Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शस्त्रसाठा प्रकरणामध्ये नवव्या आरोपीला अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शस्त्रसाठा प्रकरणामध्ये नववा आरोपी अमर अनिल बालकिशन याला बुधवारी (३० मे) अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, पाच जूनपर्यंत पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस. बी. पवार यांनी दिले.

ऑनलाइन शस्त्र मागवण्यात आल्याच्या प्रकरणामध्ये नववा आरोपी अमर अनिल बालकिशन (२८, रा. हनुमाननगर, सिडको एन-चार) याला बुधवारी मेवाड लॉज परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून खटका दाबताच अनेक दिशांना उघडणारा 'फोल्डर' चाकू जप्त करण्यात आला. त्याला गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीने शस्त्र कुठून मागवले व त्यामागचा उद्देश काय होता, तसेच साथीदार आरोपींना अटक करावयाची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी पक्षाकडून करण्यात आली. ही विनंती मान्य करून आरोपीला पाच जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटिझन रिपोर्टर-३१मे

0
0

मटा इम्पॅक्ट

न्यू शांतीनिकेतन कॉलनी

धोकादायक खांब हटविला

न्यू शांतीनिकेतन कॉलनीमध्ये विजेचा एक खांब अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या मधोमध पडला होता. या खांबामुळे रस्त्याचा अर्धा भाग व्यापला होता. याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत होता. यासंदर्भाट 'मटा सिटिझन रिपोर्टर'मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेने त्या खांबाचा रस्त्यातील अडथळा दूर केला. यामुळे वाहनधारक नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

- एक वाचक, औरंगाबाद

..

यादवनगर

नालेसफाई प्रगतीपथावर

हडको एन ११, नवजीवन कॉलनी, यादवनगरमध्ये महापालिकेतर्फे अनेक ठिकाणी नालेसफाईचे काम केले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वीच केले आहे. त्यामुले कचरा अडकून जनतेस त्रास होणार नाही. याबद्दल महापालिका व नगरसेविका यांचे आभार. नागरिकांनी या जागी कागद वगैरे टाकू नयेत. स्वच्छतेची जाण असू द्यावी.

- शरद लासूरकर, सिडको

..

हर्सूल टी पॉइंट

लाल सिग्नल लागल्यावरही भुर्रर्र

शहराच्या बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दंड थोपटले आहेत. जळगाव रोडवरील एसबीओए पब्लिक स्कूल चौकातील सिग्नलचा लाल दिव्याचा संकेत थांबण्याचा असतानासुद्धा हे महाशय घाईगडबडीत डबल सीट, समोरून येणाऱ्या वाहनांची कसलीही तमा न बाळगता अतिशय वेगाने जीव धोक्यात घालून वाहनासह भुर्रर्र निघून गेले. काहींच्या तर काळजाचा ठोका चुकला. यातूनच अपघात होत आहेत. बुलेट वा तत्सम दुचाकीवर फटाके फोडत, फायरिंगचा आवाज करीत धूम स्टाइलने वाहने चालवून शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नियम मोडणाऱ्याविरुद्ध पोलिस विभागाने कडक दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

- रवींद्र तायडे, हर्सूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाई निविदेला दिरंगाई शहर अभियंता पानझडे यांना नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेत दिरंगाई केल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. डॉ. विनायक यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यावर प्रथमच अशा प्रकारे नोटीस बजावली आहे.

