Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ध्वजारोहणला गैरहजेरी; दहा अधिकाऱ्यांना नोटीस

$
0
0

सोयगाव: सोयगाव तहसील कार्यालयाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभाला गैरहजर असलेल्या दहा अधिकाऱ्यांना बुधवारी तहसीलदार छाया पवार यांनी कारणे दाखवा बजावली. तालुका कृषी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पंचायत, महावितरण सहाय्यक अभियंता, सामाजिक वनीकरण, वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग सोयगाव, तालुका पशुधन अधिकारी, लघू पाटबंधारे जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, आगार प्रमुख सोयगाव हे अधिकारी ध्वजारोहण समारंभास गैरहजर राहिले होते. या गैरहजरीबद्दल त्यांना तातडीने चौकशीसाठी तहसील कार्यालयात हजर राहून लेखी जबाब द्यावयाचा आहे. दोन दिवसात तहसील कार्यालयात प्रत्यक्ष हजार न झाल्यास आठवडाभर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे. नोटीसची प्रत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवल्याचे नायब तहसीलदार प्रभाकर गवळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोयगावात आग; साहित्य खाक

$
0
0

सोयगाव: आग लागल्याने येथील शेतकरी शांताराम दयाराम चौधरी यांच्या शेतातील गोठा गुरुवारी जळून खाक झाला. सोयगाव शेंदुर्णी रोडलगत गट क्रमांक २६ मध्ये चौधरी यांचा गोठा आहे. येथे गुरुवारी दुपारी बारा वाजता अचानक आग लागली. आगीत जनावरांचा चारा, ठिबक सिंचन संच, विद्युत पंप संच, जुने सागवान लाकडे, पीव्हीसी पाइप, टीन पत्रे, शेती अवजारे जळून खाक झाली. आगीत दोन लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शेतकरी व गावकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी आणून आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही. यावेळी वैभव चौधरी, सुनील चौधरी, कैलास चौधरी, पवन पाटील, देवेंद्र चौधरी, विजय जावळे, विश्वेश चौधरी, प्रदीप चौधरी, संजय जावळे, जयेंद्र चौधरी, किशोर पाटील, योगेश चौधरी, सागर चौधरी आदींनी आग विझवण्यासाठी मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकाच्या शेतात कचरा टाकला

$
0
0

औरंगाबाद: नारेगावचे माजी नगरसेवक मनीष दहीहंडे यांच्या नारेगाव येथील शेतात महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला आहे. शेतात टाकलेल्या कचऱ्याबद्दल जाब विचारण्यासाठी दहीहंडे हे शुक्रवारी दुपारी महापालिकेत आले होते. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या समक्ष अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतात टाकलेला कचरा काढून घेण्याचे आदेश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांना जामीन; शहरात जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (चार मे) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे शहरातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद; तसेच इतर ओबीसी संघटनांनी क्रांतीचौकात पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष केला.

भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर क्रांतीचौकात सायंकाळी अखिल भारतीय समता परिषद, अखिल भारतीय भगवानबाबा महासंघासह इतर संघटनांचा समावेश होता, असे मनोज घोडके यांनी सांगितले. यावेळी मनोज घोडके, विजय महाजन, सुदाम ‌चिंतने, प्रा. भारत खैरनार, संदीप घोडके, रवींद्र खैरनार, बाबासाहेब जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारानंतर आत्महत्येस केले प्रवृत्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर तब्बल पाच ते सहा वर्षे बलात्कार करणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त करून पीडितेच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या प्रा. राजेश अनंतराव कांबळे याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. तपकिरे यांनी शुक्रवारी (चार मे) फेटाळला. आरोपी प्राध्यापकाकडून पीडितेवर २०१२पासून अत्याचार सुरू होता आणि नऊ जानेवारी २०१८ रोजी पीडितेने आत्महत्या केली आणि तिने लिहिलेल्या २० पानी 'सुसाईड नोट'द्वारे हा प्रकार उघड झाला.

