Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आजी, माजी, भावी आमदारांत श्रेयवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

बिडकीन पाणीपुरवठा योजनेचे श्रेय घेण्यावरून तालुक्यातील राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. योजनेसाठी कोणताही पाठपुरवा न करता आमदार संदीपान भुमरे योजनेचे उद्घाटन करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने केला आहे. तर, माझ्या आमदारकीच्या काळात मंजूर झालेल्या कामांचेच मी उद्घाटन करतो, असा दावा आमदार भुमरे यांनी केला आहे.

नेहमीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बिडकीनच्या अठरा कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर व आमदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्याचे आले. विशेष म्हणजे, उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या स्थानिक नेत्या व्यतिरिक्त इतर पक्षाच्या स्थानिक नेत्याना निमंत्रण देण्यात आले नसल्याने, त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. मी आमदार असताना, बिडकीनची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली व तत्कालीन

मंत्र्यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन केले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे यांनी दिली. या योजनेशी आमदार संदीपान भुमरे यांचा कोणताही सबंध नसताना ते या योजनेचे श्रेय घेत लोकार्पण करत असून ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचा आरोप वाघचौरे यांनी भुमरे यांच्यावर केला आहे.

दुसरीकडे, भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे ही योजना पूर्णत्वास गेल्याचा दावा भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनी केला आहे. योजना पूर्ण व्हावी यासाठी झटणाऱ्या आमच्या नेत्याला आमंत्रित न करता आमदार भुमरे हे बालिशपणे योजनेचे उद्घाटन करत असल्याचे शिसोदे म्हणाले. या आरोपांचे उत्तर देताना आमदार संदीपान भुमरे म्हणाले, २०१४ मध्ये मी आमदार झाल्यानंतर या योजनेला मंजुरी मिळाली. मी सतत पाठपुरवठा केल्याने चार वर्षात ही योजना पूर्ण झाली. योजनेचे श्रेय घेत असल्याचा विरोधकांचा आरोप खोटा असून माझ्या आमदारकीच्या जवळपास २५ वर्षांच्या कालावधीत मी लोकांच्या कामांचा कधीच श्रेय घेतला नसल्याचा दावा आमदार भुमरे यांनी केला आहे.

..

बिडकीनची पाणीपुरवठा योजना पूर्ण व्हावी यासाठी झटलो म्हणून आज हक्काने योजनेचे उद्घाटन केले. विरोधकांना आता आरोप करण्याशिवाय कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही.

-संदीपान भुमरे, शिवसेना आमदार, पैठण

माझ्या आमदारकीच्या काळात या योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेची एक टक्काही माहिती नसलेले आमदार भुमरे या योजनेचे उद्घाटन करत आहे. हे तालुक्याचे दुर्दैव्य आहे.

-संजय वाघचौरे, माजी आमदार

खासदार रावसाहेब दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष दिल्याने बिडकीनची पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. योजनेशी कोणताही संबंध नसणारे याचे उद्घाटन करत आहेत.

-तुषार शिसोदे, तालुकाध्यक्ष भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अशोक वीरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गुलमोहोर कॉलनी सिडको एन पाच वॉर्डाचे माजी नगरसेवक अशोक वीरकर यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत वीरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, डॉ. भागवत कराड, एकनाथ जाधव, अनिल मकरिये, विजय औताडे, हेमंत खेडकर, शिवाजी दांडगे, श्रीनीवास कुलकर्णी, राहुल गाडीवान, कल्याण दांगोडे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको उड्डाणपुलाचे नामकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथील वसंतराव नाईक चौकात असलेल्या उड्डाणपुलाचे 'स्वातंत्रवीर सावरकर उड्डाणपूल' असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाला राष्ट्रीय बंजारा परिषदेने विरोध केला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यांतर उद्घाटन सोहळा पार पडला.

जालना रोडवरील वसंतराव नाईक चौकात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाठ, महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, देव पटेल, अनिल पैठणकर, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे, गजानन बारवाल, सचिन खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यापूर्वी बंजारा परिषदेने नामकरणाला विरोध केला. वसंतराव नाईक चौक असल्याने पुलाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. महापौरांनी समजून सांगितल्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. यावेळी माजी महापौर भगवान घडामोडे, काँग्रेसचे भाऊसाहेब जगताप, नगरसेवक राजू वैद्य, मकरंद कुलकर्णी, सिद्धांत शिरसाठ, मनोज गांगवे, सत्यभामा शिंदे, कीर्ती शिंदे, नितीन साळवी, जयश्री कुलकर्णी, शरद भोगले, सावरकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद तांदुळवाडीकर, भाऊ सुरडकर, जालिंदर शेंडगे आदींची उपस्थिती होती.

