Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन घरफोड्यात लाखोंचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरातील एम्पाअर लॉन येथे एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष प्रभाकर कांबळे (रा. लॅन्डमार्क एम्पायर, जालाननगर) हे घराला कुलूप लावून १० एप्रिल रोजी पुण्याला गेले होते. ते शुक्रवारी (४ मे) परत आले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांच्या घरातून पन्नास हजार रुपये, एक सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, २० हजार रुपयांचा सोन्याचा हार, दहा हजार रुपये किमतीचे एका कानातले झुमके आणि सात हजार रुपये रोख चोरून नेले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

……………

\Bकैलासनगरातही डल्ला

\Bकैलासनगर भागातील बग्गा हॉटेलच्या शेजारी राहणारे विनोद पांडुरंग आनेराव हे तीन मे रोजी सकाळी दहा ते रात्री साडेआठ दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्याने घराचे कुलूप तोडून एलईडीसह सोन्याचे दागिने असा एकूण ६९ हजार २०० रुपयांचा माल लंपास केला. या प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थॅलेसेमिया दिनानिमित्त आज कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद : जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने डॉ. हेडगेवार रुग्णालय, दत्ताजी भाले रक्तपेढीतर्फे रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा दाते सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी थिंक फाउंडेशनचे विनय थेट्टी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे विशेष कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश शेटे, पासपोर्ट अँड फॉरेनर्स रजिस्टेशन कार्यालयाच्या प्रभारी विद्या जगदाळे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजश्री रत्नपारखे, डॉ. अमित पिलखाने, डॉ. मंजुषा कुलकर्णी, सुरेश दरडा यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देश भयाखाली जगत आहे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आणीबाणीत देश तुरुंग झाला होता. सध्या आणीबाणी नसताना देश भयाखाली जगत आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास मुस्लिमांना आंतकवादी, आदिवासांना नक्षलवादी आणि इतरांना देशद्रोही ठरवले जात आहे. या सर्वांची बाजू घेणारे भ्रष्टाचारी ठरत आहेत. या भयावह स्थितीत 'हस्तक्षेप'सारखे पुस्तक प्रकाशित होणे महत्त्वाची गोष्ट आहे' असे प्रतिपादन आमदार कपिल पाटील यांनी केले. ते शनिवारी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.

प्रगतिशील लेखक संघ आणि लोकवाड्मय गृह यांच्या वतीने वीरा राठोड लिखित 'हस्तक्षेप' या ग्रंथाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आइन्स्टाइन सभागृहात आज सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जयदेव डोळे, प्रा. राहुल कोसंबी, डॉ. सुधाकर शेंडगे आणि वीरा राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येकाने आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी सद्यस्थितीवर भाष्य केले. 'देशात सत्तेवर आलेली मंडळी भयंकर असून न्यायाधिशांनासुद्धा न्याय मागावा लागत आहे. आणीबाणीत न्यायसंस्था मुक्त होती. हे हिटलरचे बाप निघाल्याने प्रत्येकजण दडपणाखाली जगत आहे. देशात व राज्यात विरोधी पक्ष आहे असे आपण म्हणतो. पण, कोठडी रिकामी असल्याचे सत्ताधारी सुनावत असल्यामुळे विरोधकांवरही प्रचंड दडपण आहे. सभागृहात याची वारंवार प्रचिती येते. आक्रमक मांडणी करणारा विरोधी नेता अचानक सत्ताप्रमुखाचे कौतुक करतो हे धक्कादायक आहे. ओपिनियन मेकर अत्यंत दांभिक झाले आहेत. त्यामुळे देश संकटात टाकण्याच्या वृत्तीविरोधात उभे रहा. ज्यांनी ब्रिटीशांच्या सुपाऱ्या घेतल्या ते देशभक्ती शिकवत आहेत. सध्या देश साने गुरुजींचा नसून गोळवलकर गुरुजींचा आहे. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचे धाडस 'हस्तक्षेप'ने केल' असे पाटील म्हणाले.

