Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दलित कुलगुरुंच्या बदनामीचे प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाला वेठीस धरून आमदार सतीश चव्हाण हे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप स्वाभिमानी मुप्टा संघटनेने केला. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाला निवेदन देऊन मागासवर्गीयांवरील अन्याय दूर करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

मराठवाड्यातील मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी स्वाभिमानी महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज्ड टिचर्स असोसिएशनने केली आहे. राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाला दिलेल्या निवेदनात विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समस्यांवर संघटनेने प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पूर्णवेळ दलित समाजाचे कुलगुरू मिळाले. गेल्या चार वर्षात विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी मेहनत केली. मागासवर्गीय प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर नियमानुसार योग्य न्याय दिला. मात्र, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण कुलगुरू व प्रशासनाला वेठीस धरून कुलगुरुंना बदनाम करण्याचे प्रयत्न करीत आहेत. विधान परिषदेतील दोन आमदारांना हाताशी धरून चोपडे यांच्या विरोधात चौकशी समिती स्थापन केली असा आरोप स्वाभिमानी मुप्टाने केला. मराठवाड्यातील एस. सी व एस. टी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी संघटनेने अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष हरीश पिंपळे यांना गुरुवारी (७ जून) निवेदन दिले. विद्यापीठाने १० वर्षांपूर्वी विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर केलेल्या प्राध्यापकांच्या नियुक्त्यात प्रशासन व अधिकार मंडळातील सदस्यांच्या नातेवाईकांचा भरणा आहे. आमदार सतीश चव्हाण, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचा आरोप संघटनेने निवेदनात केला आहे. या नियुक्त्या करताना शासनाची जाहिरात, बिंदुनामावली, निवड समित्या यांना बगल देण्यात आली. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गावर अन्याय झाल्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी संघटनेने केली. विद्यापीठाशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयात मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यासाठी समिती निर्देशित करावी अशी मागणी संघटनेने केली. यावेळी डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, डॉ. भगवान गव्हाडे, प्रा. मोहन सौंदर्य, प्रा. प्रशांतकुमार वनंजे, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ. किशोर वाघ, डॉ. अश्विन चिंचोलीकर आदी उपस्थित होते.

समिती विद्यापीठात

विधीमंडळाच्या अनुसूचित जाती-जमाती समितीच्या सदस्यांनी गुरुवारी विद्यापीठात आढावा घेतला. विद्यापीठात अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण १०४ पदे आहेत. सरळसेवा भरतीतील २१ आणि पदोन्नतीची १० पदे रिक्त आहेत. पदोन्नतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रक्रिया रखडल्याचे प्रशासनाने समितीला सांगितले. बहुतेक जागा भरल्या असल्यामुळे समितीने समाधान व्यक्त केले. तांत्रिक त्रुटी असल्यामुळे जागा रिक्त असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. यावेळी तीन तक्रार निवेदने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परिवहन समितीसाठी गुडघ्याला बाशिंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात सिटी बस सुरू करण्याच्या तुरी अजून बाजारात आहेत. सिटी बस खरेदीचा निर्णय झाला. मात्र, अद्याप तो प्रत्यक्षात आलेला नाही. असे असताना परिवहन समिती स्थापन करून नवे सत्ताकेंद्र निर्माण करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून औरंगाबादसाठी १५० सिटी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी शंभर बस पहिल्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी निविदा देखील काढली. बस खरेदीची निविदा निघताच महापालिकेत परिवहन समितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी या संदर्भात आयुक्तांना पत्र देऊन परिवहन समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. राज्यातील ज्या ज्या महापालिकेत सिटी बससेवा सुरू आहे, त्या त्या महापालिकेत परिवहन समिती आहे. परिवहन समितीच्या सभापतीला स्थायी समितीच्या सभापतीएवढेच महत्त्व आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी जशी चुरस निर्माण होते, तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चुरस परिवहन समितीच्या सभापतिपदासाठी होईल असे मानले जात आहे.

\B'एसपीव्ही'चे नियंत्रण

\Bऔरंगाबादमध्ये सुरू केल्या जाणाऱ्या सिटी बस स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग असणार आहेत. महापालिकेचा या सिटी बसशी तसा काही संबंध असणार नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीची 'एसपीव्ही' सिटी बस सेवेवर नियंत्रण ठेवेल असे मानले जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पात परिवहन समितीला स्थान आहे का, अशी चर्चा आता पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी आत्महत्या प्रकरणातील आरोपींचा गुन्हा रद्द

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिघांवर दाखल करण्यात गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला.

