Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घाटीला १५ पीजी जागांची कमाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) वेगवेगळ्या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १५ जागा वाढल्या आहेत. यामध्ये तीन नवीन विषयांमध्ये सहा जागांची वाढ झाली आहे, तर दोन विषयांमध्ये नऊ जागांची वाढ झाली आहे. त्यातही स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागांची संख्या एकाचवेळी दुपटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या वर्षापासून तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. यामध्ये डीएम-निओनॅटॉलॉजी म्हणजे नवजात शिशू शास्त्र हा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वांत पहिल्यांदा घाटीमध्ये सुरू होत आहे आणि या विषयासाठी 'एमसीआय'ने एका जागेला मान्यता दिली आहे. तसेच एमडी-जेरियाट्रिक्स म्हणजेच वार्धक्यशास्त्र हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वांत पहिल्यांदा घाटीमध्ये सुरू होत आहे आणि या विषयाच्या तीन जागांना 'एमसीआय'ने मान्यता दिली आहे. त्याचवेळी कित्येक वर्षांपूर्वी खंडित झालेला एमडी-रेडिओथेरपी म्हणजेच किरणोपचारशास्त्र या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमालाही याच वर्षी मान्यता मिळाली आहे आणि या विषयाच्या दोन जागांना 'एमसीआय'ने मान्यता दिली आहे. त्याशिवाय स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सात जागांमध्ये दुपटीने वाढ होऊन आता जागा १४ झाल्या आहेत, तर नेत्ररोगशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या दोन जागा वाढून आता पीजी जागा सहा झाल्या आहेत; म्हणजेच यंदा एकूण १५ पीजी जागांची कमाई झाली आहे. मागच्या वर्षी 'एमसीआय'ने 'पीजी'साठी शिक्षक-विद्यार्थ्याचे प्रमाण (रेश्यो) वाढवून एका प्राध्यापकाला दोन ऐवजी तीन पीजी विद्यार्थ्यांना, तर एका सहयोगी प्राध्यापकाला एक ऐवजी दोन पीजी विद्यार्थ्यांना मान्यता दिली. त्यामुळे २०१७ मध्ये घाटीमध्ये १४० पीजी जागांची वाढ झाली आणि गत दोन वर्षांत १५४ पीजी जागांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 'ऑल इंडिया' पातळीवर विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू झाले असून, राज्याच्या कोट्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश यापुढील काळात सुरू होणार आहेत.

\Bप्रतीक्षा नवीन वसतिगृहाची

\Bमागच्या दोन वर्षांत वाढलेल्या १५४ पीजी जागांमुळे आता पीजी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची अडचण भासू शकते. त्यामुळे नवीन पीजी वसतिगृहाचे फर्निचरचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन नवीन वसतिगृह कार्यान्वित होणे गरजेचे असून, नवीन वसतिगृहामुळे काही प्रमाणात ही अडचण कमी होणार आहे. अर्थात, सर्व पीजी विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळणे हे आव्हान ठरणार आहे.

यंदा वेगवेगळ्या विषयांमध्ये १५ पीजी जागा वाढल्या आहेत व दोन वर्षांत १५४ जागा वाढल्या आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांबरोबरच रुग्णसेवेलाही होणार आहे. आता इतर विषयांमध्ये पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी …

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शंभर रुपयांवरून चिरला मुलाचा गळा

$
0
0

औरंगाबाद : शंभर रुपया मागितल्याच्या कारणावरून एका आरोपीने अल्पवयीन मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केले. चिकलठाणा भागात दोन मे रोजी रात्री सात ते साडेसातदरम्यान ही घटना घडली. शांतीलाल (पूर्ण नाव माहित नाही) असे संशयिताचे नाव असून, अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करत आहेत.

अल्पवयीन मुलाने आईला शांतीलाल याकडे असलेले शंभर रुपये आणण्यास सांगितले होते. त्यावर शांतीलाल याने फिर्यादी व त्याच्या आईला शिवीगाळ केली. थोड्यावेळाने परत येत फिर्यादीवर ब्लेडने हल्ला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक बिबट्या जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

एक महिन्यापासून तालुक्याच्या विविध गावांमध्ये निदर्शनास येणारा बिबट्या शुक्रवारी खांबपिंपरी येथील विहिरीतून जेरबंद करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली, मात्र गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या गावांमध्ये व एकाच वेळी शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे बिबट्याच्या संख्येविषयी तर्कवितर्क लावण्यात येत असून, तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत अद्याप कायम आहे.