या पुस्तकावर प्रा. राहुल कोसंबी यांनी भाष्य केले. 'वीरा राठोड यांना दिशादर्शक, मार्गदर्शक वाटलेल्या व्यक्तींवरची व्यक्तीचित्रणे पुस्तकात आहेत. मात्र, एकूण पुस्तकाचा पोत लक्षात घेता काही लेख नसते तर अधिक संयुक्तिक ठरले असते. वीरा यांनी अनुभवजन्य लेखन समोर आणले. भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पदर त्यातून समजून घेता येतील' असे कोसंबी म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रा. जयदेव डोळे यांनी केला. पुस्तकाचे मुखपृष्ठावरील छायाचित्र टिपणारे छायाचित्रकार चंद्रकांत थोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नीलेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bभुजबळांना उपचार मिळत नव्हते

\B'सध्याचे सत्ताधारी अत्यंत वाईट असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोठडीत उपचारसुद्धा मिळत नव्हते. याबाबत मी सभागृहात आवाज उठवला. भुजबळांची बाजू घेतली अशी टीका लोक करतील तर करू देत असा विचार करून आवाज उठवला. दोन-दोन वर्षे जामीन मिळू देत नाही. शिवाय उपचारसुद्धा न करणे वाईट होते' असे कपिल पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉटची केली परस्पर विक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतीमध्ये प्लॉट पाडून परस्पर विक्री केल्याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात शेतगड्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम खान इमाम खान (रा. किराडपुरा) यांची सुंदरवाडी येथे गट क्रमांक तीनमध्ये शेतजमीन आहे. ते शहरात वास्तव्याला असल्यामुळे त्यांनी ही जमीन कसण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी बागवान अफसर खान जब्बार खान बागवान (रा. संजयनगर, बायजीपुरा) यांना मुख्त्यारनामा करून दिली होती. तेव्हा बागवान यांनी २१ नोव्हेंबर २०१७ ते १६ जानेवारी २०१८ च्या दरम्यान शेती मालकाची पूर्वपरवानगी न घेता याठिकाणी ६०० चौरस फुटाचे दोन प्लॉट पाडले. दुय्यम निबंधक कार्यालयात इसार पावती करून त्याची परस्पर विक्री केली. या दोन प्लॉटचे पैसेही स्वत:जवळ ठेवले. ही बाब समोर आल्यानंतर इब्राहिम खान यांच्या फिर्यादीवरून बागवान अफसर यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीट आज, ३८ केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी घेण्यात येणार आहे. शहरातील ३८ केंद्राहून १८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजेपासून परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेसाठी ड्रेस कोड, परीक्षेला येताना विद्यार्थ्यांने कसे यावे यावर यंदा चर्चेला उधान आले होते. विद्यार्थ्यांना कानातले, नाकातले, गळ्यात चेन इत्यादी वस्तू घालून न येणे अशा अनेक सूचना देण्यात आल्या. त्यासह केंद्रावर मोबाइल जामर बसविण्यात येणार आहेत. सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत प्रवेश दिले जाणार आहे. दुपारी एक वाजता पेपर सुटणार आहे. परीक्षेसाठी नियंत्रक ही शहरात दाखल झाले आहेत. औरंगाबाद केंद्राहून १८ हजार परीक्षार्थींनी नोंदणी केलेली आहे. परीक्षेचे नियोजन शहरातील जैन इंटरनॅशनल व चाटे हायस्कूलकडे आहे. देशभरातून यंदा साडेतेरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षार्थींना सूचना

- सकाळी ७.३० वाजता केंद्रावर प्रवेश

- सोबत प्रवेश पत्र

- पासपोस्ट किंवा पोस्ट कार्डच्या आकाराचे फोटो सोबत

- पर्स, बॅग, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणू नये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हास्यदिन सोहळा आज

$
0
0

औरंगाबाद : जागतिक हास्यदिनानिमित्त रविवारी हास्ययोग प्रात्यक्षिकसह विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठवाडा साहित्य परिषदेत सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहेत. भापकर यांची मुलाखत हास्ययोग प्रसारक डी. एस. काटे, हास्यकवी डॉ. विष्णू सुरासे घेणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिता-पुत्रावर चाकू, तलवारीने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हॉटेलच्या जागेच्या वादातून पिता-पुत्रावर चाकू, तलवारीने हल्ला केल्याची घटना शनिवारी कटकट गेट परिसरात घडली. या हाणामारीत दोघे गंभीर जखमी असून एकूण पाच जणांवर घाटीत उपचार सुरू आहेत.