विद्यापीठातील वसतिगृहात रहात असलेला संगणक शास्त्राचा विद्यार्थी गणेश कोपूरवाड याने १५ सप्टेंबर २०१७रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणात गणेशचा भाऊ उमेश कोपूरवाड याने दिलेल्या फिर्यादीत गणेश हा फिर्यादी उमेशबरोबर रहात होता. आरोपी रेणुका गवारकर, ज्योती तांगडे, अक्षय गायकवाड, आकाश गायकवाड यांच्या छळामुळे मानसिक तणावाखाली येऊन गणेशने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. यावरून अक्षय, आकाश, आणि ज्योती यांच्यावर दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान आरोप हे संदिग्ध स्वरुपाचे असून त्याद्वारे आरोपीविरोधात केस चालवणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करत तिघांवरील गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात आरोपीतर्फे सुदर्शन साळूंके, एन. डी. सोनवणे यांनी काम पाहिले. सरकारपक्षाची बाजू आर.बी. बागुल यांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅन्सर’ला पुन्हा पाणी टंचाईचा विळखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट'चा दर्जा मिळालेले शासकीय कर्करुग्णालय सुरू होऊन सहा वर्षे लोटली; परंतु या सहापैकी तब्बल पाच वर्षे हॉस्पिटल चक्क खासगी टँकरवर सुरू होते. खंडपीठाच्या आदेशानंतरही कितीतरी उशिरा हॉस्पिटलसाठी ज्युबली पार्कपासून स्वतंत्र जलवाहिनी तयार करण्यात आली व काही महिने हॉस्पिटलला काही प्रमाणात पुरेसे पाणी मिळाले. मात्र त्यानंतर मागच्या किमान आठ ते दहा महिन्यांपासून हॉस्पिटलला अत्यंत त्रोटक पाणी पुरवठा होत असून, चक्क घरगुती वाटपाप्रमाणे तिसऱ्या-चौथ्या दिवशी रुग्णालयाला अत्यंत अपुरे पाणी मिळत आहे. अर्थातच, खंडपाठीच्या आदेशालाही पालिकेने खुंटीला लावून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन २०१२ मध्ये झाले आणि तेव्हापासून; किंबहुना त्याआधीपासूनच कॅन्सर हॉस्पिटलला अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा दुर्दैवी सामना करावा लागला. हॉस्पिटलमधील आठ उंची नळाद्वारे हॉस्पिटलला तिसऱ्या दिवशी पाणी मिळत होते आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळेच हॉस्पिटलला तब्बल पाच ते साडेपाच वर्षे दररोज चार ते पाच खासगी टँकर घ्यावे लागले. या संदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने, हॉस्पिटलसाठी ज्युबली पार्कपासून हॉस्पिटलपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी तयार करण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही पालिकेने तब्बल दोन ते अडीच वर्षे उशिरा जलवाहिनी तयार करुन दिली. नवीन जलवाहिनीद्वारे काही महिने पुरेसा पाणी पुरवठा झाला; परंतु त्यानंतर पुन्हा 'पहिले पाढे पंचावन्न' अशी अवस्था झाली आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून हॉस्पिटलला दर तिसऱ्या आणि आता चौथ्या दिवशी घरगुती वापरानुसार अत्यंत अपुरा पाणी पुरवठा होत आहे. समस्त कर्करुग्णांचा विचार करुन हॉस्पिटलला थेट व दररोज पुरेसा पाणी पुरवठा करण्यात यावा, असे स्पष्ट आदेश खंडपीठाने दिल्यानंतरही हॉस्पिटलला अत्यंत अपुरा व त्रोटक पाणी पुरवठा होत आहे.

ओरड होताच टँकरचा मुलामा

अत्यंत अपुऱ्या पाणी पुरवठ्याची ओरड हॉस्पिटलमधून होताच, पालिकेकडून टँकर पाठवण्याचे सोपस्कार केले जातात. मात्र टँकरद्वारे अपेक्षेच्या प्रमाणात हॉस्पिटलला पाणी उपलब्ध होतच नाही आणि पुन्हा टंचाईच्या झळा हॉस्पिटलला सोसाव्या लागतात. दररोज पुरेसा पाणी पुरवठा केला जात नसेल तर स्वतंत्र जलवाहिनीचा फार्स कशासाठी, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याच अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे काही वेळेस खासगी टँकरही मागवण्याची वेळ हॉस्पिटलवर येत आहे.

स्वतंत्र जलवाहिनीद्वारे अपुरा पाणी पुरवठा होत आहे आणि पालिकेच्या टँकरद्वारे अपेक्षेप्रमाणे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे पालिकेने हॉस्पिटलला दररोज पुरेसा पाणी पुरवठा करावा, अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे. त्याचा पालिकेने आतातरी गांभीर्याने विचार करावा.

- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, राज्य कर्करोग संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायकवाड क्लासेसचा घनश्याम राज्यात तिसरा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एमएचटी-सीईटी २०१८' चा नुकताच निकाल जाहीर झाला. निकालात शहरातील गायकवाड क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामध्ये घनश्याम पाटील या विद्यार्थ्याने १९० गुणांसह राज्यातून तृतीय येण्याचा मान मिळवला. भौतिकशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळवत घनश्यामने शहरात पहिला क्रमांकाचा बहुमान मिळवला. अभिजीत चव्हाण १६८ गुणांसह क्लासेसमधून द्वितीय तर देवयानी बोडखे १६३ गुणांसह तृतीय येण्याचा मान मिळवला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गायकवाड एज्युकेशनल ग्रुपचे संचालक प्रा. रामदास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत आणि प्राध्यापकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे हे यश असल्याचे प्रा. गायकवाड यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वर्षांनी दौलताबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दौलताबाद चाळीसगाव ९५ किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा २०१४मध्ये करण्यात आली. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून हा प्रस्ताव मार्च महिन्यात रेल्वे बोर्डाकडे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दौलताबाद चाळीसगाव रेल्वे मार्गाची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. राष्ट्रीय महामार्ग २११ धुळे-औरंगाबाद-बीड-उस्मानाबाद- सोलापूर या मार्गासोबत रेल्वे मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांनी मध्य रेल्वेला माहितीच्या अधिकारात या रेल्वे मार्गाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती मागितली होती. याबाबत ३० मे २०१८ रोजी उत्तर मध्य रेल्वेचे राजेश उपाध्याय यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की औरंगाबाद-दौलताबाद-चाळीसगाव या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सहा मार्च २०१८ रोजी रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. आगामी काही वर्षांत हा रेल्वे मार्ग पूर्ण होण्याची शक्यता आहे.

