Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पंपावरील कर्मचाऱ्यांनी केला लाखाचा अपहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल पंपावर काम करीत असलेल्या दोन भावांनी हिशेबाच्या रक्कमेतील एक लाख पाच हजार रुपयाचा अपहार केला. बीड बायपास रोड येथे २२ मे रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात दोन्ही भावांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड बायपास रोडवर श्रीरामकृष्ण सर्वो अॅटो सर्व्हिसेस पेट्रोलपंप आहे. या पंपावर संशयित आरोपी योगेश बद्रीप्रसाद बोराटे व विशाल बद्रीप्रसाद बोराटे (दोघे रा. गणेशनगर) हे दोन भाऊ कामाला आहेत. पेट्रोलपंपावर २२ मे रोजी पेट्रोल विक्रीची रक्कम जमा झाली. या दोघांनी या रक्कमेतील एक लाख पाच हजार रुपयाचा परस्पर वापर केला. नुकताच हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. याप्रकरणी पंपाचे मॅनेजर सोहेल अजगर सिद्दिकी (वय २६, रा. सिल्कमील कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून योगेश व विशाल यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार कंदे याप्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आव्हान’ समिती सदस्यांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यस्तरीय 'आव्हान' शिबिराला दांडी मारणाऱ्या समिती सदस्यांनमा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शिबिरासाठी २३ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, अध्यक्ष वगळता इतर सदस्य गैरहजर राहत असल्यामुळे संयोजनावर परिणाम झाला होता. या प्रकाराची दखल घेऊन प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी नोटीस बजावली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यपाल कार्यालयाच्या वतीने 'आव्हान' शिबिर सुरू आहे. येत्या तीन जून रोजी शिबिराचा समारोप आहे. चौदा विद्यापीठातील दीड हजार विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेसाठी विद्यापीठाने २३ समित्या नेमल्या आहेत. या समितीत अध्यक्ष आणि सहकार्यासाठी आठ ते दहा सदस्य आहेत. बहुतेक सदस्य शिबिराला दांडी मारत असल्यामुळे संयोजन विस्कळीत झाले आहे. या प्रकाराची तक्रार आल्यानंतर प्र-कुलगुरूंनी अचानक भेट घेऊन गैरहजर सदस्यांची माहिती घेतली. महत्त्वाच्या शिबिराला अनुपस्थित राहिल्याबाबत सदस्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे सदस्य हजर झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टचे पार्सल प्रोसेसिंग सेंटर सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पार्सल टपालच्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता ग्राहकांना अधिक तत्पर सेवा देता यावी, यासाठी डाक विभागाने सिडको एन-सात येथील पोस्ट ऑफिस कार्यालय परिसरात पार्सल प्रोसेसिंग, नोडल डिलिव्हरी सेंटर सुरू केले आहे.

पोस्ट मास्टर जनरल प्रणवकुमार यांच्या हस्ते शुक्रवारी या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सहायक संचालक एस. बी. लिंगायत, प्रवर अधीक्षक अनंत रसाळ, प्रवर डाकपाल एस. एल. बनसोडे, अधीक्षक आर. डी. कुलकर्णी, सहायक अधीक्षक असदुल्ला शेख आदी उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यानंतर बोलताना पोस्ट मास्टर जनरल प्रणवकुमार पत्रकारांशी संवाद साधताना पार्सल टपालच्या संख्येने वाढ होत आहे. सरासरी एक हजार २०० पार्सल रोज शहरात येतात; तसेच मोठ्या प्रमाणात अन्यत्र जातात. हे प्रमाण लक्षात घेत पार्सल नेटवर्क, सिस्टिम आणि प्रक्रियांचे फेररचना करण्याची योजना आखल्याचे नमूद केले. पार्सल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट संकल्पनेमुळे अधिक चांगली वितरण यंत्रणा विकसित झाली असून, पार्सल हँडलिंग क्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक उपकरणेही पार्सल प्रोसेसिंग केंद्रात बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेंटर परिसरावर 'सीसीटीव्ही'ची नजर असून, अधिकाऱ्यांसह १२ कर्मचारी येथे कार्यरत असणार आहे.

