Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मार्च संपताच वीज वसुली ढेपाळली

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मार्चअखेरपर्यंत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणाने धडक मोहीम राबविली. ती यशस्वी करून राज्यात वसुलीत औरंगाबाद विभागाने नववा क्रमांक पटकाविला. ही मोहीम यशस्वी केल्यानंतर एप्रिल महिन्यात महावितरण कार्यालयाच्या अभियंत्यांनी; तसेच कर्मचाऱ्यांनी 'आराम'च केला. त्यामुळे एप्रिल महिन्यात औरंगाबाद विभागाच्या वसुलीत २६ कोटी रुपयांची तूट आल्याचे स्पष्ट झाले आहे. या थकबाकीची वसुली १५ मेपर्यंत न झाल्यास संबंधित उपविभागीय अभियंत्यांच्या पगारातून वीज बिलाच्या थकबाकीची वसुलीची करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.

महावितरणाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी क्रांतीचौक उपविभागाला मंगळवारी (आठ मे) भेट दिली. त्यावेळी कामकाज संथपणे सुरू असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले. या विभागातील कामाचा आढावा घेतल्यानंतर क्रांतीचौक उपविभागात २०० वीज मीटर बदलण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. या शिवाय क्रांतीचौकातील वीज वसुलीही खुपच कमी झाली असल्याची माहितीही समोर आली. या प्रकरणावरून मुख्य अभियंता गणेशकर यांनी संबंधित अभियंत्यांना वीज वसुली पूर्ण करण्याचे आदेश दिले. संबंधितांनी कार्यालयात थांबू नये. वीज बिलाच्या वसुलीसाठी बाहेर निघण्याचा सल्लाही दिला.

या भेटीनंतर मुख्य अभियंता गणेशकर यांनी 'मटा'ला सांगितले की, औरंगाबाद विभागाची एप्रिल २०१८च्या महिन्यात २६० कोटी रुपयांची डिमांड होती. यातून फक्त २३४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर शहर विभागाला ४२ कोटी रुपयांची वीज देण्यात आली. यातून ३४ कोटी रुपये वसूल झाले आहेत. शहरातून आठ कोटी रुपयांची वसुली कमी झालेली आहे. एप्रिल महिन्यात विभागात २६ कोटींची वसुली कमी झाल्याने १५ मेपर्यंत थकबाकी पूर्ण वसूल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. ही थकबाकी वसुली झाली नाही, तर संबंधित उपविभागीय अभियंता यांच्या पगारातून थकबाकीची रक्कम वसूल केले जाणार आहे.

……………

एक ते पाच मेदरम्यान वीज चोरांवर कारवाई

शहर आणि जिल्ह्यात एक ते पाच मेदरम्यान वीज चोरी विरोधात मोहीम राबविण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी दिले होते. ही कारवाई काही भागात राबविण्यात आली, मात्र अनेक भागात ही मोहीम झाली नसल्याची माहितीही महावितरण कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

……………

मीटर बदलण्याच्या मोहिमेतही अपयश

एप्रिल २०१८ मध्ये विभागात १६ हजार इलेक्ट्रो मॅग्नेटिक नवीन वीज मीटर लावण्याचे टार्गेट देण्यात आले होते. जुन्या मीटरच्या जागी नवीन वीज मीटर बसविण्यात येणार होते, मात्र एप्रिल महिन्यात फक्त आठ हजार ३०० वीज मीटर बदलण्यात आले आहे. त्यापैकी तीन हजार २०० वीज मीटरची नोंद कम्प्युटरमध्ये करण्यात आली आहे. यामुळे वीज मीटर बदलण्याच्या मोहिमेतही महावितरण अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मध्य प्रदेश सरकारवर कारवाईची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मध्य प्रदेश राज्यात पोलिस भरतीत वैद्यकीय तपासणीदरम्यान उमेदवारांच्या छातीवर जातीनिहाय माहिती लिहिण्यात आली होती. उमेदवारांना अयोग्य वागणूक देणाऱ्या मध्य प्रदेश सरकार विरोधात अॅट्रासिटी कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

यासंदर्भात काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष शेषराव नाडे, सरचिटणीस जयपाल दवने, रॉबिन बत्तीसे, सुनील साळवे, उत्तमराव दनके, अरुण नंदागवळी, हरचरणसिंग गुलाटी, अलिशेर खान, शकुंतला पट्टेकर, अनिता भंडारी, अॅड. राजेंद्र गवई, सम्राट वानखेडे, प्रभाकर साळवे, भिकाजी खोतकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लोकरंग महाराष्ट्राचे’ सोहळा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र दिनानिमित्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित 'गर्जा महाराष्ट्र' कार्यक्रमांतर्गत प्रोझोनमध्ये सादर करण्यात आलेल्या 'लोकरंग महाराष्ट्राचे' कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. शाहीर अजिंक्य लिंगायत प्रस्तूत या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध लोककलांचे दर्शन घडवले.

महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने आयोजित 'गर्जा महाराष्ट्र सोहळ्या'ला प्रोझोन मॉल, मॅजिस्टिक लँडमार्क्स, हिरण्य रिसॉर्ट्स, लिटिल एंजल्स स्कूल, आयसीडी, मृदुला टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हेअर स्टुडियो यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्रदिनी सायंकाळी प्रोझोनमध्ये रंगलेल्या 'लोकरंग महाराष्ट्राचे' कार्यक्रमाची सुरुवात 'वासुदेव आला'ने झाली. त्यानंतर गोंधळ, वाघ्या-मुरळी, शाहिरी, लावण्या, लोकगीते सादर करण्यात आली. यावेळी वासुदेवच्या माध्यमातून शहरातील कचऱ्याच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला. प्रत्येकाने जबाबदारीने वागल्यास कचऱ्याची समस्या दूर केली जाऊ शकते असा संदेश देताना स्वच्छतेची कास धरण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी 'माझी मैना गावाकडे राहिली'च्या गीतातून संयुक्त महाराष्ट्राची यशोगाथा सादर करण्यात आली. 'वाजले की बारा', 'राया मला सोडून जाऊ नका' यासारख्या दिलखेचक लावण्यांनी दर्शकांची मने जिंकली. विस्मरणात गेलेली गण गवळण, बतावणीची ठसकेदार विनोद, देवीचा जोगवा व वाघ्या मुरळीची पारंपारिक गाणी आणि सोबतच ठसकेबाज लावण्यांनी कार्यक्रमामध्ये बहर आणली. 'लोकताल वाद्य महाराष्ट्राचे'ने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कलावंतांनी लोककलेतील वाद्य, ढोलकी, डिमडी, तुणतुणे, ढोलताशा, शाहिरी डफ, हलगीचा वापर करून सादर केलेल्या 'लोकरंग महाराष्ट्राचे'ने प्रोझोनमध्ये खरेदी व मनोरंजनासाठी आलेल्या शेकडो दर्शकांना मंत्रमुग्ध केले.

'लोकरंग महाराष्ट्राचे'मध्ये प्रचिती हासेगावकर, मयुरी राजपूत, श्वेता पगारे, दिव्या तुपे, गायत्री तुपे, वैष्णवी गीते, किशोर धारासुरे, चैतन्य इंगळे, शुभम केंद्रे, वैभव पंडित, वैभव बोडखे, ऋत्विक चव्हाण या कलावंतांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. धारूरकर यांना जनसंपर्क पुरस्कार

$
0
0

औरंगाबाद : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय) संस्थेच्या वर्धा शाखेतर्फे जनसंपर्क, माध्यम तज्ज्ञ, अभ्यासक प्रोफेसर डॉ. वि. ल. धारूरकर यांना नुकताच जनसंपर्क सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रोफेसर आनंद वर्धन शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जनसंपर्क, माध्यम आणि संशोधन क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, पीआरएसआयच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल कुमार राय, सचिव बी. एस. मिरगे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. धारूरकर यांनी आभार मानत जनसंपर्क विषयाची व्याप्ती, हेतू आणि साध्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रो. शर्मा यांनीही त्यांचे विचार मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिके विरोधात गंभीर अहवाल शासनाला पाठवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये आपापासात संवाद नाही. त्यामुळे शहरात गेल्या ८२ दिवसांपासून कचरा समस्या कायम आहे. समितीने कचरा टाकण्यासाठी जागा निश्चित करून दिल्या आहेत तरी या जागांचा वापर करणे सुरू केले नाही, वर्गीकरण केलेला कचरा घेण्याचे निर्देश आहेत. मात्र, कारवाई होताना दिसत नाही, कचराप्रश्नी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीने काम करावे प्रशासनाने काम सुधारावे अन्यथा आपण आठवड्याभरात महापालिकेविरोधात शासनाकडे गंभीर अहवाल पाठवणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.

शहरातील ठिकठिकाणी पडलेला कचरा उलण्याऐवजी कचराकोंडीच्या समस्यांवर केवळ बैठकांचा सपाटा सुरू असून महापालिकेतील अधिकारी पूर्ण ताकदीने काम करत नसल्याने समिती अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर चांगलेच संतापले आहेत.

