Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महालगावात १०७ जणांचे रक्तदान

0
0

औरंगाबाद,

डॉ. मधुकरराव थावरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. मधुकरराव थावरे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महालगाव यांच्या वतीने आयोजित शिबिरात १०७ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. संतोष संघवी, अतुल येरमे यांची उपस्थिती होती. यावेळी अविनाश गलांडे, रमेश बोरनारे, संतोष जाधव, प्रमोद नांगरे, भाऊसाहेब झिंजुर्डे, बाबासाहेब डांगे, संभाजी डांगे, डॉ.प्रवीण दुशिंग आदींची उपस्थिती होती. शिबीरासाठी ‌निशिकांत थावरे, अभय थावरे, पंकज थावरे, योगेश गायकवाड यांनी सहकार्य केले. औरंगाबाद ब्लड बँकेच्या वतीने डॉ. सुभाष पाटोदी, शामराव सोनवणे, विजय सोनुने, मनोज चव्हाण यांनी रक्तसंकलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंगल बातम्या क्राइम

0
0

महिलेचे चौदा हजार लांबवले

…औरंगाबाद : सायबर ठगाने महिलेला एटीएक ब्लॉक झाल्याची धमकी देत पासवर्ड विचारून १४ हजार रुपये ऑनलाइन लांबवले. शनिवारी सकाळी नऊ वाजता जे सेक्टर, मुकुंदवाडी येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जोडप्याला मारहाण

…औरंगाबाद : भिंती पाडल्याच्या कारणावरून जोडप्याला मारहाण करीत नुकसान केले. २७ मे रोजी दुपारी चार वाजता हा प्रकार जयभवानीनगर रोडवर घडला. या प्रकरणी तोळाराम फुलाजी राठोड (वय ५९ रा. एन चार, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी वसंत बन्सी चव्हाण व दोन महिला आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाला मारहाण

…औरंगाबाद : रिक्षा काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादात सोमीनाथ अर्जुनराव गालफाडे (रा. बजाजनगर) याला तिघांनी मारहाण केली. २५ मे रोजी भडकलगेट भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी रिक्षा (क्रमांक एमएच २० बीटी ६४६०) चा चालक तसेच तीन साथीदाराविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मटका चालवणारे गजाआड

…औरंगाबाद : कल्याण मुंबई मटका चालविणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी सकाळी नारेगाव भाटनगर भागात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये संशयित आरोपी शेरसिंग उर्फ शेरू सुरजसिंग मलके (वय २३, रा. भाटनगर) व अमोल प्रभाकर गोंडे (वय १९, रा. नारेगाव) यांना अटक करण्यात आली असून रोख सातशे रुपये व जुगाराच्या चिठ्या हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारीने केक कापणारे जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिडकीन पोलिसांनी शनिवारी पुन्हा कारवाई करीत चार तलवारी जप्त करीत तीन जणांना अटक केली. शुक्रवारी देखील चार जणांना पोलिसांनी अटक करून शस्त्रसाठा जप्त केला होता. वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सोशल मीडियावर तलवारीने केक कापल्याचे फोटो व्हायरल करणारी मंडळी सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.

शहरात ऑनलाइन शस्त्रे मागविणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. शहर पोलिसांप्रमाणेच ग्रामीण पोलिस देखील आता शस्त्र विकणाऱ्या आरोपींच्या मागावर आहेत. शुक्रवारी बिडकीन पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून पाच तलवारी, एक कुकरी व सहा चाकू तसेच शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. शनिवारी बिडकीन पोलिसांनी पुन्हा तीन जणांना अटक केली. यामध्ये विजय बाळासाहेब सुखदान (वय १९, सचिन छगुराव खरात, वय १९ दोघेरा.चितेगाव व संतोष टाक ( वय ४५रा.अलाना या तिघांचा समावेश आहे यांच्याकडून चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिडकीन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंडीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

तलवारीने केक कापणारे रडारवर

बिडकीन पोलिसांनी शनिवारी पकडलेल्या आरोपीमध्ये दोन तरुणांनी वाढदिवसाचे केक तलवारीने कापून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या फोटोवरून दोघांना ताब्यात घेण्यात आले. बिडकीन पोलिसांनी तलवारीने केक कापणाऱ्यांना ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. यामुळे अनेकांनी फेसबुकवरून आपले फोटो डिलिट केले आहेत तर अनेकांनी तर आपले अकाऊंटच बंद केले असल्याचे समोर आले आहे.

