Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विद्यापीठ निवडणुकीत अपिलांचा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विद्यापीठ अधिसभेतून आठ सदस्यांची निवड करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, अधिसभा निवडणुकीच्या अपिलांवरील सुनावणी प्रलंबित असल्यामुळे व्यवस्थापन परिषद निवडणूक कार्यक्रम वादात अडकला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पक्षपाती निर्णयाविरोधातील काही अपिल प्रलंबित असताना व्यवस्थापन परिषद निवडणूक घेऊ नये, अशी मागणी थेट राज्यपालांकडो करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासाठी शुक्रवारी (२५ मे) आरक्षण सोडत काढली जाणार असून १५ जून रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार व्यवस्थापन परिषदेवर अधिसभा, विद्या परिषद आणि राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड करण्यात येत असते. अधिसभेतील प्राध्यापक, प्राचार्य, पदवीधर व संस्थाचालक गटातील निवडून आलेल्या सदस्यांपैकी दोन जणांची निवड होते. विद्या परिषदेतून दोन सदस्य व्यवस्थापन परिषदेवर पाठवले जातात. राज्यपाल एका व्यक्तीची नेमणूक करतात. राज्यपाल नियुक्त सदस्य किशोर शितोळे आणि शिक्षणतज्ज्ञ गटात डॉ. टी. जी. सीताराम यांची नेमणूक झाली आहे. व्यवस्थापन परिषदेत कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, दोन अधिष्ठाता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दोन संचालक व्यवस्थापन परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. तसेच वित्त व लेखाधिकारी व परीक्षा संचालक निमंत्रित सदस्य असतात. अधिसभेद्वारे पाठविण्यात येणाऱ्या आठ सदस्यांच्या निवडीसाठी राज्यपाल कार्यालयाची मंजुरी घेण्यात आली. या निवडणूक वेळापत्रकानुसार एक जून रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. दोन जूनला अर्ज छाननी होऊन वैध-अवैध अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. चार जून रोजी सायंकाळी पाचनंतर आक्षेप नोंदवता येणार आहेत. सात जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. आठ जून रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल, तर १५ जून रोजी अधिसभेची बैठक सुरू होऊन दुपारी मतदान प्रक्रिया होईल, असे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यापीठ अधिसभा निवडणुकीतील अपिलांवरी सुनावणी प्रलंबित आहे. निवडणुकीचा कारभार एकतर्फी झाल्याच्या तक्रारी आहेत. या वादात विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषद निवडणुकीची घाई केली आहे. त्यामुळे थेट राज्यपालांना निवेदनाद्वारे दाद मागण्यात आली आहे. संबंधित प्रकरण हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे.

\Bअपिलांवर सुनावणी कधी ?

\B

विद्यापीठ अधिसभा निवडणूक प्रक्रियेवर अपिले दाखल असतानाही निवडणूक प्रक्रियेच्या नियमानुसार त्यावर सुनावणी घेण्यात आली नाही. काही अपिले जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून अपात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिल्याने ते अपात्र उमेदवार अधिसभा सदस्य आहेत. अपिलावरील सुनावणीनंतर काही सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. सर्व प्रलंबित प्रकरणाची सुनावणी घेऊन अपिलांवर आदेश द्यावा. तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी हनुमंत गुट्टे यांनी केली आहे. याबाबत राज्यपाल, कुलगुरू आणि कुलसचिवांना निवेदन दिले आहे.

डॉ. साधना पांडे या प्रभारी कुलसचिव असून त्यांना दैनंदिन कामकाजापुरता अतिरिक्त भार दिलेला असतो. त्या निवडणूक निर्णय अधिकारी राहू शकत नाहीत. पांडे या पूर्णवेळ कुलसचिव नसल्यामुळे प्रक्रिया नियमबाह्य ठरते.

