Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाढदिवस - प्रदीप राठोड, प्रदेश उपाध्यक्ष झेडपी कर्मचारी युनियन

$
0
0

वाढदिवस - प्रदीप राठोड, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विश्व हिंदू परिषदेतर्फे शिवणयंत्राची मदत

$
0
0

विश्व हिंदू परिषदेतर्फे

शिवणयंत्राची मदत

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात झालेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शिवणयंत्र, फॉल पिको मशीन देण्यात आल्या.

गेल्या शुक्रवारी शहरात झालेल्या दंगलीत अनेकांचा नुकसान झाले. दुकाने, वाहने जाळली गेली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने मदत करण्यात आली. या कुटुंबियांच्या उपजिविकेचे साधन असलेल्या शिवणयंत्र, फॉल पिको मशीनची मदत करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष अप्पा बारगजे, राजीव जहागिरदार, शैलेश पत्की, राजेश गुजराती, महेश पाटील, बजरंग दलाचे विवेक बाप्ते, रवी मिसाळ, अण्णा खंडागळे, रमेश ताकवाले आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच अभियंत्यावर ६० हजार वीज ग्राहकांचा भार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा, छावणी, नक्षत्रवाडीसह इतर भागातील सुमारे साठ हजार वीज ग्राहकांचा भार महावितरणच्या एकाच अभियंत्यावर टाकण्यात आला आहे. एकच अभियंता असल्याने नवीन वीज मिटर बसविण्यापासून देखभाल-दुरुस्तीची कामे संथगतिने सुरू आहेत. याचा फटका या भागातील वीज ग्राहकांना सोसावा लागत आहे.

शहरातील सातारा-देवळाई परिसर हा विकसित भाग असून तो महावितरणच्या छावणी उपविभागात समाविष्ट आहे. छावणी उपविभागात सातारा परिसर, नक्षत्रवाडी, रेल्वे स्टेशनचा काही भाग, राहुलनगर, पन्नालालनगर, छावणी नागरी वसाहत आणि छावणी सैन्य दलाचा भाग येतो. या भागात गेल्यावर्षी सर्वाधिक वीजचोरी पकडण्यात आली. याशिवाय या भागात वीजबिल वसुलीला सतत प्राधान्य द्यावे लागते.

छावणी उपविभागाचा विस्तार मोठा असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा भार आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी पदे रिक्त असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत छावणी उपविभागाचा कारभार हाकला जात आहे. परिणामी, वीज ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मार्चनंतर रिक्त जागांवर अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्या नसल्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच सोसावा लागत आहे.

\Bग्राहकांच्या तक्रारी पडून

\B

सध्या महावितरणमार्फत मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीचा कामे केली जात आहेत. ही कामे एजन्सीमार्फत केली जात असली तरी ती व्यवस्थितपणे करून घेण्याची जबाबदारी अभियंत्यांची असते. याशिवाय वीज वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह इतर कामेही एकाच अभियंत्याला करावी लागत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना बिलाच्या व इतर तक्ररी सोडवून घेण्यासाठी अधिकाऱ्याचा शोध घ्यावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार मोटार वाहन निरीक्षक मुंबईला

$
0
0

औरंगाबाद: राज्य परिवहन विभागाने नुकत्याच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदी पदोन्नती दिली आहे. या पदोन्नतीमध्ये अकरा निरिक्षकांच्या बदल्या औरंगाबाद येथे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनुष्यबळ वाढणार, असे वाटत असताना चार मोटार वाहन निरीक्षकांची मुंबईला प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने राज्यातील ६७ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना पदोन्नत दिली आहे. हे आदेश ८ मे रोजी जारी करण्यात आले. त्यानुसार, येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात अकरा मोटार वाहन निरीक्षकांना बदली करून पाठविण्यात आले. यामुळे ताण हलका होईल, असे वाटत असताना वैष्णवी दिघावकर, अनामिका बाविस्कर, शिवाली सोमवंशी आणि नाजनीन बागवान या चार मोटार वाहन निरीक्षकांना तात्पुरती पदस्थापना म्हणून मुंबई कार्यालयात बोलावून घेण्यात आले. मुंबई कार्यालयात मोटार वाहन निरिक्षकांचा तुटवडा असल्याने त्यांना पुढील आदेशापर्यंत तेथेच काम करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यकृतदानाचे प्रमाण अत्यल्प

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

यकृत खराब होण्याला दारू पिणे हे कारण असले तरी याशिवाय तीनशे विविध कारणांमुळे यकृत खराब होतो. विषेश म्हणजे यकृत ८० टक्के खराब झाल्यानंतर लक्षणे दिसतात. वेळीच उपचार केला, तर रुग्‍णाला वाचवणे शक्य आहे. यासाठी यकृत प्रत्यारोपणाचाही पर्याय आहे, मात्र यासाठी अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची चिंता तज्‍ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली.