कचराप्रश्नावर बोलताना डॉ. भापकर म्हणाले की, शहरात येत्या काही दिवसात पाऊस सुरू झाला तर गंभीर परिस्थिती ‌निर्माण होईल, समिती केवळ मार्गदर्शन करू शकते, प्रत्यक्षात महापालिका प्रशासनाला काम करावयाचे आहे, सर्वप्रथम शहरातील रस्त्यांवर पडलेला कचरा उचला असे निर्देश असतानाही पूर्ण क्षमतेने काम केले जात नाही. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा घ्या तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश असताना केवळ थातुरमातूर कारवाया करण्यात येत आहेत. समितीने कचरा टाकण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. मात्र, त्याचा पूर्ण वापरच होत नसेल तर सदर माहिती शासनाला कळवावी लागेल. महापालिकेने केवळ कचराप्रश्नावर काम करण्यासाठी अधिकाऱ्यांचे एक वेगळे पथक निर्माण करावे जेणेकरून कामामध्ये सातत्य राहील. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्‍ण भालसिंग तसेच अभियंता हेमंत कोल्हे तसेच इतर अधिकाऱ्यांना काम जमत नसेल तर त्यांना निलंबित करणार असल्याचा इशाराही डॉ. भापकर यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यावरून कुरघोडीचे राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणीपुरवठ्यावरून महापालिकेत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. सत्ताधारी शिवसेना - भाजपमध्येच पाण्यावरून जुंपली असून सुरळीत पाणीपुरवठ्याचे श्रेय कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या रस्सीखेच मुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असून त्यात नागरिक भरडले जातआहेत.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी मुक्काम आंदोलन करून समान पाणीवाटपाचा मुद्दा पुढे आणला आणि तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त उदय चौधरी यांना घ्यायला लावला. भाजप नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून पालिका प्रशासनाने तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले अस्वस्थ झाले. शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. सर्वसाधारण सभा संपून दोन दिवस उलटल्यावर भाजप नगरसेवकांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने महापौरांनी दिलेले आदेश बाजूला ठेवून तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन टाकला. त्यानंतर बुधवारी पत्रकारांशी बोलताना महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहराला दोन दिवसआडच पाणीपुरवठा होईल, असे स्पष्ट केले. दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, असे आदेश दिले.

पत्रकारांशी बोलताना महापौर म्हणाले, शहराला सध्या २२० एमएलडी पाण्याची गरज आहे, प्रत्यक्षात १३५ एमएलडी पाणी शहरापर्यंत येते. दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यासाठी एवढे पाणी पुरेसे आहे. या पाण्याचा हिशेब केल्यास दोन दिवसआड पाणीपुरवठा केल्यावर देखील ५० एमएलडी पाणी शिल्लक राहते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने योग्य नियोजन केल्यास दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाऊ शकतो, याबद्दल आपण आयुक्तांशी चर्चा करणार आहोत. माजी महापौरांसह भाजपच्या नगरसेवकांना आंदोलन करावे लागले ही खेदजनक बाब आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

महापौरांच्या या भूमिकेनंतर 'मटा' शी बोलताना भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले, शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या गुलमंडी, राजाबाजार, पानदरीबा, रंगारगल्ली, मछलीखडक आदी भागात पाच - सहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त जाले आहेत. शहरातील सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन महापालिकेने करावे व नागरिकांना पाणी द्यावे. काही ठिकाणी दोन दिवसांनी, काही ठिकाणी तीन दिवसांनी तर काही ठिकाणी पाच-सहा दिवसांनी पाणी येते हे योग्य नाही. सर्वांना समान पाणी मिळाले पाहिजे, असे तनवाणी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठा चौथ्या दिवशीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा कमी होत आहे, त्या तुलनेत उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. उपलब्ध होणारे पाणी आणि पाण्याची वाढती मागणी याची सांगड घालताना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य नाही. तीन दिवसाआडच (चौथ्या दिवशी) पाणीपुरवठा केला जाणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी रात्री उशिरा स्पष्ट केले आहे. तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे वॉर्ड निहाय वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी ११ मे पासून होईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी बुधवारी रात्री उशिरा पाणीपुरवठ्याबद्दल प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हर्सल तलाव फेब्रुवारी महिन्यातच आटला आहे. या तलावातून ज्या वॉर्डांना पाणीपुरवठा होत होता, त्या वॉर्डांना आता जायकवाडीवरून पाणीपुरवठा करावा लागत आहे. जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग मशनरीची पाणी उपसण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे रोज १५६ एमएलडी पाणी उपसले जाण्याऐवजी १५० एमएलडी पाणी उपसले जात आहे. नागरिकांनी वापराच्या पाण्यासाठी घेतलेल्या विंधन विहिरी देखील आटल्या आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी आठ ते दहा एमएलडीने वाढली आहे. या सर्व बाबींचा विचार करता दोन दिवसआड पाणीपुरवठा करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होऊ शकत नाही. ज्या भागात जलकुंभ आहेत त्या भागातील नागरिक ' माझा वॉर्ड-माझी टाकी-माझे पाणी' अशी भूमिका घेत दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याची मागणी करीत आहेत. नागरिकांनी 'आपले शहर अपले पाणी' अशी भूमिका ठेवावी, असे आवाहनही चहेल यांनी केले आहे.

तीन दिवसआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने वॉर्ड निहाय वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवार (११ मे) पासून केली जाणार आहे, असे चहेल यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक जलकुंभावर पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक लावण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यधुंद कारचालकामुळे अपघात

$
0
0

वाळूज महानगर: पुण्याकडून नागपूरकडे जाणाऱ्या खासगी बससमोर एक मद्यधुंद चालकाने कार अचानक रस्त्यावर आडवी लावल्याने बसचालकाने बस दुभाजकावर घातल्याने मोठा अपघात टळला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास औरंगाबाद-पुणे रस्त्यावरील वाळूज पोलिस ठाण्यासमोर झाला.

वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर गायकवाड (रा़ वाळूज, ता़ गंगापूर) हा मद्यधुंद अवस्थेत कार (एम एच २० बी एन ८८१८) घेऊन रस्त्यावर रस्त्यावर फिरत होता. नशेत असल्याने त्याने अचानक कार रस्त्यावर आडवी केली. यावेळी बसचालकाने प्रसंगावधान राखून बस (एमएच ०४ जी ८८१६) दुभाजकावर चढवल्याने जीवितहानी झाली नाही. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते. या अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. गायकवाड हा मद्यधुंद अवस्थेत एक तासापासून फिरत होता, असे प्रत्यक्षदर्शी नदीम झुंबरवाला यांनी सांगितले. बसचालक अभय साळुंखे यांच्या तक्रारीवरून कारचालक किशोर गायकवाड याच्यावर वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

\Bदरवाजे तोडून प्रवासी काढले \B

धडकेचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी गर्दी केली होती. वाळूज पोलिस ठाण्याचे अंमलदार भाले, सहाय्यक फौजदार दत्तात्रय साठे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोरुडे यांनी नागरिकांच्या मदतीने बसचे दरवाजे तोडून प्रवाशांना बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बीएड अर्ज भरण्याची गर्दी

$
0
0

बीएड अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी गर्दी

९, १० जून रोजी ऑनलाइन परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अध्यापक पदवी अभ्यासक्रम (बीएड) प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन प्रवेशपूर्व परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवारी संपली. पुढील वर्षीपासून अभ्यासक्रमाचा कालावधी वाढणार असल्याने यंदा अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

बीएड अभ्यासक्रमासाठी ९ व १० जून रोजी ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी ९ ते एप्रिल ते ९ मे दरम्यान विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. त्याची मुदत बुधवारी संपली. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. शासकीयसह खासगी बीएड कॉलेजांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे दिवसभर कॉलेजांमध्येही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे ही प्रक्रिया राबविली जात आहे. सायंकाळपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली नव्हती. पुढील वर्षात अभ्यासक्रमाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. २०१५-१६ शैक्षणिक वर्षापासून बीएड अभ्यासक्रम दोन वर्ष कालावधीचा करण्यात आला. आता हा बारावीनंतर चार वर्षाचा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी यंदा वाढण्याची शक्यता आहे. आलेल्या अर्जाच्या नोंदी घेण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढेल असे चित्र आहे.

'एमएड'साठीही प्रक्रिया झाली

पदव्युत्तर अध्यापक अभ्यासक्रमासाठी (एमएड) प्रवेश पूर्व परीक्षा १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २६ मार्च ते ७ मे दरम्यान झाली. बीएड, एमएड अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी २३, २४ मे रोजी हॉलतिकीट विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे कळविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामसडकची कामे अर्धवट करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि इतर योजनांतर्गत गावातील रस्त्यांची दुरूस्ती, डांबरीकरण, खडीकरण यासह रस्ते देखभाल, दुरूस्ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. कामाची निविदा देण्यात आलेल्या ठेकेदाराने नियमानुसार वेळेत गुणवत्तापूर्ण काम करणे हे गरजेचे आहे. ज्याठिकाणी कंत्राटदारांनी कामे अर्धवट, निकृष्ट दर्जाची केली आहेत अशा सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका, त्यांच्याकडून नियमाप्रमाणे दंड वसूल करा, असे आदेश खासदार तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशाची बैठक बुधवारी खासदार खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयाणी डोणगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, यांच्यासह जिल्हा परिषद तसेच पंचायत समितींचे सभापती, सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार खैरे यांनी 'संसद आदर्श ग्राम योजना' या योजनेअंतर्गत लोकप्रतिनिधींनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये केंद्र, राज्य शासनाच्या सर्व योजना यशस्वीरित्या पूर्ण कराव्यात. बदलत्या काळानुसार आता जिल्हा परिषद, महानगर पालिकेच्या शाळांनी गुणवत्तावृद्धीवर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी करत रस्त्याची कामे अर्धवट, निकृष्ट करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देश दिले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जिल्ह्यात विहिरींच्या अकुशल कामांचे राहिलेले अनुदान तत्परतेने वितरित करण्यासाठीचे प्रस्ताव पाठवावेत, निकृष्ट काम करणाऱ्या एजन्सीला कार्यादेश देण्यात येऊ नये, अशा सूचना यावेळी मांडल्या. अन्य सदस्यांनीही विहीरींचे काम करूनही शेतकऱ्यांना निधीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विहिरींचे अनुदान तत्परतेने देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा, असे निर्देश खासदार खैरे यांनी दिले. चर्चेत निधी उपलब्ध नसल्याचे समोर येताच जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे साडेचार कोटी रुपयांच्या निधीची मागणी करावी, असे सुचविले. दरम्यान, बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, कर्मचारी राहत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यावर बोलताना खैरे यांनी गैरहजर राहणाऱ्यावर कारवाई केली करण्यात येईल, असा इशारा दिला. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ मिशन, सर्व शिक्षा अभियान यासह इतर विविध योजनांच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

ई -स्कॅनिंग ९१ टक्के

बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी यांनी डिजीटल भारत भू- अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात यशस्वीरित्या काम सुरू आहे. आतापर्यंत औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण या तहसील कार्यालयांतील ई-स्कॅनिंग १०० टक्के पूर्ण झाले असून संपूर्ण जिल्ह्यात आता पर्यंत ९१.३३ टक्के काम पूर्ण झाले, अशी माहिती दिली.

