Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खासदारांवर गुन्हा दाखल करा: विखे पाटील

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दंगल नियोजित होती व त्यांना राजाश्रय होता. त्यामुळे दंगल घडविणाऱ्यांसह चिथावणीखोर भाषण करून दंगल भडकाविणाऱ्या खासदारांवर गुन्हे दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. या दंगलीची 'कमिशन ऑफ इन्कॉवायरी अक्ट'नुसार चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. शहरात दंगल होणार असल्याची माहिती मिळविण्यात पोलिसांचा गुप्तहेर विभाग अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या जाळपोळीनंतर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रविवारी शहागंज, राजाबाजार, नवाबपुरा या भागातील जळालेल्या दुकानांची पाहणी करून दुकानदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. 'औरंगाबादमधील ही घटना दुर्दैवी आहे. आठ दिवसांपासून काही जण शहरात जातीय तणाव निर्माण करत होते. पण, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलिसांची गुप्तहेर यंत्रणा दंगलीची माहिती मिळविण्यात अपयशी ठरली. मंत्र्यांनी चौकशी समिती नियुक्तीची घोषणा केली आहे. ही चौकशी भीमा कोरेगाव दंगलीप्रमाणे झाल्यास ती निरर्थक ठरेल. त्यामुळे औरंगाबादमधील दंगलीची चौकशी 'कमीशन ऑफ इनक्वायरी अक्ट'नुसार उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती किंवी जिल्हा कोर्टाचे प्रधान न्यायधीशामार्फत करावी. यामुळे जनतेला बाजू मांडता येईल. या कायद्यानुसार, चौकशी समिती नियुक्त झाली नाही, तर काँग्रेस न्यायालयात दाद मागेल,' असे विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितले.

या दंगलीमागे राजाबाजारमधील काही तथाकथित नेत्यांचा हात आहे. यासोबत खासदारांनीही शहरात दंगा भडकाविण्यासाठी चिथावणीखोर भाषा वापरली. त्यांच्या भाषेमुळे दंगल उसळली. तथाकथित नेते व खासदारांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विखे पाटलांनी केली.

\Bहिंमत असेल, तर कारवाई करा: खैरे \B

शुक्रवारी रात्री झालेल्या वादानंतर तेथे पोलिस नव्हते. शिवसैनिकांनीच मोतीकारंजा भाग शांत केला. त्यानंतर शहागंज, राजाबाजार भागात दगडफेक सुरू केली. या परिस्थितीत आम्ही नागरिकांच्या संरक्षणासाठी उभे राहिलो. शिवसैनिक नसते, तर परिस्थिती भयानक झाली असती. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या जवळचे आहेत. दलबदलू गद्दारांनी आम्हाला शिकवू नये. हिंमत असेल, तर कारवाई करूनच दाखवा,' असे आव्हान शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद: दंगल भडकली; पोलीस बघतच राहिले!

0
0

औरंगाबाद:

औरंगाबादमध्ये नळ कनेक्शन तोडल्यावरून शुक्रवारी रात्री भडकलेल्या दंगलीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात जमाव हिंसक होत असताना पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत होते, असं या व्हिडिओत दिसत आहे. दंगलखोर वाहने पेटवून देत असताना, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे नऊ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या सहभागाबाबत चौकशी करण्याचे आदेश पोलीस प्रशासनानं दिले आहेत.

एका रस्त्यालगतच्या इमारतीतील खिडकीतून दंगलीचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. त्यात १० पोलीस कर्मचारी दंगलखोरांसोबत चालताना दिसत आहेत. जमावाकडे हत्यारे असून, ते तोडफोड करताना दिसत आहेत. त्यांनी काही वाहनेही पेटवून दिली. शहरातील इंटरनेट सेवा बंद असल्यानं व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला नव्हता. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. हे प्रकरण गंभीर असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे. दोषी पोलीस कर्मचारी आणि दंगलखोरांवर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) बिपीन बिहारी म्हणाले, की 'कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही, पोलीस दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.' दंगलखोर वाहनांची तोडफोड करत होते, त्यावेळी पोलीसही उपस्थित होते, असं या व्हिडिओत दिसत आहे. नवाबपुरा परिसरातील भारतीय नर्सिंग होमसमोरच्या चार गाड्या पेटवून देणाऱ्या व्यक्तीनं तोंडावर सफेद रंगाचा स्कार्फ बांधल्याचंही या व्हिडिओत दिसतं. तोडफोड आणि जाळपोळ होत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्यांदा समोर आलं आहे.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अरुणाच्या मरणांत वेदना आमच्याही