फिजिशिएन असोसिएशन ऑफ औरंगाबाद आणि कमलनयन बजाज रुग्‍णालयातर्फे रविवारी 'यकृताचे आजार, निदान आणि उपचारपद्धती' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबई येथील डॉ. समीर शहा, डॉ. आकाश शुक्ला, डॉ. अनुराग श्रीमाल, डॉ. सचिन पळणीटकर, डॉ. वैशाली सोलाओ, डॉ. वैभव गंजेवार, डॉ. प्रथमेश जोशी आदींची उपस्थिती होती.

परिसंवादाकरिता मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील सुमारे दीडशे फिजिशिएन उपस्थित होते. परिसंवादानंतर या तज्‍ज्ञांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परिसंवादामध्ये केलेल्या विविध विषयांच्या मांडणीची माहिती दिली.

यावेळी डॉ. शहा म्हणाले की, कावीळच्या विषाणूंमुळे यकृत खराब होऊ शकते. यकृतास सूज आली तर त्याचे कारण शोधले पाहिजे. मद्यपान टाळणे, मधुमेह, रक्तदाब कमी करणे हे यकृत सुदृढ राहण्यासाठी आवश्यक आहे. हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, अनुवंशिक आजार आदी अनेक कारणांनी यकृत खराब होत असल्याचे सांगण्यात आले. 'वेळीच निदान आणि उपचाराने यकृत चांगले राहू शकते. अन्यथा यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो,' असे डॉ. आकाश शुक्ला यांनी सांगितले.

\Bयकृत प्रत्यारोपण शक्य \B

आता मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे यकृत प्रत्यारोपण शक्य आहे. वर्षाला जवळपास साडेतीनशे प्रत्यारोपण केले जातात. वर्षाला सातशेपेक्षा अधिक लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते. मात्र आजही ५० टक्के रुग्ण प्रतीक्षा यादीत आहेत, असे डॉ. आकाश शुक्ला यांनी सांगितले. यकृत दान करताना यकृताचा काही भाग दिला जातो. दात्याचे यकृत काही दिवसांनंतर पूर्वीप्रमाणे होते. तर गरजूला जीवदान मिळते, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगल प्रकरणातील एक संशयित आरोपी शरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राजाबाजार नवाबपुरा भागातील दंगल प्रकरणातील संशयित आरोपी उमेश खुनीवाले हा रविवारी विशेष पथकासमोर शरण आला. खुनीवाले यांना हातगाडीवाल्यांकडून झालेली मारहाण हे देखील दंगलीचे एक प्रमुख कारण आहे. आतापर्यंत विशेष पथकाने दंगलीच्या गुन्ह्यात दोन्ही गटाचे मिळून ५६ आरोपींना अटक केली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी शहागंज भागात आंबे खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी गेलेल्या उमेश खुनीवाले यांच्यावर हातगाडीवाल्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत आले होते. मात्र, यामध्ये दोन्ही गटांनी तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान ११ मे रोजी रात्री नवाबपुरा भागात दोन गटात दंगल उसळली होती. या दंगलीतील संशयित आरोपींना ओळख पटवून अटक करण्याचे काम सध्या विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या दंगेखोरामध्ये उमेश खुनीवाले याचा देखील संशयित म्हणून समावेश होता. पोलिसांच्या वतीने उमेशचा शोध सुरू होता. रविवारी उमेश खुनीवाले हा स्वत: सिटीचौक पोलिस ठाण्यात विशेष पथकासमोर हजर झाला. यानंतर त्याला अटक करण्यात आली.

