Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

घाटीत दुसऱ्या दिवशी ३६ निवासस्थाने सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी कर्मचारी क्वार्टर्समध्ये सोमवारपासून रिक्त निवासस्थाने सील करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी १९ निवासस्थाने सील केली गेली. मंगळवारी दुसऱ्या दिवशी ३६ निवासस्थानांना सील लावण्यात आल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील (घाटी) कर्मचाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर, बदली झाल्यानंतर अनेक निवासस्थाने कर्मचाऱ्यांनी रिकामी केली, पण काही ठिकाणी अनधिकृतपणे कब्जा करण्यात आला. काही रिक्त निवासस्थानाचा उपयोग शेजारी राहणारे कर्मचारी करत होते. याबाबत घाटी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी आल्या होत्या. मात्र, ठोस कारवाई झालेली नव्हती. सोमवारपासून प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने यांच्यासह अधिकारी, पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. मंगळवारी डी एक विंगमधील ३६ निवासस्थाने सील करण्यात आल्याचे सुक्रे यांनी सांगितले. बुधवारीही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनियंत्रित वाढणारा गर्भ त्वरित काढण्याचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितेच्या गर्भाशयात अनियंत्रित वाढणारा गर्भ त्वरीत काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील यांनी दिले. घाटीच्या वैद्यकीय बोर्डाने गर्भपात करण्याचा अहवाल दिला होता.

जालना येथील रहिवाशी असलेली संगीता बंडू हिवाळे हिने आपल्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाची तपासणी जालना येथील ओट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रेडिओलॉजी विभागात केली. येथील डॉ. पियूष श्रॉफ यांनी गर्भात वाढणाऱ्या बाळाचा मेंदू कवटीबाहेर येत असल्याचे निरीक्षण नोंदवून दोन्ही मूत्रपिंडावर रक्त साचल्याचेही सांगितले. गर्भात वाढणाऱ्या बाळास मोठ्या प्रमाणावर शारीरिक व्यंग असून, गर्भपात करणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले. यासाठी विवाहितेने शासकीय रुग्णालयात (घाटी) तपासणी केली असता डॉ. व्ही. कल्याणकर यांनीही गर्भपाताचा सल्ला दिला. विवाहितेने औरंगाबाद खंडपीठात ११ मे रोजी धाव घेतली. जी. बी. कुलकर्णी यांनी संबंधित महिलेच्या वतीने याचिका दाखल केली. या महिलेची तपासणी वैद्यकीय बोर्डामार्फत करण्याची विनंती खंडपीठाकडे केली.

याचिकाकर्त्यातर्फे जी. बी. कुलकर्णी, राज्यशासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील अभिजीत नामदे तर केंद्रातर्फे ए. एस. नागोडे यांनी काम पाहिले.

\Bडॉक्टरांच्या अहवालावरून निर्णय\B

घाटीतील पाच डॉक्टरांच्या समितीने महिलेची १४ मे रोजी तपासणी केली. या अहवालात गर्भपात केला जाऊ शकतो, असे नमूद केले. गर्भ २२ आठवडे सहा दिवसांचा असल्याने लवकरात लवकर गर्भपात करणे योग्य ठरेल जेणेकरून मातेच्या जीवितास धोका कमी राहील. हा अहवाल खंडपीठासमोर ठेवण्यात आला. उपरोक्त अहवालावरून त्वरीत गर्भपात करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैस्वाल उपचारासाठी घाटीत दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना मंगळवारी उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी कारागृह प्रशासनाकडे केली होती. पोलिस ठाण्यात तोडफोड केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांना अटक केली होती. कोर्टाने सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी रविवारी रात्री क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तोडफोड करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. अटक असलेल्या तरुणांना सोडवण्याच्या मागणीवरून हा प्रकार घडला होता. पोलिसांनी सोमवारी जैस्वाल यांना निराला बाजार परिसरातील घरातून अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने जामीन फेटाळत त्यांची हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. पोलिसांनी त्यांना सायंकाळी हर्सूल कारागृहात पोचवले होते. जैस्वाल यांनी मंगळवारी सकाळी कारागृह प्रशासनाकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली. दुपारी एकच्या सुमारास घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. अपघात विभागात प्राथमिक तपासणी झाल्यानंतर त्यांना अतीदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यांच्यावर सध्या अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जैस्वाल गुडघेदुखीचा त्रास असून, त्याचा परिणाम उजव्या मूत्रपिंडावर झालेला आहे; तसेच त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा देखील त्रास आहे. त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, त्यांच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