दीड हजार शाळांना अ दर्जा

जिल्ह्यातील २ हजार शाळांपैकी १ हजार ५०० शाळा प्रगत महाराष्ट्र अभियानांतर्गत यशस्वी वाटचाल करून अ दर्जा नामांकित झाल्या असल्याची माहिती यावेळी शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी यावेळी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरटीई’चा दुसरा टप्पा सुरू करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाची दुसरी प्रक्रिया अद्याप ठप्प आहे. 'मे'चा पंधरवाडा होत आला तरी, प्रक्रियेला मुहूर्त नाही. प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी मागणी पुढे आली आहे. आरटीई पालक संघटनेनेही निवेदन दिले आहे. मोफत प्रवेशाची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. मे सुरू झाला तरी, अद्याप प्रक्रियेचा दुसरा टप्पाच सुरू झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सहा हजार प्रवेश दिले जाणार आहेत. पहिली सोडत १३ मार्च रोजी झाली. एप्रिलमध्ये पहिला टप्पा पूर्ण झाला यामध्ये २ हजार ९८ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. परंतु पुढचा टप्पाच सुरू झाला नाही. या टप्प्याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. प्रक्रिया त्वरीत सुरू करावी अशी मागणी होत आहे. पालक संघांने १५ मे पर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर प्रा. प्रशांत साठे यांची स्वाक्षरी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराप्रश्नी निर्णायक लढाईची वेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐतिहासिक औरंगाबादची प्रतिमा कचऱ्यामुळे डागाळली असून शहराला कचरा समस्येपासून मुक्त करण्यासाठी गेल्या ८२ दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. आता पावसाळा तोंडावर आल्याने निर्णायक लढाईची वेळ आली आहे. या समस्येतून मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणा, नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचा सूर महास्वच्छता अभियानाच्या बैठकीत बुधवारी निघाला.

तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित महास्वच्छता अभियान बैठकीसाठी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, नगररचना उपसंचालक रिता मैत्रेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सभागृह नेता गजानन बारवाल, अनिल भालेराव, प्रफुल्ल मालानी, जगन्नाथ काळे, नवल किशोर मालू, सारंग टाकळकर, समाजसेवक श्री. खेडकर, सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण आदींचीउपस्थिती होती.

महास्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून शहरातील विविध रस्ते, दुभाजक, चौक, हरितपट्ट्यांच्या सुशोभिकरणासाठी सामंजस्य करार करण्यात येणार असून यासाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था, व्यापारी महासंघ, उद्योजक संस्था तसेच इतर संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी कचरा व्यवस्थापन कालबद्ध कृती आरखड्याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'शहर चकाचक करण्यासाठी १९, २०, २६ आणि २७ मे रोजी महास्वच्छता अभियान राबण्यात येणार आहे. या अभियानात लोकांनी सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे. पावसाळ्यापूर्वी शहरातील कचरा, नालेसफाई होणे आवश्यक आहे. गेल्या १५ दिवसांपासून समितीने कचरा टाकण्याची जागा निश्चित केल्या आहेत. मात्र त्यापैकी मोजक्याच जागेवर कचरा टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन दिवसांत निवडलेल्या सर्व जागांवर कचरा टाकणे आवश्यक आहे. पालिकेने ११ मे पासून शहरात कचऱ्याचे ढिग राहणार नाहीत याची दक्षता घेत याबाबत तत्काळ कारवाई करावी,' असे निर्देशही आयुक्तांनी दिले. बैठकीला उद्योजक तसेच बांधकाम व्यावसायिक दिसत नसल्याची खंत आमदार अतुल सावे यांनी व्यक्त केली. महापौर म्हणाले, 'नागरिकांच्या सहभागाशिवाय कुठलेही संकट दूर होत नाही. कचऱ्याच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे.'

\Bमहापौर असल्याचे विसरलो

\B'शहरात कचराकोंडीच्या समस्या दूर करण्यासाठी नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. आर्थिक संकटात सापडलेली महापालिका चालवणे परमेश्वरालाही अवघड आहे. कचऱ्याच्या समस्येमुळे आपण महापौर आहोत हेच विसरलो आहोत,' असे घोडले म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराणा प्रताप जयंती उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

क्रांतिसूर्य, वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती बुधवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त वाहनफेरी, रक्तदान शिबिर, व्याख्यानासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी राजाबाजार येथून मुख्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुणांनी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करत लक्ष वेधून घेतले.