-हनुमंत गुट्टे, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यातील विहिरीत सोडले पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,सातारा

सातारा परिसरातील विहिरीत महापालिकेने मोफत पाणीपुरवठ्याला सुरवात केली आहे. नागरिकांनी २१ रोजी प्रभाग कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले होते. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी तात्काळ संबंधित आधिकाऱ्यांना विहिरीत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमिवर आज विहिरीत किती पाणी साठवता येईल व गावची पाण्याची आवश्यकता किती याची चाचणी घेण्यात आली. यावेळी भाजप नगरसेवक राजू शिंदे, देवळाईचे नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे, संघर्ष समितीचे सोमिनाथ शिराणे, वॉर्ड अधिकारी पी. जी. पवार, पाणीपुरवठा अधिकारी वीर उपस्थित होते.

सातारा परिसरातील नागरिकांनी सोमवारी प्रभाग कार्यालयावर आंदोलन केले. पाण्याचे मोफत टँकर सुरू करावे, अशी मुख्य मागणी त्यावेळी केली होती. त्याचबरोबर बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी आदेश दिल्यानंतरही सातारा-देवळाई भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही, याबद्दल नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा सुरू असतानाच ठिय्या आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर महापालिका सातारा-देवळाई भागाला मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. यावेळी भाजपच्या महिला सरचिटनिस सविता कुलकर्णी, राजू पटेल, जमील पटेल, फिरोज पटेल, रमेश बाहुले आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नहरीची केली आयुक्तांनी पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी गुरुवारी पानचक्की आणि नहर - ए - अंबरी याची पाहणी केली. यावेळी त्यांच्याबरोबर नहरींचे जाणकार डॉ. रमजान शेख होते. डॉ. शेख यांनी आयुक्तांना पानचक्की व नहरीची माहिती दिली. औरंगाबाद शहराचा ऐतिहासिक ठेवा लक्षात घेऊन नहरींचे संवर्धन केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. नहरीचा विकास व संवर्धनासाठी किमान दहा कोटी रुपये खर्च येईल असे यावेळी आयुक्तांना सांगण्यात आले. डॉ. विनायक यांनी नहर संवर्धन समितीची २९ मे रोजी बैठक घेण्याचे मान्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविनाश धर्माधिकारी यांचे आज व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्र, एमआयटी पिस युनिव्हर्सिटीतर्फे शुक्रवारी अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रुक्मिणी सभागृहात सकाळी १० वाजता व्याख्यानाला सुरुवात होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीही घेण्यात येणार आहे. कलचाचणी सकाळी ९.३० वाजता घेण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. सतीश ढगे, लक्ष्मण कदम आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूरची मतमोजणी पुन्हा लांबणीवर

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

बीड नगरपालिकेच्या अकरा अपात्र नगरसेवकांचा वाद सर्वोच न्यायालयात जाणार आहे. लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील उमेदवार अशोक जगदाळे व अपात्र नगरसेवक अमर नाईकवाडे हे औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत, असे नगरसेवकांचे वकील सतीश तळेकर यांनी सांगितले. दरम्यान, या मतदारसंघातील मतमोजणी ६ जूनपर्यंत लांबणीवर गेली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने दाखल पुनर्विलोकन याचिका आणि दिवाणी अर्जांवर ६ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. खंडपीठाचे सुटीतील न्यायमुर्ती मंगेश पाटील यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. या याचिकेत राज्य शासन, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केलेले आहे. निवडणुकीपूर्वी बीडच्या दहा नगरसेवकांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरविले होते. मतपत्रिका त्यापूर्वीच तयार झालेल्या असल्याने निवडणूक आयोगाने त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. राज्यमंत्र्यांचे आदेश रद्द करण्यासाठी बीडचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह नऊ अपात्र घोषित नगरसेवकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी या नगरसेवकांना मतदानाची परवानगी दिली होती. अपात्र नगरसेवकांचे मत मोजण्यात यावे, सदर दहा नगरसेवकांच्या मतांचा निवडणुकीवर परिणाम होत असेल, तर निकाल जाहीर करू नये. निवडणुकीचा निर्णय याचिकेच्या अंतिम निकालास अधीन राहील, असे स्पष्ट केले होते. या निर्णयाविरुद्ध प्रज्ञा तळेकर यांनी पुनर्विलोकन याचिका दाखल केली होती, तर ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि नितीन गवारे यांच्यामार्फत दिवाणी अर्ज दाखल केले होते. निवडणूकआयोगातर्फे अलोक शर्मा यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर न सोडण्याच्या अटींवर जैस्वाल यांना जामीन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. जैस्वाल यांनी तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यावर पोलिस ठाण्यात हजर व्हावे, तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव टाकू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडू नये अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.

हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पोटे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जैस्वाल यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार २० मे रोजी रात्री ११ वाजता जैस्वाल पोलिस ठाण्यात आले व गांधीनगरमधील दोन तरुणांना जामिनावर सोडण्यास सांगितले. 'शिवसैनिकांनाच अटक केली जात असल्याने, आता उद्या शहरात काय घडते ते बघाच,' अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. पोलिस ठाण्यातील खुर्च्या भिरकावल्या व टेबलची काच फोडली. या तक्रारीनंतर जैस्वाल यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ व ४२७; तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी जैस्वाल २१ मे रोजी यांना अटक केली होती. यापूर्वी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी जामिनाला विरोध केला. जैस्वाल हे राजकीय दबाब टाकू शकतात. त्यांच्यासह दोन नगरसेवकांचा दंगल घडविण्यात कितपत सहभाग आहे, याची चौकशी करायची आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे, त्यामुळे सरकारी पक्षाने जैस्वाल यांना जामीन देण्यास विरोध केला. जैस्वाल यांच्यातर्फे के. जी. भोसले व अभयसिंह भोसले यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठणपासून अवघ्या १७ किलोमीटरवर असलेले बोरगाव (ता. पैठण) हे पुनर्वसित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या ४० वर्षांपासून गावात रस्त्याच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. टाकळी-बोरगाव मंदिर-७४ जळगाव या सात किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करा, या मागणीसाठी गुरुवारी (२४ मे) शिवाजी मुळे व इसाक शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणात गावातील महिला, पुरुषांनीही मोठ्याप्रमाणावर सहभाग नोंदवला.

जायकवाडी धरणात पुनर्वसित झालेले बोरगाव असून, गावामध्ये रस्ताच नसल्याने गावकऱ्यांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गंभीर रुग्‍णांना शहरात उपचारासाठी दाखल करण्यासाठी काय करावे, असा प्रश्न गावकऱ्यांसमोर नेहमीच असतो. रस्त्यासाठी गावातील सर्वसामान्य नागरीकांनी आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकाम; तसेच पोलिस प्रशासनाचेही उंबरठे गावकऱ्यांनी झिजवले तरीही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

या उपोषणासाठी गावातील महिला, पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रस्त्याचे काम केव्हा सुरू होणार व काम पूर्ण केव्हा होणार याची माहिती द्या, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इंधन दरवाढीच्या विरोधात कॉँग्रेसने गुरुवारी विभागीय आयुक्तालयावर सायकली फेरी काढून निषेध व्यक्त केला. हेच का अच्छे दिन, असा सवाल करत आंदोलनकर्त्यांनी दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

मोदी सरकारच्या विरोध घोषणाबाजी करत कॉँग्रेसने पैठणगेट येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास सायकल फेरीला सुरुवात केली. कॉँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर,

महापालिका गट नेते भाऊसाहेब जगताप, विनोद तांबे, केशवराव औताडे, बाबा तायडे, राम शेळके, नगरसेविका सायली जामदार आदी उपस्थित होते. हेच का अच्छे दिन, इंधन दरवाढ रद्द करा, जनता के सन्मान मे कॉँग्रेस मैदान मे यासह अन्य घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संपूर्ण फेरी मार्ग दणाणून सोडला होता. गुलमंडी, सिटी चौक, शहागंज मार्गे काढण्यात आलेली ही सायकल फेरी विभागीय आयुक्तालयावर धडकली. तेथे फेरीचे रुपातंर सभेत करण्यात आले. त्याप्रसंगी बोलताना आमदार झांबड यांनी भाजप सरकारवर तोफ डागली. 'अच्छे दिन येणार, असे स्वप्न दाखवत भाजप सत्तेत आली. मात्र, महागाई, इंधनाची भरसाठ दरवाढ हेच अच्छे दिन आहेत का' असा सवाल केला. 'इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असून तातडीने दरवाढ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही' असा इशारा दिला.

