Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘महसूल’मध्ये प्रभारीराज!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याचे मुख्यालय असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी आणि मुख्यालयातील महसूल उपायुक्त पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असून या पदांचा कारभार सध्या प्रभारींच्या खांद्यावर आहे. सध्या महसूल प्रशासनाला बदल्यांचे वेध लागल्यामुळे महिन्याअखेर तरी प्रभारी पदांवर अधिकारी मिळणार काय असा प्रश्न आहे.

औरंगाबादचे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेद्र कटके यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रशांत शेळके यांच्याकडे तर पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा पदभार देण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून ही दोन्ही महत्वाची पदे प्रभारींच्या खांद्यावर आहेत. जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, फुलंब्री तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्याची धुरा प्रभारी अधिकाऱ्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मराठवाडा विभागाचे महसूल उपायुक्त हे महत्त्वाचे पदही गेल्या पाच महिन्यांपासून प्रभारींच्या खांद्यावर आहे. डिसेंबर महिन्यात प्रल्हाद कचरे सेवानिवृत्त झाल्यानंतर महसूल उपायुक्तचा पदभार शिवानंद टाकसाळे यांच्याकडे देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या पातळीवरही सध्या बोंडअळी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी तसेच गारपीट अनुदान वाटपासारखे महत्त्वाचे प्रश्न असताना हे पद प्रभारींच्या खांद्यावर आहे.

\Bबदल्यांचे वारे

\Bमे महिन्याला सुरुवात होताच महसूल विभागामध्ये बदल्यांचे वारे सुरू होते. मे अखेरीस कार्यकाळ पूर्ण केलेल्या अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असून सोयीच्या ठिकाणी बदल्यांसाठी अनेकांनी 'फिल्डिंग'ही लावणे सुरू केले आहे. तीन वर्षे पूर्ण केलेले, होम टाऊन असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती विभागीय आयुक्‍तालयाने आठही जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवली आहे. ही माहिती येत्या काही दिवसांत येईल व त्यानंतर बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर स्वच्छतेसाठी ४० संस्थांचा पुढाकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराला कचरा समस्येपासून मुक्त करण्यासाठी ४० संस्थांनी पुढाकार घेतला असून कचरा असलेली ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी सहा सामंजस्य करार होण्याच्या मार्गावर आहेत.

या ४० संस्थांमध्ये सेवाभावी संस्था, व्यापारी संस्था, शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. ऐतिहासिक औरंगाबादची प्रतिमा कचऱ्यामुळे डागाळली असून येत्या काही दिवसांमध्ये पावसाचे संकटही येण्याची शक्यता असल्याने सनियंत्रण समिती अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी महास्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी तापडिया नाट्य मंदिर येथे मोठ्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. शहरातील कचरा समस्या ही सर्वांची असून यासाठी सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, सेवाभावी संस्था, शाळा, महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक संस्थांनी विविध ठिकाणे स्वच्छ करण्याची तयारी दर्शवली आहे.