0
0

\BNikhil.Nirkhee@timesgroup.com

Tweet-@nnirkheeMT\B

अरुणा शानबाग प्रकरणाने देशाला हादरवून सोडले आणि दयामरण-इच्छामरणाचा विषय याच प्रकरणातून उपस्थित झाला. अरुणा यांच्या कोमासदृश मरणासन्न अवस्थेमुळेच त्यांना दयामरण देण्यात यावे, यासाठी जनहित याचिका दाखल झाली होती, तर दयामरणाला केईएम रुग्णालयातील परिचारिकांनी कडाडून विरोध केला होता. सुप्रिम कोर्टानेही अरुणा यांचे अधिकृत पालकत्व 'केईएम'कडे दिले होते. तब्बल ४२ वर्षे अरुणा यांची 'केईएम'च्या परिचारिकांनी मनापासून सुश्रुषा करून रुग्णसेवेचा गौरवशाली इतिहास जगापुढे ठेवला. 'अरुणा यांची प्रत्यक्ष रुग्णसेवा केलेल्या 'केईएम'च्या निवृत्त परिसेविका व परिचारिका कल्याणकारी संस्थेच्या सचिव अंजू पराडे व निवृत्त पाठ्यनिर्देशक जयश्री तारकर या शहरात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. जागतिक परिचारिका दिन व १८ मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या अरुणा यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद

....

\B-अरुणा यांची सुश्रुषा का करावी वाटली ?\B

-कर्नाटकातील अरुणा ही १९६६ मध्ये 'केईएम'मध्ये जेएनएम अभ्यासक्रम करण्यासाठी आली होती व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रुग्णालयातच कनिष्ठ परिचारिका म्हणून रुजू झाली होती. रुग्णालयातील वॉर्ड बॉय सोहनलाल हा रुग्णालयातील 'डॉग लॅब'मधील मांस चोरत होता आणि ही बाब अरुणाच्या लक्षात आली होती आणि तिने सोहनलाल याला हटकले होते. त्या रागातूनच सोहनलाल याने अरुणाचा गळा कुत्र्याच्या साखळीने आवळून तिच्यावर दृष्कृत्य केले होते. गळा आवळल्यामुळे मेंदुला रक्तपुरवठा न झाल्याने तिचा मेंदू निकामी होऊन तिची अवस्था कोमासदृश झाली होती आणि या घटनेचा तिला जबर मानसिक धक्काही बसला होता. घटनेतंतर तिच्यावर 'आयसीयू'मध्ये सर्व उपचार झाले व कुठलीच सुधारणा होत नसल्याने तिला सर्वोदय रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र अरुणा ही आमच्यातलीच आहे, तिच्यावर आमच्याच रुग्णालयामध्ये उपचार व्हावेत आणि आम्हीच तिचा सांभाळ करू, अशी भूमिका त्यावेळच्या रुग्णालयातील समस्त परिचारिकांनी घेतला, मोर्चाही काढला. त्याचा केईएम प्रशासनाने विचार करून अरुणाला पुन्हा रुग्णालयात आणले व परिचारिकांच्या निर्णयाला प्रशासनाने शेवटपर्यंत साथ दिली.

\B-४२ वर्षांची ही अखंड रुग्णसेवा प्रत्यक्षात कशी होती? \B

तेव्हापासून (१९७३ पासून) ती अंथरुणाला खिळून होती. मी १९७६ मध्ये रुग्णालयात रुजू झाल्यापासून अरुणाला त्याच अवस्थेत पाहिले व कक्ष क्रमांक ४ मध्ये ती शेवटपर्यंत होती. अरुणाला घटनेचा जबर मानसिक धक्का बसला होता आणि त्यामुळेच पहाटे पाचला तिला जेव्हा आंघोळीसाठी बाथरुममध्ये नेले जाई किंवा स्पंजिंग केले जाई तेव्हा ती मोठमोठ्या ओरडत असे आणि 'अरुणा उठली' असे सगळ्या रुग्णालयाला कळून चुकत असे. ती कोणताही स्पर्श किंवा पुरुषी आवाजामुळे भेदरून जात असे, ती त्या घटनेच्या दाहकतेमुळे व तिच्या मनावर खोलपर्यंत झालेल्या जखमांमुळेच. कोमासदृश स्थितीमुळे ती अंथरुणाला खिळलेली होती व तिला जागेवरच चहा, नाष्टा, जेवण भरविण्यात येत होते व ती ते हळूहळू खातही होती, आवडलेले पदार्थ मिळाले तर स्मित हास्यही करत होती. विशेषतः फिशकरी, गोडधोड तिला जास्त आवडत होते. फिशकरी खाताना ती चक्क मिटक्या मारताना दिसायची. फिशकरी आवडते म्हणून मुद्दाम आठवड्यातून एकदा-दोनदा तरी तिला काटे काढून फिशकरी देत असू. तिच्या खोलीमध्ये नेहमी सत्तरीतील गाणी लावली जात असे व ती गाणी एकाग्र चित्ताने ऐकायची, शांत व्हायची, गाण्यांचा आनंद घ्यायची, असे तिच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसायचे. विश्वप्रार्थनाही खोलीत लावली जायची. अगदी आपल्या घरातला माणूस असल्यासारखे तिची काळजी घेतली जात होती.

