Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सच्चिदानंद शेवडे यांची आज प्रकट मुलाखत

$
0
0

औरंगाबाद : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त शहरात सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सावरकर साहित्याचे अभ्यासक सच्चिदानंद शेवडे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सात वाजता समर्थनगर येथील सावरकर पुतळ्यासमोर देव यांच्या मोकळ्या पटांगणावर हा कार्यक्रम होईल. सावरकर साहित्य अभ्यासक पार्थ बावस्कर मुलाखत घेतील. 'स्वातंत्र्यवीर सावरकर : आक्षेप आणि खंडण' असा हा कार्यक्रम असेल. सावरकरांचे क्रांतीमय जीवन या कार्यक्रमातून उलगडले जाईल. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंपोस्ट पीटची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोट्यवधी खर्च करूनही कंपोस्ट पीटचे काम समाधानकारक रित्या झाले नसल्याचे उघड झाल्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांनी कंपोस्ट पीटचे बांधकाम थांबवले आहे. खर्चाची व कंपोस्ट पीटच्या बांधकामाच्या दर्जाची चौकशी झाल्यानंतर व त्याबद्दल सर्वसाधारण सभेत धोरण ठरविल्यानंतर उर्वरित पीट बांधण्याबद्दल निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

कंपोस्ट पीटवर साडेसहा कोटी रुपये खर्च केले. मात्र, हा निधी कुठे मुरला याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रकाशित केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासन आणि कारभारी खडबडून जागे झाले आहेत. कंपोस्ट पीटच्या बांधकामाबद्दल व एकूणच साफसफाईबद्दल महापौरांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत कंपोस्ट पीट बांधकामाबद्दल आढावा घेण्यात आला. ४३० कंपोस्ट पीट बांधायचे होते, त्यापैकी १७० पीटचे बांधकाम होणे बाकी आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ज्या पीटचे बांधकाम बाकी आहे, ते तसेच राहू द्या. बांधकाम करू नका असे महापौरांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कंपोस्ट पीटच्या बांधकामावर झालेला खर्च, पीटच्या बांधकामाचा दर्जा याची चौकशी झाल्यावर सर्वसाधारण सभेत धोरण ठरविले जाईल. त्यानुसार उर्वरीत पीटचे बांधकाम करा, असे आदेश महापौरांनी दिले. हर्सूल - सावंगी येथील तलावाच्या शेजारी असलेल्या विहिरीला देखील महापौर व पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. विहिरीच्या जवळ टाकण्यात आलेला कचरा काढून टाका, अशी सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आली. कचऱ्याचे वर्गीकरण करूनच या ठिकाणी कचरा आणा असे त्यांनी स्पष्ट केले.

\Bदुग्धनगरीच्या जागेवर कचरा

\Bगरवारे स्टेडियमच्या शेजारी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काम केले जाणार आहे. याला नगरसेवक राजू शिंदे यांनी विरोध केला होता. त्यामुळे गरवारे स्टेडियमच्या शेजारी कचरा न टाकता चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवर कचरा टाका अशी सूचनाही महापौरांनी अधिकाऱ्यांना केली.

ज्या कंपोस्ट पीटचे बांधकाम बाकी आहे ते तसेच राहू द्या. कंपोस्ट पीटच्या बांधकामावर झालेला खर्च, पीटच्या बांधकामाचा दर्जा याची चौकशी झाल्यावर सर्वसाधारण सभेत धोरण ठरविले जाईल.

- नंदकुमार घोडेले, महापौर

\Bकचऱ्यात घोळ

\B- ४३० कंपोस्ट पीट

- २६० पीटचे बांधकाम पूर्ण

- १७० पीटचे बांधकाम अपूर्ण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांना आपत्ती निवारणाचे धडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोणतीही आपत्ती सांगून येत नसते. मानवी किंवा नैसर्गिक आपत्तीवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे असे मार्गदर्शन 'एनडीआरएफ'च्या प्रशिक्षकांनी केले. 'आव्हान' शिबिरात १२०० प्रशिक्षणार्थींना आपत्ती निवारणाचे धडे देण्यात आले. या शिबिरात प्रशिक्षकांनी दोन सत्रात माहिती दिली.