शहराध्यक्ष पवार, डॉ. कल्याण काळे आदी नेत्यांनीही भाषणात इंधन दरवाढीच्या मुद्यावरून भाजप सरकारवर कडाडून टीका करत निषेध व्यक्त केला.

\Bसायकल चालवताना दमछाक

\Bआंदोलनात सहभागी नेत्यांपैकी अनेकांना सायकल चालविण्याची सवय नसल्याने त्यांची चांगलीच दमछाक झाली. विभागीय आयुक्त कार्यालय येथील चढावर एक कार्यकर्ता खाली कोसळला. अन्य कार्यकर्ते तातडीने त्याच्या मदतीसाठी धावले.

\B

आ. सत्तारांसाठी प्रतीक्षा

\Bआंदोलनाची नियोजित वेळ सकाळी अकराची होती. त्यानुसार कार्यकर्ते आले होते. पण, जिल्हाध्यक्ष आमदार सत्तार येणार म्हणून त्यांना तब्बल एक ते सव्वा तास प्रतीक्षा करावी लागली. सत्तार येणार नाही, असा निरोप येताच नेत्यांनी आंदोलनास सुरुवात केली. दरम्यान, 'ओळखीच्या परिवारात झालेल्या दु:खद घटनेमुळे आंदोलनासाठी वेळेवर येता येणे शक्य झाले नाही. तसा निरोप पदाधिकाऱ्यांना दिला होता' अशी माहिती आमदार सत्तार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभियांत्रिकी परीक्षेत जुनीच प्रश्नपत्रिका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गुरुवारी दुसरीच प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना मिळाली. प्रश्नपत्रिका जुनी आल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर धावपळ उडाली. विद्यापीठाकडून ऑनलाइन प्रश्नपत्रिका, त्यानंतर छायांकित प्रती काढणे यात काही केंद्रांवर तब्बल दीड तास गोंधळ सुरू होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवली.

विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या परीक्षा १६ मेपासून सुरू झाल्या आहेत. सिव्हिल शाखेच्या द्वितीय वर्षाच्या 'सर्वे-२' विषयाची परीक्षा गुरुवारी सकाळी दहा वाजता होती. त्याची प्रश्नपत्रिका परीक्षार्थींच्या हाती पडल्यानंतर सत्रामध्ये शिकलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. विद्यार्थ्यांनी ही बाब पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी कळवल्यानंतर विद्यापीठ परीक्षा विभागाला चूक लक्षात आली. त्यामुळे धावपळ उडाली. तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडविली होती तर, काहींनी किती वेळ वाट पाहणार, असे म्हणत परीक्षा केंद्रही सोडले. काही केंद्रावर परत प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्यात आली आणि पुन्हा पेपर घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या सगळ्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी थेट विद्यापीठात जाऊन याबाबत प्रकाराचा निषेध केला.

\Bपरीक्षार्थींचे हाल

\B

घडलेला प्रकार सांगण्यासाठी विविध कॉलेजचे विद्यार्थी विद्यापीठात गेले, परंतु तेथे प्रशासकीय इमारत, परीक्षा विभाग अशा चकरा माराव्या लागल्या. मात्र, कोणीही योग्य प्रकारे अडचण समजून घेतली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. परीक्षा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रश्नत्रिकेतील एक भागातीलच प्रश्न थोडेसे वेगळे होते. सुधारित प्रश्नपत्रिका पाठवून पुन्हा परीक्षा घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनीषाचा परतीचा प्रवास सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर औरंगाबादची गिर्यारोहक मनीषा वाघमारे बुधवारी दुपारी बेस कँम्पवरून नामची बाजार येथे पोचली. साधारणपणे एक ते दोन जूनदरम्यान ती औरंगाबादमध्ये परत येईल, असे मानले जात आहे.

बेस कॅम्पवर मनीषा आणि तिच्या सहकाऱ्यांची डॉक्टर बेन यांनी तपासणी केली. सर्वांची तब्बेत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मनीषा आणि टीम ऑक्सिजन पुरेसे मिळावा आणि शरीराची झालेली झीज भरून निघावी म्हणून लगेच काल रात्री बेस कँपवरून नामचे बाझार येथे आले. मनिषा आज संध्याकाळी लुकला येथे पोचली आहे. तेथील हॉस्पिटलमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी तीन ते चार दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या लुकाला येथील वातावरण खराब असल्याचे समजले. त्यामुळे तेथून काठमांडू येथे जाण्यासाठी विमान प्रवास बंद आहे. हवामान चांगले झाले की मनीषा लुकला येथून विमानाने उड्डाण करून काठमांडू येथे येईल.