डॉ. विनायक यांनी गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. या कामाची स्थिती फारच विदारक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रामुख्याने औषधीभवन, बारूदगरनाला, आरतीनगर, मिसारवाडी, बॉटॅनिकल गार्डन कटकट गेट, रहेमानिया कॉलनी, किलेअर्क, नाथ सुपर मार्केट, नुर कॉलनी, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, सुखना नदी आदी ठिकाणी पाहणी केली. नालेसफाईच्या कामासाठी निविदा काढण्यात दिरंगाई झाल्याचे आयुक्तांच्या लक्षात आल्याने याची जबाबदारी शहर अभियंत्यांवर निश्चित करून कारणेदाखवा नोटीस बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेत बावीस दिवसांत तेरा कोटींचा फडशा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेत बावीस दिवसांत तब्बल तेरा कोटींचा फडशा पाडण्यात आल्याचे उघड झाले आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि दबावावरून एवढ्या मोठ्या रकमेचे अल्प कालावधीत पेमेंट अदा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले लेखाधिकारी एन. जी. दुर्राणी यांनी निवृत्त होताना तब्बल ३२ कोटी रुपयांचे पेमेंट विविध कंत्राटदारांना केले. त्यावेळी त्यांच्याकडे मुख्य लेखाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. ते ज्या दिवशी निवृत्त झाले त्या दिवशी त्यांनी वाटप केलेल्या पेमेंटची माहिती फुटली आणि तत्कालीन आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी असेच प्रकरण पालिकेच्या लेखा विभागात घडल्याचे सूत्रांनी सांगितले. लेखा परीक्षण विभागात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला मुख्य लेखाधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. सुमारे बावीस दिवस त्यांच्याकडे हा पदभार होता. या काळात त्यांनी तेरा कोटी रुपये कंत्राटदारांना वाटले. त्या प्रभारी अधिकाऱ्याने कंत्राटदारांना तातडीने पेमेंट करावे यासाठी पालिकेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याची महत्त्वाची भूमिका होती अशी चर्चा आहे. त्या पदाधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार तेरा कोटींचे पेमेंट करण्यात आले.

\B...अन् केले जबाबदारीतून मुक्त

\Bपदाधिकाऱ्याकडून पेमेंटबद्दलची अपेक्षा वाढू लागल्यामुळे 'त्या' अधिकाऱ्याने स्वत: हून मुख्य लेखाधिकारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना मुक्त देखील करण्यात आले. बावीस दिवसांत तेरा कोटींचे पेमेंट करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बावीस दिवसात त्या अधिकाऱ्याकडून तेरा कोटींचे पेमेंट झालेले नसावे. मी घेतलेल्या माहितीनुसार चार ते पाच कोटींचे पेमेंट त्या अधिकाऱ्याने केले. ज्येष्ठता यादीनुसार कंत्राटदारांना पेमेंट करण्यात आले, त्याशिवाय शासकीय देणी देण्यात आली. तत्कालीन आयुक्तांच्या परवानगीनेच हे सर्व करण्यात आले.

\B- विकास जैन, सभागृहनेता, महापालिका\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीकांत महाराज पादुका पूजनाचा रविवारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अधिक पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अन्वा संस्थानच्या सद्गुरू लक्ष्मीकांत महाराज यांच्या पादुकांच्या पूजनाचा कार्यक्रम रविवारी ( ३ जून) आयोजित करण्यात आला आहे. हडको एन ९ एल सेक्टर मधील महारुद्र हनुमान मंदिरात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पादुका पुजनाबरोबरच अभिषेक, आरती, महाप्रसाद, सव्वाकोटी गुरुमंत्राच्या जपाचा संकल्प असेही कार्यक्रम होणार आहेत. भक्त व शिष्य मंडळींनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे, आवाहन लक्ष्मीकांत महाराज गुरूपौर्णिमा उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबा महोत्सवात ६०० हापूस पेट्यांची विक्री

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी येथे सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून दोन दिवसांत हापूसच्या सहाशेच्यावर पेट्यांची विक्री झाली आहे. महोत्सवाचा आज शेवटाचा दिवस आहे.

शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यामाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. केशर उत्पादकांनी फारसा उत्साह दाखविला नसला तरी कोकणातील रत्नागिरी, राजापूर, देवगड आदी ठिकाणच्या हापूस उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हापूस आंबे या महोत्सवात वाजवी दरात उपलब्ध झाले. हे आंबे नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले असल्याने ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. बुधवारी पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक हापूसच्या पेट्यांची हातोहात विक्री झाली, तर गुरुवारी चारशेच्यावर पेट्यांची विक्री झाल्याचे बाजार समितीचे सभापती पठाडे यांनी सांगितले. अडीचशे रुपये डझनापासून ते आकारानुसार ३००, ५०० रुपये डझन याप्रमाणे आंब्याची विक्री होत असल्याचे आंबा उत्पादक गणेश मोरे यांनी सांगितले. एक पेटी एक हजारापासून ते दीड हजारपर्यंत उपलब्ध आहे.