राज्यपाल कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय आव्हान शिबिर सुरू आहे. आपत्तीवर मात करण्यासाठी व्यवस्थापन कसे करावे याबाबत शनिवारी मार्गदर्शन करण्यात आले. नाट्यगृह, वनस्पतीशास्त्र विभाग, मराठी विभाग, अर्थशास्त्र विभाग, प्राणीशास्त्र विभाग, वाणिज्य विभाग आणि सिफार्ट सभागृहात विद्यार्थ्यांना 'एनडीआरएफ'च्या प्रशिक्षकांनी आपत्ती निवारणाचे धडे दिले. आपत्ती आल्यानंतर पहिल्या टप्प्यात व्यवस्थापन गरजेचे असते. पहिल्या टप्प्यात यश आल्यास नंतर तिच्यावर मात करता येते असे तज्ज्ञांनी सांगितले. १४ विद्यापीठात १२२२ विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले आहेत. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येत्या तीन जूनपर्यंत शिबीर सुरू राहणार आहे. शिबिरार्थींची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

\Bअखेर जेवणाची पाहणी

\Bआव्हान शिबिरात विद्यार्थ्यांच्या जेवणाची आबाळ झाल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने शनिवारी प्रसिद्ध केले. या पार्श्वभूमीवर कुलगुरू बी. ए. चोपडे यांनी दुपारी भोजन कक्षाला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांसोबत जेवण करुन जेवण रूचकर असल्याचा अभिप्राय दिला. तसेच व्यवस्थेत उणिवा ठेवू नका अशा सूचना स्वयंसेवकांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची आत्महत्या

$
0
0

औरंगाबाद : काम करीत नसल्याने वडील रागवल्यामुळे बारावीत शिकणाऱ्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खेड (रा. खुलताबाद) येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुनील कोंडिराम चव्हाण (वय १८) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकाश्रमात वृद्धाचा मृत्यू

$
0
0

औरंगाबाद : सातारा तांडा येथील ओंकार बालकाश्रमात राहणाऱ्या ६६ वर्षीय वृद्धाचा रक्ताच्या उलट्या झाल्याने शुक्रवारी (२५ मे) मृत्यू झाला. महेश मधुकर देशपांडे असे मृताचे नाव आहे. कौटुंबिक कारणांनी देशपांडे गेल्या पाच वर्षांपासून या आश्रमात रहात होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना यकृताचा त्रास होता. शुक्रवारी देशपांडे यांना रक्ताच्या उलट्या झाल्याने त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांनी दहा वर्षांपूर्वी अवयवदानाचे संमतीपत्र भरुन दिले होते. मात्र, नियमानुसार मृत्यूचे कारण स्पष्ट न होऊ शकल्याने त्यांचे अवयवदान होऊ शकले नाही, अशी माहिती संस्थेचे सचिव अनिल घोराळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखिल भारतीय छावा संघटनेचे बुधवारी अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखिल भारतीय मराठा युवा संघटनचे ११ वे राष्ट्रीय अधिवेशन बुधवारी २९ मे रोजी औरंगाबादेत होत आहे. (कै.)अण्णासाहेब जावळे यांच्या प्रेरणेने बांधलेल्या संघटनेच्या अधिवेशनासाठी मराठवाड्यासह राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत, अशी माहिती संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, सल्लागार भगवान माकणे, स्वागताध्यक्ष अप्पासाहेब कुढेकर, जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शिवाजीराव मार्कंडे, विशाल सूर्यवंशी, अशोक मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. जावळे म्हणाले, 'अखिल भारतीय छावा संघटनेचा २० वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे. आमच्या अधिवेशनात हीच प्रमुख मागणी असणार आहे. मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्नांकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कोपर्डी घटनेनंतर राज्यात ५८ मोर्चे निघाले. राज्य सरकारकडे आरक्षणाची मागणी केली, पण त्यावर अजूनही काहीच निर्णय झालेला नाही. यापुढे आम्ही आरक्षणासाठी अधिक उग्र स्वरुपाचे आंदोलन उभारणार आहोत. त्याची दिशा या अधिवेशनातून ठरविली जाईल. मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही,' असा इशारा त्यांनी दिला. विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे म्हणाले, 'राज्यात खाजगी क्लासेसचे पेव फुटले आहे. याठिकाणी फिसला कुठलेच नियंत्रण नाही. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी भरडले जात आहेत. याविरोधात अखिल भारतीय छावा संघटना आंदोलन छेडणार आहे.'