\Bचार दिवस अभियान\B

विविध वॉर्ड, दुभाजक, शहरातील कचरा साचलेले अनेक मोठे कोपरे तसेच आवश्यक त्या ठिकाणी रंगरंगोटी करण्याची तयारी या संस्थांनी दर्शवली आहे. यासह शहरातील विविध चौक, मोठी उद्याने, हरितपट्टे आदींची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यासाठी व त्यांची देखभाल करण्यासाठी सहा सामंजस्य करार होण्याच्या मार्गावर आहेत. शहराला कचरा समस्येपासून मुक्त करण्यासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. 'शहर चकाचक करण्यासाठी १९, २०, २६ आणि २७ मे रोजी महास्वच्छता अभियान राबण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहन अधिकाऱ्याने नगरसेवकाला तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला बदडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरटीओ कार्यालयात एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांना डेप्युटी आरटीओ संजय मेत्रेवार यांनी मारहाण केली तर संतप्त कार्यकर्त्यांनी मेत्रेवार यांच्यावर हल्ला चढवला. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला. आरटीओने पकडलेल्या दुचाकीच्या कारणावरून हा वाद झाला. या घटनेनंतर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओमध्ये धाव घेतल्यानंतर वातावरण तणावग्रस्त झाले होते. परिवहन आयुक्त शेखर चेन्ने आज आढावा बैठक घेण्यासाठी शहरात आले होते. त्यांच्या येण्यापूर्वी हा प्रकार घडला. मेत्रेवार यांना दीर्घ रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध एडके यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात मारहाण व जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी आरटीओच्या वतीने शहरातील चित्रविचीत्र नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये एडके यांच्या नातेवाईकाच्या दुचाकीवरही कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी एडके नातेवाईकासह आरटीओ कार्यालयात आले होते. त्यांनी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांच्याशी संपर्क साधला. ही दुचाकी सोडण्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आरटीओच्या दालनासमोर हा वाद झाला. शाब्दिक चकमक सुरू असताना मेत्रेवार यांनी अचानक एडके यांच्या तोंडात लगावली. याला एडके व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी प्रत्यूत्तर देत मेत्रेवार यांना मारहाण केली. कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे मेत्रेवार बचावले. ही घटना घडताच आरटीओ कार्यालयात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती होताच एमआयएमचे डॉ. गफार कादरी, विरोधी पक्षनेता फेरोजखान, अरुण बोर्डे व इतर कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयात धाव घेतली. पोलिसांना हा प्रकार कळताच उपायुक्त विनायक ढाकणे, एसीपी गोवर्धन कोळेकर, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, हेमंत कदम, पीएसआय वर्षाराणी आजले आदींनी आरटीओ कार्यालय गाठले. परिवहन आयुक्त शेखर चेन्ने आज आढावा बैठक घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात आले होते. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेराव घालत मेत्रेवार यांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, मेत्रेवार वर्ग एकचे अधिकारी असल्याने हा अधिकार शासनाला असून त्यांना सोमवारपासून दीर्घ रजेवर पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले.

घडलेली घटना गंभीर आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अधिकारी मारताना स्पष्ट दिसत आहे. दुचाकीवरील कारवाईपासून ते शुक्रवारी झालेल्या झालेल्या मारहाणीच्या घटनेपर्यंतचे चौकशी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी सतिश सदामते यांना देण्यात आले आहेत. त्यांचा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणा आहे. तो पर्यंत मेत्रेवार यांना दीर्घ रजेवर पाठवण्यात आले आहे.

शेखर चेन्ने, परिवहन आयुक्त

चौकट जबरी चोरीचा गुन्हा

दरम्यान, या घटनेनंतर नगरसेवक विकास एडके यांनी संजय मेत्रेवार यांच्या विरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये मेत्रेवार यांनी मारहाण केली तसेच गळ्यातील सोन्याची चेन हिसकाल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून मेत्रेवार यांच्या विरुद्ध जबरी चोरी, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीची छेडछाड-मारहाण, आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरात वर्तमानपत्र टाकण्याचे काम करणाऱ्या, वर्तमानपत्रावर 'कॉल मी' असे लिहून अल्पवयीन मुलीला भर रस्त्यावर जाब विचारणाऱ्या, छेडछाड काढणाऱ्या आणि तिच्या कुटुंबीयांना धमक्या देऊन मारहाण करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी शुक्रवारी ठोठावली.