५६ दंगेखोर गजाआड

दंगलीच्या घटनेला दहा दिवस उलटले आहेत. या दंगलीनंतर पोलिस आयुक्तांनी तपासासाठी विशेष पथक नेमले आहे. या पथकाकडून मोबाइल क्लीप, शुटिंग, फोटोवरून दंगेखोरांची ओळख पटवून अटक करणे सुरू आहे. या दंगल प्रकरणात नगरसेवक राजेंद्र जंजाळ, लच्छू पहेलवान, एमआयएमचा नगरसेवक फेरोजखान यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या पथकाने ५६ आरोपींना रविवारपर्यंत अटक केली आहे. आणखी १५० दंगेखोरांची ओळख पटली असून त्यांचा शोध घेत त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पथकाच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत परवान्यासाठी मार्गदर्शन मेळावा

$
0
0

औरंगाबाद : राज्याच्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाकडून विद्युत पर्यवेक्षक प्रमाणपत्र व परवाने, विद्युत कंत्राटदारांना परवान्यांबाबत मार्गदर्शन मेळाव्यात शहरात आयोजन करण्यात आले आहे.

विद्युत निरिक्षक कार्यालय व महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनी यांच्यातर्फए २५ मे रोजी सकाळी ११ वाजता मार्गदर्शन मेळावा हर्सूल, ट्रेनिंग सेंटर महावितरण कंपनी येथे होणार आहे. मेळाव्यामध्ये विद्युत पर्यवेक्षक परवाना धारकांसाठी विद्युत कंत्रटादार अनुज्ञाप्ती प्राप्त करण्याबाबत; तसेच विद्युत आभियांत्रिकीमधील पदवी, पदविका व आयटीआय वायरमन, इलेक्ट्रिशियन पात्रता असणाऱ्या आणि एक वर्ष अनुभव घेतलेल्यांना तारतंत्री, विद्युत पर्यवेक्षक प्रमाणपत्र, परवाना मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

…………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९० टक्के कचरा उचलला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा ९० टक्के उचलण्यात महापालिकेने उचलल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी केला. रविवारी २५० टन कचरा उचलण्यात आला, तर चिकलठाण्यात आज कचरा टाकण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. १६ फेब्रुवारीपासूनचा हा प्रश्न सोडविण्यात अद्याप पालिकेला यश आलेले नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संनियंत्रण समितीने सात ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यापैकी चिकलठाणा येथील जागेवर कचरा पाठविण्यात आला. परंतु, तेथील नागरिकांनी विरोध केल्यामुळे कचरा न टाकताच माघारी फिरावे लागले होते. त्यात नागरिकांना सांगितल्यानंतर रविवारी कचरा टाकण्यात आला. रविवारी महापौरांनी कचरा प्रक्रियेसाठी सनियंत्रण समितीने निवडलेल्या चार जागांना भेट दिली. पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे पाहणी केली. शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा उचलण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शहरातील जमा झालेल्या कचऱ्यापैकी ९० टक्के कचरा उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

\Bवर्गीकरण केलेलाच कचरा जाणार

\B

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सात ठिकाणे निश्चित केली आहेत. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी कचरा वर्गीकरण करून तेथे जाणे अपेक्षित आहे. परंतु, शहरातून अद्यापही ३० ते ४० टक्के वर्गीकरण न केलेला कचरा जातो. त्यामुळे कचरा प्रक्रियेतही अडथळे येत असल्याचे समोर आले आहे. पूर्णपणे वर्गीकरण केलेला कचराच त्याच ठिकाणी जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात येत आहे. त्यासाठी पालिका स्वत:च्या पातळीवर वर्गीकरण करण्याची प्रक्रिया करण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो कचरा प्रक्रिया केला जाणार आहे, तेथे नेण्यात येईल.

शहरात आता रस्त्यावर कचरा नाही. गल्ली बोळात असेल, परंतु, मुख्य रस्त्यावर नाही. त्यासह प्रक्रिया जेथे करण्यात येणार आहे तेथेही वर्गीकरण केलेला कचराच नेण्यात येईल.

-नंदकुमार घोडेले, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवती भवती - आम्ही इंथ राहायला आलो व्हायं?