\Bकार्यकर्त्यांची घाटीत गर्दी\B

जैस्वाल यांना घाटीत दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मिळाली. यानंतर कार्यकर्त्यांनी घाटीत धाव घेतली. काही वेळातच मेडिसिन विभागासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता बालक मनमाड येथून ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेदांतनगर पोलिस ठाण्यात ११ वर्षांच्या बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बेपत्ता बालकाला वेदांतनगर पोलिसांनी मनमाड येथील बालगृहातून ताब्यात घेत वडीलांच्या स्वाधीन केले. पाच एप्रिलपासून हा मुलगा बेपत्ता होता.

रेल्वे स्टेशन एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये भारतकुमार प्रेमकुमार कुवर हे नऊ महिन्यांपासून काम करतात. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून, दोन मुलासह कुवर कंपनीतील खोली राहत होते. मार्च महिन्यात कुवर दोन्ही मुलांना कंपनीमध्ये सोडून नेपाळला गेले होते. यादरम्यान त्यांचा ११ वर्षांचा मुलगा महेशकुमार हा पाच एप्रिल रोजी बेपत्ता झाला होता. भारतकुमार नेपाळवरून परतल्यानंतर त्यांनी २८ एप्रिल रोजी वेदांतनगर पोलिस ठाण्याात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पीएसआय वर्षाराणी आजळे या महेशकुमारचा शोध घेत होत्या. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेसद्वारे ही माहिती पाठवली होती. दरम्यान, मनमाड पोलिसांनी महेशकुमार रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले होते. त्याच्या कुटुंबीयाचा शोध लागत नसल्याने त्याला मनमाडच्या बालगृहात ठेवण्यात आले. मनमाड पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पीएसआय आजळे यांच्याशी संपर्क साधला. सोमवारी आजळे यांनी महेशकुमारला मनमाडवरून ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जून महिन्यात जल – कर अदालत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जून महिन्यात जल आणि कर अदालत घेण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे. मालमत्ता कराच्या अभय योजनेला मुदतवाढ दिली जाणार नाही असे स्पष्ट करताना त्यांनी जे नागरिक कर भरणार नाहीत त्यांची मालमत्ता सील केली जाईल असा इशारा देखील दिला आहे. अभय योजनेतून महापालिकेला मोठा महसूल मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात होता, पण प्रत्यक्षात साडेसोळा कोटी रुपयेच मालमत्ता कराच्या रुपाने पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. त्यामुळे अभय योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे सातारा-देवळाई परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला. त्या भागातील अनेक घरांना अजूनही मालमत्ता कर लावण्यात आला नाही. याकडे महापालिकेचे अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांना दर्जेदार, प्रमाणित बा - बियाणे मिळावे, बनावट बियाणांची विक्री होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात असून, त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा भरारी पथकाद्वारे तपासणी केली जात आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांनी 'मटा'शी बोलताना दिली. तपासणीसाठी बियाणे नमुने काढण्याचे कामही हाती घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज गृहित धरून कृषी विभागाने २०१८-१९ या वर्षासाठी खरिपाचे नियोजन केले. औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २० लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी नियोजन प्रस्तावित असून, एक लाख ५७ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी; तसेच गुणवत्तापूर्ण व प्रमाणित बी-बियाणे खत शेतकऱ्यांना मिळावे त्यासाठी खास दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकतेच खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार; कृषी विभागाने नियोजन केले आहे. औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालय क्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत खते, बियाणे आणि किटकनाशक विक्री परवाने प्राप्त कृषी सेवा केंद्राची संख्या ही अनुक्रमे सहा हजार १३२, सहा हजार १९५ आणि पाच हजार ३११ एवढी आहे. या केंद्राकडून विक्री होणारे बियाणे, खत, किटकनाशके प्रमाणित, गुणवत्तापूर्ण आहेत, बनावट विक्री होत नाही ना, याची पडताळणीची जबाबदारी गुणनियंत्रक विभागाकडे सोपविण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षकांपासून, तर विभागीय सहसंचालक कृषी अधिकारी यांचा समावेश असलेले भरारी पथक स्थापन करण्यात आले असून, तालुकास्तरावर नऊ; तसेच जिल्हास्तरावर एक अशा दहा भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच बियाणे, अप्रमाणित, बनावट नाही ना, याची तपासणी करण्यासाठी बियाणे नमुने काढणे व ते प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक पडवळ यांनी दिली.