सातवीत शिकणाऱ्या पीडित १३ वर्षांच्या मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. त्यानुसार, आरोपी स्वप्नील पांडुरुंग काळे (२२, रा. एन-१२, टीव्ही सेंटर) हा त्यांच्या घरी वर्तमानपत्र टाकण्याचे काम करीत होता. वर्तमानपत्रावर 'कॉल मी' असे लिहून तो मुलीला त्रास देत होता. ही मुलगी त्यांच्या स्वत:चया कापड दुकानाकडे जाताना १६ मार्च २०१६ रोजी सकाळी दहा वाजता टीव्ही सेंटर परिसरात आरोपीने मुलीचा हात पकडून 'फोन का करत नाही', असा जाब विचारला आणि 'दुकानाच्या गल्ल्यातील पैसे आण, नाही, तर तुला गायब करीन,' अशी धमकी दिली. मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, 'हे सगळे थांबवायचे असेल तर गाडी दे नाहीतर दीड लाख दे, नाहीतर तुला बरबाद करून टाकेन' अशी धमकी फिर्यादीला दिली. तसेच मुलालाही 'एकट्यात भेट, दाखवतो' अशी धमकी दिली. आरोपीच्या भीतीने मुलीने शाळेत जाणे बंद केले होते व १९ मार्च २०१६ रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान आरोपी पीडितेच्या घरात घुसला आणि तिचा हात पकडून छाड काढत असताना तिचा भाऊ आला. आरोपीने भावाला मारहाण केली. त्याचवेळी फिर्यादी पीडितेची सुटका करण्यासाठी पुढे आल्या असता त्यांनाही ढकलून दिले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. महिला पोलिस उपनिरीक्षक एस. जे. कुवारे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले.

\Bचार कलमान्वये शिक्षा

\Bखटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये पीडिता, तिची आई, भाऊ, शाळेचे मुख्याध्यापक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भादंवि ३२३ कलमान्वये ६ महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कारावास, कलम ५०६ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस कारावास, 'पोस्को' कायद्याच्या कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, तर 'पोस्को' कायद्याच्या कलम १२ अन्वये २ वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीला पळवून नेऊन अत्याचार; आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून पळवून नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये १६ मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश ए. एच. पाटील यांनी शुक्रवारी दिले.

याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जुनेद समशेर पटेल (२४, रा. अबरार कॉलनी, बीडबायपास) याने मुलीला पळवून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याला ५ मे रोजी हैदराबादहून अटक करून कोर्टात हजर केले असता शुक्रवारपर्यंत (११ मे) पोलिस कोठडी सुनावली होती. दरम्यान, आरोपीने अत्याचार केल्याचा जबाब पीडितेने महिला सुरक्षा समितीपुढे दिला होता. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने पीडितेला कुठे-कुठे नेले, त्या ठिकाणी जाऊन तपास करणे व पुरावे गोळा करणे बाकी आहे. याकामी आरोपीला कुणी मदत केली का, याचाही सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फतेलष्कर मारहाणप्रकरणी दोघांना अटक, कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जुन्या वादातून संजय फत्तेलष्कर यांच्यावर तलवारीने गंभीर हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये मयुर भास्कर आडुळे (वय २०) व अक्षय रमेश परकेल्लु या संशयित आरोपींना शुक्रवारी (११ मे) अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, १६ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय. एच. मोहम्मद यांनी शुक्रवारी दिले.

जुन्या वादातून फिर्यादी संजय फत्तेलष्कर यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यात ते खाली कोसळल्यानंतर मिरची पूड टाकून त्यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले होते. हे वार संजय यांनी हातावर वार झेलले. यात त्यांच्या खांद्याला गंभीर इजा झाली होती. या गुन्ह्यात संशयित आरोपी अक्षयला गुरुवारी रात्री ११ वाजता व आरोपी मयुरला शुक्रवारी दुपारी पावणे चार वाजता अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. या गुन्ह्यातील इतर आठ आरोपींना अटक करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्याचा सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बी. पी. काकडे पाटील यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने दोन्ही आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज नसल्याने नागरिकांचे हाल

0
0

फास्ट न्यूज

वीज नसल्याने

नागरिकांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणने शुक्रवारी अनेक भागात मेंटेनन्ससाठी वीजपुरवठा बंद ठेवला होता. शिवाय अनेक भागात वीज गुल होत होती. ४२ अंश तापमानात वीज गायब झाल्यामुळे औरंगाबादकरांचे पुरते हाल झाले. अनेक भागात चार ते पाच तास वीज नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते.पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी महावितरणने अनेक भागात सकाळच्या टप्प्यात वीजपुरवठा बंद ठेवला होता. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. शुक्रवारही त्याला अपवाद ठरला नाही. शुक्रवारी तापमान ४२ अंशांवर पोचले होते. त्यात वीज गेल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. सिडकोसह काही भागात दुपारच्या टप्प्यात वीजपुरवठा सुरळीत झाला. उस्मानपुरा भागात दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू होता. अशीच परिस्थिती शहरातील अनेक भागात होती. उन्हाची तीव्रता आणि त्यात वीज गायब झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