&x1f3d4;कॅम्प-दोन वरून समिटपर्यंत आणि समिटपासून पुन्हा कॅम्प-दोनपर्यंत अशा तीन ते चार दिवसांच्या प्रवासात एकदाही जेवण केले नसल्याने शरीरातील पूर्ण ऊर्जेचा स्रोत वापरला गेला. त्यामुळे सर्वांना अशक्तपणा आणि थकवा आला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करावा, असे सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूजजवळ अपघातात दोघे ठार

$
0
0

वाळूज महानगर : नातेवाइकाच्या लग्नाहून परत जात असताना कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाळूज एमआयडीसीत घडली. कृष्णा रामभाऊ बुट्टे (४०) व मनोज भालचंद्र शेडुते (४०) अशी मृतांची नावे आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, कृष्णा रामभाऊ बुट्टे (४०, रा. शहागंज परिसर, औरंगाबाद) यांचे मेव्हणे प्रशांत श्रीमाळी यांचा बुधवारी (२३ मे) विटावा येथे विवाह होता. या लग्नासाठी कृष्णा बुट्टे त्यांचा मावस मेव्हणा मनोज शेडुते (रा. इन्कम टॅक्स कॉलनी, जुना जालना) नातेवाईक सुभाष मुंडलिक (४५, रा. मुस्तान चाळ, आझादनगर, जि. ठाणे), शिवाजी कुलथे ( ४०, रा. वैजापूर) हे चौघे कुटुंबासह गेले होते. लग्नसोहळा पार पडल्यानंतर नातेवाइकाला निरोप देऊन कृष्णा बुट्टे व अन्य तिघे रात्री कारमधून (क्रमांक एमएच २१, एएक्स ०७७९) परत शहराकडे येण्यासाठी निघाले होते. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जोगेश्वर-विटावा रस्त्यावरील व्हेरॉक कंपनीजवळ वळण घेत असताना चालक बुट्टे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. ही कार क्षणार्धात दुभाजकाला धडकली. या अपघातात कारचालक कृष्णा बुट्टे यांचा जागेवरच मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फौजदार संतोष कसबे, हेड कॉन्स्टेबल किरण जाधव, गायकवाड, समीर सिद्दिकी यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमीना बाहेर काढले. यानंतर दोघा जखमींना रुग्णवाहिकेतून तर अन्य दोघांना टू-मोबाइलमधून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. कृष्णा बुट्टे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनोज शेडुते यांचा उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मृत्यू झाल. अन्य दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, शिवाजी कुलथे यांची प्रकृती चिंताजक आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समाजकल्याणच्या विविध वसतिगृहांमध्ये सुविधा पुरिवण्यात याव्यात, विद्यार्थ्यांना सतावणाऱ्या समस्या दूर कराव्यात आदी मागण्यांसाठी अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक एस. एस. शेळके यांची भेट घेत निवेदन दिले. प्रश्न तात्काळ न सोडविल्या आंदोलनाचा इशारा दिला.

समाजकल्याण विभागातर्फे शहर व जिल्ह्यात वसतिगृह चालविली जातात. अकरावीपासून पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. शहरातील अनेक वसतिगृहांमध्ये सुविधांचा अभाव आहे. हडकोतील वसतिगृहातील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची समस्येबद्दल विद्यार्थ्यांनी तक्रारी दिल्या होत्या. यावेळी विभाग संघटनमंत्री, वसतिगृह संपर्क प्रमुख प्रविण गायकवाड, महानगरमंत्री ईश्वर अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख निखिल आठवले, शिवाजी वरपे, अजय लवंगे, रोहित कोतवाल यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी घरांत बेकायका वास्तव्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानात काही जण अनधिकृतपणे राहतात. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे पत्र घाटी प्रशासनाने पोलिस आयुक्तांना गुरुवारी दिले.