दरम्यान, पार्सलची वाढती संख्या, वजन व आकारामानामुळे वितरण व्यवस्थेत ताण येत होता. त्यानुसार वेळीची गरज ओळखून शहरातील सर्व दहा पोस्ट ऑफिसचे पार्सल नोडल डिलिव्हरीमार्फत वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी या सेंटरमुळे पार्सल सेवा अधिक गतिमान व सुरक्षित होण्यास मोठी मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाटलीबंद पाण्यावर पालिका आयुक्तांचे निर्बंध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांवर महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी निर्बंध घातले आहेत. महापालिकेच्या कार्यालयांसह इतर ठिकाणी पाण्याच्या बाटल्यांचा वापर करू नका, असे आदेश त्यांनी शुक्रवारी काढले आहेत. या आदेशाची लगेचच अंमलबजावणी केली जाणार आहे.

शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्याच्या दृष्टीने डॉ. विनायक यांनी काम सुरू केले आहे. कचराकोंडी फोडण्यासाठी शासनातर्फे तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाचा देखील ते अभ्यास करीत आहेत. कचराकोंडी फोडण्यात प्लास्टिकचा वापर अडसर ठरत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शुक्रवारी एक आदेश काढून कार्यालयात पाण्याच्या बाटल्या वापरण्यास बंदी घातली आहे. आदेशात त्यांनी म्हटले आहे की, कार्यालयात होणाऱ्या बैठकांसाठी बाटल्यांमधून पाणी दिले जाते. बाटलीमधील पाणी पूर्णपणे प्यायले जात नाही आणि बाटल्यांचा कचरा देखील होतो. महापालिकेने सध्या कचरा निर्मूलनाचे धोरण अवलंबले आहे. त्यात कचऱ्याचे प्रमाण घटविणे, कचऱ्याचा फेरवापर करणे, प्रक्रिया करणे याचा समावेश आहे. कचरा निर्मूलनाच्या धोरणामुळे पाण्याच्या बाटल्या वापरावर बंदी घालण्यात येत आहे, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसव्या मित्रपक्षापासून सावध रहा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या मित्रपक्षाकडून कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे फसव्या मित्रपक्षापासून सावध रहा, असे आवाहन शिवसेनेचे नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

औरंगाबाद ग्रामीण भागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी तापडिया नाट्य मंदिरात झाली. यावेळी खासदार खैरे बोलत होते. बैठकीला जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना आवाहन करताना खैरे म्हणाले,'शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना नेहमीच आग्रेसर राहिली आहे. शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भागातील जनतेसाठी शिवसेनेने केलेले काम सर्वांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडूक स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षप्रमुखांनी घेतला आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार सर्वांनी कामाला लागावे.'

शिवसेना स्थापनेला ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. औरंगाबादेतील शिवसेना शाखेचा वर्धापनदिन आठ जून रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम विभागप्रमुख ते शाखाप्रमुख आणि सरपंचांच्या उपस्थितीत होणार आहेत, वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले, नरेंद्र त्रिवेदी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महिला आघाडीच्या आनंदीबाई अन्नदाते यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक रमेश बोरराणे यांनी केले. लक्ष्मण सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. राजू वरकड यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाणीपुरवठा’ आता कोल्हेंकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यात कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना अपयश आल्यामुळे आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाची घडी बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाची सूत्रे देण्यात आली आहेत. चहल आता त्यांना सहाय्यक म्हणून काम करतील.

सुमारे दोन-अडीच महिन्यांपासून शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असताना औरंगाबाद शहरात, मात्र पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पाणीपुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी चहल यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी, महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा करून तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयानुसार चौथ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही. नागरिकांचे व नगरसेवकांचे आंदोलन सुरूच राहिले. त्यामुळे आयुक्तांनी या बद्दल काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे व पाणीपुरवठा सुरळीत केला पाहिजे, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना केली होती. त्यानुसार डॉ. विनायक यांनी शुक्रवारी कार्यालयीन आदेश काढून पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांची नियुक्ती केली. पुढील आदेशापर्यंत कोल्हे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहतील, असे डॉ. विनायक यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