जिन्सी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कटकट गेट परिसरातील हॉटेल शालिमार हे मुनवर अली अन्सारी (टाइम्स कॉलनी) यांनी २०१५मध्ये जफरखान युनूस खान (रा. कैसर कॉलनी) यांच्याकडून पाच वर्षांसाठी भाड्याने घेतले होते. मुनवर अली यांनी दोन दिवसांपूर्वी जिन्सी पोलिस ठाण्यात अर्ज दाखल करीत शालिमार हॉटेल आपण खरेदी केले असून त्यानंतरही मूळ मालक जफरखान वाद घालीत असल्याचे म्हटले होते. शनिवारी दुपारी दीड वाजता जफरखान युनूस खान आणि त्याचा मुलगा शहाबाज खान जफर खान हे दोघे १०-१२ लोकांना घेऊन हॉटेलवर दाखल झाले. त्यांच्या हातात तलवारी आणि लाठ्याकाठ्या होत्या. त्यांनी हॉटेलमध्ये बसलेल्या मुनवर अली अन्सारी यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे हॉटेलमध्ये हाहाकार माजला. हॉटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांनी पळ काढला. या हल्ल्यात मुनवर अली गंभीर जखमी झाले. हॉटेलचे मालकच जखमी झाल्याचे पाहून हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आलेल्या लोकांवर हल्ला चढविला. त्यामुळे लाठ्याकाठ्या घेऊन हल्लेखोर पळून गेले. परंतु जफरखान युनूस खान आणि त्याचा मुलगा शहबाज खान जफर खान हे दोघे कर्मचाऱ्यांच्या तावडीत सापडले. या दोघांना कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत जफरखान याच्या नाकाला मार लागून घोळाणा फुटला, हाताला दुखापत झाली. शहबाजखानही गंभीर जखमी झाला. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांपैकी दोघांची प्रकती चिंताजनक आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख रफीक यांनी घाटीत जाऊन जखमींचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मनुवर अली यांनी आपला जबाब नोंदविला. मात्र जफर खान आणि शहाबाज खान या दोघांची प्रकृती जबाब देण्यासारखी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. …………घटनेची माहिती होताच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फईम हाश्मी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. हॉटेल परिसरातील गर्दीला हटविण्यात आले. कटकट गेट परिसरात मोठा पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

\Bदीड वर्षांत चार वेळेस मारहाण

\Bशालिमार हॉटेल किरायाने घेतल्यानंतर मुनवर अली यांनी हॉटेल सजविण्यासाठी मोठा पैसा खर्च केला. मात्र जफरखान यांनी दोन वर्षांतच हॉटेल खाली करण्याचा तगादा लावला. यावरून जून २०१७ मध्ये दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झाले होते. परंतु काही नागरिकांनी मध्यस्ती करीत ते मिटविले. दरम्यान जफरखान यांनी हे हॉटेल जळगाव येथील एका व्यक्तीला विकले. त्यानंतर जळगावच्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विकले. त्या व्यक्तीकडून मुनवर अली अन्सारी यांनी खरेदी केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावरून दीड वर्षात तीन ते चार वेळेस मारहाणीच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