घाटीत कार्यरत वर्ग एक ते वर्ग चार कर्मचाऱ्यांसाठी घाटी परिसरात निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यापैकी काही निवासस्थाने रिक्त असून, त्या ठिकाणी या संस्थेत कार्यरत नसलेले व जे यापूर्वी या संस्थेत कार्यरत होते, सध्या सेवानिवृत्त झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांचे काही आप्तेष्ट अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे, असे घाटी प्रशासनाने पत्रात म्हटले आहे. अनधिकृतपणे राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलिस आयुक्तांना केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजमार्टा एजन्सीला दीड कोटीचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपुऱ्या साधनामुळे वाहनधारकांना वेळेत वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) वाटप करता आले नाही. त्यामुळे या प्रकरणी औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रोजामार्टा एजन्सीला तब्बल एक कोटी ४६ लाखांचा दंड ठोठावला आहे, अशी माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी दिली. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा वेळेवर होत नव्हता. त्यामुळे स्मार्ट कार्ड स्वरुपातील वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) मिळविण्यासाठी वाहनधारकांना कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागत होती. सध्या स्मार्ट कार्डची प्रतीक्षा यादी शून्यावर आली आहे. तरीही अनेक ग्राहक जुनेच कार्ड न मिळाल्यामुळे परिवहन कार्यालयाच्या खेट्या मारत होते. त्यात रोजामार्ट एजन्सीने स्मार्ट कार्डचा पुरवठा वेळेत केला नाही. केवळ यंत्रणा अपुरी आहे म्हणून रोजामार्ट कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती नखाते यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आम आदमी पक्षाने दिले निवेदन

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

वाढत्या इंधन दरवाढीबाबत आम आदमी पक्षाने गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांची भेट घेऊन निवेदन दिले. इंधन दर कपातीचे अच्छे दिन कधी येणार? असा सवाल यावेळी केली.

उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्राचे सेवा कर, विविध सेस आणि पेट्रोलपंप चालकांचा नफा गृहित धरला तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर राज्यांच्या बरोबरीचे असायला हवेत. प्रत्यक्षात राज्य सरकारच्या विविध करांमुळे राज्यातील जनतेला भरमसाठ दराने पेट्रोल घ्यावे लागत आहे. रविवारपासून झालेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात सोशल मीडियावरून लोकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. हेच अच्छे दिन का, काळा पैसा कुठे आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. भविष्यात जर अशीच दर वाढत राहिले तर सायकल चालवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. या दरवाढीचा परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो. निवेदनावर सिद्धार्थ बनसोड, अशीर जयहिंद, विनोद घाटे, अर्जुन मांडवे, सतीश संचेती, मो. बशीर, अजबराव मानकर, सुग्रीव मुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भुवन येथे दूध शीतकरण केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगबाद

देवगिरी महानंद या ब्रँडने आपली उत्पादने बाजारात आणणाऱ्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने विस्तारीकरणावर भर दिला आहे. त्यातूनच सिल्लोड तालुक्यातील भुवन येथे अल्पकाळात ३० हजार लिटर क्षमतेचे शीतकरण केंद्र उभारण्यात आले आहे, अशी माहिती विधानसभा, दूध संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली.

दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देवगिरी महानंद या ब्रँडने आपली उत्पादने बाजारात आणणाऱ्या दूध संघाला जिल्ह्यातील ४७५हून अधिक प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थां नियमित दुधाचा पुरवठा करते. दूध उत्पादक सहकारी संस्था नाही, अशी ठिकाणी नवीन संस्था स्थापन करत त्यांना बळकट देणे, शेतकऱ्यांना अनुदानावर कडबा कटर, इको मिल्क वाटप, दूध तपासणी संयत्र यांसह अन्य साधनाचे वाटपावर भर दिला जात असल्याचे बागडे यांनी सांगितले. संघाने विस्तारीकरणावर गेल्या काही वर्षांत भर दिला आहे. त्याद्वारे सिल्लोड तालुक्यातील भुवन येथे दोन एकर जागेवर शीतकरण केंद्र उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी सुमारे पाच कोटी खर्च आल्याचेही त्यांनी नमूद केले. गांधेली येथील मुख्य डेअरी विस्तारीकरण, अत्याधुनिकीकरणाचे कामही गतीने सुरू असून, त्याचा आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