पुढील वर्षी १५ दिवस महोत्सव

शहरातील या पहिल्याच आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पुढील वर्षी १ ते १५ मे या कालवधीत आंबा महोत्सव आयोजित केला जाईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीड लाखां रुपयांसाठी विवाहितेला हिटरचे चटके

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लॉट घेण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेचा हिटरचे चटके देत छळ करण्यात आला; तसेच तिच्या वडील व भावावर चाकुहल्ला करण्यात आला. हिनानगर, चिकलठाणा भागात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपीविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शब्बीर रशिद कुरेशी (वय ५३ रा. हिनानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुरेशी यांच्या मुलीचा पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेला आहे. लग्नानंतर त्यांच्या मुलीला प्लॉट घेण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये आणण्याची मागणी करीत छळ करण्यात आला. तिला सातत्याने मारहाण करीत हिटरने चटके देण्यात आले; तसेच सोमवारी तिच्या सासरची मंडळी कुरेशी यांच्या घरी आली. यावेळी त्यांच्यात वाद झाल्याने शब्बीर कुरेशी त्यांचा मुलगा सहेबाज उर्फ सद्दाम व अफराज यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये सद्दाम गंभीर जखमी झाला. याप्रकरणी संशयित आरोपी हमीद कुरेशी, सम्रान उर्फ शम्मू, मुनाफ कुरेशी व अलीम कुरेशी (सर्व रा. शेंद्राबन, चिकलठाणा) यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पीएसआय संदीप शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्राआधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जमीन मालकाला वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करूत जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला; तसेच खोटे अर्ज दाखल करण्याची धमकी देत चार लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात सात जणाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोतीलाल लक्ष्मण काळे ( वय ६३ रा. पिसादेवी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये काळे यांची गट क्रमांक ७६मध्ये वारसाहक्काने मिळालेली जमीन आहे. काही जणांनी या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करूत बाँडपेपरवर जमीन खरेदी केल्याचा करार केला. यामध्ये काळे यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या; तसेच काळे यांना या जमिनीसंदर्भात चार लाखांची खंडणी मागण्यात आली. हा प्रकार ३१ मार्च २००६ ते २३ एप्रील २०१८ या कालावधीत शनी मंदिराजवळील डी. जी. लाटकर यांच्या नोटरी कार्यालयात घडला. याप्रकरणी काळे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संजय शामराव हिवराळे, काकासाहेब धोंडीराम बनकर, युवराम शामराव हिवराळे, दिलीप दामोधर शेळके, सुनील रामभाऊ राऊत, विजय कडू पारखे व डी. जी. लाटकर यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार एजाज शेख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस अधिकाऱ्यांचा अंतर्गत बदल्यांचे आदेश

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस दलातील ४८ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकाच्या अंतर्गत बदल्या गुरुवारी करण्यात आल्या. आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी या बदल्याचे आदेश जारी केले. यामध्ये नऊ एपीआय असून, ३९ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. अनेकांच्या बदल्या विनंतीनुसार करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून नवीन ठिकाणी रुजू होण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानधनाची लयलूट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कायम सेवेतील प्राध्यापकांनी आपल्याच विभागात तासिका घेऊन तासिका तत्त्वावर लाखो रुपयांचे मानधन घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्राध्यापकांनी वेगवेगळी तीन हजार बिले विद्यापीठाला सादर केल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले. या गैरप्रकारामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कायम प्राध्यापकांना वेगळे मानधन न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. केवळ 'सीएचबी' प्राध्यापकांनाच मानधन देण्यात येणार आहे.