विहामांडवा ते तुळजापूर रस्त्यावर महिन्यापूर्वी निदर्शनास आलेला बिबट्या मागच्या आठवड्यात आनंदपूर, ज्ञानेश्वरवाडी या भागात दिसला होता. बिबट्याने गाईवर हल्ला करून त्यांना ठार मारल्यावर वनविभागाचे कर्मचारी मागच्या आठ दिवसांपासून या भागात विविध ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेजारील शेवगाव तालुक्यातील खांबपिंपरी शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती शुक्रवारी वनविभागाला मिळाली. औरंगाबाद व नगरच्या वनविभागाचया कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केले असून, मागच्या आठ दिवसापासून तालुक्यात दिसणाराच हा बिबट्या असल्याची माहिती वनपाल गोविंद वैद्य यांनी दिली.

दरम्यान, वनविभागाने खांबपिंपरी येथे बिबट्या जेरबंद केला असला तरी तालुक्याच्या विविध गावांमध्ये बिबट्या निदर्शनास येत आहे. आनंदपूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील आखतवाडा येथील रावसाहेब भुजबळ यांच्या शेतातल्या बुधवारी रात्री गाईच्या वासराला बिबट्याने ठार मारले. याच वेळी कातपूर शिवारात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसला. जायकवाडी धरणाच्या बॅकवाटर परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे या भागातील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने. सध्या कातपूर, पिंपळवाडी, ढाकेफळसह २० गावांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. एकाच वेळी व तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये बिबट्या दिसत असल्याने त्याचा संख्येविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. सध्या शहर व परिसरातील गावांमध्ये जवळपास पाच ते सहा बिबटे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उसामुळे वाढले प्राणी

गोदावरी नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. परिणामी या भागात रानडुकराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मागच्या दोन ते तीन वर्षांपासून या भागात बिबट्या व तडस अशा हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला आहे. पूर्वी, वर्षातून एखाद्या वेळेस नजरेस पडणारे हे हिंस्र प्राणी, आता कायमच शेतकऱ्यांच्या नजरेस पडत असून, यापुढे या भागात बिबट्यासह अन्य हिंस्र प्राण्यांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज प्राणी व पक्षी मित्र दिलीप भगत यांनी व्यक्त केला आहे.

शहर व परिसरात बिबट्याच्या जोडीचा वावर असून, शुक्रवारी खांबपिंपरी येथे पकडण्यात आलेला बिबट्या जोडीपैकी एक असावा, असा अंदाज आहे. दुसरा बिबट्या पकडण्यासाठी दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहे

- गोविंद वैद्य, वनपाल, वनविभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टम्पोच्या धडकेने एक मृत्युमुखी

$
0
0

वैजापूर : टेम्पो व मोटार सायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना मुंबई - नागपूर महामार्गावर परसोडा फाट्यावर शुक्रवारी दुपारी घडली. पोलिसांनी सांगितले की, रमेश दत्तू हरिश्चंद्रे (४५, रा. लासूरगाव) असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी जिजाबाई या जखमी झाल्या आहेत. दोघे पती-पत्नी मोटार सायकलने (एमएच २० ईव्ही १५६५) लासूरगाव येथून लग्न समारंभासाठी वाघला येथे जात होते. त्यावेळी टेम्पोने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी दिलीप दत्तू हरिश्चंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एम. जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्रीरोगशास्त्र संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. देशमुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र संघटनेच्या शहर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. वर्षा देशमुख, तर सचिवपदी डॉ. मनिषा काकडे-पाथ्रीकर यांची निवड झाली; तसेच पुढील वर्षीसाठी डॉ. जयश्री मोरे यांची निवड झाली आहे. उर्वरित कार्यकारिणी अशी, उपाध्यक्ष डॉ. पंडित पळसकर व डॉ. अंजली वरे, सहसचिव डॉ. घन:श्याम मगर, सदस्य डॉ. गुरुप्रीतकौर संधू, डॉ. किरण छाबडा, डॉ. कुणाल जाधव, डॉ. निखिल राजपूत. राज्य प्रतिनिधी डॉ. सुरेश रावते, डॉ. विक्रम लोखंडे, व्यवस्थापकीय समिती सदस्य डॉ. लक्ष्मी राचकोंडा, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अजय माने, सर्वसाधारण व्यवस्थापकीय समिती सदस्य डॉ. वर्षा देशपांडे, डॉ. जयश्री जाधव, डॉ. संगीता चौहान, डॉ. सीमा मुशीर, डॉ. प्रिया देशमुख, डॉ. दीपाली नोरे, डॉ. अनुप्रिया महर्षी. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुरक्षा एजन्सीच्या अध्यक्षाला मागितली दोन लाखांच्या खंडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सुरक्षा एजन्सीच्या अध्यक्षाकडे दोन लाखांच्या खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास कंपनीची मान्यता रद्द करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको, एन-आठमधील एसबीआय कॉलनी रस्त्यावर एक मे रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