\Bपोलिस चौकी द्या

\Bमुन्नवर अली अन्सारी यांचा हॉटेलचा व्यवसाय असून त्याच्याकडे काम करणारे युवक हे उत्तर प्रदेश, बिहारचे असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली. याशिवाय या भागात अन्य हॉटेलवर काम करणारे इतरही उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. त्यामुळे त्यांचे वारंवार स्थानिक नागरिकांशी भांडणे होतात. यामुळे या भागातील नागरिकांनी कटकट गेट भागात पोलिस चौकी देण्याची मागणी केली आहे.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायरान जमिनीवर अतिक्रमण; राज्य शासनाला नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

करोडी-साजापूर येथील शासकीय गायरानातील गट क्रमांक २४ मध्ये पंचायत समिती सदस्य विजय जाधव यांच्या वडिलांनी केलेल्या अतिक्रमणासंदर्भातील याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.रवींद्र बोर्डे आणि न्या. के.के. सोनवणे यांनी राज्य शासनाला नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

करोडी येथील पाच एकर जमीन शेषराव किसन जाधव यांच्या ताब्यात बऱ्याच वर्षांपासून आहे. ती जमीन त्यांच्या नावे करण्याबाबत त्यांनी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. १२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार गायरान जमीन अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणतीही व्यक्ती अथवा खासगी संस्था यांना कोणत्याही प्रयोजनासाठी देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार शेषराव जाधव यांचे अतिक्रमण निष्कासीत करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी २० स्पटेंबर २०१६ ला मंडळ अधिकाऱ्याला दिला होता. त्यावरून मंडळ अधिकाऱ्यांनी जाधव यांची विनंती मान्य करता येणार नाही, असे कळविले होते. असे असताना अतिक्रमण काढण्याची कारवाई झाली नाही. शिवाय अतिक्रमण करणाऱ्याचा मुलगा विजय शेषराव जाधव हे औरंगाबाद पंचायत समितीचे सदस्य असल्यामुळे देखील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही थांबली आहे,असा आक्षेप याचिकाकर्ते शेख शहानूर शेख हसन यांनी घेतला. त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीअंती खंडपीठाने राज्य शासन आणि अतिक्रमण करणारे शेषराव जाधव यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुजबळांच्या अटकेनंतर त्यांनी दाढीच केली नाही

$
0
0

उस्मानाबाद:

नेत्यांसाठी वाट्टेल ते करायला तयार असणारे कार्यकर्ते आपण नेहमीच पाहतो. त्यांचे किस्सेही आपण नेहमी ऐकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानं त्यांचे असेच दोन कार्यकर्तेही प्रकाशझोतात आले आहेत. उस्मानाबाद आणि नाशिकमधील या अवलियांनी भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर दाढी न करण्याचा निर्धार केला. आज दोन वर्ष झाली तरी त्यानी हा पण मोडलेला नाही. उद्या भुजबळबाहेर येणार आहेत, त्यानंतरच ते दाढी करणार असल्याचं सांगण्यात येतं.

१४ मार्च २०१६ मध्ये भुजबळांना अटक झाली. तेव्हापासून उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील मोहा गावचे बिभीषण माळी यांनी दाढी केलेली नाही. 'जोपर्यंत साहेब तुरुंगातून बाहेर येत नाहीत तोपर्यंत दाढी करायची नाही, असा निर्धार केला होता,' असं माळी सांगतात. माळी हे गावात पान टपरी चालवतात. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. मात्र भुजबळांवर त्यांचं आतोनात प्रेम आहे. या प्रेमापोटीच त्यांनी दाढी आणि केस न कापण्याचा निर्धार केला होता.

नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूलचे सुनील पैठणकर हे सुद्धा भुजबळांचे जबरदस्त फॅन आहेत. त्यांनीही भुजबळांना अटक होताच दाढी न करण्याचा निर्णय घेतला. पैठणकर आणि माळी या दोघांनाही भुजबळांची भेट घ्यायची आहे. पैठणकरांना तर भुजबळांच्या उपस्थित दाढी कापण्याचा महासोहळा करायचा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वत:ला झोकून द्या, यश नक्कीच मिळेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

ध्येय निश्चित करा, ते प्राप्त करण्यासाठी स्वत:मध्ये आत्मविश्वास वाढवा आणि ध्येय प्राप्तीसाठी स्वतःला झोकून दिल्यानंतर या स्पर्धेच्या युगामध्येही यश प्राप्त करता येऊ शकते, असे प्रतिपादन आमदार संदीपान भुमरे यांनी केले.

