानुसार यंदाचे सभापतिपद शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे रेणुकादास (राजू) वैद्य सभापतिपदाचे दावेदार आहेत, यापूर्वीही ते स्थायी समितीचे सभापती होते. प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोटी त्यांच्यात आहे. वैद्य यांच्याशिवाय खासदार पुत्र ऋषिकेश खैरे व आमदार पुत्र सिद्धांत शिरसाट देखील सभापतिपदाचे दावेदार आहेत, पण या सर्वांना डावलून बारवाल यांना पुन्हा सभापती करण्यासाठी शिवसेनेतच हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images