Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘आदर्श’ प्रकरणी आंदोलनाचा इशारा

0
0
आदर्श सोसायटी गैरव्यवहाराचा आरोप असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री राजेश टोपे व सुनील तटकरे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी सीबीआयला द्यावी, अन्यथा १ जानेवारीपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जनता दल (धर्मनिरपेक्ष) ने दिला आहे.

थेट अनुदान योजनेमुळे गॅस सिलिंडर महागले

0
0
सरकारने गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्याला सुरुवात केली. त्यामुळे पूर्वीच्या पद्धतीपेक्षा गॅस सिलिंडरसाठी जासा पैसे खर्च करावे लागत आहेत. एका सिलिंडरमागे पूर्वीच्या पद्धतीच्या तुलनेत सुमारे दोनशे रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

‘आदर्श’मुळे मराठवाड्याचे माजी मुख्यमंत्री अडचणीत

0
0
वादग्रस्त आदर्श सोसायटीचा अहवाल शुक्रवारी नागपूर अधिवेशनात सादर करण्यात आला. या अहवालात मराठवाड्यातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, (कै.) विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

२७२ किलोमीटरच्या ड्रेनेज लाइन बदलणार

0
0
महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या प्रस्तावानुसार शहरातील ५४४ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइनपैकी २७२ किलोमीटर लांबीच्या ड्रेनेज लाइन बदलल्या जाणार आहेत. याशिवाय शहराच्या विविध भागात सहा मलप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जाणार आहेत.

आधी हाकलले, मग बोलावले

0
0
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शुक्रवारी लघु-टंकलेखक (स्टेनो) पदासाठीची ‌‘स्किल टेस्ट’ घेण्यात आली. परीक्षेदरम्यान उमेदवारांना परीक्षा इंग्रजी माध्यमाची नाही, मराठी माध्यमाची आहे, असे सांगूत बाहेर काढण्याचा प्रकार घडला.

आचारसंहितेपूर्वीच कामाला सुरुवात

0
0
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाची सुरुवात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच होणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले.

तर ‘समांतर’चे पैसे परत करा

0
0
शहराच्या समांतर जलवाहिनीचे काम होत नसेल तर या जलवाहिनीसाठी केंद्र शासनाने दिलेले पैसे परत करा असे केंद्र शासनाच्या नगरविकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे,पण तसे करू नका.

भूमिगत गटार योजनेला मंजुरी

0
0
औरंगाबादसाठीच्या भूमिगत गटार योजनेच्या ३६५ कोटी ६९ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने मंजूरी दिली.

मराठवाडा कनेक्शन

0
0
शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विलासराव देशमुख व अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री आदर्श घोटाळ्याशी संबंधित व तिघेही मराठवाड्याचे हा एक योगायोग. त्यामुळे येत्या निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसची स्थिती अडचणीची होऊ शकते.

नियम रद्द करून आता बैठकांचा फेरा

0
0
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्याच्या नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी गुरुवारी (२० डिसेंबर) विधान परिषदेत जाहीर केल्यानंतर लगेचच मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळेल, याची शक्यता नाही.

विजेसाठी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

0
0
दुष्काळाच्या झळ सहन केलेल्या शेतकऱ्यांचे कृषी पंप ऐन हंगामात बंद करु नका, या प्रमुख मागणीसाठी शिवसैनिकांनी जालना येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चानंतर निवेदन देताना संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी एका अधिकाऱ्यास धक्काबुकी केली, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

जालन्यातील कामे महावितरणने थांबविली

0
0
शिवसेनेच्या मोर्चेकरूंनी कार्यकारी अभियंत्याला केलेल्या कथित मारहाणीनंतर महावितरणने जालना जिल्ह्यातील पायाभूत विकास आराखड्यातील २१३ कोटी रूपयांची कामे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत विकास आराखडा योजना- २ मध्ये ही काम होणार होती.

एनजीओंसाठी नाना रोल मॉडेल

0
0
भारतामध्ये एनजीओंनी खूप चांगली कामे केली आहेत. नजीकच्या काळात संसदेमध्ये तीन विधेयके एनजीओंच्या रेट्यामुळेच पास झाली. पद्मश्री नाना चुडासामा यांनी जाएंटस ग्रुपची स्थापना करून जगभर जाळे विणले.

ट्रान्सपोर्ट चालकाने माल केला लंपास

0
0
कंपनीत मालाची डिलेव्हरी न देता ट्रान्सपोर्ट चालकाने माल परस्पर लंपास केला. पांडुरंग केरुबा कांबळे (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) हे सनिका टेक्नालॉजी कंपनीचे सीईओ आहेत.

‘एकनाथ’ची यंत्रसामग्री देखभालीअभावी धोक्यात

0
0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा गेल्या वर्षीचा गळित हंगाम झाल्यावर कारखान्याच्या सर्व कामगारांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. हंगाम संपल्यावर कारखान्याच्या महत्वाच्या यंत्रांची ओव्हरआइलिंग व केमिकल प्रोसेस न झाल्याने कारखान्याची यंत्रे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पाणीपट्टी कमी करण्यासाठी आंदोलन

0
0
वाळूज औद्योगिक वसाहतीत पायाभुत सुविधा पुरविण्यात याव्यात, पाणीपट्टीची दरवाढ रद्द करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी राज्य कामगार विमाधारक संघटनेने शुक्रवारी एमआयडीसी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात बेशरमांच्या पानांचा हार घालून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सोनखेड ठाण्यांतर्गत ३४ गावांसाठी २९ पोलिस

0
0
लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्यातंर्गत एकूण ३४ गावे व त्यापैकी ५ गावे संवेदनाशील असताना या ठाण्यात केवळ २९ पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडतो आहे.

अतिक्रमित इमारतीचे बांधकाम तत्काळ थांबवा

0
0
चेलिपुरा चौकातील चार मजली अतिक्रमीत इमारतीचे बांधकाम त्वरीत थांबवा व आयुक्तांची परवानगी घेऊन ही इमारत तात्काळ पाडून टाका असे आदेश पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी पालिका प्रशासनाला दिले.

पॅचवर्क चौकशीच्या फायली आयुक्तांच्या ताब्यात

0
0
शहरातील पॅचवर्कच्या चौकशीच्या फायली आयुक्तांनी मागवून घेतल्या आहेत. त्या त्यांच्या ताब्यात आहेत अशी माहिती पालिकेचे मुख्यलेखापरीक्षक एम. आर. थत्ते यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यास हायकोर्टाची मनाई

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उपकुलसचिव व सहाय्यक कुलसचिव यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यास मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए.आय.एस. चिमा यांनी मनाई केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images