विद्यापीठातील बहुतेक विभागात प्राध्यापक नसल्यामुळे काही विषयांच्या तासिका होत नाहीत. एखाद्या अभ्यासक्रमासाठी अतिथी प्राध्यापक निमंत्रित असतात. काही विभागात तासिका तत्त्वावर प्राध्यापक कार्यरत आहे. मात्र, कायम सेवेतील प्राध्यापकांनी अतिरिक्त तासिका घेऊन मानधन घेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. काही तासिका केवळ कागदोपत्री असल्याची चर्चा आहे. हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला. कायम प्राध्यापकांनी मानधनासाठी वेगवेगळी तीन हजार बिले सादर केली आहेत. या माध्यमातून लाखो रुपयांचे मानधन प्राध्यापक घेणार आहेत. वेतनाशिवाय वेगळे मानधन घेतल्यामुळे विद्यापीठावर भार पडला आहे. विभागातील एखाद्या विषयाचा अभ्यासक्रम शिकवणे किंवा पूर्ण करणे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. या कर्तव्यभावनेला सोयीस्कर वगळून प्राध्यापकांनी मानधन घेण्याचा सपाटा लावला आहे. कायम सेवेतील प्राध्यापक 'सीएचबी'चे मानधन कसे घेऊ शकता असा सवाल उपस्थित झाला आहे. सध्या कायम प्राध्यापकांच्या बिलांना स्थगिती दिली असून फक्त 'सीएचबी' प्राध्यापकांची बिले मंजूर करण्यात येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी गुरुवारी अधिष्ठाता मंडळाची बैठक घेतली. तासिका तत्त्वावरील मानधनाच्या मुद्द्यावर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अतिथी प्राध्यापक आणि सीएचबी प्राध्यापकांना मानधन देण्यात येईल. मात्र, कायम प्राध्यापकांना तासिका तत्त्वावरील मानधन देण्यात येणार नाही. अतिथी प्राध्यापकांनाही दरमहा दोन किंवा तीन तासिका घेता येणार आहेत. प्रतितास ३०० रुपये मानधन असले तरी काही प्राध्यापकांनी जास्तीचे मानधन घेतल्याचा संशय आहे. या प्रकाराची प्रशासन चौकशी करीत असून मानधनाबाबत योग्य निर्णय घेतला जाणार आहे.

\Bतासिका झाल्या का ?

\Bएका प्राध्यापकाने तासिकांचे मानधन घेतले. मात्र, तासिका झाल्या नसल्याचा प्रकार उघडकीस आला. तासिकेला उपस्थित विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक माहिती अधिकारात मागण्यात आले होते. बहुतांश विभागात हाच प्रकार घडल्याचा संशय आहे. केवळ कागदोपत्री तासिका दाखवून मानधन मंजूर करुन घेण्यात आले. 'सीएचबी' तासिका आणि मानधन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे.

२०१८-१९ या वर्षीपासून कायमस्वरुपी सेवेतील प्राध्यापकांना 'सीएचबी'चे मानधन मिळणार नाही. विभागातील राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे प्राध्यापकांचे कर्तव्य आहे. विभागातच तासिका घेऊन त्याचे वेगले मानधन घेणे उचित नाही.

- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिवंडीमधून सहा शस्त्र पार्सल जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन शस्त्र खरेदी प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी गुरुवारी इन्स्टाकार्ट कुरिअर कंपनीच्या भिवंडी येथील गोदामाची झाडाझडती घेऊन शस्त्राचे आणखी सहा पार्सल जप्त केले. भिवंडी येथील गोदामाच्या व्यवस्थापनाला चौकशीसाठी औरंगाबादला हजर राहण्याची नोटीस देखील बजावली.

फ्लिपकार्टद्वारा शहरात खेळणीच्या नावाखाली शस्त्र मागवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने फ्लिपकार्टची सह भागीदार असलेल्या इन्स्टाकार्ट कुरिअर कंपनीच्या नागेश्वरवाडी व जयभवानीनगर येथील कार्यालयावर छापे टाकून ३६ शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये एकूण नऊ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील कार्यालयाला कंपनीच्या भिवंडी येथील गोदामामधून पार्सल पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. बुधवारी रात्री भिवंडी येथील कार्यालय व गोदामाची तपासणी करण्यासाठी गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली होती. या पथकाने गुरुवारी सकाळपासून या गोदामाची झाडाझडती घेतली. यामध्ये शस्त्राचे आणखी सहा पार्सल पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी ही पार्सल जप्त केली. असून यापुढे अशा प्रकारचे कोणतेही पार्सल आल्यास त्याची डिलेव्हरी करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावली आहे.

\Bबंगळुरू कार्यालयाला नोटीस

\Bभिवंडी येथील गोदामामध्ये हे पार्सल कोठून आले, याचा देखील तपास करण्यात येत आहे. इन्स्टाकार्ट कंपनीच्या बंगळुरू येथील मुख्य कार्यालयाला देखील गुन्हे शाखेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली असून भिवंडी येथील मॅनेजर व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी चौकशीसाठी औरंगाबादला हजर राहण्याबाबत देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छापरवाल यांचा सन्मान

