Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

खैरे-जलील यांची चौकशी करा

0
0

औरंगाबाद : शहरात हिंदू-मुस्लिम जातीय दंगल नसून राजकीय दंगल झाली आहे. २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक दंगल घडवून आणली गेली. सर्वसामान्यांचे डोके भडकावून कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवून जाळपोळ करण्यात आली. भावनिक करून हिंदू मतदारांची मते घेण्याचे स्वप्न खासदार चंद्रकांत खैरे पाहत आहेत. तर मुस्लिम मतदारांची मते 'एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील यांना हवी आहेत. दोन धर्मात भांडणे लावून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या नेत्यांची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या दोन्ही नेत्यांची मालमत्ता जप्त करून दंगलीत नुकसान झालेल्या गोरगरिबांना अर्थसाह्य करावे असे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शहरातील राजकारण नागरिकांना कळत असल्यामुळे दंगल भडकली नाही, असे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड आणि बाबासाहेब दाभाडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन आयुक्तांची कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महानगरपालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना पहिल्याच दिवशी नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. कचराकोंडी फोडण्यासाठी आयुक्तांनी नियोजन केले होते. मात्र, हर्सूल व चिकलठाणा येथे कचरा टाकण्यास रहिवाशांनी विरोध करीत कचऱ्याची वाहने परत पाठवली. रहिवाशांची समजूत घालण्याचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले.

औरंगाबाद शहरातील कचऱ्याची समस्या राज्यभर चर्चेचा विषय झाली आहे. काही दिवस महापालिका आयुक्त नसल्यामुळे ही समस्या प्रचंड वाढली होती. नुकताच पदभार स्वीकारलेले आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी (१८ मे) कचरा निर्मूलन मोहीम हाती घेतली. प्रत्यक्षात ठिकठिकाणी रहिवाशांचा टोकाचा विरोध झाल्याने आयुक्तांना हात हलवत परतावे लागले. चिकलठाणा येथील रहिवाशांनी तर कचऱ्याच्या वाहनांसह परत पाठवले. हर्सूल गावात विरोध कमी झाल्यानंतर कचरा टाकण्यात आला. दिवसभर उचलेला कचरा कांचनवाडी, पडेगाव परिसरात टाकण्यात येत होता. ओला आणि सुका, असे कचऱ्याचे वर्गीकरण केल्यामुळे शहरातील कचरा समस्येची तीव्रता कमी झाली आहे. काही भागात अजूनही रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे कचराकोंडी दिसत आहे. राज्यभर टीकेची झोड उठल्यामुळे मनपाची यंत्रणा अडचणीत सापडली आहे. आयुक्त नसल्यामुळे कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता. नियमित आयुक्त म्हणून डॉ. निपूण विनायक रुजू झाले आहेत. आयुक्त विनायक यांच्या आदेशानुसार शुक्रवारी कचरा उचलण्यास सुरुवात झाली. सकाळी चिकलठाण्यात कचऱ्याने भरलेली १५ वाहने रिकामी करण्यात आली. कचरा टाकण्यास रहिवाशांनी टोकाचा विरोध केला. या विरोधामुळे कचरा टाकणे बंद करण्यात आले. अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतरही रहिवाशांचा विरोध कमी झाला नाही. आयुक्त विनायक यांनी स्वत: समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुविधा दिल्याशिवाय काम करू देणार नाही, असे रहिवाशांनी सांगितले. त्यानुसार कचरा टाकण्याचे काम बंद करण्यात आले. नागरिकांच्या सूचनेप्रमाणे काम करून कचरा टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मजबुतीकरण करून पूर्ण प्रकल्पाला झाकून घ्या. आसपासच्या विहिरीत कचऱ्याचे मिसळलेले पाणी येणार नाही याची दक्षता घ्या. नियोजन करूनच कचरा टाका, असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.