याप्रकरणी मृत पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादीच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे फिर्यादीच्या दोन्ही मुली आजीच्या घरी राहात होत्या. त्यापैकी पीडित मुलगी ही बी.ए.चे शिक्षण घेत होती. नऊ जानेवारी २०१८ रोजी सकाळी सहा वाजता पीडित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तरुणीची २० पानी 'सुसाईड नोट' सापडली होती. या 'सुसाईड नोट'मध्ये तरुणीने सविस्तर घटनाक्रम लिहिला होता. संबंधित तरुणी ज्या महाविद्यालयात शिकत होती, त्या महाविद्यालयात आरोपी राजेश अनंतराव कांबळे (रा. दावरवटी रेसिडेन्सी, सावंगी, ता. जि. औरंगाबाद) हा तिथे प्राध्यापक होता. आरोपीने त्याच्या पत्नीच्या मदतीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून २०१२पासून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. नंतर लग्नास नकार दिल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे 'सुसाईड नोट'मध्ये तरुणीने म्हटले आहे.

याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या ३०७ कलमान्वये पिशोर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपीची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता. अर्जाच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील उल्हास एम पवार यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला. आरोपीने गुरू-शिष्य नात्याला काळीमा फासला आहे; तसेच पदाचा दुरुपयोग करून मृत पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. लग्नाचा आग्रह केल्यावर धुडकावले आणि त्याचवेळी आरोपी तिचे लग्न कुठेही होऊ देत नव्हता. या प्रकरणात मिळालेली 'सुसाईड नोट' हा सबळ पुरावा पुरावा आहे. आरोपीला जामीन मंजूर केल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे आरोपीचा नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील पवारांनी केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपी प्राध्यापकाचा नियमित जामीन फेटाळला.

\Bबलात्काराचा गुन्हा दाखल नाहीच\B

या प्रकरणामध्ये पीडित तरुणीने वारंवार बलात्कार केल्याचे 'सुसाईड नोट'मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे, मात्र त्यानंतरही कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झालेला नाही, असेही समोर येत आहे. खटल्यावेळी हे कलम दाखल होईल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळांच्या जामिनानंतर वैजापुरात जल्लोष

$
0
0

वैजापूर : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टने जामीम मंजूर केल्याच्या निर्णयाचे ओबीसी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून स्वागत केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला. या वेळी समता परिषदेचे आबासाहेब जेजूरकर, काशिनाथ गायकवाड, जगन गायकवाड, नगरसेवक स्वप्नील जेजूरकर, दौलत गायकवाड, अरविंद शेवाळे, रवींद्र जेजूरकर, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर घोडके, रतिलाल गायकवाड, दत्त गायकवाड, भाऊसाहेब गलांडे, गणेश सावंत, बाबासाहेब वाघ, विजय पवार, प्रमोद गायकवाड, रवींद्र सोनवणे, लक्ष्मण राऊत यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्टरलाइट’ची कोट्यवधींची करचुकवेगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टरलाइट टेक्नोलॉजीज कंपनीने (एसटीएल) जीएसटी करप्रणाली कायदा धाब्यावर बसवून तब्बल तीन कोटी ४३ लाखांची करचुकवेगिरी केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या वाळूज, शेंद्रा, सिल्वासा येथील युनिटवर छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे,' अशी माहिती केंद्रीय जीएसटी विभागाचे सहआयुक्त अशोककुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मराठवाड्यातील अशी पहिलीच कारवाई आहे.