\Bअरुणा यांच्या आहाराची काळजी कशी घेतली ?\B

सगळ्याच नर्स तिच्यासाठी अधून-मधून काहीतरी आणत असत. तिला नष्टा-जेवण भरवण्यासाठी वेळापत्रक तयार केले जाई आणि ज्या नर्सची ड्युटी असेल त्याच नर्सना तिच्या खोलीमध्ये जाण्यासाठी प्रवेश असायचा. सुरक्षेच्या व इतर कारणांस्तव कुणालाही तिच्या खोलीमध्ये जाता येत नसे. २०११ नंतर अरुणा आणखी क्षीण झाली, तिला चावता येत नव्हते, तोंडावाटे खाणे कठीण होऊ लागले म्हणून नाकात नळी टाकून तिला अन्न दिले जात होते. तरीही आहारतज्ज्ञानुसार तिला पोषक आहार दिला जात होता.

\Bत्यांचे निधन झाल्यानंतर तुमच्या भावना कशा होत्या?\B

२०१३ मध्ये तिला न्युमोनिया झाला होता व आठ दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर ती पूर्वीसारखी झाली होती. मात्र २०१५ मध्ये तिला पुन्हा न्युमोनिया झाला आणि त्यातच ती १८ मे २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला. ती गेल्यानंतरही तिला साडी-चोळी घालून, सजवून परिचारिकांनीच तिला स्मशानात नेले होते. तिरडी पकडायलाही परिचारिकाच होत्या आणि तिची तिरडी तिच्या आवडत्या मोगरा-चाफ्यांनी सुशोभित करण्यात आली होती. मला आठवते त्या दिवशी स्मशानात केवळ 'केईएम'नव्हे तर अनेक रुग्णालयांच्या हजार परिचारिका आल्या होत्या. मी व अधिष्ठाता डॉ. सुपे यांनी तिला भडाग्नी दिला आणि तेव्हाच ४२ वर्षांची रुग्णसेवा थांबली.

\B-अखंड रुग्णसेवेला कोणी कंटाळले नाही का?

\B

-अजिबात नाही. उलट तिची सेवा करण्याची प्रत्येकाची इच्छा असायची. 'अरुणा बायची मला रोज सेवा करू द्या' अशी आमची चंपा मावशी निवृत्त झाल्यानंतर डॉ. सुपे सरांना म्हणत होती. मात्र निवृत्त झाल्यामुळे सुपे सरांनी तिला परवानगी दिली नाही. खरे म्हणजे ती आमचीच होती म्हणून तिला कंटाळायचा प्रश्नच नव्हता. तिच्या सेवेसाठीच रुग्णालयातील डॉ. सिक्वेरा यांनी ५० हजारांची मदत केली होती. इतर सर्वजण आपापल्या परीने मदत करीत होते. अरुणाच्या सेवेत प्रशासनानेही कधीच हात आखडता घेतला नाही, हेही आवर्जून सांगावे लागेल. अरुणाची व तिच्या प्रामाणिक सेवेची आठवण म्हणूनच १८ मे पासून आठवडाभर आम्ही 'नर्सिंग केअर विक' साजरा करतो.

\B-दयामरणाला विरोध करण्यामागे कोणती भूमिका होती?

\B

-पिंकी विराणी यांनी अरुणावर पुस्तक लिहिले व २०११ मध्ये तिच्या दयामरणासाठी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र मुळात तिला दयामरण द्यायचे कशासाठी, हा आमचा प्रश्न होता. ती अन्न स्वीकारते, कमी का असेना प्रतिसाद देते, अनेक सूचना ऐकते, असे असताना तिला दयामरण देणे आम्हाला अजिबात मान्य नव्हते. आम्ही सर्व कष्ट उपसून तिचा सांभाळ करीत असताना तिच्या दयामरणाची मागणी करणाऱ्या विराणी यांनी पुस्तकाच्या कॉपीराइटची साधी रॉयल्टीदेखील दिली नाही. त्यामुळे विराणी यांना दयामरणाची मागणी करण्याचा कोणताही अधिकार नव्हता, हीच आमची भूमिका होती. नंतर सुप्रिम कोर्टानेही याचिका फेटाळली आणि पालकत्व 'केईएम'कडे दिले आणि आम्ही तिचे पालकत्वही समर्थपणे निभावले. याची नोंद केवळ देशाने नव्हे तर जगानेही घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकार्यासाठी सोशल कट्ट्यावर थिगळे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 'हाय, हॅलो, गुडमॉर्निंग, गुडनाइट'पासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही चविष्ट गप्पा-गोष्टी, चर्चा जोरात रंगत असतात. मात्र एखाच्या ग्रुपची निर्मितीच मुळात अडलेल्यांना मदत करण्यासाठी होते; अशी उदाहरणे अर्थातच फार कमी असतात. अशा दुर्मिळ ग्रुपमध्ये 'थिगळे ग्रुप'चा समावेश होतो. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे होत आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपच्या माध्यमातून सगळे थिगळे बांधव कधी नव्हे इतके ज‍वळ आले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये सेवाव्रती म्हणून काम करणारे त्र्यंबक थिगळे यांनी हा ग्रुप सुरू केला आहे. आश्चर्य म्हणजे त्यांनी देशभरातील सगळे थिगळे आडनावाच्या व्यक्तिंना या ग्रुपमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. यातील सगळेच नातेवाईक आहेत, असेही नाही. काही नातेवाईक असले तरी पूर्वी त्यांचा संपर्क नव्हता. परंतु, आता संपर्कात आले आहेत. परिणामी, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आदी राज्यांसह चेन्नईपासून मुंबईपर्यंतचे सर्व थिगळे बांधव ग्रुपमध्ये एकत्र आले आणि आज या ग्रुपमध्ये १५६ थिगळे आहेत व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत किमान काहीजणांना नोकरी मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. सुखद धक्का म्हणजे काहीजणांच्या रेशीम गाठीदेखील याच ग्रुपच्या माध्यमातून जुळल्या आहेत. त्याशिवाय रुग्णालयात दाखल करणे, रुग्णालयामध्ये गरजेनुसार मदत करणे, रोजच्या डब्यांची सोय करणे अशीदेखील कामे ग्रुपमधील संवाद-समन्वयामुळे शक्य होत आहे.