\Bहार्दिक यांची उपस्थिती

\B'सिडको एन पाच येथील राजीव गांधी मैदानावर बुधवारी २९ मे रोजी दुपारी चार वाजता अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे ११ वे राष्ट्रीय अधिवेशन होईल. अधिवेशनासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांची उपस्थिती असणार आहे. पटेल गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत, तर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रात २० वर्षांपासून लढत आहोत,' असे जावळे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांचे आज व्याख्यान

$
0
0

औरंगाबाद : ज्येष्ठ साहित्यिक, पानिपतकार विश्वास पाटील यांचे रविवारी पानिपत या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या पानिपत या कादंबरीत ३० वर्षे पूर्ण होत आहेत. हे व्याख्यान रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता एमजीएम कँपस येथे होईल. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते हस्ते उदघाटन होईल. उद्योजक पद्माकरराव मुळे अध्यक्षस्थानी असतील. लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे. के. जाधव, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी सोहम वायाळ प्रमुख पाहुणे असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तापमान @ ४२

$
0
0

औरंगाबाद : शहरात उन्हाचा पारा चढल्यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. चिकलठाणा वेधशाळेत शनिवारी कमाल ४२ सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली. दुपारी उन्हाची काहिली प्रचंड वाढल्यामुळे नागरिक घामाघूम झाले. सायंकाळी पाच पर्यंत शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी कमी होती. येत्या दोन दिवसानंतर तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापाऱ्यांनी दबावगट निर्माण करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील स्थिती पाहता सर्वत्र शांतता निर्माण करण्याची गरज असून व्यापाऱ्यांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी, प्रगतीसाठी संघटित होत एक दबाब गट निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केले.

सिडको परिसरातील व्यापारी वर्गाच्या पुढाकाराने येथील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात शनिवारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अजय शहा, लक्ष्मीनारायण राठी, नारायणअण्णा सुरगोणीवार, राजन हौजवाला यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना काळे म्हणाले, व्यापाऱ्यांनी अडचण येते तेव्हाच एकत्र येऊ नये. तर नेहमी संघटित राहणे गरजेचे असून प्रश्न सोडविण्यासाठी, व्यापार क्षेत्राच्या प्रगतीसाठी दबाबगट निर्माण करणे आवश्यक आहे. मालाणी यांनी बदलत्या काळानुसार अधिक जागरुक राहत व्यापाऱ्यांनी अपडेट राहणे आवश्यक असल्याचे आवाहन केले. शहा यांनी व्यापारी महासंघाच्या कार्याविषयी माहिती देत व्यापारी संघटना केवळ समस्या सोडविण्यासाठी नव्हे, तर प्रगतीसाठी एक मार्ग असल्याचे नमूद केले. व्यापाऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा हवी. हॉकर्स झोन तयार करण्यासाठी महापालिका अधिकारी, व्यापारी प्रतिनिधी आदींचे एक समितीमार्फत काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोतील व्यापारी बद्रीनारायण ठोंबरे यांनी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी मांडतानाच संघटनेच्या माध्यमातून सर्वांनी एक छताखाली यावे, असे आवाहन केले. सरदार हरीसिंग, विजय जैस्वाल, ज्ञानेश्वर खर्डे, कृष्णा ठोंबरे, गणेश काळे, विलास कोरडे, विठ्ठलराव टेहरे, माणिक कोमटकर आदी उपस्थित होते.

