Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कृषिमाल निर्यातीसाठी एअर कार्गो सुविधा केंद्र

$
0
0
मराठवाड्यातील शेतीमालाची थेट निर्यात करण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर कार्गो हब उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाबरोबर चर्चा सुरू आहे, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

चला 'आयटीआय'ला प्रवेश घेऊ या

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील (आयटीआय) विविध ट्रेडसाठीची प्रवेश प्रक्रिया २४ जूनपासून सुरू होत आहे. 'डीटीई'च्या धर्तीवर राज्याचे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने कात टाकून आयटीआयचे प्रवेश यंदापासून 'ऑनलाइन' करण्याचा निर्णय घेतला आहे.

'क्वालिटी कंट्रोल'कडूनच रस्त्यांचा दर्जा तपासणार

$
0
0
पालिकेने शहराच्या विविध भागांत केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वालिटी कंट्रोल विभागातर्फेच तपासून घेणार आहोत. या कामासाठी क्वालिटी कंट्रोल विभागाने मागितलेले शुल्क टप्प्याटप्प्याने देऊ, अशी माहिती पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर

$
0
0
भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून शासनाला सादर करण्यात आला आहे. या संदर्भात मंगळवारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असा विश्वास पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी व्यक्त केला.

पालिका आयुक्त उतरले नहरीत

$
0
0
पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नहरींच्या आतील भागाची पाहणी केली. जवळपास एक तास त्यांनी नहरीच्या आत घालवला. नहरीची रचना, बांधकाम याची त्यांनी पाहणी केली.

मयुरनगर परिसरात नागरी सुविधा द्या

$
0
0
मयूरनगर परिसरातील विकास शुल्क भरलेल्या सोसायट्या व ले-आउटमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती व ड्रेनेज या नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना खासदार खैरे यांनी मनपाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मतदान केंद्रांची तपासणी करा

$
0
0
सर्व मतदान केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ही तपासणी मतदान केंद्राध्यक्षांकडून करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने २०१४मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

सोनोग्राफी केंद्राचा परवाना नांदेडमध्ये निलंबित

$
0
0
अवैध पद्धतीने गर्भलिंग निदान करताना स्टिंग ऑपरेशनमध्ये सापडलेल्या डॉ. तनुजा बरडे यांच्या सोनोग्राफी केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. डॉ. तनुजा यांचे पती प्रा. डॉ. श्रीनिवास बरडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. डॉ. तनुजा यांच्याकडे सोनोग्राफी केंद्राचा परवाना आहे.

औरंगाबादच्या रस्त्यांवर सीमकार्डची विक्री

$
0
0
रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने मोबाईल सिमकार्ड विकणा-या दोन जणांविरुध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री शहानूरवाडी भागात ही कारवाई करण्यात आली.

दाम्पत्याला जाळले; पोलिसाची बदली

$
0
0
हिमायतनगर तालुक्यातील पंजाबनगर येथील जळीतकांड प्रकरणातील हलगर्जीपणा पोलिस निरीक्षक अशोक घुगे यांच्या अंगाशी आला असून, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या पोलिस ठाण्याची जबाबदारी अनिलसिंह गौतम यांच्याकडे देण्यात आली आहे.

एएमसीची 'पीएमसी'वर उधळण

$
0
0
रस्त्यांच्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेने (एएमसी) प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीवर (पीएमसी) आतापर्यंत करोडो रुपये उधळले आहेत. 'पीएमसी'वर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करूनही रस्त्यांच्या दर्जाबद्दल प्रश्न चिन्ह कायमच आहे.

भर बस स्थानकाजवळ चाकूहल्ला

$
0
0
काळीपिवळी जिपमध्ये प्रवासी बसवण्याच्या वादातून युवकावर चाकूहल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता मध्यवर्ती बसस्थानकजवळ घडली. जखमी युवकावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेत अत्याधुनिक 'मका हब'

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्यात मका पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. त्यामुळे जिल्ह्यात मका हब उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.राज्यात मक्याचे जास्त क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांत औरंगाबादचा समावेश आहे.

शिक्षण विभागावर कॅमे-यांची नजर

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दररोज होणारी गर्दी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे त्रास, राजकीय मंडळींचा वावर यामुळे कामे प्रलंबित राहत होती. यावर तोडगा काढूत शुक्रवारी दुपारपासून प्रभावी अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे.

महापालिकेत गोंधळ घालणा-यांवर कारवाई

$
0
0
महापालिकेत प्रशासन विभागाचे उपायुक्त उपस्थित असताना त्यांच्याकडे निवेदन न देता अप्पर आयुक्तांच्या दालनाला कुलूप लावण्याची घटना निंदनीय आहे. वेळोवेळी संबधित नगरसेवकांनी सांगितलेल्या बाबीकडेप्रशासनाने नेहमी लक्ष दिले असताना केवळ प्रसिद्धीसाठी महापालिका प्रशासन वेठीला धरणे चुकीचे आहे.

पाण्यासाठी रोजंदारीवर 'पाणी'

$
0
0
संजयनगर वॉर्डातील बहुतांश नागरिकांना पाण्यासाठी अनेकदा रोजंदारीवर पाणी सोडावे लागते. पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित नसल्यामुळे पाणी भरण्यासाठी घरातील एक-दोन सदस्यांना घरीच रहावे लागते. त्यामुळे रोजंदारी हमखास बुडतेच.

पहिल्या दिवशी दीड लाखांचे उत्पन्न

$
0
0
आरटीओ कार्यालयात मोटारसायकलची ‌नवीन सिरीज सोमवारी सुरू करण्यात आली. सिरीजमधील चॉईस नंबरचा गोंधळ टाळण्यासाठी यंदा अर्ज मागविण्यात आले होते. एका नंबरसाठी एकच अर्ज आल्याने चॉईस नंबरची फी भरून हा नंबर संबंधिताला देण्यात आला.

यूथ बॉक्सिंग संघाकडून ५ पदकांची अपेक्षा

$
0
0
सर्बेरियातील ग्लोडन ग्लोव्ह्ज आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय यूथ संघ प्रथमच सहभागी होत असला, तरी किमान पाच पदकांची अपेक्षा आहे, असे मत भारतीय यूथ बॉक्सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक जी. मनोहरन यांनी 'मटा'शी संवाद साधताना व्यक्त केली.

उस्मानाबाद नगरपालिकेवरील महावितरणचे संकट हटले

$
0
0
उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणा-या उजनी पाणीपुरवठा योजनेनंतर एकस्प्रेस फिडरसाठी आणि आता तर चक्क महावितरणचे बिल भरण्‍यासाठी निधी देण्याचे वचन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तुळजापूर येथील कार्यक्रमप्रसंगी उस्मानाबाद येथील शिष्टमंडळाला दिले.

गणवेशाचा मुहूर्त पुन्हा चुकणार

$
0
0
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गणवेशाचा कपडा आणि शिलाईचे पैसे संबंधित शाळांच्या स्थानिक व्यवस्थापन समितीला नुकतेच देण्यात आल्यामुळे पंधरा जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images