बजरंग चौक येथे सकाळी नऊ वाजता महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर हिंदू क्रांतिसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे दुचाकी फेरी काढण्यात आली. टीव्ही सेंटर, जिल्हाधिकारी कार्यालय, भडकलगेट, बाबा पेट्रोलपंप, क्रांतिचौक, सेव्हनहिल, सिडको बसस्टॅण्ड मार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता महाराणा प्रतापसिंह उद्यान (कॅनॉट गार्डन) येथे करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या जयघोषाने संपूर्ण वाहनफेरी मार्ग दुमदुमून गेला होता. उद्यान परिसरात असलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विचारवंत बालाजी जाधव यांचे 'राजपूत समाजाची दशा व दिशा' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

\Bराजाबाजारातून मुख्य मिरवणूक \B

संस्थान गणपती, राजाबाजार येथून सायंकाळी सात वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीस नगरसेवक गजानन बारवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे कंवरसिंह बैनाडे, जयसिंग होलिये, संजय गोमलाडू, महेंद्र बारवाल जगतसिंह परिहार, सुभाष मेहेर, नारायणसिंह होलिये, पद्मसिंह राजपूत, बिजू मारग, प्रा. भीमसिंग कहाटे, चंदा राजपूत, महाजन चुंगडे, रामू राजपूत, विनोद पवार, महेंद्रसिंह ठाकूर, विजयसिंह झाला, ताराचंद महेर, विश्वनाथ राजपूत, देविचंद बारवाल, रणधीरसिंह होलिये यांच्यासह मोठ्या संख्येने समिती सदस्य, नागरिक उपस्थित होते. सजावलेल्या रथात महाराणा प्रताप यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ढोलपथकाचे आकर्षक सादरीकरण तसेच लाठ्या-काठ्या, गत्कल यांचे सादरीकरणाने साऱ्याचे लक्ष वेधले होते. शहागंज, सराफा, सिटी चौकमार्गे काढण्यात आलेल्या या मिर‌वणूकीचे विसर्जन गुलमंडी येथे करण्यात आले.

\Bशिवराणा सेवा संघ \B

शिवराणा सेवा संघ प्रणित सर्वधर्मीय महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात महापौर नंदकुमार घोडेल यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यात अनेक दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी संघाचे प्रांत अध्यक्ष एल. डी. ताटू यांनी उद्यानात महाराणा प्रताप यांचा पुर्णाकृती पुतळा तातडीने उभारण्यात यावा, अन्यथा इतर कोण्याही नेत्यांचा पुतळा शहरात उभारू देणार नाही, असा इशारा दिला. त्यावर बोलताना महापौरांनी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, समितीतर्फे गजानन महाराज मंदिर येथून वाहनफेरी काढण्यात आली. जवाहर कॉलनी, आकाशवाणी, सेव्हन हिल, कॅनॉट प्लेस मार्गे काढण्यात आलेल्या या फेरीची सांगता महाराणा प्रताप उद्यान येथे झाली. तेथे साहित्यिक प्रा. ऋषिकेश कांबळे यांनी उपस्थितांना महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी गायत्री राजपूत, दिव्या जोनवाल या विद्यार्थिनींचीही भाषणे झाली. कैलास राजपूत, जगतसिंह परिहार, गोवर्धन शेवगण, जितेंद्र राजपूत, सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण, देविदास जाधव, नितीन सानप, सुभाष शिंदे, दिगंबर गजमल, स्वप्निल जाधव यांना उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. के. आर. ताटू, गुरूदत्त राजपूत, प्रेम राजपूत, शाम राजपूत, सय्यद मुर्तुजा उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधी विद्यापीठ फोटो

...अबब, अडीच लाखांचे वीज बिल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्राहकाने सोलार पॅनल घरी बसवून त्याची वीज वापरल्यानंतरही सुरुवातीला सदोष वीज बिल दिले. त्यानंतर तक्रार करूनही पुन्हा तब्बल दोन लाख ३९ हजारांचे वीज बिल देण्याचा महाप्रताप महावितरणने केला आहे. त्यामुळे बीड बायपास रोडवर राहणाऱ्या प्रवीण गिरी यांना सोलार पॅनल बसवण्याची अवदसा का आठवली, असा प्रश्न पडला आहे.

पारंपरिक ऐवजी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करून अक्षय ऊर्जा निर्मितीकडे ग्राहकांनी वळावे यासाठी ऊर्जा विभागाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. शहरातील बीडबायपास रोडवरील जगदीश गिरी यांनीही आपल्या घरावर सोलार ऊर्जा पॅनल बसविले. या पॅनलमधून होणाऱ्या ऊर्जेवर घरात वीज आली. त्यानंतरही महावितरण कार्यालयाने त्यांना दोन लाख रुपयांचे वीज बिल दिले. त्यामुळे गिरी यांनी वीज बिल दुरुस्त करून देण्याची मागणी केली. या मागणीनंतरही महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून उत्तर मिळाले नाही. अखेर कंटाळून त्यांनी हे प्रकरण महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालककडे नेले. त्यानंतर महावितरण कार्यालयाने सोलार ऊर्जा असलेल्या नेट मिटरिंग ग्राहकांची कार्यशाळा घेऊन त्यांना दुरुस्त केलेले वीज बिल दिले. यात अनेकांचा प्रश्न सुटला. मात्र, गिरी यांनी वारंवार महावितरण कार्यालयाचे खेटे मारले. अर्जफाटे दिले. त्यानंतर वीज बिलात दुरुस्ती झाली नाही. उलट मे महिन्याचे वीज बिल हा दोन लाख ३९ हजार आले आहे.