\Bमदतीच्या हेतुनेच संवाद

\B

या ग्रुपमध्ये ज्या सदस्याला जी गरज असेल ती तो ग्रुपवर टाकतो आणि संबंधित गाव-शहरातील सदस्य ती मदत करण्याचा, मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या ग्रुपमध्ये जो काय एकमेकांचा एकमेकांशी संवाद होता तो अधिकतर उद्दिष्टासाठी व एकमेकांना मदत करण्याच्या हेतुनेच. त्यामुळे ग्रपमधील थिगळे हाय हॅलो करण्यात वेळ दवडत नाही, हेही आवर्जुन सांगावे लागेल, असे त्र्यंबक थिगळे यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृत संभाषण वर्गाला प्रतिसाद

0
0

औरंगाबाद: बन्सीलालनगर येथील संस्कृत भारती संस्थेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या निःशुल्क संस्कृत संभाषण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्गात संस्कृत भाषेत कसे बोलावे, याचे प्रशिक्षण राजलक्ष्मी झंवर, अबोली देशमुख व स्वप्नील ठाकरे यांनी दिले. संस्कृत संभाषणाबरोबरच संस्कृत गीते व संस्कृत शब्द क्रीडाही घेण्यात आल्या. या वर्गाचा ५ ते ५० वर्षांपर्यंतच्या ४८ जणांनी वर्गाचा लाभ घेतला. आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. रश्मी रापतवार, दिवाकर महाजन आदींच्या उपस्थितीत वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी संस्कृत व्याकरणाचे महत्त्व सांगितले. समारोपाला संस्कृत कार्यक्रमही घेण्यात आला. समारोप कार्यक्रमाला संस्कृत अध्यापिका शांता दीक्षित, बन्सीलाल प्रभागातील माहेश्वरी मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विष्णू बजाज, सीए राजेंद्र झंवर, अरुंधती रानडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानाचे स्थलांतर करा

0
0

औरंगाबाद: वॉर्ड क्रमांक ३३ मधील सनी सेंटर अपार्टमेंटमधील तीन गाळ्यांचे दारूचे दुकान इतरत्र स्थलांतर करावे किंवा दुकानाचा परवाना तत्काळ रद्द करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या दुकानाचा त्रास महिलांसह लहान मुलांना होत आहे. मद्यपी दुकानासमोरच मद्य प्राशन करतात आणि महिलांकडे पाहून अश्लील हातवारे करतात. या संदर्भात पोलिस आयुक्तांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भास्कर मुगदल, प्रकाश जाधव, बाळू गणराज, बाबा घोरपडे, शेषराव सातपुते, राजू जाधव, अशोक जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभियांत्रिकी परीक्षेचा संभ्रम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मे पासून सुरू होणार आहेत. परीक्षा काही तासांवर आली तरी, 'कॅरिऑन' मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रक्रिया अद्याप पूर्ण नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. दुसरीकडे या प्रकारची कोणतीच अडचण नसल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि विद्यार्थी, असा वाद समोर आला आहे.

विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेतील गोंधळाची परंपरा दरवर्षीप्रमाणे या सत्रात ही कायम आहे. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले. त्यानुसार १६ मे ते ७ जून दरम्यान अभियांत्रिकीच्या विविध सत्राच्या परीक्षा होणार आहेत. निकालानंतर रिड्रेसलच्या निकालाची प्रतीक्षा संपली असली तरी, मागील सत्रात मिळालेल्या 'कॅरिऑन'चे विद्यार्थी पुढच्या परीक्षेला पात्र ठरले का, याबाबत स्पष्टता नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर तसे स्पष्ट केले नसल्याने त्यांच्यासमोर परीक्षा द्यायची की नाही, असा संभ्रम आहे. मात्र, कोणताच संभ्रम असण्याचे कारण नाही, असे परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रात्यक्षिक सबमिशनची प्रक्रिया आत्ताच पूर्ण झाल्याने परीक्षेपर्यंत थोडा कालावधी असावा, असे मत व्यक्त करत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीही पुढे आली होती. परंतु, या मागणीला विद्यापीठ प्रशासनाने प्रतिसाद न देता ठरलेल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. अभियांत्रिकीसह, औषधनिर्माणशास्त्राच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा होत आहेत.

\Bनिकालांवर 'थेट द्वितीय वर्ष प्रवेश' अवलंबून

\B

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे लांबलेले वेळापत्रक, निकालाला होणारा विलंब, त्यानंतरची रिड्रेसलची प्रक्रिया याचा परिणाम राज्यातील थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेवर होतो. दरवर्षी तंत्रशिक्षण विभाग निकालानंतर द्वितीय वर्षातील नापास विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठांकडून मागवून घेते. त्यानंतर प्रक्रिया राबविली जाते. विद्यापीठाच्या विलंबामुळे तंत्रशिक्षण विभागासमोर अडचणी येतात आणि राज्यातील प्रवेशाची प्रक्रिया खोळंबते. यामुळे परीक्षांचे वेळापत्रकात बदल न करण्याचे सुतोवाच विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

\Bपरीक्षार्थी संख्या....३५०००

परीक्षा केंद्र..........२२\B

परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाली असून ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. त्यांना अडचणी येणार नाहीत. सबमिशननंतर थोडा वेळ देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, पुढील प्रक्रियेचा खोळंबा होत असल्याने वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जात आहे.

डॉ. दिगंबर नेटके, संचालक,

परीक्षा व मूल्यमापन नियंत्रण मंडळ,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिक मासानिमित्त उद्यापासून कार्यक्रम

0
0

औरंगाबाद: समर्थनगर येथील श्री गणेश सभेतर्फे अधिक मासानिमित्त बुधवारपासून (१६ मे) रविवारपर्यंत (१७ जून) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सविता मुळे यांचे बुधवारी व गुरुवारी कीर्तन, १८ मे रोजी नागेश मूर्तीकर यांचे प्रवचन, १९ रोजी श्रीनिवास जोशी, २० रोजी रामदास धानोरकर, २१ रोजी रामकृष्ण बारहाते, २२ रोजी पंडित ठोसर, २३ रोजी शैलेंद्र जोशी, २४ रोजी रमाकांत देव, तर २५ रोजी दिनेश कुलकर्णी यांचे प्रवचन, २६ मे ते १ जूनपर्यंत रामनाथबुवा अय्यर यांचे शिवपुराण (संगीतमय प्रवचन), ३ जून रोजी अभिनव भजनी मंडळाची भजनसंध्या, ४ ते १० जूनपर्यंत स्वरुपानंद सरस्वती यांचे गीतेतील १५ व्या अध्यायावर प्रवचन, ११ ते १६ मेपर्यंत सिन्नरकर महाराज यांचे कीर्तन, १७ जून रोजी लक्ष आवर्तन संकल्पाची सांगता होणार आहे. सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी साडेसहा ते आठ या वे‍ळेत होणार आहेत. तसेच दररोज सकाळी नऊ वाजता सामुदायिक सहस्त्रावर्तने होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन गणेश सभेने केले आहे.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘बाटू’च्या परीक्षांना सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे (बाटू) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष दुसऱ्या सत्रातील परीक्षांना सोमवारपासून सुरुवात झाली. औरंगाबादहून अडीच हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. ही प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या सत्रातील परीक्षा आहे.

'बाटू'ला शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये संलग्न झालेल्या महाविद्यालयांची परीक्षा होणार आहे. पहिल्या सत्राची परीक्षा ११ ते २० डिसेंबरमध्ये घेण्यात आली होती. दुसऱ्या सत्राची परीक्षा १४ मेपासून सुरू झाली असून ती २५ मेपर्यंत घेतली जाणार आहे. 'बाटू'चे संलग्नीकरण स्वीकारण्याचे आवाहन गेल्यावर्षी करण्यात आले होते. मात्र, पहिल्या वर्षी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही; फक्त ४८ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी संलग्नीकरण स्वीकारले. २०१८-१९ शैक्षणिक वर्षासाठी ही संख्या ७० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. औरंगाबाद विभागातील दहा अभियांत्रिकी महाविद्यालयांनी संलग्नीकरण केले आहे. या महाविद्यालयांतील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

\B'सीसीटीव्ही'ची नजर\B

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या परीक्षा 'सीसीटीव्ही'च्या नजरेत आहेत. शहरातील सात केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. परीक्षा केंद्रातील प्रत्येक परीक्षा कक्षात 'सीसीटीव्ही' असणे बंधनकारक आहे. खबरदारी म्हणून या उपायायोजना करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

