Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

नांदेड ते गोवा रेल्वेची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

औरंगाबाद हे पर्यटन शहर आहे. या शहराला गोव्याशी जोडण्यासाठी नांदेड - गोवा रेल्वे औरंगाबादहून सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेड विभागाने यंदा उन्हाळ्यात नांदेड ते गोवा विशेष रेल्वे सोडावी अशीही मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी केली.

औरंगाबाद रेल्वे मार्गावर उन्हाळ्याच्या काळात विशेष रेल्वे सोडण्याबाबत मराठवाडा रेल्वे विकास समितीचे वर्मा यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांना भेटून केली होती. या मागणीनंतर नांदेड विभागाने नांदेड पनवेल या रेल्वेच्या २६ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय नांदेड निझामोद्दीन एक्स्प्रेस अकोलामार्गे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीला जाण्यासाठी औरंगाबाद रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेची मागणी केली जात आहे, मात्र औरंगाबादकरांच्या मागणीची दखल न घेता, निजामोद्दीन एक्स्प्रेस अकोलामार्गे चालविण्यात येत आहे.

औरंगाबाद करांच्या मागणीचा विचार करून निजामोद्दीन एक्स्प्रेसच्या तीन फेऱ्या औरंगाबादहून करण्यात याव्यात; तसेच पर्यटक शहराला गोव्याशी जोडण्यासाठी नांदेड - गोवा ही विशेष रेल्वे औरंगाबादमार्गे चालविण्यात यावी, अशीही मागणी ओमप्रकाश वर्मा यांनी केली आहे.

………

मनमाडमध्ये जागा नाही

नांदेड दिल्ली औरंगाबादमार्गे का दिली गेली नाही. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मध्य रेल्वेकडून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेला मनमाड येथे दाखल केले जात नाही. यामुळे औरंगाबाद मार्गावरून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्यात अडचणी येत असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२०१९ पासून जहाजाद्वारे हज यात्रा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

हज सबसिडी बंद झाल्याने हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या खर्चात वाढ झाली आहे. यामुळे भाविकांना जहाजाद्वारे पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जागतिक स्तरावर निविदा काढण्यात आली असून २०१९ पासून जहाजाद्वारे हज यात्रा सुरू होणार असल्याची माहिती राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अल्पसंख्यांक विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी यांनी दिली. 'हज यात्रा २०१८' बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत इम्तियाज काझी बोलत होते.

यावेळी हज कमिटी लेखाधिकारी जुबेर अहेमद, खिदमत-ए-हुज्जाज कमिटीचे मौलाना नसिमोद्दीन मिफ्ताई, साजिद अनवर, अजिज कुरेशी, मोहंमद खालेद, डॉ. मोहंमद रहिमोद्दीन यांची उपस्थिती होती. यावेळी इम्तियाज काझी यांनी सांगितले की, यावर्षी राज्यातून ४३ हजार ७३९ इच्छुकांनी हज यात्रेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी प्राथमिक फेरीत ११ हजार ५२७ हाजींची राज्यातून निवड झाली आहे. औरंगाबादहून जाणाऱ्या ८४५ भाविकांची निवड करण्यात आली आहे. यंदा ११ ऑगस्टला हज यात्रेकरूंचा पहिला जत्था रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हज यात्रेला केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान न्यायलयाच्या निर्णयानंतर बंद करण्यात आले आहे. यामुळे यात्रेचा खर्च वाढला. हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाही. यामुळे जहाजाद्वारे हज यात्रा सुरू करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. हा प्रवास हवाई यात्रेपेक्षा एक लाख रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता इम्तियाज काझी यांनी व्यक्त केली.

……………१६ महिला हजला जाणार

यावर्षी हज यात्रेसाठी राज्यातून ४३,७३९ जणांनी अर्ज केले होते. त्यात प्रथमिक फेरीत ८४५ जणांची निवड झाली. तसेच नवीन नियमानुसार बगैर मेहरम (एकटी महिला) जाणार आहे. त्यात हजसाठी महाराष्ट्रातून १६ महिला हजला जाणार आहेत. यात औरंगाबादेतून एक तर बीड जिल्ह्यातील ४ महिलांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र हज कमिटीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रापमंचायतीसाठी आचारसंहिता लागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

जून ते सप्टेंबर २०१८ कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी वेळापत्रक जाहीर केला आहे. सार्वत्रिक, पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात २३ एप्रिल २०१८पासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत राहील, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