भुजंग तेजराव पवार (४१) हे सहकारी अनिल आत्माराम मुके यांच्यासोबत कामानिमित्त टीव्ही सेंटरकडे जात होते. यावेळी एसबीआय बँक कॉलनी रस्त्यावर पवार यांच्या गाडीसमोर (एम.एच. २० डीजे ४८१८) सचिन बचाटे व त्याच्या साथीदाराने गाडी आडवी लावली. पवार यांना थांबवत दोघांनी 'तुम्हाला माझा व्हॉट्स अॅप मेसेज मिळाला का,' अशी विचारणा केली. तेव्हा पवार यांनी होकार दिला. त्यावर त्याने, 'मी सामाजिक कार्यकर्ता आहे. तेव्हा वर्गणी का देत नाही. तुम्ही मला दोन लाख रुपये द्या, अन्यथा तुमच्या कंपनीची मान्यता रद्द करेन,' अशी धमकी दिली व तो तेथून निघून गेला. या प्रकारानंतर पवार यांनी गुरुवारी सिडको पोलिस ठाणे गाठत बचाटेविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ लिभेर’चे मंगळवारी उद्घाटन

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

रेफ्रिजरेशन क्षेत्रात जगात प्रसिद्ध असलेल्या लिभेर या जर्मन कंपनीचा भारतातील पहिला प्रकल्प शेंद्रा एमआयडीसीमध्ये आठ मेपासून सुरू होत आहे. एकूण ५० एकरांपैकी १५ एकरांवर प्रकल्पाचा पहिला टप्पा उभारण्यात आला आहे त्यासाठी ५०० कोटींची गुंतवणूक केली जात आहे.

'महाराष्ट्र टाइम्स'ने सर्वप्रथम १८ आक्टोबर २०१४ रोजी लिभेर कंपनी औरंगाबाद येथे सुरू होणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या कंपनीची ८० हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. लिभेर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही स्वायत्त कंपनी आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडियाअंतर्गत कंपनीचा प्रकल्प भारतात उभारण्यात आला आहे. विशेष या ठिकाणी एक हजाराहून अधिक रोजगार येथे उपलब्ध होणार आहे. एका वर्षात ५० हजार कुलिंग अप्लायन्सेस निर्मितीचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. जगातील पाचवा आणि भारतातली पहिला प्रकल्प शेंद्रा एमआयडीसीत साकारला जात आहे.

या उद्योगाला लागणारा कच्चा माल औरंगाबाद आणि परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. प्रतिवर्षी २२ लाख उपकरणांचे घरगुती, व्यावसायिक बाजारपेठेसाठी उत्पादन केले जाते. भारतीय बाजारपेठेचा प्रतिसाद पाहून मध्यम आिण उच्च मध्यम वर्गीयांसाठी विविध उपकरणांची निर्मिती या प्रकल्पात केली जाणार आहे.

पहिल्या टप्यात पाच लाख फ्रिज तयार करण्याचे ध्येय कंपनीचे आहे. २५० ते ६५० लिटर क्षमतेचे फ्रिज या प्रकल्पात तयार होणार आहेत. शेंद्रा येथे २० एकरातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आठ मेपासून कंपनी उत्पादन सुरू होणार आहे. या कंपनीचे कॉर्पोरेट ऑफिस औरंगाबादमध्येच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिफ्रेशर कोर्सचे विद्यापीठात केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठी ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमासाठी देशभरातील ७५ विद्यापीठांची निवड केली आहे. या केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचाही समावेश आहे. या केंद्राद्वारे विज्ञान तंत्रज्ञान विषयाच्या प्राध्यापकांसाठी अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. नवीन नियमानुसार प्राध्यापकांना दरवर्षी हा ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे.

उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अत्याधुनिक पद्धतीने रिफ्रेशर अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 'स्वयम' उपक्रमाअंतर्गत अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. देशातील ७५ विद्यापीठांना राष्ट्रीय स्रोत केंद्रे (एनआरसी) दिले आहेत. संबंधित केंद्र १५ जूनपर्यंत रिफ्रेशर कोर्सचा आराखडा तयार करणार असून कोर्स पूर्ण केलेल्या प्राध्यापकांची यादी ३१ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करणार आहेत. अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांना रिफ्रेशर कोर्सचा लाभ घेता येणार आहे. सेवेत रूजू झाल्यानंतर एकदाच कोर्स केल्यानंतर पुन्हा कोर्स करण्याची आवश्यकता नव्हती. आता नवीन नियमानुसार दरवर्षी रिफ्रेशर कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे. 'स्वयम' संकेतस्थळावर कोर्सचे साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहे. आपल्या वेळेनुसार संबंधित प्राध्यापक अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतील. ऑनलाइन व्यावसायिक कौशल्य वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अभ्यासक्रमातील वैविध्य राखण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी प्राध्यापकांना नवीन संकल्पना कोर्सद्वारे माहिती करून देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांना उपलब्ध करून देण्याच्या सुविधात ऑनलाइन कोर्सचा समावेश करण्यात आला आहे. देशातील बहुतेक विद्यापीठांचा दर्जा घसरला असून शैक्षणिक क्षेत्राची स्थिती चिंताजनक आहे. या माध्यमातून नवीन सकारात्मक बदल घडवण्याचा 'एचआरडी'चा उद्देश असल्याचे जाणकारांनी सांगितले.