0
0

औरंगाबाद : लायन्स क्लब इंटरनॅशनलचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून अॅड. शांतीलाल छापरवाल सतत नऊ वर्ष कार्यरत असल्याबद्दल राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रांतपाल संदीप मालू, एम. के. अग्रवाल, विवेक अभ्यंकर, समन्वयक राजेश भारुका आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शहरात ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनातर्फे कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. दुचाकी वाहन फेरी, तसेच सायंकाळी ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून गर्दी झाली होती. खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, विजय वाघचौरे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. मुकुंदवाडी परिसरात विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. कॅनॉट गार्डन, चिकलठाणा, विजयनगर आदी भागांसह सरकारी कार्यालये, शाळा, संस्थामध्ये अभिवादन करण्यात आले. सकाळी विविध संघटनांनी वाहन फेरी काढत अभिवादन केले. जय मल्हारच्या घोषणांनी परिसर दणाणला. जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याने, वाहनफेरी, मिरवणूक काढण्यात आली. कॅनॉट गार्डन येथे संघर्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनतर्फे जयंती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ विचारवंत अंबादासराव रगडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भारिप नेते श्रीरंग ससाणे, माजी सभापती रतनकुमार पंडागळे, एन. एस. कांबळे, स. सो. खंडाळकर, निशांत पवार, अॅड्. सोमनाथ वाघमारे, श्रीधर जाधव, प्रा. रामेश्वर घिटरे, अॅड्. मारुती राऊत यांची उपस्थिती होती.

\Bमिरवणुकीने लक्ष वेधले\B

जयंतीनिमित्त सायंकाळी पैठणगेट येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी रथ सजविण्यात आला होता. सजवलेल्या रथावर अहिल्यादेवी यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. ढोल ताशाचा गजर, झांझ पथक अशा उत्साही वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. क्रांतीचौक, उस्मानपुरा सर्कल, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रोडमार्गे ही मिरवणूक कोकणवाडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ विसर्जित करण्यात आली. यावेळी मल्हार सेना प्रमुख लहुजी शेवाळे, दत्ता म्हेत्रे, शिवाजी काटकर, रमेश डोड्डामनी, यादव गवारे, तुळसीदास खटके, पी. बी. कोकणे, हरिभाऊ मिसाळ, सत्यवान मिसाळ यांची उपस्थिती होती.

\Bझुंजार छावातर्फे जयंती साजरी\B

झुंजार छावा संघटनेतर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष निलेश डव्हळे, अध्यक्ष विठ्ठल माने, सचिन खरात, शिवाजी जगताप, दत्तात्रय घारे, रोशनलाल शर्मा, प्रशांत भालेराव, विशाल हिवराळे, राजेश पाटील यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रेयनगरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

श्रेयनगर झांबड इस्टेट परिसरात अज्ञात आरोपींनी घराबाहेर उभ्या असलेल्या चार वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. अज्ञात माथेफिरूनी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे पाच यादरम्यान हा धुडगूस घातला. या परिसरात बुधवारी रात्री देखील वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वाहनधारकांनी तक्रार दाखल केली नसल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयभवानीनगरकडे आयुक्तांची पाठ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगर मधील नाल्यावरील बांधकामांकडे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पाठ फिरवली. नाल्याचा प्रवाह अडवणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या भावाचे बांधकाम पाडण्याचे आदेश त्यांनी दिले होते, पण हे बांधकाम पडलेच नाही. नाल्याचे काम अर्धवट झाल्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.

गतवर्षीच्या पावसाळ्यात जयभवानीनगरमधील सुमारे दोनशेवर घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिक भयभीत झाले. त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी स्थळ पाहणी करून नाल्यावरची बांधकामे पाडण्याचे आदेश दिले. त्याच वेळी जयभवानीनगरातील नाल्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले. या कामाच्या दरम्यान नाल्यावरील बांधकामे पाडण्यात भेदभाव होऊ लागल्याची तक्रार नगरसेविका मनीषा मुंडे यांनी वारंवार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीच्या बैठकीत केली. २३ मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत देखील हाच विषय मुंडे यांनी मांडला आणि नाल्यावरची बांधकामे न पाडल्यास यंदा पुन्हा पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी जाईल, असा इशारा दिला. महापालिकेच्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या भावाची दोन बांधकामे नाल्यावर आहेत. ही बांधकामे पाडल्याशिवाय नाल्याचा प्रवाह मोकळा होणार नाही. महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग ती दोन बांधकामे पाडण्यास टाळाटाळ करीत आहे, असे गटनेते प्रमोद राठोड यांनी महापौर व आयुक्तांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना त्या बांधकामांवर कारवाई करा, मी ३१ मे रोजी पाहणी करण्यासाठी येतो, असे बजावले होते. त्यामुळे जयभवानीनगरातील नागरिक डॉ. विनायक यांच्या आगमनाची चातकासारखी वाट पहात होते. परंतु, डॉ. विनायक जयभवानीनगरात दुपारी चार वाजेपर्यंत आलेच नाहीत. उपायुक्त निकम व अतिक्रमण हटाव विभागाने त्या निवृत्त अधिकाऱ्याच्या भावाचे बांधकाम देखील पाडले नाही. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत होते.