\B'रोटेगाव कोपरगाव'चे सर्वेक्षण प्रगतीपथावर

\Bरोटेगाव कोपरगाव कॅडलाइन टाकण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या २२ किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षणाचे सुरू करण्यात आले आहे, अशीही माहितीही रेल्वेकडून देण्यात आली आहे.

औरंगाबाद रेल्वे मार्गाच्या विकासासाठी दौलताबाद-चाळीसगाव व रोटेगाव-कोपरगाव या रेल्वे मार्गाची गरज आहे. यामुळे हे रेल्वे मार्ग लवकरात लवकर व्हावेत. यासाठी लोकप्रतिनिधींसह, रेल्वे संघटनेने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे.

- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे समिती ………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दंगलीतील जखमी एसीपी कोळेकर यांना डिस्चार्ज

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोतीकारंजा येथील दंगलीमध्ये दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या एसीपी गोवर्धन कोळेकर यांच्यावर गेल्या २८ दिवसापासून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

११ मे रोजी शहरात दोन गटात दंगल उसळली होती. यावेळी मोतीकारंजा चौकात दंगल आटोक्यात आणण्यासाठी एसीपी कोळेकर व पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकार तात्काळ दाखल झाले होते. मात्र, दोन्ही गटाच्या मध्ये ते अडकले होते. यावेळी झालेल्या दगडफेकीत कोळेकर यांच्या गळ्यावर दगडाचा जोरदार फटका बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या स्वरयंत्राला जखम झाल्याने त्यांना बोलता येत नव्हते. त्यांच्यावर सुरुवातीला शहरातील सिग्मा हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गुरूवारी त्यांना हॉस्पिटल प्रशासनाने सुट्टी दिली आहे.

विश्रांतीची गरज

कोळेकर यांना बोलण्याचा अद्यापही त्रास होत आहे. त्यांच्यावर स्पीच थेअरी करीत त्यांच्याकडून एक एक शब्द डॉक्टरांनी उच्चारून घेतला. त्यांना तीन महिने आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला काही दिवस बोलणे टाळण्याचे सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा आज मेळावा; खैरेंसह चार नेत्यांचा सत्कार

0
0

औरंगाबाद : शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३३व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सिडको येथील संत तुकाराम नाट्यगृहात सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या चार नेत्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यात खासदार चंद्रकांत खैरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री तथा खासदार आनंदराव आडसुळ यांचा समावेश असणार आहे. या मेळाव्याला शहर व जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिनविरोध धडपडीला पूर्णविराम

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली. कमी-अधिक मतदार असूनही दोन गट प्राचार्य, अध्यापक, संस्थाचालक आणि पदवीधर गटाची निवडणूक लढवणार आहेत. मनिषा टोपे यांनी बिनविरोध विजयाची शक्यता मावळताच संस्थाचालक गटातून उमेदवारी अर्ज मागे घेतला.

विद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणूक येत्या १५ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सात जून मुदत होती. एकूण २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आतापर्यंत आठ जागांपैकी चार जागेवर बिनविरोध उमेदवार निवडले गेले आहेत. यात तीन उमेदवार उत्कर्ष पॅनलचे आहेत. तर प्राचार्य (ओबीसी) जागा विद्यापीठ विकास मंचने पटाकावली. प्राचार्य (सर्वसाधारण) प्रवर्गातील दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता उत्कर्षचे डॉ. जयसिंग देशमुख आणि मंचचे डॉ. सुभाष टकले यांच्यात लढत होईल. पदवीधर (सर्वसाधारण) प्रवर्गाच्या चार अर्जांपैकी डॉ. भारत खैरनार, प्रा. सुनील मगरे यांनी अर्ज मागे घेतले. तर प्रा. संभाजी भोसले आणि डॉ. नरेंद्र काळे यांनी अर्ज मागे घेतला नाही. दोन्ही उमेदवार उत्कर्ष पॅनलचे असल्यामुळे सामंजस्याने मार्ग काढला जाणार आहे. संस्थाचालक गटातील सर्वसाधारण प्रवर्गाच्या एका जागेसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. मनीषा राजेश टोपे यांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले. पण, कुणीही अर्ज मागे घेतला नसल्यामुळे टोपे यांनी माघार घेतली. आता 'उत्कर्ष'चे कपिल आकात, भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर यांच्यात लढत होणार आहे. अध्यापक गटासाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे उत्कर्षचे डॉ. राजाभाऊ करपे व विकास मंचचे डॉ. गोविंद काळे यांच्यात लढत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसलेल्या गुंडाला महिलेने शिकवला धडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, पडेगाव

अचानक घरात शिरलेल्या एका व्यक्तीसोबत दोन हात करत रोजा असलेल्या सालगड्याच्या बायकोने चोराला पळवून लावले. हा प्रकार मिटमिटा येथील सिद्धिकी यांच्या शेतात मंगळवारी दुपारी घडला. या प्रकाराची पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आलेली नाही.