मार्च २०१८अखेर कारवाई

जिल्हा - परवाना निलंबन- परवाना रद्द - पोलिस केस

औरंगाबाद ७६ १ ३

जालना ४४ ० ३

बीड २७ ० ०

एकूण १४७ १ ६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॅव्हल्स बसभाड्याचे शहरात सहा ठिकाणी फलक

$
0
0

औरंगाबाद : उन्हाळी सुट्टयांच्या काळात ट्रॅव्हल्सचालकांनी सर्वसामान्य प्रवाशांची लूट करू नये. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रवाशांत जागृती होण्यासाठी ट्रॅव्हल्स बस प्रवास भाडे दराचा बोर्ड लावण्यात आला आहे. शहरात सहा ठिकाणी हे बोर्ड लावण्यात आले आहे. बोर्डात दराबाबत सूत्र स्पष्ट करण्यात आले आहे. या सुत्रानूसार दिलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी ट्रॅव्हल्स चालकांनी केल्यास, अशा ट्रॅव्हल्स वाल्याविरोधात 'आरटीओ' कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक भरतीसाठी आंदोलनाची हाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अध्यापक पदविका, पदवी अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीच्या शोधत असलेल्या बेरोजगारांची संख्या दहा लाखांपेक्षा अधिक आहे. राज्यात २०१० पासून शिक्षक भरतीची प्रक्रियाच झालेली नाही. त्यात भरती प्रक्रियेची कोणतीच तयारी नसल्याने बेरोजगार पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. २८ मे रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मारण्याची तयारी राज्यातील डी. टीएड्., बी. एड्.धारकांनी केली आहे.

शिक्षक भरती केव्हा होईल याबाबत शासनस्तरावरून निश्चिती होत नाही. त्यामुळे डी. टीएड्, बी. एड्.धारकांमध्ये संताप आहे. डी. एड्., बी. एड्. स्टुडंट असोसिएशनच्या मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही हा संताप दिसून आला. राज्यात बेरोजगारांची संख्या वाढत असताना शासनस्तरावरून भरतीबाबत कोणती कार्यवाही केली जात नसल्याने रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करण्याचा निर्णय करण्यात आला. २८ मे रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे दहा लाख बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात २०१३ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पहिल्यांदा घेण्यात आली. यानंतर चार वेळा ही परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये जवळपास ५८ हजार मुल 'टीईटी' उत्तीर्ण आहेत. त्यानंतर २०१७ मध्ये शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता घेण्यात आली. त्यामध्ये जवळपास एक लाख ७८ हजार मुलांनी परीक्षा दिली. त्याचा निकाल विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर जाहीर करण्यात आला.

\B'पवित्र' डेडलाइन ओलांडली\B

शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीला दोन वेळा दिलेले वेळेचे आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर अद्याप पोर्टलबद्दल कोणतीही ठोस माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात नाही. यावर शाळांमधील रिक्त जागा, अभियोग्यता चाचणीमध्ये पात्र विद्यार्थी याची माहिती राहणार आहे. त्यातूनच भरती प्रक्रिया होणार होती. परंतु, त्याला मूर्त स्वरुप मिळत नाही.

शिक्षक भरतीची प्रक्रिया होत नाही. शासनाकडून आश्वासन पाळले जात नाही. त्यामुळे बेरोजगारांमध्ये रोष आहे. २८ मे रोजी पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. शासनाला बेरोजगारांचा प्रश्न सोडवावा लागेल तोपर्यंत माघार नाही.