\Bगल्ली क्रमांक ११मध्ये विदारक स्थिती

\B

दरम्यान, भूमिगत गटार योजनेसाठी महापालिकेने नाल्यातील काही बांधकामे पाडली. पण गटार योजनेचे व नाल्याचे बांधकाम मात्र केले नाही. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पावसाळा तोंडावर आलेला असताना नाल्यांमधून टाकावयाच्या ड्रेनेज लाइनचे काम लगेचच पूर्ण होण्याची शक्यता नाही. नाल्याचे बांधकाम झालेले नसल्यामुळे अनेक घरांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. जयभवानीनगरातील गल्ली क्रमांक ११ मध्ये तर विदारक स्थिती आहे. पाडापाडी केलेल्या नाल्याच्या दोन्ही काठावर शिडी टाकून नागरिकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘प्रभारी’ मतदानाचा वाद हायकोर्टात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद निवडणुकीचा वाद अखेर हायकोर्टात पोहचला. प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या विरोधात 'उत्कर्ष पॅनल'ने गुरुवारी हायकोर्टात याचिका दाखल केली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे चार दिवसांपासून दौऱ्यावर असल्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मतदानाचा निर्णय होऊ शकला नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद निवडणूक १५ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीत विद्यापीठाच्या १२ प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. राज्यातील एकाही विद्यापीठाने प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. मात्र, एका गटाचे हित साधण्यासाठी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी अवैधरित्या प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्याचा आरोप 'उत्कर्ष पॅनल'ने केला. प्रभारी कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन संचालक, वित्त व लेखाधिकारी, चार अधिष्ठाता, क्रीडा संचालक, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक, आजीवन विस्तार संचालक आणि उपकेंद्र संचालक या सर्व 'प्रभारी' अधिकाऱ्यांचा मतदार यादीत समावेश आहे. संबंधितांची नियुक्ती तात्पुरती असल्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही असा आक्षेप आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे असल्या तरी निवडणूक मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आहेत. हा वाद झाल्यानंतर कुलगुरू दौऱ्यावर गेले आहेत. चार दिवसांपासून कुलगुरुंच्या प्रतिक्षेत असलेल्या उत्कर्ष पॅनलने अखेर हायकोर्टात याचिका दाखल केली. प्रभारी अधिकारी मतदारयादीतून वगळण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणे अपेक्षित आहे. राज्यातील इतर विद्यापीठांनी प्रभारींना वगळले असताना याच विद्यापीठात अधिकार देण्याचे प्रयोजन काय असा सवाल डॉ. भारत खैरनार यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंबाखू न खाण्याचा कामगारांना केला संकल्प

0
0

वैजापूर : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त गुरुवारी नगर पालिकेच्या सफाई विभागातील जवळपास ५० स्त्री-पुरुष कामगारांनी तंबाखू न खाण्याचा व बिडी न पिण्याचा संकल्प केला. तालुका तंबाखू नियंत्रण समितीचे अध्यक्ष धोंडिरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत हा संकल्प करण्यात आला. या प्रसंगी स्वछता निरीक्षक भागीनाथ त्रिभुवन व सहायक प्रमोद निकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राजपूत यांनी तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थपासून होणाऱ्या शारीरिक व्याधी व दुष्परिणाम ची माहिती दिली. नंतर त्यांना तंबाखू सोडण्याची शपथ दिली. स्वछता निरीक्षक त्रिभुवन यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएमच्या नगरसेवकाचा नियमित जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात नुकत्याच उसळलेल्या दंगलीच्या प्रकरणामध्ये सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला एमआयएमचा विरोधी पक्षनेता फेरोज मोईनोद्दीन खान याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी गुरुवारी (३१ मे) फेटाळला.