\Bविज्ञान तंत्रज्ञान विषय केंद्र

\Bदेशातील ७५ केंद्रातील एक केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव संसाधन विकास केंद्र येथे आहे. 'स्वयम' संकेतस्थळावर नोंदणी करून प्राध्यापकांना ऑनलाइन कोर्स करता येणार आहे. विज्ञान तंत्रज्ञान या विषयासाठी देशभरातील प्राध्यापक या केंद्रात नोंदणी करू शकतील अशी माहिती मानव संसाधन विकास केंद्राचे सहसंचालक डॉ. मोहम्मद अब्दुल राफे यांनी दिली. सध्या प्राध्यापकांनी केंद्र कार्यालयात विचारणा सुरू केली आहे.

या कोर्ससाठी दूरध्वनीवरूनही नोंदणी करणे शक्य आहे. संकेतस्थळावर विषयनिहाय पर्याय असून अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध आहे. या सेवेचा प्राध्यापकांना निश्चित उपयोग होईल.

- डॉ. मोहम्मद अब्दुल राफे, सहसंचालक, मानव संसाधन विकास केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बलुतेदारीवर प्रकाश टाकणारा ग्रंथ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'चांभार जातीची ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडणारे 'चांभार पाटील' पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील परिस्थितीचा आढावा समग्रपणे घेतला आहे' असे प्रतिपादन समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. ते पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते.

डॉ. विजय वाडकर लिखित 'चांभार पाटील' पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, डॉ. दा. धों. काचोळे, डॉ. प्रमोद शिंदे व डॉ. संजय साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. चांभार समाजाची वाटचाल उलगडणाऱ्या ग्रंथावर कांबळे यांनी भाष्य केले. 'चांभार जातीचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील व्यावसायिक स्वरुप, स्पृश्य-अस्पृश्य जातीशी असलेला संबंध आणि सद्यस्थितीचा ग्रंथात आढावा घेतला आहे. भारतीय समाजव्यवस्था जाती आणि उपजातीमध्ये गुरफटलेली असून बाहेर पडण्यासाठी वि. रा. शिंदे, जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे अध्ययन करणे गरजेचे आहे' असे कांबळे म्हणाले. डॉ. गंगाधर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी आनंद पाटील, डॉ. राहुल हजारे, डॉ. अशोक गायकवाड, अविनाश पाटील, पवन पाटील, प्रवीण चव्हाण, कैलास हिवर्डे आदींनी परिश्रम घेतले.

\Bपारंपरिक व्यवसाय नावापुरते

\B'प्रत्येकाला आपल्या जातीचा व धर्माचा स्वाभिमान असतो. पण, दुसऱ्याबद्दल दुराभिमान असतो. खऱ्या अर्थाने माणूस हा धर्म आणि देशाचा अभिमान बाळगण्याची समाजाला गरज आहे' असे अंजली धानोरकर म्हणाल्या. गावगाड्यातील बलुतेदारीमुळे खेडे स्वयंपूर्ण होते. ही पद्धत आज लुप्त झाली आहे. पारंपरिक व्यवसाय आता नावापुरतेच शिल्लक आहेत. पुढील पिढीली आदर्श बलुतेदारी कळावी म्हणून संशोधनपर ग्रंथाचे लेखन केले असे लेखक डॉ. विजय वाडकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रवींद्र जोशी यांना आदर्श तलाठी पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील भगूर सजाचे तलाठी रवींद्र जोशी यांची जिल्ह्यातून आदर्श तलाठी म्हणून निवड झाली आहे. एक मे रोजी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महसूल खात्याच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरावर आदर्श तलाठी पुरस्कार दिला जातो. सर्वसामान्याची कामे वेळेत करणे, सरकारी योजनांची चोख अंमलबजावणी करणे, वसुली आणि इतर महसुली कामे वेळेत पूर्ण करणे यासाठी दिला जाणारा यंदाचा पुरस्कार जोशी यांना देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनयन संस्कार सोहळा आज