\Bविस्तारीकरणासाठी २० कोटी रुपये खर्च\B

दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भुवन येथील शीतकरण केंद्राचा उद्घाटन सोहळा येत्या आठ जुन रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी दिली. दरम्यान, डेअरी विस्तारीकरणासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत (एनपीडीडी) शासनाकडून दहा कोटी २६ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. प्रकल्पासाठी एकूण खर्च हा २० कोटीच्या घरात असून, उर्वरित रक्कम संघाने उभी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेकडून पीककर्ज वाटप सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप सुरू करण्यात आले आहे. बँकेला ३९८ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे टार्गेट असून, आतापर्यंत सुमारे ३७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. दरम्यान, बँकेतील नोकरी भरतीप्रकरणी सरकारने दिलेल्या चौकशी आदेशासंदर्भात पाटील यांनी, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. विधानसभा अध्यक्ष, बँकेचे संचालक हरिभाऊ बागडे, उपाध्यक्ष दामोधर नवपुते, संचालक आमदार अब्दुल सत्तार, माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील, माजी आमदार नितीन पाटील, प्रभाकर पालोदकर, अशोक मगर, फारूक शेख, अभिजित देशमुख, पुंडलिक जंगले आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर बँकेचे अध्यक्ष पाटील आणि आमदार सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बँकेच्या नोकरी भरती प्रकरणाची चौकशी करून महिनाभरात अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य सरकारने विभागीय सहनिबंधकांना दिले आहेत. याबाबत विचारले असता पाटील यांनी,'२००१ ते २००२ या कालावधीत बँकेत कर्मचारी भरती झाली होती. त्यावर काहींनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली. चौकशी झाली असून, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,' असे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले. आमदार सत्तार यांनीही प्रकरण कोर्टात आहे, निकाल लागले या स्टेजवर आहे, असे नमूद केले. दरम्यान, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध व्हावेत, यासाठी बँकेने नियोजन केले आहे. पीककर्जाचे टार्गेट ३९८ कोटी रुपये असून आतापर्यंत ३७ कोटी रुपयांच्या वर कर्ज वाटप झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. कर्जमाफीचे १६६ कोटी रुपये सभासद सदस्य असलेल्या शेतकऱ्यांना प्राप्त झाल्याचे नमूद केले.

\Bकर्मचाऱ्यांच्या बदल्या\B

जिल्हा बँकेच्या मुख्यालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वर्षानुवर्ष अन्यत्र बदल्याच केल्या जात नाही, असा आरोप काही संचालकांनी केला आहे. यावर उघडपणे कोणीही बोलत नाही. यासंदर्भात विचारले असता, 'कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार केल्या जात असून, अधिककाळ एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र बदल्या केल्या जात आहे,' अशी माहिती बँक अध्यक्षांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारशे जणांना मिळाला रोजगार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे गुरुवारी घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यातून चारशे जणांना नोकरी मिळाली. मात्र, बड्या कंपन्यांनी या मेळाव्याकडे पुरती पाठ फिरविल्याने मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची संख्याही मर्यादित होती.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये हा मेळावा घेण्यात आला. यावेळी ४०पेक्षा अधिक कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्यक्षात अठरा उद्योगांनी यात सहभाग घेत मुलाखती घेतल्या. बहुतांश मुलाखती या तांत्रिक कौशल्यधारकांसाठीच्या इलेक्ट्रिशियन, फिटर, डिझेल मॅकेनिक, प्रोजेक्ट ऑफिसर अशा विविध पदांसाठी होत्या. बारावी, आयटीआय, डिप्लोमा, बीफार्मसी, नर्सिंग, बीएएमएस, बीएचएमएच, पदवीधारकांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, आज आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे अनेक उद्योगांना असे उमेदवार मिळाले नाहीत. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी बारावी, पदवीधारक होते. विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्याही लक्षणीय होती. सकाळी नऊपासून नोंदणीची प्रक्रिया आणि त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली. अनेकांनी कंपन्यांनी लगेच नोकरी दिली, तर काहींनी पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावले. रोजगार मेळाव्याकडे बड्या कंपन्या कायम दुर्लक्ष करतात. औरंगाबादमध्ये एक हजारपेक्षा उद्योग आहेत. त्यापैकी आजच्या मेळाव्यात अठरा कंपन्यांनी सहभाग घेतला. विशेषत: मॉल, रुग्णालय, औषधनिर्माण कंपन्यांचा सहभाग होता. मेळाव्याबाबत माहिती देताना जिल्हा कौशल्य विकास अधिकारी नि. ना. सूर्यवंशी म्हणाले 'मेळाव्याचा सगळ्या स्तरातील विद्यार्थ्यांना फायदा झाला. आज चारशेपेक्षा अधिक रिक्त जागांसाठी भरती मेळावा घेण्यात आला. त्यात औषधनिर्माण, रुग्णालय अशा संस्थांचा सहभाग होता. सुरुवातीला नोंदणी मर्यादित होती नंतर वाढली.'

