Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘आधी वसुली, नंतर वेतनवाढ’

$
0
0

औरंगाबाद : महावितरण कंपनीचे जवळपास तीन कोटी ग्राहक असून थकबाकी ३९ हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे. मात्र, एक एप्रिलपासून वीज कामगारांचा वेतन करार थकीत आहे. परंतु, ही वसुली झाली तरच वेतनवाढी करारावर चर्चा करता येणार असल्याचे संकेत राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या अलिबाग येथे झालेल्या २०व्या अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एन. के. मगर, भाऊसाहेब भाकरे, डी. एन. देवकाते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यंदा करारात ५० टक्के वेतनवाढ करण्याची मागणी सय्यद जहिरोद्दीन यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रमजान’मध्ये भारनियम नाही

$
0
0

औरंगाबाद : रमजानच्या पवित्र महिन्यात वीजपुरवठा नियमित राहणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तांत्रिक कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास ते भारनियमन समजू नये. विजेची कमतरता नाही. त्यामुळे रमजाच्या काळात कुठेही भारनियमन करण्यात येऊ नयेत, असे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूकदार हैराण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात मागील चौदा वर्षांतील सर्वाधिक दराने पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूकदार हैराण झाले असून ते 'चक्का जाम' आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

कर्नाटकची निवडणूक संपातच पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत आहेत. शहरात सध्या पेट्रोल ८४ रुपये, तर डिझेल ७२ रुपये ५३ पैसे प्रतिलिटर प्रमाणे विकले जात आहे. यामुळे मालवाहतूकदारांचे हाल होत आहेत. मात्र, कंपन्यांसोबतच्या करारामुळे डिझेलचे दर वाढले तरी दरवाढ करता येत नाही. यामुळे वाहनांचे सुटे भाग, देखभाल दुरुस्ती, चालकांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चासह डिझेलवरील खर्च वाढला आहे.

शहरात दररोज अडीच हजारांपेक्षा जास्त ट्रक येतात व तीन लाख लिटर डिझेलची विक्री होते. काही दिवसांत डिझेल दोन ते अडीच रुपयांनी वाढल्याने व्यावसायिकांवरील ताण वाढल्याने ते आंदोलनाच्या तयारीत आहे.

'डिझेल दरवाढीमुळे मालवाहतूक व्यवसायावर परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसांत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे,' अशी माहिती औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनीषा वाघमारे एव्हरेस्ट शिखरावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबादची गिर्यारोहक मनीषा वाघमारेने सोमवारी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. सागरमाथ्यावर पाऊल ठेवणारी मनीषा ही मराठवाड्यातील पहिलीच महिला गिर्यारोहक ठरली आहे.

गतवर्षी मनीषा वाघमारेला खराब हवामानामुळे अवघ्या १७० मीटर अंतरावरून माघारी परतावे लागले होते. यंदा नव्या जोमाने मनीषा एव्हरेस्ट शिखर मोहिमेवर गेली होती. १७ मे रोजी मध्यरात्री मनीषाने बेसकँपवरून एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने चढाईस सुरवात केली. निर्धारित नियोजनाप्रमाणे ती चढाई करीत होती. रविवारी मध्यरात्री मनीषाने कँप चारवरून एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यास प्रारंभ केला. सोमवारी सकाळी ८.१० वाजता मनीषाने सागरमाथ्यावर पाऊल ठेवले. शेर्पा दावा चिरिंगची तिला खूप मदत झाली.

मूळची परभणी येथील मनीषा वाघमारे ही औरंगाबादेतील इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात क्रीडा विभाग प्रमुख कार्यरत आहे. क्रीडा विभाग प्रमुख असताना एव्हरेस्ट शिखर मोहिम फत्ते करणारी ती पहिलीच क्रीडा विभाग प्रमुख ठरली आहे. राज्य शासनाने मनीषा वाघमारेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. गंगावणे यांचे निधन

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रोफेसर ल. वि. गंगावणे (वय ७५) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. वनस्पतीशास्त्र विभागात अहोरात्र परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय संशोधन करण्यात गंगावणे यांचे विशेष योगदान आहे. इंग्लंड, नेदरलँड, इजिप्त, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशात त्यांनी संशोधन पूर्ण केले. मानवाच्या शरीरातील कावीळ रोगाचे विषाणू तंबाखूच्या पानावर वाढवून त्याचा अधिक अभ्यास करता येऊ शकतो, हे गंगावणे यांचे संशोधन जगप्रसिद्ध 'लॅनसेट' या जर्नलने स्वीकारले होते. डॉ. गंगावणे भारतीय वनस्पती विकृतीशास्त्र संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनाथ मुलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अठरा वर्षांवरील अनाथ, निराधार मुलांना रोजगार, स्वंयरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पगारिया फांउडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या मुलांसाठी मोफत व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली असून प्रशिक्षण कालवधीत त्यांच्या निवास व भोजनाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती फांउडेशनचे अध्यक्ष पुखराज पगारिया यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