अशोककुमार म्हणाले, 'स्टरलाइटकडून करचुकेवेगिरी होत असल्याची खात्रीलायक माहिती 'जीएसटी'ला प्राप्त झाली. त्यानुसार दोन आणि आणि एप्रिल रोजी वाळूजसह कंपनीच्या तीन युनिटवर छापे टाकण्यात आले. तपासात मिळालेल्या कागदपत्रावरून प्राथमिकस्तरावर कंपनीने जीएसटी कायद्याचे उल्लंघन करत सेनवेट क्रेडिटचा गैरफायदा उचल्याचे समोर आले आहे. छाप्यानंतर कंपनी अधिकाऱ्यांनी तातडीने ७९ लाख ४१ लाख ७०२ रुपयांचा कर अदा केला. तसेच सिल्वासा येथील युनिट अधिकाऱ्यांनी ५१ लाख ४९ हजार ५९२ रुपयांचा कर अदा केला आहे. जीएसटी कायद्याच्या सक्रंमण काळात सेनवेट क्रेडिट नियमानुसार केंद्रीय उत्पादन शुल्काचा लाभ घेण्यास उत्पादित मालाच्या आधारे परवानगी होती. सेनवेट क्रेडिटच्या रकमेचा उपयोग करता येतो. त्यासाठी मूळ चलन व बिल आवश्यक असते. मात्र या कंपनीने दिलेल्या नियमांचा भंग केल्याचे समोर आले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून क्रेडिट लाभ (Tran -१), करदाता या अनुषंगाने काहीही सुधारणा वा उपाय केले नाहीत. तसेच Tran -१ परतावा दाखवल्यानंतर पुन्हा संक्रमणाकालीन पत रक्कमेत वाढ दाखवल्याचे समोर आले आहे. आयुक्त श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कर चुकवेगिरी करण्यात आलेल्या रकमेत वाढही होऊ शकते,' अशी शक्यता अशोककुमार यांनी वर्तवली.

\Bस्टरलाइट पुन्हा वादात

\B- मराठवाड्यातील पहिली कारवाई

- ३ कोटी ४३ लाखांची करचुकवेगिरी

- छापे टाकल्यानंतर भरले पैसे

- आकडा वाढण्याची शक्यता

- स्टरलाइट यापूर्वी पाणीप्रकरणी संशयात

- रासायनिक पाणी शेतात होते टाकले

स्टरलाइट कंपनीने तीन कोटी ४३ लाखांची करचुकवेगिरी केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या वाळूज, शेंद्रा, सिल्वासा येथील युनिटवर छापे टाकत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. करचुकवेगिरीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.

- अशोककुमार, सहआयुक्त, जीएसटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध हमी भावाच्या कक्षेत आणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केवळ सरकारच्या मनात आले व त्यांनी २७ रुपये प्रतीलिटर हा भाव जाहीर केला, नंतर कमी भाव देणाऱ्या विरोधात कारवाईची भाषा केली जात आहे. हा सर्व प्रकार दिशाभूल करणार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सरकारने आधी कायदा तयार करावा, दुधाला हमीभावाच्या कक्षेत आधी आणावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकरी सन्मान अभियान यात्रेनिमित्त खासदार शेट्टी शुक्रवारी औरंगाबादेत आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे संयोजक व्ही. एम. सिंग, अविक शाह, रवीकांत तुपकर उपस्थित होते.

'आता मरायचं नाही, लढायच' हा नारा देत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी, त्यांना पाठबळ देणे हा उद्देश यात्रेचा आहे. दुष्काळी १४ जिल्ह्यांत हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सरकारने कर्जमाफीसह अन्य केलेल्या घोषणा पोकळ आहेत. कारण अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाही. नोटबंदी, जीएसटीचा फटका शेतकऱ्यांना बसला. उत्पादनखर्चात प्रचंड वाढ होत असतानाच शेती मालाच्या भाव सुमारे ३५ टक्क्यांहून कमी झाले आहेत. हमीभाव दिला जात नाही, उलट डाळ, पामतेल आयात करून सरकार देशांतर्गत शेतीमालाचे भाव पाडत आहे, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान पीक विमा योजना, तर पंतप्रधान कॉर्पोरेट कल्याण योजना झाली आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

दूध दराबाबत सरकार दिशाभूल करत आहे. सरकारने २७ रुपये भाव जाहीर केला. दर कमी देणाऱ्या संघांविरोधात कारवाईची भाषा केली जाते, पण हे कायदेशीररित्या टिकणार नाही. आधी कायदा तयार करा, दुधाला हमीभावाच्या कक्षेत आणा, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केली. कृषी मूल्य आयोगाच्या कक्षेत दुधाचा भाव आणत, फौजदारी गुन्ह्याची तरतूद झाली पाहिजे, तरच शेतीमालास कमी भाव देणाऱ्यांना चाप बसेल, असे त्यांनी सांगितले.