\Bकोपरापासून जोडले हात

\Bमहावितरण कार्यालयाच्या वारंवार चकरा मारूनही वीज बिल दुरुस्त करून दिले जात नाही. उलट जास्तीचे वीज बिल देण्यात येत आहे. या अतिशय आनंदाचा वर्षा करणाऱ्या त्रासाबद्दल आणि तक्रार न सोडविल्याबद्दल गिरी यांनी कोपरापासून हात जोडून महावितरणचे आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घाटीत उभी राहणार नवीन ‘मॉर्च्युरी’

$
0
0

पाच कोटी रुपये झाले मंजूर; तीन महिन्यांत काम सुरू होऊन दोन वर्षात दुमजली इमारतीचे काम होणार पूर्ण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) शवविच्छेदनगृहाची (मॉर्च्युरी) नवीन इमारत उभी राहणार आहे. त्यासाठी ४ कोटी ८५ लाख रुपये मार्चच्या बजेटमध्ये मंजूर झाले आहेत आणि येत्या तीन महिन्यात प्रत्यक्ष काम सुरू होऊन दोन ते अडीच वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन दुमजली इमारतीमुळे पूर्वीच्या तुलनेत जास्त जागा मिळणार असून, काही नवीन सुविधाही उपलब्ध होणार आहेत. त्याचा रुग्णांच्या नातेवाईकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही लाभ होणार असल्याची अपेक्षा केली जात आहे.

घाटीमध्ये शवविच्छेदनगृहाची ५० वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम हे लोडबिअरिंगचे असल्याने नव्या प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. उशिरा का होईना या इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून, मार्चच्या बजेटमध्ये दुमजली (जी प्लस वन) इमारतीसाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १ कोटी ६१ लाख रुपयांपर्यंतचा निधी पहिल्या वर्षी मिळणार आहे आणि उर्वरित निधी दुसऱ्या वर्षी मिळणार आहे. त्यामु‍ळे शवविच्छेदनगृहाच्या नवीन इमारतीवर एकदाचे शिक्कामोर्तब झाले आहे. इमारतीचे इस्टिमेट, तांत्रिक मंजुरी व इतर औपचारिक कामे तसेच ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या तीन महिन्यांत इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. अपेक्षेप्रमाणे निधी मिळाला तर बांधकाम सुरू झाल्यावर १८ महिन्यांत किंवा फार तर दोन वर्षांत बांधकाम पूर्ण होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. अर्थात, अपेक्षेप्रमाणे निधी नाही मिळाला तर मात्र घाटी व शासकीय दंत महाविद्यालयाच्या विविध इमारतींप्रमाणे या इमारतीचेही बांधकाम रखडणार हे निश्चित, असेही सांगण्यात येत आहे. त्याचवेळी मार्चच्या बजेटमध्ये निधी मंजूर झाला असला तरी अद्यापपर्यंत घाटीच्या 'बीडीएस'वर हा निधी जमा झालेला नाही, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.

....

आहे त्याच जागी नवीन इमारत

शवविच्छेदनगृहाची नवीन दुमजली इमारत ही जुन्या इमारतीलगतच उभी राहणार आहे. नवीन इमारत उभी होऊन सेवेत आल्यानंतर जुनी इमारत टप्प्याटप्प्याने पाडण्यात येईल, जेणेकरुन शवविच्छेदनाच्या कामामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. सद्यस्थितीत राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शवविच्छेदनगृहाच्या जवळपास एकाच पद्धतीच्या 'जी प्लस वन' इमारती उभ्या राहात आहेत. त्यानुसारच ही नवीन इमारत असेल, असेही सूत्रांनी सांगितले.

....

प्रशस्त जागेचा होणार लाभ

नवीन इमारतीमध्ये शवविच्छेदनासाठी दोन 'मॉर्च्युरी ब्लॉक' तसेच दोन 'कोल्ड स्टोरेज' असतील. त्याचप्रमाणे 'ऑटोप्सी ऑडिटोरियम'देखील नवीन इमारतीमध्ये असणार आहे. या सभागृहामध्ये या विषयासंबंधी पदवीस्तरीय तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेग‍ळे शैक्षणिक उपक्रम, व्याख्याने, प्रशिक्षण आदी कार्यक्रम होतील. महत्वाचे म्हणजे नवीन इमारतीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होईल. तसेच पीजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांनाही नवीन इमारतीमध्ये संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता-पद्माकर देवधर

$
0
0

औरंगाबाद: शहरातील रहिवासी व निवृत्त आयकर सहाय्यक आयुक्त पद्माकर पांडुरंग देवधर (वय ८१) यांचे मंगळवारी राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर बुधवारी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद देवधर यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅरेज बंद करून चोरीचे ट्रक विक्रीचा धंदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुन्हे शाखेच्या अटकेत असलेला शेख बाबर याने गॅरेज बंद करून या ट्रक विक्रीचा व्यवयास सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या टोळीने दीड वर्षात चोरीच्या ३५ ट्रक विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा संशय आहे.