\Bभाजप-शिवसेनेत श्रेयाची लढाई\B

उड्डाणपुलाच्या नामकराचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप, शिवेसेनेने केला. भाषणात अतुल सावे म्हणाले, उड्डाणपुल उभारणीसाठी आपणही प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी 'बारसे आम्ही करत आहोत,' असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शहानगरमध्ये वैध नळ जोडणी द्या’

$
0
0

औरंगाबाद : सिल्क मिल कॉलनी परिसरातील शहानगरात अनेकांना अद्याप नळ जोडणी देण्यात आलेली नाही. या भागात अधिकृतरित्या नळ जोडणी द्यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. सिल्क मिल कॉलनीमधून शहराची मुख्य जलवाहिनी शहरात येते. मात्र, शहानगरमधील मीना मशिदी शेजारच्या भागाला अद्याप पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या परिसरातील नागरिक महापालिकेकडे नळ जोडणीसाठी शुल्क भरण्यास तयार आहेत. त्यासाठी विशेष शिबिर घेऊन वैध नळ जोडणी द्यावी, अशी मागणी युवा क्रांती दलाचे नीलेश शिंदे यांच्यासह फिरोज खान, शेख इमाम, अली खान, शाहेद मिर्झा आदींनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धेत मटकावले पटापट आंबे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा रोलर रिले स्केटिंग असोसिएशनतर्फे आयोजित आंबे खाण्याची स्पर्धा रविवारी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सामील झालेल्या मुलांनी आंबे खाण्याचा आनंद तर मिळवलाच पण, बक्षीसही पटकावले.

ही स्पर्धा रविवारी सायंकाळी पाच वाजता विभागीय क्रीडा संकुलात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विविध वयोगटात स्पर्धकांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण संघटनेचे सचिव भिकन अंबे, जितेंद्र तांदळे, राजेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधिका अंबे, गणेश आंबेकर, अनिल जाधव, मीना कमलेश आदींची उपस्थिती होती.

\Bस्पर्धेतील विजेते \B

\B१० वर्षांपर्यंत \B

१ कृष्णा कटकुरे

२ साईरिनेश नटराजन

३ लक्ष्य उपाध्याय

\B१२ वर्षांपर्यंत \B

१ उज्ज्वल आंबेकर

२ अर्नव मोदी

३ ऋषभ मोहिते

\B१४ वर्षांपर्यंत \B

१ साई आंबे

२ आदित्य लड्डा

३ आलोक कटकुरे

\B१६ वर्षांपर्यंत\B

१ श्रद्धा धूत

२ ऋचा राठोड

३ वैदेही लवारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकळेपणाने स्वीकार अन् उपचार हेच उत्तर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोकळेपणाने स्वीकार, लवकरात लवकर योग्य उपचार, आजाराकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन हाच स्किनझोफ्रेनियावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, असे मत प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी स्किझोफ्रेनिया दिनानिमित्त रविवारी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. अजूनही प्रभावी जनजागरणाची गरज असल्याचे मत नोंदवतानाच, यानिमित्त सादर करण्यात आलेल्या प्रभावी नाटिकेद्वारे स्किझोफ्रेनियाविषयी इत्यंभूत माहिती देण्यात आली.

शांती नर्सिंग होम, स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठानच्या (एसएसपीपी) वतीने रविवारी तापडिया नाट्य मंदिरात कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक राम भोगले, शांती नर्सिंग होमचे डॉ. विनय बाऱ्हाळे, डॉ. विनायक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी स्किझोफ्रेनियाविषयी एक वेधक नाटिकाही सादर करण्यात आली. एक महाविद्यालयीन अभ्यासू विद्यार्थी अचानक एकट्यात राहू लागतो, एकट्यात बडबडू राहतो, मित्रांवर आणि घरच्यांवर संशय घेऊ लागतो, प्रसंगी आक्रमकही होतो. त्याचे अभ्यासावरुन लक्ष उडते, एकाग्रता भंग पावते. मात्र त्याला बाहेरची बाधा समजली जाते. त्याची कुंडली पाहण्याबरोबरच त्याच्यावर आयुर्वेदापासून ते होमिओपॅथीपर्यंतचे असंख्य उपचार करण्याची तयारी केली जाते; पण त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याचा विचार कुणाच्या मनाला शिवत नाही. अनेक फॅमिली फिजिशियनही अशा रुग्णांना मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवण्यास फारसे इच्छुक नसतात. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे मानसिक आजार ओळखण्यापासून ते मानसिक आजारांवरील उपचारांसाठी मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले पाहिजे, ही जाणीवदेखील समाजामध्ये किती अत्यल्प प्रमाणात आहे, याचे प्रभावी चित्रण नाटिकेद्वारे मांडण्यात आले. याच नाटिकेच्या माध्यमातून स्किझोफ्रेनियाची लक्षणे, उपचारांबाबत सविस्तर माहितीही देण्यात आली. डॉ. बर्वे यांचे लेखन-दिग्दर्शन होते. मानसतज्ज्ञ ललिता बर्वे (सूत्रधार), माधुरी व श्रीरंग मक्तेदार, आशा खेडगीकर, सागर तांबे, आकाश सानप, अक्षय जाधव, स्वाती शेजूळ यांच्या वेधक अभिनयाने नाटिका रंगली. याच कार्यक्रमात स्किझोफ्रेनिया विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले. 'एसएसपीपी'चे सचिव शिवकुमार पाडळकर यांनी आभार मानले. डॉ. कस्तुरी बाऱ्हाळे यांनी आपल्या सुरेल आवाजात प्रार्थना सादर केली.