\B

...अशी झाली निवड

\B- १८ कंपन्या सहभागी

- ४१० रिक्त जागा

- ४०० जणांना संधी

- ५५० उमेदवारांची हजेरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परजिल्ह्यातील १०३ शिक्षक जिल्ह्यात दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागाच्या नवीन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या ३३४ शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश १० मे रोजी काढले तर, २० मे पर्यंत जिल्ह्यात १०३ शिक्षक दाखल झाले आहेत. त्यांच्या शाळानिहाय नियुक्तीचे आदेश लवकरच जिल्हा परिषदेला पुणे येथील राष्ट्रीय माहिती केंद्रातून (एनआयसी) मिळणार आहेत.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप, तसेच गोंधळ टाळण्यासाठी गेल्या वर्षी नवीन शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे़ या शासन निर्णयानंतर कक्ष अधिकारी ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांनी एकूण १७ जिल्ह्यांमधील ऑनलाइन बदल्यांसंदर्भाचे वेळापत्रक जाहीर केले होते. या अनुषंगाने औरंगाबाद विभागातील शिक्षकांकडून गेल्यावर्षी १२ मे पासून आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यानुसार काही शिक्षकांचा बदल्या झाल्या तर काहींच्या बदल्या प्रतीक्षेत होत्या.

दरम्यान, जिल्ह्यातील ३४४ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर २० मे पर्यंत जिल्ह्यात १०३ शिक्षक दाखल झाले आहेत. या सर्व शिक्षकांची जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या शाळेवर नियुक्ती करायची याचे आदेश ग्राम विकास विभागाकडून काढण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींवर संक्रांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून बुधवारी दुचाकी चोरी गेल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिल्कमिल कॉलनी, आकाशवाणी, उस्मानपुरा, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर भागात या घटना घडल्या.

दुचाकी चोरीच्या पहिल्या घटनेत अंकुर प्रकाश श्रीखंडे (वय ३७ रा. वाहेगाव ता. फुलंब्री) हे सिल्कमिल कॉलनी येथील महापालिकेच्या हॉलमध्ये मंगळवारी दुपारी एका लग्नासाठी आले होते. हॉलबाहेर त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लांबवली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना १४ एप्रिल रोजी आकाशवाणी सिग्नलजवळ घडली. ओमप्रकाश रामसिंह जांगीड (वय ३१, रा. विश्वकर्मा विहार) यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरीची तिसरी घटना मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहाच्यादरम्यान फुलेनगर (उस्मानपुरा) येथे घडली. अभिजित शंकरराव बनसोडे (वय ३३ रा. नंदनवन कॉलनी) याने त्याची दुचाकी शुभम रेस्टॉरंटसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी चोरांनी चौथ्या घटनेत बुधवारी पहाटे अडीच वाजता संजयनगर, मुकुंदवाडी येथून नवनाथ महादेव उघडे (वय ५५, रा. संजयनगर) यांची दुचाकी लांबवली. याप्रकरणी उघडे यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचव्या घटनेत चोरट्यांनी भैरवनाथ नागनाथ नाथजोगी (वय २४, रा. पुंडलिकनगर) यांची दुचाकी लांबवली. हा प्रकार नऊ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images