-प्रशांत पाटील शिंदे

भरतीची प्रक्रिया रखडल्याने भावी शिक्षकांमध्ये प्रचंड रोष आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या लाखोत तर, नोकरीची संधी शून्य अशी स्थिती आहे. शासनाने तातडिने यावर तोडगा काढायला हवा.

-प्राजक्ता गोडसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संकेत खुनप्रकरणी तिघांचा जामीन नाकारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

सिडको एन-दोन परिसरातील कामगार चौकामध्ये संकेत कुलकर्णीला कारने जोराची धडक देऊन निर्दयीपणे खून करणाऱ्या तिघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी वेगवेगळे अर्ज दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्यासमोर तिन्ही अर्जवर सुनावणी झाली असता त्यांनी नियमित जामीन नामंजूर केले.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील संकेत संजय कुलकर्णी याला २३ मार्च रोजी चारच्या सुमारास संकेत प्रल्हाद जायभाये याने भेटण्यासाठी बोलवले होते. भेटण्यासाठी गेल्यावर त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे संतापलेल्या संकेत जायभायेने कारने (क्रमांक एमएच १६ एजे १५८५) संकेत कुलकर्णीच्या दुचाकीला धडक दिली. संकेत आपला बचाव करत भिंतीचा आडोसा धरून बसला असता जायभायेने त्याच्या अंगावर चार ते पाच वेळा कार घातली आणि त्यातच संकेत कुलकर्णी गतप्राण झाला. संजय कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संकेत जायभाये यास अटक केली मात्र, अन्य तीन जण पसार झाले होते.

पोलिसांनी त्याचा शोध घेऊन देवळाईतील उमर पटेल, विजय जोग आणि संकेत मंचे या तिघांना अटक केली. हे चौघे जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उमर पटेल, संकेत मचे आणि विजय जोग यांनी नियमित जामिनासाठी वेगवेगळे अर्ज दाखल केले होते.

'साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता'

या तिन्ही अर्जावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या समोर सुनावणी झाली असता मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी या संकेत कुलकर्णीचा खून शांत डोक्याने कट रचून केला आहे, गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, त्याचा तपास होणे बाकी आहे, त्याचबरोबर ओळखपरेडदरम्यान संकेत जायभायेने साक्षीदारांना पोलिसांसमोरच धमकावल्यामुळे संकेत विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या तिघांना जामीन दिला तर ते बाहेर आल्यावर साक्षीदारांवर दबाव आणू शकतात त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने ही विनंती ग्राह्य धरून त्या तिघांचा जामीन नाकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक मतीन पोलिसांच्या ताब्यात ?

$
0
0

औरंगाबाद: महापालिका सभागृहात वंदे मातरम म्हणण्यास विरोध केल्यावरून एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना मंगळवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. काही महिन्यांपूर्वी महापालिका सर्वसाधारण सभेत वंदे मातरम म्हणण्यासाठी नगरसेवक मतीन यांनी विरोध केला होता. त्याची तक्रार पालिका प्रशासनाने केली होती. सिटी चौक पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. यावरून मंगळवारी रात्री पोलिसांनी नगरसेवक मतीन यांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमाडजवळ अपघात, दोघे ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कारसमोर कुत्रा आल्याने नियंत्रण सुटलेल्या कारला ट्रकने धडक दिली. या विचित्र अपघातात दोन जण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात जालना रोडवरील करमाड जवळील सटाणा गावाजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता झाला. कारमधील चौघे जण पुणे येथे झालेला आयपीएलचा सामना बघून अमरावतीकडे परत जात होते.

घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दिलीप दादाजी पराते (वय ४२), सागर गणेशराव पेरण (वय ३४) यांचा मृत्यू झाला. सागर पेरण हे नाशिक येथे आदिवासी विभागात अधीक्षक असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. सटाणा गावाजवळ त्यांच्या कारसमोर अचानक कुत्रा आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली ही कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजुच्या रस्त्यावर पडली. त्यावेळी जालन्याकडून येत असलेल्या ट्रकची कारला धडक बसली. दिलीप पेरण, सागर पेरण, राहुल गणेशराव पेरण (वय ३२) व विजय भिसेकर (वय ३८, सर्व रा. अमरावती) हे चौघे रविवारी पुणे येथे आयपीएलमधील चेन्नई सुपरविंग्ज व किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी सोमवारी पुणे व औरंगाबाद येथील काही प्रेक्षणीय स्थळे पाहिली. औरंगाबाद येते रात्री जेवण करून कारमधून ते अमरावती येथे जात होते. विजय भिसेकर यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुसरे मृत दिलीप पराते यांचे अमरावती शहरात प्रवीणनगर भागात मेडीकल स्टोअर्स आहे. दुसरे जखमी विजय भिसेकर हे अमरावती कोर्टात नोकरीला असल्याची माहिती जखमी राहुल पेरण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समृद्धी’चे १८ कंत्राटदार पात्र

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी नियोजित १६ पॅकेजच्या कामांसाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. तांत्रिक निविदा तपासणीमध्ये १८ कंत्राटदार पात्र ठरले आहेत. या पॅकेजच्या आर्थिक निविदा (फायनान्शिअल बीड) सोमवारी उघडण्यात येतील. त्यानंतर कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हा महामार्ग आठ जिल्ह्यांमधून जाणार आहे. यासाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून काही ठिकाणी भूसंपादनाचे काम सुरू आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पॅकेजसाठी तांत्रिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची छाननी नुकतीच झाली. त्यात १८ कंत्राटदार निकषास पात्र ठरले. या कंत्राटदारांनी सादर केलेल्या आर्थिक निविदा सोमवारी उघडल्या जातील. त्यात भरलेले दर पाहून कंत्राटदार निश्चित होतील. त्यानंतर पात्र कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत.

\Bपात्र ठरलेले कंत्राटदार\B

अॅफकॉन्स, अशोका बिल्डकॉन, अॅपको, बी.सीनाईह सीपीएल, दिलीप बिल्डकॉन, गायत्री प्रोजेक्टस, एल अँड टी, मेघा इंजिनीअरिंग, नवयुग इंजिनीअरिंग, पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर, सद्भाव, टाटा प्रोजेक्टस, एनसीसी, माँटेकार्लो, ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनीअर्स, केएनआर कन्स्ट्रक्शन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, आयएलएफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क.

१८ कंत्राटदारांच्या आर्थिक निविदा सोमवारी उघडण्यात येतील. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू आहे. आर्थिक निविदा निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेशाची कार्यवाही लवकरच होईल.

-राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोडेखोरांवर मोक्का

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अंबाजोगाई रोडवर दुचाकी अडवून लुटमार करणारे; तसेच त्याचा रस्त्यावर टेंपोचालकास लुबाडणाऱ्या व लातूर शहरातील दोन घरावर दरोडे टाकणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला परळी पोलिसांनी अटक केली. हे गुन्हे संघटित पद्धतीने करण्यात आल्याने त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला. या टोळीतील दोघांना मंगळवारी मोक्काचे विशेष न्यायधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर हजर करण्यात आले असता त्यांना २८ मेपर्यंत मोक्काची कोठडी सुनावली आहे.

शिवकन्या मधुकर नागरगोजे (वय ४५ रा. मोडेखेल ता. परळी) या २८c फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री सव्वानऊ वाजता दुचाकीवर तडोळीवरून मांडखेलकडे निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या जीपचालकाने जीप आडवी लावून आडवले. जीपमधील दोघांनी खाली उतरत शिवीगाळ व चाकुहल्ला करीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, कानातील झुंबर असा ६० हजारांचा ऐवज लुबाडला. याप्रकरणी शिवकन्या नागरगोजे यांच्या तक्रारीवरून परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी तपास करीत बालाजी उर्फ बाल्या पंडित काळे (वय ३०, रा. वडीगोद्री, सध्या रा. घोडा कवडगाव, ता. परळी) याला १३ मे रोजी अटक केली. पोलिस चौकशीमध्ये ही दरोडेखोरांची टोळी असून, या टोळीने एकाच रात्री अनेक ठिकाणी लुटमार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बालाजीने दिलेल्या माहितीवरून आरोपी शाम उर्फ बाळू उत्तम पवार (वय २४ रा. वडीगोद्री, ता. अंबड) याला अटक करण्यात आली. या दोघांना मंगळवारी मोक्काच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. मोक्काचे विशेष सरकारी वकील राजू पहाडिया यांनी बालाजी उर्फ बाल्या हा टोळी प्रमुख असून, त्याच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात तीन, सिरसाळा पोलिस ठाण्यात दोन आणि अंबाजोगाई पोलिस ठाण्यात एक असे सहा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या ताब्यातून ६० हजारांचे दागिने जप्त करावयाचे आहेत. गुन्ह्यात वापरलेली जीप, हत्यार हस्तगत करायचे आहेत, अन्य साथीदारांचा शोध घ्यायचा असल्याने कोठडीत देण्याची विनंती केली. मोक्काच्या विशेष न्यायालयाने या दोन आरोपींना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्मानाबाद विधानपरिषदेची मतमोजणी पुढे ढकलली