$
0
0

औरंगाबाद : श्री वेद मित्रमंडळाच्या वतीने सामूहिक उपनयन संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. किराडपुरा येथील श्रीराम मंदिरात रविवारी २१ उपनयन संस्कार होणार आहेत. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीकांत सोनटक्के व जीवन जोशी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लठ्ठपणा रोगनिवारण शिबिर आजपासून

$
0
0

औरंगाबाद : भारतीय योग संस्थानतर्फे सिडको एन आठ येथील बॉटनिकल गार्डन येथे रविवारी लठ्ठपणा रोग निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पावणेसहा वाजता शिबिरास सुरुवात होणार असून, गुरुवारपर्यंत शिबिर असणार आहे. प्रवेश नि:शुल्क असून गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रधान डॉ. उत्तम काळवणे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉँग्रेस सेवादल कार्यकारणी जाहीर

$
0
0

औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्ष अल्ताफ पटेल यांनी शुक्रवारी सेवादलाची शहर कार्यकारणी जाहीर केली. शहर कार्याध्यक्षपदी गणेश लहाने, शहर उपाध्यक्षपदी कैसर पठाण, सुभाष हिवराळे, आलमनूर पठाण, दिनेश थारीवाल, मुक्तार पटेल, पंजाबराव भासले, सुधाकर भोळे, मुसा पटेल, सतीश जगताप, काशीनाथ सुरे, अरुण दाभाडे, गणेश घोरपडे, आप्पासाहेब बकाल, भाऊसाहेब दहिहंडे, राहुल चव्हाण, प्रा. कैलास भोसले, सरचिटणीसपदी सुभाष रिठे, भाऊसाहेब मगरे, शेख मुनीर, विश्वजित नरवडे, शेख युनूस, प्रशांत दळवी, सनी पाटील, शेख महंमद, रवी साळवे, मुख्तार बागवान, गोरख जाधव यांची निवड करण्यात आली. सेवादलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी गंगापुर तालुकाध्यक्षपदी नारायण चनघटे यांची नियुक्ती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपीचा हातकडीसह पोबारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या आरोपीने पोलिसाच्या हाताला झटका देऊन शुक्रवारी (४ मे) रात्री साडेअकरा वाजता धूम ठोकली. शेख वाहेद शेख असद (सईदा कॉलनी, जटवाडा रोड) असे आरोपीचे नाव आहे असून, १५ दिवसातली ही दुसरी घटना आहे.

एका चोरीच्या प्रकरणात शेख वाहेदला छावणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सात मेपर्यंत त्याला पोलिस कोठडी मिळाली होती. छावणी पोलिस ठाण्यात लॉक अप नाही. यामुळे या आरोपीला सिटी चौक पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता त्याने पोटात दु:खत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला सांगितली. नियंत्रण कक्षाने ही माहिती छावणी पोलिस ठाण्याच्या रात्री गस्तीवर असलेल्या टू मोबाइल व्हॅनला दिली. आरोपीवर घाटीत उपचार करून पुन्हा सिटी चौकच्या लॉकअपमध्ये आणण्याचे आदेश दिले. छावणीच्या टू मोबाइल वाहनावर मोहम्मद अली मोहम्मद शेख, अंकुश नामदेव माळी आणि चालक शेख इस्माईल असे तिघे जण होते. त्यांनी सिटी चौक पोलीस ठाणे गाठून १०.४२ वाजता लॉकअप ड्यूटीवर असलेले मोरे यांच्या ताब्यातून शेख वाहेदला घेतले. त्यानंतर घाटीत आणून मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखविले. उपचार केल्यानंतर रात्री ११ वाजता पुन्हा त्याला गाडीत बसवत असताना वाहेदने शेख इस्माइल यांच्या हाताला झटका दिला आणि ढकलून दिले. त्यामुळे शेख इस्माइल पडले. तेवढ्यात वाहेदने पळ काढला. मेडिकल कॉलेजसमोरील गार्डनच्या दिशेने तो पसार झाला़ त्याच्यामागे पोलिस कर्मचारीही धावले. परंतु २० वर्षीय वाहेदने तुफान पळ काढला. त्याला पकडण्यात पोलिस अपयशी ठरले़ ही माहिती छावणी पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या तीन-चार गाड्या घाटीत दाखल झाल्या. त्यांनी वाहेदचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. याप्रकरणी मोहम्मद अली मोहम्मद शेख यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात आरोपी पळून गेल्याची तक्रार दाखल केली आहे. तपास जमादार कोकणे करत आहेत.