शहर पोलिसांनी केली सुरुवात

शहर व ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून तथाकथित भाऊ दादाकडून तलवारीने केक कापण्याचे प्रकार घडत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येतात. शहराचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बाबीची तीन वर्षांपूर्वीच दखल घेतली होती. रस्त्यावर तलवारीने केक कापणारा गुन्हेगार संदीप पहेलवान याला घरातून उचलून पोलिसांनी आणले होते. त्याच्याकडून तलवार जप्त करीत त्याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शहरात हे फॅड बंद झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाई बातमी फोटो

0
0

नालेसफाई बातमी फोटो

....

- पदमपुरा नाला

- नूर कॉलनी

- किले अर्क नाला

- औषधी भवन नाला

- पीर बाजार नाला

- सुतगिरणी चौक

- गजानन महाराज मंदिर चौक

- जयभवानी चौकातील नाला

- जयभवानी नगरातील नाला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मेच परीक्षार्थी ‘यूपीएससी’ला हजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे रविवारी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ निम्म्या विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली. गैरहजेरीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होते. ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली.

आयोगातर्फे रविवारी देशभरात परीक्षा घेण्यात आली. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवाराने आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा वाहन परवाना यापैकी कोणतेही ओळखपत्र, त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक होते. यासह डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाइल असे इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन न येणाच्या सूचना होत्या. पोलिसांकडून तपासणी करून त्यांना परीक्षा कक्षात सोडण्यात आले. ही परीक्षा शहरातील ३१ केंद्रांवर आली. औरंगाबाद केंद्रावरून परीक्षेसाठी १० हजार ४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्यात सत्रात सकाळी ९.३० ते ११.३० दरम्यान चार हजार ७९८ विद्यार्थी उपस्थित, तर पाच हजार २४६ विद्यार्थी गैरहजर होते. दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० ते ४.३० दरम्यान चार हजार ८३३ विद्यार्थी हजर, तर पाच हजार गैरहजर राहिले. उपस्थितीचे प्रमाण सुमारे पन्नास टक्क्यांच्या आत होते. जिल्हाधिकारी कार्यायलयाच्या नियंत्रणाखाली झालेल्या या परीक्षेसाठी १४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यपीने दारूसाठी दोन हजार लुबाडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मद्यपीने तरुणाला मारहाण करीत दोन हजार रुपये लुबाडले. हा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच वाजता औरंगपुरा भाजीमंडई भागात घडला. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महमंद मिनाजोद्दीन निजामोद्दीन (रा. जुनाबाजार) याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये मिनाजोद्दिन हा शनिवारी सायंकाळी पाच वाजता औरंगपुरा भाजीमंडई येथील स्टार अॅटो मोबाइल व स्पेअर पार्टच्या दुकानासमोर उभा होता. यावेळी संशयित आरोपी शेख ईलियास उर्फ इल्ली (रा. जुनाबाजार, अजीम कॉलनी) हा त्याच्या जवळ आला. इल्लीने मिनाजोद्दीन याला दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मिनाजोद्दीन याने त्याला नकार दिला. यावेळी आरोपी इल्लीने त्याच्या पँटच्या खिशात बळजबरीने हात घालून दोन हजार रुपये काढून घेत पसार झाला. याप्रकरणी आरोपी इल्लीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक बांगर हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकच दुकान दोन दिवस फोडण्याचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवाजीनगर भागातील एकच दुकान चोरट्यांनी लागोपाठ दोन दिवस फोडण्याचा प्रयत्न केला. तर अवघ्या २० दिवसांपूर्वी उद्घाटन झालेले मेडिकल स्टोअर्स चोरट्यांनी फोडले. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी अल्पवयीन बालकाला पुंडलिकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मनोज श्रीपाल लोहाडे यांचे शिवाजीनगर भागात सुपर शॉपी हे दुकान आहे. लोहाडे यांच्या दुकानाचे शटर चोरट्यांनी १ जून रोजी उचकटले होते. शनिवारी सकाळी लोहाडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. शटरला वेल्डिंग करण्याचे त्यांनी ठरवत वेल्डिंग मशीन देखील मागविले होते. मात्र, वीज गेल्याने वेल्डिंग करणे शक्य झाले नाही. शनिवारी पुन्हा चोरट्याने याच दुकानाला लक्ष्य चोरीचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला असून पोलिसांनी संशयावरून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