$
0
0

उस्मानाबाद:

अचानक उद्भवलेल्या न्यायालयीन खटल्यामुळे उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेची उद्या गुरुवारी होणारी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारांना पत्र पाठवूनच मतमोजणी उद्या होणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे उद्या राज्यातील फक्त पाच विधानपरिषद निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.

उस्मानाबाद-बीड-लातूर या मतदारसंघातील लढत चुरशीची झाली आहे. येथे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-बीड-लातूर जागेसंदर्भात अचानक झालेल्या कोर्ट केसमुळे या ठिकाणीची होणारी मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे सहकारी रमेश कराड यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीकडून या जागेसाठी अर्ज केला होता, मात्र ऐनवेळी अर्ज मागे घेत त्यांनी राष्ट्रवादीलाही आठवड्याभरात राम राम ठोकला होता. त्यामुळे अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या जगदाळेंना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. या नाट्यमय घडामोळींमुळे उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेची जागा सर्वाधिक चर्चेची राहिली होती. या ठिकाणी पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ऐवजी सतरा हजारांच्या वीज खांबाची खरेदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन हजार रुपये किमतीचा विजेचा खांब खरेदी करण्याऐवजी चक्क सतरा हजार रुपये किमतीचा खांब खरेदी करण्यात आला. या प्रकरणावरून बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा केला.

नगरसेवक राजू शिंदे यांनी आपल्या वॉर्डात विजेचा खांब लावण्यासाठी अर्थसंकल्पात वीस लाखांची तरतूद केली. त्यापैकी दहा लाख रुपये खर्च करून तीन हजार रुपये किमतीचे शंभर जीआय पोल खरेदी करा, असे त्यांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. अधिकाऱ्यांनी मात्र सतरा हजार रुपये किमतीचे ऑप्टीनान्स प्रकाराचे तीस पोल खरेदी केले. त्यामुळे वॉर्डात तीसच पथदिवे लागतील. उर्वरित सत्तर दिवे मी हातात घेवून फिरू का, असा सवाल यांनी केला. तीन हजार रुपयाला एक खांब येत असताना सतरा हजारांचा पोल का खरेदी केला, असा सवाल त्यांनी केला. राजू वैद्य म्हणाले, अधिकाऱ्यांची ही कृती महापालिकेला आर्थिक नुकसान पोचवणारी आहे. कुणाच्या सांगण्यावरून विद्युत खांबाचा प्रकार बदलण्यात आला असा सवाल त्यांनी केला. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि उपअभियंता के. डी. देशमुख यांना याचे उत्तर देता आले नाही. जे झाले ते झाले. आता जीआय पोल खरेदी करू असे कोल्हे म्हणाले. त्यांच्या या विधानावर देखील वैद्य, शिंदे यांनी आक्षेप घेतला. तेव्हा महापौरांनी जीआय पोल खरेदी करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ट्रॅक्टर, दुचाकी अपघातात जातेगावजवळ एकाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

