Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जयभवानीनगरात युद्धपातळीवर काम करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानीनगरातील स्थिती संवेदनशील असून त्यामुळे नाला बांधकामाचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. नाल्याकाठच्या काही वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून त्यात जयभवानीनगरचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्याच पावसात जयभवानीनगरात हाहाकार उडाला. नाल्याला पूर आल्यामुळे घरातील नागरिक घरात आणि बाहेरचे बाहेर, अशी स्थिती निर्माण झाली होती. सुमारे १५० घरांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला. महापालिकेच्या यंत्रणेने जयभवानीनगरात नालासफाईचे, नाल्यावरील बांधकामे पाडण्याचे व ज्या ठिकाणची बांधकामे पाडली आहेत त्या ठिकाणच्या नाल्याच्या बांधकामाचे काम वेळीच केले नाही. त्यामुळे अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. याबद्दल पत्रकारांनी महापौरांना विचारले असता ते म्हणाले, जयभवानीनगरात नाल्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करावे, असे सांगितले आहे. नाल्याला पूर आल्यावर सुमारे १५० घरांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नाल्याला संरक्षक भिंत बांधण्याचे व त्यानंतर स्लॅब टाकण्याचे काम देखील केले जाणार आहे. स्लॅब टाकल्यानंतर नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग मोकळा होईल. नाल्यावर स्लॅब पडेपर्यंत नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागेल, असे महापौरांनी स्पष्ट केले. नाल्याला आलेल्या पुरामुळे जयभवानीनगरातील काही घरे खचण्याची देखील शक्यता आहे, असे ते म्हणाले.

\Bइतर तीन भाग संवेदनशील \B

जयभवानीनगरसह नूर कॉलनी, कबाडीपुरा, नारळीबागचा काही भाग पुराच्या दृष्टीने संवेदनशील आहे. त्यामुळे या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणीबाणीची स्थिती निर्माण झालीच तर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्याच्या दृष्टीने त्या भागातील महापालिकेच्या शाळा, समाजिक सभागृहांची माहिती मागवली आहे. या ठिकाणी नागरिकांनी व्यवस्था केली जाईल, असे महापौरांनी सांगितले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमरगा तालुक्यात वादळाचा फटका

$
0
0

औरंगाबाद : उमरगा तालुक्यातील ८ गावांना रविवारी रात्री वादळाचा फटका बसल्यामुळे तब्बल १४०५ घरांची मोठी पडझड झाली. दरम्यान, तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान कवठा, कलदेव निंबाळा, काळनिंबाळा, रामपूर, बलसूर, कडदोरा, गुंजोटी आणि कदेर या गावाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. तालुक्यात पाऊण तास झालेल्या पावसाची केवळ ३.४५ मिलिमीटर अशी नोंद आहे. मात्र, या दरम्यान सुरू असलेल्या वादळामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच सोमवारी (४ जून) सकाळी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पथकासह सर्व गावांना भेटी दिल्या व पंचनामे करण्याचे निर्देश दिले. प्राथमिक पंचनाम्यानंतर तब्बल १४०५ घरांची पडझड झाली असल्याचा अहवाल त्यांनी जिल्हाप्रशासनाकडे पाठवला. पुढे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवला. या घटनेमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील विजेचे खांब उन्मळून पडले. यामुळे गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे मोठ्याप्रमाणावरील घरांची पत्रेही उडाली, या घटनेमध्ये म्हैस व दोन शेळ्या ठार झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर सिटीबसची वाट मोकळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे १०० सिटीबस खरेदी करण्यासाठीची निविदा महापालिकच्या माध्यमातून कॉर्पोरेशनच्या मुख्याधिकाऱ्यांनी काढली आहे. १५० सिटीबसेस खरेदी करण्यास परवानगी मिळाली असून पहिल्या टप्प्यात १०० बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. बस खरेदीची निविदा ९ जुलै रोजी उघडण्यात येणार असल्यामुळे याच दिवशी फैसला होईल, असे मानले जात आहे.