हेमंत कोल्हे यांना सरताजसिंग चहल यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सहकार्य करणार आहेत. कोल्हे यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाची सूत्रे आल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा आता सुरळीत होईल असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूरात दूध ओतले; तहसीलसमोर ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलनाच्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपाच्या पहिल्याच दिवशी (शुक्रवारी) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मि‌ळाला. शेतकऱ्यांनी मुंबई महामार्गावर 'रास्ता रोको'; तसेच दूध ओतून संताप व्यक्त केला, तर गंगापूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात इतरत्र मात्र कोणताही परिणाम दिसू न आला नाही.

किसान क्रांतीचे समन्वयक विजय काकडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजता येथील क्रांती चौकातून क्रांती मशाल फेरी काढत संपाला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी एक जून रोजी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. यासंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने पुन्हा एकवार आंदोलनाचे हत्यार उपसावे लागल्याचे काकडे यांनी सांगत ही आंदोलन येत्या काळात अधिक तीव्र होईल, असा इशारा दिला.

संपाचे पडसाद गंगापूर तालुक्यात उमटले. डोणगाव, पिंपळगाव, रायपूर, किन्हळ, पाचपीर वाडी, रायपूर व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी येथील मुंबई महामार्गावर सुमारे दीड तास 'रास्ता रोको' आंदोलन केले. याप्रसंगी नागरिकांना दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर उर्वरित दुध रस्त्यावर ओतून संपकऱ्यांनी संताप व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत मागण्या न केल्यास लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. शेकाप नेते महेश गुजर, मनसेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजीव खिल्लारे, काँग्रेसचे किरण पानकर, रामेश्वर पोपळघट, अशोक कीर्तीकर, गुजर गुरुजी, सुनील वावरे, नितीन चंदिले, सतीश चंदिले. पंकज नन्नवरे आदी उपस्थित होते.

\Bतहसील कार्यालयासमोर ठिय्या\B

गंगापूर शहरात शेतकऱ्यांनी टाळ मृंदगाच्या गजरात शेतकरी दिंडी काढत नंतर तहसील कार्यालयाच्या प्रवेश द्वारात ठिय्या आंदोलन केले. भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, अशी घोषणाबाजी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास ३ जून रोजी कायगाव टोका येथे रास्ता रोको केले जाईल, असा इशाराही देण्यात आला. भाऊसाहेब शेळके,संपत रोडगे, अण्णासाहेब जाधव, महेश गुजर, लक्ष्मी पिसे, संकेत मैराळ, सुरेश चव्हाण, विठ्ठल फटांगडे, सोमनाथ गवारे, मनोज पुंडकर, बाबा दुशिंग, देविदास पाठे, संगीता मोरे आदी उपस्थित होते.

\Bइतरत्र परिणाम नाही\B

गंगापूर व परिसर वगळता जिल्ह्यात संपाचा परिणामी दिसून आला नाही. दूध विक्री; तसेच जाधववाडी येथील बाजार समितीत शेतीमालाची नियमित आवक झाली, अशी माहिती बाजार समितीने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९५ लाखांचे कर्ज नियमबाह्य वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल ७६ लाभार्थ्यांना ९५ लाखांचे कर्ज नियमबाह्य वाटप केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक व लेखापालाविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २००४ ते ३१ डिसेंबर २००७ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हा प्रकार घडला.

या प्रकरणी अरुण ठक्कर (रा. एन अकरा, हडको) यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये म्हटले आहे की, एप्रिल २००४ ते डिसेंबर २००७ या कालावधीत महामंडळामध्ये तत्कालीन जिल्हा व्यवस्थापक नागेश जगदीश देशपांडे, तर लेखापाल म्हणून कमलेश म्हाळसाकांत भाले कार्यरत होते. या दोघांनी या कालावधीत महामंडळाच्या विविध योजनाच्या कर्ज प्रकरणात कर्ज पुरवठा केला, मात्र हा कर्ज पुरवठा करताना त्यांनी पुरवठादार अस्तिवात आहेत किंवा नाहीत याची खात्री केली नाही. अस्तिवात नसलेल्या काल्पनीक पुरवठा दाराच्या नावावर त्यांनी कर्जवाटप केले. यामुळे खऱ्या लाभार्थींना मदत करण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण झाला नाही. या दोघांनी अशा काल्पनिक ७६ लाभार्थींना ९५ लाख ४८ हजार रुपयांचे नियमबाह्य कर्ज वाटप केले. यामध्ये शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन त्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी ठक्कर यांच्या तक्रारीवरून व्यवस्थापक देशपांडे व लेखापाल भालेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार देशमुख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनांना संरक्षणाच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे उपलब्ध होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले.