\Bपंधरा दिवसांतील ही दुसरी घटना

\B'घाटी'तून आरोपी पळून जाण्याची १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. २३ एप्रिल रोजी सकाळी सातला वॉर्ड क्रमांक १० मधून उपचारासाठी दाखल केलेल्या कैद्यांपैकी सनी वाघमारे आणि अक्षय आठवले यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने ड्यूटीवर असलेल्या उदय जोशी यांना मारहाण करत पलायन केले होते, परंतु त्यापैकी अक्षय आठवलेला नागरिकांनी पकडले. सनी वाघमारे फरार होण्यात यशस्वी झाला. त्याच्या शोधासाठी अनेक पथके कार्यरत असले तरी अद्याप त्याला पकडण्यात यश आले नाही. त्यातच शुक्रवारी पुन्हा वाहेद फरार झाल्याची ही दुसरी घटना घडली आहे.

आरोपीच्या शोधासाठी बेगमपुरा पोलिस ठाण्याचे एक आणि बेगमपुरा पोलिस ठाण्याचे एक पथक कार्यरत आहे. आरोपी पळून गेल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीला हातकडी घातली होती का नाही, पळून जाण्यात यशस्वी कसा झाला, याबाबत माहिती घेण्यात येईल. ज्या पोलिसांचा दोष असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- डॉ. दीपाली घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय

$
0
0

औरंगाबाद : 'सिडको हडको उद्यान बचाव, पक्षी बचाव अभियान'च्या स्वंयसेवकांनी पुढाकार घेत पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वन विभागाच्या कार्यालय आवारात असलेल्या झाडांवर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी खास मातीचे भांडी ठेवली असून दाण्यांची सोय करण्यात आली आहे. उप वनसंरक्षक सतीश वडस्कर यांच्या हस्ते या उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन झाले. वन विभागाचे अधिकारी ए. एम. सोनवणे, एस. बी. तांबे, एस. आर. मोरे, अभियानाचे अध्यक्ष संजय दळवी, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केवळ दोन हजार व्यावसायिक नळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल सोळा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबादमध्ये फक्त दोन हजार नळ जोडण्या व्यावसायिक असल्याची धक्कादायक माहिती शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. त्यामुळे व्यावसायिक स्वरुपाच्या अनधिकृत नळ जोडण्या शोधण्यासाठी मोहीम हाती घ्या व दोन महिन्यात किमान पन्नास हजार व्यावसायिक जोडण्या रेकॉर्डवर आणा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले.

पाणीपुरवठा विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. विस्कळीत पाणीपुरवठ्याबद्दल नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अनधिकृत नळ जोडणींच्या संख्या जास्त आहे. त्यामुळे पाण्याची चोरी होते व पुरेसे पाणी मिळत नाही, अशा भावना नगरसेवकांनी व्यक्त केल्या. भाजपचे राजू शिंदे यांनी शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळ जोडण्याची माहिती विचारली. याबद्दल खुलासा करताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल म्हणाले महापालिकेच्या रेकॉर्डवर दोन हजार व्यावसायिक नळ जोडण्या आहेत. एकूण अनधिकृत नळजोड्यांची संख्या एक लाख ३४ हजार आहे. व्यावसायिक नळ जोडणीसाठी शुल्क किती आकारले जाते या प्रश्नाला चहेल यांनी सांगितले की, व्यावसायिक अर्धा इंची नळ जोडणीसाठी वीस हजार तर एक इंची नळ जोडणीसाठी ७७ हजार रुपये शुल्क आकारले जाते.

शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी शहरातून जाणारी मुख्य जलवाहिनी किती किलोमीटर अंतराची आहे व त्यावर किती नळ जोडण्या अनधिकृत आहेत असा प्रश्न विचारला. चहेल म्हणाले, शहरातून जाणारी मुख्य जलवाहिनी साठ किलोमीटर अंतराची आहे, त्यावर किमान चारशे नळ जोडण्या अनधिकृत आहेत. यावर तुपे म्हणाले, अनधिृत नळ जोडण्या शोधून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे का दाखल करीत नाहीत. यावर राजू शिंदे म्हणाले, अनधिकृत व्यावसायिक नळ जोडण्या शोधण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली पाहिजे. दोन महिन्यात व्यावसायिक नळ जोडण्यांची संख्या पन्नास हजारावर न्या आणि त्यानंतर निवासी भागातील नळ जोडण्याशोधण्याची कार्यवाही हाती घ्या.

व्यावसायिक नळ जोडण्यांवर लक्ष्य केंद्रीत करा. अगोदर अनधिृत व्यावसायिक नळ जोडण्या अधिकृत करा. ज्या या जोडण्या घेतल्या आहेत त्यांच्याकडून पूर्व प्रभावाने पाणीपट्टी वसूल करा. पाणीपट्टी भरण्यास ते तयार नसतील तर रिकव्हरी सूट दाखल करून गुन्हेही दाखल करा.