\Bनागरिकांचा तीव्र विरोध\B

महापालिकेच्या पथकाला कचरा टाकताना चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथे विरोध करण्यात आला. हा विरोध दुपारी कमी झाल्यानंतर कचरा टाकण्याचे काम सुरू झाले. फक्त चिकलठाणा येथे कचरा टाकण्यात आला नाही. संनियंत्रण समितीमार्फत दिवसभरात हर्सूल येथे ७२ टन, चिकलठाणा येथे ४० टन, पडेगाव येथे २०० टन आणि कांचनवाडी येथे ४८ टन कचरा टाकण्यात आला. तसेच वॉर्ड क्रमांक सात व आठ येथून साचलेला संपूर्ण कचरा उचलण्यात आला.

\Bमहापौरांची लगबग\B

कचराकोंडी कमी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांची लगबग कायम आहे. पक्षादेश आणि लोकांचा रोष अशा कात्रीत महापौर सापडले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कचरा उचलून घेण्यासाठी त्यांनी नियोजन केले होते. मागील पंधरा दिवस काम थांबवले होते. मात्र, नवीन आयुक्त आल्यानंतर महापौरांनी पुन्हा काम सुरू केले. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता त्यांनी कर्मचाऱ्यांकडून कचरा भरून घेतला. औरंगपुरा, पैठणगेट, गुलमंडी, किलेअर्क या भागात स्वच्छता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी

0
0

- भव्य त्रिदिन कीर्तन महोत्सव

- स्थळ : गजानननगर मळा, गारखेडा

- वेळ : पहाटे चार ते रात्री दहा पर्यंत

----

- धम्मपद निवासी शिबिर

- स्थळ : कांबळे पाटील हॉस्टेल, कांचनवाडी

- वेळ : सकाळी सहा वाजता

----

- भव्य श्री. विष्णू याग सोहळा

- स्थळ : सप्तपदी मंगल कार्यालय, एस सात, सिडको

- वेळ : सकाळी साडेसात वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस शेगडी चोरणाऱ्यास कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजाबाजार येथे दंगल झाल्यामुळे दंगलखोरांनी दुकानांची जाळपोळ आणि लुटालूट केली असून गॅस शेगडी चोरणाऱ्या २८ वर्षीय उमेश लोखंडे यास अटक केली. त्याला शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

रोषणगेट येथे राहणाऱ्या अलिबीन अब्दुल चाऊस यांचे राजाबाजार परिसरात गॅस शेगडी विक्री आणि दुरुस्तीचे दुकान आहे. मुस्लीम दंगलखोरांनी दुकानाची तोडफोड केल्यामुळे दंगलीत आलेल्या दंगलखोरांनी साहित्य चोरून नेल्याची तक्रार चाऊस ने सिटीचौक पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून गॅस शेगडी चोरी करणाऱ्या उमेश लोखंडे यास अटक केली असून त्याच्या ताब्यात चोरीची शेगडी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. लोखंडेला शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्या समोर हजर केले असता सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी लोखंडेने शेगडी चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्या साथीदारांची नावे त्याच्याकडून जाणून घ्यावयाची आहेत. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी विनंती केली असता न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्य समाजतर्फे मदत

0
0

औरंगाबाद: शहरातील दंगलीत नुकसान झालेल्या एका कुटुंबाला आर्य समाजातर्फे मदत करण्यात आली. दंगलीत शहागंज भागात या कुटुंबाताली एकाचा आगीत मृत्यू झाला. या कुटुंबाला रोख दहा हजार रुपये आणि संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. यावेळी जुगलकिशोर दायमा, सविता जोशी, दयाराम बसैये, अॅड. जोगेंद्रसिंह चौहान, ओमप्रकाश बसैये आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पेट’ डिसेंबर महिन्यात ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रखडलेले 'आरआरसी' अर्थात संशोधन अधिमान्यता समित्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा विषयांच्या मुलाखती चार जून ते १० जुलै आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा विषयांच्या मुलाखती एक ते सात जून या कालावधीत होणार आहेत. रखडलेल्या 'पेट' प्रक्रियेवर उपाय काढण्यासाठी यावर्षी डिसेंबर महिन्यात 'पेट' परीक्षा घेण्याचे नियोजन प्रशासन करणार आहे.