गुन्हे शाखेने चोरीचे ट्रक विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी देखील याच प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक शेख जफर याला अटक केली असून तो सध्या भिवंडी पोलिसांच्या ताब्यात आहे. शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात त्याचा भाऊ शेख बाबर शेख अख्तर, आमेरखान व अलीम हमीद पटेल हे तिघे अटकेत आहेत. ही टोळी आंतरराज्य टोळी असून ट्रकच्या चेसिस क्रमांकात खाडाखोड करून बनावट कागदपत्राआधारे ही टोळी ट्रक विकत होती. शेख बाबर याचे पूर्वी गॅरेज होते. गुरूप्रीतसिंग नावाच्या आरोपीच्या सानिध्यात शेख बाबर आल्यानंतर त्याने त्याला या धंद्याची माहिती दिली. यानंतर बाबर हा गॅरेज बंद करून पूर्णपणे चोरीचे ट्रक विकण्याच्या व्यवसायात उतरला. ट्रक विक्रीतून आलेली रक्कम त्याचा भाऊ जफर याच्या बँक खात्यात जमा होत होती. धुळे व नाशिक येथून त्यांना चोरीचे ट्रक विकण्यासाठी मराठवाड्यात पाठवण्यात येत होते. या टोळीने दीड वर्षात अंदाजे ३५ ट्रक विकल्याचा संशय आहे. ते अर्ध्या किंमतीत ट्रक विकत होते.

\Bआणखी एक ताब्यात\B

दरम्यान, गुन्हे शाखेच्या ताब्यात सध्यात तीन आरोपी असून आणखी एकाला बुधवारी ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे प्रभारी व सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे हे करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वन अतिक्रमण विरोधात कारवाई

$
0
0

म. टा. औरंगाबाद

वन क्षेत्रावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात वन खात्याने कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सिल्लोड वन क्षेत्रातील २५ हेक्टरवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. तर, बीड जिल्ह्यातील ४६ हेक्टरवरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अन्य भागातील अतिक्रमणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे, अशी माहिती विभागाचे मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

मराठवाड्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ साडेचार टक्के वनक्षेत्र असल्यामुळे त्या भागात पाणीटंचाई आणि अपुऱ्या पावसाच्या संकटाला तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन तहानलेल्या मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर झाडांच्या लागवडीच्या माध्यमातून सावली देण्यासाठी एकीकडे वन मंत्रालयाकडून प्रयत्न होत असतानाच आहे ते वन क्षेत्रच संरक्षित आहे का, असा प्रश्नही निर्माण होत आहे. त्याचे कारण म्हणजे वनक्षेत्राला अतिक्रमणाचा बसलेला विळखा. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९२ हजार ८५२ तर जालना जिल्ह्यात एकूण ९ हजार ९९६ हेक्टरवर वनक्षेत्र विस्तारले आहे. यात दोन्ही जिल्ह्यातील वनक्षेत्रात ५ हजार हेक्टरवर अतिक्रमण झाले आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे वृत 'मटा'ने प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत वन विभागाने अतिक्रमणा विरोधात कारवाई सत्र हाती घेतले आहे.

वन क्षेत्रावर असलेल्या अतिक्रमणासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेडसह अन्य ठिकाणीही कारवाई करण्यात असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लॅट होणार औरंगाबादमध्ये

$
0
0

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना होणार फायदा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राष्ट्रीय विधी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट'साठी (क्लॅट) औरंगाबाद परीक्षा सेंटर असणार आहे. देशपातळीवरून होणाऱ्या या परीक्षेसाठी औरंगाबाद पहिल्यांदाच सेंटर असणार आहे. केंद्राचे समन्वयक म्हणून 'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ' काम पाहणार आहे. १३ मे रोजी ही परीक्षा होणार आहे.

विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहेत. देशभरात २० विधी विद्यापीठ असून तेथील प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रवेश प्रक्रिया होते. 'कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट'मधून (क्लॅट) हे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. दरवर्षी या परिक्षेची जबाबदारी एका विद्यापीठाकडे असते. यंदा कोची विद्यापीठाचा लॉ विभागाकडे प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी आहे. १३ मे रोजी देशभरात ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेचे सेंटर औरंगाबादही असणार आहे. अशा प्रकारचे सेंटर पहिल्यांदा औरंगाबादमध्ये मिळणार आहे. औरंगाबादमध्ये 'महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ' यंदापासून सुरू झाले. विद्यापीठाने परीक्षेसाठी समन्वयक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविल्याने परीक्षेचे केंद्र औरंगाबादला मिळाले आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. राज्यात विधी विद्यापीठे तीन असून त्यासह देशभरातील विधी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या परीक्षेसाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना बाहेर केंद्रावर जाण्याची गरज भासणार नाही.

'मॉक टेस्ट' ही घेणार विद्यापीठ

औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच 'क्लॅट'चे सेंटर मिळाले. तर, परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विद्यापीठाने 'मॉक टेस्ट'ही घेण्याचे निश्चित केले आहे. या केंद्रावरून १६७ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. त्यांच्यासाठी ११ व १२ मे असे दोन दिवस ही मॉक टेस्ट घेण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी 'मटा'ला सांगितले. कांचनवाडी परिसरातील जयहिंद कॉलनी येथील स्किल सोल्यूएशन येथे ही परीक्षा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images