'यूपीएससी' परीक्षेत तालुक्यातील सुधीर रामनाथ केकान यांनी यश मिळवले आहे. केकान व त्यांचे वडील रामनाथ केकान यांचा रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार भुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेविषयी गैरसमज असल्याने ग्रामीण भागातील मुले तिच्यापासून लांब राहत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे. यामुळे, खेड्यापाड्यातील मुले-मुली या परीक्षेत यशस्वी होत आहेत, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात, नंदलाल काळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, दादा बारे, बळीराम औटे, तुषार पाटील, शिवराज पारीख, भुषण कावसानकर, देविचंद मोरे, शहादेव लोहारे, सोमनाथ परळकर, इश्वर दगडे, किशोर चौधरी, किशोर तावरे, शेरु भाई, दीपक मोरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातमाळीत गायरानावर अतिक्रमण, राज्य शासनासह तिघांना नोटीस

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

हातमाळी (ता. औरंगाबाद) येथील शासकीय गायरानातील गट क्रमांक ८८ मध्ये तिघांनी केलेल्या अतिक्रमणासंदर्भातील याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी राज्य शासन आणि अतिक्रमण करणाऱ्या तीन जणांना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला.

हातमाळी भागातील गट क्रमांक ८८ मधील ६१ हेक्‍टर १३ आर या जमिनीवर बऱ्याच वर्षांपासून शिवाजी धायडे, शहानूरबी शहा आणि अमीन शहा या तिघांचा ताबा आहे. या तिघांनी ही जमीन कसण्यास घेतली असून त्यावर विहिरी, टीन शेड उभारले आहे. गावकऱ्यांनी २००८ पासून या जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. २६ जून २०१३ रोजी या तक्रारींच्या अनुषंगाने तहसीलदारांनी १२ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार गटविकास अधिकाऱ्यांना अतिक्रमण निष्कासित करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हातमाळी ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्यासाठी सूचित करण्यात आले होते; मात्र आजतागायत अतिक्रमण काढण्यात न आल्याने बंडू त्रिंबक म्हस्के यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

सर्वोच्च न्यायलयाने 'जगपालसिंग विरोधात स्टेट ऑफ पंजाब' या प्रकरणात निर्देश दिले होते, की शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणधारकांना कारणे दाखवा नोटीस देऊन संक्षिप्त सुनावणी घेण्यात यावी; तसेच त्यांची अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी. याआधारे हातमाळी येथील अतिक्रमाणसंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाने कलम ५३ नुसार व 'जगपालसिंग वि. स्टेट ऑफ पंजाब' प्रकरणानुसार कारवाई कराण्याची याचिकेत मागणी करण्यात आली.

प्रकरणाच्या प्राथमिक सुनावणीअंती खंडपीठाने राज्य शासन आणि अतिक्रमण करणाऱ्या वरील तिघांना नोटीस बजाविण्याचा आदेश दिला.याचिकाकर्त्याची बाजू रवींद्र गोरे यांनी मांडली. त्यांना नारायण मातकर, चंद्रकांत बोडके सहकार्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्षपदाच्या मुलाखती

$
0
0

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ८ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून राष्ट्रवादी भवन मध्ये सदर निवड करण्यात येणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तसेच ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी तालुकाध्यक्षपदाच्या निवडी करण्यात येणार आहे. ८ मे रोजी गंगापूर, वैजापूर, पैठण, सिल्लोड, खुलताबाद, कन्नड, औरंगाबाद (ग्रामीण), फुलंब्री, सोयगाव या सर्व तालुक्यांसाठी मुलाखती होणार आहेत.