औरंगाबाद शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाल्यानंतर या योजनेतील विविध कामे सुरू करण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल (एसपीव्ही) च्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. स्मार्टसिटी योजनेत अर्बन ट्रॅफिक मोबॅलिटी हा एक घटक आहे. या घटकाच्या माध्यमातून सिटीबस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु त्याला मुहूर्त लागत नव्हता. डॉ. निपुण विनायक यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर एसपीव्हीचे संचालक असलेले महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्याशी सिटीबसबद्दल चर्चा केली. सिटीबस सेवा सुरू करणे कसे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यानुसार डॉ. विनायक यांनी कामास सुरुवात केली. शनिवारी त्यांनी मुंबईला जाऊन एसपीव्हीचे अध्यक्ष सुनील पोरवाल यांच्याशी चर्चा केली. पोरवाल यांनी १५० बसेसपैकी १०० बसेस खरेदी करण्याची परवानगी डॉ. विनायक यांना दिली. पोरवाल यांची मंजुरी मिळताच सोमवारी बस खरेदीची निविदा देखील काढण्यात आली.

अशा असतील सिटीबस

बसची लांबी - ९ मीटर

आसनक्षमता - ३५ प्रवासी

...

६ जुलै : निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख

९ जुलै : निविदा उघडण्याची तारीख

एका महिन्यात ३० टक्के बस देणे बंधनकारक - पान चारवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बियाणे विक्रेत्यांनी प्रामाणिक राहावे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

खरीप हंगाम सुरू होत आहे. सरकारने काही बियाणे कंपन्यांवर बंदी घातली आहे. पण या कंपन्या जास्तीच्या नफ्याचे गाजर दाखवतात. याला बळी न पडता विक्रेत्यांनी शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहावे व प्रमाणित बियाणांचीच विक्री करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी केले.

जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप हंगामपूर्व बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, कृषी निविष्ठा विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष राकेश सोनी, अमित नावंदर, जगन्नाथ काळे, कृषी संशोधक विकास झाडे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी आनंद गंजेवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. खरीपपूर्व बैठकीला जिल्ह्यातील ८२२ कृषी सेवा केंद्रचालक उपस्थित होते.

बोंडअळीवर उपाय योजना करण्यासंदर्भात डॉ. परदेशी यांनी कृषी सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शन केले. बोंडअळीचे प्रमाण जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एक एकर कपूस पीकांमध्ये किमान २ फेरमन ट्रॅप लावले पाहिजे. या ट्रॅपमध्ये माशी अडकून पडते. त्यामुळे मादी माशी अंडी घालू शकत नाही. हे प्रमाण जास्त असेल तर ट्रॅप वाढविले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. थिटे यांनी सांगितले, की बोंडअळी थांबविण्यासाठी फरदड घेण्यापासून उपाययोजना करायला हव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबस पान चारची बातमी

$
0
0

एका महिन्यात ३० टक्के बस देणे बंधनकारक

औरंगाबाद : औरंगाबाद शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत १०० सिटीबस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पुरवठादारास वर्कऑर्डर दिली जाईल त्याला ती दिल्यापासून एक महिन्याच्या आत ३० टक्के बस देणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भातील निविदा काढण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांना दिली.

महापौर म्हणाले की, १०० सिटीबस खरेदी करण्यास परवानगी मिळाली असून निविदा आज काढण्यात आली. खरेदी करण्यात येणाऱ्या बसेस नऊ मीटर लांबीच्या मिडी बसेस असतील, एका बसची आसनक्षमता ३५ असेल. काढण्यात आलेल्या निविदेच्या संदर्भात संबंधित कंत्राटदार - पुरवठादाराला काही शंका असल्यास त्याबद्दल १२ जून रोजी एसपीव्हीच्या मुख्याधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर १३ जून रोजी प्रिबीड बैठक होणार आहे. ६ जुलै ही निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. प्राप्त झालेल्या निविदांचे टेक्निकल बीड ९ जुलै रोजी उघडण्यात येणार आहे, त्यानंतर २४ तासांनी कमर्शियल बीड उघडण्यात येणार आहे.

ज्या पुरवठादाराची निविदा स्वीकारण्यात येईल त्याला वर्कऑर्डर दिल्यापासून एक महिन्यात ३० टक्के बसेस देणे पुरवठादाराला बंधनकारक असेल. दुसऱ्या महिन्यात ३० टक्के व तिसऱ्या महिन्यात उर्वरित ४० टक्के बसेस पुरवठादारास एसपीव्हीला उपलब्ध करून द्याव्या लागतील. पुरवठादाराला १५ जुलैपर्यंत वर्कऑर्डर दिली जाऊ शकते, त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत काही बसेस उपलब्ध होतील, असे महापौर म्हणाले. बसेससाठी डेपो उपलब्ध व्हावा यासाठी डॉ. विनायक यांनी एस .टी. महामंडळाचे सचिव रणजीत देओल यांच्याशीही चर्चा केली. देओल यांनी डेपोसाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे, असे महापौरांनी सांगितले. बस खरेदीच्या निविदे बरोबरच सर्व्हिस ऑपरेटरसाठी देखील निविदा काढण्यात येणार आहे.