विशेष अधिवेशनाची मागणी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लढा देण्यासाठी अनेक संघटना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीखाली एकत्र आल्या आहेत. कर्जमुक्ती यासह अन्य विधेयक संसदेत मांडण्यात येणार असून, ३२ विरोधी पक्षांनी विधेयकास पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मे महिन्यात संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, या मागणीसाठी शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. अधिवेशनाच्या मागणीसाठी दहा मे रोजी शेतकरी देशव्यापी आंदोलन करेल. स्वाक्षरी मोहीत घेऊन माागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात येईल, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बसच्या धडकेत २९ वर्षांचा दुचाकीस्वार जागेवरच ठार झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास वरद गणेश मंदिराजवळ घडली. अक्षय लक्ष्मीकांत रापतवार (रा. एन-तीन, सिडको) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बस जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अक्षय हा गुरुवारी रात्री बाराच्या सुमारात मुख्य बस स्थानकाकडून दुचाकीने (क्रमांक एमएच २० डीवाय ७१७७) सिडकोकडे जात होता. त्याने वरद गणेश मंदिराकडे दुचाकी वळवली. त्यावेळी कंपनीच्या कामगारांची ने-आण करणाऱ्या बसची त्याच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने घाटीत दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

ही घटना कळताच अक्षयच्या मित्रांनी घाटीत धावत गेले. अक्षयचा मृतदेह पाहाताच त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. अक्षयचे बारावीचे शिक्षण सरस्वती भुवन विज्ञान कॉलेजात झाले असून, तो सध्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली.

\Bघरी जातानाच अपघात\B

कायम मित्रांच्या घोळक्यात असलेला अक्षय सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होता. गुरुवारी एका लग्न संभारंभाच्या निमित्ताने तो सगळ्या मित्रांना भेटला. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला वडिलांचा फोन आला आणि तो घरी परतत असतांनाचा हा अपघात झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचा विनयभंग; लोखंडी रॉडने मारहाण

$
0
0

औरंगाबाद : महिलेकडे पैशांची मागणी करुन घरात शिरलेल्या एका आरोपीने विनयभंग करत लोखंडी रॉडने मारहाण केली. मसनतपुर भागात दोन मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

संदीप उर्फ गुरू शामराव साबळे (रा. अशोकनगर, चिकलठाणा एमआयडीसी) असे संशयिताचे नाव असून, समाजसेवकाचे असल्याचे सांगत त्याने फिर्यादीच्या घरात प्रवेश केला व पैशांची मागणी केली. फिर्यादी व तिच्या मुलाने पैसे देण्यास नकार दिल्याने साबळेने दोघांना रॉडने मारहाण केली; तसेच महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रार आहे. अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉचमनचे घर फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाग्यनगरातील वॉचमनचे घर फोडून चोराने टीव्ही, मोबाइल आणि सेट टॉप बॉक्स लांबवला. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेदहा ते दुपारी चारच्या सुमारास घडला. शिवाजी मुरलीधर माने (वय ४२) असे फिर्यादीचे नाव असून, ते भाग्यनगरातील महापालिकेच्या उद्यानात वॉचमन आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास ते उद्यानाच्या गेटसह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. याची संधी साधून चोराने गेटवरून उडी मारून माने यांच्या घराचे कुलूप तोडले. यानंतर खोलीतील टीव्ही, मोबाइल आणि सेट टॉप बॉक्स चोरून नेला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरवर आता तहसीलदारांचा वॉच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला असताना टँकरची संख्या ४३१वर पोचली आहे. दररोज टँकरची मागणी वाढत असल्यामुळे टँकर सुरू करण्यापूर्वी तहसीलदारांनी संबंधित गावाला भेट देऊन खातरजमा करावी व त्यानंतर टँकर सुरू करावे, असे निर्देश नवनियुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले.