या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात भाजीपाला व दूध इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांवर विशेष नजर ठेऊन त्यांना आवश्यकतेनुसार पुरेशी संरक्षण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. वाहने अडवली जाणार नाहीत यादृष्टीने पोलिस यंत्रणेनी तयारी ठेवावी. मुख्य डेअरी, दुधाचे मुख्य वितरक, भाजीपाला विक्रेते, व्यापारी, भाजीमंडई व्यवस्थापक यांच्या सोबत समन्वय संपर्क ठेऊन कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही, संपकऱ्यांकडून ज्या ठिकाणी काही घडण्याची शक्यता असेल, त्याबाबत तत्काळ संबंधितांनी पोलिस यंत्रणेला सूचित करावे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेऊन पुरेशी कुमक तयार ठेवावी. या संप काळात दूध, भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत प्रत्येक दिवशीचा अहवाल मुख्य सचिव आणि गृह सचिव यांना पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत मंगळवारपासून पुन्हा एकदा पास सिस्टीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मंगळवारपासून (५ जून) अपघात विभागासह सर्व ३० वॉर्डांमध्ये पुन्हा एकदा पास सिस्टीम लागू होणार असून, पासचे काटेकोर पालन होणार असल्याचा निर्वाणीचा इशाराही शुक्रवारी (१ जून) झालेल्या बैठकीत देण्यात आला. आता एका रुग्णाला केवळ एक पास दिला जाणार आहे आणि फक्त सायंकाळी पाच ते सात या वेळेत रुग्णांना पासशिवाय भेटता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही रुग्णालयामध्ये पास सिस्टीम लागू करण्यात आली होती, परंतु त्यावेळी एका रुग्णाला दोन पास देण्यात येत होते. मात्र दोन-दोन पासमुळे वॉर्डा-वॉर्डामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते. त्यामुळे दोन पासला विरोध झाला होता. त्यानंतर शुक्रवारी घाटीचे डॉक्टर-अधिकारी-कर्मचारी-परिचारिका तसेच मार्ड व सुरक्षा रक्षकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वांच्या सहमतीने ५ जूनपासून पास सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित दामले, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्नास सिटी बससाठी आयुक्तांचा हिरवा कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्मार्ट सिटी प्रकल्पातून सिटी बस सुरू करण्याला महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी हिरवा कंदील दाखवला असून पहिल्या टप्प्यात पन्नास बस खरेदी करण्याची तयारी झाली आहे. यातील किमान पंधरा सिटी बस स्वातंत्र्यदिनी सुरू व्हाव्यात अशी सूचना आपण आयुक्तांना केली आहे,' अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

महापौर म्हणाले,"सिटी बस आवश्यकतेबद्दल आयुक्तांनी काही व्यक्तींची मते जाणून घेतली. सुमारे ३७ टक्के लोकांनी सिटी बस सुरू करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सिटी बस खरेदी प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेला गती देवून सिटी बस खरेदीचे काम लवकर पूर्ण करा, असे आपण आयुक्तांना सांगितले आहे. आयुक्तांनी देखील सेवा सुरू करण्यास तयारी दाखवली आहे. आयुक्तांच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात पन्नास सिटी बस सुरू होतील. जानेवारीपर्यंत बस सुरू व्हाव्यात असे आयुक्त म्हणाले आहेत, परंतु स्वातंत्र्यदिनी सिटी बस सेवा सुरू करण्याची घोषणा आम्ही यापूर्वीच केली आहे. त्यामुळे पन्नास पैकी किमान पंधरा बस स्वातंत्र्यदिनी सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा असे आयुक्तांना सांगितले आहे. त्यांनीही त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा शब्द दिला आहे. आयुक्तांनी पुढाकार घेतल्यामुळे सिटी बस सेवा लवकरच सुरू होईल,' असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

