Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दरेगाव कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे यश

0
0

औरंगाबाद : बाजारसावंगी-दरेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश मिळविले. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेतर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. भाग्यश्री जाधव हिने ७८ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक मिळविला. सौरभ राऊत याने ७५ टक्के गुण मिळवित द्वितीय तर, पूजा गायकवाड हिने ७४.४६ टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, दिगंबर गाडेकर, डॉ. सीताराम भोसले, डॉ. रमेश खडके, प्रा. शांता भोसले, प्रकाश वेताळ, काकासाहेब दिवेकर यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एसटी’ कराराचे स्वागत

0
0

औरंगाबाद : एसटीच्या वेतन कराराचे शनिवारी विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा तसेच मध्यवर्ती बसस्थानकात एसटी कामगार सेनेने फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. एसटी कामगार सेनेचे शिवाजी बोर्डे - पाटील, कार्याध्यक्ष विनायक हाके, उषाताई मेहेत्रेसह अन्य कामगारांनी या आनंदोत्सवात सहभाग नोंदविला. यावेळी मनोहर वेताळ, मनोज पहुरे, अमोल खोमणे, अनिता सोनगिरे, अल्ताफ अहेमद यांच्यासह अन्य कामगारांची उपस्थिती होती. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मागील वर्षभरांपासून अडकलेला वेतन करार केला आहे. हा करार केल्याबद्दल रावते यांच्या अभिनंदनाचा ठराव या आनंदोत्सवात घेण्यात आला.

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरणच्या कामाचे पितळ उघड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात जून महिन्यात झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने महावितरणच्या कामाचे पितळ पुरते उघडे पडले. शनिवारी दिवसा आणि रात्रीही विजेचा लंपडाव सुरू होता.

दुपारी पावणेचारच्या सुमारास पावसाला सुरू झाला. त्यानंतर लगेच काही भागात वीज पुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली. पन्नालाल नगरला सातारा भागातून वीज पुरवठा होत असतो. पावसामुळे सातारा भागातून येणारी वीज वाहिनी तुटल्याने पन्नालालनगर, ज्योतीनगर, उस्मानपुरा, क्रांतीचौक, रेल्वे स्टेशन, पदमपुरा भागातील वीज पुरवठा खंडित झाला. याशिवाय एन ३ आणि एन ४ भागात वीज वाहिन्यांवर तारा कोसळल्या. यामुळे या भागात वीज वितरण व्यवस्थाही बंद पडली. याशिवाय चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील दोन इंड्रस्ट्रियल फिडरही बंद पडले. चिकलठाणा भागात म्हाडा फिडर बंद पडल्याचा फटका या भागातील नागरिकांना बसला. याशिवाय रामा हॉटेलचे फिडर बंद पडल्याने या भागातील नागरिकांचे चांगलेच हाल झाले. हर्सूल, जटवाडा, हर्सूल गाव परिसरासह विदयापीठातही वीज पुरवठा खंडित झाला होता. याशिवाय छावणी, शहागंज, या भागातही वीज पुरवठा खंडित झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ………पहिल्याच पावसाने सूतगिरणी भागातील चौकात पाणी शिरले होते. याशिवाय शहानूरवाडी येथे काही जण पत्र्यांच्या शेडमध्ये अडकल्याचा फोन अग्निशमन विभागाला आला होता. पडेगाव येथे एक व्यक्ती विहिरीत पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली होती.

\Bनियंत्रण कक्षाकडून प्रतिसाद नाही

\Bमहावितरण विभागाने काही दिवसांपूर्वी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. या नियंत्रण कक्षाला ०२४० -२३४३१२४ या क्रमांकावर शहरातील अनेक जणांनी संपर्क केल्यानंतरही या कक्षाकडून ग्राहकांना प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय अनेकांनी फ्यूज कॉल सेंटरवर संपर्क केला. त्या ठिकाणीही फोन काढून बाजूला ठेवल्याची माहिती अनेक ग्राहकांनी 'मटा'ला दिली. महावितरणने मान्सूनची तयारू म्हणून अनेक भागात भारनियमन करून कामे करून घेतली. मात्र, या कामाचा दर्जा पहिल्याच पावसाने उघड पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील कामांसाठी लष्कराची मदत घ्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'शहरातील विकास कामांसाठी लष्कर आणि पर्यटन विभागाची मदत घ्या,' अशी सूचना शिवसेना संपर्कनेते विनोद घोसाळकर यांनी केली आहे. 'या दोन्ही विभागांच्या मदतीमुळे दर्जेदार कामे होतील,' असे ते म्हणाले.