टँकर लॉबीच्या शंकेमुळे तत्कालिन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील टँकर तपासणीसाठी चार उपजिल्हाधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करून अहवाल मागवला होता, मात्र आतापर्यंत केवळ गंगापूर तालुक्याचाच अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. हा अहवाल मिळाला असता तर नवीन जिल्हाधिकाऱ्यांसमोर जिल्ह्यतील टँकरचे चित्र स्पष्ट झाले असते, मात्र आता अहवालाची वाट न पाहता नवनियुक्त जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या टँकरवर वॉच ठेवण्याची जबाबदारी तहसीलदारांकडे दिली आहे. जिल्ह्यात गरज असलेल्या गावांना टँकर तत्काळ देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले.

तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या पथकात फुलंब्री तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, सिल्लोड तालुका श्रीमंत हारकर, गंगापूर तालुका भाऊसाहेब जाधव, तर खुलताबाद तालुक्यात सुरू असलेल्या टँकर तपासणीसाठी वैजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांची नियुक्ती करण्यात आली होती. गंगापूर वगळता इतर कोणत्याही तालुक्याचा अहवाल अद्याप जिल्हाप्रशासनाला प्राप्त झाला नाही.

टँकर मंजूर असलेल्या गावांची लोकसंख्या, तेथील पाणीपुरवठ्याची उपलब्‍ध साधने व स्थिती, त्याद्वारे रोज होणारा पाणीपुरवठा, टंचाईग्रस्त गावांमध्ये सध्या उपलबध असलेल्या इतर स्‍त्रोतापासून पाणी मिळत असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा गरजेचा आहे काय; तसेच पेयजल, टंचाई निवारणार्थ घ्यावयाच्या उपाययोजनांमध्ये पाणीपुरवठा करण्याव्यतिरिक्त अन्य उपाययोजना घेणे शक्य आहे काय, याबाबत गावनिहाय स्थळपाहणी तपासणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा, असे या पथकाला सांगण्यात आले होते.

\Bसात लाखांवर नागरिकांची तहान टँकरवर

\Bजिल्ह्यातील ३६० गावे व ४० वाड्यांमधील तब्बल सात लाख ९५ हजार ३९९ नागरिकांची तहान ४३१ टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. यासह सर्वाधिक ९९ टँकर गंगापूर जिल्ह्यात सुरू आहेत.

\Bतालुकानिहाय टँकर \B

तालुका.......... गावे.....वाड्या....टँकर

औरंगाबाद.......४७.......१५.......६३

फुलंब्री............४६.......०५.......६५

पैठण..............२९.......०३.......३३

गंगापूर............९२.......००.......९९

वैजापूर...........५१.......०२.......५९

खुलताबाद.......२१.......०४.......२०

कन्नड............२४.......०५.......२४

सिल्लोड.........४९.......०६.......६७

सोयगाव..........०१.......००.......०१

एकूण.............३६०......४०......४३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ १३ गावांचा सातबारा डिजिटल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

राज्यातील राज्यातील शेतकरी व सर्वसामान्यांना एक मेपासून डिजिटल सातबारा उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली, मात्र घोषणेचा बार फुसका निघाला असून जिल्ह्यातील केवळ १३ गावांतील सातबाराचे उतारे डिजिटल स्वाक्षरीद्वारे उपलब्‍ध होत आहेत.

जिल्ह्यातील खुलताबाद, गंगापूर आणि सोयगाव तालुक्यातील १३ गावांमध्ये डिजिटल स्वाक्षरीद्वारे सातबारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात १३६५ गावे असून, ३७३ सज्जे आहेत. एकूण सातबाऱ्यांची संख्या तीन लाख आहे. त्यापैकी केवळ २२८४ सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध असून, या सर्व सातबाऱ्यांची पीडीएफ फाइल उपलब्‍ध करुन देण्यात आली आहे. यामध्ये खुलताबाद तालुक्यातील १५ हजार ८४४ पैकी २६३, गंगापूर तालुक्यातील ३२ हजार ४२९ पैकी १३३१ आणि सोयगाव तालुक्यातील ११ हजार ५८० पैकी ६९० सातबारा उतारे डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. डिजिटल सातबारा तयार केल्याची टक्केवारी केवळ ०.७८ आहे.

