Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

३७० रुपयांमध्ये मिळाले गॅस कनेक्शन

$
0
0

इंदिरानगर बायजीपुरासह या भागात बहुतांश नागरिक गरीब आहेत. या भागातील अनेकांना गॅस कनेक्शन घेणे शक्य नव्हते. उज्वला गॅस योजनेत गॅस कनेक्शन घेण्यासाठी या नागरिकांनी ३७० रुपये भरले. उर्वरित रक्कम या ग्राहकांच्या सबसिडीतून वळती केली जाणार आहे. या योजनेमुळे त्यांच्या घरातील चूल बाजुला झाली असून त्यांना गॅस मिळाला आहे. रॉकेलच्या रागांसाठी उभे राहण्याच्या त्रासातून मुक्तता झाल्याचा आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माझ्याकडे जादुची कांडी नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

माझ्याकडे जादुची कांडी नाही, शहर रुळावर येण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. नागरिकांनी देखील त्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, अशी भूमिका महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी बुधवारी स्पष्ट केली. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांनी सर्व विभागप्रमुख, झोन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दहा वाजता त्यांनी महापौर व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर शहरातील सनदी अधिकाऱ्यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली. सायंकाळी पाच वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

औरंगाबाद शहराचे नाव येत्या काळात अभिमानाने घेतले जाईल, अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आपण करू, अशी ग्वाही त्यांनी सुरुवातीला दिली. शहराच्या विकासाची आवश्यकता लक्षात घेऊन सुधारणेचे, विकासाचे निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. ' क्लिनिंग, ग्रिनिंग व प्रोफेशनॅलिझम ' या तीन घटकांकडे आपण विशेष लक्ष देणार आहोत असे सांगत ते म्हणाले, 'पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन या प्रश्नांना प्राधान्य देऊन हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवावे लागतील. त्याशिवाय महापालिकेच्या कारभारात प्रोफेशनॅलिझम आणावा लागेल. प्रत्येक कामाचे उद्दीष्ट ठरवून त्यानुसार काम करण्याचे नियोजन करावे लागेल. त्याच बरोबर भ्रष्टाचाराला आळा बसवण्याच्या दृष्टीने देखील कठोर पावले उचलली जातील.' अधिकाराचे विकेंद्रीकरण करणार असल्याचे स्पष्ट करताना डॉ. विनायक म्हणाले, 'झोन अधिकाऱ्याने झोन आयुक्त म्हणून काम करावे, अशी आपली भूमिका आहे. तशा सूचना झोन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे बहुतांश नागरिकांच्या तक्रारी झोन कार्यालयातच सुटतील. त्यांना मुख्य कार्यालयात किंवा आयुक्तांपर्यंत येण्याची गरज पडणार नाही. करावयाच्या कामांचा 'रोड मॅप ' तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकडे आपला कल असणार आहे. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.'

कचरा टाकण्यासाठी जागा नसणारे हे 'युनिक शहर' आहे असा उल्लेख आयुक्तांनी केला. यातून मार्ग काढावा लागेल. यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य केले पाहिजे. कचऱ्याचे वर्गीकरण करूनच नागरिकांनी कचरा महापालिकेच्या ताब्यात दिला पाहिजे. तशी संस्कृती येत्या काळात तयार करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

तज्ज्ञांची मदत घेणार

विविध विषयांत काम करण्यासाठी महापालिका किंवा महापालिकेचे अधिकारी सक्षम आहेतच असे नाही. त्यामुळे त्या त्या विषयासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारची मदत घेण्याची आपली तयारी आहे. तज्ज्ञांच्या सूचनेनुसार काम करण्यासाठी नियोजन करावे लागेल, असे डॉ. निपूण विनायक म्हणाले.

पॅरा ग्लायडिंगपेक्षा इथले आव्हान कठीण

पॅरा ग्लायडिंगची तुम्हाला आवड आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, 'पॅरा ग्लायडिंगची मला आवड नाही. उंचावरून पडण्याची भीती मनात होती. ही भीती काढून टाकण्यासाठी मी पॅरा ग्लायडिंग केले होते. औरंगाबादेत आल्यावर इथली परिस्थिती लक्षात घेतली तेव्हा पॅरा ग्लायडिंग करण्यापेक्षा इथले आव्हान कठीण आहे, असे वाटते.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढील महिन्यात राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता

$
0
0

सिंगल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जून महिन्यातील जिल्हा दौऱ्यात जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आठ ते दहा महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा कायम आहे.