पीएच. डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी संशोधन अधिमान्यता समित्यांचे (आरआरसी) वेळापत्रक जाहीर झाले आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या १९ विषयांमध्ये ९८४ पीएच. डी. जागा रिक्त आहेत. या जागांसाठी एकूण १२०० उमेदवार मुलाखती देणार आहेत. भौतिकशास्त्र विषयात ४४ मार्गदर्शक (गाइड) असून १४५ जागा रिक्त आहेत. बायोफिजीक्ससाठी एक गाइड असून पाच जागा आहेत. संख्याशास्त्र विषयात तीन गाइड आणि ११ जागा आहेत. मायक्रोबॉयलॉजी विषयात १३ गाइड आणि १६ जागा रिक्त आहेत. रसायनशास्त्र विषयात सर्वाधिक ५१ गाइड असून ११२ जागा आहेत. यात ६२ जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या ५० जागा आरक्षित प्रवर्गाच्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील १९ विषयांसाठी ३३१ गाइड आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील ४९८ विद्यार्थी आणि आरक्षित प्रवर्गातील ४८६ विद्यार्थी आहेत. एकूण जागांसाठी एक हजार १९० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले आहे. चार जून ते १० जुलैपर्यंत 'आरआरसी' सुरू राहणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील पाच विषयासाठी एक जूनपासून 'आरआरसी' आहे. व्यवस्थापनशास्त्राच्या मुलाखती एक ते चार जून आणि वाणिज्यच्या पाच ते सात जून रोजी आहे. एकूण ११७ रिक्त जागांसाठी ३०४ विद्यार्थ्यांचे मुलाखतीसाठी यादीत नाव आहे. बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, टुरिझम अॅडमिनिस्ट्रेशन, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट आणि वाणिज्य या विषयांचा त्यात समावेश आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या 'पेट' परीक्षेचे नियोजन असून विस्कळीत आहे. आरआरसी वेळापत्रकासाठी तब्बल दहा महिने कालावधी लागला. प्राध्यापकांनी असहकार पुकारल्यामुळे छाननी प्रक्रियेला सर्वाधिक कालावधी लागला. प्र-कुलगुरुंनी आदेश दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली होती. आता सामाजिकशास्त्रे आणि आंतरविद्याशाखेचे 'आरआरसी' वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असे प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले.

\Bडिसेंबर महिन्यात होईल 'पेट'\B

इतर विद्यापीठात वर्षातून दोन वेळेस 'पेट' परीक्षा होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'पेट' परीक्षा निश्चित वेळेत होत नाही. परीक्षा झाल्यानंतर गोंधळ होतो. हा विस्कळीतपणा दूर करुन नियमित 'पेट' परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात 'पेट' घेण्याचे नियोजन आहे. यावर्षीच्या 'पेट' परीक्षेसाठी याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. गुणवत्तेची पातळी राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक फेरोज खानची हर्सूल कारागृहात रवानगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमआयएम'चा नगरसेवक व विरोधी पक्षनेता फेरोज मोईनोद्दीन खान याची शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी त्याची चौदा दिवसांसाठी हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

फेरोजखान (रा. बनेमिया दर्गामागे, निजामोद्दीन रोड, बक्कलगुडा) याला मंगळवारी सायंकाळी आमदार इम्तियाज जलील यांनी सिटीचौक पोलिस ठाण्यात हजर केले होते. त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर केले. तपास अधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांना माहिती दिली नाही. न्यायालयासमोर तपास अधिकाऱ्यांनी युक्तीवाद केला. तपास पूर्ण झाला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयने ही विनंती मान्य करून फेरोजखान याची चौदा दिवसासाठी हर्सूल कारागृहात रवानगी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारची जाळपोळ करणाऱ्या सहा जणांना कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजाबाजार परिसरातील चंदन बिअरबार पेटवून देणाऱ्या सहा दंगेखोरांना शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळेयांनी २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सिटीचौक पोलिसांनी या आरोपींना अटक करीत कोर्टासमोर हजर केले. अन्य एका आरोपीला देखील डॉ. भारतीया यांच्या कारची तोडफोड केल्याप्रकरणी २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