निवडणूक वेळापत्रकाची टप्पेनिहाय वेळोवेळी अचूक कार्यवाही करावी. टप्पेनिहाय केलेल्या कार्यवाहीचा अहवाल त्या-त्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबतची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासाठी २५ एप्रिल ते दिनांक ३१ मे कालावधीत मुदत संपणाऱ्या, नव्याने अस्तित्त्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक व पोट निवडणुकीचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. मतदारयादी २७ एप्रिल रोजी संबंधित ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्याबाबतीत सरपंच थेट पद्धतीने निवडून द्यायचे असल्याने आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत विशेष उपाययोजना करावी. प्रत्यक्ष मतमोजणीवेळी संवेदनशील मतमोजणी केंद्राच्या परिसरात विशेष पोलिस बंदोबस्त पुरविण्याची दक्षता घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे, निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र जारी करणे आदी कामे संगणकीकृत पद्धतीने राबवावी, असेही कळविले आहे.

चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका

जिल्ह्यात गोलवाडी (ता. औरंगाबाद), तीसगाव, तीसगाव तांडा (ता. खुलताबाद) आणि अगरसायगाव (ता. वैजापूर) या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील ३४ ग्रामपंयातींच्या ४१ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. फुलंब्री तालुक्यात आठ, वैजापूर तालुक्यात सहा, गंगापूर व पैठण तालुक्यांत प्रत्येकी पाच, औरंगाबाद, सिल्लोड, सोयगाव, कन्नड या तालुक्यांत प्रत्येकी चार आणि खुलताबाद तालुक्यात एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यंगचित्रातून व्यसनमुक्तीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्यसनमुक्ती आणि रस्ता सुरक्षा या विषयाबाबत जनजागरण करण्यासाठी गिनीज बुकमध्ये नोंद असलेले विक्रमवीर व्यंगचित्रकार सुहास पालिककर यांच्या व्यंगचित्रांची ४७ दिवस, ४७ ठिकाणी प्रदर्शने भरविण्यात येत आहेत. या उपक्रमाला महाराष्ट्र दिनापासून सुरुवात करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे रविवारी हे प्रदर्शन भरविण्यात आले.

ग्रामीण भागात व्यसनाधीनता, रस्ते सुरक्षा या विषयांवर जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनापासून ग्रामीण भागात प्रदर्शन भरविण्याचा निर्णय घेतल्याचे पालिमकर यांनी सांगितले. मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यांत हे प्रदर्शन होत आहे. येत्या १४ जूनपर्यंत ४७ गावांत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात या प्रदर्शनाला सुरुवात झाली. १४ जून रोजी बीड जिल्ह्यातच प्रदर्शनाची सांगता होणार आहे. या मालिकेतील सहावे प्रदर्शन गंगापूर येथे रविवारी भरविण्यात आले. गंगापूर येथील पोलिस उपनिरीक्षक कदम यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्यंगचित्रकार सुहास पालिमकर बीड येथील आयुर्मंगलम निवासी मुकबधीर विद्यालयात कला शिक्षक आहेत. गेल्या १८ वर्षांपासून ते व्यंगचित्रे रेखाटत आहेत. २०१३मध्ये त्यांनी स्त्रीभृण हत्या, बेटी बचाव या विषयावर सलग २२ तास व्यंगचित्रे रेखाटण्याचा विक्रम केला. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद घेण्यात आली आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी व्यंगचित्रे साकारली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीआरएम’कडे तक्रारीनंतर कार्यवाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एक वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या खोलीच्या छतावर ठेवलेल्या टाकीतून पाणी वाहत आहे. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर जळण्याचा धोका निर्माण झाला होता. हे पाणी फलाटवर पसरल्याने प्रवासी घसरून पडण्याचा धोका होता. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याने अखेर प्रवाशांनी थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे तक्रार केली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे.

याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या इमारतीच्या छतावरील टाकीत पाणी भरल्यानंतर ते वाहत रेल्वे रुळावर येत होते. हे पाणी फलाटावरील पत्र्यातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह स्वच्छतेसाठी ठेवण्यात आलेल्या खोलीत येत होते. याची माहिती रेल्वे स्टेशन मॅनेजरकडून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली जात होती. मात्र, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले.