सिद्धिकी यांच्या शेतात आठ वर्षांपासून शेख कुटुंब सालगडी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मिटमिटा येथील आठवडा बाजार करण्यासाठी घरातील कर्ता पुरूष गेले होते. त्यावेळी दुपारी दोनच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने घरातील महिलेला पाणी मागितले. त्या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या असता तो अचानक घरात शिरला व तोंड दाबून लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्याच्या हाताचा चावा घेऊन पाय मारून त्याला खाली पाडले. त्यामुळे त्या व्यक्तीने तेथून पाळ काढला. या महिलेला रोजा असल्याने अंगात त्राण नव्हे तरीही तिने त्याच्यापासून स्वत:चे संरक्षण केले. मिटमिटा परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. सदर प्रतिनिधीने या महिलेची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. या महिलेने पतीसह छावणी पोलिस ठाण्यात जाऊन याची तक्रार दिली. अनोळखी गुन्हेगाराचा शोध घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार टन कचरा पडून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरिकांच्या विरोधामुळे साईटस् वर कचरा टाकणे जवळपास बंद झाले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात सुमारे दोन ते तीन हजार टन कचरा पडून आहे. साचलेला कचरा आणि पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शासनाच्या संनियंत्रण समितीने चिकलठाणा, सावंगी, पडेगाव आणि कांचनवाडी येथील जागा निश्चित केल्या आहेत. या चारही जागांवर कचरा नेऊन टाकण्याचे काम महापालिकेतर्फे केले जात आहे, परंतु वर्गीकरण केलेला कचरा मात्र तेथे नेला जात नाही. मिश्र कचरा त्या चारही जागांवर टाकण्यात येत असल्यामुळे असा कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणाचे काम योग्य प्रकारे होत नाही, असे मत महापौरांनी व्यक्त केले आहे. नागरिकांच्या विरोधामुळे कचऱ्याची वाहतूक जवळपास बंद झाली आहे, त्यामुळे रस्त्यांच्या बाजूला, मोकळ्या जागांवर दोन ते तीन हजार टन कचरा पडून आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता पडून असलेला कचरा चिंताजनक आहे.

कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे हे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना समजून सांगण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस प्रशिक्षण वर्ग घेतला जाणार आहे. मध्यवर्ती जकात नाका भागाला गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भेट दिली तेव्हा कचऱ्याची मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. दुर्गंधी मध्ये काही कर्मचारी काम करीत होते. त्यांच्या आरोग्य तपासणीचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले. आरोग्य विभागातर्फे ३४ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, कुणालाही आजार आढळला नाही. एका कर्मचाऱ्याला रोजा असल्यामुळे त्याला भोवळ आली होती अशी माहितीही त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार कोईभी हो, शुरवात जोरशोरसे करते है

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सध्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, वीज, इंधनाचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे महागाईमध्ये वाढ झाली आहे. 'सरकार कोईभी हो, शुरुवात जोर शोरसे करते है', त्यांनंतर मात्र अडचणी समोर येतात असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू व ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा गुजरातमधील रेशन दुकानदार संघटनेचे राज्याध्यक्ष प्रल्हादभाई मोदी यांनी गुरुवारी (७ जून) पत्रकार परिषदेत केले. रेशन दुकानदार संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीसाठी ते औरंगाबादला आले होते.

रेशन दुकानदारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कधी आणि किती वेळा चर्चा झाली व त्याचे फलित काय असे प्रल्हादभाईंना विचारले असता, 'ज्याने देशासाठी घर सोडले त्याच्यासाठी संपूर्ण देशच त्याचे कुटूंब आहे, कधी तरी कुटूंबाविषयी त्यांच्याशी फोनवर बोलणे होते, रेशन दुकानदारांच्या प्रश्नासंदर्भात संघटनेच्या पातळीवरुन सरकारकडून वेळोवेळी उत्तर मिळते', असे त्यांनी सांगितले.

रेशनपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत आहे, मात्र रेशन दुकानदारांच्या कुटुंबांचा विचार कुणी करत नाही, यामुळे रेशनदुकानदारांना दरमहा किमान ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, एवढे कमिशन सरकारने द्यावे, किंवा त्यांना तेवढा पगार द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

इपॉस, ईपीडीएस प्रणालीला आमचा कधीच विरोध नव्हता, मात्र लाभार्थ्यांच्या डेटामधील चुका दुरुस्त करून द्यावा. २००१ मध्ये तयार केलेल्या दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांच्या याद्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. अनेक लाभार्थ्यांना यामुळे रेशनचे अन्न मिळत नाही, त्यामुळे ही यादी सुधारित व अद्ययावत करून द्यावी. देशभरात रेशनदुकानदारांच्या बैठका घेण्यात येणार असल्याचे मोदी म्हणाले. पत्रकार परिषदेला फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, सचिव राजेश अंबुसकर, सहसचिव विश्‍वंभर बासू, कोषाध्यक्ष किरणपालसिंग त्यागी, महाराष्ट्राचे राज्यअध्यक्ष डी. एन. पाटील यांची उपस्थिती होती.