सुधाकर सोनवणे यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर जिल्ह्याला पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही. आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आठ महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिल्यानंतरही जिल्हाध्यक्ष पदाबाबत ‌वरिष्ठ स्तरावरून निर्णय झाला नाही. औरंगाबादचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे यांचाही कार्यकाळ पूर्ण झाला आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी रंगनाथ काळे, कैलास पाटील आदींची नावे पुढे येत आहेत. तथापि, शहराध्यक्षपदासाठी कोणतेही नाव चर्चेत नाही.

जून महिन्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेऊन पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्षांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (१५ मे) मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्येही जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर हॉस्पिटल होणार अद्ययावत

$
0
0

सिंगल

म.टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

शहरातील शासकीय कॅन्सर हॉस्पिटल या संस्थेतील रेडिओथेरपी विभागाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या वाढीव बांधकामाला केंद्र शासनाच्या एनपीसीडीसीसीएस या कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीमधून ३१ कोटी कोटी ७ लाख रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे. यामुळे आता हॉस्पिटलमध्ये सुविधांमध्ये अधिक वाढ होणार आहे.

या बांधकामांतर्गत भाभा ट्रॉनच्या शेजारी असलेल्या जागेमध्ये लिनिअर एक्सिलेटरसाठी असलेल्या भूमिगत बांधकामावर दोन मजले बांधण्यात येणार आहे. यामध्ये रेडिओथेरपी विभागाची ओपीडी, डे केअर वॉर्ड, आपत्कालीन वॉर्ड, स्टोअर, किचन आदींचे बांधकाम करण्यात येणार आहे. नवीन बांधकामामध्ये १६५ वॉर्ड बांधण्यात येणार असल्यामुळे आता कॅन्सर हॉस्पिटलच्या एकूण वॉर्डांची संख्या २६५ होणार आहे.

शासन निर्णयामधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील प्रामुख्याने रुग्‍णालयीन बांधकामाशी संबंधित एनबीसीसी, एचएलएल, एचएससी या सार्वजनिक उपक्रम असलेल्या कंपन्यांकडून देकार मागवून बांधकामाबाबतची कार्यवाही करण्यासंदर्भात स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.

औरंगाबाद येथे असलेल्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, खान्देश भागातून मोठ्या प्रमाणावर रुग्‍ण उपचारासाठी येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्ही फुटेज केले डिलिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलीप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल क्लीप पुरावे म्हणून जमा करणे सुरू केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही नागरिकांनी त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजचा डेटा डिलिट केल्याचे समोर आले आहे. असे पाच डीव्हीआर पोलिसांनी जप्त केले असून, ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती 'एसआयटी' प्रमुख व उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शुक्रवारी राजाबाजार, नवाबपुरा भागात दोन गटात तुफान दंगल उसळली. यामध्ये दगडफेक व जाळापोळ मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. दुकाने व वाहने जळाल्याने नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. या प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने दंगेखोरांना ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइलमधील व्हिडिओ शुटींग, फोटो आदी पुरावे जमा करण्यास सुरुवात केली आहे. या पुराव्यावरून आरोपी निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी या भागात ज्या नागरिकांच्या घराबाहेर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, त्यांच्याकडून फुटेज मागवले होते. मात्र या नागरिकांनी विविध कारणे दाखवत फुटेज देण्यात असमर्थता दर्शवली आहे. पोलिसांच्या पाहणीत त्यांच्या डीव्हीआरमधील शुक्रवारच्या दंगलीचे चित्रिकरण डिलिट केल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी असे पाच डीव्हीआर जप्त केले आहेत. या डीव्हीआरची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात येणार असून, डिलिट झालेले फुटेज पुन्हा प्राप्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. हे फुटेज प्राप्त झाल्यानंतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येणार आहे.