शहरात उसळलेल्या दंगलीच्या काळात दीपक मन्नालाल जैस्वाल यांच्या बिअर बारच्या गोडाऊनमधील विदेशी मद्याच्या साठ्याची तोडफोड करून पेटवून दिल्याच्या; तसेच जैस्वाल यांचे घर पेटवून दिल्यासंदर्भात दाखल गुन्ह्यात आरोपी फेरोजखान हा १५ मे रोजी पोलिसांना शरण आला होता. या प्रकरणी कोर्टाने त्याला १८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती व त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, त्याने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, त्या अर्जावरील सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर पाटील यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदाराने (फेरोजखान) जमावाला भडकावले होते. या गुन्ह्यात फेरोजखानच्या ७ साथीदारांना १७ मे रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्या तपासात फेरोज खानने चिथावणी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचे आणखी १४ साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे बाकी आहे. आरोपीला जामीन दिल्यास तो त्यांना फरार होण्यास मदत करील. आरोपीने तरुणांचे डोके भडकावून, कट रचून दंगल घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. भविष्यातही दंगल घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. दंगलीच्या काळात नागरिकांच्या सुमारे ७ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले व एकाचा होरपळून मृत्युही झाला. आरोपी व त्याच्या साथीदारांनी जनतेच्या मालमत्तेची तोडफोड व जाळपोळ करुन लुटमार केली. त्यांच्याकडून लुटलेला माल हस्तगत करणे बाकी असल्यामुळे आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंतीही सरकारी पक्षातर्फे कोर्टात करण्यात आली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपी फेरोज खानचा जामीन अर्ज फेटाळला.

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवगा तोडल्याचा जाब विचारला; तलवारीने हल्ला

0
0

औरंगाबाद

शेवगा तोडल्याचा राग मनात ठेवून एकाने ८१ वर्षीय डॉक्टरवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. औरंगाबादमधील गादिया विहार भागात गुरुवारी ही घटना घडली.

काही दिवसांपूर्वीच डॉ. पांडुरंग काळे यांच्या घरासमोरील शेवग्याच्या शेंगा आरोपी विजय साबळे याने तोडल्या होत्या. या शेवगा तोडल्या याचा जाब डॉक्टर काळे यांनी साबळेला विचारला. त्याचाच राग आरोपीच्या मनात होता. या रागातून आरोपीने स्कूटरवरुन घरी जाणाऱ्या डॉ. काळे यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. काळे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. डॉ. काळे हे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर असून त्यांचा मुलगा उद्योजक आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये ऑनलाइन पद्धतीने तलवार विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा अवैध शस्त्रांबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.




मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटक कराचा चेंडू सरकारच्या कोर्टात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील दौलताबाद, वेरूळ आणि अजिंठा येथे येणाऱ्या पर्यटकांना कर लावण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या पुढाकाराने हा प्रस्ताव ठेवण्यात आला. जिल्हा परिषदेची टीम काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेली होती. उपाध्यक्ष केशवराव तायडे, सदस्य अविनाश गलांडे आणि अधिकाऱ्यांनी अभ्यासदौऱ्यात पाहिले, की कोकणातील किल्ल्यांमध्ये पर्यटक कर लावला जातो. ही रक्कम संबंधित ग्रामपंचायतीच्या विकासकामांना व पर्यटनस्थळाच्या विकासासाठी वापरली जाते. औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. लाखोंच्या संख्येने देशी-परदेशी पर्यटक दरवर्षी भेट देतात. या पर्यटनस्थळांपैकी काही ठिकाणी पर्यटक कर लावल्यास ग्रामपंचायतींना फायदा होईल, त्या अनुषंगाने पंचायत विभागाने प्रस्ताव तयार केला. वेरूळ, दौलताबाद आणि अजिंठा येथे कर लावण्याबाबत दरनिश्चित केले गेले. एका व्यक्तीस पाच रुपये, सहा ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना तीन रुपये, सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना एक रुपया, तर ग्रामपंचायतीशी संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांना मोफत सेवा पुरविली जाईल.

\Bरोज दोन हजारांची वसुली\B

साधारणपणे दिवसाला दोन रुपये महसूल मिळेल, अशी शक्यता प्रस्तावात वर्तविण्यात आली. जमा झालेल्या रकमेतून २५ टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या विकासकामासाठी तर ७५ टक्के रक्कम पर्यटन स्थळाच्या विकासकामांवर खर्च करणे बंधनकारक आहे. हा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. आता अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images