Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गांजाची तस्करी; दोन महिलांना कोठडी

0
0

औरंगाबाद: गांजा तस्करीप्रकरणी दोन महिलांना अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना सोमवारपर्यंत (११ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. चौधरी यांनी दिले. सुधा उर्फ शाहेदा सुब्रमण्यम (वय ४०, रा. तामीळनाडू, ह. मु. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) व शबाना अख्तर पठाण (वय ४०, रा. फत्तेपूर ता. जामनेर, जि. जळगाव), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सहायक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी कोर्टात केली. कारमधून गांजाची तस्करीप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनंत भालेराव विद्या मंदिर (गुणवंत विद्यार्थी)

0
0

१) तेजल पाटील - १००

२) जान्हवी तोतला - ९९.२०

३) अपेक्षा तांगडे - ९८.४०

४) श्रीराम जोशी - ९८.००

५) निसर्गा वागले - ९७.००

६) गायत्री जगदाळे - ९६.८०

७) मुग्धा कुलकर्णी - ९६.४०

८) सागर चौधरी - ९६.४०

९) अथर्व वालेकर - ९६.४०

१०) मानस पाटील - ९६.४०

११) साक्षी भालेराव - ९६.००

१२) साक्षी आहेरकर - ९५.४०

१३) आदित्य काळे - ९५.४०

१४) आयुष कुलकर्णी - ९५.२०

१५) सायली राठोड - ९५.२०

१६) अक्षरा मोगल - ९५.२०

१७) वैष्णवी कुलकर्णी - ९४.६०

१८) अथर्व कुलकर्णी - ९४.६०

१९) अभिजित पाटील - ९४.६०

२०) नीलय कोरटकर - ९४.४०

२१) तन्वी सोनवणे - ९४.४०

२२) वेदवती जाधव - ९४.४०

२३) शरयू बिडवई - ९४.२०

२४) वल्लभ बुद्रुककर - ९४.२०

२५) वैष्णवी खलसे - ९४.२०

२६) सुधांशू अग्निहोत्री - ९४.००

२७) शुभम बारगळ - ९४.००

२८) यश बनकर - ९४.००

२९) ऋतुराज पार्वे - ९२.८०

३०) सुमेध मणुरकर - ९२.८०

३१) मयुरी इमडे - ९२.६०

३२) सुमित पवार - ९२.२०

३३) प्रथमेश चक्रे - ९२.२०

३४) श्रेयस रणदिवे - ९२.२०

३५) सुखदा अन्वीकर - ९२.००

३६) कौशल चव्हाण - ९१.६०

३७) अदित्य कुनगर - ९१.२०

३८) मयुर राठोड - ९०.८०

३९) अतर्व आयाचित - ९०.८०

४०) रोहित पवार - ९०.४०

४१) हर्षदा पाठक - ९०.२०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा वर्गीकरणासाठी रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय शुक्रवारी (८ जून) महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कचरा, नाले सफाईबद्दल महापौर नंदकुमार घोडेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी कचरा वर्गीकरणाचा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्यामुळे संनियंत्रण समितीने ठरविलेल्या जागेवर कचरा जात नाही. नागरिक कचरा आणण्यास विरोध करता. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण झालेच पाहिजे यासाठी व्युहरचना करण्याचे ठरविण्यात आले अशी माहिती महापौरांनी दिली. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी २० जूनपर्यंत रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना सीएसआर फंडातून वेतन दिले जाईल. वर्गीकरण केलेला सुका कचरा सकलेचा यांच्या कंपनीत प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे, तर ओला कचरा संनियंत्रण समितीने निश्चित केलेल्या जागांवर पाठवला जाईल असे ते म्हणाले.

पावसाळा लक्षात घेता नाले सफाईचे काम सुरू करण्यात आले असून ते साठ टक्के झाले आहे असा दावा त्यांनी केला. पावसाचे पाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरल्यास बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे दहा डिवॉटरिंग पंप तयार ठेवण्यास सांगितले आहे. सायंकाळपर्यंत नियंत्रण कक्ष अद्याप सुरू करा असे आदेश दिले आहेत. आपतकालीन परिस्थिती लक्षात नऊ दवाखाने सुरू केले जातील असा उल्लेख त्यांनी केला.

\Bजयभवानीनगर अतिसंवेदनशील

\Bमहापौर म्हणाले, 'जयभवानीनगर अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. जयभवानीनगरमधील नाल्याचे काम बंद आहे. कंत्राटदार काम करीत नाही अशी अधिकाऱ्यांची तक्रार आहे. आयुक्तांना यात लक्ष घालण्यास सांगू. रोगराई किंवा साथीच्या आजारासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेला कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा: सेंट झेव्हिअर स्कूल - श्रुती खिलारे (९०)