$
0
0

रेल्वे स्टेशन येथे स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी खासगी कंपनीचे कर्मचारी आले. त्यांनी रेल्वे स्टेशनची पाहणी केली. स्वच्छता गृह, वेटिंग रूम पाहिल्यानंतर एक जण रेल्वे अधिकाऱ्यांपासून दूर गेला. त्यांनी एका प्रवाशांला गाठलं. त्यांनी विचारलं,'बाबा कुठे चालले आहात?' प्रवाशाने सेलूला जात असल्याचे सांगितले. तपासणी अधिकाऱ्यांनी आणखी खोदून विचारले,'बाबा तुमच्यासोबत कोण आहे? माझी बहिण अन् आमचं बिऱ्हाड सोबत आहे.' त्यानंतर पुन्हा तपासणी अधिकाऱ्यांने विचारले, 'बाबा रेल्वे स्टेशनची स्वच्छता कशी वाटली तुम्हाला?' हे विचारताच बाबाचा पारा चढला. 'अहो रेल्वे वेळेवर चालत नाही. आम्ही तिनदा जाऊन रेल्वेबद्दल विचारले. त्यांनी रेल्वे उशिरा येईल, असं सांगितलं. अहो आधी रेल्वे वेळेवर चालवा. आम्ही काय इंथ राहायला आलो व्हाय.' बाबांचे हे उत्तर ऐकताच तो तपासणी अधिकारी सरळ रेल्वे अधिकाऱ्यांच्या सोबत वेटिंग रूममधून निघून गेला.

- अब्दुल वाजेद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - शांतीलाल मोहन जाधव

$
0
0

निधन वार्ता

शांतीलाल मोहन जाधव

औरंगाबाद : एसटी कॉलनी फाजलपुरा येथील रहिवासी महापालिकेचे कर्मचारी शांतीलाल मोहन जाधव (वय ४८) यांचे दीर्घ आजाराने २० मे निधन झाले. त्यांच्यावर शहाबाजार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक रुग्णांची संख्या वाढतेय

$
0
0

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वैष्णव

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगभरात 'ड्रिपेशन' हा दुसऱ्या क्रमांकाचा आजार आहे. मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, देशात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यासह 'मानसिक आरोग्य सेवा कायदा' हा डॉक्टर व रुग्णांमधील संवाद कमी करणारा आहे, असे प्रतिपादन मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष डॉ मुर्गेश वैष्णव यांनी आज केले.

औरंगाबाद मानसोपचार संघटनेतर्फे 'न्यायवैद्यकीय शैक्षणिक चर्चासत्रा'चे आयोजन करण्यात आले. मानसोपचार तज्ज्ञांना नवीन मानसिक आरोग्य सेवा कायदा-२०१७ व संबंधित इतर न्याय वैद्यकीयबाबी बद्दल माहिती व्हावी या हेतुने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ताज हॉटेलमधील सभागृहात झालेल्या या कार्यशाळेच्या व्यासपीठावर डॉ. मुर्गेश वैष्णव, औरंगाबाद सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजीव सावजी, डॉ. अमर राठी, डॉ. एन. डी. कुलकर्णी, डॉ. गजानन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. वैष्णव म्हणाले, 'मानसिक आरोग्य सेवा कायदा-२०१७' कायदा हा इंग्लडमधील कायद्याप्रमाणे आहे. कायदा करताना भारतीय परिस्थितीचा विचार करण्यात आला नाही. यामुळे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि रुग्णांमध्ये होणारा संवाद कमी होईल. यात सुधारणा करण्याची आमची मागणी आहे. जगभरात रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या कमी आहे. देशभरात सुमारे साडेपाच हजारच डॉक्टर आहेत तर, पंधरा कोटी रुग्ण असे चित्र आहे. कायद्यातील त्रुटीमुळे निर्भयपणे उपचार करताना काहिशा अडचणी येतील. त्यामुळे आम्ही आमच्या पातळीवर सल्लागार मंडळ तयार करणार आहे. यावेळी डॉ. सावजी यांनी आयोजनामागची भूमिका विषद केली. कार्यशाळेत देशभरातून जमलेल्या सुमारे १०० मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेरूळ अजिंठ्याच्या बसचा प्रवास पुन्हा पुण्याला

$
0
0

औरंगाबाद :

शहरात आलेल्या पर्यटकांना वातानुकूलित बसमधून प्रवास करता यावा यासाठी दोन वातानुकुलित बस एसटी महामंडळाला देण्यात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात या बसचा प्रवास औरंगाबाद ते अजिंठा आणि औरंगाबाद ते वेरूळ या मार्गावर चालू ठेवण्याऐवजी या बस पुणे मार्गावर चालविण्यात येत असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या वेरुळ, अजिंठा या दोन्ही ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा संनियंत्रण समितीच्या माध्यमातून दोन वातानुकुलित पर्यटन बस देण्यात आल्या होत्या. या बसला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या बस अजिंठा आणि वेरूळ लेणीच्या मार्गावर न चालविता पुण्याला पाठविण्यात येत आहेत. औरंगाबादहून पुण्याला जाणारी गर्दी रविवारी वाढली. वातानुकुलित बस कमी पडत असल्याने वेरूळ आणि अजिंठासाठी असलेल्या बस पुण्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. या बस पुण्याकडे पाठविण्यात आल्याने पर्यटकांसाठी ऐनवेळी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे मार्गावर या बस चालविल्या जात असल्याने पर्यटकांना वातानुकुलित सेवा मिळत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत ठेकेदार परवान्यासाठी जालन्यात मार्गदर्शन मेळावा