\B'समांतर'बद्दल आज चर्चा

\Bआयुक्त डॉ. निपुण विनायक शनिवारी मुंबईला जाणार असून ते मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी प्रवीण परदेशी यांच्याशी समांतर जलवाहिनी योजनेच्या संदर्भात चर्चा करणार आहेत. समांतर जलवाहिनीच्या संदर्भात यापूर्वीच पालिका पदाधिकारी, आमदार यांच्याबरोबर परदेशी यांची बैठक झाली आहे. न्यायालयाबाहेर तडजोड करून समांतर जलवाहिनीचे काम सुरू करण्याबाबत त्या बैठकीत चर्चा होऊन तसा प्रस्ताव तयार करण्याचे ठरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. सौ. इं. भा. पाठक महिला महाविद्यालयातील बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. वसुधा पुरोहित, प्रा. डॉ. सुशिला फुले, प्रा. विदुल सुकळीकर, पर्यवेक्षिका प्रा. एस. जे. चव्हाण आदी उपस्थित होते. प्राजक्ता तुपकर (कला शाखा), निकिता सूर्यवंशी ( वाणिज्य शाखा), आदिती धनेधर (विज्ञान शाखा), आलिया शेख (एच. एस. व्ही. सी.) या विद्यार्थिनींचा पालकांसह सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर पोलिस दलात १३ निरीक्षकांचे खांदेपालट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस दलात नवीन आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी १३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी जारी केले. यामध्ये महत्त्वाची शाखा असलेल्या गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी पुन्हा मधुकर सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंत यांच्यासह दोन निरीक्षकांची पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी बदली करण्यात आहे.

तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांचा देखील समावेश होता. सावंत यांचा गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदाचा कार्यकाल बाकी असताना त्यांची अचानक सप्टेंबर महिन्यात यादव यांनी गुन्हे शाखेतून क्रांतीचौकात व नंतर शहर वाहतूक शाखेत बदली केली होती. त्याचप्रमाणे सिटीचौकचे दादाराव शिनगारे, जिन्सीचे श्यामसुंदर वसूरकर यांची देखील बदली करण्यात आली होती. चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी काढलेल्या आदेशामध्ये या तीन निरीक्षकांना पूर्वीच्या ठिकाणीच नेमण्यात आले आहे. बदल्या करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकाचे सध्याचे नेमणुकीचे व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे.

दादाराव शिनगारे उस्मानपुरा ते सिटीचौक, निर्मला परदेशी महापालिका अतिक्रमण हटाव ते सिडको, श्रीपाद परोपकारी क्रांतीचौक ते छावणी, श्यामसुंदर वसूरकर मुकुंदवाडी ते जिन्सी, हनुमंत गिरमे सिडको वाहतूक शाखा ते क्रांतीचौक, शरद इंगळे नियंत्रण कक्ष ते जवाहरनगर, प्रल्हाद घोडके नियंत्रण कक्ष ते उस्मानपुरा, नाथा जाधव सुरक्षा विभाग ते सातारा, भारत काकडे सातारा ते शहर वाहतूक शाखा, मुकुंद देशमुख छावणी ते छावणी वाहतूक शाखा, रामेश्वर रोडगे छावणी वाहतूक शाखा ते सुरक्षा विभाग, इंदलसिंग बहूरे नियंत्रण कक्ष ते मनपा अतिक्रमण हटाव पथक आणि मधुकर सावंत शहर वाहतूक शाखा ते गुन्हे शाखा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपिनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ स्मारकासाठी शासकीय दूध डेअरी येथे सरकारकडून जागा देण्यात आली आहे. मात्र, या जागेवर स्मारक उभारण्यासाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. यासह ऊसतोड महामंडळ, विद्यापीठामध्ये संशोधन केंद्र उभारण्यात यावे या मागणीसाठी जय भगवान महासंघाने शुक्रवारी (१ मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