टाकीचे पाणी रेल्वे फलाटावर साचल्यामुळे त्यावरून घसरून वृद्ध व महिला पडण्याचा धोका होता. अखेर संबंधितांनी या प्रकरणाची तक्रार विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांच्याकडे केली. राभा यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना झापल्यानंतर रेल्वेचे अधिकारी रविवारी स्टेशनवर आले. त्यांनी हे वाहते पाणी बंद केले आहे. पुन्हा गळती होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’च्या नगरसेवकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाहन चोरीच्या गुन्ह्यात भिवंडी गुन्हे शाखेने इंदिरानगर वॉर्डाचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याला शनिवारी रात्री अटक केली. ट्रक व डंपर चोरांची आंतरराज्य टोळी भिवंडी पोलिसांनी गजाआड केली आहे. या टोळीमध्ये शेख जफर व त्याच्या भावाचा समावेश असल्याचा आरोप आहे. चोरीचे डंपर बनावट कागदपत्राआधारे विकून त्याची रक्कम नगरसेवक शेख जफरच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गेल्या वर्षी भिवंडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अवजड वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात नागपूर आरटीओ कार्यालयाची सहा चारचाकी वाहनांची बनावट कागदपत्रे पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी तपास सुरू केला होता. यामध्ये आरोपी अली हुसेन शेख व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. या टोळीने महाराष्ट्र व गुजरात राज्यातून ३४ ट्रक व डंपर चोरी केल्याची कबुली देत त्या वाहनांची नंदूरबार व बुलडाणा आरटीओ कार्यालयात पासिंग केल्याचे निष्पन्न झाले होते. यावेळी पोलिसांनी शोध घेऊन २० डंपरचा जप्त करत आरोपींना अटक केली होती. बनावट कागदपत्राआधारे ही वाहने विकण्यात आली.

या गुन्ह्यामध्ये औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर व त्याचा भाऊ बाबर शेख हे चोरीचे डंपर विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादेत येऊन आधी शेख बाबर याला अटक केली. यानंतर शनिवारी नगरसेवक शेख जफर याला सहायक पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी अटक केल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने दिली. ही कामगिरी ठाणे येथील पोलिस आयुक्त परमवीर सिंह, सहआयुक्त मधुकर पांडेय, अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहाय्यक पोलिस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शीतल राऊत व सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप निगडे यांनी केली.

\Bराजकीय वजनाचा वापर

\B

नगरसेवक शेख जफर यांचा चोरीची वाहने विकण्यात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. यामध्ये राजकीय वजन वापरून शेख जफर याने चोरीची वाहने विक्री केल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने दिली आहे. याप्रकरणी व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावरील दहावी, बारावी निकालांच्या तारखांवर विश्वास ठेवू नका

$
0
0

दहावी, बारावी निकालाच्या तारखा सोशल मीडियावर चर्चा

अफवांवर विश्वास ठेवू नका, मंडळाने केले स्पष्ट

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या निकालाच्या तारखा सोशल मीडियावर फिरत आहेत. सोशल मीडियावरील तारखांच्या घोळामुळे विद्यार्थी, पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. तर, मंडळाने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान झाल्या तर, दहावीच्या १ ते २५ मार्चपर्यंत चालल्या. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीबाबतच्या बहिष्कारामुळे मंडळ चर्चेत आले. त्यामुळे निकाल वेळेत लागेल की नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती, परंतु उत्तरपत्रिका तपासणीचा प्रश्न मिटला आणि उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली. यात आता सोशल मीडियावर निकालाच्या तारखा केव्हा याबाबतचे संदेश फिरत आहेत. बारावीचा २७ मे तर, दहावीचा कोणी ६ जून रोजी निकाल असल्याचे सोशल मीडियावर फिरत आहे. सोशल मीडियावरील या तारखांमुळे पालक, विद्यार्थीही संभ्रमात आहेत. याची दखल घेत मंडळाने निकालाची कोणतीही तारीख जाहीर केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मंडळाने पत्रात काय म्हटले

राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख आजमितीस जाहीर केलेली नाही. १०, १२ वीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा व्हॉटस्अॅप, फेसबूक या सोशल मीडियावर अनधिकृतरित्या प्रसारित करण्यात येत आहेत. अशा अनधिकृत तारखांवर विद्यार्थी, पालक यांनी विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख मंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावरून, प्रसिद्धी माध्यमे व वर्तमानपत्रांमार्फत यशावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत सर्व विद्यार्थी, पालक, शाळा, ज्युनिअर कॉलेजांन कळविण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीओंकडून रिफलेक्टरचे वाटप

$
0
0

औरंगाबाद : वाहनांच्या मागील बाजुला रेडिअम किंवा रिफलेक्टर लावणे बंधनकारक आहे. शहरातील दीडशे ते दोनशे वाहनांना रिफ्लेक्टर वाटपाचा उपक्रम आरटीओ विभागाकडून राबविण्यात आला.