स्मार्ट बसथांबे

स्मार्टसिटी योजनेतून स्मार्ट बसथांबे बांधण्यात येणार आहेत. एसटी महामंडळातर्फे शहरात विविध ठिकाणी बसथांबे वापरले जातात, त्याचे बांधकाम महापालिकेतर्फे करण्यात आले आहे, पण त्यांची स्थिती विदारक आहे. तेच बसथांबे स्मार्ट बसथांबे म्हणून विकसीत केले जाणार आहेत. त्याशिवाय वर्कशॉप, बसस्टँड देखील स्मार्टसिटी योजनेतूनच विकसीत केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदा नसल्याने जुन्या वाहनांमुळे हवेत वाढतेय प्रदूषण

$
0
0

फ्लायर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

शहरात विविध भागात रस्त्यावर जुन्या गाड्या उभ्या आहेत. भंगार पडलेल्या गाड्यांची समस्या तर आहेच. त्याशिवाय १५ वर्षांपेक्षा जास्त मर्यादा ओलांडलेल्या गाड्याही रस्त्यावर धावत आहेत. या वाहनांवर कारवाईही होत नसल्याने शहरात होणारे प्रदूषण वाढत जात आहे.

मोटार वाहन अधिनियमात १५ वर्षे झाल्यानंतर अशा वाहनांची आरटीओ कार्यालयात फिटनेस तपासणी आवश्यक आहे. या तपासणीनंतर पाच वर्षांसाठी ग्रीन टॅक्स भरून ही वाहने वापरता येतात. मात्र, अनेक जुन्या वाहनधारकांकडून त्यांच्या गाड्यांची फिटनेस तपासणी कराच्या ओझ्यामुळे केली जात नाही. एखाद्या कारवाईत वाहन सापडल्यास ती वाहने आरटीओ किंवा पोलिस ठाण्यात सोडून देण्यात येत असतात. यात ट्रक, ट्रक्टर, कार आणि दुचाकी वाहनांचा जुन्या वाहनांमध्ये समावेश आहे. तसेच रिक्षांचाही समावेश आहे. …………

एक कोटीचा ग्रीन टॅक्स

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात १ कोटी ३१ लाख रुपये जुन्या वाहनांकडून ग्रीन टॅक्स रुपात जमा करण्यात आले आहेत. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये हा कर एक कोटी ५७ लाख रुपये जमा करण्यात आला आहे.

मर्यादेबाबत पुनर्विचार आवश्यक

अनेकदा पहिल्यावहिल्या वाहनावर नागरिकांचे खूप प्रेम असते. ती गाडी विकली जात नाही, मोडीतही काढली जात नाही. अनेक मध्यमवर्गीय कुटुबांना १५ वर्षानंतर गाडी बदलणे कठीण असते. यामुळे मर्यादा टाकण्याबाबतचा निर्णय लागू करणे हे शक्य नाही. प्रदूषण रोखण्यासाठी मर्यादेबाबत पुनर्विचार आवश्यक आहे.

सर्जेराव शेळके, माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी. औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिडिओकॉनमध्ये आग, झाडे खाक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

पैठण औरंगाबाद रस्त्यावरील व्हिडिओकॉन कंपनीबाहेरील भंगार साहित्याला सोमवारी अचानक आग लागली. या आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे भंगार साहित्य जळून खाक झाले असून दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनी परिसरातील शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत.