जातेगाव येथील धरणालगत ट्रँक्टर व दुचाकीच्या अपघातात एक जण ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मच्छिद्र शंकर पवार (वय ३८) यांचा अपघातात मृत्यू झाला. मीना भास्कर पवार (वय ३२, रा. डोनवाडा, ता. औरंगाबाद) जखमी महिलेचे नाव आहे. मृत मच्छिंद्र पवार यांच्या त्यात भावजय आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की डोनवाडा येथील मच्छिद्र पवार हे दुचाकीवरून (क्रमांक एमएच २० डीआर ६१७७) आपली भावजाय मीनाबाई यांना ममनाबाद येथून काविळाचे औषध देऊन गावाकडे परतत होते. जातेगाव पाझर तलावाजवळ त्यांच्या दुचाकीला एका वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रँक्टरने (क्रमांक एमएच २० एवाय ६६४१) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे खाली पडले. त्यावेळी ट्रँक्टरचे एक चाक मच्छिंद्र पवार यांच्या अंगावरून गेले.

दोन्ही गंभीर जखमीना फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेदारे चालक विजय देवमाळी यांनी प्रथम फुलंब्री ग्रामिण रुग्णालयात नंतर औरंगाबाद येथील एम्स हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान मच्छिंद्र पवार यांचा मृत्यू झाला. मीनाबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार काळेंनी अनुभवला थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आम्हाला वाटले गाडीचे टायर फुटले, मात्र जेव्हा लोक धावायला लागले तेव्हा ग्रॅनेड हल्ला झाल्याचे कळले. पोलिसांनी आम्हाला वाहने थांबवू दिली नाहीत. आम्ही बंदोबस्तात श्रीनगर येथे पोचलो असून ग्रेनेड हल्ल्यातून बालंबाल बचावलो आहोत,' अशी माहिती आमदार विक्रम काळे यांनी 'मटा'ला दिली.

जम्मु-काश्मीरमधील बिज‌बिहारा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंचायत राज समिती दौऱ्यावर गेलेले आमदार काळेसह पाच आमदार व इतर असे एकूण २१ जण बचावले. या घटनेची माहिती देताना आमदार काळे म्हणाले. आम्ही पाच आमदारांसह एकूण २१ जण पहेलगाम येथील एका शासकीय शाळेची पाहणी करून पोलिस बंदोबस्तात श्रीनगर येथे परत येत होतो. त्यावेळी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता अत्यंत गर्दीचा भाग असलेल्या बिजबिहारा तालुक्यात आमची वाहने पोचताच मोठा आवाज झाला. आम्हाला वाटले आमच्या गाडीचे टायर फुटले, हा ग्रेनेडचा हल्ला होता. हल्ल्यानंतर पोलिसांनी आम्हाला घटनास्थळी क्षणभरही थांबू दिले नाही. आम्हाला सुरक्षित शहराबाहेर आणले. आमच्या ताफ्यातील दोन वाहनांचे टायर फुटले व एका वाहनावर बंदुकीच्या गोळ्याने छिद्रे पडली आहेत. पोलिसांनी घटनास्थळापासून ५५ किलोमिटर अंतरावरील श्रीनगर येथे तत्काळ पोचवले. तेथून तत्काळ निघाल्यानेच आम्ही बचावलो, असे आमदार काळे यांनी सांगितले. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती व सचिवांनी फोन करून विचारपूस केल्याचेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद तसेच मराठवाड्यातील अनेक शिक्षकांनीही फोनवर चौकशी केल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडधान्याचे क्षेत्र वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात २० लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी नियोजन प्रस्तावित आहे. यंदा कापसासह मका पिकाचा लागवड क्षेत्र घट होण्याची शक्यता असून मूग, उडीद आदी कडधान्यांचे क्षेत्रात वाढविण्यावर कृषी विभागाने भर दिला आहे.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालय क्षेत्राअंतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात खरिपाखालील एकूण सरासरी क्षेत्र १९ लाख ९२ हजार हेक्टर असून, यंदा २०.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. २०१७-१८मध्ये १०.४९ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती, परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. परिणामी, यंदा कापूस लागवड क्षेत्रात काही प्रमाणात घट होईल, अशी शक्यता आहे. कापसासाठी यंदा नऊ लाख आठ हजार लाख हेक्टर एवढे प्रस्तावित पेरणी क्षेत्र असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे.