$
0
0

औरंगाबाद :

विद्युत पदवी व पदवीकाधारक अभियंता, आयटीआय इलेक्ट्रिशियन वायरमनधारक, तारतंत्री यांना विद्युत पर्यवेक्षण परवाना मिळवण्यासाठी मार्गदर्शन मेळावा २२ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत महावितरण लघुप्रशिक्षण केंद्र, ४८८, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जवळ, जालना येथे हा मेळावा होणार आहे. संबंधितांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज उपकरण, डीपीजवळ कचरा जाळू नका

$
0
0

औरंगाबाद :

वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, फिडर पिलर, विजेचे खांब, आर्थिंग किंवा वितरण पेट्यांजवळ आणि भूमीगत वाहिन्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीलाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीज वाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी, डीपी, विजेचे खांब, आर्थिंग, भूमीगत वाहिन्या उघड्यावर आहेत. वीज उपकरण परिसरात कचरा टाकला जातो. हा साठवलेला कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणांमुळे कचरा जळाल्यास भूमीगत केबल व इतर वीज यंत्रणा धोक्यात येते. परिणामी या भागातील वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे या परिसरातील नागरिकांना वीज पुरवठा दुरूस्त करेपर्यंत अंधारात राहावे लागते. तसेच महावितरणचे आर्थिक नुकसानही होते. गतवर्षी एका सार्वजनिक कार्यक्रमात वापरलेल्या पत्रावळीचा कचरा वितरण रोहित्राजवळ पेटविल्याने वीज तारा वितळून स्थानिक बालाजीनगर परिसरातील वीज पुरवठा तब्बल दहा तास खंडित होता. भर उन्हात परिसरातील नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला होता. १२ मार्च रोजी शहरात एका भागात रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला आग लागून वीज पुरवठा करणारी केबल पेटला होती. यामुळे येथील रहिवाशांनाही बराच वेळ विजेविना राहावे लागले होते. वीज यंत्रणेला कचऱ्यांयामुळे आग लागण्याच्या अशा अनेक घटना घडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नये, आपत्कालीन परिस्थितीत किंवा वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळून आल्यास १८००२३३३४३५ किंवा १८००१०२३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेसाठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लातूर-बीड-उस्मानाबाद आणि परभणी-हिंगोली या दोन स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी सोमवारी मतदान होणार आहे. लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात भाजप उमेदवार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष अशोक जगदाळे यांच्यात थेट लढत असून. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेचे विप्लव बजोरिया आणि काँग्रेसचे सुरेश देशमुख समोरासमोर आहेत. मतमोजणी गुरुवारी होणार आहे.

लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघ काँग्रेसकडे होता. आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली. परभणी-हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. तो काँग्रेसच्या वाट्याला आला. लातूरमध्ये भाजप, तर परभणीत शिवसेना नशीब आजमावत आहे.

लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे अपक्ष अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केले. भाजपने सुरेश धस यांना मैदानात उतरविले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई असून या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. परभणी-हिंगोलीमध्ये शिवसेनेने विप्लव बजोरिया यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे सुरेश देशमुख रिंगणात आहेत. सोमवारी या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान आहे.

………

\Bविधान परिषदेचे मतदार

लातूर-बीड-उस्मानाबाद\B

राष्ट्रवादी काँग्रेस : ३३६

काँग्रेस : १९१

भाजप : ३०२

शिवसेना : ९२

एमआयएम : २०

एकूण : १००५

\Bपरभणी-हिंगोली\B

राष्ट्रवादी काँग्रेस : १६५

काँग्रेस : १३५

शिवसेना : ९७

भाजप : ५२

इतर : ५४

एकूण : ५०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मते मोजण्यास परवानगी

$
0
0

औरंगाबाद : लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत दहा नगरसेवकांची मते मोजण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील यांनी परवानगी दिली आहे. दहा नगरसेवकरांच्या मतांचा निवडणुकीवर परिणाम होत असेल निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये. निवडणुकीचा निर्णय याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण कर्मचाऱ्यांचे गोळेगावात श्रमदान

$
0
0

औरंगाबाद :

महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद व महावितरण औरंगाबाद परिमंडल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गोळेगाव ता. खुलताबाद येथे श्रमदान करून पाणी फाउंडेशनच्या लोकचळवळीत सहभाग घेतला.