\Bकार्यकारिणी निवड स्थगित

\Bमेळाव्यात सिडको व्यापारी संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात येणार होती. मात्र, सिडकोतील सर्व सेक्टरमधील व्यापारी उपस्थित नसल्याचा मुद्दा समोर आला. त्यावर संयोजकांनी तातडीने कार्यकारणी निवड स्थगित करण्याचा निर्णय घेत निवडीसाठी लवकरच बैठक घेऊ असे नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज वर्षपूर्ती कार्यक्रम

$
0
0

औरंगाबाद : सेवा फाउंडेशनच्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी 'पुन्हा एक आंबा आनंदाचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धार्थ गार्डन येथे सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल, अशी माहिती फाउंडेशनचे सुमीत खांबेकर यांनी दिली. कार्यक्रमात बाबासाई एड्सग्रस्त बालगृहातील मुलांना आंबे वाटप केले जाणार आहे तसेच संस्थेला किराणा, शैक्षणिक साहित्य, मिक्सर, कुकर, आदी विविध साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलग्रस्त भागात डीसीपी, एसीपींची रात्रपाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलग्रस्त भागात कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी दोन पोलिस उपायुक्त व सहायक पोलिस आयुक्तांसह चार पोलिस निरीक्षकांची रात्रपाळी लावण्यात आली आहे. या परिसरात कोठलाही अनुचित प्रकार घडू नये या बाबत प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना केल्या आहेत.

जिन्सी, क्रांती चौक आणि सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या गस्ती वाढवण्यात आल्या आहेत़ शिवाय पोलिस उपायुक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना महिन्यातून तीन वेळा रात्रीच्या गस्ती रोबरच रात्रपाळी बंधनकारक करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आली आहेत. दोन आठवड्यांपूर्वी शहात दंगल भडकल्याने यात समाजकंटकांनी दुकांनांची जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड केली. आता रमजान महिना सुरू असल्याने या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये. गुन्हेगारावर वचक निर्माण व्हावा यासाठी उपायुक्त (डीसीपी) व सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) यांनी महिन्यातून तीन दिवस रात्री अचानक गस्त घालून बंदोबस्ताची पाहणी करण्याचे आदेश भारंबे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोदी सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली. या चार वर्षांत सरकारने जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक, व्यापाऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे शहर काग्रेसच्या वतीने शनिवारी काळा दिन पाळण्यात आला आणि केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

क्रांतीचौक येथे हा कार्यक्रम झाला. शहराध्यक्ष नामदेव पवार, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, शहराध्यक्ष सरोज मसलगे, पृथ्वीराज पवार, ओबीसी अध्यक्ष अनिल माळोदे, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे, खालेद पठाण, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, सायली जमादार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यांच्या वादामुळे दंगल भडकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राजाबाजार भाग चार पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत येतो. त्यामुळे दंगल झाल्यावर कोणत्या पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी सर्वप्रथम तेथे जायचे याचा निर्णय लगेचच झाला नाही आणि त्यामुळे दंगल भडकली,' असा आरोप शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. 'मुख्यमंत्र्यांना भेटून या दंगलीची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी आपण करणार आहोत,' असे ते म्हणाले.

रावते शनिवारी शहरात होते. त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. दंगलीची झळ ज्यांना पोचली त्यांच्याशी देखील चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'दंगल पूर्वनियोजित आहे असे वाटते. दंगलीमध्ये ठराविक जुनी दुकाने जाळण्यात आली. दहशत माजवण्याचा त्यामागे हेतू होता असे वाटते. पोलिस व गुप्तचर यंत्रणेला दंगलीबद्दलची पूर्वकल्पना यायला हवी होती, पण या दोन्हीही यंत्रणा अपयशी ठरल्या. राजाबाजार भाग चार पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत येतो. त्यामुळे कोणत्या पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अगोदर जायचे हे ठरले नाही. पोलिस उशीरा आले आणि त्यामुळे दंगल भडकली. या दंगलीची स्वतंत्रपणे चौकशी करा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. त्यासाठी येत्या मंगळवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ' असे रावते म्हणाले. रावते यांनी प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ, लक्ष्मीनारायण बाखरिया यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक रेणुकादास वैद्य, विकास जैन, राजू बागडे, संतोष जेजुरकर, बाळासाहेब थोरात, रमेश इधाटे, प्रफुल्ल मालाणी आदी उपस्थित होते.

राजाबाजार भाग चार पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत येतो. त्यामुळे कोणत्या पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अगोदर जायचे हे ठरले नाही. पोलिस उशिरा आले आणि त्यामुळे दंगल भडकली. या दंगलीची स्वतंत्रपणे चौकशी करा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. त्यासाठी येत्या मंगळवारी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ.