\Bमी घेतले 'पॅनिक डिसॉर्डर'वर उपचार\B

१९९३ मध्ये झालेला मुंबई बाँबस्फोट मी माझ्या डोळ्याने पाहिला. माझ्यासमोर स्फोटात बस उडाली, अनेक लोक खाली कोसळले, रक्तबंबाळ झाले. या स्फोटाचा खूप गंभीर परिणाम माझ्या मनावर खोलपर्यंत होऊन मला 'पॅनिक डिसॉर्डर' हा मानसिक आजार झाला आहे हे मी ओळखले. त्याचा मी स्वीकार केला आणि स्वतःसाठी, कुटुंबासाठी असलेली माझी जबाबदारी ओळखून दुसऱ्या मनोविकारतज्ज्ञाकडे जाऊन उपचार घेतले. त्यातून ठणठणीत बरा झालो. योग्य वेळी मानसिक आजाराचा स्वीकार केला, तातडीने योग्य उपचार घेतले म्हणूनच मी आज तुमच्यासमोर उभा आहे, असे प्रांजळ मत डॉ. बर्वे यांनी कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच भोगले यांनीही स्किझोफ्रेनियासंबंधीचा आपला अनुभव कथन केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मोकळेपणाने स्वीकार’ बातमीचे फोटो

ग्रामपंचायत निवडणूक शांततेत

$
0
0

खुलताबाद: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. तिसगाव येथे ९२.६२ टक्के, तिसगाव तांडा येथे ८९.२२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


…देखभालीच्या नावे, महावितरणचे चांगभले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महावितरणतर्फे मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी शहरातील अनेक भागात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. याचा फटका ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागत आहे.

हर्सूल भागातील महापारेषणचे १३२ केव्ही फिडर नुकतेच नादुरुस्त झाले होते. हे फिडर दुरुस्त करण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान हर्सूल फिडरवरील वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. निश्चित केलेल्या वेळेपेक्षाही एक तास उशिराने हर्सूल फिडरवरील वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर साधारणत: तासाभरात पुन्हा वीजपुरवठा बंद झाला होता. या भागातील वीजपुरवठा सायंकाळी पाचपर्यंत सुरळीत झाला नव्हता. याशिवाय शहरातील अनेक ठिकाणी असेच प्रसंग समोर येत आहेत. वारंवार वीज खंडित होणे, घोषित वेळेपेक्षा जास्त वेळ त्या भागाचा वीजपुरवठा खंडित ठेवणे, वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरही वीज प्रवाह कमी, जास्त होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे वीज ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वीज ग्राहकांकडून संबंधित विभागाला संपर्क केल्यानंतर तेथून नीट उत्तर दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.

…………

\Bपहिल्या पावसात उडणार दाणादाण

\B

मान्सूनपूर्व कामांवर वरिष्ठ कार्यालयाकडून निगराणी केली जात नसल्याचा फटका पहिल्या पावसाच बसण्याची शक्यता आहे. अनेक वीज वाहिन्यांवरील कंडक्टरसह इतर साहित्य बदलण्याची गरज आहे. हे साहित्य अद्याप बदलले जात नाहीत. यामुळे पहिल्या पावसातच शहराचा वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची शक्यता महावितरणच्या माजी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेत हरविलेली बॅग मिळली परत

$
0
0

औरंगाबाद : नागपूरहून मनमाडकडे जात असलेल्या ताडोबा एक्स्प्रेसच्या एस-दोन कोचमध्ये एका महिला प्रवाशीची बॅग रेल्वे विसरली. ती रेल्वे प्रवासी सेना, लोहमार्ग पोलिस यांच्या मदतीने परत मिळाली.

याबाबत लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; २५ मे रोजी नागपूरहून ताडोबा एक्स्प्रेसच्या एस-दोन कोचमधील एका महिला प्रवासी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेसहाच्या सुमारास उतरल्या. सोबतच असलेली बॅग, सुटकेस व अन्य समानासह त्या रिक्षात बसल्या. त्यांना रिक्षा चालकास अगाऊ पैसे द्यायचे होते. त्यावेळी आपली पर्स सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्स रेल्वेत विसरल्याची माहिती त्यांनी रेल्वे पोलिसांनी दिली.