रस्ते सुरक्षा सप्ताह २०१८अंतर्गत प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मे रोजी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते, विजय काळे, मोटार वाहन निरीक्षक हरीश पवार, योगिता तरदे यांच्या उपस्थितीत पंचवटी चौक, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, रोपळेकर हॉस्पिटल चौक शहानुरमिया दर्गा याठिकाणी रस्ते सुरक्षा माहिती पत्रके वाटण्यात आली. शहरातील दीडशे ते दोनशे वाहनधारकांना रिफ्लेक्टर रेडिअम वाहनांना लावण्यात आले; तसेच त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहितीही देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवपुरे यांचे काम मोलाचे : गायकवाड

$
0
0

औरंगाबाद : दुष्काळ निवारणात नरहरी शिवपुरे यांचे काम मोलाचे आहे. मराठवाड्यातील १०५ जलस्त्रोत बळकच करून पाणी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी रविवारी येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपालांनी नियुक्ती केल्यानिमित्त शिवपुरे यांचा विभागातील स्वयंसेवी संस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सर्जेराव ठोंबरे, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्रा. गजानन सानप, शशिकांत हदगल, ज्ञानेश्वर हनवते आदी उपस्थित होते. गायकवाड म्हणाले,'शिवपुरे यांच्या शाश्वत ग्रामविकासाच्या अनुभवाचा लाभ विद्यापीठाला होणार आहे. ते एक सर्वगुण संपन्न कार्यकर्ते आहेत. आगामी काळात त्यांनी ग्रामविकासासाठी राज्यस्तरावर कार करावे.'

शिवपुरे यांच्या रुपाने राज्यपालांनी योग्य व्यक्तीची विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली, असे डॉ. ठोंबरे यांनी सांगितले. 'या पुढील आयुष्य मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी खर्च करणार आहे. ग्रामीण समाज विद्यापीठाशी जोडणार आहे, असे शिवपुरे यांनी सांगितले. विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. सरदारसिंह बैनाडे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर हनवते यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत गटार योजनेला विनातारण कर्ज

$
0
0

भूमिगत गटार योजनेला विना तारण कर्ज

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भूमिगत गटार योजनेसाठी महापालिकेच्या मालमत्ता गहाण न ठेवता कर्ज घेण्यात येणार आहे. सुरुवातीला ९८.३० कोटी रुपयांचे कर्ज घेताना पालिका आपल्या मालमत्ता गहाण ठेवण्याचा विचार करत होती. त्यात ऐतिहासिक टाऊन हॉलचाही समावेश होता. त्यावर विरोध होताच पालिकेने हा प्रस्तावात बदल केला. योजनेच्या दरातील फरकाची रक्कम कंत्राटदाराला देण्यासाठी कर्ज घेण्याचा प्रस्ताव शनिवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.

योजनेसाठी ८७ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेण्याचा सुधारीत प्रस्ताव सभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नागरी पायाभूत विकास कंपनी लि. या वित्तीय संस्थेकडून दोन वर्षात ६० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात मंजुरी दिली. उर्वरित २७.२० कोटी रुपयांची तरुतूद पालिकेच्या भांडवली खर्चातून करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला १ जुलै २०१४ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे. ४१८ कोटीत हा प्रकल्प नियोजित करण्यात आला. त्यानुसार काही काम झाले, परंतु आतापर्यंत थांबलेले काम निधीअभावी थांबल्याचे सांगण्यात येते. मंजूर योजनेच्या दराच्या फरकातील रक्कम कंत्राटदाराला देण्यासाठी सुरुवातीला ९८.३० कोटी रुपयांचे कर्ज हुडको संस्थेकडून घेण्याचा प्रस्ताव होता. त्यावर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही विरोध केला. कर्जाची रक्कम कमी करून पालिकेच्या मालमत्ता गहाण ठेवाव्या लागणार नाहीत. याचा तपासणीनंतर सुधारित प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. आता नागरी पायाभूत विकास कंपनीकडून कर्ज घेतले जात असल्याने पालिकेला मालमत्ता गहाण ठेवावी लागणार नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्ताजी भाले रक्तपेढीत ‘थॅलेसेमिया’वर मंथन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. हेडगेवार रुग्णालय, दत्ताजी भाले रक्तपेढी व औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने जागतिक थॅलेसेमिया दिन रविवारी (६ मे) साजरा करण्यात आला. यानिमित्ताने 'थॅलेसेमिया मेजर' या गंभीर व दुर्धर आजाराविषयी उपस्थितांचे मंथन घडविण्यात आले.