\Bदंगलीचे व्हिडिओ पाठवा

\Bडॉ. घाडगे म्हणाल्या, 'ज्या नागरिकांकडे दंगली बाबतचे व्हिडिओ असतील त्यांनी ते पाठवावेत. अशा व्हिडिओची पोलिसांना मदत होणार आहे. अशा व्हिडीओ क्लीप असल्यास पोलिस आयुक्तालयाच्या ८३९००२२२२२ तसेच ७७४१०२२२२२ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवाव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपयश लपवण्यासाठी पोलिसांकडून सेनेची बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

आपले अपयश लपवण्यासाठी पोलिस शिवसेनेला बदनाम करीत आहेत. दंगलीत ज्या पोलिसांना आम्ही वाचवले तेच पोलिस आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड करीत आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी केला. तापडिया नाट्य मंदिरात आयोजित शिवसेनेच्या शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

चंद्रकांत खैरे म्हणाले, 'अचानक दंगल कशी सुरू झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर दगडफेक कशी आणि कुठून झाली, पेट्रोल बाँब कुणी फेकले याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. यात पोलिसांना अपयश येत आहे. राजेंद्र जंजाळ यांनी प्रतिकार केला नसता तर चार जणांचे जीव गेले असते.' विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. त्यावर खैरे म्हणाले, 'मी माझ्या मतदारसंघातील लोकांच्या मागे उभे रहायचे नाही, त्यांचे संरक्षण करायचे नाही तर कुणाचे संरक्षण करायचे.' विखे पाटील दलबदलू आहेत, ते मुख्यमंत्र्यांना मिळालेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आपण बचाव केला आहे, संरक्षण केले आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असे असले तरी तुम्ही सतर्क रहा, कधीही काहीही घडू शकते, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. औरंगाबादच्या विधानसभेच्या तिन्हीही जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, त्या दृष्टीने कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

या मेळाव्यात व्यासपीठावर संपर्क नेते विनोद घोसाळकर, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी आमदार अण्णासाहेब माने, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, संतोष जेजुरकर, विजय वाघचौरे, विधानसभा संघटक रेणुकादास (राजू) वैद्य, महिला आघाडीच्या कला ओझा, रंजना कुलकर्णी, सुनीला आउलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजी-माजी पदाधिकाऱ्यांना डावलू नका

विनोद घोसाळकर यांनी शाखाप्रमुख, उप शाखाप्रमुख यांच्या जबाबदाऱ्या, कामाची माहिती दिली. शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीला आजी-माजी पदाधिकाऱ्यांना बोलवत जा, त्यांना डावलू नका असे त्यांनी व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना सांगितले. आमदार संजय शिरसाट, नरेंद्र त्रिवेदी, अण्णासाहेब माने यांचेही यावेळी भाषण झाले.

मी थोडे मोठ्याने बोललो की,

खैरे रागावले असे म्हणतात

संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एवढे बोलतात पण त्यांच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही आणि मी थोडे मोठ्याने बोललो की खैरे रागावले असे म्हटले जाते, असा उल्लेख करून कार्यकर्त्यांना उद्देशून खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, मी तुमचा मोठा भाऊ आहे. कुटुंबप्रमुख आहे. मी जेवढा रागावतो तेवढेच प्रेमही करतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भयमुक्त काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

'तुमच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, भयमुक्त काम करा. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत', असा विश्वास महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. निपूण विनायक यांना दिला.

डॉ. विनायक यांनी बुधवारी सकाळी दहा वाजता महापौरांच्या दालनात जाऊन महापौर घोडेले यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभागृहनेता विकास जैन, सभापती गजानन बारवाल, गटनेता मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी महापौरांनी आयुक्तांना ५८ विषयांचा उल्लेख असणारे निवेदन दिले. प्राधान्यक्रमानुसार विषय मार्गी लावा, असे आवाहन त्यांनी आयुक्तांना केले.

भयमुक्त काम करा, तुमच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, परंतु जे काही निर्णय घ्याल त्याची माहिती पदाधिकारी म्हणून आम्हाला द्या, अशी सूचना महापौरांनी डॉ. विनायक यांना केली. डॉ. विनायक यांनी ही सूचना मान्य केली. आपण सर्वजण मिळून शहर विकासासाठी काम करू, असे ते महापौरांना उद्देशून म्हणाले. सुमारे एक तास आयुक्त आणि पदाधिकारी यांची बैठक चालली. यावेळी पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले ५८ विषयांचे निवेदन महापौरांनी दिले. त्यात प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन, नाला सफाई, समांतर जलवाहिनीचा प्रकल्प, भूमिगत गटार योजना, स्मार्टसिटी प्रकल्प, एलईडी लाईटचा प्रकल्प, सफारी पार्कसाठी शासनाकडून निधी प्राप्त करणे, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामासाठी पीएमसी नियुक्त करणे, १५० कोटींच्या रस्त्यांच्या कामांबद्दल तात्काळ निर्णय घेणे, सातारा-देवळाईसाठीच्या डीपीआरचा आढावा घेऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आदी विषयांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगरात दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

औरंगाबादमधील दगंल प्रकरणात शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळला झाल्याच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी बुधवारीही शिवाजीनगर व परिसरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला.