शिवाजीनगर भागातच स्वप्नील कासलीवाल यांनी २० दिवसांपूर्वी श्री चिंतामणी मेडिकल स्टोअर उघडले आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटवले. दुकानात शिरून चोरट्यांनी दहा हजारांची रोख रक्कम यावेळी गल्ल्यातून लंपास केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पुंडलिकनगर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असा मी घडलो’ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन

0
0

औरंगाबाद: 'असा मी घडलो-गाथा ग्रंथापालांच्या' या संपादित ग्रंथाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत शनिवारी सायंकाळी चार वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी कृषीतज्ज्ञ डॉ. एस. बी. वराडे, डॉ. वि. ल. धारुरकर आणि 'महाराष्ट्र टाइम्स'चे वरिष्ठ सहाय्यक संपाद प्रमोद माने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रणजीत धर्मापुरीकर व डॉ. मेघा धर्मापुरीकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांची ‘पायी दिंडी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजांचे शिक्षक इच्छा मरण आंदोलनानंतर आता आयुक्त कार्यालयासमोर 'गळफास आंदोलन' करणार आहेत. अनुदान द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (४जून) औरंगाबाद शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मराठवाड्यातील सात हजार शिक्षक 'पायी दिंडी'ला पुण्याकडे निघणार आहेत.

राज्यात २००० साली कायम विना अनुदानित धोरण आले. त्यानंतर २००९ साली कायम शब्द निघाला, प्रत्यक्ष २०१३ अनुदानाची घोषणा झाली. मात्र, याचा फायदा होताना माध्यमिक शाळांचाच विचार झाला. ज्युनिअर कॉलेजांचा विचार शासनस्तरावरून करण्यात आला नाही. वारंवार आंदोलनानंतर ही प्रश्न मार्गी न लागल्याने शैक्षणिक वर्षाला सुरुवातीलाच या शिक्षकांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांची सोमवारपासून 'पायी दिंडी' निघणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निवेदन देऊन ही पायी दिंडी निघणार आहे. नगरमार्गे ही दिंडी १३ जून रोजी पुण्यात आयुक्त कार्यालयावर धडकणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले. तोपर्यंत शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर, गळफास घेण्याची परवानगी द्यावी असे सांगत शिक्षकांनी 'गळफास आंदोलन' करण्याचे जाहीर केले आहे. विभागातून सात हजार शिक्षक पायी दिंडीत सहभागी होणार आहेत. दररोज सुमारे १८ ते २० किलो मीटरचे अंतर कापत हे शिक्षक पुढे जाणार आहेत. पायी दिंडीतील सदस्य ज्या गावात थांबतील तेथील शाळेत मुक्काम करणार आहेत.

अडीच हजार आंदोलन

शिक्षकांनी अनुदानाच्या मागणीसाठी आजपर्यंत अडीच हजार आंदोलने केली. उद्यापासूनच्या आंदोलनात शिक्षकांनी उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयांचे ऑनलाइन १३०० प्रस्ताव, त्वरित घोषित करून शंभर टक्के अनुदान देणे, अघोषित प्राथमिक, माध्यमिक वर्ग व तुकड्या तात्काळ घोषित करणे, शिक्षकेतर पदभरती करणे अशा मागण्या केल्या आहेत.

दिंडी किती दिवस चालणार... ९ दिवस

सहभागी शिक्षक... ७ हजार

..

शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करूनही सरकारला जाग येत नाही. इच्छा मरण ही मागितले. त्यानंतर आमच्या मागणीसाठी पायी दिंडी काढत आहोत. आयुक्त कार्यालयावर आम्ही आमच्या मागण्या पुन्हा मांडू.

राजेंद्र नेवगे,

राज्य सचिव,

राज्य ज्युनिअर कॉलेज अनुदान हक्क कृती समिती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जालना रस्त्याचा विस्तार की डागडुजी ?