पैठण औरंगाबाद रस्त्यावरील चितेगावजवळ असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीने कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवलेले आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास या भंगार साहित्याला अचानक आग लागली. भंगाराच्या साहित्यामध्ये प्लास्टिक व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझवण्यासाठी कंपनीचे तीन, औरंगाबाद महापालिकेचे दोन, बजाज कंपनीचा एक व औद्योगिक वसाहत वाळूजचा एक अश्या एकूण सात अगमिशमन दलाच्या गाड्याच्या सहाय्याने जवळपास दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवता आले. यासाठी बारा खासगी पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

दरम्यान, या आगीमुळे कंपनीचे किती नुकसान झाले व आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनी आवारातील शेकडो झाडे या आगीत जाळून खाक झाली. याप्रकरणाची बिडकीन पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादचे वाघ सोलापूरला हवे

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात असलेल्या पाच पिवळ्या वाघांपैकी दोन वाघांची मागणी सोलापूर महापालिकेच्या प्राणिसंग्रहालाने केंद्रीय प्राणी प्राधिकरणाकडे केली आहे.

मात्र, यासंदर्भात अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एच. नाईकवाडे यांनी दिली. ते म्हणाले, 'सोलापूर प्राणिसंग्रहालयातून वाघांच्या बदल्यात अन्य सक्षम प्राणी मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. औरंगाबादच्या प्राणिसंग्रहालयातील प्राणी इतरत्र पाठविल्यास येथील प्राण्यांची संख्या कमी होईल. परिणामी त्याचा नागरिकांच्या आकर्षणावरही परिणाम होईल. त्यामुळे सोलापूरला वाघ देण्याचा निर्णय अद्याप तरी घेण्यात आलेला नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार गुलदस्त्यातच

$
0
0

सिंगल

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

एसटी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या वेतन कराराबाबत कामगार संभ्रम झाला आहे. नेमका आपला पगार किती वाढला याची माहिती अजूनही त्यांना मिळालेली नाही. व्यवस्थापकीय संचालकांच्या सहीनंतर हा करार सार्वजनिक केला जाणार असल्याची माहिती एसटी विभागाच्या सूत्रांनी दिली.

३ जून रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने परिवहन मंत्र्यांनी घोषित केलेला कामगार करार फेटाळून लावला होता. हा करार चार हजार कोटींचा करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय ३२ ते ४८ टक्केची वेतनवाढ दिल्याचीही माहिती दिली जात आहे. मात्र, वेतन वाढ कधीपासून लागू करण्यात आली, वेतनवाढीचे काय सूत्र ठरविण्यात आले, याची माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. सोमवारी व्यवस्थापकीय संचालक यांच्या सहीनंतर वेतनवाढीचा चार्ट समोर येणार आहे.

वेतन वाढीबाबतची माहिती येण्याआधीच अनेक कामगारांनी किती वाढ होणार आहे, याबाबत अंदाज घेण्यास सुरुवात केली आहे. काही कामगारांनी ही दरवाढ १२ टक्के इतकी राहणार असल्याचे सांगितले. चार वर्षात ४८ टक्के इतकी वेतन वाढ सांगण्यात आलेली आहे. शिवाय महागाई भत्ताही कमी झाल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांकडून येत आहे.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज बिलाची दुरुस्तीही आता ऑनलाइन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी. औरंगाबाद :

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठी ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून ती तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. तसेच याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना पाठविला जाईळ.

वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया सुलभ व ऑनलाईन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नव्या ऑनलाइन प्रक्रियेत ग्राहकांना वीजबिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाइल ॲप, ईमेल व व्टिटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात करता येणार आहे. तक्रार आल्यानंतर ती किमान ९ दिवसांत सोडवावी, असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. जर ग्राहकांचे वीजबिल बरोबर असेल तर त्याबाबत ग्राहकाला एसएमएस प्राप्त होईल व त्यात संबंधित वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येईल, परंतु जर ग्राहकाच्या वीजबिलात दुरुस्ती करण्याची गरज असेल तर ते वीजबिल संबंधित शाखा कार्यालयात पाठविण्यात येईल. या शाखा कार्यालयामार्फत ग्राहकांच्या वीजबील तक्रारीच्या संदर्भात आवश्यक ती प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. यानंतर सुधारणा केलेले अंतिम वीजबील ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. हा एसएमएस दाखवून ग्राहकाला आपल्या वीजबिलाचा भरणा करता येईल.