पोलिसांनी जंजाळ यास मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेत नंतर अटक केली. ही बाब समजातच परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. दुसऱ्या दिवशीही शिवाजीनगरसह अकरा तसेच बारावी योजना, सूतगिरणी आदी परिसरातील बहुतेक दुकाने बंद होती. दुकाने बंद ठेवा, असे कोणीही आवाहन न करताही व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळल्याचे समोर येत आहे. शिवाजीनगर परिसरातील बाजारपेठेत नेहमी वर्दळ असते. परंतु या बंदमुळे शुकशुकाट जाणवत होता. मेडिकल स्टोअर्स, दवाखाने आदी वगळता सर्व दुकाने, व्यापारी प्रतिष्ठान, दालन कुलूप बंद होते. या उत्स्फूर्त बंद दरम्यान दिवसभरात कुठल्याही प्रकाराचा अनुचित प्रकार घडला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशी दारूच्या दुकाने हटवा

$
0
0

औरंगाबाद :

सनी सेंटर येथील अपार्टमेंटच्या तीन गाळ्यात देशी दारूचे दुकान सुरू आहे. या दारूच्या दुकानाचा सर्वसामान्यांना मोठा त्रास होत आहे. या देशीच्या दारू दुकानाला तत्काळ स्थलांतरित करावे, अशी मागणी भास्कर मुदगल, प्रकाश जाधव, बाळू गणराज, बाबा घोरपडे, शेषराव सातपुते, राजु जाधव यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधान सचिव कुंटे आज औरंगाबादमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे गुरुवारी औरंगाबादमध्ये येणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निणर्याविरोधात कोर्टात असलेल्या प्रकरणांचा सीताराम कुंटे गुरुवारी आढावा घेणार आहेत. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या सभागृहात ही बैठक सकाळी ११ वाजता होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान प्रवाशांकडून आयुक्तांनी गोळा केल्या शहर सुधारणेच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी एक तासाच्या विमान प्रवासात सहप्रवाशांकडून शहर सुधारणेबद्दलच्या सूचना गोळा केल्या. ३० ते ३५ सूचना त्यांच्याकडे प्राप्त झाल्या. आयुक्त म्हणून काम करताना या सूचनांचाही विचार करू, अशी ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. निपूण विनायक मंगळवारी सायंकाळी मुंबई ते औरंगाबाद असा विमान प्रवास करून आले. ४५ मिनिटांच्या या प्रवासात विमानाच्या खिडकीतून बाहेर बघत बसण्यापेक्षा किंवा एखादे मासिक चाळण्यापेक्षा वेगळे काही तरी करण्याची कल्पना त्यांना सूचली. विमानातील बहुतांश प्रवासी औरंगाबादला येणारे आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रवाशांना स्वत:ची ओळख करून दिली. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारण्यासाठी आपण जात आहोत. तुम्ही औरंगाबादचे नागरिक आहात, तेव्हा शहर सुधारणेच्या दृष्टिने तुमच्या काही सूचना असतील तर त्या कागदावर लिहून द्या, असे आवाहन त्यांनी आपल्या सहप्रवाशांना केले. लगोलग त्यांनी या प्रवाशांना कोरे कागदही वाटले. औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांसाठी हा अनुभव तसा नवाच होता. पदभार स्वीकारण्यासाठी येणारा आयुक्त आपल्या सूचना जाणून घेत आहे, हीच घटना प्रवाशांना सुखद धक्का देणारी होती. प्रवाशांनी लगेचच कागदावर सूचना लिहिण्यास सुरुवात केली आणि ३०-३५ जणांच्या सूचना त्यांच्या हाती पडल्या. सूचना लिहिलेले कागद त्यांनी पत्रकारांना दाखवले. काम करताना या सूचनांचा निश्चितपणे विचार केला जाईल, असे ते म्हणाले. आपले शहर कसे असावे, आपल्या शहराला काय हवे आहे हे त्या त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांनी ठरविले पाहिजे. नागरिकांनी अपेक्षित असलेला विकास महापालिकेने केला पाहिजे, अशी आपली भूमिका असून त्याच दृष्टिकोनातून विमान प्रवासाचा उपयोग करून घेतला, असा उल्लेख डॉ. निपूण विनायक यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस आणि दंगलखोरांच्या विरोधात शिवसेना मोर्चा काढणार आहे. शिवसेनेच्या शाखाप्रमुख व उप शाखाप्रमुखांच्या मेळाव्यात जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी मोर्चा काढण्याचे सूचित केले. मोर्चाबद्दलची अधिकृत घोषणा गुरुवारी केली जाणार आहे.