... तर आपल्याच खिशातील पैसे जातील

सध्या परिस्थितीनुरुप महागाई वाढली आहे हाच पैसा शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येत असतात त्यामुळे सरकार हे संतुलन साधत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७० लाखांची फसवणूक; नियमित जामीन फेटाळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तब्बल ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या रामेश्वर महादेव कानघुले याचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी गुरुवारी फेटाळला. आरोपीविरुद्ध वाळूज एमआयडीसी व पुंडलिकनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.

मंत्रालयामध्ये ओळख असून, १५ शिक्षकांच्या संच दुरुस्तीला मान्यता मिळवून देतो, असे आमीष दाखवून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच कोषाध्यक्षांची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रामेश्वर महादेव कानघुले (वय ३८, रा. गारखेडा) याला अटक करून गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानंतर कानघुले याने नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असून हा आर्थिक स्वरुपाचा गंभीर गुन्हा आहे. जामीन मंजूर केल्यास पुरावा नष्ट करू शकतो व तपासात बाधा निर्माण करू शकतो. त्यामुळे नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे खेटे.. प्रक्रियेला मुदतवाढ

0
0

\B

प्रक्रियेला अखेर मुदतवाढ

\B

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय केली असली तरी, विद्यार्थ्यांचे खेट्या कमी झालेल्या नाहीत. निकाल जाहीर नसणे, गुणपत्रिका नसणे, त्यामुळे कागदपत्रांची कॉलेजकडून होत नसलेली तपासणीची प्रक्रिया, त्यामुळे विद्यार्थ्यांची फटफट होते. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेत प्रक्रियेला अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय गुरुवारी विद्यापीठ प्रशासनाने घेतला.

यंदापासून विद्यापीठ विभाग, संलग्नीत कॉलेजांमधील विज्ञान, वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. प्रवेशाची पहिली फेरी ४ ते ७ जूनपर्यंत होती. पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली. ७ पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक होते, परंतु अद्याप विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नाहीत, राज्यातील इतर विद्यापीठांचेही निकाल नाहीत. काही जणांना स्थलांतर प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यात अनेक कॉलेजांकडे विद्यार्थी कागदपत्र पडताळणीसाठी गेले तर, त्यांना विद्यापीठात पाठिवले जाते. या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांची फरफट होते आहे. कागदपत्र पूर्तता पूर्ण नसताना प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड प्रशासनाने अखेर लक्षात घेत प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी परिपत्रक काढत मुदवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांना आता पहिल्या फेरीतील प्रवेश १५ जूनपर्यंत घेता येणार आहेत.

तात्पुरते प्रवेश द्या

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी अंतिम वर्षाचा निकाल घोषित झाला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपात प्रवेश द्यावा अशा सूचना प्राचार्यांना करण्यात आल्या आहेत. प्रवेश देताना विद्यार्थ्यांना ३० दिवसात कागदपत्र सादर करावे लागतील अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासह विद्यार्थ्यांकडून शंभर रुपयांच्या बाँडवर हे लिहून घेण्याच्या सूचना ही देण्यात आल्या. ३० दिवसात गुणपत्रक, स्थलांतर प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल, अशी अट घालण्यात येणार आहे.

असे आहे नवे वेळापत्रक..

प्रथम फेरीतील प्रवेश प्रक्रिया............१५ जूनपर्यंत

द्वितीय प्रवेश फेरी...........................१६ ते २० जून

तृतीय प्रवेश फेरी...........................२१ ते २५ जून

कोट..

विद्यार्थ्यांना स्थलांतर प्रमाणपत्रास वेळ लागत होता. त्यासह अनेक विद्यापीठांचे निकाल जाहीर नाहीत. विद्यार्थ्यांनी याबाबी सांगत प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचे सांगितले होते. प्राचार्यांनीही याबाबत अडचणी मांडल्या. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

डॉ. अशोक तेजनकर,

प्र-कुलगुरू,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुसूचित जाती कल्याण समिती पत्रकार परिषद

0
0

पाली विद्यापीठाची स्थापना करावी

अनुसूचित जाती कल्याण समिती करणार सरकारकडे शिफारस

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाली भाषेच्या शिक्षणाची सुविधा अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, पाली भाषेतील उच्चशिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मध्यवर्ति ठिकाण म्हणून औरंगाबादेत पाली विद्यापीठाची स्थापना करावी, अशी शिफारस सरकारकडे केली जाणार आहे, अशी माहिती अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार हरिष पिंपळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा झाला. शुक्रवारी दौरा झाल्यानंतर समिती सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ सदस्य आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, संगीता ठोंबरे, डॉ. मिलिंद माने, लखन मलिक, प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.