बासरीवादन शिबिरात आज

राजेंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृष्णगुंज बांसुरी गुरुकुल तर्फे पा मे पासून बसरीवादनाचे रियाजी शिबिर बासरी वादक निरंजन भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सिडको एन सहा येथे सुरू असलेल्या या शिबिरात मराठवाड्यातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिबिरात विद्यार्थ्यांनकडून प्रारंभिक गोष्टींचा रियाज करून घेण्यात आला. शिबिरात शनिवारी सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत व रविवार १३ मे रोजी सकाळी आठ ते ११ या वेळी बासरीवादक राजेंद्र कुलकर्णी (पुणे) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. बासरी प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

गॅस शेगडी व सिलिंडरचे आज वाटप

औरंगाबाद - हारून मुकाती फाऊंडेशनच्या वतीने उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत २५० गॅस शेगडी व सिलिंडरचे भारत गॅसतर्फे शनिवारी वाटप करण्यात येणार आहे.

हारून मुकाती फाऊंडेशन, जिन्सी, बायजीपुरा रोड येथे शनिवारी दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सीईओ कौर यांचा

शिक्षक समिती तर्फे सत्कार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, राज्य सहसचिव नितीन नवले, मराठवाडा सरचिटणीस शाम राजपूत, शालिकराम खिस्ते, गुलाबराव चव्हाण, विष्णू भंडारे,रामू गायकवाड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी, कडूबा साळवे,चंदू लोखंडे, गणेश सोनवणे,अर्जुन पिवळ, के. के. जंगले, के .डी. मगर, विलास चव्हाण आदी उपस्थित होते. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन श्रीमती कौर यांनी दिले.

अन्नधान्य वाटप

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुलकसागरजी महाराज यांच्या अवतरण दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचच्या वतीने राजाबाजार जैन मंदिरात गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. गरजू लोकांना गहू, साखर, तांदूळ वाटण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते माणिकचंद गंगवाल, एम.आर.बडजाते, डॉ. रमेश बडजाते,अशोक गंगवाल, ज्ञानचंद अजमेरा, श्रीपाल लोहाडे, कमल कासलीवाल, नरेंद्र अजमेरा, पुलक मंचचे अध्यक्ष सुनील पांडे, दिलीप कासलीवाल, निर्मल पांडे, राजकुमार सवाईवाला, पारस गोधा, संतोष पापडीवाल, प्रकाश कासलीवाल आदीच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठीमहामंत्री राकेश पाटोदी, ,अनिल अजमेरा, जितेंद्र साहुजी, नीरज सेठी, प्रकाश कासलीवाल, अनिल पाटणी, प्रसाद पाटणी, भरत पापडीवाल आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईओ पवनीत कौर पत्रपरिषद

0
0

झेडपीत येणाऱ्या अभ्यागतांना

जारचे पाणी पिण्यासाठी देणार

सीइओ पवनीत कौर यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कामासाठी येणाऱ्या अभ्यागतांना पिण्याचे पाणी मिळण्यास अडचण येते. पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुरत नाही. यासाठी संबंधित विभागांच्या काँटिजन्सी फंडातून जारच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. काही विभागात याची सुरवात झाली आहे. उर्वरित विभागात लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी पत्रकारांना दिली.