स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने घोसाळकर यांचे महापालिकेत आगमन झाले होते. यावेळी त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, 'मुंबईत लष्कराने दोन पुलांचे बांधकाम केले आहे. त्यांनी केलेले काम अल्पावधीत झाले असून चांगल्या पद्धतीने केले आहे. औरंगाबाद मध्येही छावणी परिसराच्या माध्यमातून लष्कराचे मोठे कार्यालय आहे. ब्रिगेडिअरचे पद या ठिकाणी आहे. शहर विकासासाठी त्यांची मदत घेता येते का याचा विचार केला पाहिजे. खैरे यांनी दिल्लीत या संदर्भात पाठपुरावा केला तर स्वतंत्र निधी देखील मिळण्याची शक्यता आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातूनही निधी मिळवून शहराचा विकास केला जाऊ शकतो,' असे घोसाळकर म्हणाले.

\Bमहापौर पत्र देणार

\Bया संदर्भात बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, 'लष्कराकडून मदत मिळावी म्हणून खासदार खैरे यांना पत्र दिले जाईल. खैरे यांचा दिल्लीत मोठा संपर्क आहे. त्यामुळे निश्चितपणे मदत मिळेल असे वाटते. पर्यटन खात्याच्या मंत्री व व्यवस्थापकीय संचालकांना देखील पत्र देऊन शहर विकासासाठी मदत करण्याची विनंती केली जाणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोहिण्यांच्या मुसळधार सरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन आठवड्यांपासून उन्हाने हैराण झालेल्या औरंगाबादकरांना मुसळधार पावसाने दिलासा दिला. शहरात शनिवारी दुपारी तासभर रोहिणी नक्षत्रांच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे अवघे वातावरण बदलले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे.

कडक उन्हाने त्रस्त नागरिकांना पावसाच्या सरींनी थंड वातारणाचा सुखद अनुभव दिला. दोन दिवस पाऊस पडल्यामुळे अवघे वातावरण बदलले. उन्हाची जागा गारव्याने घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यासह दुपारी तासभर रोहिणी नक्षत्राच्या सरी बरसल्या. सोसाट्याचा वारा असल्याने काही वसाहतीतील वीज पुरवठा खंडित झाला. संपूर्ण शहरात पावसाचा जोर होता. तासभर पाऊस पडताच सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी नालेसफाई नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर आले. अचानक पडलेल्या धुव्वाधार पावसामुळे फेरीवाल्यांची तारांबळ उडाली. तर वाहतूक काही वेळ बंद झाली. शहरात ३२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली. यंदा ४२ सेल्सिअस अंश तापमान गाठणारे शहर दोन दिवसात थंड झाले. पावसानंतर कमाल तापमान ३९ आणि किमान २५.६ सेल्सिअस अंश होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जवाहर कॉलनी, घाटी परिसर, विद्यापीठ परिसर आणि दिल्ली गेट परिसरात झाडाच्या फांद्या कोसळल्या. या घटनेमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोडल्या. मोठी क्रेन लावून सायंकाळी काही ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील अतिक्रमित वसाहतीत पाणी घुसण्याचा प्रकार पावसाळ्याच्या पहिल्याच दिवशी घडला. पाणी वाहण्यास अडथळा ठरणारी बांधकामे कायम राहिल्याने घरात पाणी शिरण्याचे प्रकार अधिक होण्याची भीती आहे. पुरेशी नालेसफाई झाली नसल्यामुळे पाणी रस्त्यांवर आले. या दुर्गंधीयुक्त पाण्याने रहिवाशांच्या गैरसोयीत भर पडली. महापालिका प्रशासनाने काही भागात पाहणी केली.

\Bजिल्ह्यात जोरदार पाऊस

\Bवैजापूर, सिल्लोड, कन्नड तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यास या आठवड्यात पेरणीचे कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या पेरण्या रोहिण्या बरसल्यामुळे पहिल्याच आठवड्यात सुरू होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार उमेदवार बिनविरोध विजयी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत शिक्षक गटात एनटी प्रवर्गात डॉ. फुलचंद सलामपुरे यांची बिनविरोध निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. भगवान ढोबाळ यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. यापूर्वी डॉ. हरिदास विधाते राहुल म्हस्के आणि सुनील निकम बिनविरोध विजयी झाले आहेत.

व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी करून शनिवारी वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. शिक्षक गटातून डॉ. फुलचंद सलामपुरे बिनविरोध विजयी झाले. प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. भगवान ढोबाळ यांचा अर्ज अवैध ठरला. चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून ढोबाळ यांच्यासह डॉ. सतीश दांडगे यांचा अर्ज अवैध ठरला. आता खुल्या प्रवर्गातील २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संस्थाचालक गटातून माजी शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या पत्नी मनीषा टोपे निवडणूक लढवत आहेत. ही जागा बिनविरोध सोडवण्यासाठी टोपे राजकीय ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीत बारा प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या सात जूनपर्यंत या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांच्या मतदानाबाबत अंतिम निर्णय घेतला नाही. परिणामी, दोन्ही गटांच्या सदस्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकनेते मुंडे यांचा आज स्मृतिदिन