पिंपळे म्हणाले,"सरकारच्या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची पाहणी आम्ही केली. नोकरभरती, आढावा, अनुशेष याचा आढावा घेतल्यानंतर अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यापैकी काही त्रुटी दूर करण्यात आल्या. औरंगाबादेतील बहुतांश कार्यालयातील अधिकारी नव्याने बदलून आले आहेत. त्यामुळे माहिती मिळण्यास विलंब झाला. काही ठिकाणी आम्ही आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचा अहवाल अधिवेशनात सादर केला जाईल. आम्ही पाटोदा ग्रामपंचायतीला भेट दिली. तेथील सर्व सुविधा पाहिल्यानंतर सरकारकडे अशा प्रकारचे उपक्रम अन्य ग्रामपंचायतीत राबवावे, अशी शिफारस केली जाणार आहे," असे त्यांनी सांगितले.

" भीमनगर भावसिंगपुरा परिसरात १५० फूट रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता झाला तर अनेक दलित वसाहतींसाठी मुख्य रस्ता उपलब्ध होईल. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी याची पाहणी करून यासंदर्भात आम्हाला अवगत करणार आहेत. काही सरकारी कार्यालयातील विभागांची बिंदूनामावली तपासायची राहिली आहे. ती तपासून योग्य त्या सूचना केल्या जातील. जात वैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे महिनाभरात निकाली काढावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, यासंदर्भात शिफारस केली जाईल. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिष्यवृत्तीचा प्रश्न उपस्थित झाला. त्याठिकाणी याद्याच उपलब्ध नाहीत, तिथे योग्य ती सूचना करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंचे कामकाज चांगले असल्याचे निवेदन एका संघटनेकडून आले आहे. आम्ही विद्यापीठातील कामकाजाचा आढावा घेतला, त्याचा अहवाल अधिवेशनात सादर केला जाईल. साताळा (ता.औरंगाबाद) येथील पाणीपुरवठा योजनेबाबतही योग्य ती कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील परिस्थिती फारच विदारक असल्याचे आमदार हरिष पिंपळे यांनी सांगितले. तीनही वसतिगृहांमध्ये अस्वच्छता आढळून आली. घाणीचे साम्राज्य होते, भोजनगृहही चांगले नव्हते. वीजेच्या तारा उघड्या होत्या. याप्रकरणी पीडब्ल्यूडीच्या इलेक्ट्रिक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली जाईल. शिवाय स्वच्छता करणाऱ्या दोन्ही कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकावे, अशी शिफारस केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नातीसोबत आजीही दहावी पास

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अपयश आले, कमी गुण पडले की, निराशेच्या गर्तेत जाणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारी बातमी. औरंगाबादमधील ५८ वर्षाच्या ध्रुपदाबाई एडके यांनी आपल्या नातीसोबत दहावीची परीक्षा उत्तीर्ण होत, वेगळा आदर्श ठेवला आहे.

शिकण्याची प्रचंड जिद्द असूनही घरची बेताची परिस्थिती असल्याने शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यात लहानपणीच लग्न झाले, मुले शिकली, त्या मुलांची मुलेही पदवीचे शिक्षण घेत आहेत, पण लहानपणापासून शिकण्याची जिद्द मनात कायम घर करून होती. याच जिद्दीतून ध्रुपदाबाईंनी चार वर्षापूर्वी प्रौढ महिला विद्यालयात शाळेत प्रवेश घेतला. शिक्षणाची बारखडीही येत नसल्याने अगदी बाराखडीपासून शिक्षण सुरू झाले. नियमितपणे विद्यालयात येत त्यांनी पाचवी, सातवी असे करता करता आज १० वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

बालाजीनगरमध्ये राहणाऱ्या ध्रुपदाबाई बाबुराव एडके यांचे पती फॅब्रिकेशनची छोटे-छोटी कंत्राटे घेतात. त्यांना अनिल आणि प्रफुल्ल अशी दोन मुले, तीन मुली. सगळ्यांची लग्न झालेली. त्यांच्या मुलांची मुले आज बारावी, पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. त्याचवेळी त्यांची नात मीताली विजय झाल्टे ही यंदा दहावीत होती. आजी आपल्यासोबतच दहावीची परीक्षा देत असल्यानेही तिनेही त्यांना अभ्यासात मदत केली. ध्रुपदाबाई घरातील कामकाज आटोपून नियमितपणे शाळेत पोहचत, शाळेतून आल्या की अभ्यासाची तयारी. दहावीला वर्षभर नियमितपणे अभ्यास करत त्या परीक्षेला सामोरे गेल्या. आज दहावीचा निकाल जाहीर झाला आणि एडके कुटुंबात उत्साह पसरला. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी दहावीत ४२ गुण मिळवित यश मिळविले. त्यांना पुढेही शिक्षण घ्यायचे आहे. त्यांची नात मितालीने ७८ टक्के गुण मिळविले.

''लहानपणी शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु परिस्थितीच नव्हती. लग्नानंतर संसारामुळे वेळ नाही मिळाला. सर्व लेकरांचे विवाह झाले, त्यांचे मुलेही मोठी झाली. त्यामुळे शिक्षण घेण्याचे ठरविले. नियमितपणे अभ्यास केला. घरातील सर्वांनी सहकार्य केल्याने हे यश मिळविता आले.'' - ध्रुपदा बाई एडके

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लहू प्रहार’ने केली गाढवाची महापूजा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मातंग समाज आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारच्या निषेधार्थ लहू प्रहार संघटनेने शुक्रवारी जिहाधिकारी कार्यालयासमोर गाढवाची महापूजा केली.