श्रीमती कौर म्हणाल्या," सद्य परिस्थितीत स्वच्छता व पाणीपुरवठा, शिक्षण विभागात पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध आहेत. अन्य विभागातही काँटिजन्सी फंडातून पाण्याचे जार उपलब्ध करून द्यावेत, यासाठी मी विभागप्रमुखांना सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया आजपासून सुरू झाली. आज सामान्य प्रशासन, वित्त आणि एकात्मिक बालविकास योजना विभागातील आपसी, विनंती आणि प्रशासकीय बदल्या झाल्या. समतोल ठेवण्यासाठी रिक्त जागांचा आढावा घेऊन ज्याठिकाणी अधिक रिक्त जागा आहेत, त्या आधी भराव्यात असे सरकारी अध्यादेशाप्रमाणे अंमलबजावणी केली जात आहे. बदली प्रक्रिया संपल्यानंतर समाजकल्याण विभागासह अन्य विभागांच्या योजना अंमलबजावणीकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला मंजूर झालेली कामे महिनाभरात मार्गी लागतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विभागनिहाय झालेल्या बदल्या

सामान्य प्रशासन विभाग २८

एकात्मिक बाल विकास सेवा योजना ७

अर्थ विभाग ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वनपर्यटनाची कामे प्राधान्याने पूर्ण करा

0
0

वनपर्यटनाची कामे पूर्ण करण्यासाठी

बांधकामाचा खर्च कमी करा

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद व धुळे परिक्षेत्रात मंजूर झालेल्या वनपर्यटनाच्या कामांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी कृती कार्यक्रम अधिक प्रभावी करा. बांधकामावरचा खर्च कमी करून प्रकल्प पूर्णत्वाकडे न्या, असे आदेश अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिले.

औरंगाबाद विभागातील आठ व धुले विभागातील आठ जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांची आढावा बैठक शुक्रवारी जालन्यातील वनसंररक्षक प्रशिक्षण कार्यालयात झाली. औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, धुळे येथील मुख्य वनसंरक्षक साळुंके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील वनपर्यटन प्रकल्पासाठी यंदाच्या बजेटमध्ये ८४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून पूर्वी मंजूर झालेले प्रकल्प पूर्णत्वाकडे न्यावेत. जेणेकरून वनपर्यटनाची सुविधा लवकर उपलब्ध होईल. सध्या मंजूर झालेले प्रकल्प लवकर कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. बांधकामाचा खर्च कमी करा. अन्य कामासाठी निधीची मागणी असेल तर ती ताबडतोब करा. पूर्वीच्या कामांना निधी मिळेल. नवीन प्रकल्पासाठी उपलब्ध निधीतून रक्कम शिल्लक राहिली तर विचार केला जाईल, असे लिमये यांनी सांगितल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिल्लोडमध्ये दोन शिक्षकांच्या घरी चोरी

0
0

सिल्लोड: सिल्लोड शहरातील आनंद पार्क परिसरात राहणाऱ्या दोन शिक्षकांच्या घरी घरफोडी करण्यात आली. अविनाश नखाते हे शनिवारी कुटुंबास सारणी (ता. केज) येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर दाराचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांच्या घरातून कपाटातील किंमती साड्या, मुलांचे कपडे, चांदीचे ३० ग्रॅमचे दागिने, लॅपटाप हे साहित्य चोरीस गेले. याच परिसरातील संतोष प्रसाद हे शनिवारी गारज (ता.वैजापूर) येथे लग्नसमारंभासाठी गेले असता घराचे कुलूप तोडून ३२ इंची टीव्ही चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता चौधरच म्हणतात राऊतांवर कारवाई करा

0
0

म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद

तहसीलदार विजय राऊत आणि सुरक्षारक्षकाला गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून मंगळवारी मारहाण करणारे सहाय्यक आयुक्त मनोज चौधर यांनीच आता विजय राऊत यांच्यावर कारवाई करा अशी मागणी ‌विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