0
0

औरंगाबाद : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त रविवारी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मृती समितीने दिली. मुंडे यांच्या स्मारकाचे नियोजित स्थळ असलेल्या जालना रोड येथील शासकीय दूध डेअरी प्रांगणात सायंकाळी सहा वाजता अभिवादन सभेला सुरुवात होईल. अभिवादन कार्यक्रमास समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यायग्रस्त शिक्षक न्यायालयात जाणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या नुकत्याच केल्या. या बदल्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ५५० शिक्षक बदली होऊनही पदस्थापना न मिळाल्याने विस्थापित झाले. ३५०० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या. या बदल्या योग्य झाल्या नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटून शिक्षकांनी आपली कैफियत मांडली. बदल्यांमधून शिक्षकांवर अन्याय झाल्याचा दावा करत शिक्षकांची बैठक शनिवारी झाली. बदल्यांविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद शिक्षक सोसायटी कार्यालयात मराठवाडा शिक्षक कृती समितीचे निमंत्रक दिलीप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली तर मुख्य समन्यव्यक राजेश पवार, संतोष ताठे, सदानंद माडेवार, कृष्णा शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक झाली. पाच तास चाललेल्या बैठकीत शिक्षकांनी बदल्यांमध्ये झालेली अनियमितता सांगितली. पती - पत्नी एकत्रिकरण, कनिष्ठ शिक्षक व सर्वाधिक एकल शिक्षक यांच्यावर अन्याय होऊन विस्थापित झाले आहेत. २७ फेब्रुवारीच्या धोरणाचे उल्लंघन करण्यात आले असून राज्यातील सर्व बदल्या नियमबाह्य असल्याचा दावा करण्यात आला. जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांनी संवर्ग एक व दोनमध्ये बनावट कागदपत्रे देऊन लाभ घेतला आहे. सेवाज्येष्ठता डावलून पोस्टिंग मिळाल्याची उदाहरणे शिक्षकांनी लेखी पुराव्यासह बैठकीत सादर केली. विस्थापित शिक्षकांनी याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी महिला शिक्षकांनी मांडल्या. बदली झालेल्या ज्या शिक्षकांनी प्रमाणपत्र सादर केले आहेत. त्याची तपासणी झेडपी पातळीवर व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

\Bचौकशी करण्याची मागणी

\Bसंवर्ग दोन पती - पत्नी यांनी अंतर कमी असताना जास्त दाखवून घेतलेले लाभ, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात येऊन त्यांच्या जागा विस्थापित शिक्षकांना संधी द्यावी, कायमस्वरूपी रिक्त ठेवलेल्या जागा विस्थापित शिक्षकांना देण्यात याव्यात, आदी निर्णय घेण्यात आले. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला , संतोष ताठे यांनी प्रास्ताविक केले. सदानंद माडेवार, कृष्णा शिंदे, सुषमा राऊतमारे यांनी मनोगत व्यक्त केले, दिलीप ढाकणे यांनी अन्याय ग्रस्त शिक्षकाना न्याय मिळवून देईपर्यत संघर्ष सुरू असेल, असे सांगितले मुख्य समन्वयक राजेश पवार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आव्हान’ देशभर नेण्याचा प्रयत्न करू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राष्ट्रीय सेवा योजनेशी जोडलेला युवक कधीच सामाजिक बांधिलकी विसरत नाही. राष्ट्र उभारणीत प्रेरित तरुणांची गरज आहे. 'आव्हान' शिबिर घेऊन महाराष्ट्राने आदर्श संकल्पना मांडली. हा उपक्रम सर्व राज्यात घेण्याचे प्रयत्न करू,' असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे आयपीएस संचालक विरेंद्र मिश्रा यांनी केले. ते आव्हान शिबिरात बोलत होते.

राज्यपाल कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने 'आव्हान -राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर' आयोजित करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दहा दिवस चाललेल्या शिबिराचा रविवारी दुपारी समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे आयपीएस संचालक विरेंद्र मिश्रा, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंके, 'एनडीआरएफ'चे निरीक्षक एस. पी. राणा, जी. बी. कतलाकुट्टे, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे आणि समन्वयक प्रा. टी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील १४ विद्यापीठांच्या दीड हजार विद्यार्थ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या शिस्तप्रिय प्रशिक्षणाचा मान्यवरांनी गौरव करीत सद्यस्थितीवर मनोगत मांडले. देशभरात आव्हान शिबिर घेण्याचा प्रयत्न करू, असे विरेंद्र मिश्रा म्हणाले. 'शिबिरात विद्यार्थी कौशल्य शिकून बाहेर जात आहेत. स्वत:कडे कौशल्य असणे महत्त्वाचे असते. १९६९ मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेत सुरुवातीला फक्त ४० हजार स्वयंसेवक होते. सद्यस्थितीत देशभरात ४१ लाख स्वयंसेवक आहेत. आपत्ती निवारणात त्यांची मोलाची मदत होते. 'आव्हान'ची संकल्पना आदर्श असून प्रत्येक राज्यात राबविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या शिबिरामुळे आपत्ती निवारणाशी जोडलेले विद्यार्थी सामाजिक बांधिलकी आणि मानवता यांच्यापासून दूर जात नाही' असे मिश्रा म्हणाले.