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रस्त्याची डागडुजी होणार की विस्तार याबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जालना रस्ता विस्तारीकरणासाठी १२० कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले, पण सहा महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या डागडुजीसाठी साडेनऊ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा मंजूर झाली असून कार्यारंभ आदेशही लवकरच दिले जाणार आहेत. त्यामुळे रस्ता दुरुस्त होणार की विस्तार होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात सर्वाधिक रहदरीचा असलेला जालना रस्ता सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. महापालिका क्षेत्रात असलेला हा रस्ता आजही सरकारच्या लेखी राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्ती पीडब्ल्यूडीकडे आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार वर्षांपूर्वी निधी मंजूर केला गेला. त्यातून दुरुस्ती झाली, पण रस्त्यावर असलेली वाहतूक आणि डीपी प्लॅननुसार प्रस्तावित रुंदीकरणाच्या प्रस्तावाचा चेंडू केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत एका कार्यक्रमात जालना रस्ता व बीड बायपासचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करत असल्याची घोषणा केली. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जाईल, असे सांगण्यात आले. दोन वर्षे हा प्रस्ताव दिल्लीत चर्चिला केला. पाठविलेल्या प्रस्तावावर दिल्लीतील अधिकाऱ्यांनी अभ्यास करून काही बदल सूचविले, नंतर शहरांतर्गतचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जालना रस्त्याचे भाग्य पुन्हा अडगळीत पडण्याची भीती निर्माण झाली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी गडकरी यांना विनंती करून या रस्त्यासाठी विशेष निधी देण्याची मागणी केली. त्यानुसार गडकरी यांनी नोव्हेंबर महिन्यात विशेष बाब म्हणून जालना रस्त्यासह जिल्ह्यातील अन्य पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७४ कोटी रुपये मंजूर केले. पीडब्ल्यूडीच्या राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत रस्त्यांचे सर्वे करून प्रस्ताव पाठविला गेला. त्यात निधीत कपात करून पाचही रस्त्यांसाठी निधी मंजूर केला गेला. त्यात जालना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटी रुपये मंजूर झाले. या रस्त्यांच्या निविदा काढल्या, कंत्राटदार निश्चित झाले. कार्यारंभ आदेश देण्यात आले. काही दिवसांत कामही सुरू होणार आहे. दरम्यान, गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जालना रोडच्या मजबुतीकरणासाठी १२० कोटी रुपये मंजूर असल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक पातळीवर संभ्रम निर्माण झाला आहे. जालना रस्त्याचा विस्तार करताना जागा संपादित करावी लागणार आहे. महापालिका प्रशासनाच्या मदतीने हे शक्य होईल, पण जागा संपादनानंतर मावेजा देण्याबाबत मात्र भविष्यात अडचणी येणार आहेत. परिणामी सद्य परिस्थितीत डागडुजी केली जाईल आणि पुढे विस्तारीकरणाचा विचार केला जाईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैधरित्या वानर डांबून ठेवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात काळ्या तोंडाचे वानर अवैधरित्या डांबून ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल सादर करा, असे आदेश सेंट्रल झू ऑथॅरिटीने नागपूर येथील वन्यजीव विभागाच्या मुख्याधिकाऱ्याला दिले आहेत. या आदेशामुळे महापालिकेच्या यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

सेंट्रल झू ऑथॅरिटीने औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. याच संदर्भात २४ मे रोजी झू ऑथॅरिटीच्या दिल्ली येथील कार्यालयात सुनावणी झाली. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे सुनावणीसाठी गेले होते. सुनावणीच्या दरम्यान त्यांनी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची आम्ही कशी आणि किती काळजी घेतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. हे सांगताना त्यांनी माकडाचा किस्सा सांगितला. प्राणिसंग्रहालयात एक काळ्या तोंडाचे वानर आले होते, त्याला पकडून आम्ही पिंजऱ्यात टाकले. पिंजऱ्यामध्ये मादी वानर होते, तिला जोडीदार मिळाला. कर्मचारी त्या वानराची काळजी घेत आहेत, असे ते म्हणाले.

झू ऑथॅरिटीच्या परनावगीशिवाय प्राणिसंग्रहालयात कोणताही प्राणी ठेवता येत नाही. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयात वानर झू ऑथॅरिटीची परवानगी न घेता ठेवण्यात आले, ही बाब अत्यंत गंभीर असून वाईल्ड लाईफ (प्रोटेक्शन) अॅक्ट १९७२ कलम २ (१६) आणि ५२ चे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे या कायद्यानुसार प्राणिसंग्रहालयाच्या संचालकांवर गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल सादर करा, असे झू ऑथॅरिटीचे सदस्य सचिव डॉ. डी.एन. सिंग यांनी नागपूर येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयाला कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईवेळी महापौरांना नागरिकांनी सुनावले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'बारा महिने झोपतात आणि पावसाळ्यामध्ये काम करायला येतात. लोकांच्या घरामध्ये पाणी जाते. लाखो रुपयांचं नुकसान होतं, राशन भिजून जाते,' अशा शब्दात नागरिकांनी रविवारी महापौरांना सुनावले. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जयभवानीनगरमधील नागरिकांचे पावसाने अतोनात हाल झाल्याने महापौरांनी रविवारी नालेसफाईचा दौरा केला. त्यावेळी त्यांना नागरिकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.