पोलिसांनी नांदेड रेल्वे नियंत्रण कक्ष प्रमुख मनोज तिवारी यांना या घटनेची माहिती दिली; तसेच ताडोबा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणारे प्रवासी संघटनेचे मनीष मुथा यांनाही याची माहिती दिली. सोबत बॅगेमध्ये असलेल्या महिलेचा मोबाइल क्रमांकही दिला.

लोहमार्ग पोलिसांसोबत मनीष मुथा यांनी एस-दोन कोचमध्ये जाऊन महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. मोबाइल रिंग वाजल्यामुळे बॅग सापडली. ती बॅग परत काचीगुडा पॅसेंजरने लोहमार्ग पोलिसांकडे पाठविण्यात आली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक दिलीप साबळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर गोडे, पोलिस उपनिरिक्षक आनंद बनसोडे, मिर्झा अन्वर बेग यांनीही कारवाई यशस्वीपणे राबविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंचन लेखा कार्यालयाचे स्थलांतर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्याचे मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन मुख्य कार्यालय औरंगाबाद शहरात आहे. हे कार्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही शासकीय स्तरावर सुरू झाली आहे. या प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी आणि कार्यालय औरंगाबाद शहरात राहू द्यावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली. याबाबत त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पत्र दिले आहे.

मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन या राज्यस्तरीय कार्यालयाची स्थापना औरंगाबाद येथे एक एप्रिल २००६ रोजी करण्यात आली. या कार्यालयात राज्याच्या जलसिंचनाचे लेखा परीक्षण होते. औरंगाबाद हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सर्व संबंधित कार्यालयाच्या सोयीसाठी कार्यालय सुरू झाले. महाराष्ट्र शासनाच्या मृद व संधारण विभागाकडे 'वाल्मी' संस्था हस्तांतरित झाल्यानंतर जल लेखा कार्यालयास 'वाल्मी'च्या मुख्य इमारतीत जागा देण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे. मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन विभाग या कार्यालयासाठी ८५ कर्मचाऱ्यांचा पॅटर्न आहे. सध्या ८० कर्मचारी कार्यरत असून, ते मराठवाड्यातील रहिवासी आहेत. या गोष्टीचा विचार करून स्थलांतराची प्रक्रिया थांबवावी, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

\Bकर्मचाऱ्यांचाही विरोध\B

मृद व जलसंधारण विभागाने २३ मे रोजी मृद व जलसंधारण विभागाचे आयुक्त आणि वाल्मीचे महासंचालक यांना पत्राद्वारे मुख्य लेखा परीक्षक जल व सिंचन कार्यलय 'वाल्मी' संस्थेच्या प्रशासकीय इमारतीच्या एल-१ या विंगमधून मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आर-५ या विंगमध्ये तात्काळ स्थलांतर करण्याविषयी कार्यवाही करण्यास कळवले आहे. त्यामुळे मुख्य अभियंता जलसंपदा पुणे यांनी कार्यकारी संचालकांना पाठवलेला स्थलांतराचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. या स्थलांतराला कर्मचाऱ्यांनीही विरोध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आंतरराष्ट्रीय’ शा‌ळांची उभारणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग यंदापासून शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करणार आहे. यामध्ये १३ शाळांची आता निवड करण्यात आली असून, त्यात मराठवाड्यातील दोन शाळांचा समावेश आहे. या शाळांची त्या दृष्टिकोनातून तयारी करण्यास वेग आला आहे.

राज्यात मराठी शाळांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या शाळांशी स्पर्धा करता यावी या हेतूने शिक्षण विभाग त्या दर्जाच्या शाळा बनविण्याचा प्रयत्न करते आहे. अशा शंभर शाळांसाठी स्वतंत्र मंडळही निर्माण करण्यात येणार आहे. यापूर्वी शाळा निवडीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १३ शाळांची निवड करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यातील दोन शाळांचा समावेश आहे. यामध्ये पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माळीवाडा, कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला शिराढोण या शाळेचा समावेश आहे. या शाळांना 'ओजस आंतरराष्ट्रीय शाळा' असे नाव करण्यात आले. त्यासाठी शाळांसाठी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. विभागातील या दोन शाळांसाठी १३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना बदली प्रक्रियेतूनही वगळ्यात आले आहे. २०१८-१९ शैक्षणिक वर्षापासून या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील शालेय शिक्षण दिले जाणार आहे. दोन एकर जागेवर ही शाळा असणार असून, ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असणार आहे. मराठवाड्यातील दोन्ही ठिकाणच्या शाळांसाठी गावकऱ्यांनी जमीन दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तेथे पायाभूत सुविधांचीही निर्मिती उभारली जात आहे.