थॅलेसेमिया मेजर व थॅलेसेमिया मायनर हा गंभीर आजार कशामुळे होतो, या आजाराचा अटकाव करण्यासाठी कोणत्या बाबींची काळजी आवश्यक आहे आणि सध्या थॅलेसेमिया असलेल्या रुग्णांची काळजी कशी घेतली पाहिजे, यातील आव्हाने कोणती, याबाबतची इत्यंभूत माहिती थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी व इतर तज्ज्ञांनी दिली. या प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे, पासपोर्ट कार्यालयाच्या शाखा प्रमुख विद्या अनिरुद्ध जगदाळे, विजया कांतीलाल दरडा आदींची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्ताने ५० थॅलेसेमिया मुले दत्तक घेतलेल्या पुष्कर एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना औषधी गोळ्यांचे कार्यक्रमात वाटप करण्यात आले. डॉ. अमित पिलखाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. जतीन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर डॉ. राजश्री रत्नपारखे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी दत्ताजी भाले रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शुभांगी चांडगे, औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष कैलास औचरमल, सचिव अनिल दिवेकर, जितेंद्र ब्रह्मराक्षस, संदीप म्हस्के, फेरोज पठाण, संतोष गायकाड आदींची उपस्थिती होती.

….....

थॅलेसेमियाग्रस्तांवर मुंबईत शस्त्रक्रिया

यानिमित्ताने मुंबईतील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये अनेक थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर बोन मॅरो ट्रान्स्प्लान्ट शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यापुढेही या प्रकारच्या शस्त्रक्रिया अधिकाधिक प्रमाणात होतील, असेही शेटे यांनी कार्यक्रमात सांगितले.

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दंत’ला ९४ लाखांच्या निधीचा आधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्यातील एकमेव शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या वेगवेगळ्या महत्वाच्या कामांसाठी तब्बल २ कोटी ६५ लाखांचा निधी दीर्घ कालावधीपासून थकीत असताना, ९४ लाखांचा निधी महाविद्यालयाच्या वाटेला आला आहे. मार्चच्या बजेटमध्ये या निधीची तरतूर करण्यात आली असली तरी अशी तरतूद करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले आहे. अजूनही तब्बल १ कोटी ७१ लाखांच्या निधीची प्रतीक्षा असली तरी मिळालेल्या ९४ लाखांच्या निधीतून लिफ्टसह वसतिगृहाचे काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

शासकीय दंत महाविद्यालयामध्ये बहुचर्चित वसतिगृहासह दोन प्रयोगशाळा, व्यायामशाळा, उपहारगृह, रँप, ग्रंथालयाचे फॉल सिलिंग तसेच इतर छोटी-मोठी कामे रखडली आहेत आणि त्यासाठी २ कोटी ६५ लाखांचा निधी दीर्घ कालावधीपासून थकीत आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत किमान चार ते पाच वर्षांपासून रखडली आहे आणि अजूनही वसतिगृहाचा १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणे बाकी आहे. प्राप्त झालेल्या निधीच्या तुलनेत वसतिगृहाचे काम जास्त झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये, अशी एकंदर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मार्चच्या बजेटमध्ये वसतिगृहासाठी ८० लाख रुपये, तर महाविद्यालयातील लिफ्टसाठी १४ लाख रुपये मंजूर झाले आहे. अर्थात, महाविद्यालयाच्या 'बीडीएस'वर हा निधी जमा होणे बाकी असले तरी तो लवकरच होईल, अशी आशा केली जात आहे. सद्यस्थितीत वसतिगृहाचे फर्निचर, रंगरंगोटीचा एक हाथ, कंपाऊंड वॉल होणे बाकी आहे. प्लंबिंग व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून केवळ जोडणे बाकी आहे. त्यामुळे ८० लाखांचे थकीत बिल अदा करुन उर्वरित काम नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत पूर्ण होईल आणि दंत महाविद्यालयाचे विद्यार्थी वसतिगृहाचा लाभ घेऊ शकतील, अशी आशा केली जात आहे. मात्र प्रयोगशाळेसह इतर कामांसाठीच्या १ कोटी ७१ लाखांच्या थकीत निधीला कधी मुहूर्त लागणार, आणखी किती लिवंब होणार असा सवाल उपस्थित होत आहे.

….....