गेल्या आठवड्यात शहरात उसळलेल्या दंगलीबद्दल अंबादास दानवे यांनी या मेळाव्यात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. 'पोलिसांना शिवसेनेने वाचवले. सामाजिक स्वास्थ राखण्याची जबाबदारी दोन्ही बाजूची आहे. शिवसेनेने पोलिसांना मदत केली, पण नंतर पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचे काम सुरू केले. त्यामुळे पोलिसांच्या व दंगेखोरांच्या विरोधात शिवसेनेने मोर्चा काढला पाहिजे. शहरातील प्रमुख मार्गांवरून; तसेच जुन्या शहरातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यावा,' अशी सूचना त्यांनी केली. मोर्चा काढण्याबद्दल खासदार चंद्रकांत खैरे यांनी आदेश द्यावेत, असे ते म्हणाले.

संपर्कनेते विनोद घोसाळकर म्हणाले, 'दंगलीचा तपास पोलिस योग्य प्रकारे करीत नाहीत, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी शिवसेनेची भूमिका आहे. ही मागणी शिवसेना लावून धरेल. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री नसल्यामुळे वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.'

दरम्यान, शिवसेनेच्या जिल्हाभरातील सर्व नगरसेवकांचा मेळावा गुरुवारी भानुदासराव चव्हाण सभागृहात मेळावा होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेतर्फे मोर्चाची घोषणा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिक मासनिमित्त धार्मिक कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अधिक मासानिमित्त शहरात विविध ठिकाणी विष्णू याग सोहळा, भगवत गीता, श्रीमद भागवत सप्ताह, कृष्णनाम स्मरण यासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,' अशी माहिती पुरोहित रामकृष्ण बारहाते यांनी दिली.

बारहाते म्हणाले, '१६ मेपासून अधिक महिना सुरू झाला आहे. दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. त्यास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात पुरुषोत्तम मासनिमित्त अनेक व्रत-वैकल्ये केले जातात. या महिन्यात दररोज उपवास, फक्त एकच वेळा भोजन किंवा मौनव्रतही पाळतात. या काळात तीर्थस्नान केले जाते. देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते. सौभाग्यप्राप्तीसाठी तांबुलदान केले जाते. 'अप्रूप' दानाचे विशेष महत्त्व आहे. मात्र हे सर्व दान सत्पात्री असावे. आधुनिक काळात गरजुंना शालेय साहित्याचे वाटप, गोरगरिबांना गरजेच्या वस्तूचे वाटप केले जाते.' दरम्यान, अधिक मासनिमित्त वेद अर्पण सेवाभावी संस्थातर्फे सिडकोतील सप्तपदी मंगल कार्यालयामध्ये १९ मे पासून विष्णू याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्य अभियंतापदी अतुल चव्हाण

$
0
0

सिंगल

मुख्य अभियंतापदी

अतुल चव्हाण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंतापदी अतुल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. एम. एम. सुरकुटवार हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. या पदाचा अतिरिक्त कार्यभार अधीक्षक अभियंता चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला.

चव्हाण मूळचे फुलंब्री तालुक्यातील आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे विविध पदांवर काम केले आहे. पुण्यात व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसची पहिली ग्रीन बिल्डिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली उभी राहिली. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्प डिझाईनमध्येही अतुल चव्हाण यांचा सहभाग आहे. वर्षभरापूर्वी ते औरंगाबादेत अधीक्षक अभियंता म्हणून रुजू झाले. सुरकुटवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर नवीन कोण अधिकारी रुजू होणार ? अशी चर्चा होती. याठिकाणी तीन अधीक्षक अभियंता कार्यरत आहेत. त्यातून चव्हाण यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला.

……………….