स्‍मारकासाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विडा उचलला होता. मात्र त्यांना पदावरून दूर केल्यामुळे स्मारक प्रत्‍यक्षात न उतरता कागदावरच राहिले. त्यामुळे स्मारकासाठी, ऊसतोड महामंडळासाठी तसेच विद्यापीठातील संशोधन केंद्रासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला छावा श्रमिक संघटनेनेही पाठिंबा दिला. यावेळी जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप, सुभाष जावळे, विशाल सानप, रामकिसन दहिफळे, सचिन डोईफोडे, योगेश खाडे, बाबाराम मिसाळ, कुणाल गजहंस, दिनेश भगुरे यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहन महामंडळाचा वर्धापनदिन उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रवाशांचे पेढे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक व बालकांच्या हस्ते केक कापण्यात आला. सकाळी दहा वाजता मध्यवर्ती बसस्थानकात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहाव्यवस्थापक मधुकर पठारे, विभागीय नियंत्रक अधिकारी किशोर सोमवंशी, एम. डी. केंजळे, विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी, विभागीय अभियंता मीनल मोरे, आर. के. बत्तीसे यंची प्रमुख उपस्थिती होती. प्रवाशांच्या मनातील सेवा एसटी महामंडळाने दिली आहे. एसटी महामंडळाचे चालक बस अगदी सुरक्षित चालवत असल्याने एसटी अपघाताचे प्रमाण ०. १६ टक्के असल्याची माहिती मधुकर पटारे व प्रशांत भुसारी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खुश्कीच्या मार्गाने प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही विभागांना विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले असून 'पीजी सीईटी'साठी नोंदणी केल्यानंतर मोजक्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. काही विभागात दहापेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असल्यामुळे विभागप्रमुखांनी 'स्पॉट अॅडमिशन'च्या नावाखाली खुश्कीच्या मार्गे मागच्या दाराने प्रवेश देऊन कोटा पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत.

विद्यापीठातील विभागांचा स्वायत्त कारभार सुधारण्यासाठी ऑनलाइन 'पीजी सीईटी' सुरू केली. या प्रवेश परीक्षेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, काही विषयांना अत्यल्प प्रतिसादामुळे प्रशासनासमोर पेच उभा राहिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार दहापेक्षा कमी विद्यार्थी असलेले विभाग बंद करणे बंधनकारक आहे. संस्कृत, नॅनो टेक्नॉलॉजी, परफॉर्मिंग आर्ट्स या विषयाची 'सीईटी' दहापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी दिली. आता प्रत्यक्ष किती विद्यार्थी प्रवेश घेणार याची साशंकता आहे. मागील वर्षीसुद्धा काही विभागात दहापेक्षा कमी विद्यार्थी होते. विभागांचा पांढरा हत्ती पोसणे प्रशासनाला कठीण झाले आहे. काही विभागात सहा प्राध्यापक आणि विद्यार्थी १३ अशी स्थिती होती. 'पीजी सीईटी'नंतर परिस्थिती सुधारण्याची शक्यता होती. या प्रयत्नाला जेमतेम यश मिळाले आहे. विशेष म्हणजे 'सीईटी'बाबत बहुतेक विद्यार्थी अनभिज्ञ असल्याचे एका प्राध्यापकाने सांगितले 'सीईटी' नोंदणीशिवाय प्रवेश मिळणार नाही हा नवीन नियम विद्यार्थ्यांना माहीत नाही. जून महिन्यात 'स्पॉट अॅडमिशन'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विभागांनी तयारी केली आहे. विद्यार्थीसंख्येचा 'कोटा' पूर्ण करण्यासाठी स्पॉटशिवाय पर्याय नसल्याची वस्तुस्थिती आहे. या प्रवेशासाठी प्रशासनाला विनंती करण्यात येणार आहे. नियमातून पळवाट काढण्यासाठी विभागप्रमुख तत्पर असल्यामुळे प्रशासन परवानगी देण्याची शक्यता आहे. अन्यथा, रिकाम्या विभागाचे काय करावे हा प्रश्न उभा राहणार आहे.