चौधर यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मंगळवारी मी गाडी पार्क केलेल्या ठिकाणी इतर आठ ते दहा अधिकाऱ्यांच्याही खासगी गाड्या उभ्या केलेल्या होत्या. मात्र केवळ मलाच त्रास देण्यासाठी राऊत यांनी सुरक्षारक्षकाला निर्देश देत माझ्या गाडीची हवा सोडली. मला अपमानित करण्यासाठीच हे कृत्य करण्यात आले. कोणत्या गाड्या कुठे-कुठे पार्क कराव्यात, याबाबत कोणत्याही लेखी सूचना विभागीय आयुक्तांनी दिलेल्या नाहीत. गाडीची हवा सोडण्यापूर्वी मला कल्पना देणे अपेक्षित होते. हेतुपुरस्सरपणे हा प्रकार करणे योग्य नाही. सुरक्षारक्षकाला गाडीची हवा सोडण्याचे निर्देश देणे ही बाब मला अपमानित करण्यासाठी केली आहे. त्यामुळे तहसीलदार राऊत यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणानंतर महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटना प्रशासनावर मला निलंबित करण्यासाठी दबाव आणत आहेत, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांत्वन, शोक आणि दु:ख

0
0

सांत्वन, शोक आणि दु:ख

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शोकसागरात बुडालेल्यांचे सांत्वन करणारे लोक, घरचे कर्ते गमावल्याचे दु:ख आणि आता पुढे काय होणार या विवंचनेत बसलेले कुटुंबीय असे विदारक चित्र घाटीच्या अपघात विभागासमोर होते.

शुक्रवारी सायंकाळी गेवराई तांडा येथे टँकर व रिक्षाच्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात आणण्यात आले होते. पण बहुतांश जणांचा आणतानाच मृत्यू झाला. घाटीच्या अपघात विभागात मृतदेह ठेवण्यात आले.

मृतांमधील बहुतांश जण गेवराई तांडा परिसरातील आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची घाटीत गर्दी झाली. अपघात विभागासमोर नातेवाईक, आप्तस्वकियांची गर्दी झाली होती. दु:ख करणारे नातेवाईक, शोकमग्न बसलेले लोक, कुणाचे वडील गेलेले कुणाच्या पोटचा गोळा हिरावलेला अशी विदारक परिस्थिती होती. मदतीसाठी, ओळख पटविण्यासाठी काहींची धावपळ सुरू होती. सरकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन दुर्घटनेची माहिती करून घेतली. घाटीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने रात्री उशिरापर्यंत अपघात विभागात बसून मदतीची खातरजमा करून घेत होते. घाटी अभ्यागत समितीचे सदस्य नारायण कानकाटे यांनी जखमींना मदत केली. खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले रात्री दहाच्या सुमारास घाटीत आले आणि त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. मृतांमधील बहुतांश लोक कष्टकरी असल्याचे कळताच उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३९ गावांत पाणीटंचाई

0
0

सोयगाव: सोयगाव शहरासह तालुक्यातील ३९ गावे तीव्र पाणीटंचाईने होरपळली आहेत. तालुक्यातील बारा धरणे मृतसाठ्यात येऊन ठेपली आहेत. मात्र तालुका प्रशासनाकडून पाणी पुरवण्यासाठी उपाय केले जात नसल्याबद्दल ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात केवळ एकच टँकर सुरू आहे. प्रत्यक्षात ३९ गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. सोयगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वेताळवाडी धरणात केवळ २५ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे सोयगाव शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांच्या कालावधीवर गेला आहे. बनोटी, धिंगापूर आणि देव्हारी ही धरणे वगळता उर्वरित धरणात पाण्याचा थेंबही नाही. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. दरम्यान, सोयगाव तालुक्यात टंचाई गंभीर नसल्याचा अहवाल पंचायत समिती आणि तहसील प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन गाफील आहे. दोन आमदार असलेल्या सोयगाव तालुक्याचा पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एकही लोकप्रतिनिधीने अद्याप सोयगाव तालुक्याच्या पाणीटंचाई आढावा घेतलेला नाही. नागरिक पाणी पाणी करत असतांना लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका नागरिक करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर तापले, तापमान ४२ अंशावर