पीजी हॉस्टेलचे कामही वेळेत?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे वसतिगृह व ग्रंथालयाच्या फर्निचरच्या कामासाठी निधीचा प्रश्न मार्गी लागला असून, निविदा प्रक्रिया संपून येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षांत 'शासकीय वैद्यकीय'चे पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृहाचा लाभ घेऊ शकतील, अशी आशा पल्लवीत झाली आहे.

…....

वसतिगृहासाठीचा संपूर्ण १ कोटी रुपयांचा थकीत निधी प्राप्त झाला नसला तरी ८० लाखांचा निधी अदा करुन काम पूर्ण करुन घेण्याचा प्रयत्न असेल. इतरही अधिकाधिक कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

- सय्यद के. एम. आय, सहाय्यक अभियंता, बांधकाम विभाग

….....

९४ लाखांचा निधी शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृह व लिप्टसाठी मिळाला आहे. उर्वरित निधी लवकरच मिळेल आणि सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. एस. पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

….....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फतेलष्कर यांच्यावर तलवारीने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात व्यायाम करून घरी परतताना वाहनातून आलेल्या मारेकऱ्यांनी भाजप पदाधिकारी संजय फतेलष्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास विद्यापीठातील गोगाबाबा टेकडी येथून व्यायाम करून वसतिगृह क्रमांक दोन समोरून जात होते. त्यावेळी वाहनातून आलेल्या पाचजणांनी फतेलष्कर यांना गाठले. त्यांच्या डोळ्यात मिरचीची भुकटी फेकली व त्यांच्यामागून तलवारीने वार केला. हल्ला चढवून मारेकरी पसार झाले. ही बाब बेगमपुऱ्यातील काही तरुणांना माहिती होताच त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस अधिकारीही घाटीत पोहचले. बेगमपुऱ्यातील नागरिकांनीही यावेळी गर्दी केली. भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस असलेल्या फतेलष्कर यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

maharashtra legislative council: धनंजय मुंडेंना धक्का

$
0
0

बीड:

विधानपरिषदेच्या लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांनी आश्चर्यकारकरित्या माघार घेतली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही. कराड यांना उमेदवारी देत राजकीय खेळी खेळणाऱ्या राष्ट्रवादीला आणि पक्षाचे नेते धनंजय मुंडेंना हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलेला धक्काच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

रमेश कराड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक होते. त्यांना राष्ट्रवादीत घेऊन पक्षाने त्यांना लातूर-बीड-उस्मानाबादमधून विधानपरिषदेची उमेदवारीही दिली. धनंजय मुंडेंच्या या राजकीय खेळीला आता पंकजा मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कारण रमेश कराड यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुदत संपल्यानं आता राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही. त्यामुळं आता राष्ट्रवादीनं अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या सुरेश धस यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कराड यांनी ऐनवेळी माघार घेऊन राष्ट्रवादीची केलेली कोंडी, अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीने जाहीर केलेला पाठिंबा आणि भाजपकडून राष्ट्रवादीच्या धस यांना देण्यात आलेली उमेदवारी यामुळं ही निवडणूक रंगतदार होणार आहे, यात शंकाच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थॅलेसेमिया: मरणयातना संपता संपेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृत्युपूर्वी न चुकता दररोजच मृत्यू भोगावा लागत असलेल्या थॅलेसेमियाग्रस्तांच्या व्यथा-वेदना कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दुर्दैवी चित्र मंगळवारी पाळण्यात येणाऱ्या जागतिक थॅलेसेमिया दिनी पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सरकारी रुग्णालयांमध्ये अपेक्षित योग्य उपचार मिळण्याचे भाग्य सोडाच, साधे शुद्ध रक्तदेखील मिळणे कठीण, अशी एकंदर स्थिती बहुतांश सरकारी रुग्णालयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले 'हिमॅटॉलॉजी सेंटर' अजूनही हवेतच असल्याचे पुन्हा एकदा समोर येत आहे.