तरुणांच्या जीवनात 'एनएसएस'च्या महत्त्वावर बागडे यांनी भाष्य केले. 'राष्ट्रीय सेवा योजनेचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. विद्यार्थी दरवर्षी खेडेगावात चांगले काम करतात. प्रबोधनाचे काम केले तर यश मिळते. अजूनही देशात स्वयंशिस्तीचे धडे देण्याची गरज आहे. मागील ७० वर्षात राज्यकर्त्यांनी स्वयंशिस्तीसाठी कधी पुढाकार घेतला नाही. हा पुढाकार घेतला असता, तर देश आणखी पुढे गेला असता' असे बागडे म्हणाले.

यावेळी 'एनडीआरएफ'च्या कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. प्रा. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. साधना पांडे यांनी आभार मानले. यावेळी प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक, स्वयंसेवक उपस्थित होते.

\Bअभ्यासक्रम राबविणार

\B

आपत्ती आल्यानंतर सामना कसा करावा याचे शास्त्रशुद्ध शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले. देश गतिमान करण्यासाठी अशा शिक्षणाची गरज आहे. या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन क्रेडिटचा अभ्यासक्रम राबविणार असल्याचे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी जाहीर केले. या शिबिरानिमित्त दीड हजार विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात आली असून त्याची पुस्तिका लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

\Bविजेत्यांना पारितोषिक

\B'आव्हान' शिबिरात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघांना आणि स्वयंसेवकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिरातून ५० स्वयंसेवकांची 'अॅडव्हान्स्ड' शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. पारितोषिक प्राप्त संघांनी जल्लोष केल्यानंतर नाट्यगृह दणाणून गेले. शिस्त आणि कौशल्य यांचा मिलाफ झालेले शिबिर नेहमी स्मरणात राहील आणि प्रेरणा देईल, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारविरोधात विश्वासघात दिन

0
0

पान पाच मेनलीड बातमी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जून २०१७ रोजी संपकरी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करून काही गोष्टींचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अद्याप पाळले गेले नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. किसान क्रांतीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन संप स्थगित केला. फडणवीस यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ रविवारी विश्वासघात दिन पाळण्यात आला.

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली नाही, दूध दरवाढ झालेली नाही, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. वर्ष उलटून गेले तरी एकाही गोष्टीची पूर्तता झाली नाही, याविरोधात क्रांतीचौकात आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विश्वासघातकी, लबाड, खुनी सरकारचा निषेध असो, काळा पैसा कोठे गेला?, सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले?, दीड पट हमीभाव देण्याचे काय झाले?, १५ लाख रुपये कोणाच्या खात्यात जमा केले? आदी प्रश्न उपस्थित केले गेले. दंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला. विश्वासघात आंदोलनात अन्नदाता शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, मनसे, मावळा मराठा, बुलंद छावा, शेकाप, तेली युवा संघटना, बळीराजा शेतकरी आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारने दहा जूनपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारच्या विरोधी जनजागृती अभियान राबविले जाणार आहे, असे जाहीर करण्यात आले. यावेळी जयाजी सूर्यवंशी, बाबुराव केकते, सुधाकर गाडेकर, शेख रफिक शेख हुसेन, संतोष गाडेकर, उद्धव तांबे, पुंजाराम तांबे, सुदाम तांबे, सुरेश वाकडे, सतीश वेताळ,भरत कदम, राजीव खिल्लारे, हरिदास घोले, बळीराम चांगतपुरे, महेश गुप्ता, अशोक कुऱ्हे, सुनील तांबे, विजय काकडे आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथे शेतकरी विश्वासघात दिन पाळण्यात आला. किसान क्रांतीने पुकारलेल्या संपानंतर सरकारसमोर काही मागण्या केल्या होत्या. एक ऑक्टोबर २०१७ पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती, पण सरकारने विश्वासघात केला. त्याच्या निषेधार्थ रविवारी लासूर स्टेशन बसस्थानक येथे सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शेतकऱ्यांतर्फे निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांनी दूध सांडून सरकारला निषेध केला. यावेळी बापूसाहेब सातपुते, सतीश अभंग, दशरथ जाधव, विलास पवार, विलास गवळी, रामहरी शेजवळ, गजानंद देवकाते, श्रीकांतशेजवळ, विजय भाले, भाऊसाहेब गवरे, संतोष तायडे आदी उपस्थित होते.

शेतकरी संपाची तिव्रता टप्प्याटप्प्याने वाढवणार

संपूर्ण कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला देशव्यापी संप टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र केला जाणार आहे, असा इशारा किसान क्रांती जन आंदोलनाचे संस्थापक सदस्य महेश गुजर यांनी दिला.