0
0

तापदायक ठरलेल्या मे महिन्यामध्ये तापमान सातत्याने ४० अंश सेल्सियसच्या पुढेच राहत असून शुक्रवारी (११ मे) शहराचे कमाल तापमान ४२ अंश सेल्सियस होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरात उन्हाचा कहर कायम आहे. शुक्रवारी दिवसभर कोरड्या आणि उष्म हवामानामुळे रस्त्यांवर सामसूम होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येणाऱ्या आठवड्यातही शहराचे तापमान ४० अंशापेक्षा अधिक राहणार असल्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या कहरामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यातही आवश्यक कामांसाठी बाहेर पडणारे उन्हापासून असे संरक्षण करताना दिसत होते. 'मटा'चे छायाचित्रकार चंद्रकांत थोटे यांनी टिपलेली ही काही छायाचित्रे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत १५ स्वयंपाकी जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

इंडिका कार व टेम्पोच्या धडकेत १५ स्वयंपाकी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता औरंगाबाद रस्त्यावर कोल्ही शिवारात घडली. अपघातानंतर कारचालक पळून गेला. या घटनेत टेम्पोचालकासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

औरंगाबाद येथून वीस जण टेम्पोमधून (एम एच २१ एक्स ७५९८) नाशिक जिल्ह्यातील येवला येथे लग्न समारंभासाठी जात होते. येवल्याकडे जाताना कोल्ही शिवारात औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या इंडिका कार (एम एच २० डी एफ ०३७९) व टेम्पोमध्ये जोराची धडक झाली. या धडकेमुळे टेम्पोचालकासह अन्य प्रवासी टेम्पोमध्ये अडकून पडले. यावेळी कारचालकाने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिऊर पोलिस ठाण्याचे विशाल पडळकर, अविनाश भास्कर, वैजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामहरी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना टेम्पोबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मेराज खान, जया शेलार, प्रमिला आव्हाड, रुबीना बेगम, अलिम शेख यांना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालायत पाठवण्यात आले. शेख आफरिन, सायमा पठाण, मदिना पठाण, आमिना बेगम, नाजिया खान, शिरीन शेख, शेख सलीम बाबू, सुलताना शेख, आरेफा शकील, शाह, अविनाश मगरे, चंद्रकला शिंदे (सर्व रा. कटकट गेट औरंगाबाद) यांच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोयगावात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीचे वारे

0
0

सोयगाव: ऐन उन्हाळ्यात नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. नगर पंचायतीमध्ये तीन सदस्य असलेल्या काँग्रेसच्या हातात सत्तेची चावी असली तरी सध्या भाजप-शिवसेना युतीची सत्ता आहे. परंतु, राज्यात आणि केंद्रात भाजप व शिवसेनेतील मतभेदाचा परिणाम येथे होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची मुदत २७ मे रोजी संपत आहे. तीन सदस्यांच्या बळावर काँग्रेस उपनगराध्यक्ष पदाच्या मागणीवर ठाम आहे. दुसरीकडे मात्र भाजप-शिवसेना युती अभेद्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र भाजपमधील बंडाळीमुळे युतीला धक्का पोहचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपाकडे आठ, तर शिसेनेकडे सहा सदस्य आहेत. बहुमतासाठी लागणारी नऊ सदस्य संख्या गाठण्यासाठी भाजपला केवळ एका सदस्याची गरज आहे. शिवसेनेला मात्र तीन सदस्य मिळवावे लागतील. दुसरा नगराध्यक्ष शिवसेनेचाच, असा ठाम विश्वास योगेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. युतीधर्म पाळल्यास नगराध्यक्ष शिवसेनेचाच होणार हेही निश्चित आहे. शिवसेनेकडून योगेश पाटील, भागवत गायकवाड आदींची नावे चर्चेत आहे. भाजपकडून अद्याप इच्छुकांची नावेच चर्चेत नाहीत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपनगराध्यक्षपद मिळवण्यासाठी डावपेच आखत आहे. त्यासाठी लतीफ शहा इच्छुक आहेत.

पक्षीय बलाबल

भाजप ८

शिवसेना ८

काँग्रेस ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींसमोर अश्लील चाळे; आरोपीस वर्षाची सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शाळकरी व महाविद्यालयीन मुलींचा पाठलाग करणाऱ्या आणि बसस्टॉपवर मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी शुक्रवारी ठोठावली.