- नंदकुमार घोडेले, महापौर

\Bसब गोलमाल

\B- १ लाख ३४ हजार अनधिकृत नळ

- २० हजार अर्धा इंची नळ जोडणी शुल्क

- ७७ हजार एक इंची नळ जोडणी शुल्क

- १९००० जीएसटी अंतर्गत नोंद व्यावसायिक

- २ लाख शॉप अॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेले

- १३ हजारांची अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंदणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीचा उल्लेख अंगलट; अखेर सभागृहनेत्याची दिलगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळी केलेला झोपडपट्टीचा उल्लेख महापालिकेचे सभागृहनेते विकास जैन यांच्या चांगलाच अंगलट आला. त्यांना शनिवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी लागली.

पोलिस मुख्यालयात पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी काही नागरिकांनी खासदार चंद्रकांत खैरे व महापौर नंदकुमार घोडेले यांना गाठले व कचराकोंडीबद्दल जाब विचारला. यावेळी थोडी खडाजंगी देखील झाली. नागरिकांना शांत करताना विकास जैन म्हणाले होते की, तुम्ही खासदारांशी बोलत आहात याचे भान ठेवा. झोपडपट्टीतील नागरिकांसारखे बोलू नका.

विकास जैन यांच्या या विधानाचा संदर्भ घेत भाजपचे राजू शिंदे सर्वसाधारण सभेत महापौरांना उद्देशून म्हणाले, आम्ही ज्या वॉर्डातून निवडून आलो आहोत त्या वॉर्डाचा काही भाग झोपडपट्टीचा आहे. त्यामुळे आम्हाला बोलण्याची परवानगी आहे की नाही. आम्ही बोलू शकतो का? यावर विकास जैन यांची बाजू सावरताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, अनावधानाने ते घडले. महापौरांचे विधान संपल्यावर जैन उठून उभे राहिले. ते म्हणाले, त्या विधानाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. जैन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, तुम्हीही तुमचे मन मोठे करा असे आवाहन महापौरांनी राजू शिंदे व अन्य नगरसेवकांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी ‘डीएसआर’बद्दल कोर्टात शपथपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कमी झालेल्या 'डीएसआर'बद्दल मंगळवारी हायकोर्टात शपथपत्र सादर करा, पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन निविदा काढा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी महापालिकेच्या प्रशासनाला दिले.

शहारतील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटींचे अनुदान दिले आहे, त्याशिवाय पन्नास कोटीचे डिफर्ड पेमेंटचे रस्ते तयार केले जाणार आहे. या निविदा प्रक्रियेला काही ठेकेदारांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. दरम्यानच्या काळात शासनाने 'डीएसआर' कमी केले. हा मुद्दा माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी १९ एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. गतवर्षीचे यंदाचे 'डीएसआर' याच्यातील तफावतीचा तक्ता पुढील सर्वसाधारण सभेत सादर करा, असे आदेश कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना दिले होते. तुपे यांनी आज पुन्हा सर्वसाधारण सभेत तो विषय काढला व अधिकाऱ्यांनी तक्ता तयार केला आहे का असे विचारले. महापौरांनी सिकंदर अली यांना खुलासा करण्यास सांगितले. सिकंदर अली म्हणाले, किती तफावत आहे याची माहिती काढावी लागेल. या उत्तरामुळे तुपे संतापले. सिकंदर अली यांचा उद्देशून ते म्हणाले, दोन्ही 'डीएसआर'मधील तफावत काढण्याचे काम तुम्ही तात्काळ का केले नाही. पालिका तुम्हाला खड्ड्यात घालायची आहे का ? चोवीस कोटीच्या कामात काय झाले ते तुम्हाला माहिती नाही का ? तुम्ही त्यात आहात ना ? राजू शिंदे म्हणाले, दर कमी झाल्याचे आपण कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ शकतो की नाही याचा खुलासा विधीसल्लागाराने करावा. विधीसल्लागार अपर्णा थेटे म्हणाल्या, रस्त्यांच्या निविदांसंदर्भात मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यावेळी 'डीएसआर' कमी झाल्याचे आपण कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ शकतो. यावर महापौर घोडेले म्हणाले, 'डीएसआर' कमी झाल्याचे शपथपत्राच्या माध्यमातून मंगळवारी कोर्टाच्या निर्दशनास आणून द्या. दर कमी झाल्यामुळे होणारी बचत व त्या बचतीतून केली जाऊ शकणारी रस्त्यांची जास्तीची कामे याबद्दलही कोर्टाला माहिती द्या. 'डीएसआर'कमी झाल्यामुळे झाल्यामुळे पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून नवीन दराने रस्त्यांच्या कामांची निवीदा काढा.