\Bआंतरराष्ट्रीय शाळा करण्याच्या प्रक्रिया\B

आंतरराष्ट्रीय पातळीवरचा विचार करून शिक्षण पद्धतीची रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कामही पूर्ण झाले आहे. १३ शाळांमधील शिक्षकांची निवड राज्यभरातील सरकारी शाळांमधूनच करण्यात आली आहे. राज्याचे हे आंतरराष्ट्रीय मंडळ स्वतंत्र असणार आहे. त्याची रचना अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यावर भर असणार आहे, तर उर्वरित शाळांची निवड ही येत्या काही दिवसात पूर्ण केली जाणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी 'मटा'ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महास्वच्छता अभियानात सव्वाशे टिप्पर मलबा साफ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद डेव्हलपमेंट फोरमतर्फे २६ मे आणि २७ मे रोजी शहरात महास्वच्छता अभियान शहरात राबविण्यात आले. या अभियानात शहरातील १२५ टिप्पर बांधकामाचा कचरा जमा करण्यात आल्याची माहिती फोरमचे स्वच्छता दुत भगतसिंग दरक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात धूळमुक्त अभियान राबविण्यासाठी महापालिकेने नऊ जेसीबी आणि २६ टिप्पर दिले होते. २६ मे रोजी ६०, तर २७ मे रोजी ६५, असा एकूण १२५ टिप्पर मलबा (ओला कचरा) शहराजवळच्या एका मिलच्या जागेवर टाकण्यात आला. या संस्थेतर्फे पूर्वी वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी या दरम्यान, पुष्पनगरी, चिंतामण कॉलनी, शांती निकेतन कॉलनी या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. नागरिकांच्या सहभागामुळे आणि संस्थेच्या प्रयत्नामुळे या भागातून कचरा बाहेर निघत नाही. आगामी काळात शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी असे उपक्रम आयोजित करणार असल्याचे भगतसिंग दरक यांनी सांगितले. या उपक्रमासाठी खासगी कंपनी, बँका तसेच अन्य संस्थांनीही पुढाकार घेऊन महापालिकेला स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी मदत द्यावी असे आवाहन फोरमतर्फे करण्यात आले आहे. यावेळी रवी भट्टड, रणजित दरख यांची उपस्थिती होती.

\Bझाडांना रंग; दुभाजकाला चुना \B

धूळमुक्त औरंगाबाद अभियान महावीर चौक ते विमानतळ दरम्यान राबविण्यात आले. या मोहिमेत रस्त्याकडेच्या झाडांना रंग देऊन सुशोभीकरण करण्यात आले. ही मोहिम यशस्वी झाल्यानंतर पालिकेनेही दुभाजकांना चुना मारून रस्ता सुंदर केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विभाग नियंत्रक कार्यालयात नियुक्तीपत्रासाठी गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) नुकतीच सहाय्यकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागासाठी देण्यात आलेल्या सहाय्याकांना नियुक्तीपत्र देण्याचे काम एसटी विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी विभाग नियंत्रक कार्यालयात गर्दी झाली.

एसटी महामंडळाच्या विविध आगारांमध्ये सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे. विशेषत: तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने एसटीच्या देखभाल दुरुस्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी करण्यात येत होती. महामंडळाने नुकत्याच नवीन भरती प्रक्रियेत औरंगाबाद विभागासाठी ५० सहाय्यकांची नियुक्ती देण्याचे मान्य केले आहे. यामध्ये १९ कर्मचारी हे विभागीय कार्यशाळेला दिले जाणार आहेत, तर ३१ कर्मचारी हे विभागातील विविध आगारांना देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे विभागात विविध ठिकाणी असलेल्या २० तांत्रिक कर्मचाऱ्यांची विनंती बदली करण्यात येणार आहे. त्या २० पैकी १२ जण विभागीय कार्यशाळेला देण्यात येणार आहेत. विभागीय कार्यशाळेला एकूण ३१ कर्मचारी देण्यात येणार आहेत. उर्वरित नवीन आणि जुने मिळून ३९ कर्मचारी विविध आगाराला देण्याची कार्यवाही सुरू होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून विभागीय नियंत्रक कार्यालयात उमेदवारांची गर्दी जास्त होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकाच्या भाडेकरूचे घर फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विष्णूनगर भागात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करीत तब्बल दहा लाखांचा ऐवज लंपास केला. बाहेरगावी गेलेल्या व गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. यामध्ये पोलिस निरीक्षकाच्या भाडेकरूसह निवृत्त सुपरवायझर घर फोडण्यात आले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला असून, जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी अशोक मुदिराज यांचे विष्णूनगरात चार मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर प्रकाश बाबुलाल कोटेचा (वय ४०) हे व्यापारी राहतात. कोचेटा यांची पत्नी मुलासोबत नाशिकला माहेरी गेल्या आहेत. कोटेचा शनिवारी कुटुंबाला आणण्यासाठी नाशिकला गेले होते. त्यांचे कुलूपबंद घर चोरट्यांनी लक्ष्य केले. पहाटेच्या सुमारास दोन चोरट्यानी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील लोखंडी व लाकडी कपाट चोरट्यानी तोडली. आतमधील सामान बाहेर फेकत चोरट्यांनी २० तोळ्यांचे दागिने व रोख अडीच लाख रुपये लंपास केले. हा प्रकार रविवारी सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानी कोटेचा यांना माहिती दिली. कोटेचा तातडीने शहरात दाखल झाले. निरीक्षक मुदीराज यांना ही माहिती देण्यात आली. जवाहरनगर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. फिंगरप्रींटस एक्सपर्टनी चोरट्यांच्या बोटाचे ठसे घटनास्थळावरून घेतले.