राजाबाजार परिसरामध्ये दीपक जैस्वाल यांचे चंदन बिअरबार व परमीट रूम हॉटेल आहे. शुक्रवारी झालेल्या दंगलीत दंगेखोरांनी हॉटेलमध्ये शिरून तोडफोड करीत दारूचे बॉक्स पळवले होते. यानंतर हॉटेल पेटवून देण्यात आले होते. खालचे हॉटेल पेटल्याने वरच्या मजल्यावर असलेले घर देखील जळाले. यामध्ये ७५ लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात दंगेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडेबहाळे यांच्यासमोर हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी या सहा जणांकडून अन्य साथीदारांची नावे जाणून घ्यावयाची असल्यामुळे कोठडी देण्यात यावी अशी विनंती केल्यामुळे न्यायालयाने २१ मे, सोमवार पर्यंत कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणात वकील मॅनेज होतात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेची कोट्यवधींची मालमत्ता भूमाफियांच्या घशात जात आहे. प्रशासनाला हे दिसूनही काहीच कार्यवाही होत नाही. याप्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या केसेस आपण हरत आहोत. पॅनेलसाठी वकील मॅनेज होत असल्याचा खळबळजनक आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी केला. जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत याबाबत वादळी चर्चा झाली. आपल्या मालमत्ता वाचविण्यासाठी प्रशासन काय करणार ? असा सवाल सर्वच सदस्यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी झाली. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, उपाध्यक्ष केशवराव तायडे, सभापती विलास भुमरे, धनराज बेडवाल, मीनाताई शेळके, सीईओ पवनीत कौर, अतिरिक्त सीईओ अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव, सदस्य किशोर बलांडे, मधुकर वालतुरे, किशोर पवार, रमेश गायकवाड आदींची उपस्थिती होती. किशोर बलांडे यांनी जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा प्रश्न उपस्थित केला. शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे. अनेक ठिकाणी भूमाफियांनी कब्जा केला आहे. याबाबत कोर्टात खटले सुरू आहेत. पण आपल्या पॅनेलवरील एकाही वकिलाने केस जिंकलेली नाही. हे वकील मॅनेज होतात, असा आरोप तायडे यांनी केला. तायडे यांनी याविषयावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, की शहरात दिल्ली गेट येथील पेट्रोल पंपाची जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. काही दिवसांपूर्वी मी या जागेची फाइल मागिवली होती. मात्र फाइल गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. यात दोषी अधिकारी व कर्मचारीवर कोणतीही कारवाई का झाली नाही ? असा सवाल तायडे यांनी उपस्थित केला. याची चौकशी करून दोषींना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली. पॅनेलवरील सर्व वकील बदलावेत, असा ठराव बैठकीत मांडण्यात आला. यासंदर्भात महिनाभरात निर्णय घेऊ असे शिरसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी नाही

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेच्या वतीने दंगलीच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या हिंदू शक्ती मोर्चाला परवानगी दिलेली नसल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यानंतरही मोर्चा काढण्यात आला तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

११ मे रोजी रात्री नवाबपुरा, राजाबाजार परिसरात दोन गटात दंगल उसळली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली होती. सात तास ही दगडफेक सुरू होती. यामध्ये अनेक वाहने, घरे व दुकानाचे नुकसान झाले होते. या दंगलीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शनिवारी हिंदू शक्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजेपासून पैठणगेट येथून हा मोर्चा निघणार असून विभागीय आयुक्त कार्यालयावर जाणार आहे. पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी हा मोर्चा काढण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. दरम्यान, या मोर्चाला परवानगी दिली नसल्याचे प्रभारी पोलिस आयुक्त भारंबे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मोर्चा काढून शांततेचा भंग केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. या मोर्चा संदर्भात दुसऱ्या गटाला देखील कोणतेही प्रत्यूतर देऊ नये अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती आयुक्त भारंबे यांनी दिली. संभाव्य मोर्चाच्या दृष्टीने जय्यत बंदोबस्त नेमण्यात आला असल्याचेही भारंबे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाबाजार, नवाबपुरा जनजीवन पूर्वपदावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजाबाजार, नवाबपुरा येथील दंगलीला शुक्रवारी आठवडा उलटला असून येथील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. या भागातील दुकाने उघडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, दंगलीच्या भीतीपोटी ग्राहक भागात येत नसल्याने दुकानदारांची प्रतीक्षा कायम आहे.