पाऊस सुरू होताच शहरातील नाल्यांच्या सफाईला सुरुवात झाली असून त्याची पाहणी करण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी रविवारी विविध भागात दौरा केला. पद्मपुरा, किलेअर्क, औषधी भवन येथील नालेसफाईची पाहणी करून ते गजानन महाराज मंदिर चौकात पोहचले. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ते जयभवानीनगर चौकात पोहचताच नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. जयभवानीनगरच्या गल्ली नंबर ९, १०, ११ मध्ये पोहचताच महापौरांना नागरिकांनी घेराव घालत तक्रारी मांडल्या. गल्ली क्रमांक ९ मध्ये नाल्याची पाहणी करताना त्यांना पुरूष व महिलांनी आम्ही रात्रभर गुडघाभर पाण्यातून ये-जा केले, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचले आहे, असे सांगितले. गल्ली क्रमांक १०मध्ये पाहणी करताना, एक दिवस घरातच काढला; आता किती दिवस घरातच बसून काढणार, काही तरी करा, असे एका नागरिकांना सुनावले. तेवढ्यात एका नागरिकाने महापौरांना सर्वांसमोर फैलावरच घेतले. 'बारा महिने झोपतात आणि पावसाळ्यात काम करतात. घरामध्ये पाणी जाते, लाखो रुपयाचं नुकसान होतं. रॉकेल, रेशन सर्व भिजत आहे,' या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे रागावलेल्या महापौरांनी त्यांना, 'खाली हात करून बोला, जरा कोणाशी बोलता हे बघा,' असे सुनावले. त्यानंतर गल्ली नंबर ११मधील महिलांनी त्यांना नाल्यातून जावे लागते तुम्ही सांगा कसे जायचे ते, असा प्रश्न केला. 'नाला खोदल्यापासून अवस्था वाईट झाली आहे. पुलाचे काम सुरूच आहे. परेशानी आहे, बप्पा सारी,' असे महिला म्हणाल्या. ' साहेब आधी काम पूर्ण करा, सहा माणसांत कशी कामे पूर्ण होतील,' असा प्रश्न त्यांना नागरिकांनी केला.

\Bरात्रन् दिवस काम करण्याचे आदेश \B

नागरिकांचा प्रश्नांचा भडीमार झाल्याने निरुत्तर झालेल्या महापौर घोडेले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून रात्रन् दिवस कामे करा, अशा सूचना दिल्या. महापौरांच्या पाहणी दरम्यान नगरसेविका मनीषा मुंडे मात्र गैरहजर होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला सूचना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसाळ्यामध्ये साथरोगाची लागण झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अरोग्य विभागाची काय तयारी आहे, याचा आढावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी आढावा घेतला. त्यांनी रविवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आरोग्य केंद्रातील अडचणी, औषधांचा साठा याबाबत माहिती घेत पालिकेच्या यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले.

शहरात कचराप्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात रोगाराई व उपाययोजनाबाबत बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी सभागृह नेते विकास जैन, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात साथरोग पसरण्याचा धोका असतो हे लक्षात घेवून आरोग्य विभागाने सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.

\Bकचऱ्यावर रसायन फवारणी

\B

शहरातील कचरा प्रश्न पूर्ण सुटलेला नाही. पावसाने कचरा ओला झाला, तर दुर्गंधी सुटेल आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर रसायनांची फवारणी करावी, पावडर टाकून कचरा निर्जंतूक करण्यात यावा, अशा सूचना महापौरांनी दिल्या. शहरात रस्त्याच्या बाजुला आणि मोकळ्या जागेत तळे आणि डबके साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. अशा डबक्यामध्ये औषध फवारणी करून औषधमिश्रित ऑइल सोडण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस- डॉ. कल्पना हळे, मुख्याध्यापक