- दिवाकर रावते, परिवहन मंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळ घाटीत दाखल

$
0
0

औरंगाबाद : दंगलीप्रकरणातील आरोपी असणारा युवा सेनेचा पदाधिकारी आणि शिवाजीनगर भागाचा नगरसेवक राजेंद्र जंजाळ याला छातीत दुखत असल्यामुळे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दंगल प्रकरणात जंजाळ याच्यावर दुकाने जाळण्याचा आरोप असून त्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशामुळे त्याची सध्या हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी जंजाळच्या छातीत दुखत असल्याने त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्थाचालिकेला ७० लाखाचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षकांची संच दुरुस्ती मान्यता मिळवून देतो; तसेच प्रलंबित कामे करून देतो, अशी थाप मारीत संस्थाचालिकेची ७० लाखांची फसवणूक करण्यात आली. शंकर बाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेसोबत हा प्रकार नोव्हेंबर २०१५ ते मे २०१८ या कालावधीत घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी; रेखा चंद्रकांत रेखे (वय ४३, रा. शास्त्रीनगर, जवाहर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. रेखे या बजाजनगर येथील शंकरबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष असून, पुष्पा रामचंद्र जोशी या अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या वतीने बजाजनगर येथे त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा चालवण्यात येते. या शाळेमध्ये २३ शिक्षक असून, १५ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता नाही; तसेच शाळेचे काही अनुदान दुरुस्ती लिपिक सेवक पदे मंजूर करण्याचे काम प्रलंबित आहे. याबाबत जिल्हा परिषदेत प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे काम रेखे यांच्याकडून सुरू होते.

दरम्यान, त्यांच्या शाळेचा शिपाई सुनील गोपाल चौधरी यांने त्यांचा परिचय रामेश्वर महादेवराव कानघुले (वय ३८ रा. आर्च संकुल, गारखेडा परिसर, शिवाजीनगर) याच्याशी करून दिला होता. कानघुले याने त्याची अमरावती येथे मान्यताप्राप्त शाळा असल्याचे सांगितले. आपली जिल्हा परिषद व मुंबई मंत्रालयात ओळखी असल्याचे सांगत शिक्षकांच्या संच मान्यतेचे व इतर प्रलंबित कामे करू देतो, अशी थाप मारली. या संच मान्यतेसाठी ७० ते ८० लाख रुपये लागणार असल्याचे कानघुले यांने सांगितले. रेखे यांनी शिक्षकांना याबाबत माहिती दिली असता शिक्षकांनी या कामासाठी तयारी दर्शवली. यानंतर कानघुले याला वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ७० लाख रुपये देण्यात आले. ही रक्कम घेतल्यानंतर कानघुले याने संस्थेचे काम करण्यास टाळाटाळ केली. कानघुले याचा पाठपुरावा करण्यात आला असता उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रेखे यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी रामेश्वर कानघुले याला अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानिपत हे मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'तरुण सरदारांचे युद्ध ठरलेल्या पानिपतमध्ये मराठ्यांची मोहम्मदशहा अब्दालींवर मोठी दहशत होती. पानिपतमध्ये युद्धाची शिस्त, यंत्रतंत्र मोडली गेली. निसर्गही एकाकी पडलेल्या मराठ्यांच्या विरोधात होता. असे असले तरी पानिपत हे प्रत्येक मराठ्यांनी मानवंदना करावी अशी पराक्रमाची गाथा असून त्याचे जतन झाले पाहिजे,' असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.

छत्रपती संभाजी राजे जयंती तसेच पानिपत या कादंबरीस तीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने रविवारी बुलंद छावा संघटनेतर्फे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जे. के. जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे हे होते. यावेळी मंचावर कैलास पाटील, 'मटा'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने, जिल्हा बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांची उपस्थिती होती.