नवाबपुरा, राजाबाजार भागात शुक्रवारी रात्री दोन गटात दंगल उसळली होती. यामध्ये दुकाने, घरे, वाहनांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत प्रचंड नुकसान झाले. यामध्ये जेष्ठ नागरिकासह गोळी लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेला आठ दिवस उलटले आहेत. या घटनेनंतर या भागातील नागरिकांत प्रचंड दहशत पसरली होती. गेल्या आठ दिवसांपासून या भागातील दुकाने बंद होती. रस्त्यावर केवळ स्थानिक नागरिक व पोलिसांचा वावर दिसून येत होता. ज्या दुकानाचे घराचे नुकसान झाले त्याचे अवशेष अद्यापही रस्त्यावर पडून आहेत. आठ दिवसानंतर या भागातील बाजारपेठेतील दुकाने नागरिकांनी उघडली होती. गेल्या शुक्रवारी घडलेल्या घटनेपासून या परिसरात ग्राहकवर्ग फिरकला देखील नाही. हॉटेल, पानटपऱ्यावर तुरळक प्रमाणावर गर्दी दिसून येत होती. या दंगलीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून आठ दिवस झाले तरी बोहणी देखील होत नसल्याच्या प्रतिक्रीया व्यापाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर दिल्या.

\Bपोलिसांच्या भीतीने भूमिगत

\Bदंगेखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मोबाइल क्लिप, फोटोचा वापर करीत ओळख पटवणे सुरू केले आहे. दररोज विशेष तपास पथकाचे अधिकारी, सिटीचौक पोलिस ठाण्याचे अधिकारी या परिसरात येऊन फोटो दाखवून ओळख पटवत आहेत. दंगलीच्या काळात अनेक नागरिक कुटुंबाच्या सरंक्षणासाठी घराबाहेर येऊन थांबले होते. प्रत्यक्ष दंगलीत सहभाग नसताना देखील पोलिसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून अनेक नागरिक या परिसरातून भूमिगत झाले असल्याची सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षक हाश्मी संशयाच्या भोवऱ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगल प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फहीम हाश्मी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हाश्मीबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेची चौकशी होणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

नवाबपुरा चौकात दोन गटात दंगल उसळली होती. यामध्ये एक गट हा जिन्सी पोलिस ठाण्याकडून येत असलेल्या मार्गावर होता, तर दुसरा गट राजाबाजार भागात होता. जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक फहीम हाश्मी तसेच पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातच बसून होते. रस्त्यावर येणारा जमाव त्यांनी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला नाही. तसेच नवाबपुरा चौकातील जमाव आटोक्यात आणण्याऐवजी ते चंपा चौक भागातच गस्त घालण्यावर भर देत होते, असाही आरोपी करण्यात येत आहे. जिन्सी पोलिसांनी जर जमावाला वेळीच रोखले असते, तर संभाव्य घटना टळली असती अशीही चर्चा आहे. या संदर्भात पोलिस आयुक्तांकडे देखील काही जणांनी तक्रार केली आहे. पोलिस आयुक्त भारंबे यांनी या तक्रारीची दखल घेतली असून हाश्मी यांची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभागृहाचे आज भूमीपूजन

0
0

औरंगाबाद: विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते शनिवारी फुलंब्री तालुक्यातील नरला येथील सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र कृषीसेवा पूर्व परीक्षा रविवारी

0
0

औरंगाबाद: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जिल्ह्यातील १७ उपकेंद्रावर महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा रविवारी सकाळी साडेदहा ते बारा या वेळेत घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

या परीक्षेसाठी पाच हजार ६१६ उमेदवारांना प्रवेशपत्रे पाठविली असून परीक्षेच्या कामासाठी ६६६ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराने आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ओळखपत्र व त्यांची छायांकित प्रत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षात सकाळी अकरानंतर प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत याशिवाय कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात नेता येणार नाही. डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाइल, ब्ल्युटूथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही उपकरण कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्तमनाई आहे. हे साहित्य केंद्राच्या आवारात आणल्यास फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह, आगामी परीक्षांकरीता बंदी घालण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानझडेंच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका सेवेतून निलंबित असताना हायकोर्टात शहर अभियंत्यांच्या नावे शपथपत्र दाखल केल्याबद्दल सखाराम पानझडे यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठेवला आहे.

महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना निलंबित केले होते. निलंबित असताना पानझडे यांनी हायकोर्टातील जनहित याचिकेमध्ये आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर शपथपत्र दाखल केले. हे शपथपत्र शहर अभियंता म्हणून दाखल करण्यात आले. पानझडे यांच्याकडून शपथपत्र दाखल करणाऱ्या विधिज्ञास महापालिकेच्या विधी विभागाकडून प्राधिकृत करण्यात आले नव्हते, असे पालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या याचिकेत पानझडे नावानिशी प्रतिवादी नाहीत. त्यामुळे ते जोपर्यंत प्रतिवादी होत नाहीत अथवा त्यांना नावानिशी प्रतिवादी करण्यात येत नाही, तो पर्यंत त्यांना शपथपत्र शहर अभियंता पदाच्या कर्तव्याशी निगडीत असल्यामुळे दाखल करता येत नाही. यावरून त्यांनी निलंबित असताना व आयुक्तांची परवानगी न घेता शपथपत्र दाखल करून कार्यालयीन शिस्तीचा भंग केला आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पानझडे यांची विभागीय चौकशी करण्याची परवानगी प्रशासनाने प्रस्तावाच्या माध्यमातून सर्वसाधारण सभेकडे मागितली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतुल पाटील यांचे निधन

0
0

औरंगाबाद : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक व औरंगाबाद पेंट डीलर्स संघटनेचे माजी अध्यक्ष अतुल पुरुषोत्तम पाटील (वय ५५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा समर्थनगर येथील निवासस्थानापासून रविवारी (२० मे) सकाळी नऊ वाजता निघणार आहे. पुष्पनगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - डॉ. अभय महाजन, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ

कदम हल्ला प्रकरणी एकास कोठडी

0
0

औरंगाबाद : शहरात दोन गटात झालेल्या हिंसक घटनेत जखमी झालेले पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर हल्ला करणाऱ्या इम्रान अहमद शकील (रा. जुना बाजार) यास शुक्रवारी अटक करून त्यास शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शहरात ११ मे रोजी मोती कारंजा, शहागंज, चंपाचौक, लोटाकारंजा, गांधीनगर भागात दोन गटात हिंसक झडप झाली होती. यावेळी आरोपी दगडफेक करीत होता. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी कोठडीची मागणी केली. प्रकरणाची फिर्याद घटनेत जखमी झालेले पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी दिलेली आहे.

जळीतप्रकरणी एकास कोठडी

औरंगाबाद : शहरात दोन गटात झालेल्या हिंसक कारवाईत घर जाळण्यात आले होते. या प्रकरणात शेख इरफान शेख इब्राहिम यांस शुक्रवारी (१८ मे) अटक करून शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी आरोपीस चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मृताच्या मुलाने फिर्याद दिली होती. आरोपीवर भादंवि ३०२, ४३६, १४३, १४७, १४९, १०९, ११४, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेगडी चोरणाऱ्यांना कोठडी

0
0

औरंगाबाद : शहरात ११ मे रोजी झालेल्या हिंसक घटनेत शेगडी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडून न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एस. खांडबहाळे यांनी दोघांना सोमवार (२१ मे) पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आहे. सदर प्रकरणी अलबिन अब्दुल चाऊस यांनी फिर्याद दिली होती. मूळ आरोपी उमेश अंबादास लोखंडे यास न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली. विनोद बागुल (रा. रंगारगल्ली) आणि अजय भास्कर नाडे (रा. रंगारगल्ली) यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता सहाय्यक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी कोठडीची मागणी केली. ती कोर्टाने मान्य केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी

0
0

धम्मपद निवासी शिबिर

स्थळ : कांबळे पाटील हॉस्टेल

वेळ : सकाळी सहा वाजता

श्री. विष्णू याग सोहळा

स्थळ : सप्तपदी मंगल कार्यालय, एन ७, सिडको

वेळ : सकाळी ९ वाजता

सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

स्थळ : सावंगी बायपास चौफुली

वेळ : सायंकाळी सात वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images