महावितरणने याबाबत परिपत्रक जारी केले असून यात ऑनलाइन वीजबिल दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. महावितरणच्या या नवीन उपाययोजनांमुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. तसेच त्यांच्या तक्रारींचे निरसनही तातडीने होईल, अशी माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महावितरण कार्यालयात शेतकऱ्याला ढकलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

शेतातील विहिरीवरील विद्युत मीटरच्या कोटेशनची तारीख बदलण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकऱ्यास शिविगाळ करून कार्यालयाच्या बाहेर काढल्याप्रकरणी महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेत तालुक्यातील भगूर येथील मूळ रहिवासी व सध्या शहरातील सावतानगर भागात राहत असलेले शंकर मोरे हे जखमी झाले आहेत. त्यांचा पाय मोडला आहे.

शंकर मोरे यांची भगूर शिवारात गट क्रमांक १५७ मध्ये चार एकर शेती असून पंचायत समितीच्या योजनेतून विहीर शेतात खोदली आहे. या विहिरीसाठी विद्युत जोडणीसाठी कोटेशन दाखल केले होते. कोटेशन भरल्याची तारीख हुकल्याने ती बदलून घेण्यासाठी २८ मे रोजी वैजापूर येथील महावितरणच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता प्रकाश तौर यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी शिंदे व बद्रीनाथ चाफे यांनी त्याना अडवून नंतर या, असे सुनावले. मोरे यांनी कोटेशनची तारीख बदलून द्या अशी विनंती केली असता त्यांनी फाइल मिळणार नाही, असे उद्धट उत्तर देत त्यांना कार्यालयाबाहेर जा, असे फर्मावले. मात्र, मोरे यांनी फाइल घेतल्याशिवाय जाणार नाही, असे सांगितल्याने चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षारक्षक विक्रांत जाधव यांना बोलावून या म्हताऱ्याला बाहेर काढा, असे सांगितले. शेतकऱ्याला कार्यालया बाहेर फेकून दिल्याने त्याचा पाय मोडला. खासगी रुग्णालयात त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शेतकरी शंकर मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महावितरणचे शिंदे, बद्रीनाथ चाफे, सुरक्षारक्षक विक्रांत जाधव यांच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

\Bमुख्य अभियंत्याकडे दाद मागणार \B

महावितरण कंपनीच्या कार्यालयात कामानिमित गेलेल्या वयोवृद्ध मागासवर्गीय शेतकऱ्याला वाईट वागणूक देऊन कर्मचारी गुंडगिरी केली, त्यांना कार्यालयाबाहेर फेकून दिल्याने शेतकऱ्यांत दहशत पसरली आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांची भेट घेऊन संबधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ त्रिभुवन यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमरग्यातील ८ गावांना वादळाचा फटाका, १४०४ घरांची पडझड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

उमरगा तालुक्यातील ८ गावांना रविवारी रात्री वादळाचा फटका बसल्यामुळे तब्बल १४०५ घरांची मोठी पडझड झाली. दरम्यान, तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

रविवारी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान कवठा, कलदेव निंबाळा, काळनिंबाळा, रामपूर, बलसूर, कडदोरा, गुंजोटी आणि कदेर या गावाला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. तालुक्यात पाऊण तास झालेल्या पावसाची केवळ ३.४५ मिलिमीटर अशी नोंद आहे. मात्र, या दरम्यान सुरू असलेल्या वादळामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच सोमवारी (४ जून) सकाळी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पथकासह सर्व गावांना भेटी दिल्या व पंचनामे करण्याचे निर्देश दिले. प्राथमिक पंचनाम्यानंतर तब्बल १४०५ घरांची पडझड झाली असल्याचा अहवाल त्यांनी जिल्हाप्रशासनाकडे पाठवला. पुढे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवला. या घटनेमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील विजेचे खांब उन्मळून पडले. यामुळे गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वादळामुळे मोठ्याप्रमाणावरील घरांची पत्रेही उडाली, या घटनेमध्ये म्हैस व दोन शेळ्या ठार झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंजिठा’ने घेतला रसिकांचा ठाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ज्येष्ठ पत्रकार सतीश सुदामे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त सादर झालेल्या पद्मश्री ना. धों. महानोरलिखित 'अजिंठा' या खंडकाव्याच्या निरनिराळ्या अविष्काराने रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला. उस्मानपुऱ्यातील कलश मंगल कार्यालयात रविवारी (४ जून) ही मैफल रंगली. यानिमित्ताने लक्ष्मीकांत धोंड यांनी खंडकाव्याचे अभिवाचन सादर केले, तेजश्री पाटील हिने नृत्य सादर केले, तर अभिषेक देशपांडे, चित्ररेखा निकुंभ यांनी अभिनयातून काव्य रंगवले. विश्वनाथ दाशरथे यांच्या सुरेल स्वरांनी मैफलीत जान आणली. विनायक पांडे यांचे पार्श्वसंगीत होते. याच कार्यक्रमात अजिंठ्यातील चित्रे रेखाटणाऱ्या जाँ जिनोझ या फ्रेंच चित्रकाराची खास उपस्थिती होती. सुदामे कुटुंबियांच्या वतीने सर्व कलावंतांचा तसेच जाँ जिनोझ यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला दर्दींची गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंगल बातम्या क्राईम