'सबका साथ सबका विकास' हा नारा देत केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मात्र, मागील चार वर्षांमध्ये सरकारला मातंग समाजाचा विकास करायला वेळ मिळाला नाही. अनुसूचित जाती आरक्षणाची वर्गवारी करून मातंग समाज व तत्सम जातींना आरक्षण अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीकडे राज्यातील महायुती सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या विरोधात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतोष पवार, तातेराव कारके, नितीन आव्हाड, सचिन साबळे, मुकेश जाधव, अनिल भालेराव, दीपक त्रिभुवन, कचरू कांबळे, भारत मानकर आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका शाळांचा निकाल ८० टक्के, आठ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुणांचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका शाळेचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ८०.४३ टक्के लागला आहे. महापालिकेच्या एकूण १४ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधून ६४९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आठ विद्यार्थ्यांना नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले.

नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. लक्ष्मी बकाल ( ९३.६० टक्के, माध्यमिक विद्यालय, चिकलठाणा), तब्बसुम रसुल खान पठाण ( ९१.६० टक्के , माध्यमिक विद्यालय, नारेगाव), मुज्जमील रियाज शहा (९०.४० टक्के, माध्यमिक शाळा, नारेगाव), उजमा अहेमद शहा ( ९०.२० टक्के, माध्यमिक विद्यालय, नारेगाव), संध्या विलास केदारे ( ९०.२० टक्के, माध्यमिक विद्यालय,सिडको एन ७), आफरीन अजगर अली (९०.४० टक्के, माध्यमिक विद्यालय, नारेगाव), खान उजमा कदीर (९०.०० टक्के, माध्यमिक विद्यालय, किराडपुरा क्रमांक १), शाह सना कौसर (९०.०० टक्के, माध्यमिक विद्यालय, नारेगाव).

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते त्यांच्या दालनात करण्यात आला. त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांचे अभिनंदन केले. महापालिकेच्या शाळेच गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. संकटावर मात करून त्यांनी हे यश मिळवले आहे. चांगले शिक्षण देण्याचे कामही आम्ही करू शकतो हे या निकालाने दाखवून दिले आहे. पुढील आठवड्यात शिवछत्रपती पुरस्कारा प्राप्त खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे, त्याचवेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार केला जाईल असे महापौरांनी जाहीर केले. यावेळी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके, संजीव सोनार यांच्यासह अन्य मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

फोटोओळ - महापालिकेच्या शाळांमधून ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेले (उजवीकडून) लक्ष्मी बकाल, तबसुम रसुल पठाण, उजमा अहेमद शहा, सना कौसर अझगर शहा, मुजब्बीक शहा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी परीक्षेत मुलींचाच दबदबा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या निकालात शुक्रवारी ऑनलाइन जाहीर झाला. बारावीप्रमाणे दहावीतही विद्यार्थिंनीनी आपला दबदबा कायम ठेवला. औरंगाबाद विभागात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.९६ टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विभागाचा निकालही यंदा वाढला असून १ लाख ८८ हजार ३१९ विद्यार्थ्यां पैकी १ लाख ६७ हजार २४४ विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा पार केला. उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.८१ टक्के एवढे आहे. तर, राज्याच्या निकालाची टक्केवारी ८९.४१ एवढी आहे.

दहावीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षात बदलत आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार दहावीची ही शेवटची बॅच होती. १ ते २४ मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने आज जाहीर झाला. निकालाची टक्केवारी यंदा वाढली आहे. राज्यातील नऊ विभगात पहिला क्रमांक कोकण विभागाचा आहे. कोकण वभागातून ९६ टक्के विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले. राज्यात औरंगाबाद निकालात पाचव्या स्थानावर आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विभागाची निकालाची टक्केवारी ०.६६ टक्क्यांनी अधिक आहे. विभागात केवळ ११.१९ टक्के विद्यार्थ्यांना दहावीचा टप्पा पार करता आला नाही. विभागातील २ हजार ४६१ शाळांमधून दहावी परीक्षेला विद्यार्थी बसले होते. औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याने पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.५४ टक्के एवढे आहे. यासह औरंगाबाद विभागातून ७ हजार ९०७ पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी ३ हजा ३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची ही टक्केवारी ४२.३४ एवढी आहे. या निकालात मुलांनी आघाडी घेतली. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलींच्या तुलनेत ०.४८ टक्क्यांनी अधिक आहे.

जिल्हावार निकाल..

जिल्हा... परीक्षार्थी... उत्तीर्ण.... टक्केवारी

औरंगाबाद..६५३७७....५९३९५...९०.८५

बीड..........४४०४२...४०७५५...९२.५४

परभणी......२९३२३...२४७४५....८४.३९

जालना......३१८०५...२८५९८....८९.९२

हिंगोली......१७७७२....१३७५१...७७.३७

..

राज्यातील एकूण परीक्षार्थी…१६ लाख २८ हजार ६१३

उत्तीर्ण विद्यार्थी संख्या……….१४ लाख ५६ हजार २०३

निकालाची टक्केवारी..........८९.४१

...