\Bअभ्यासक्रमाचा पॅर्टन \B

तंत्रशास्त्र विद्यापीठाचा अभ्यासक्रम ६० + २० + २० असा आहे. लेखी परीक्षा साठ गुणांची, तर प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष कंपनीत कामाचा अनुभव याला ठराविक गुण, असा पॅटर्न आहे. कौशल्याधारित अभ्यासक्रमाची रचना करत त्यानुसार गुणांची विभागणी करण्यात आली आहे. लेखी परीक्षांमधील उत्तरपत्रिकांची तपासणीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. एका प्राध्यापकाला एका दिवसात दहा दिवसात पेपर तपासता येतात. त्यासाठी प्राध्यापकांना स्वतंत्र लॉगइन आयडी, पासवर्ड दिला जातो. औरंगाबाद विभागातील उत्तरपत्रिका तपासणीचे केंद्र जळगाव आहे. तपासणीची प्रक्रिया ऑनलाइन असल्याने निकाल वेळेत जाहीर करण्यास अडचणी येत नसल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावीच्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा उत्साहात

0
0

औरंगाबाद: सिडको एन २ येथील ज्ञानेश विद्या मंदिर माध्यमिक शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संवाद सेतू प्रतिष्ठानतर्फे कार्यशाळा घेण्यात आली. सोमवारी समारोप झालेल्या या कार्यशाळेतून स्वजाणिवेची ओळख करून दिली जात आहे. या वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, त्याचा क्रियाशीलतेवर होणारा परिणाम, वाढ व विकासाचे विविध टप्पे याची माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे दिली जात आहे. उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र विटोरे, उपाध्यक्ष पूजा पऱ्हे, मुख्याध्यापक रामनाथ पंडुरे, संवाद सेतू प्रतिष्ठानच्या साधना सुरडकर, डॉ. सुनीता डोईबळे, सत्यप्रभा अष्टपुत्रे आदींची उद्‌घाटनप्रसंगी उपस्थिती होती. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सुनीता पिंप्रीकर यांनी मुलींवर होणारे अत्याचार, याची कारणे, घ्यावयाची काळजी, सामाजिक व प्रशासकीय कर्तव्य, कायदेशीर उपाययोजना याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाची तयारी कशी करावी? प्रत्येक विषयाचे करिअरसाठीचे महत्त्व पटवून दिले. एकाग्रता वाढवावी, असा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रीकर निवृत्तांना ओळखपत्र

0
0

औरंगाबाद: विक्रीकर विभागातर्फे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीनंतरचे कायमचे ओळखपत्र राज्यकर सहआयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. विक्रीकर विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली ओळखपत्रे वस्तू व सेवा कर भवन रेल्वे स्टेशन येथून घेऊन जावेत, असे आवाहन विक्रीकर पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जनार्धन अमृतकर, निरंजन थावरे व कार्यकारिणीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भारताचे संविधान’ विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करा’

0
0

औरंगाबाद: येत्या शैक्षणिक वर्षापासून पदवी, पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांत 'भारताचे संविधान' हा विषय सक्तीचा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांना संविधानाचे ज्ञान व्हावे, समाजात समता, एकता, बंधुता अखंडित रहावी या हेतुने जबाबदारी म्हणून विद्यपीठाने प्रत्येक अभ्यासक्रमात हा विषय सक्तीचा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन तुकाराम पांचाळ यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

…करोडीत ट्रॅकसाठी प्रस्ताव पाठवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

करोडीत नवीन टेस्टिंग ट्रॅक तयार करणे, तेथे वाहनधारकांसाठी शेडसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी औरंगाबाद येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील परिवहन कार्यालयाला (आरटीओ) नवीन परिवहन आयुक्त शेखर चेन्ने यांनी भेट दिली. या भेटीत चन्ने यांनी 'आरटीओ'च्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ऑनलाइन प्रक्रियेची माहिती व त्यातील अडचणी समजून घेतल्या. यावेळी औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिऐशनने करोडी टेस्टिंग ट्रॅक येथे वाहने पासिंगसाठी येतात, पण तेथे वाहनधारकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगितले. यानंतर परिवहन आयुक्त चेन्ने यांनी टेस्टिंग ट्रॅकवर होत असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी करोडी येथे नवीन ट्रॅक तयार करण्याची गरज असल्याचे मत मांडण्यात आले. २१ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन ट्रॅक तयार करावा, असे मत परिवहन अधिकाऱ्यांनी केले. मात्र, शासकीय नियमानुसार ज्या कामासाठी निधी मिळाला आहे, त्याच कामासाठी तो वापरावा लागतो, हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे चन्ने यांनी करोडी येथे टेस्टिंग ट्रॅक, वाहनधारकांना सुविधा निर्माण करून देण्याकरिता प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दलालांची चलाखी उघड

परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांच्या भेटीदरम्यान अनेकांनी वाहन पासिंगसाठी नवीन व्यवस्थेत अपॉइंटमेंट मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर चन्ने यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. 'एखाद्या अपॉइंटमेंटसाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर ते बाद होत नाही. अनेक एजंट याच अपॉइंटमेंटचा वापर करून वाहने पासिंग करून घेऊन जातात. त्यामुळे सर्वसामान्यांची अडचण होत असते. दलाल याचा फायदा उचलतात,' असे अधिकाऱ्यांनी परिवहन अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. दलालांची ही चलाखी उघड झाल्याने याबाबत लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

मैत्रेवार ठरले दुसरे अधिकारी

परिवहन आयुक्तांच्या समोरच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार व नगरसेवक विकास एडके यांच्यात वादावादी झाली. या घटनेनंतर मैत्रेवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. यापूर्वी औरंगाबाद कार्यालयातील तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर. आर. सावंत यांनाही त्यांच्या वर्तनाच्या कारणावरून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. सावंत यांच्यानंतर मैत्रेवार हे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येणारे दुसरे 'डेप्युटी आरटीओ' ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातगाडी हप्ते वसुलीतून दंगल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरात झालेली दंगल कोणत्याही दोन समुदायातील नसून शहागंज परिसरातील हप्ते वसुलीवरून तसेच स्वत:च्या व्यवसायाच्या वृद्धीवरून भांडणे झाली. त्याचे पर्यवसन दंगलीमध्ये झाले. या घटनेचा फायदा निवडणुकीत व्हावा असे काही राजकीय लोकांना वाटत आहे,' असा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी केला.

मुंडे यांनी राजाबाजार, शहागंज, नवाबपुरा, चमन या दंगलीत नुकसान झालेल्या परिसराला भेट दिली. यानंतर सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 'शहागंज, चमन पसिरामध्ये मोठ्याप्रमाणावर हातगाड्या आहेत. हप्ते वसुलीसाठी येथे नगरसेवकांच्या कुरबुरी होतात. स्वत:चा फायदा होत नसल्याचे लक्षात येताच येथे भांडणे झाली व पुढे दंगल पेटली. दंगलीमध्ये ठरवून दुकाने लुटण्यात आली. स्वत:ची खळगी भरण्यासाठी ज्या लोकांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख, तर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये शासनाने द्यावे. दंगलीमध्ये दुकान, घर जळालेल्या प्रत्येक दुकान मालकाने विमा काढलेला नाही. आता हे व्यापारी रस्त्यावर येतील. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही शासनाने घ्यावी. शहरातील दंगलीची शक्यता अडीच महिन्यांपूर्वी गुप्तचर विभागाकडून पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येऊन सदर माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दाबली. दंगलीचे नियोजन दोन महिन्यांपासून सुरू होते हे यावरून स्पष्ट होते. शहरातील काही भागात समाजकंटकाकडून जाळपोळ सुरू असताना पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत होते. पोलिसांच्या मदतीनेच जर दंगे होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे जावे ? पोलिस पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. शहरातील दंगलीची चौकशी विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली करावी,' अशी मागणीही मुंडे यांनी केली. पत्रकार परिषदेसाठी आमदार सतीश चव्हाण, कदीर मौलाना आदींची उपस्थिती होती.

\B

खासदारांवर कारवाई करा

\B'राज्यात गृहविभाग आहे काय?' असा सवाल करत 'शहरात घडलेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्र्यांना पाठवले. आता मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहरात यावे,' असे आवाहन मुंडे यांनी केले. 'औरंगाबादचे खासदार तसेच माजी आमदार व शिवसेनेचे पदाधिकारी दंगेखोरांसोबत फिरताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. एका माजी आमदाराच्या शहागंजमधील प्लॉटकडे जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून काही दुकाने पेटवण्याचे प्रकार घडले,' असा आरोपही मुंडे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवशाही बस गोव्यापर्यंत धावणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

औरंगाबाद ते गोवा अशी शिवशाही बस सुरू करण्याची घोषणा एसटी विभागाकडून करण्यात आली होती. आगामी दहा दिवसांत औरंगाबाद ते सावंतवाडीपर्यंत स्लीपर बस गोव्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे.