$
0
0

\Bघरफोडीत ४४ हजाराचा ऐवज लंपास\B

औरंगाबाद: मोहम्मदखान नियामतखान पठाण (रा. हिमायतनगर, मॉर्डन हौसिंग सोसायटी) यांचे घर फोडून चोरट्यांनी ४४ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. हा प्रकार १७ मे ते १ जून या कालावधीत घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

....

\Bदुचाकी लंपास\B

वर्धमान राजमल पांडे (वय ४० रा. नांदगाव) यांची दुचाकी चोरट्यानी लंपास केली. हा प्रकार शनिवारी रात्री जालना रोडवरील कोठारी सारीज समोर घडला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bजुन्या वादातून मारहाण\B

जुन्या वादातून प्रकाश रमेश ठोंबरे (वय २३, रा. टीव्ही सेंटर) याला दोघांनी मारहाण केली. हा प्रकार शनिवारी सायंकाळी सिडको एन सहा भागात घडला. याप्रकरणी मनोज खुर्दे व गणेश खुर्दे व त्यांचे दोन मित्र (सर्व रा. सिडको एन सहा) यांच्या विरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bहद्दपार आरोपी गजाआड\B

शहरातून हद्दपार करण्यात आलेला आरोपी संदीप रमेश ठाकूर (वय २७, रा. एकता कॉलनी, सातारा) याला सातारा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी सकाळी संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ करण्यात आली. याप्रकरणी हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bट्रकच्या एसआरपीच्या कारला धडक\B

ट्रकचालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवत एसआरपीएफ ग्रुप जालनाच्या समादेशकाच्या कारला धडक दिली. हा प्रकार रविवारी सायंकाळी बीड बायपास रोडवरील गोदावरी टी पॉइंट येथे घडला. या प्रकरणी पोलिस नाईक दीपक मनगटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ई-टपाल सुविधेची पोलिसांतर्फे सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांतर्फे दररोज विविध ठिकाणी पत्रव्यवहार केला जातो. पोलिसांचे हे टपाल वाटप करण्यासाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करावी लागते. पोलिसांच्या वतीने सोमवारपासून ई-टपाल सुविधेला प्रारंभ करण्यात आला आहे. परिणामी काही दिवसांनी ही सुविधा पूर्ण ऑनलाइन करण्यात येणार असून टपाल वाटपाचा भार हलका होणार आहे.

शहर पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक विविध शाखा, पोलिस ठाणे यांचे मिळून जवळपास एक हजार टपालाची आवक-जावक होते. हे टपाल वाटण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक कर्मचारी तसेच विविध शाखेतील एका कर्मचाऱ्याकडे ही जबाबदारी सोपवली जाते. आता ही सुविधा ऑनलाइन करण्यात आली आहे. या सुविधेसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या सुविधेमध्ये जे टपाल पाठवायचे आहे, त्या कागदपत्राचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. यानंतर ऑनलाइन इंटरनेटद्वारे सबंधित पोलिस ठाणे किंवा शाखेला ते टपाल पाठवण्यात येणार आहे. समोरील सबंधित व्यक्तीला त्याच्या मोबाइलवर या संदर्भात मॅसेज प्राप्त होणार आहे. हे टपालपुढे कोणाकडे गेले, त्याचा काय पाठपुरावा झाला हे देखील या ई-टपाल सुविधेमध्ये माहिती होणार आहे. या संदर्भात सोमवारी ई टपाल सुविधेसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नीट’ मध्ये मराठवाड्याचा झेंडा