या सर्व तालुकच्या मुलाखती युवक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर शहरात नेत्यांचे पुतळे उभारू देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

शहरात जोपर्यंत महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांचे पुतळे उभारू देणार नाही, अशी भूमिका शिवराणा सेवा संघाने घेतल्याची माहिती प्रांत अध्यक्ष एल. डी. ताटू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिडकोतील कॅनॉट प्लेस येथील उद्यानामध्ये नियोजित जागेवर महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ भव्य पुतळा उभारण्यात यावा यासाठी गेल्या २५ वर्षांपासून मागणी केली जात आहे. या प्रकरणात २०१५ तसेच २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनेही करण्यात आली. मात्र, महापालिकेने अद्याप ही जागा सिडकोकडून हस्तांतरितही केलेली नाही. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून सचिवांनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणात महापालिकेने पुन्हा प्रस्ताव द्यावा, असे मंत्रालयाचे आदेश आहेत. मात्र, सर्व प्रकरण थंड बस्त्यात पडले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरप्रस्ताव दाखल करावा, असे आदेश असतानाही महापालिकेने प्रस्ताव दाखल केला नाही. सध्या जीआरनुसार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत, सदर प्रकरणात महापौरांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्याचेही ठरले होते, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

अश्वारुढ पुतळ्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा महापालिकेने करावा तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही आडकाठी न आणता सहकार्य करावे अन्यथा याप्रकरणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच न्यालयालात जाण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेसाठी सय्यद मुर्तूजा, कैलास करगे, गजमल दिगंबर, संदीप देशमाने, सुभाष शिंदे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा खर्चावर आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपोस्ट पिट, कचऱ्यावर टाकण्यासाठीची पावडर खरेदी या खर्चावर नगरसेवकांनीच आक्षेप घेऊन त्याचा हिशेब मागितला आहे. कोट्यवधी रुपये खर्च होत असताना त्याचे परिणाम काहीच दिसत नसल्याने नगरसेवकांचा आक्षेप आहे. सर्वसाधारण सभेतही याचे पडसाद उमटले.

शहरात कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. तीन महिन्यांनंतरही शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. अनेक वॉर्डांतील मैदानांवर, रस्त्यांवर, दुभाजकांवरही कचरा आहे. शनिवारी उशिरापर्यंत चाललेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर नगरसेवकांनी महापौर, प्रशासनाला घेरले. कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटू नये, आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये या हेतूने खरेदी करण्यात आलेल्या पावडरचा मुद्दा नगरसेवकांनी मांडला. त्यासह कंपोस्ट पिटवर झालेला कोट्यवधीचा खर्च करून उपयोग झाला नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. कोट्यवधी रुपयांच्या उधडळपट्टीनंतरही प्रश्न 'जैसे थे' का, असा सवाल केला. चर्चेत काँग्रेसचे गट नेते भाऊसाहेब जगताप, शिवसेनेचे त्र्यंबक तुपे, राजेंद्र जंजाळ, भाजपचे भगवान घडामोडे आदिंनी सहभाग घेत विविध प्रश्नांची सरबत्ती केली.

कचरा डेपो बंद झाल्यानंतर फेब्रुवारीपासून हा प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर आला. कोर्टानेही फटकारल्यानंतर जाग आलेल्या पालिकेने उपाययोजना करण्यासाठी धावपळ सुरू केली. दोन महिन्यांतही हा प्रश्न निटपणे हाताळता न आल्याने प्रश्नांचे अधिक गंभीर रूप धारण केले आहे. त्यात दोन महिन्यांत पावडर खरेदी झाली, कंपोस्ट पिट उभारले. पावडर कोठे टाकण्यात आली, पिटचे काय हे गुलदस्त्यात आहे. पालिकेने तब्बल २५ लाख रुपयांची पावडर तर, कंपोस्ट पिटसाठी साडेचार कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच कोटी रुपयांच्या पुढे हा खर्च गेला आहे, तरी शहरातील कचरा प्रश्न कायम आहे.