कोअर कमिटी बैठक रविवारी झाली. विजय काकडे, जयाजी सूर्यवंशी,अण्णासाहेब जाधव, राजीव खिल्लारे, महेश गुजर, जरांगे पाटील आदी उपस्थित होते. सोमवारी चार जून रोजी सकाळी दहा वाजता जुने कायगाव, नगर महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात येणार आहे.

सात व आठ जून रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आंदोलन असेल. १० जून रोजी भारत बंद पुकारण्यात आला असून संप काळातील लढ्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आ‌वाहन अण्णासाहेब जाधव, जितेंद्र सिरसाट, योगेश शेळके, भाऊसाहेब शेळके, संपत रोडगे, राजीव खिल्लारे, देविदास पाठे, संकेत मैराळ, बापूसाहेब सातपुते, महेश गुजर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या वयोवृद्ध माथाडी कामगारांचा सन्मान

0
0

सिंगल बातमी

औरंगाबाद : माथाडी कायद्याच्या मसुद्यावर राष्ट्रपतींनी ५ जून १९६९ रोजी स्वाक्षरी केली होती, या कायद्याला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ५ जूनपासून राज्यभर विविध उपक्रम करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने घेतला आहे. औरंगाबाद येथे वयोवृद्ध माथाडी कामगार कामगारांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांनी दिली.

औरंगाबाद येथे ५ जून रोजी जाधववाडी येथील शेतकरी भवन, कृषीउत्पन्न बाजार समिती येथे होणाऱ्या कार्यक्रमात माथाडी कायद्याचे महत्व व ज्येष्ठ माथाडी कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य हमाल महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे याांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमासाठी कामगार उपायुक्त व माथाडी मंडळाचे अध्यक्ष शैलेंद्र पोळ, उच्चतम कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, आडत व्यापारी असोसिएशनचे हरीश पवार, किराणा व्यापारी असोसिएशनचे संजय कांकरीया तसेच अॅड. प्रकाश परांजपे, अॅड. मनोहर टाकसाळ, सुधीर देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माथाडी कामगारांनी म़ोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देविदास किर्तीशाही, छगन गवळी, प्रवीण सरकटे, अलीखान, अरविंद बोरकर, जगन भोजणे आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘‘डिस्क रिप्लेसमेंट’ने वेदनामुक्तीची फुंकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतामध्ये पोते उचलताना डाव्या हाताला अचानक वेदना सुरू झाल्या. तपासणीत मानेचा मणका सरकून नस दबल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मणक्याच्या गादीचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होताच वेदना शून्य झाल्या आणि दुसऱ्याच दिवशी शेतकरी चालू लागला. लवकरच हा तरुण शेतकरी कामावर परतणार आहे. विशेष म्हणजे ही 'सर्व्हायकल डिस्क रिप्लेसमेंट' शस्त्रक्रिया शहरात पहिल्यांदाच झाली आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या 'स्पाईन युनिट'ने यशस्वी केली.

भगवान भराडे हाच तो ३२ वर्षीय शेतकरी आणि रुग्णालयाचे स्पाईन सर्जन डॉ. श्रीकांत दहिभाते यांनी ही क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी केली. या प्रकारच्या शस्त्रक्रियेला 'अँटेरिअर सर्व्हायकल डिस्केकटॉमी अँड फ्युजन सर्जरी' असे म्हटले जाते.

बडाठाण (ता. वैजापूर) येथील भगवान हे आपल्या शेतामध्ये काम करीत होते आणि पोते उचलताना डाव्या हातामध्ये एकाएकी प्रचंड वेदना सुरू झाल्या. वेदना वाढत असतानाच हाताची शक्तीही नाहीशी झाली आणि बसून राहणेही शक्य होईना म्हणून भगवान यांनी अंथरुण धरले. त्यांना तातडीने डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि विविध तपासण्यांमध्ये मानेचा पाचवा व सहावा मणका सरकल्याचे आणि नस दबल्याचेही स्पष्ट झाले. अशा केसेसमध्ये ज्येष्ठ रुग्णांमध्ये दोन मणके जोडले जातात. मात्र या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये कालांतराने वरच्या मणक्यावर ताण येऊन इजा होण्याची किंवा मानेची कार्यक्षमता घटण्याची शक्यता असते म्हणून तरुण रुग्णांमध्ये त्याऐवजी मणक्याच्या गादीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुचवली जाते. अर्थात, रुग्णाचे वय कमी असेल, मणक्यांची झीज झालेली नसेल व इतर कोणतीही गंभीर गुंतागुंत नसेल तरच या प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. सुदैवाने, भगवान हे प्रत्यारोपणासाठी पात्र होते म्हणूनच त्यांच्यासमोर या शस्त्रक्रियेचा पर्याय ठेवण्यात येऊन शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. २८ मे रोजी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि दुसऱ्याच क्षणी भगवान यांच्या वेदना नाहीशा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी ते चालूही लागले. हाताची ताकदही वाढली.

.....