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा विभागीय नेतेपदी चंद्रकांत खैरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेच्या मराठवाडा विभागीय संपर्कनेतेपदी खासदार चंद्रकांत खैरे यांची निवड करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरे यांच्यावर औरंगाबाद, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यांची जबाबदारी सोपविली. खासदार खैरे यांना उपनेतेपदावरून नेतेपदी पदोन्नती देण्यात आली होती, मात्र त्यांच्याकडे स्वतंत्र जिल्ह्याची जबाबदारी दिली नव्हती. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरे यांची संपर्कनेतेपदाची निवड जाहीर करत त्यांच्याकडे बीड आणि लातूरची जबबादारी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषी खात्यातील सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरा

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

निवृत्त शिक्षकाची राजीनाम्यापूर्वीची कृषी खात्यातील नऊ वर्षांची सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संभाजीराव शिंदे व न्या. एस. एम. गव्हाणे यांनी दिले.

याचिकाकर्ते शिक्षक राजाराम उर्फ राजसाहेब भाऊराव कवाले शासनाच्या कृषी विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून सेवेत होते. कृषी खात्यात त्यांनी २ डिसेंबर १९६७ ते २ सप्टेंबर १९७८ दरम्यान नोकरी केली. नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये ते २ सप्टेंबर १९७८ मध्ये रुजू झाले. दोन्ही विभागांमधील ३८ वर्षांच्या सेवेनंतर कवाले १० ऑगस्ट २००६ रोजी निवृत्त झाले. विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर विभागाकडे त्यांच्या दोन्ही सेवांचा ३८ वर्षांचा प्रस्ताव निवृत्तीवेतनासाठी पाठविण्यात आला. उपसंचालकांनी केवळ शिक्षण विभागातील त्यांच्या २९ वर्षांच्या सेवेच्या आधारे निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव मान्यतंसाठी पाठविला. त्रुटीची पूर्तता करण्याच्या अटीवर सदर प्रस्ताव ३८ वर्षांच्या सेवेच्या अधिकारास अधिन राहून पाठविला होता. यानंतर याचिकाकर्त्याच्या निवेदनानुसार त्यांची कृषी खात्यातील नऊ वर्षांची आणि महाविद्यालयीन २९ वर्षांची अशी एकूण ३८ वर्षांची सेवा ३३ वर्षांच्या मर्यादेपर्यंत ग्राह्य धरून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ नुसार महाविद्यालयाने याचिकाकर्त्यास ३३ वर्षांच्या सेवेच्या आधारे निवृत्ती वेतन मान्य करण्याची शिफारस शिक्षण उपसंतचालक लातूर यांच्याकडे केली. त्यांनी प्रस्ताव नागपूर येथील महालेखाकार यांच्याकडे पाठविला. सदर प्रस्ताव नागपूर कार्यालयाने नामंजूर केला. यानंतर याचिकाकर्त्यांनी उपसंचालक लातूर यांच्याकडे खंड क्षमापित करण्यासाठी निवेदन सादर केले. परंतु याचिकाकर्त्यास प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. याचिकाकर्त्याची बाजू विठ्ठलराव सलगरे यांनी मांडली. या प्रकरणात संस्थेतर्फे एस. व्ही. नातू आणि शासनाच्या वतीने सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले.

\Bतो संदर्भ निर्णायक

\Bसर्वोच्च न्यायालयातील मधुकर विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणाचा संदर्भ देत शासन निर्णय १८ डिसेंबर १९८५, २८ सप्टेंबर १९८९ आणि १३ मार्च १९९२ विचारात घेऊन याचिकाकर्त्याने २ डिसेंबर १९६७ ते २ सप्टेंबर १९७६ या काळात कृषी खात्यात नऊ वर्ष सेवा केली. ३ सप्टेंबर १९७८ रोजी ते शिक्षक म्हणून रुजू झाले. एक दिवसाचा नाममात्र सेवाखंड क्षमापित करता येतो. महाविद्यालयाने शिफारस केल्याप्रमाणे ३८ वर्षांच्या एकूण सेवेच्या ३३ वर्ष मर्यादेत निवृत्ती वेतनास पात्र ठरतो असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीपीला लागली आग

$
0
0

डीपीला लागली आग

औरंगाबाद :