शासनाने ई-म्युटेशन मोहीम हाती घेऊन हस्तलिखित सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सत्तेत आलेल्या युती शासनानेही हा कार्यक्रम पुढे राबवला. सध्या उपलब्ध असलेल्या सातबाराचा डेटा अद्ययावत करणे, त्रुटी दूर करणे, गटातील क्षेत्र जुवळणे, खातेदारांचे नाव जमिनीची अद्ययावत नोंद घेणे आदी कामे याअंतर्गत करण्यात येत आहे. डेटाचे युनिकोडमध्ये रुपांतर केल्यानंतर क्षेत्र जुळलेला सातबारा ऑनलाईन उपलब्‍ध करून देण्यात आला मात्र हा सातबारा केवळ नागरिकांच्या माहितीस्तव होता, एक मेपासून या उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून शासनाने ऑनलाइन सातबारा डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते.

जिल्ह्याची स्थिती

तालुका.........एकूण गावे….....सातबारा संख्या

औरंगाबाद........२१४……...........३४७००

कन्नड……............१९५............४७५९०

खुलताबाद….......७३..............१५८४४

गंगापूर……............२२६……............३२४२९

पैठण……..............१८९............५१३५६

फुलंब्री……............९०..............२७७३०

वैजापूर...........१६४............३३९४५

सिल्लोड.........१३१............३८६३७

सोयगाव.........८३..............११५८०

एकूण............१३६५..........२९३८११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गबाजी गायकवाड यांचे निधन

$
0
0

वैजापूर : विश्वनाथनगर भागातील गबाजी कारभारी गायकवाड (वय ८९) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे चार मुले, दोन विवाहित मुली, सुना, नांतवंडे व जावई असा परीवार आहे. शिवसैना कार्यकर्ते शामराव गायकवाड व माजी जवान पोलिस नाईक दादासाहेब गायकवाड यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापूर पालिकेची आज पहिली सभा

$
0
0

वैजापूर : नगरपालिकेचे उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी ११ मे (शुक्रवार) रोजी पहीली सर्वसाधारण सभा पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. नगरपालिकेची मुदत पाच वर्षाची आहे. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची मुदत पाच वर्षांची असेल. नुकत्याच झालेल्या नगर पालिका निवडणुकीत जनतेतून शिल्पा परदेशी या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. २३ सदस्यीय नगरपालिकेत शिवसेनेचे १३ ,भाजपाचे नऊ व काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला आहे. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संशोधन प्रक्रिया रखडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पात्र-अपात्र पीएच. डी. संशोधकांच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात आहे. पदवीदान समारंभ आणि 'आव्हान' महोत्सवाची जबाबदारी वाढल्यामुळे संशोधन विभागाचे कामकाज रखडले आहे. पात्र-अपात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर 'आरआरसी'चे वेळापत्रक जाहीर होणार आहे. दुसरीकडे अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा फेरमूल्यांकन निकाल रखडला आहे.

विद्यापीठातील पीएच. डी. प्रक्रिया अजूनही संपलेली नाही. पात्र-अपात्र संशोधक विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला होता. अर्ज छाननीसाठी संबंधित विषयाचे प्राध्यापक येत नसल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. चार विषयांच्या प्राध्यापकांनी पाठ फिरवल्याने पंधरा दिवस उशीर झाला होता. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी लक्ष घालून याद्यांचे काम पूर्णत्वास नेले होते. त्यानंतर अपात्र विद्यार्थ्यांकडून अर्जातील त्रुटी करून नवीन अर्ज मागवण्यात आले. सध्या अर्जांची छाननी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. दोन दिवसात याद्या लावून 'आरआरसी'चे (संशोधन व मान्यता समिती) वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे प्र-कुलगुरूंनी सांगितले. मात्र, या प्रक्रियेला दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. पात्र-अपात्र विद्यार्थ्यांची अंतिम यादी पुढील आठवड्यात जाहीर होईल. तर १५ मे रोजी पदवीदान समारंभ असून शेवटच्या आठवड्यात आव्हान महोत्सव आहे. या कामासाठी संशोधन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे 'आरआरसी'चे वेळापत्रक २० मे नंतर जाहीर होणार आहे. सध्या संशोधक विद्यार्थी विभागात

वेळापत्रकाची चौकशी करीत आहेत.