टेम्पोला धडकून दुचाकीस्वार ठार

0
0

वाळूज महानगर: बजाजनगर येथील जयभवानी चौकात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास टेम्पोवर धडकून एक दुचाकीस्वार तरूण ठार व दुसरा गंभीर जखमी झाला. बळीराम सर्जेराव धायवर (वय १९, ह़ मु़ बजाजनगर, मुळ गाव रा. टेंभूर्णी ता.जाफ्राबाद जि. जालना), असे मृताचे नाव आहे. तर मागे बसलेला मोहन संतोष चव्हाण (वय १८) हा गंभीर जखमी झाला आहे़

नियंत्रण सुटल्याने दुचाकी आयशर टेम्पोवर (एम.एच.२०, बी.टी.२१३५)धडकली. जखमींना नागरिकांनी खासगी वाहनातून बजाजनगरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मृत बळीराम हा पाच वर्षांपासून बजाजनगरात मामा संतोष उगले यांच्याकडे राहत होता. उगले यांचे बजाजनगरात कापड दुकान व हॉटेल आहे. बळीराम हॉटेलातील कामगार मोहनसह घरी जेवणासाठी जात होते. घरी धोंडे जेवणासाठी त्याचे आईवडील आले होते. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अपघातातील दोन्ही वाहने जमा केले आहे़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनैतिक संबंधातून खून, पाच वर्षे सक्तमजुरी, दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अनैतिक संबंधातून कुऱ्हाडीचे घाव डोक्यात घालून खून करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेमंत एस. महाजन यांनी सोमवारी (४ जून) ठोठावली.

याप्रकरणी मृत हरिचंद्र लक्ष्मण मोरे (रा. इमामपूरवाडी, ता. पैठण) यांच्या पत्नीने फिर्याद दिली होती. त्यानुसार, हरिचंद्र व आरोपी भगवान गंगाराम पवार (रा. इमामपूरवाडी) हे वाळूज परिसरातील रामराई येथे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. मात्र हरिचंद्र हे रात्री घरी परतले नाही व सकाळी सहाच्या सुमारास घराजवळील एका प्लॉटच्या परिसरात हरिचंद्र यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव दिसून आले होते व जमिनीवर रक्त सांडले होते. याप्रकरणी मृत हरिचंद्र यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून बिडकीन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान, आरोपी भगवान गंगाराम पवार व त्याच्या एका सहकाऱ्याने हरिचंद्र यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी व फिर्यादीच्या अनैतिक संबंधातून खून झाल्याचेही समोर आले. या प्रकरणी आरोपी भगवान याला ५ जून २०१६ रोजी अटक करण्यात आली होती.

\Bदंड न भरल्यास आणखी शिक्षा\B

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील उदय प्रल्हाद पांडे यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३०४ (दोन) कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली, तर सबळ पुराव्याअभावी कोर्टाने आरोपीच्या सहकाऱ्याची निर्दोष मुक्तता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सालारजंग फसवणूकप्रकरणी नियमित जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हैदराबादच्या सालारजंगच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नसिरोद्दीन मोहम्मद उस्मानोद्दीन (५९, मूळ रा. परभणी, ह.मु. रोशनगेट, औरंगाबाद) याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. यु. सुपेकर यांनी सोमवारी (४ जून) फेटाळला.

या प्रकरणी आरोपीला ३१ मे रोजी अटक करुन ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर आरोपीने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. अर्जावरील सुनावणीवेळी, गुन्हा गंभीर आहे आणि प्रकरणाचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. त्याचवेळी आरोपींनी कागदपत्रांच्या हेराफेराचा गुन्हा केला आहे. तसेच आरोपींविरुद्धचे सबळ पुरावे जप्त करणे बाकी असून, आरोपीला जामीन मंजूर केल्यास आरोपी तपासात अडथळे आणू शकतो व पुरावे नष्ट करू शकतो. त्यामुळे आरोपीला नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पसार अमजद गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिलाल कॉलनी येथील शेख जब्बार खून प्रकरणातील अजून एक प्रमुख आरोपी व कुख्यात बबलाचा भाऊ शेख अमजद याला गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई सोमवारी पहाटे माळीवाडा भागात कारवाई करण्यात आली. १६ मे रोजी जब्बारचा खून करून मृतदेह दौलताबाद जवळील विहिरीत फेकण्यात आला होता.