औरंगाबाद विभागातील परीक्षार्थी....१ लाख ८८ हजार ३१९

उत्तीर्ण विद्यार्थी.........................१ लाख ६७ हजार २४४

निकालाचे प्रमाण.......................८८.८१ टक्के

.......

पुन्हा आम्हीच

दहावी परीक्षेतही विद्यार्थिनींनी आपला दबदबा कायम ठेवला. मुलांच्या तुलनेत राज्यातही मुलीच पुढे आहेत. औरंगाबाद विभागातही हेच चित्र आहे. राज्यातून ७ लाख ४२ हजार ५०७ मुलींनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख ८२ हजार ८६४ उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.९७ एवढे आहे. मुलांच्या तुलनेत निकालाची टक्केवारी ४.७ टक्क्यांनी अधिक आहे. राज्यात ८ लाख ८६ हजार १०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख ८२ हजार ६६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.२७ एवढे आहे. औरंगाबाद विभागात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.९६ टक्क्यांनी अधिक आहे. विभागातून ८० हजार २८० मुलींनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ७४ हजार ४१ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२३ टक्के एवढे आहे. विभागातून १ लाख ८ हजार ३९ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९३ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ८६.२७ टक्के एवढे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजा मुंडे यांना कोर्टाची चपराक

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

ग्रामविकास विभागाच्या योजनेअंतर्गत परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी द्यावयाचा निधी बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे. त्यामुळे राजकीय सूडबुद्धीने, विरोधकांच्या ग्रामपंचायतींना निधी न देण्याच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयाला चपराक बसली आहे.

शासनाचा हा निर्णय पारदर्शक वाटत नाही तर तो अपारदर्शक, अनियंत्रित आणि कायद्याच्या मूळ गाभ्याला बगल देऊन घेण्यात आला आहे, अशा शब्दात न्यायालयाने ग्रामविकास विभागावर ताशेरे ओढले आहेत. विशेष म्हणजे ग्रामविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील कामाबाबत शासनाने हे आदेश दिले होते. परळी तालुका हा ग्रामविकास मंत्री पंकजा यांच्या मतदारसंघात येतो. निधी वर्ग केलेल्या ग्रामपंचायती पूर्वी स्वतःच्या ताब्यात असल्याने त्यांनी सुरुवातीला हा निधी ग्रामपंचयातींना दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका होऊन या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्याने त्यांनी राजकीय हेतुने हा निधी ग्रामपंचायतींकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना चपराक बसली आहे.

ग्रामीण भागात मुलभूत विकास कामांसाठी ग्रामविकास विभागाच्या अन्य योजनेतून ग्रामपंचायतींना रस्ते, नाल्या अशा किरकोळ कामासाठी निधी दिला जातो. २८ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ग्रामविकास खात्याने परळी तालुक्यातील २०६ कामांसाठी ६ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून तो बीड जिल्हा परिषदेला वर्ग केला होता. यातील ४३ कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या असताना १८ कामे पूर्ण झाल्यावर व उर्वरित कामे प्रगतीपथावर असताना व हे कामे करण्याची संबंधित ग्रामपंचायतींनी तयारी दर्शविली असतानाही तब्बल एका वर्षानंतर ग्रामविकास विभागाने ३० डिसेंबर २०१७ रोजी पुन्हा एक शासन निर्णय काढून यातील ३ कोटी ४० लाख रुपयांची १०१ कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली होती.

शासनाच्या या निर्णयाविरूद्ध परळी तालुक्यातील वागबेट, लमाणतांडा, नागपिंपरी, लांडेवाडी, कासारवाडी, सरदगाव, दावणापूर या ग्रामपंचायतींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर न्या. बोर्डे व न्या. सोनवणे यांच्यासमोर सुनावणी होऊन ४ मे रोजी निकाल राखीव ठेवण्यात आला होता. न्यायालयीन सुट्टीनंतर ५ जून रोजी या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने बांधकाम खात्याला निधी वर्ग करण्याचा ग्रामविकास विभागाचा ३० डिसेंबर २०१७ चा शासन निर्णय रद्द ठरवला. हा निकाल देताना शासनाने ग्रामविकास विभागावर अतिशय तीव्र शब्दात ताशेरे ओढले असून, त्यात हा निर्णय पारदर्शक वाटत नाही तर अपारदर्शक आणि अनियंत्रित आहे, कायद्याच्या मूळ गाभ्यास बगल देऊन असा निर्णय घेता येत नाही. २०६ पैकी १०१ कामेच का निवडली? ३ लाखांपर्यंतची किरकोळ कामे असताना राज्यस्तरीय मोठे प्रकल्प करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही कामे का वर्ग केली? अंमलबजावणी करणारी यंत्रणा का बदलली? असे अनेक प्रश्न उपस्थित करतानाच राजकीय हेतुने हा निर्णय घेतलेला असल्याने त्याचे न्यायालयीन पुनर्विलोकन करणे क्रमप्राप्त ठरते असे आपल्या निकालात म्हटले आहे. या प्रकरणी अर्जदारांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ आर.एन.धोर्डे यांनी काम पाहिले. शासनाच्या वतीने एस. बी. यावलकर तर बीड जिल्हा परिषदेच्या वतीने विठ्ठल चाटे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images