'थॅलेसेमिया मेजर' हा दुर्धर आजार असलेल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक तीन ते चार आठवड्याला रक्त दिल्याशिवाय ते मूल जगू शकत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच सर्व रक्तपेढ्यांमध्ये अशा सर्व मुलांना मोफत रक्त देण्याचा सरकारी नियम आहे. मात्र फार कमी रुग्णांना अपेक्षेप्रमाणे शुद्ध रक्त वेळेवर मिळते आणि रक्त मिळाले तरी ते योग्य पद्धतीने दिले जात नाही आणि अपेक्षेप्रमाणे हिमोग्लोबिन ९ ग्राम असताना ते दिले जात नाही. अशा रुग्णांमध्ये लोहाचे प्रमाण वाढून कालांतराने वेगवेगळे अवयव निकामी होतात आणि ते होऊ नये म्हणूनच अशा प्रत्येक रुग्णाला 'आयर्न चिलेशेन'च्या गोळ्या मिळणे वैद्यकीयदृष्ट्या अत्यावश्यक मानले जाते. मात्र या गोळ्या कोणत्याच सरकारी रुग्णांलयांमध्ये मिळत नाही. मात्र कोणत्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या गोळ्या तसेच इतर औषधोपचार मिळत नाही. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अपेक्षित स्वतंत्र कक्ष नाही व विशेष डॉक्टर-प्रशिक्षित कर्मचारीदेखील नाहीत. अशा रुग्णांना संसर्गविरहित रक्त मिळावे म्हणून 'नॅट टेस्टेट' रक्त मिळण्याची सोयदेखील सरकारी रुग्णालयांमध्ये नाही. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये 'चिलेशन'च्या गोळ्यांचा समावेश झाला आहे व 'डीएमईआर'च्या दर करारामध्येही गोळ्यांचा समावेश झाला आहे; परंतु त्याची शून्य अंमलबजावणी आहे, असे थॅलेसेमियाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या 'थिंक फाऊंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष विनय शेट्टी (मुंबई) यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

मेजर-मायनरची तपासणीही नाहीच

पती व पत्नी हे दोघेही 'थॅलेसेमिया मायनर' असतील तर त्यांचे मूल हे 'थॅलेसेमिया मेजर' असण्याची निम्मी शक्यता असते. त्यामुळे विवाहापूर्वी मायनर-मेजरची तपासणी करणारी 'इलेक्ट्रोफेरेसिस'ची तपासणीदेखील सरकारी यंत्रणांमध्ये होत नाही व त्याविषयी किमान जनजागृतीदेखील नाही. सरकारी-खासगी रुग्णालयांमध्ये व डॉक्टरांमध्येही याविषयी कमी जागृतता आहे आणि देशभरात पाच कोटी मायनर असतानाही सरकारने याकडे पार दुर्लक्ष केले आहे, असेही शेट्टी म्हणाले.

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 'हिमॅटोलॉजी सेंटर'साठी साडेतीन कोटी रुपये मंजूर आहेत; परंतु या सेंटरविषयी कोणतीही हालचाल दोन वर्षांत झालेली नाही. घाटीमध्ये किंवा कोणत्याच सरकारी किंवा पालिका रुग्णालयांमध्ये 'चिलेशन'च्या गोळ्या व औषधोपचार उपलब्ध नाही. मराठवाड्यात तीन हजारांपेक्षा जास्त थॅलेसेमियाग्रस्त असतानाही त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

- अनिल दिवेकर, सचिव, औरंगाबाद थॅलेसेमिया सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन दिवसाच्या पाळतीनंतर इरफान कुरेशी पोलिसांच्या जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई गुन्हे शाखेने शहा कॉलनी येथून घाटकोपर बाँबस्फोटातील संशयित प्राध्यापक इरफान अहेमद गुलाम अहेमद कुरेशी (वय ४७ रा. प्लॉट क्रमांक ८, शहा कॉलनी, उस्मानपुरा) याला रविवारी अटक केली. गुरुवारी शहरात आलेल्या कुरेशीवर अहमदाबाद एटीएसची तीन दिवसांपासून पाळत होती. दरम्यान, २००४ साली पोटा कमिटीने कुरेशीवरील गुन्हा मागे घेण्याचे आदेश दिले होते.

उस्मानपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २००२ मध्ये घाटकोपरमध्ये बाँबस्फोट झाला होता. त्या घटनेच्या पूर्वी कुरेशी हे मुंबईतील कंपनीमधील नोकरी सोडून आखाती देशात नोकरीसाठी गेला होता. त्याच्या कंपनीमधील काही सहकाऱ्यांचा बाँबस्फोटात संशयित आरोपी म्हणून समावेश होता. या प्रकरणी कुरेशीचा काही सबंध नसल्याने २००४ साली पोटा न्यायालयाच्या एका समितीने कुरेशीवरील कलमे मागे घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर कुरेशी पुन्हा आखाती देशात निघून गेला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या तपास यंत्रणेमध्ये त्याचा पसार आरोपीत समावेश कायम होता. २००६ साली अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर बाँबस्फोट झाला होता. त्यामध्ये देखील संशयित म्हणून कुरेशीचा समावेश होता. गुजरात एटीएसचे पथक देखील त्याच्या मागावर होता. गुरुवारी कुरेशी आखाती देशातून भारतात परतून औरंगाबादच्या निवासस्थानी दाखल झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुजरात एटीएसचे पथक शहरात धडकले. त्यांनी कुरेशी याची चौकशी केली. त्यामध्ये कुरेशी याचा अहमदाबादच्या घटनेशी सबंध नसल्याचे निष्पन्न झाले. गुजरात एटीएसने मुंबई गुन्हे शाखेला कुरेशी भारतात आल्याची माहिती दिली. या माहितीवर रविवारी मुंबई गुन्हे शाखेचे पथक शहरात दाखल झाले. चौकशीमध्ये कुरेशी याने त्यांना पोटा कमिटीने क्लीनचीट दिल्याची कागदपत्रे दाखवली. मात्र, पोलिसांच्या रेकॉर्डनुसार कुरेशी पसार असल्याने त्याला ताब्यात घेत अटक करून कागदपत्र व नातेवाईकासह मुंबईला चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