प्लॉटच्या कारणावरून शेख अमजद शेख असद (वय ३०, रा. जहांगीर कॉलनी) याचा हिलाल कॉलनी येथील शेख जब्बार शेख गफार याच्यासोबत वाद होता. त्यातून १६ मे रोजी अपहरण करून आधी बेगमपुरा स्मशानभूमीत मारहाण करण्यात आली. त्यानंतर दौलताबाद परिसरातील मोमबत्ता तलावाजवळील विहिरीत फेकण्यात आले होते. याप्रकरणी कुख्यात गुन्हेगार शेख वाजीद शेख असद उर्फ बबला याच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत बबलासह पाच जणांना अटक केली आहे. शेख अमजद पसार झाला होता. गुन्हे शाखेने त्याला माळीवाड्यातून पहाटे सव्वातीन वाजता अटक करून बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दिपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घनश्याम सोनवणे, जमादार सुभाष शेवाळे, शेख बाबर, सुधाकर राठोड, सय्यद अशरफ, योगेश गुप्ता, नवाब शेख, सिध्दार्थ थोरात, नितीन धुळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी सोमवारी कायगाव टोका (ता. गंगापूर) येथे अहमदनगर-औरंगाबाद महामार्गवर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.

शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून स्वामिनाथन आयोगाप्रमाणे हमी भाव द्यावा, संपूर्ण सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना १६ तास वीज मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, दुधाला ५० रुपये लिटर हमी भाव द्यावा ,जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा, शेतमालावरील कायमची निर्यात बंदी उठवावी ,कापसावरील बोंडअळीचे अनुदान तत्काळ देण्यात यावे, पीक विम्याचे पैसे तत्काळ बँक खात्यावर जमा करावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. या वेळी प्रहार शेतकरी संघटनेच भाऊसाहेब शेळके, स्वाभिमानीचे संपत रोडगे पाटील, अभिजित पोटे,अजित धस, संतोष जाधव, राष्ट्रवादीचे वाल्मिक शिरसाठ. मनसेचे अण्णासाहेब जाधव, शेकापचे महेश गुजर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शेळके, राजीव खिल्लारे, विठ्ठल कुंजर, अरविंद कान्हे, संभाजी ब्रिगेडचे संकेत मैराळ, धनराज जाधव, सतीश चव्हाण, देविदास पाठे, सुधीर बारे, ज्ञानेश्वर अदमाने, राहुल पारखे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीची चौकशी न्यायमुर्तीतर्फे करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात उसळलेल्या दंगलीत पोलिसांची भूमिका, शहरातील काही राजकिय नेत्यांनी केलेली विधाने यामुळे स्वतंत्र तपास आवश्यक आहे. या दंगलीची चौकशी उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायमुर्ती यांच्याकडून करून पोलिस, राजकीय नेते तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी विरोधात यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी. दंगलीत मृत झालेल्यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुमाईंदा कौन्सिलतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मुस्लिम नुमाईंदा कौन्सिलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेला मोहम्मद अवेस अहेमद, मेराज सिद्दिकी, जियोद्दीन सिद्दीकी, अॅड. खिजर पटेल आदींची उपस्थिती होती. अवेस अहेमद यांनी नुमाईंदा कौन्सिलने तयार केलेला दंगलीबाबतचा सत्यशोधन अहवाल सादर केला. त्यात दंगलीपूर्वी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या शहागंज येथील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शिवाय पोलिसांच्या कारवाईबद्दलही शंका घेतली आहे. पोलिसांनी दंगलीपूर्वी शहरात शांतता बिघडविण्याचे प्रयत्न करणाऱ्या लच्छु पैलवानसह इतरांवर कारवाई केली असती, तर निश्चितच ही घटना घडली नसती. गांधीनगरमध्ये पोलिसांनी कारवाई केली असती पुढील हिंसा झाली नसती, असे म्हटले आहे. अहवालात पोलिस अपयशी ठरल्याचे नमूद केले आहे. गोळीबारात मृत, तसेच दंगलीत दुकान जाळल्याने मृत झालेल्या व्यक्तीला एक कोटी रुपये द्यावेत, त्यांच्या घरातील व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी, दंगलीत जखमींना प्रत्येकी ५० लाखाची मदत द्यावी, आदी मागण्या केल्या आहेत.

याप्रकरणाची चौकशी उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती यांच्याकडून करावी अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास कोर्टात स्वतंत्र याचिका दाखल केली जाईल असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images