पागरिया ऑटोच्या माध्यमातून चार दशकांहून अधिक काळापासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गेल्या अडीच-तीन वर्षांत शहर व परिसरातील अनाथ बालकांच्या संस्थांना भेटी दिल्या असता, १८ वर्षांपर्यंतच मुले संस्थेत राहता; त्यानंतर काय हा प्रश्न मनाला पडला. त्यामुळे अशा मुलांना भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना तातडीने रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता मोफत व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष पुखराज पगारिया यांनी नमूद केले. फाउंडेशनच्या रेल्वे स्टेशन रोडवरील (आरटीओ शेजारी) कार्यालयात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मुलांची नि:शुल्क भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी यजुवैद महाजन, एस. पी. वैद्य, राहुल पगारिया, कुसुम पगारिया, वैभव घुले आदी उपस्थित होते.

\Bतीन कोर्सचे प्रशिक्षण \B

केंद्र सरकार मान्यताप्राप्त असलेले मोबाइल दुरुस्ती, डोमॅस्टिम डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशयन हे तीन कोर्स जुलै महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक बॅचमध्ये ७५ जणांना प्रवेश दिला जाणार आहे. अनुभवांच्या आधारे पुढील काळात बॅचची संख्या वाढविण्यात येईल, तसेच नवीन कोर्स सुरू करू, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या मुलांवर चांगले संस्कार व्हावे यासाठी विशेष प्रयत्न, संगीत, खेळ यासह विविध छंद जोपासले जाणार आहेत. ज्या मुलांना प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असेल, त्यांना जळगाव येथील संस्थेत मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती महाजन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टमास्तर बुजाडेंचा सत्कार

$
0
0

औरंगाबाद: क्रांतीचौक पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर म्हणून रुजू झालेले एस. बी. बुजाडे यांचा अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. संघटनेचे सर्कल सचिव देवेंद्र परदेशी यांनी बुजाडे यांचा सत्कार केला. यावेळी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटकेपूर्वी मोठा बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद उमटू नयेत, यासाठी पोलिसांनी निराला बाजार व क्रांतीचौक पोलिस ठाणे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जैस्वाल यांना अटक करण्याची प्रक्रिया सोमवारी दुपारी सुरू करण्यात आली. अटकेनंतर पडसाद उमटू नयेत, यासाठी निरालाबाजारात बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिवाय क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कुमक मागवण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, अनिल आडे व विशेषे शाखेचे कर्मचारी दीपक परदेशी हे जैस्वाल यांच्या घरी गेले. त्यांना अटक करत असल्याचे सांगण्यात आले. जैस्वाल हे कोणताही विरोध न करता त्यांच्या वाहनातून पोलिसांसोबत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आले. ही माहिती समजताच शेकडो कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक पोलिस ठाणे व कोर्टात धाव घेतली. जैस्वाल यांना रितसर अटक करून सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांच्या वाहनात दुपारी चार वाजता कोर्टात हजर करण्यात आले. प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी ए. यू. खेमकर यांनी जैस्वाल यांचा जामीनअर्ज फेटाळून लावत त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी जैस्वाल यांना हर्सूल कारागृहात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रगडे यांची नियुक्ती

$
0
0

औरंगाबाद: फुले शाहू आंबेडकर संघर्ष परिषदेच्या मराठवाडा कार्यध्यक्षपदी मधुकर रगडे यांची निवड करण्यात आली. यावेळी अॅड. मनोज सरीन, संजय पंडित, ललिता खंडारे, सुरेश जाधव, गौतम जाधव, लक्ष्मण अंबिलवादे, दिलीप बोर्डे, संजय चिकसे, अरुण जाधव, फैसल खान पठाण, सागर साळवे, सुनीता चव्हाण, रंजना लांडगे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. चव्हाण यांचा सत्कार

$
0
0

औरंगाबाद: हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाधिकारी म्हणून ते सोमवारी रुजू झाले आहेत. नेहमीप्रमाणे सत्कारात पुष्पगुच्छ न देता पुस्तक देऊन फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. हा सत्कार संघटनेचे अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी केला. यावेळी अरशद पठाण यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीनारायण बाखरिया हर्सूल जेलमध्ये