पानिपत कादंबरीचा प्रवास सांगताना विश्वास पाटील म्हणाले की, कादंबरीला प्रारंभ करत असताना अनेकांनी विरोध केला. कादंबरीच्या नावावरूनही अनेकांनी नाके मुरडली. १४ जानेवारी पानिपत येथे स्थानिक रोड मराठा व इतर ठिकाणचे लाखो मराठा शूरवीरांचे स्मरण करून मानवंदना देतात. तेथे युद्धादरम्यानचा काळा आंब आहे, तसेच भाऊसाहेब पेशव्यांनी मुक्काम केल्यामुळे नाव पडलेल्या भाऊपूरमधील लोक भाऊसाहेबांच्या नावाचे पोवाडे गातात, असे पाटील यांनी सांगितले.

१४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपत युद्धातील लाखो मराठ्यांना रसद कमी पडली, पाणीही तोडले होते. हे सैनिक तीन आठवडे उपाशी होते. झाडांची पाने, माती खाण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यावेळी मराठी फौजाच्या अंगात जिद्दीच्या ज्वालामुखी शिवाय काहीच नव्हते. गनिमी काव्यांने लढणाऱ्या मराठ्यांना सपाट जमिनीवर लढावे लागले होते. त्यातच भाऊबंदकीचा वाद, युद्धाची मोडलेली शिस्त व निसर्गही विरोधात असल्यामुळे पराभव झाला तरी अब्दालीचा विजय झाला नाही. त्याला युद्धाचे श्रेय घेता आले नाही, असे प्रतिपादन अनेक दाखले देत पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज गायके, सूत्रसंचालन जयश्री जाधव-पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश वाकडे, नानासाहेब कुटे, संदीप चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

\Bखेडी राहिली, तर देश राहील \B

यावेळी रा. रं. बोराडे म्हणाले की, आज राज्यातील खेडी धुमसत आहेत. शेतीचे तुकडे पडत आहेत. एकही गाव वेशीच्या बाहेर निघाले नाही. खेड्यांना शहरे गिळत आहेत. खेड्यात जमिनीचे तुकडे पडत असल्यामुळे हातपाय पसरायला जागा राहिली नाही. शेतीचे पडत असलेले तुकडे थांबवल्याशिवाय ही समस्या सुटणार नसल्याचे बोराडे यांनी सांगितले. आता खेड्यात शेतकरी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र घरांची योजना आणण्याची गरज आहे. खेड्यातील माणसेही वेशीच्या बाहेर पडण्याची गरज असल्याचे बोराडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांनी सावरकारांचा आदर्श समोर ठेवावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आजच्या परिस्थितीचा विचार करता तरुण, तरुणींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीतर्फे रविवारी 'स्वातंत्र्यवीर सावरकर:आक्षेप आणि खंडन' विषयावर सच्चिदानंद शेवडे यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. पार्थ बावस्कर यांनी त्यांची मुलाखत घेतली. सावरकरांची उडी, अंदमान पर्व, स्थानबद्धतेचे राजकारण आदी मुद्यांवर शेवडे यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, द्विराष्ट्रवादाचे जनक सावरकर नव्हते, तर अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमदखान यांनी हा सिद्धांत मांडला. उलट सावरकरांनी सर्व जातीधर्मांना सामावून घेणाऱ्या भारताचे स्वप्न पाहिले होते. अंदमानातून सुटका व्हावी यासाठी सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली, असे बोलले जाते. मात्र, ही राजकीय हेतुने केलेली चिखलफेक आहे, असे ते म्हणाले.

यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हा प्रमुख अंबदास दानवे, विश्व परिषदेचे संजय बारगजे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, समितीचे अध्यक्ष आनंद तांदुळवाडीकर, भाऊ सुरडकर, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, कीर्ती शिंदे, सचिन वाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