५ ते १० टक्के व्यक्तींना गरज

एकूण मणक्याच्या रुग्णांमध्ये २० टक्के रुग्ण हे मानेच्या मणक्याचे असतात आणि त्यातील केवळ ५ ते १० टक्के रुग्णांनाच शस्त्रक्रियेची गरज असते आणि बाकीच्या ९० टक्के रुग्णांना औषधोपचार पुरेसे ठरतात. या शस्त्रक्रियेला सद्यस्थितीत कोणत्या शासकीय योजनेचा आधार नाही. या कृत्रिम 'डिस्क'चे शुल्क एक लाख ३७ हजार रुपये ('जीएसटी'सह) आहे, असेही डॉ. दहिभाते यानी सांगितले.

....

रुग्ण २५ ते ५० या वयोगटात असेल आणि मणक्याची गादी सरकून नस दबली असेल तरच या शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांनी रुग्ण आपली सर्व दैनंदिन कामे करू शकतो.

- डॉ. श्रीकांत दहिभाते, स्पाईन सर्जन

....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध घटनात अल्पवयीन बालीकेसह दोन महिलांचा विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विविध तीन घटनांत अल्पवयीन बालीकेसह घटस्फोटीत विवाहितेचा तसेच एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. किलेअर्क, मुकुंदवाडी व उस्मानपुरा परिसरात हे प्रकार घडले. या प्रकरणी सबंधित पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उस्मानपुरा परिसरात शनिवारी दुपारी पावणेतीन वाजता पहिली घटना घडली. येथील २८ वर्षांच्या विवाहितेचा पतीसोबत न्यायालयात घटस्फोट झाला आहे. या महिलेला शनिवारी तिचा घटस्फोटीत पती अजिंक्य शहाजी फावडे, शंकर शहाजी फावडे व एक महिला (सर्व रा. हडपसर, ग्रीन पार्कस फेज २) याने छेड काढून विनयभंग केला. तसेच तिच्या आईवडीलांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपी अजिंक्य व दोघांविरुद्ध उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनयभंगाची दुसरी घटना शनिवारी रात्री दहा वाजता मुकुंदवाडी परिसरात घडली. येथील ४० वर्षांची विवाहिता मुलांसह घरात झोपली होती. यावेळी संशयित आरोपी विठ्ठल राऊत याने दारू प्राशन करून तिच्या घरात शिरला. राऊत याला ही महिला समजावून सांगत असताना त्याने अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी आरोपी राऊत विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन पाच वर्षांच्या मुलीसोबत अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार २८ मार्च रोजी किलेअर्क परिसरात घडला. या मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संशयित आरोपी संतोष जयराम सोनवणे (वय ३० रा.किलेअर्क) याच्या विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालधक्क्यावर पावसामुळे पोती भिजली

0
0

औरंगाबाद - रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर रेल्वेने सिमेंटच्या पोत्याचा माल आला होता. शनिवारी पडलेल्या पावसामुळे यातील सिमेंटची अनेक पोती भिजली. ही पोती उघड्यावर उतरवण्यात आली होती. शनिवारी ही पोती उचलण्याचे काम सुरू होते. मात्र, सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पोती भिजू नयेत म्हणून ताडपत्री टाकण्यात आली होती, तरी देखील अनेक पोती भिजली. ही पोती रविवारी तशीच ट्रकमध्ये लोड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपी - बांधकाम विभागातील डागडुजीने कामकाजाला अडथळा

0
0

बांधकाम विभागाच्या डागडुजीचे

अनेक कामांना अडथळा

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात गेल्या चार महिन्यांपासून डागडुजी करण्यात येत आहे. ऐन मार्च संपताना ही कामे सुरू झाली. महिनाभरात काम संपेल, असा दावा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. पण हे काम अजूनही सुरू असल्याने अनेक प्रशासकीय कामांचा खोळंबा झाला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बांधकाम विभाग आहे. कार्यकारी अभियंत्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत जवळपास ५० हून अधिक जण या कार्यालयात बसतात. अर्धे कार्यालय स्लॅबमध्ये तर अर्धे पत्र्यात अशी या विभागाची अवस्था आहे. मार्च एंडच्या काळात उपकरातून मंजूर केलेल्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. नेमक्या याच काळात अनेक निविदांची कामे आली होती. इ निविदा कक्ष या दुरुस्तीच्या कक्षेत येत असल्याने संगणक, इंटरनेट सेवा जवळपास बंद होती. तीन दिवस हा त्रास पाहून कंत्राटदारांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांच्याकडे तक्रार केली. डोणगावकर यांनी बांधकाम विभागात जाऊन कामाची पाहणी केली होती. त्यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डागडुजीचे काम लवकरात लवकर संपविण्याचे आश्वासन दिले होते.