\Bशेजारच्या गल्लीतही घर फोडले\B

कोटेचा यांचे घर फोडल्यानंतर चोरटयानी शेजारच्या गल्लीत मोर्चा वळवला. या ठिकाणी संभाजी राजे साखर कारखान्यातील निवृत्त सुपरवायझर नामदेव तुकाराम बनकर (वय ६२ रा. गल्ली क्रमांक-दोन) यांची तीन मजली इमारत आहे. बनकर कुटुंब घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाट फोडून आतमधील तीन ग्रॅमचे दागिने, रोख ५० हजार, मोबाइल असा ६० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या दोन्ही घटनांत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bतुळशी वृंदावनात आढळले कुलूप\B

कोटेचा यांच्या घराचे कुलूप तोडल्यानंतर चोरट्यांनी ते तेथे असलेल्या तुळशी वृंदावनामध्ये टाकले. सकाळी शेजारी तुळशी वृंदावनात पाणी टाकत असताना त्यांना तेथे कोटेचा यांचे कुलूप आढळले. त्यांनी कोटेचा यांना फोन केला. यावेळी कोटेचा कुटुंब नाशिकला असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी कोटेचा यांना घरी चोरी झाल्याची माहिती दिली.

पाऊण तास चोरटे घरात

दरम्यान या परिसरातील एका सीसी टीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहे. हे फुटेज पोलिसांनी हस्तगत केले आहे. यामध्ये दोन चोरटे पहाटे तीन वाजून दोन मिनीटांनी कोटेचा यांच्या घरात शिरले असून ४९ मिनीटांनी ते बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. तब्बत पाऊण तासात चोरटयानी कोटेचा यांचे घर साफ केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतागृहांना मदतीस हात आखडता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराच्या विविध भागात सार्वजनिक शौचालये व वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामासाठी 'सीएसआर फंडा'चा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी विविध उद्योजक, लोकप्रतिनिधींना आवाहन देखील करण्यात आले आहे. महापालिकेच्या आवाहनाला खासदार राजकुमार धूत आणि आमदार अतुल सावे यांनीच प्रतिसाद दिला आहे. अन्य लोकप्रतिनिधींनी मात्र हात आखडता घेतला आहे.

उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक संस्था यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून सार्वजनिक शौचालय व वैयक्तिक शौचालयाच्या योजनेला सीएसआर फंडातून मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या या आवाहनाला काही कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. लुपीन लिमिटेड या कंपनीने औरंगपुरा येथील एका सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली आहे. लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रलने मुकुंदवाडी भाजी मंडई, आनंद गाडे चौक व कबीरनगर असा एकूण चार सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली आहे. गरवारे पॉलिस्टर लिमिटेड या कंपनीने गरवारे स्टेडियम येथील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. लायन्स क्लबतर्फे महिलांसाठी शहागंज येथे ई-टॉयलेटचे काम केले जाणार आहे.

आमदार, खासदारांनी देखील त्यांच्या विकास निधीतून या उपक्रमाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार खासदार राजकुमार धूत यांनी आरटीओ कार्यालयाजवळ व मुकुंदवाडी ग्रीन बेल्टमध्ये एक असे दोन नवीन सार्वजनिक शौचालय बांधून देण्याची तयारी दाखवली आहे. आमदार अतुल सावे यांनी दोन सार्वजनिक शौचालयाच्या दुरुस्तीसाठी मदत करणार असल्याचे महापालिकेला कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुढची २५ वर्षे काँग्रेस सत्तेबाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने गेल्या चार वर्षांत विविध क्षेत्रातील घटकांसाठी लोककल्याणकारी योजना राबविल्या. एकामागून एक राज्ये आम्ही काबीज करत आहोत. त्यामुळे काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांची अडचण झाली आहे. आता ते भाजपविरोधी आघाडी करण्यासाठी एकत्र येऊ पाहत आहेत. पण हा प्रयोग यशस्वी होणार नाही. आमच्या कामावर लोक आम्हाला निवडून देतील. काँग्रेस पुढची २५ वर्षे सत्तेत येणार नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.