\Bआपल्या सरकारचे दुर्लक्ष

\B

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवे, अशी मागणी शेवडे यांनी केली. आपलं आपलं सरकार म्हणतो, या सरकारला चार वर्ष पूर्ण झाली. परंतु, अद्याप त्यांना सावकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय घेता आला नाही. सावकरांची वास्तु खरेदी करून त्याला आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याचा विचार ही राज्य सरकार करत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन कोटी झाडांसाठी फक्त सव्वा कोटी खड्डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड मोहिमेत गेल्यावर्षी मराठवाडा विभागाने एक कोटी ५ लाख वृक्षांची लागवड केली असली, तरी यावर्षीचे उद्दिष्ट तब्बल तीन कोटी आहे. विभागीय प्रशासनाने चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट सर्व यंत्रणांना दिले असून वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याची अंतिम मुदत ३१ मे आहे. मात्र मराठवाड्यात आतापर्यंत केवळ एक कोटी १७ लाख खड्डे तयार असल्याने ही मुदत हुकण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात वनाखालील जमीनीचे प्रमाण वाढणे आवश्यक असल्याने गेल्या काही वर्षांपासून विभागात मोठ्याप्रमाणावर वृक्षलावगडीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यंदाही पावसाळ्यापूर्वी वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी सर्व विभागांना वृक्षलावगडीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. मे महिन्याच्या अखेरीसही खड्डे खोदण्याच्या कामाची संथगती कायम आहे. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी वृक्षलागवडीसंदर्भात नुकतीच संबंधित विभागांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खड्ड्यांचे खोदकाम येत्या ३१ मे पूर्वीच करावे तसेच खड्डे खोदणे व इतर सर्व तयारी विषयक कामांची माहिती ऑनलाइन द्यावी, अशा सूचना केल्या. मात्र विभागीय आयुक्तालयातील वृक्षलागवड कक्षामध्येच दररोज माहिती अपडेट होत नसल्याचे चित्र आहे. भागात सध्या एकूण आठ कोटी ६० लाख रोपे उपलब्‍ध आहेत.

सध्या तीन कोटी वृक्षलागवडीच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात १७ लाख, बीड १७ लाख, हिंगोली १६ लाख, जालना ८ लाख, लातूर ११ लाख, नांदेड २१ लाख, उस्मानाबाद १३ लाख तर परभणी जिल्ह्याात १० लाख असे एकूण एक कोटी १७ लाख खड्डे तयार करण्यात आले आहेत.

...

\B८ कोटी ६० लाख

उपलब्ध रोपे

...\B

\Bवृक्षलागवडीसाठी

खोदलेले खड्डे \B

औरंगाबाद १७ लाख

बीड १७ लाख

हिंगोली १६ लाख

जालना ८ लाख

लातूर ११ लाख

नांदेड २१ लाख

उस्मानाबाद १३ लाख

परभणी १० लाख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुनर्जन्मा’नंतर जन्म नव्या जिवाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातत्याने हिमोग्लोबिन कमी होत होते; परंतु त्यामागचे कारण कळत नव्हते. चाचणीनंतरच मूत्रपिंड निकामी झाल्याचे विसाव्या वर्षी लक्षात आले. आईने मूत्रपिंडदान केले आणि प्रत्यारोपणानंतर या तरुणीने उत्तम गुण मिळवत पदवी मिळवली. पदव्युत्तर शिक्षण घेताना सर्व परिस्थिती माहीत असताना एका उमद्या तरुणाने लग्नाची मागणी घातली आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतलेली तरुणी रेशीम बंधनात अडकली. दोघांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता, पण पोटात मूल वाढत असल्याचे लक्षात येताच काही झाले तरी बाळाला जन्म द्यायचा धाडसी निर्णय घेतला. दोघांच्या धीरोदात्त प्रेमाने समाजापुढे वस्तुपाठ घालून दिला आहे.