$
0
0

बाखरिया आणखी १४ दिवस हर्सूलमध्ये औरंगाबाद : दंगलीचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या लक्ष्मीनारायण बाखरिया यांची आज सोमवारी पोलिस कोठडी संपल्यामुळे त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राजाबाजार परिसरात दंगल घडविण्यास कारणीभूत असलेल्या लक्ष्मीनारायण बाखरिया यांनी चिथावणी दिल्यामुळेच या परिसरात दंगल उसळली असल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेचे अरुण वाघ यांनी दिलेल्या तक्रारीत केला. या तक्रारीवरून लक्ष्मीनारायण बाखरिया यांच्याविरोधात भादंवि १४३, १४४, ४३६ भारतीय हत्यारबंद कायदा ४, २५ मुंबई अ‍ॅक्ट १३५ भादंवि १२० ब, १०९ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लक्ष्मीनारायण बाखरिया यांना १६ मे रोजी, बुधवारी रात्री अटक केली असून दुसऱ्या दिवशी न्यायालयाने २१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजान टाइम

पैठण, सिल्लोड, औरंगाबाद शटल सेवा अडचणीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी. औरंगाबाद

एसटी महामंडळाने ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी शटल सेवा सुरू केली. सीबीएस, सिडकोसह अन्य बस स्थानकातून ही या शटल बस चालू करण्यात आल्या आहेत. मात्र, काही मार्गाचे सर्वेक्षण केल्यानंतर बसच्या प्रवासाचा वेळ (रनिंग टाइम) कमी करण्यात आल्याने पैठणसह अन्य मार्गावरील शटल बस सेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

शहरातून विविध ग्रामीण भागांना जोडण्यासाठी तसेच या मार्गावर होणारी अवैध वाहतूक कमी करण्यासाठी शटल बस चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयांतर्गत औरंगाबाद-पैठण, औरंगाबाद-सिल्लोड, औरंगाबाद-कन्नड औरंगाबाद-गंगापूर, औरंगाबाद-वैजापूरसह इतर भागांसाठी शटल बस चालू करण्यात आल्या. शटल बस सुरू करताना औरंगाबाद शहरातून त्या गावांपर्यंत जाण्यासाठी रस्ता खराब असल्याने ३० ते ४५ मिनिटांचा अधिक वेळ देण्यात एसटी ड्रायव्हरांना आला होता.

औरंगाबाद ते पैठणपर्यंत एसटी बसला पावणे दोन तासांचा वेळ लागत होता. त्यासाठी अडीच तासाचा वेळ देण्यात आला होता. एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील वाहतूक विभागाने काही दिवसांपूर्वी पुन्हा रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अडीच तासांऐवजी पावणे दोन तासच शटल सेवेसाठी देण्याचे नियोजित केले आहे. त्याच रनिंग टाईमनुसार गाड्या चालविण्यात याव्यात, असे आदेश दिले आहेत. यामुळे पैठण किंवा सिल्लोड मार्गावरील वाढलेली वाहतूक तसेच रस्त्याची खराब अवस्था असल्याने शटल सेवेसाठी दिलेल्या वेळेत फेऱ्या पूर्ण होत नाही. याशिवाय नवीन नियमानुसार एसटी चालकांना ओव्हरटाइमचेही पैसे देण्यात येणार नसल्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. याचा फटका औरंगाबाद ते पैठण सह अन्य शटल मार्गावर चालणाऱ्या बसवर होण्याची शक्यता आहे. आगामी काळात तीन फेऱ्यांची ऐवजी दोन फेऱ्यांद्वारे शटल सेवा चालवून वेळेवर आपली ड्यूटी पूर्ण करण्याचे काम एसटीच्या चालकांना करावे लागणार आहे. ………………