\Bसार्वजनिक बांधकामला कामे द्या

\Bशासनाने दिलेल्या अनुदानातून करावयाची रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्या. निधी त्या विभागाला वर्ग करा, अशी मागणी राजू शिंदे यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे झाली तर दर्जेदार कामे होतील व आपल्यात भांडणेही लागणार नाहीत असे ते म्हणाले. तुम्ही हे करणार नसाल तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तशी शिफारस करतो, असा उल्लेख त्यांनी महापौरांना उद्देशून केला. तेव्हा सभागृहनेते विकास जैन उठून उभे राहिले. ते म्हणाले, सर्वकाही जुळत आले आहे. उगीच सार्वजनिक बांधकाम खात्याला कशासाठी रस्त्यांची कामे देता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणे हटावसाठी कृती आराखडा तयार करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी येत्या आठ दिवसांत कृती आराखडा तयार करा, असे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालिका प्रशासनाला शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले.

रस्त्यांवरील अतिक्रमणे, हातगाड्या आदींबाबत सर्वसाधारण सभेत सुमारे अडीच तास चर्चा झाली. शहागंज भागातील हातगाड्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबद्दल 'एमआयएम' नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. कारवाईची पालिकेची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप 'एमआयएम' गटनेते नासेर सिद्दिकी, विरोधीपक्षनेते फेरोज खान यांनी केला. शहागंजमधील हातगाड्या हटवा, पण अशीच कारवाई शहराच्या अन्यही भागात करा अशी मागणी त्यांनी केली. यामुळे शिवसेना - भाजपचे नगरसेवक संतापले. 'एमआयएम' आणि युतीच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. महापौरांनी हस्तक्षेप करून वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमण हटाव विभागप्रमुखांना उद्देशून ते म्हणाले, अतिक्रमणांवर समान कारवाई करा. कारवाई करताना आमच्या पैकी कुणी माघारी बोलावले तर माघारी येऊ नका. सलीम अली सरोवराच्या परिसरातील अतिक्रमण किती दिवस तसेच ठेवायचे, दिल्ली गेट परिसरातील फर्निचरच्या दुकानांवर कारवाई का होत नाही असे त्यांनी विचारले. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी दमडीमहलचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, दमडीमहल परिसरात महापालिकेच्या जागेवर जेवढे अतिक्रमण आहे ते प्रथम काढा, त्यानंतर बाकीच्या अतिक्रमणांवर कारवाई करा.

\Bहॉकर्स झोन तयार करा\B

अतिक्रमण हटाव विभागप्रमुख सी. एम. अभंग म्हणाले, हातगाडी फिरती राहिली पाहिजे असा कायदा आहे. हॉर्कस झोन तयार करून हातगाड्या उभ्या करण्यासाठी जागा दिली पाहिजे असा कायद्यात उल्लेख आहे. कोणतीही हातगाडी आपण ताब्यात घेऊ शकत नाही. अभंग यांच्या माहितीवर विधीसल्लागारांकडून खुलासा घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली. महापौरांनी विधीसल्लागार अपर्णा थेटे यांना खुलासा करण्यास सांगितले. थेटे म्हणाल्या, फेरीवाले धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करावे लागतील, पण हातगाडीवाल्यांना संरक्षण देण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेचे हफ्ते भरले नाही म्हणून तिघांवर गुन्हा

$
0
0

औरंगाबाद : वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरले नाही म्हणून वाळूज पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने शेतीच्या कामासाठी बँकेच्या कर्जावर ट्रॅक्टरची खरेदी केली. या कर्जाचा सहामाही हफ्ता ९६ हजार रुपये होता. महिलेने ट्रॅक्टरचे चार हफ्ते फेडले. पुढील हफ्ते फेडणे शक्य नसल्याने ट्रॅक्टर विकण्याचा निर्णय घेतला. ट्रॅक्टरची खरेदी करताना संबंधित खरेदीदाराने बँकेचे हफ्ते नियमित भरण्याबाबत आश्वासन दिले होते. महिलेकडून ट्रॅक्टर खरेदी करणारे संतोष अरुण जगताप (रा. नेवासा खुर्द) संजय जगन्नाथ भवार (रा. लांझी, गंगापूर) बाळासाहेब कारभारी कर्डिले (रा. वाळूज) यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ पासून ४ मे २०१८ दरम्यान बँकेचे हफ्ते फेडले नाहीत. या प्रकरणात महिलेने या तिघा जणांविरोधात वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले.

………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images