दिरंगाईचा फटका

कुरेशी याला पोटा समितीने क्लीनचीट दिल्यानंतर त्याने ती कागदपत्रे सबंधीत तपास यंत्रणेला किंवा ज्या कोर्टात घाटकोपर बाँबस्फोटाचे प्रकरण सुरू होते त्या ठिकाणी दाखल करणे गरजेचे होते. त्याने ही कागदपत्रे दोन्ही ठिकाणी सादर केली नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या लेखी तो पसार आरोपी होते. या मुद्द्यावरच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कागदपत्रासह मुंबईला नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही दिनात २९ तक्रारी

$
0
0

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात सात एप्रिल रोजी झालेल्या लोकशाही दिनामध्ये २९ तक्रारी दाखल झाल्या. यामध्ये जिल्हा परिषदेच्या पाच, महापालिका दोन, सार्वजनिक बांधकाम एक, एमएसईबी दोन, पोलिस चार, महसूल सात तर इतर विभागांच्या पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या. या लोकशाही दिनामध्ये तीन प्रकरणे निकाली काढण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अग्रवाल युवा मंचच्या वतीने पारुंडी गोशाला येथे चारा वाटप

$
0
0

म.टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

अग्रवाल युवा मंचच्या वतीने सोमवारी आडूळ जवळील पारुंडी गावातील गोशाळेत चारा वाटप करण्यात आला. ११०१ चाऱ्याच्या पेंढ्या यावेळी देण्यात आल्या. अग्रवाल युवा मंचच्या वतीने नेहमी सामजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम अध्यक्ष दीपक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या वतीने राबवण्यात आला. यावेळी युवा मंचचे उपाध्यक्ष शिरीष अग्रवाल, सचिव अनुप अग्रवाल, सहसचिव मुकेश अग्रवाल, कोषाध्यक्ष अमुल अग्रवाल, सदस्य अनिकेत अग्रवाल, प्रतीक पिरथानी, शुभम अग्रवाल, अमित अग्रवाल, सागर अग्रवाल, दीपक जैन, सचिन अग्रवाल, सुमित भारुका, योगेश मोर, शुभम अग्रवाल, मोहित धानुका, श्लोक बगड़िया, राहुल भारुका, रवी गुप्ता, राहुल अग्रवाल, राकेश मोदी, गौरव अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. निपुण विनायक शनिवारी येणार

$
0
0

औरंगाबाद : महापालिका आयुक्त म्हणून बदली झालेले डॉ. निपुण विनायक शनिवारी शहरात दाखल होणार आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी आपण शनिवारी येणार असून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहोत असे सांगितले. महापौरांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. डॉ. विनायक यांच्या बदलीचे अधिकृत आदेश राज्य शासनाने शनिवारी (५ मे) काढले. त्यानंतर आज महापौरांनी डॉ. विनायक यांच्याशी संपर्क साधला व पालिकेत केव्हा रूजू होणार असे विचारले तेव्हा शनिवारी आपण शहरात येणार आहोत. त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आयुक्तपादीची सूत्रे स्वीकारू असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’ प्रक्रिया योग्य रितीने करा

$
0
0

'आरटीई' प्रक्रिया योग्य रितीने करा

'सीईओ'ना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्राथमिक शिक्षण विभागाकडून शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी योग्य रितीने होत नसल्याची तक्रारी पिपल्स व्हाईसकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले. आरटीई प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणा, बेजबाबदार वर्तनामुळे व तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांचा मुलभूत हक्क हिरावला जात आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर रवी मिसाळ, अॅड. सागर मोरे, रवी गायकवाड यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images