Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘एकनाथ’च्या कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ

0
0
दहा बाय दहाची पत्र्याची खोली, खोलीत अर्धांगवायूच्या झटक्यामुळे पलंगावर खितपत पडलेला साठीतला व्यक्ती. थकित पगारच्या अपेक्षेवर असलेली त्याची म्हातारी पत्नी. आयुष्यभर संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर नोकरी केलेले दौलत भाऊराव ताकवाले सध्या अशा परीस्थित आपले जीवन जगत आहेत.

बेपत्ता शाळकरी विद्यार्थी सुखरुप परतले

0
0
मसनतपूर येथून मंगळवारी बेपत्ता झालेली तीन शाळकरी विद्यार्थी गुरुवारी दुपारी सुखरूप घरी परतली आहे. करोडी येथे देवदर्शनाला गेलो असल्याची माहिती या तिघांनी पोलिसांना दिली आहे.

अवैध भूखंड वाटप रद्द करा

0
0
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील ‌उद्योग विस्तारीकरणाच्या नावाखाली भूखंड वाटप करण्यासाठी एमआयडीसी कार्यालयात विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत २८ अर्जदारांमधून फक्त ११ जणांना भुखंडाचा वाटप करण्यासाठी बोलविण्यात आले होते.

जाबजबाबाची प्रक्रिया पुन्हा झाली सुरू

0
0
पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील पेपरफुटीचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. पोलिसांच्या तपासाचा वेग कमी झाला असला तरी आता मंडळाने नेमलेल्या समितीने पुन्हा जाबजबाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

महावितरणचा सुखद धक्का

0
0
कोटेशन भरल्यानंतर चकरा मारूनही लवकर कनेक्शन मिळत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील २५३६ नागरिकांना एका दिवसात कनेक्शन मिळाल्याचा सुखद धक्का बसला आहे.

बनावट बियाण्यांची चौकशी सुरू

0
0
आमदार आर. एम. वाणी यांनी गाढेपिंपळगाव (ता. वैजापूर) येथे बोगस बीटी कपाशी बियाण्यामुळे १४२ शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा गुरुवारी तारांकित प्रश्नाद्वारे नागपूर अधिवेशनात उपस्थित केला.

पालिकेविरोधात नागरिकांचा ‘नो कर’

0
0
शहरातील काही जागरुक नागरिकांनी एकत्र येऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी क्रांती चौकात नो ‘कर’ आंदोलन केले. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलभूत सोयीसुविधा मिळाल्याशिवाय कर न भरण्याचा इशारा या वेळी पालिकेला देण्यात आला.

अपघातात महिला गंभीर जखमी

0
0
वाळूच्या टिप्परखाली सापडून दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता शिवाजीनगर भागात घडली. या प्रकरणी टिप्परचालक पसार झाला असून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यात आगीत ५ कोटींचे नुकसान

0
0
नवा जालना भागातील मुख्य बाजारपेठेतील उबाळे रेडिमेड दुकान बुधवारी रात्री लागलेल्या आगीत जाळून भस्मसात झाले. या आगीत सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शिक्षिकेचा शिक्षकाकडून खून

0
0
लग्नाविषयी काही अटी घातल्याच्या कारणावरून शिक्षकाने प्रेयसी शिक्षिकेचाच गळा दाबून खून केला. ही घटना बीड शहरातील कारीमपुरा भागात घडली. खुनानंतर आरोपी पोलिसांसमोर स्वत:हून शरण आला. हे दोघेही जण शहरातील राजस्थानी विद्यालयात शिक्षक होते.

आमदार सांबरेंचे नागपुरात उपोषण

0
0
कापसाला प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव द्यावा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा, यांसह अन्य प्रश्नांसाठी जालना जिल्ह्यातील बदनापूरचे शिवसेना आमदार संतोष सांबरे यांनी गुरुवारी नागपूर येथे विधान भवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले.

कैद्याकडून ‘PI’ने खरेदी केली जमीन

0
0
जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या व पुन्हा रजा संपल्यानंतरही हजर न झालेल्या कैद्यांच्या तपासाची जबाबदारी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास ढोले पाटील यांच्या पत्नी व मुलाच्या नावाने पुयनी शिवारातील जमीन खरेदी केल्याची माहिती उजेडात आले आहे. ही माहिती सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी उजेडात आणली आहे.

पेट्रोल पंप २४ ला बंद

0
0
पेट्रोल पंप चालकांना पेट्रो‌ल विक्रीतून मिळणारे कमिशन वाढवा या मागणीसाठी, कॉन्फडरेशन ऑफ इंडियन पेट्रोल डिलर्स तर्फे अखेर पेट्रोल पंप चालकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्येष्ठ नागरिकाची जमीन बळकावली

0
0
ज्येष्ठ नागरिकाची जमीन बनावट कागदपत्राआधारे बळकावल्याप्रकरणी पाच आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निराधार वृद्धांच्या मागण्यांसाठी मोर्चा

0
0
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभांपासून शेकडो निराधार व्यक्ती अद्यापही वंचित आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष (मध्य) भगवान खिल्लारे यांनी केला आहे.

पोलिस कर्मचा-यांच्या हक्कासाठी मोर्चा

0
0
पोलिसांची ड्युटी आठ तासांची करण्यात यावी, यांसह अन्य मागण्यांसाठी पोलिस मित्र संघटनेतर्फे शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

भाषा, गणिताचा पाया होणार पक्का

0
0
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयाचा पाया अधिक पक्का व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम’ हाती घेण्यात आला आहे.

‘आप’ची रविवारपासून राज्यस्तरीय बैठक

0
0
दिल्लीचा गड सर केल्यानंतर आम आदमी पार्टीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आणि व्यूहरचना ठरविण्यासाठी औरंगाबादेत २२ डिसेंबर पासून दोन दिवसांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हा ‘वीकएंड’ उबदार

0
0
गेल्या आठवड्याच्या शेवटी कुडकुडणाऱ्या औरंगाबादकरांचा हा वीक एण्ड उबदार राहणार आहे. पुढील आठवड्यात किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे ख्रिसमसच्या सुटीत भटकंती करण्यास हरकत नाही.

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ७५ हजार कार्यकर्ते

0
0
भारतीय जनता पक्षातर्फे २२ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘महागर्जना’ सभेसाठी मराठवाड्यातून ७५ हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते रवाना होणार आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images