खर्चाच्या चौकशीचे आदेश

पालिकेतील नगरसेवकांनी खर्चाच्या उधळपट्टीवर आक्षेप घेतला. दोन महिन्यांतील चित्र फारसे समाधानकारक नाही. त्यामुळे खर्चाच्या चौकशी व्हावी, अशी मागणीही पुढे आली होती. यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. पावडर खरेदी, कंपोस्ट पिट उभारणीसाठी लागलेल्या खर्चाची चौकशी करून पुढच्या सभेत हा अहवाल ठेवण्यात येणार आहे. तशा सूचना महापौरांनी दिल्याचे कळते.

कचरा प्रश्नाबाबत सुमारे २० लाख रुपये खर्च झाला, तर कंपोस्ट पिटसाठीही चार कोटी रुपये खर्च झाला. हा खर्च योग्य आहे का, असे काहींनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर हे तपासले जाईल, असे आश्वासन मी दिले आहे. चौकशी करून अहवाल ही सभेसमोर ठेवला जाईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर, औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील रामराई येथील तरुणाला शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास चौघांनी बेदम मारहाण करून जखमी केले. अनिल प्रभाकर माळी (वय २४, रा. भिलवाडा रामराई, ता. गंगापूर) याच्या भावाला गावातील चौघे मारहाण करत असल्याचे समजल्यावर भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्याचे काठी मारून डोके फोडले. तसेच पायावर मारहाण करून जखमी केले. आमच्या गल्लीत येऊ नको, असे म्हणत अनिल यास रमेश सोनकांबळे, सुनील सोनकांबळे, अनिल सोनकांबळे, विकास केदारे या चौघानी काठीने मारहाण केली. याप्रकरणी अनिल माळी याच्या तक्रारीवरून चौघांवर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार खंडागळे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठवाड्यात 'स्वच्छ भारत' उधारीवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी 'स्वच्छ भारत अभियान' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. मराठवाड्याला दिलेले टार्गेट पूर्ण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत असला तरी गेल्या सहा महिन्यांपासून वैयक्तिक शौचालयाचा ८३५ कोटी रुपयांचा निधी रखडला आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मराठवाड्यात २०१२च्या बेसलाईन सर्व्हेनुसार २३ लाख कुटूंबांना शौचालये बांधून देण्याचे टार्गेट होते. प्रशासनाच्या दाव्यानुसार मार्च २०१८ अखेरीस शौचालये बांधकामाचे टार्गेट पूर्ण केले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून मराठवाडा हागणदारीमुक्त होण्यासाठी शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. मराठवाड्यात स्वच्छ भारत अभियान उधारीवर असून तब्बल ८३५ कोटी रुपयांचा निधी शासनदरबारी रखडला आहे.

स्वच्छ भारत अभियान हे केंद्र आणि राज्य सरकारचा प्राधान्यक्रमाचा कार्यक्रम आहे. राज्यामध्ये हे अभियान मिशन मोडमध्ये राबवण्यात आले. सर्व जिल्ह्यांमध्ये टार्गेट पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे अडचण होत असल्याचा पत्रव्यवहार शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे करण्यात आला होता. यामध्ये औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शौचालये बांधकाम करण्यासाठी निधीची अडचण होत असल्याचेही नमूद करण्यात आले होते. शासनाने सदर पत्राला केराची टोपली दाखली असली तरीही प्रशासनाने निर्धारित वेळेत देण्यात आलेले टार्गेट पूर्ण केले. आता या पत्रव्यवहारालाही सहा महिने उलटून गेले असून अद्यापही मराठवाड्याला मागणी केलेल्या अनुदानापैकी छदामही मिळालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएम फंडातून एक हजार कोटींचे उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि कक्षाच्या प्रयत्नांतून व राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमार्फत साडेतीन वर्षांत तब्बल १५ ते २० लाख रुग्णांवर सुमारे एक हजार कोटी रुपयांचे विविधांगी उपचार-शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याचबरोबर विशेष कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील चार शहरांतील निवडक रुग्णालयांमध्ये शून्य ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांवर सर्व प्रकारचे उपचार-शस्त्रक्रियाही होणार आहेत व त्याची सुरुवात येत्या दोन महिन्यांत होईल, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख व विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी 'मटा' कार्यालयाला दिलेल्या भेटीत सांगितले.

मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियमान्वये २० टक्के निर्धन व दुर्बल लोकांवर उपचार होणे गरजेचे आहे व २००६ मध्ये हायकोर्टाने तसे आदेशदेखील दिले आहेत. या महत्त्वपूर्ण आदेशाची अंमलबजावणी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सुरू झाली आहे. साडेतीन वर्षांत सीएम फंडातून ३४० कोटी रुपये, तर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमार्फत २०१५ मध्ये १७९ कोटी, २०१६ मध्ये २०९ कोटी, २०१७ मध्ये २६२ कोटी असे ६५० कोटी रुपयांचे उपचार १५ ते २० लाख रुग्णांवर झाले आहे. त्याशिवाय आता राज्यातील चार शहरांतील निवडक रुग्णालयांमध्ये शून्य ते १८ वयोगटातील मुलांवर सर्व प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया तसेच उपचार होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

थॅलेसेमियाग्रस्तांवर बोन मॅरोट्रान्स्प्लान्ट

आतापर्यंत सीएम फंड व धर्मादाय रुग्णालयांमार्फत कितीतरी थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर मुंबईतील रुग्णालयांमध्ये बोनमॅरो ट्रान्स्प्लान्ट शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यापुढे प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्त मुलावर बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट करण्याचा प्रयत्न असेल, असेही शेटे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बस झाली खराब

$
0
0

औरंगाबाद :

रविवारी (६ मे) दुपारी चार वाजेच्या दरम्यान औरंगाबादहून नाशिककडे निघालेली शिवशाही बस अचानक बस स्थानकात परत आणावी लागली. याबाबत प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादहून दुपारी चार वाजेच्या दरम्यान शिवशाही बस नाशिककडे निघाली होती. ही बस बाबा पेट्रोल पंपावर पोहोचली. बाबा पेट्रोल पंपावर चालकाला बस मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात बस चालकाने बाबा पेट्रोल पंपावरून बस थेट मध्यवर्ती बस स्थानकात नेली. या ठिकाणी गाडीची तपासणी करण्यात आली. या बसमध्ये बिघाड असल्याचे लक्षात आल्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुसरी शिवशाही बस प्रवाशांना दिली. अर्धा ते पाऊण तासाचा उशीर झाल्यानंतर दुसरी बस नाशिककडे रवाना झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त शिवराणा सेवा संघ प्रणित सर्वधर्मिय महाराणा प्रतापसिंह सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे ९ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ‌नऊ वाजता मोटार सायकल फेरी, रक्तदान शिबिर यांसह राजपूत, परदेशी समाजातील कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा दुपारी करण्यात येणार आहे. शिवराणा सार्वजनिक वाचनालयात हा सत्कार सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन एल. डी. ताटू, शाम राजपूत, प्रा. गुरुदत्त राजपूत, भोरासिंग राजपूत, शाम सिंघल, सय्यद मुर्तुजा आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नितीन नवले यांची सहसचिवपदी निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या राज्य सहसचिवपदी नितीन नवले यांची, तर मराठवाडा सरचिटणीसपदी शाम राजपूत यांची निवड करण्यात आली. राज्य अधिवेशनात ही निवड करण्यात आली. यासह कार्यकारिणी सदस्यपदी औरंगाबाद जिल्ह्यातून गुलाब चव्हाण, शालीकराम खिस्ते यांची निवड करण्यात आली. निवडीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, के. के. जंगले, विष्णू भंडारे, कडुबा साळवे, अर्जून पिवळ, के. डी. मगर, रमेश पांचाळ, दिलीप ढमाले, आप्पासाहे राऊत, चंदु लोखंडे, गणेश सोनवणे, संतोष केकते यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images