पाणी हेच जीवन समजून लोकसहभाग आणि लोकचळवळीतून राज्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठया प्रमाणात श्रमदानातून कामे चालू आहेत. गोळेगाव, ता. खुलताबाद येथे आज महावितरण कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून योगदान दिले. श्रमदानात सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी सपत्निक सहभाग घेतला. गोळेगावचे सरपंच संतोष जोशी, प्रभारी महाव्यवस्थापक विवले लक्ष्मीकांत राजेल्ली, अधीक्षक अभियंता उदयपाल गाणार, दिनेश अग्रवाल, संजय अकोडे, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, अभियंते, मानव संसाधन विभाग,माहिती तत्रंज्ञान विभाग, जनसंपर्क विभाग, अधिकारी, तत्रंज्ञ,कर्मचारी, गावकरी मोठया संख्येने श्रमदानात सहभाग नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलग्रस्तांना शिवसेनेतर्फे आर्थिक मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात झालेल्या दंगलीत ज्या दुकान, घरांचे नुकसान झाले, अशा दंगलग्रस्तांना शिवसेनेतर्फे आर्थिक मदत देण्यात आली. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली.

मागील आठवड्यात राजाबाजार, शहागंज परिसरात दोन गटात दगडफेक झाली. यावेळी जाळपोळही झाली. जाळपोळील अनेकांची दुकानांचे नुकसान झाले. या दंगलीमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्यांना शिवसेनेतर्फ रविवारी आर्थिक मदत करण्यात आली. राजाबाजारमधील बालाजी मंदिरात पार पडलेल्या मदत वाटपाच्या कार्यक्रमात महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, सभागृह नेता विकास जैन, प्रफुल्ल मालानी, नगरसेवक सचिन खैरे, यशश्री बाखरिया यांची उपस्थिती होती.

\Bलग्नाचा खर्च करणार \B

माजी नगराध्यक्ष बजरंगलाल शर्मा यांचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले. त्यांच्या कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी तयारी सुरू असताना घर जळल्याने त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. त्यांच्या कुटुंबालाही मदत करण्यात आली. त्यासह त्यांच्या मुलीच्या लग्नासाठीचा खर्च शिवसेना उचलेल, असे स्पष्ट करण्यात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेईई अॅडव्हान्सला ९७ टक्के उपस्थिती

$
0
0

औरंगाबाद: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे (सीबीएसई) जेईई अॅडव्हान्स रविवारी घेण्यात आली. औरंगाबाद शहरात दोन केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. नोंदणी केलेल्या पैकी ९७ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 'आयआयटी'सह, देशपातळीवरील संस्थांमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आली. सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी दोन ते पाच अशी दोन सत्रात ही परीक्षा झाली. सकाळाच्या सत्रात साडे सात वाजताच विद्यार्थ्यांना केंद्रावर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार पालकांसह विद्यार्थी सकाळीच हजर होते. सकाळी झालेल्या सत्रात ९९ टक्के विद्यार्थी उपस्थित होते, तर दुपारच्या सत्रात ९७ टक्के विद्यार्थ्यांनी पेपर दिला. एकूण ११२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या शिबिरात हाजींना प्रशिक्षण

$
0
0

औरंगाबाद : यावर्षी हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी रविवारी दुसरे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात १२०० हाजींनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या हज शिबिरात सय्यद साजेद अन्वर यांनी यात्रेकरूंना उमराह बाबत माहिती दिली. याशिवाय हज यात्रा करताना परिधान केले जाणारे एहराम कसे बांधावे याचीही माहिती उपस्थितांना प्रात्याक्षिकासह करून दिली. या शिबिरात औरंगाबादसह अहमदनगर, जालना, बीड, बुलडाणा, मालेगाव, परभणी येथून हाजींनी सहभाग नोंदविला. हज यात्रेमधील रहिवास, तेथील नियम, कायदे, धार्मिक कर्तव्ये, प्रवास, पासपोर्ट, व्हिसा, आरोग्य याबाबत यात्रेकरूंना दरवर्षी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरात सामील होऊन प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>