पोस्ट ऑफिस कार्यालयासमोरील डीपीमध्ये बुधवारी (१६ मे) दुपारी अचानक धूर निघू लागला. या प्रकरणी स्थानिकांनी महावितरणाला संपर्क केला. महावितरण कर्मचाऱ्यांनी डीपीची तपासणी केली असता डीपीमध्ये ऑइल नसल्याने हा धूर निघत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी डीपीमध्ये आठ लिटर ऑइल टाकले. ऑइल टाकल्यानंतर पुन्हा डीपीतून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. अवघ्या काही वेळेतच डीपीला पुन्हा आग लागली. त्यामुळे चार तासांपेक्षा ही अधिक वेळ पोस्ट ऑफिस भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून डीपी पुन्हा दुरुस्त केल्याची माहिती पोस्ट ऑफीस भागातील नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोपींच्या कोठडीत वाढ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भाजपाचे पदाधिकारी संजय फतेलष्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी मयुर भास्कर आडुळे आणि अक्षय रमेश परकेल्लू या दोघांच्या पोलिस कोठडीत २१ मे पर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. वाय.एच. मोहम्मद यांनी दिले. ६ मे रोजी विद्यापीठ परिसरात सायंकाळी हा हल्ला करण्यात आला होता.

....

फतेलष्कर हे व्यायाम करून परतत असताना कारमध्ये आलेल्या चार ते पाच जणांनी फतेलष्कर यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकत तलवारीने हल्ला केला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. विद्यापिठातील वस्तीगृह दोन जवळ हा प्रकार घडला होता. फतेलष्कर यांना तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बेगमपुरा पेालिसांनी शुक्रवारी आरोपी मयुर आडुळे व अक्षय परकेल्लू यांना अटक करून कोर्टात हजर केले होते. त्यांना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्या कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश कोर्टाने दिले. याप्रकरणी सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी खाकी मग बाकी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलीत जखमी झालेले पोलिस अधिकारी हेमंत कदम मंगळवारी कर्तव्यावर हजर झाले असून दुसऱ्या अधिकारी राजश्री आढे जखमी अवस्थेतही कर्तव्य बजावत आहेत. तर पोलिस अधिकारी गोवर्धन कोळेकर यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असली तरी अद्याप ते धोक्याबाहेर नाहीत.

शुक्रवारी उसळलेल्या दंगलीत जमावाला काबूत आणण्याचा प्रयत्न करताना एसीपी गोवर्धन कोळेकर, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, हेमंत कदम, राजश्री आढे आदी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी गंभीर जखमी असलेले कोळेकर यांना मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी अद्याप त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तसेच एसीपी रामेश्वर थोरात, निरीक्षक परोपकारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवाबपुरा येथील दंगलीत जखमी झालेले हेमंत कदम यांच्या तोंडाला तसेच राजश्री आढे यांच्या पायावर दगडाचा फटका बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या शहरात तणावग्रस्त परिस्थीती आहे. ही बाब लक्षात घेऊन जखमी अधिकाऱ्यांनी कर्तव्यावर येण्याला पसंती दिली आहे. मंगळवारी हेमंत कदम हे सिटीचौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आढे यांनी उपचार घेतल्यानंतर रजेवर जाण्याऐवजी कर्तव्य बजावण्यावर भर दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे गॅस कनेक्शनचे झाले वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शुक्रवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिवारचा दिवस जुन्या औरंगाबाद शहरात बंदचा राहिला. या काळात किराडपुऱ्याच्या मंदिरात लग्न लावण्यासाठी आलेल्या वऱ्हाडींसाठी या भागातील मुस्लिम बांधव संरक्षक म्हणून उभे राहिले होते. या शांतीदुतांचा हारूण मुकाती सेंटरच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत गरीब परिवाराला गॅस कीट वाटप हारूण मुकाती सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात मुकाती सेंटरचे युसूफ मुकाती, हरविंदरसिंग सलूजा यांच्यासह सी. वायकोस आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बायजीपुरा, इंदिरानगर भागातील २०० गरीब कुटुंबांना या योजनेतून गॅसचे वाटप करण्यात आले. याशिवाय किराडपुरा येथील माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्यासह किराडपुरा भागातील मुस्लिम तरुणांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

इब्राहीम पटेल यांनी शनिवारी हिंदू परिवाराच्या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये यासाठी सरंक्षक म्हणून काम केले. दोन्ही परिवारातील पाहुण्या मंडळीसह वधू-वरांनाही आधार देत त्यांचे मंगल कार्य पूर्णत्वास नेले. शहरात दंगल उसळलेली असताना हिंदू बांधवांचे लग्नकार्य सुरळीत पार पडण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आल्याची माहिती युसूफ मुकाती यांनी दिली. यापूर्वी किराडपुरा भागातील युवकांनी रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात येणाऱ्या भाविकासांठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images