या घटनेला चार महिने उलटून गेले तरी बांधकाम विभागाची डागडुजी संपलेली नाही. दरम्यानच्या काळात बांधकाम विभागातील अनेक कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. या कामांची तांत्रिक पूर्तता करण्यासाठी अडचण येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सद्यस्थितीतील काम पाहता आणखी दीड ते दोन महिने हे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत बांधकाम विभागातील कामांना अडथळा कायम राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोरडवाहू शेतीत ‘शिवाई’ वाणाचे वरदान

0
0

\BTushar.bodkhe@timesgroup.com

\B

औरंगाबाद: कोरडवाहू शेतीत वरदान ठरणारे 'शिवाई' हे चिंचेचे वाण विकसित करण्यात हिमायतबाग फळ संशोधन केंद्राला यश आले. प्रतिझाड नऊ क्विंटल उत्पादन आणि गर जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना बहुमोल फायदा होणार आहे. 'शिवाई' वाणाला नुकतीच अधिकृत मान्यता मिळाली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हिमायतबाग फळ संशोधन केंद्र संशोधन करण्यात आघाडीवर आहे. या केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी तब्बल दहा वर्षे संशोधन करून 'शिवाई' चिंचेचे वाण विकसित केले. २००८ मध्ये कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने चिंच महोत्सव भरवला होता. महोत्सवात शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट चिंचेचे नमुने मागवले होते. शिवूर (ता. वैजापूर) येथील शेतकरी बाळासाहेब जाधव यांच्या चिंचेला 'चिंच सम्राज्ञी' पुरस्कार मिळाला होता. इतर चिंचेपेक्षा आकार मोठा असल्यामुळे या चिंचेवर डॉ. पाटील यांनी संशोधन सुरू केले. चिंचेच्या इतर जातींसोबत तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी रोपाची लागवड केली. झाडाची रचना, फांद्या, फुलाचा आकार, फलन, फळाचा आकार यांच्या नोंदी घेण्यात आल्या. तसेच चिंचेतील साखर व टार्टारिक अॅसिडचा विशेष अभ्यास करण्यात आला. इतर चिंचेच्या तुलनेत या चिंचेचा आकार मोठा आणि विद्राव्य घटक सरस असल्याचे निदर्शनास आले. झाडाच्या वाढीचा पूर्ण अभ्यास करून निवड पद्धतीने वाण विकसित करण्यात आले. शिवूर येथील ग्रामदैवत शिवाई देवीच्या नावावरून चिंचेला 'शिवाई' नाव देण्यात आले. या फळाची लांबी २०.४३ आणि रुंदी ३.१३ सेंटीमीटर आहे. तसेच चिंचेचे वजन ३६ ग्रॅम आणि प्रतिकिलो ४९७.७ ग्रॅम गर निघतो. इतर चिंचेत गराचे प्रमाण सरासरी ४० टक्के असून 'शिवाई'त ४९ टक्के आहे, असे पाटील यांनी सांगितले. यापूर्वी संशोधन केंद्राने 'योगेश्वरी', 'प्रतिष्ठान', 'अजिंठा' वाण विकसित केले आहे.

दरम्यान, दापोली येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात २४ ते २६ मे या कालावधीत संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक झाली. यावेळी चार कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. या बैठकीत पाटील यांच्या संशोधन सादरीकरणानंतर 'शिवाई' वाणाला अधिकृत मान्यता मिळाली. संशोधनासाठी कुलगुरू, संचालक संशोधन प्रभारी अधिकारी, 'बामू'च्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागाने सहकार्य केले.

\Bचिंचेला वाढती मागणी

\B

'शिवाई' चिंचेतील चिंचोक्याचा आकार मोठा आणि संख्या कमी असल्यामुळे गर जास्त मिळणार आहे. चिंचेची कलमे तयार करून देशातील विविध संशोधन केंद्राला पाठवली जाणार आहेत. देशभरात चिंचेला प्रचंड मागणी असून पुरेसे उत्पादन नसल्याची स्थिती आहे. चिंचेचा दर ३० रुपये प्रतिकिलो आणि चिंचोके १८ रुपये प्रतिकिलो आहे. कीड व रोगप्रतिकारक क्षमता जास्त व आकाराने मोठी 'शिवाई' चिंच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

प्रत्येक शेतकऱ्याने बांधावर चिंचेची चार-पाच झाडे लावली तरी वर्षाला एक लाखाचे उत्पन्न मिळेल. 'शिवाई' वाण कोरडवाहू भागासाठी उपयुक्त आहे. दहा वर्षांच्या संशोधनातून तिची उपयुक्तता सिद्ध झाली.