पुन्हा सर्वेक्षण करा

एसटीच्या चालकांनी विभाग नियंत्रक कार्यालयाच्या परिपत्रकाचा विरोध केला आहे. त्यांनी पैठणसह शटल मार्ग सुरू असलेल्या रस्त्याचे सर्वेक्षण पुन्हा करावे, या रस्त्याचे सर्वेक्षण करताना सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी असे चार सर्वेक्षण एकाच मार्गासाठी करावे, हे चार सर्वेक्षण केल्यानंतर कोणत्या वेळी कुठे गर्दी जास्त असते, कुठे कमी असते? याची माहिती प्रशासनाला मिळेल. त्यानंतर त्यांनी रनिंग टाईम काढावा, अशी मागणी एसटी चालकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपण शांती मोर्चा काढू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 'खासदार चंद्रकांत खैरे आपण जिल्ह्यातील प्रत्येक समाजाचे 'खासदार' आहात. वादग्रस्त विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी आपल्या नेतृत्वात सर्वपक्षीय शांतता मोर्चा काढून शहरात शांतता संदेश देऊया', असे खुले पत्र आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना दिले आहे. आपल्या तीन पानी पत्रात जलील यांनी म्हटले आहे की, 'खासदार खैरे आपण जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचे खासदार आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व समाजांना स्थान होते. यामुळे त्यांना रयतेचा राजा म्हणून ओळखले जात होते. आपणही रयतेचे काम करणारे आहात, हे समाजाला दाखविण्याची गरज आहे. मूठभर लोकांनी शहरात दंगल घडविली. औरंगाबाद शांत ठेवण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज होती. शहर शांत होत असताना आपण मोर्चा काढला. यामुळे शहराचे वातावरण पुन्हा बिघडण्याचा धोका होता. ही जाणीव आपल्याला का झाली नाही. हिंदू शक्ती मोर्चाच्या विरोधात मी मुस्लिम शक्ती मोर्चा काढू शकलो असतो, पण मी तसे करणार नाही. कारण शहराची शांतता बिघडू नये, व्यवसायिकांचे नुकसान होऊ नये, ही माझी प्रामाणिक भावना आहे. दंगल घडविणारे कोणत्याही समाजाचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.' 'आपण लोकप्रतिनिधी या नात्याने दोघे पुढाकार घेऊन तुमच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शांतता मोर्चा काढू. आपल्या शहरात पुन्हा अशा दंगली होणार नाहीत यासाठी आपण पुढाकार घ्यावा', असे आवाहनही जलील यांनी केले आहे. दरम्यान, यासंदर्भात खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपण नागरिकांना शांतता राखण्याचेच आवाहन केले असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

$
0
0

औरंगाबाद: दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित येथील विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ही शपथ घेण्यात आली. यावेळी अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, डॉ. विजयकुमार फड, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, सरिता सुत्रावे, सूर्यकांत हजारे, साधना सावरकर, नगरपालिका प्रादेशिक उपसंचालक रिता मेत्रेवार यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवसेनेने घडवली मतांसाठी दंगल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद ११ मे रोजी झालेली दंगल ही शिवसेनेने मतांसाठी जाणीवपूर्वक घडवलेली दंगल आहे, असा दावा सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युरीझम (सीएसएसएस) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त नेमलेल्या सत्यशोधन समितीने सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला. गेले दोन दिवस या समितीने दंगलग्रस्त भागात भेटी दिल्यानंतर हा निष्कर्ष काढला. दंगलीचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये सीएसएसएसचे संचालक अॅड. इरफान इंजिनियर, सहसंचालक नेहा दाभाडे, सिद्धी पेंडके, अॅड. अभय टाकसाळ, बुध्दप्रिय कबीर व भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. अश्फाक सलामी यांचा समावेश होता. गेल्या पंधरवाड्यापासून वेगवेगळ्या कारणाने ही दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू होता. यामध्ये मनपाची बेकायदा नळ जोडणी तोडण्याचा प्रकार तसेच हातगाडीवाल्यांवरील बेकायदेशीर कारवाई शिवसेनेच्या मागणीवरून करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मनपात सत्ता असलेल्या शिवसेनेने कचरा, रोड, पाणी या विषयावरून औरंगाबादकरांचा आक्रोश ओढवून घेतला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. तसेच हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना उशीर न करता तात्काळ मदत, पुनर्वसन करावे, कलम १५३ अे नुसार मोठ्या राजकीय नेत्याचा मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कारवाई करावी, जे पोलिस दंगलखोरासोबत हात मिळवणी करताना दिसत आहेत त्यांच्यावर जलदगतीने कारवाई करावी, आदी मागण्या या समितीने केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहशतवाद विरोधी शपथकडे पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहशतवाद विरोधी शपथ घेण्याकडे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. शपथ घेण्यासाठी केवळ २० जण उपस्थित होते. त्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी अनुपस्थित असलेल्या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. सुमारे ४०० जणांना या नोटीस बजावल्या जातील, असे मानले जात आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात २१ मे हा दिवस दहशतवाद व हिसाचार विरोधीदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी सकाळी ११ वाजता सर्व शासकीय कार्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्याची प्रथा आहे. तत्कालीन सरकारने या बद्दलचे आदेश काढले आहेत. त्यानुसार सोमवारी पालिकेच्या आवारात सकाळी ११च्या सुमारात दहशतवाद विरोधी शपथेचे आयोजन करण्यात आले होते. शपथ घेण्यासाठी पालिका मुख्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, असे कळविण्यात आले होते, पण शपथ घेण्यासाठी प्रत्यक्षात २० जणच उपस्थित होते. त्यात आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह महापौर नंदकुमार घोडेले यांचा समावेश होता. अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहून आयुक्त संतापले. शपथ घेण्यासाठी न आलेल्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावा, असे आदेश त्यांनी उपायुक्तांना दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यालयात चारशे ते सव्वाचारशे अधिकारी, कर्मचारी काम करतात. त्यापैकी चारशे जणांना नोटीसा बजावल्या जाऊ शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता रस्त्यावर कचरा फेकल्यास थेट गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कालपर्यंतचा कचरा उचलला आहे, तरीही रस्त्यावर कचरा दिसतच आहे. रस्त्यावर किंवा रस्त्याशेजारी कचरा टाकणे कमी झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर किंवा रस्त्याशेजारी कचरा टाकताना आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला आहे.