दुसरीकडे अभियांत्रिकी शाखेच्या फेरमूल्यांकनाचे काम रखडले आहे. अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीतील हलगर्जीपणाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अभ्यासपूर्ण उत्तरे लिहूनही कमी गुण दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. किमान ४० पेक्षा जास्त गुण मिळण्याची खात्री असताना फक्त दोन गुण मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. अभियांत्रिकीची पुढील सत्र परीक्षा जवळ असताना मागील सत्राच्या निकालाचा तिढा सुटलेला नाही. विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले असून त्याचे निकाल अजूनही जाहीर झाले नाहीत. 'जेएनईसी'च्या एका विद्यार्थ्याला 'डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स' विषयात ८० पैकी १४ गुण आहेत. उत्तपत्रिकेची छायांकित प्रत मागवून संबंधित विषयाच्या प्राध्यापकांना दाखवण्यात आली. तर या विषयात किमान ३० गुण आणखी वाढतील असे त्यांनी सांगितले. त्यावर विद्यार्थ्याने फेरमूल्यांकनासाठी अर्ज केला. पुढील सत्र परीक्षा पंधरा दिवसांनी असताना मागील सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. अभियांत्रिकी शाखेची परीक्षा येत्या १७ मेपासून सुरू होणार आहे. मागील सत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीतील त्रुटी दाखवण्यासाठी आणि फेरमूल्यांकनाचा निकाल मागण्यासाठी विद्यार्थी परीक्षा विभागात हेलपाटे घालत आहेत.

\Bकुलगुरूंची चौकशी कधी ?

\Bकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चौकशी समिती नियुक्त केली आहे. या आठवड्यात समिती चौकशी सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशी प्रक्रियेत कुलगुरू हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी शैक्षणिक संघटनांनी केली आहे. याबाबत राज्यपालांना निवेदने पाठवण्यात आली. या पार्श्वभूमीवर सक्तीच्या रजेबाबत विचार होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता भाजपशी जवळीक नाहीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाशी बोलणी होणार नाही. जवळीक होणारच नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. भाजपाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विश्वासघात केला आहे. अन्य फसविणाऱ्या पक्षाचा अनुभव घेणे बाकी आहे, असेही त्यांनी नमूद करत याविषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व शेतीमालाल हमीभाव हे विधेयक सभागृहात मांडण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळावा, यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे शिष्टमंडळाने काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली भेट असल्याचे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसाठी एकच सशक्त राजकीय पक्ष असतो तो म्हणजे विरोधी पक्ष. विरोधात असतात तेव्हा राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांच्या बाजुने असतात, परंतु सत्तेत आल्यावर त्यांना त्यांचा विसर पडतो, असा टोलाही त्यांनी मारला. शरद पवार यांच्या विषयी काय वाटते, असे विचारले असता शेट्टी यांनी,'पवार जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांच्या विरोधात बोलतच होतो, पण आता ते विरोधात आहे, तेव्हा नाव ठेवून काय उपयोग,' असे सांगितले. दरम्यान, राज्यात कृषी खाते आहे कि नाही हाच प्रश्न पडतो, असा टोलाही त्यांनी एका प्रश्नांवर बोलताना लागवला.