ही तरुणी म्हणजे अवंती प्रवीण लव्हेकर. किनवट येथील अवंतीची यांची आई वंदना या शिक्षिका, तर वडील अविनाश दुर्गपुरोहित हे शिक्षक पतसंस्थेत कर्मचारी आहेत. अवंती या लहानपणापासून चुणचुणीत, मनमिळावू होत्या. नेहमीच उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या अवंती यांना रक्तातील लोहाचे प्रमाण घटण्याचा म्हणजेच अॅनेमियाचा त्रास होता. 'बीसीएस'च्या पहिल्या वर्षाला असताना त्यांना कमालीचा थकवा जाणवू लागला. हात-पाय-अंगदुखीने त्या कासावीस होत असत. त्यावेळी त्यांचे हिमोग्गलोबिन ३.५ पर्यंत खाली गेले होते. पुढील उपचार-सल्ल्यासाठी औरंगाबाद येथील ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर यांच्याकडे पाठवण्यात आले असता दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झाल्याचे लक्षात आले. हा कुटुंबियांना मोठा धक्काच होता. त्यांचे डायलिसिस सुरू झाले. डॉक्टरांनी प्रत्यारोपणाचा पर्याय समोर ठेवताच कुटुंबातील अनेकजण मूत्रपिंडदानासाठी पुढे आले. अवंती यांच्या आईचे मूत्रपिंड वैद्यकीयदृष्ट्या जुळले व प्रत्यारोपणासाठी सर्वोत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईनेच किडनीदानाचा निर्णय घेतला. २५ जुलै २०११ मध्ये कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये यशस्वी प्रत्यारोपण झाले. विशेष म्हणजे प्रत्यारोपणानंतर अवघ्या पाचव्या महिन्यांत त्यांनी 'बीसीएस' प्रथम वर्षाची परीक्षा जिद्दीने दिली. त्यांनी ७० टक्के गुण मिळवत पदवी घेतली. २०१४ मध्ये 'एमएससी'ला प्रवेश घेतला. या दरम्यान त्यांच्या परिचयातील नांदेड येथील प्रवीण लव्हेकर यांनी लग्नाची मागणी घातली. प्रत्यारोपणानंतर लग्न न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतलेल्या अवंती व तिच्या कुटुंबीयांनी प्रवीणला सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली, तरी प्रवीणने तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेत तिला प्रेमाची साद घातली. अवंती यांनी प्रेमाला प्रतिसाद दिला आणि दोघांचे २०१४ मध्ये सर्वांच्या संमतीने लग्न झाले.

....

\Bदोघे आनंदी-समाधानी\B

प्रत्यारोपण व त्या अनुषंगाने येणाऱ्या गुंतगुंतीमुळे दोघांनी दत्तक मूल घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गर्भात मुल वाढत असल्याचे लक्षात आले तेव्हा अवंती यांनी काहीही झाले तरी मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. अर्थात, डॉ. बावीकर यांची संमती व भक्कम पाठिंबा दिल्यामुळ‍े अवंती यांचा आत्मविश्वास दुणावला. त्यानंतर डॉ. हेगडेवार रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्त्र डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर यांच्याकडे उपचार सुरू झाले. पाचव्या महिन्यापासून अवंती या कुटुंबासह औरंगाबाद येथेच राहण्यासाठी आले. कुठलीही गुंतागुंत न होता त्यांनी २०१७ मध्ये संपूर्ण नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण करून अडीच किलोंच्या सशक्त बाळाला जन्म दिला. हाच अर्णव आज दहा महिन्यांचा झाला असून अवंती वप्रवीण समाधानी आहेत.

....

मी रडत बसण्यापेक्षा प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर सकारात्मक पद्धतीने विचार केला. लवकरच 'एमएसस्सी' पूर्ण करेन. स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी करुन दाखवायचे आहे.

- अवंती लव्हेकर, प्रत्यारोपित रुग्ण

...

मला अवंती आवडली होती आणि काही झाले तरी तिच्याशीच लग्न करण्याचा मी निर्णय घेतला होता. अवंतीने होकार दिला आणि घरच्यांनीही साथ दिली, हे महत्वाचे.

- प्रवीण लव्हेकर, अवंती यांचे पती

....

अवंतीला खूप वर्षांपासून अॅनेमिया होता. मात्र 'किडनी फंक्शन टेस्ट' न करता इतर सर्व उपचार करण्यात येत होते. यावरून 'केएफटी'चे महत्त्व अधोरेखित होते.

- डॉ. सुहास बावीकर, ज्येष्ठ मूत्रपिंडविकारतज्ज्ञ

...

अशा केसेसमध्ये नैसर्गिक प्रसुती धोक्याची ठरू शकते. त्यामुळे सिझेरियनचा निर्णय घेण्यात आला. अशी ही केस आमच्या रुग्णालयातील पहिली केस आहे.

- डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर, स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. हेडगेवार रुग्णालय

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर जयंतीनिमीत्त आज मिरवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी आठ वाजता समर्थनगर येथील सावरकर पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे; तसेच सायंकाळी पाच वाजता मिरवमुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सिटीचौक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळ्यापासून या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. समर्थनगर येथील सावरकर पुतळ्याजवळ या मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images