शहरातील साचलेला व रस्त्यांशेजारी पडलेला कचरा चिकलठाणा, पडेगाव, हर्सूल-सावंगी व कांचनवाडी येथील जागांवर टाकण्यात येत आहे. डॉ. निपूण विनायक यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या चारही ठिकाणची पाहणी केली. त्यांना चिकलठाणा येथे नागरिकांनी विरोध केला होता. पण, नागरिकांसोबत चर्चा करून आयुक्तांनी मार्ग काढला. त्यानंतर दुग्धनगरीच्या जागेवर कचरा टाकण्यात येत आहे. शहरातील बहुतांश कचरा या तीन दिवसात चारही ठिकाणांवर हालविण्यात आला आहे.

या संदर्भात माहिती देताना महापौर म्हणाले, कालपर्यंतचा कचरा उचलला आहे. पण, जेथून कचरा उचलला तेथेच पुन्हा आज (सोमवारी) कचरा दिसत आहे. रस्त्यावर कचरा टाकू नका, असे आवाहन केल्यानंतरही नागरिक सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, तशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

\Bपीएमसीचे अधिकारी आज महापालिकेत \B

कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने प्रकल्प सल्लागार समिती (पीएमसी) नियुक्त केली आहे, मात्र या समितीचे काम धिम्यागतिने सुरू असल्याची तक्रार महापौरांनी राज्याचे उपसचिव सुधाकर बोबडे यांच्याकडे केली होती. या तक्रारींची दखल बोबडे यांनी घेतली असून समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. बोबडे यांच्या सूचनेनुसार समितीचे वरिष्ठ अधिकारी चर्चा करण्यासाठी गुरुवारी महापालिकेत येणार आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. शेख यांना पीएच. डी.

$
0
0

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संगणकशास्त्रातील संशोधनाबद्दल प्रा. शेख आशेद परवेझ वाहेद यांना पीएच. डी. प्रदान केली. प्रा. शेख हे एमआयटी एमसीए विभागात कार्यरत आहेत. डॉ. एस. बी. शेटसंधी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. 'स्टडी ऑफ आयटी अॅप्लिकेशन इन इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसेस' विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला. यशाबद्दल त्यांचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. निलेश पाटील, डॉ. एच. एम. धर्माधिकारी, डॉ. दीपक नेहते, डॉ. एम. एच. कोंडेकर यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोळेकर यांच्यावर हल्ला करणारे तिघे पुन्हा गजाआड

$
0
0

कोळेकरांवरील तिघे हल्लेखोर पुन्हा गजाआड औरंगाबाद : सहायक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्यासह इतर पोलिसांवर प्राणघातक हल्ला आणि जाळपोळ करणाऱ्या फेरोजखान अहेमदखान आणि किरण चावरिया या दोघांना १६ मे रोजीच अटक केली होती. ते दोघे सध्या पोलिस कोठडीत आहेत. सोमवारी रवी कागडा, रोहित सुमेर डुलगज आणि सुमीत ऊर्फâ शेरा प्रेम कागडा या तिघांना या गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीने हस्तांतर करून घेतले. ११ मे रोजी गांधीनगरात पोलिस बंदोबस्तासाठी आलेल्या सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या पथकावर दगडफेक करणाऱ्या पवन किरण चावरिया आणि फेरोजखान अहेमदखान या दोघांना क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली होती. ते दोघे सध्या कोठडीत आहेत. कोठडी दरम्यान त्या दोघांनी रवी कागडा, रोहित डुलगज आणि सुमीत उर्फ शेरा प्रेम कागडा सर्व रा. गांधीनगर यांची नावे सांगितली. हे तिघे दंगलीच्या गुन्ह्यात अगोदरच पोलिस कोठडीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images