\Bमोदींकडून विश्वासघात\B

दरम्यान, आगामी निवडणुकांसंदर्भात ते म्हणाले,'सध्या सर्वत्र राजकीय पक्षांशी आपण समान अंतरावर आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भारतीय जनता पक्षाशी जवळीक होणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात २०१४मध्ये मोदी यांना काही अटी घातल्या होत्या. मोदी यांनी अटी मान्य केल्या व नंतर मात्र शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. अन्य जे काही फसवणूक करणारे पक्ष राहिले आहेत, त्याचा अनुभव घ्यायचा बाकी आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाडा व्यवस्थापकाकडे बेहिशोबी मालमत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे तत्कालीन मिळकत व्यवस्थापक जोगेंदरसिंह रतनसिंह राजपूत याच्याकडे कायदेशीररित्या मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा सात लाख रुपये जास्त आढळून आले आहेत. या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी जोगेदरसिंह व त्यांची पत्नी तेजींदरकौर राजपूत यांच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

जोगेंदरसिंह राजपूत पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मिळकत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. २७ सप्टेंबर १९८९ ते ३१ मार्च २०१० या कालवधीत सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्याच्याकडे सात लाख दोन हजार ६२९ रुपयांची अपसंपदा संपादित केली. या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात त्याची पत्नी तेजींदरकौर राजुपत (दोघे रा. म्हाडा कॉलनी, प्रतापनगर) यांनीही साह्य केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिस उपाधीक्षक किशोर चौधरी यांनी सांगितले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे राहते घर व अन्य मालमत्तेची एकाच वेळी तपासणी केली जात असून, काही महत्त्वाचे दस्तावेज हाती लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र सदस्यांची मुंडेकडे पुन्हा सुनावणी

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड जिल्हा परिषदेतील सहा सदस्यांना अपात्र ठरविणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देणारा ग्रामविकासमंत्र्यांचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पी. आर. बोरा यांनी आदेश रद्द ठरविला. हे प्रकरण सुनावणीसाठी पुन्हा मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी १५ मे रोजी सुनावणी घेऊन निर्णय करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. दरम्यान, या सदस्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून बैठकीला उपस्थित राहता येईल, परंतु मतदानात सहभाग घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बीड जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बजरंग सोनवणे, मंगला प्रकाश सोळंके आणि अजय मुंडे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. जिल्हा परिषदेमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच सदस्य शिवाजी पवार, प्रकाश कवठेकर, अश्विनी जरांगे, संगीता महारनोर, मंगला डोईफोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अश्विनी निंबाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये सहभाग होता. त्यांच्या गटाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यताही दिलेली होती.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीकरिता आघाडीचे गटनेते बजरंग सोनवणे यांनी २५ मार्च २०१७ रोजी व्हिप जरी केला होता. मात्र तो डावलून पाच जणांनी मतदान केले, तर मंगला डोईफोडे या गैरहजर राहिल्या. व्हिप डावलल्याने या सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात गटनेते सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला. यावर सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी देवेंद्रकुमार यांनी १६ ऑक्टोबर २०१७ रोजी या सहा सदस्यांना अपात्र ठरविले.

या निर्णयाविरोधात सहा सदस्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील दाखल केले. याचिकाकर्त्यांच्या वतीनेही कॅव्हेट दाखल करण्यात आले, परंतु यावर कोणतीही सुनावणी न घेता अपिलाच्या निकालापर्यंत या अपात्रतेला मंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.

सुनावणीअंती खंडपीठाने, कोणतीही सुनावणी न घेता, नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग झाल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करीत मंत्र्यांचा आदेश रद्द केला आणि या प्रकरण पुन्हा सुनावणीकरिता ग्रामविकासमंत्र्यांकडे वर्ग केले. यासंदर्भात १५ मे रोजी सुनावणी घेऊन निर्णय करण्यात यावा आणि दरम्यानच्या काळात या सदस्यांना बैठकीला उपस्थित राहता येईल, परंतु मतदान करता येणार नाही व मोबदला घेता येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणी याचिकाकर्त्यांतर्फे एन. एल. जाधव, ज्येष्ठ विधीज्ञ कानेटकर, प्रतिवादींतर्फे व्ही. डी. साळुंके, गिरीश थिगळे, शासनातर्फे अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजबनगरात रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

$
0
0

औरंगाबाद: अजबनगर-कैलासनगर येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख आंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका आशा भालेराव, राजेंद्र दानवे, माजी नगरसेवक सतीश कटकटे, नरेश भालेराव, अनिकेत राठोड, बलराज जाधव, रवी लोढा, दादाराव पवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images