$
0
0

\B

'नीट' मध्ये मराठवाड्याचा झेंडा\B

नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा

शिखा सोनी, पियुष अडचित्रेचीही कामगिरी कौतुकास्पद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमबीबीएस', 'बीडीएस' अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल सोमवारी जाहीर झाला. मराठवाड्यातील नांदेडचा कृष्णा अग्रवाल याने देशभरात सातवा क्रमांक मिळविला आहे. तर, औरंगाबादच्या पियुष अडचित्रे याने मागासप्रवर्गातून देशात २३ वे स्थान मिळविले, शिखा सोनी हिने ११७ रँक मिळवित परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. यंदा 'कट ऑफ घसरला' असून इतर परीक्षेप्रमाणे 'नीट'मध्येही परिणाम पहायला मिळाल्याचे तज्ज्ञांना वाटते.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ७ मे रोजी परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. १३ लाख २६ हजार ७२५ पैकी सात लाख १४ हजार ६५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ५४ टक्के आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. नांदेडचा कृष्णा अग्रवाल याने देशभरात सातवा क्रमांक मिळविला आहे. तर, राज्यात त्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ७२० पैकी कृष्णाला ६८५ गुण मिळाले आहेत. कृष्णाने निकालात पहिल्या दहामध्ये येत मराठवाड्याचे नाव देशपातळीवर नेले. पियुष अडचित्रे याने मागासप्रवर्गातून २३ वा क्रमांक मिळिवला. यासह श्रीया राऊळ हिने ऑल इंडिया रँक १०२० असा आहे. तर, अनस खान (२६५९), कादरी सय्यद (१३०४), आरती जगदाळे (३४५०), अनिकेत पाटील (४३६५), शेख मोहम्मद सैफ अब्दुल माजिद (४५५८), कादरी शेख मुस्सदिकी (५४२१), शेख आमिर (६०९६), प्रथमेश नलावडे (९३७६), तुषार बोरुडे (११८४०), शुभम गाडेकर (१२५५४), स्नेहल गुडसुरकर (१५३५९), श्रेया जैस्वाल (१४७६७), दिव्या शिरसिकर (२४०३५), कौस्तुभ कटुले (२५२३६), पूजा पिसे (२६७३४), अनिकेत थेगडे (२८८५२),मुकेश टेकाळे (३२१७३), आर्य सबनीस (३२८१८), खान अंजुमन फातेमा (३७९८२), शेख माज अहमद (४०६६९) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

नियमितपणे अभ्यास आणि सरावा यावर मला यश मिळविणे सोपे झाले. आता पुढच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.

श्रीया राऊळ

..

सरावातील सातत्य परीक्षेत महत्त्वाचे असते. परीक्षेत फिजिक्स टफ गेला होता. निकाल चांगला अपेक्षित होता, परंतु गुण कमी झाले असे वाटते.

आरती जगदाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याने केलीशिंगरूची शिकार

$
0
0

निफाड : तालुक्यातील दिंडोरी तास येथे रविवार रात्री बिबट्याने मेढपाळाच्या घोड्याच्या शिंगरूर हल्ला केला. या हल्ल्यात शिंगरू ठार झाले.

वसंत गायकवाड या मेंढपाळाने दिंडोरी तासजवळ कालव्यानजीक मेंढ्या बसविल्या आहेत. रविवारी रात्री बिबट्याने घोड्याच्या शिंगरूवर हल्ला केला. मेंढपाळांनी आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत बिबट्याने शिंगरू फस्त केले होते. क्षेत्रपाल संजय भंडारी यांनी पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदली: शपथपत्र देण्याचे सरकारला आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचा आक्षेप घेऊन अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या बदल्यांविरोधांतील याचिकेत राज्य सरकारने शपथपत्र सादर करावे आणि शिक्षक बदली प्रक्रियेचे राज्य समन्वयक प्रदीप भोसले यांनी आपले म्हणणे सादर करावे, असे निर्देश न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी सोमवारी दिले आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी १२ जूनला होणार आहे.