याप्रकरणी शहरातील १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, २५ ऑगस्ट २०१५ रोजी ती दोन मैत्रिणींसोबत औरंगपुरा बसस्टॉप परिसरात थांबली असता, घाबरलेल्या काही शाळकरी व महाविद्यालयीन मुली फिर्यादीजवळ धावत आल्या. त्यांनी दोन दिवसांपासून पाठलाग करणाऱ्या आणि बसस्टॉप परिसरात मुलींसमोर अश्लील चाळे, हावभाव करणाऱ्या आरोपी हरिश्चंद्र मोहन पिंपळे (वय ४०, रा. बनगाव, ता. जि. औरंगाबाद) याची माहिती दिली. फिर्यादीने परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याची माहिती दिली आणि त्याच सुमारास समोरून जात असलेल्या पोलिसांचे वाहन थांबवून पोलिसांना प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याच अवस्थेत आरोपीला पकडले. याप्रकरणी भादंवि ३५४ (अ), ३५४ (ड), २९४ तसेच 'पोस्को' कायद्याच्या ७ व ८ कलमान्वये क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

\Bपाच साक्षीदांचे जबाब

\B

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब मेहेर यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादी, तिच्या मैत्रिणी व महिला कॉन्स्टेबलची साक्ष महत्त्वाची ठरली. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनीता मिसाळ यांनी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला कलम २९४ अन्वये एक महिना कारावास, तर 'पोस्को' कायद्याच्या कलम ११ व १२ अन्वये एक वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास २० दिवस कारावासाची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Aurangabad: औरंगाबादमध्ये दंगल; ३० जण जखमी

0
0

औरंगाबाद :

दोन समाजातील भांडणातून औरंगाबाद शहरात मध्यरात्रीनंतर दंगल उसळली असून जाळपोळ आणि दगडफेकीत किमान ३० जण जखमी झाले आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. वरिष्ठ अधिकारीही तातडीने हजर झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

दोन समाजात संघर्ष उफाळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी किरकोळ भांडण होऊन त्याचे पर्यावसन दंगलीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. दंगलखोरांनी शहरातील किमान २५ दुकानं पेटवून दिली आहेत. दोन्ही बाजूने एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आली असून त्यात ३० जण जखमी झाले आहेत.

64130858

शहरातील गांधीनगर, राजाबाजार, शहागंज भागात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या दंगलीची काही दृष्ये हाती लागली असून मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर फिरताना दिसत आहे. काही जण हातात लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरवत असल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू असून दंगलग्रस्त भागात सध्या कर्फ्यूसारखी स्थिती आहे.


दगडफेकीत १० पोलिस जखमी

मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट भिडल्याचे आता समोर येत आहे. तलावरी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. जखमींमध्ये सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसांचा समावेश आहे. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. दोन गटाने केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलीस जखमी झाले. पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या आहेत. तर इतर गाड्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली आहे.
64131180

औरंगाबाद शहर पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये दोन गटांत वाद; दोघांचा मृत्यू

0
0

औरंगाबाद:

मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेत ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

बेकायदा नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता, असं सांगण्यात येत आहे. तलावरी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेकही केली. यात ३० जण जखमी झाले आहेत. तर सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह दहा पोलिसही जखमी झाले. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या तीन गाड्या जाळण्यात आल्या. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. परिसरात असलेल्या इतरही गाड्यांची तोडफोड, जाळपोळ केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शांतता ठेवा, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर: वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात; ११ ठार

0
0

लातूर:

लातूर-मुखेड रस्त्यावर जांब गावच्या हद्दीत वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरने धडक दिली. या भीषण अपघातात ११ वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जांब गावच्या हद्दीत सकाळी साडेनऊच्या सुमारास लग्नाच्या वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरनं जोरदार धडक दिली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती औसा तालुक्यातील खरोसा येथील रहिवासी होते. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images