दरम्यान, 'सीईटी'साठी नोंदणी करणारे आणि प्रत्यक्ष सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची तफावत आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेला चांगला प्रतिसाद आहे. सामाजिकशास्त्रे विभागात इंग्रजी, इतिहास, मराठी, मानसशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

\Bसंशोधनाचा दर्जा?

\Bकाही विभागात पुरेसे प्राध्यापक नसल्यामुळे एम. फिल., पीएच. डी. संशोधनाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाली अँड बुद्धिझम विभागप्रमुख शिक्षणशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत. शिक्षणशास्त्र आणि पाली या दोन्ही विभागाचा पदभार ते सांभाळतात. प्राध्यापक नसलेल्या काही विभागात संशोधकांनी एम. फिल संशोधन पूर्ण केले. तासिका तत्त्वावरील प्राध्यापक मार्गदर्शन करीत असले तरी एकूण संशोधनाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बहुतेक विभागात संशोधनाची हीच अवस्था असल्यामुळे विद्यार्थीसंख्या घटत आहे.

'पीजी सीईटी' झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यात येत आहे. काही विभागात कमी विद्यार्थी आहेत. मात्र, या परिस्थितीत काय करायचे याबाबत प्रशासन योग्य निर्णय घेईल.

- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

'पीजी सीईटी' देणारे विद्यार्थी

\Bविषय विद्यार्थीसंख्या

\Bरशियन साहित्य ०३

पाली अँड बुद्धीझम १३

संस्कृत ०४

पुरातत्त्वशास्त्र २१

उर्दू २१

स्त्री अभ्यास ११

संगीत २०

परफॉर्मिंग आर्ट्स ०९

नॅनोटेक्नॉलॉजी ०७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापन निवडणुकीसाठी २६ अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. येत्या १५ जून रोजी निवडणुकीत एकूण आठ सदस्य व्यवस्थापन परिषदेसाठी निवडले जाणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अधिसभा सदस्य आणि समर्थकांनी गर्दी केली होती. या निवडणुकीत प्रभारी अधिकाऱ्यांना मतदान देण्याचा अधिकार देण्याबाबत शुक्रवारी कुलगुरुंनी कोणताही निर्णय घेतला नाही.

व्यवस्थापन परिषद निवडणुकीसाठी प्राचार्य गटात ओबीसी प्रवर्गातून एक आणि खुल्या प्रवर्गात चार अर्ज आहेत. पदवीधर गटात एसटी प्रवर्गात एक आणि खुल्या प्रवर्गात चार अर्ज, संस्थाचालक गटात एससी प्रवर्गात एक आणि खुल्या प्रवर्गात पाच अर्ज, शिक्षक गटात एनटी प्रवर्गात दोन आणि खुल्या प्रवर्गात आठ अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी अधिसभा सदस्य डॉ. भारत खैरनार, डॉ. नरेंद्र काळे, सुनील मगरे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. बाबासाहेब कोकाटे (बीड), भगवानसिंह ढोभाळ, एस. पी. निकम, राहुल म्हस्के, प्राचार्य सुभाष टकले, डॉ. सतीश दांडगे, डॉ. गोविंद काळे, हरिदास विधाते, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. राजेश करपे, भाऊसाहेब राजळे, संजय निंबाळकर, संभाजी भोसले, मुंजाजी धोंडगे आदींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीत प्रभारी अधिकाऱ्यांना मतदान देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाच्या विरोधात उत्कर्ष पॅनलने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तर विद्यापीठ विकास मंचने विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्या अधिसभा सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. कुलगुरू, अधिकाऱ्यांच्या दालनात अरेरावी करणे, गुंडगिरी करण्याच्या प्रकारामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. विद्यापीठाला बदनाम करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शाळेचे शिक्षक सुनील मगरे, अ‍ॅड. संजय काळबांडे आणि भारत खैरनार पदवीधरमधून निवडून आले आहेत. या सदस्यांना विद्यापीठ आणि उच्च शिक्षणाबद्दल माहिती नसल्यामुळे अर्वाच्च भाषेत बोलून विद्यापीठाची प्रतिमा मलिन करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निवेदनावर डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, डॉ. भगवानसिंग डोभाळ, डॉ. गोविंद काळे, योगिता हाके, डॉ. कालिदास भांगे, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. संजय सांभाळकर, नितिन वाकेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