औरंगाबाद सावंतवाडी बसचे उद्घाटन करताना विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी यांनी या बसचा मार्ग गोव्यापर्यंत पुढे नेण्याचे संकेत दिले होते. ही बस औरंगाबाद ते सावंतवाडी या दरम्यान सुरू करण्यात आली होती. गोव्यामध्ये पणजी येथे शिवशाही बस नेण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. हा परवाना मिळविण्यासाठी औरंगाबादहून एक कर्मचारी आणि तसेच मुंबईचे विभागीय वाहतूक अधिकाऱ्यास गोव्याला पाठविण्यात आले आहे. आठ दिवसांत परवाना मिळू शकेल व त्यानंतर लगेचच ही बस गोव्यापर्यंत धावू लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जळालेल्या दुकानातूनही चोरी

0
0

औरंगाबाद : शहागंज येथील दंगलीत पुना ऑटोमोबाइलला आग लावण्यात आली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. आता या जळालेल्या साहित्यांची चोरी करण्यात येत असल्याची तक्रार दुकान मालकांनी सिटीचौक पोलिसांत दिली आहे. पुना ऑटोमोबाइलचे मालक सुरेंद्रजित सिंग गुरबसिंग सबरवाल (रा. सिंधी कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १३ मे रोजी रात्री साडेसहाच्या दरम्यान काही अनोळखी व्यक्तींनी जळालेल्या दुकानाचे शटर वर करून त्या दुकानातून स्पेअर पार्टची चोरी करित होते. या प्रकरणात दुकान मालकांच्या फिर्यादीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…………

\Bदोन दुचाकीला आग

\Bऔरंगाबाद : जिन्सी भागातील तक्षशिलानगर भागात राहणारे ललित रत्नाकर वैद्य यांच्या घरासमोर उभ्या असलेलया दोन दुचाकींना अज्ञातांनी पेटवून दिले. यात दोन्ही दुचाक्या जळून खाक झाल्या असून ६४, ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळ यांच्या अटकनेनंतर शहर बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलप्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना अटक केल्याची माहिती विविध वार्डांमध्ये पसरताच व्यापाऱ्यांनी या अटकेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त बंद पुकारला.

जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिस शिवाजीनगर येथे दुपारी पोलिस पोहल्याची माहिती कळताच कार्यकर्त्यांनी जंजाळ यांच्या घरासमोर तुफान गर्दी केली. जंजाळ यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात असल्याचे समजताच शिवाजीनगर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. जंजाळ हे शिवाजीनगर भागाचे नगरसेवक असल्यामुळे वार्ड तसेच परिसरातील कार्यकर्ते, नागरिक, महिलांनी घोषणाबाजी सुरू केली. जंजाळ यांना पोलिस ठाण्याकडे घेऊन जाताना कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन केले. शिवाजीनगरसह गजानन महाराज मंदिर परिसरातील बाजारपेठ ही काहीवेळ बंद होती. दंगलीमध्ये जाळपोळ, दगडफेक झालेल्या राजाबाजार, शहागंज परिसरातही जंजाळ यांच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तेथील दुकानेही व्यापाऱ्यांनी बंद केली. टीव्ही सेंटर परिसरामध्येही दुपारी जंजाळ यांच्या अटकेची बातमी कळताच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण केली नगरसेविकेच्या मुलांविरोधात पोलिसांत तक्रार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

रस्त्यावर कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या नगरसेविकेच्या दोन मुलांसह एका नागरिकाच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुंडलिकनगर वॉर्डात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी, स्वच्छता निरीक्षक के. एम. ज्ञाते, अनिल ताठे, मोहम्मद मुश्ताक, गजानन लांडगे, कनिष्ठ लिपिक विजय पाटील आदी गस्त घालत होते. तेवढ्यात एक व्यक्ती एमएच २० बीएन १५५७ क्रमांकाच्या वाहनातून आली व रस्त्यावर कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. विजय पाटील यांनी त्यास कचरा टाकण्यापासून थांबवले, परंतु त्या व्यक्तीने पाटील यांचे ऐकले नाही. उलट त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि नगरसेविका मीना गायके यांची मुले विशाल गायके, वैभव गायके यांना बोलावून घेतले. या सर्वांनी पाटील यांना मारहाण केली. त्यामुळे पाटील यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कलम ३३२, ३५३, ३२३, ३४ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुधारण्यासाठी व त्यात सुसूत्रता आणण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची दोन महिन्यांसाठी पाणीपुरवठा विभागात विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. उपायुक्त आर. एन. संधा यांना वॉर्ड कार्यालय ६ ची जबाबदारी देण्यात आली आहे. शाखा अभियंता के. पी. पवार यांना वॉर्ड क्रमांक ५ कार्यालयाची, तर दुय्यम आवेक्षक अशोक खेडकर यांना वॉर्ड क्रमांक ७ कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्याच्या संबंधाने येणाऱ्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मध्यवर्ती तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रात सिंधू जिवरग, गौतम जाधव, शेख नजीर शेख अमीर या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विनायक निपुण यांनी स्वीकारली पालिका आयुक्तपदाची सुत्रे

0
0

फक्त फोटो कॅप्शन

डॉ. विनायक निपूण यांनी मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी काही मोजकेच अधिकारी उपस्थित होते. उद्या (बुधवारी) सकाळी आठ वाजता ते सर्व विभागप्रमुखांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. कचराकोंडी फोडण्यात डी. एम. मुगळीकर यांना अपयश आल्यामुळे शासनाने मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुगळीकर यांची तडकाफडकी पालिका आयुक्तपदावरून बदली केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images