-डॉ. संजय पाटील, शास्त्रज्ञ, हिमायतबाग फळ संशोधन केंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडावर स्वच्छता उद्या मोहीम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रायगड विकास प्राधिकरणातर्फे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मंग‌ळवारी (५ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रायगडाची स्वच्छता मोहीम आखण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष व खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्वच्छता मोहिमेत हजारो स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्याप्रमाणावर गर्दी होत आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन १३ वर्षांपूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रुप पालटले. मुठभर लोकांच्या उपस्थितीत साजरा होणारा शिवराज्याभिषेकाला आज लाखो शिवभक्त उपस्थित राहतात. दरवर्षी गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. या सोबतच गडावर प्लास्टिक बाटल्या, पिशव्यांचा खच पडत आहे. त्यामुळे यंदा संभाजीराजेंच्या संकल्पनेतून गडाची स्वच्छता करण्यात येणार आहे. ५ जून रोजी सकाळी सात वाजता मोहिमेला प्रारंभ होईल, हजारो स्वयंसेवक गडावरील निश्चित केलेल्या परिसरात गट तयार करून स्वच्छतेला सुरुवात करतील. राज्यातील तमाम शिवभक्त, दुर्गप्रेमी, इतिहास संशोधक, वास्तुतज्ज्ञ, पर्यावरण प्रेमी, प्रशासन, स्थानिक रहिवासी यांच्या सहभागातून ही मोहिम होणार आहे.

\Bकचरा वर्गीकरण \B

दुपारी १२ वाजेपर्यंत गड स्वच्छता करण्यात येणार असून कचरा एकत्र करून वर्गीकरण केले जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे आत्माराम शिंदे यांनी कळवली आहे. या मोहिमेमध्ये औरंगाबादमधूनही मोठ्याप्रमाणावर शिवप्रेमी सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात तीन वर्षात आपत्तीत २६९ जणांनी गमावला जीव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे पाचवीला पुंजलेला दुष्काळ आणि दुसरीकडे दरवर्षी पावसाने केलेला कहर असा दरवर्षी मराठवाड्याला दुहेरी फटका बसतो. गेल्या तीन वर्षांमध्ये विभागात आपत्तीमुळे तब्बल २६९ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. यातील वीज पडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या तब्बल १६४ असून ९१ जण पुरात वाहून गेले.

मे महिन्याच्या अखेरपासूनच मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावतो, सोसाट्याचा वारा, विजांच्या तडाख्यामुळे गेल्या तीन वर्षात मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये या पावसाचा सर्वाधिक फटका बसला, यामध्ये घरांवरील पत्रे उडून गेले, घरांची पडझड होण्याचे प्रकार मोठ्याप्रमाणावर घडले. आपत्तीमध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक नागरिकांना जीव गमवावा लागगला. तर २०१५ व २०१६ मध्ये प्रत्येकवर्षी ८७ जण मृत्युमुखी पडले आहेत.

आपत्तीनिहाय मृत व्यक्तींची संख्या (२०१५ ते २०१७)

वर्ष......... पुरात वाहून ............. वीज पडून.............. इतर आपत्ती............... एकूण

२०१५..........१७.....................६९........................०१........................८७

२०१६............४३..................३६..........................०८........................८७

२०१७............३१................४९............................०५........................९५

--------------------------------------------------------------------.

एकूण...........९१..................१६४........................१४.......................२६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल बातम्या पत्रक

0
0

बजाजच्या कॅम्पस मुलाखतीत ५० जणांना उमेदवारी

औरंगाबाद - बजाज ऑटोच्या वतीने गुरुवारी रेल्वे स्टेशन रोड येथील आयटीआयमध्ये कँपस इंटरव्यू घेण्यात आले. विविध व्यवसायाच्या एकूण १६० प्रशिक्षणार्थींच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये ५० जणांची शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. या मुलाखतीसाठी प्राचार्य मिलिंद बनसोडे, बजाज अॅटोचे नितीन कुलकर्णी, विक्रम साळुंके यांनी आयोजन केले. तर राजेंद्र भटाणकर, बोडखे, मुधोळकर, जी.एम. पाटील, शेळके, मनोज वाघमारे, खवसे, केसकर, खरात व यशवंते यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या असंख्य स्मृतींना उजाळा देत मुंडे यांना अभिनादन करण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांच्या चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त रविवारी (३ जून) शासकीय दूध डेअरी प्रांगण परिसरात सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती.

या प्रसंगी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मान्यवरांपर्यंत अनेक व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी, गोपीनाथ मुंडे यांच्या योगदानाचा आणि विशेषतः मराठवाड्याला तसेच मराठवाड्यातील गोरगरीब, सामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी मुंडे यांनी दिलेल्या योगदानाचा अनेकांनी गौरव केला. त्याचवेळी मुंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी फार मोठ्या रांगा लागल्या होत्या. या वेळी विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी आमदार श्रीकांत जोशी, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर बापू घडमोडे, उपमहापौर विजय औताडे, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नामदेवराव गाडेकर, जे. के. जाधव, उद्धव भवलकर, सर्जेराव ठोंबरे, आसाराम तळेकर, बसवराज मंगररुळे, संजय केणेकर, प्राचार्य राजाराम राठोड आदींनी मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या कार्यक्रमानिमित्त दूध डेअरीचा परिसर सर्व स्तरीय कार्यकर्ते व मान्यवरांनी फुलून गेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images