\Bचौकशी समिती विद्यापीठात

\Bकुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार नियुक्त चौकशी समिती सायंकाळी विद्यापीठात दाखल झाली. या समितीने काही कागदपत्रांची मागणी करीत तपासणी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील आठवड्यात ही त्रिसदस्यीय समिती एक दिवस चौकशी करून परतली होती. आता दुसऱ्यांदा चौकशीसाठी समिती सदस्य आल्यामुळे विद्यापीठात उलटसुलट चर्चा रंगली आहे. ही समिती दोन दिवस थांबण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आरडीसी’पदी जाधवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या पाच महिन्यांपासून प्रभारी असलेल्या औरंगाबाद निवासी उपजिल्हाधिकारीपदी संजीव जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारीपदावर विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नगर परिषद उपसंचालक रिता मेत्रेवार यांची, तर सिल्लोड उपविभागीय अधिकारी पदावर बिलोली (जि. नांदेड) येथील उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांची बदली करण्यात आली. तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे; तसेच सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या निलंबनानंतर दोन्ही पदे प्रभारींच्या खांद्यावर होती. आता पाच महिन्यांनंतर या पदांवर नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलप्रकरणी दहाजणांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात दंगल काळामध्ये पानदरीबा परिसरातील सात मालमत्तांची नासधूस करुन एका दुकानाला जाळल्याप्रकरणात दहा आरोपींचा नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी शुक्रवारी (१ जून) फेटाळला.

या प्रकरणी अमित दत्ता इंगळे (२७, खाराकुँआ), करण मथुरेदास भानुशाली (२८, जाफरगेट), सोमनाथ पाटील (२६, अंगुरीबाग), सुरेश शंकर नलावडे (२५, खाराकुँआ), नितीन खंडेलवाल (२७ रा. खाराकुंआ), विशाल येसके (२५, चेलीपुरा), नरेंद्र यशवंत इंगळे (२७, राजाबाजार) देवेश उर्फ बंटी चंदेश दीक्षित (२६, सिडको एन-७), राजू लक्ष्मण क्षीरसागर (२७, राजाबाजार), अमित प्रमाद पावरेकर (२३, कासारीबाजार) या दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना १३ मे रोजी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना १७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडी करण्यात आली होती. त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता असता, त्यांना जामीन दिल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. जातीय तेढ निर्माण होऊन पुन्हा दंगल होऊ शकते. त्यामुळे त्यांना नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने सर्व आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुखाच्या सरी बरसल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उन्हाने अंगाची लाही लाही सहन होणाऱ्या औरंगाबादकरांना शुक्रवारी पूर्वमोसमी पावसाने चिंब केले. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल अर्धा तास सुरू होता. हडकोत काही ठिकाणी गारपीटही झाली.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील उकाडा वाढला असल्याने कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होण्याची चिन्हे होती. आज दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यानंतर दमदरार पावसाला सुरुवात झाली. शहरातील बहुतांश भागांमध्ये पाऊस झाला. सिडको, हडको, लेबर कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दिल्ली गेट, मौलाना आझाद चौक ते टीव्ही सेंटर या भागामध्ये अर्धा तास पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सलीम अली सरोवरासमोरील दोन झाडे कोसळली. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या ४८ तासात विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

\B४४ तालुक्यात बरसला; तीन मंडळांत अतिवृष्टी

\Bशुक्रवारी सकाळपर्यंत मराठवाड्यातील नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मागोळी (११६ मिलिमीटर), उस्मानाबाद (६७ मिलिमीटर) व भूम (७८ मिलिमीटर) मध्ये अतिवृष्‍टी झाली. मराठवाड्यातील ४४ मंडळांमध्ये पूर्वमोसमी पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २५ मिलिमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यात २१, नांदेड जिल्ह्यामध्ये १४ तर हिंगोली जिल्ह्यात ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>