केंद्र सरकारने चार वर्षे पूर्ण केल्याबद्दल केंद्राच्या कामांची जंत्रीच त्यांनी वाचून दाखविली. कृषी, आरोग्य, महिला, रोजगार, युवक, सामाजिक न्याय, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात विविध योजना राबविल्याचा दावा त्यांनी केला. दानवे म्हणाले, चार वर्षांत मोदी सरकारने देशात चौफेर प्रगती केली. 'एनडीए'तील घटक पक्षांना सोबत घेऊन ही वाटचाल सुरू आहे. राज्यात १३ महापालिका, १२ जिल्हा परिषदा, ४० नगरपालिका, पाच हजार सरपंच भाजपचे झाले. २२ राज्यात भाजपने यश मिळविले. 'एनडीए'तील मित्रपक्ष सोबत राहावेत, अशी आमची इच्छा आहे. जे सोबत येतील ते ठिक नाहीतर भाजप स्वतंत्र संघटनात्मक बांधणी करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

चार वर्षांत भाजपने केलेल्या कामांची भीती वाटत असल्याने प्रादेशिक पक्ष एकत्र येत आहेत. भाजपविरोधात लढण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस पुढची २५ वर्षे सत्तेत येणार नाही. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कुणीही काहीही बोलले तरी आम्ही प्रत्येक आरोपाचे उत्तर दिले आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. देशाच्या विकासासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी घोषणा दानवे यांनी दिली. शिवसेना मात्र दररोज भाजपवर टीका करत आहे, त्यावर काय ? असे विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापौर विजय औताडे, डॉ. भागवत कराड, अनिल मकरिये आदी यावेळी उपस्थित होते.

\Bपेट्रोल दर कमी करण्याचे प्रयत्न\B

देशात पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याबद्दल विचारले असता खासदार दानवे म्हणाले, की हे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संबंधित असतात. वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. जर पेट्रोल, डिझेल जीएसटी अंतर्गत आणले तर भाव कमी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघीण रात्रभर पिंजऱ्याबाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानातिल भक्ती ही वाघिण रात्रभर पिंजऱ्याबाहेर राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला शनिवारी रात्री पिंजऱ्यात आणण्याचे विसरल्याने ती १२ तास बाहेर होती. झाडावर चढून ती बाहेर येत असल्याचे पहाटे सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने धावपळ उडाली. तासाभरानंतर तिला पिंजऱ्यात पुन्हा बंद करण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या सगळ्या घटनेने उद्यानातील सुरक्षेचे वाभाडे निघाले आहेत.

सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रालयातील विविध जातींचे वाघ आकर्षणाचे केंद्र आहेत. वाघांसाठी मुख्य पिंजरा आहे. पिंजऱ्याबाहेर वाघांना फिरण्यासाठी बंदिस्त पटांगण आहे. यापैकी बेंगॉल टायगर जातीची भक्ती ही वाघीण शनिवारी रात्री पिंजऱ्याच्या बाहेर पटांगणात राहिली. रात्री वाघीण शांत होती, पण तिने पहाटे लोखंडी जाळ्यांवर, झाडांवर चढण्याचा प्रयत्न केला. पहाटे ही बाब सुरक्षा रक्षकांच्या ध्यानात आली. त्यानंतर त्यांची धावपळ उडाली. वाघीण पिंजरा तोडून बाहेर आल्याचे सुरक्षा रक्षकांना वाटले, परंतु रात्री तिला संबंधित सुरक्षा रक्षकाने पिंजऱ्यात बंदच केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे सुरक्षा रक्षकांनी वाघिणीला पिंजऱ्यात हुसकावण्याचा प्रयत्न केला अर्ध्या तासानंतर सुरक्षा रक्षकांना त्यात यश आले. तोपर्यंत परिसरातील नागरिकही जमा झाले. या प्रकाराची दिवसभर चर्चा होती. यापूर्वी नऊ-दहा वर्षापूर्वी भींत कोसळ्याने एक वाघ बाहेर पडला होता. त्यावेळी शहरात खळबळ उडाली होती.

\Bमोठा अनर्थ टळला\B

गरमपाणी परिसराच्या बाजुने असलेल्या पिंजऱ्यात दोन नर तर, एक मादी आहे. दीड वर्ष वयाची वाघीण आहे. ती बाहेर पडण्याची अधिक भीती असल्याची चर्चा आहे. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली जाळी तोडून किंवा झाडावरून उडी मारून वाघीण बाहेर पडली असती, तर मोठा आनर्थ घडला असता. पिंजऱ्याची सुरक्षा जाळी २० फुटांपेक्षा उंच असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाघ, वाघिण पिंजऱ्यात बंद असणे आवश्यक होते. पिंजऱ्याला लगतच कर्मचाऱ्यांच्या सदनिका आहेत. मागील बाजुला गरमपाणी परिसर व समोर उद्यान आहे.