मका पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टर आहे. गेल्या हंगामात दोन लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी झालेली असतानाच यंदा मात्र एक लाख ४३ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित आहे. उसाची लागवड गेल्या वर्षांत तीन हजार हेक्टरवर झाली. यंदा त्यात यंदा वाढ होण्याची शक्यता गृहित धरत कृषी खात्याने चार हजार हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

ज्वारी, बाजरीचे क्षेत्र वाढणार

गत हंगामात ज्वारी लागवड १२ हजार हेक्टर होते. त्यात यंदा वाढ झाली असून, प्रस्तावित क्षेत्र १५ हजार हेक्टर आहे. बाजारी क्षेत्रातही चांगली वाढ झाली यंदा दोन लाख ९३ हजार हेक्टर बाजारीची लागवड होईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी एक लाख २३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीन लागवड क्षेत्रातही २० हजार हेक्टरने वाढी अपेक्षित असून, यंदा तीन लाख ४१ हजा हेक्टरवर लागवडीचे नियोजन कृषी खात्याने केले आहे.

कडधान्य क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला असून, त्यात मुगाची ८९ हजार हेक्टरवर, उडदाची ६५ हजार हेक्टरवर लागवच प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी मूग व उडदची लागवड अनुक्रमे ६४ हजार व ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती, अशी माहिती कृषी खात्यातील सूत्रांनी दिली.

खरीप हंगाम २०१८ पीक निहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र (क्षेत्र लाख हेक्टर)

पीक - पेरणी क्षेत्र

सरासरी क्षेत्र - २०१७-१८ -- २०१८-१९ प्रस्तावित

१) ज्वारी ०.३४ ०.१२ ०.१५

२) मका २.२५ २.४८ १.४३

३) बाजरी २.०८ १.२३ २.९३

४) तूर १.४४ १.२४ १.६०

५) मुग ०.४१ ०.६४ ०.८९

६) उडीद ०.२८ ०.५४ ०.६५

७) सोयाबीन १.६८ ३.२१ ३.४१

८) कापूस १०.१५ १०.४९ ९.०८

९) ऊस ०.९० ०.०३ ०.०४

१०) इतर खरीप ०.३९ ०.२० ०.११

एकूण १९.९२ २०.१८ २०.२९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृताच्या कुटुंबीयांना मदत

$
0
0

औरंगाबाद : दंगलीत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास बाथ्री तेली समाजातर्फे ८२ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. दयाराम बसैये बंधू यांच्या पुढाकाराने ही मदत करण्यात आली. यावेळी मनोज चौंडिये, गणेशलाल कुरलिये, जितेंद्र बसैये, रमेश मकरिये आदी उपस्थित होते. यापुढे शहरात सलोखा नांदावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ बालकांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बालरोग चिकित्साशास्त्र विभागात दीड दिवसांत आठ बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. या बालकांच्या मृत्यूची कारणे वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे.

घाटी रुग्णालयातील बालरोग विभागात तीन दिवसांपूर्वी दीड दिवसांत आठ बालकांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र याविषयी माहिती घेतल्यानंतर आठ पैकी सहा बालके शहरातील अन्य रुग्णालयातून घाटीत आणल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. त्यांच्यापैकी अनेकांचे वजन कमी होते. काही बाळ अत्यवस्थ होती, तर काहींना संसर्ग झाला होता. बऱ्याचवेळा बाहेरच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर एका मर्यादेपर्यंत उपचार केले जातात आणि प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास घाटीत घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. अशा अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान घाटीतील डॉक्टरांपुढे असते. त्या अनुषंगाने या सहा बालकांवर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले होते. पण प्रकृतीने साथ न दिल्याने बालके दगावली. अन्य दोन बालके घाटीतच जन्माला आलेली होती. पण त्यांना न्यूमोनिआ आजाराने ग्रासले होते. सर्व बालकांवर योग्य ते उपचार केल्याचा दावा घाटी प्रशासनाने केला आहे.

आठ पैकी सहा बालके घाटीत बाहेरून दाखल केलेली होती. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू होते. उर्वरित दोन बालके घाटीत जन्मली पण त्यांना न्यूमोनिआ झाला. नवजात बालकाची प्रतिकारशक्ती विकसित झालेली नसते. आम्ही सर्व बालकांवर योग्य ते उपचार केले होते.

-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images