बदलीने हजर झालेल्या ज्या शिक्षकांमुळे याचिकाकर्ते विस्थापित झाले आहेत, त्यांनाही वर्तमानपत्रात समन्स बजावून आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्याय झालेल्या शिक्षकांनी केलेल्या याचिकेत २०१७-१८च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रथम होणे गरजेचे होते, पण तसे करण्यात आलेले नाही. त्यामुळे मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षकांची पदस्थापना अनेक शाळांमध्ये करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार बदली टप्प्यात प्रथम समानीकरण होऊन समानीकरण अंती रिक्त पदांचा अहवाल प्रसिद्ध होणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संवर्ग १, २, ३ ची बदली प्रक्रिया पूर्ण करून रिक्त पदांचा अहवाल जाहीर होणे गरजेचे होते. त्यानंतर संवर्ग ४ ची बदली प्रक्रिया सुरू करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. अंदाजे रिक्त पदे गृहित धरून पोर्टलला मोघमपणे शाळा भरल्याने बरेच पर्याय वाया गेल्याने विस्थापित यादीत नाव आले आहे, असा आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. संवर्ग २ मधून पती-पत्नी एकत्रीकरण लाभ देताना ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नसावे. ‘अ’ ते ‘ई’ या सर्वप्रकारच्या जोडीदारांना हा लाभ देण्यात आला आहे. पण संवर्ग ४ मध्ये ३० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर सोयीत असलेल्यांना संरक्षण मिळाले नाही, ही बाब अन्यायकारक आहे. बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी होणे गरजेचे होते. तसे न झाल्याने अनेक बदल्या अन्यायकारक झाल्या आहेत, असाही आक्षेप घेण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांची बाजू सतीश तळेकर यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मका क्षेत्रात पाच हजार हेक्टरची वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

मागील वर्षी झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा खरीप हंगामात कापसाच्या क्षेत्रात किरकोळ घट होऊन मका व सोयाबीनसह इतर पिकांचे क्षेत्र वाढेल, अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिली. बियाणे, खते खरेदीतील अडवणूक व फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथक स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी तालुक्यात ४३ हजार २०० हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. पण बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. परिणामी, यंदा कापसाच्या लागवडीत घट अपेक्षित आहे. तालुक्यात ४२ हजार २५० हेक्टरवर कापूस लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी दोन लाख ११ हजार २५० बियाणे पाकिटाची मागणी केली आहे. सोयाबीन व मका या पिकांचा पेरा वाढणार आहे. शिवाय शेतकरी तुरीऐवजी मूग, उडीद या कडधान्याची आंतरपीक म्हणून लागवड करणार आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात ४२ हजार हेक्टरवर मका लागवड झाली होती. यंदा पाच हजार हेक्टरची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी चार हजार ६०० क्विंटल मका बियाणे लागणार आहे. तालुक्यात खरीप पीक लागवडीचे क्षेत्र एक लाख १० हजार हेक्टर आहे. त्यासाठी ४१ हजार १३८ टन खत मंजूर करण्यात आले आहे. हे खत टप्प्या टप्प्याने तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्राप्त होत आहे.

\Bमंजूर खत \B

तालुक्यात मागणीनुसार मंजूर झालेले खत पुढील प्रमाणे: युरिया १९ हजार टन, पोटॅश ३ हजार २५० टन, सुपर फॉस्फेट २९५ टन, डीएपी ६ हजार ५० टन, संयुक्त खते ११ हजार ६०२ टन.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुलंब्री तालुक्यात कापसाची लागवड घटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

तालुक्यात यंदा ५६ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड होणार असून कापसाच्या बियाणांची विविध कंपनीची सव्वा लाख पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार हेक्टरने कापसाची लागवड कमी होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात खरीप लागवडीची मशागत पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेणखत टाकून ट्रॅक्टरच्या साह्याने रोटाव्हेटर वापरून जमीन भूसभूशीत करून ठेवलेली आहे. बहुताश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने मशागत केली आहे. शेतकरी यंदाही कापसाला प्राधान्य देत असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत दोन हजार हेक्टरने लागवड कमी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

तालुक्यात प्रस्तावित खरीप पीक क्षेत्र पुढीलप्रमाणे: कापूस २५ हजार ३०० हेक्टर, मका २० हजार १०० हेक्टर, तूर १७०० हेक्टर,

मूग ६०० हेक्टर, सोयाबीन १५० हेक्टर, उडीद ५०० हेक्टर, बाजरी १६०० हेक्टर. तालुक्यात रासायनिक खतांचा उपलब्ध साठा पुढीलप्रमाणे: युरिया १० हजार ६७१ टन, डीएपी ४ हजार १०६ टन, एसएसपी १२२ टन, एमओपी १९५४ टन.

दरम्यान, शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर कमी करून शेणखताचा अधिक वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादूर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images