\Bसुरक्षा रक्षकाची ही जबाबदारी\B

तीन वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये एकूण नऊ वाघ आहेत. यात बेंगॉल टायगरसाठी स्वतंत्र पिंजरा आहे. सकाळी आहार दिल्यानंतर त्यांना पिंजऱ्याबाहेर सोडण्यात येते. पिंजऱ्याच्या बाहेरील पटांगणात त्यांच्यासाठी पाण्याचा हौद आहे. दिवसभर पिंजऱ्याबाहेर त्यांना ठेवण्यात येते. उद्यान बंद झाल्यानंतर, नागरिक गेल्यानंतर वाघांना पिंजऱ्यात बंद केले जाते. पिंजऱ्यात बंद केल्याशिवाय संबंधित सुरक्षा रक्षकांना उद्यान सोडता येत नाही. कारण प्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असते.

वाघीण पिंजऱ्यातच बंद करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. या वाघिणीला दुसऱ्या पिंजऱ्यातून या पिंजऱ्यात हलविले आहे. त्यामुळे ती लवकरच पिंजऱ्यात जात नाही, परंतु ही बाब लक्षात आल्यावर आम्ही सकाळी लगेच तिला पिंजऱ्यात बंद केले.

- संजय नंदन, पर्यवेक्षक, सिद्धार्थ उद्यान.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !

$
0
0

Tushar.bodkhe@timesgroup.com

औरंगाबाद : अतिक्रमण काढणे आणि अवैध नळ तोडणे या कारणांचा औरंगाबाद शहरातील दंगलीसाठी वापर करण्यात आला. शहरातील राजकीय नेते आणि पोलिसांची हातमिळवणी आहे. त्यामुळे २०१९या निवडणुकीच्या वर्षात शहरात पुन्हा हिंसाचार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, या शब्दांत अमेरिकेचे संशोधक प्रा. थॉमस हॅन्सन यांनी परखड प्रतिक्रिया दिली. औरंगाबाद शहरात राहिलेल्या हॅन्सन यांनी वेगवेगळ्या वसाहतीत अभ्यास करून जमातवादाची मांडणी केली.

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील मानववंशशास्त्र विभागाचे प्रा. थॉमस हॅन्सन संशोधनासाठी औरंगाबाद शहरात आले होते. चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी शहरातील मुस्लिम, दलित आणि हिंदू वसाहतीत मुलाखती घेतल्या. राजकारण व समाजकारणातील धार्मिक ध्रुवीकरणाचे कंगोरे जाणून घेतले. या अभ्यासावर हॅन्सन यांनी नोव्हेंबर २०१७मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात व्याख्यानही दिले. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर मागील महिन्यात (एप्रिल) हॅन्सन अमेरिकेला परतले. शहरात मे महिन्यात झालेली दंगल हॅन्सन यांच्यासाठी आश्चर्याचा धक्का नव्हती. कारण विविध वसाहतीत फिरताना तणाव जाणवत असल्याचे निरीक्षण हॅन्सन यांनी नोंदवले होते. या दंगलीबाबत त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला प्रतिक्रिया दिली. औरंगाबादेतील मुस्लिम समाज आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या पिछाडीवर आहे. दलित समाजाने शिकून सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवल्या आहेत, मात्र मुस्लिम खासगी आणि सरकारी नोकऱ्यात नाहीत. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील अत्याचाराचा मुद्दा घेऊन शिवसेनेने मागील ३० वर्षांत राजकीय दबदबा वाढवला. 'हिंदूरक्षक' म्हणून ते पुढे आले. शिवसेनेचे राजकारणासाठी असलेले मुद्दे ३० वर्षांनंतरही तेच असल्याबद्दल हॅन्सन यांनी आश्चर्य व्यक्त केले. शहरात काही वसाहतींच्या धर्मानुसार अक्षरश: सीमारेषा आहेत. हा प्रकार गंभीर असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

'शहराचा विकास फक्त हिंदूंच्या फायद्याचा राहिला. उच्चवर्णीय हिंदूंना अल्पसंख्याक समुदायकडून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज वाटते. त्यांच्या मनातील भीती हाच हिंदुत्त्ववादी पक्षांच्या राजकारणाचा गाभा आहे,' असे हॅन्सन यांनी नमूद केले. हिंदू, मुस्लिम आणि दलित अशी शहराची विभागणी झाली आहे. धार्मिक अजेंडा राबवून निवडणुका जिंकल्या जातात. 'एमआयएम'चा उदय शिवसेनेप्रमाणेच धर्माच्या मुद्यावर झाला अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीसाठी दंगल?

१९९०मध्ये औरंगाबाद शहरात राहून दंगलीचा अभ्यास केल्यानंतर २५ वर्षांनी शहरात झालेल्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी हॅन्सन आले होते. काळ उलटला, मात्र राजकारणाचे मुद्दे तेच राहिले. प्रभावशाली राजकीय पक्ष आणि पोलिसांची हातमिळवणी असल्यामुळे २०१९ या निवडणुकीच्या वर्षात पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही असे हॅन्सन स्पष्टपणे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावरकर जयंती घाटीमध्ये साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी झाली. यानिमित्त वि. दा. सावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यासह महाविद्यालयातील डॉक्टर, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images