११३ विद्यार्थ्यांना सरासरी गुण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केज गटसाधन केंद्रात जळालेल्या उत्तरपत्रिका ज्या विद्यार्थ्यांच्या होत्या त्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले आहेत. दहावीतील ११३ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या होत्या. ३ जून रोजी हा प्रकार समोर आला होता.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिका जळीत प्रकरण राज्यभर गाजले. ३ जून रोजी केज गटसाधन केंद्रात विद्यार्थ्यांच्या १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ११३ उत्तरपत्रिका दहावीच्या विद्यार्थ्यांच्या होत्या. मराठी द्वितीय भाषा विषयाच्या पेपरच्या उत्तरपत्रिका होत्या. हे विद्यार्थी उर्दू माध्यमाचे होते. उत्तरपत्रिका ज्या विद्यार्थ्यांच्या होत्या. त्यांना नियमाप्रमाणे सरासरी गुण देण्याचा मंडळाने निर्णय घेतला होता. बारावीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना हे गुण देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कला, क्रीडा गुणांचा टक्का वाढविण्यात हातभार

0
0

कला, क्रीडा गुणांचा टक्का वाढविण्यात हातभार

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कला व क्रीडाक्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर दहावीत सवलतीचे गुण दिले जातात. या गुणांनी यंदा ही निकालाचा टक्का वाढविण्यास हातभार लावल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद विभागात १६ हजार ३९० मुलांना या गुणांचा हातभार लागला.

कला व क्रीडाक्षेत्रात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारावर दहावीच्या परीक्षेत सवलतीचे गुण दिले जातात. शास्त्रीय कला, चित्रकलेचा गेल्या वर्षी समावेश करण्यात आला. ३ ते १५ असे सवलतीचे गुण देण्यात येतात. मागील वर्षी पहिले वर्ष असल्याने प्रस्तावांची संख्या कमी होती. यंदा प्रस्तावाची संख्या गतवर्षीच्या तुलनेत तिपटीने वाढली. त्याचा परिणाम गुणांचा टक्का वाढण्यात झाली आहे. शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रातील सहभागाबद्दल औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यात १६ हजार ३९० मुलांना फायदा मिळाला.

जिल्हानिहाय प्रस्ताव..

जिल्हा........ प्रस्तावसंख्या

औरंगाबाद....५४१९

जालना........१५४७

बीड............५०८७

परभणी........२६४४

हिंगोली........१२५१

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबादमध्ये वाहतूक सुरळीत

0
0

…म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

एसटी महामंडळाने सादर केलेल्या वेतन करारावर नाराजी व्यक्त करीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अघोषित बंद सुरू केला. औरंगाबाद शहरातील सिडको आणि सीबीएस येथे मात्र एसटी वाहतूक सुरूच होती. औरंगाबाद वगळता विभागात अन्य ठिकाणी एसटीची चाके थांबल्यामुळे विभागाला १४ लाख रुपयांचा फटका बसला.

शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासून मध्यवर्ती बस स्थानकातून भुसावळ, धुळे या मार्गावर एसटी धावत होत्या. यानंतर येथूनच पुणे नाशिकसह विविध मार्गावर बस सोडण्यात आल्या. पर्यटन बसही औरंगाबादहून अजिंठा आणि वेरूळ लेणीकडे गेली. ग्रामीण भागातही काही ठिकाणी बस सुरू होत्या. तसेच सिडको बस स्थानकातही बस सेवा सुरू होती. काही कर्मचाऱ्यांनी ड्युटी करण्यास नकार दिला होता, मात्र नंतर सिडकोतून बीड लातूर भागांकडे बस सोडण्यात आल्या.

पैठण येथे मात्र अनेक कर्मचाऱ्यांनी ड्युटी घेण्यास नकार दिला. तसेच वैजापूर, कन्नड, गंगापूर, येथेही अनेक शेड्युल कर्मचारी आले नाहीत. त्यामुळे विभागात सुमारे ३८ हजार किलोमीटरचा एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावरील बस बंद असल्याने १४ लाख रुपयांचा तोटा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-८जून

0
0

पुंडलिक नगर

पोलीस ठाणे गैरसोयीचे

पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे ठिकाण हे नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचे आहे सध्या हे ठाणे पारिजात नगर, सिडको एन-चार दक्षिण या परिसरात आहे. ठाण्याजवळ दिशादर्शक पाट्यांचा अभाव आहे. ठाण्याचे जवळचे लँडमार्क 'गोकुळ स्वीट्स' आहे या दुकानातील व्यक्तींना देखील पोलिस ठाण्याचा पत्ता सांगता येणे कठीण आहे. या भागात नागरिकांची; तसेच वाहनांची फारशी वर्दळ नाही. रिक्षा देखील या परिसरात अपवादानेच आढळतात. या सर्व कारणांमुळे हे ठाणे भरदिवसा गाठणे अवघड आहे. या ठाण्यास पोचण्यासाठी नागरिकांचा वेळ आणि पैसा व्यर्थ खर्च होत आहे. नवीन आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुंडलिक नगर पोलिस ठाणे हे सहज पोचता येईल अशा ठिकाणी स्थलांतरित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- एक वाचक

...

निरालाबाजार ते नागेश्वरवाडी

संपूर्ण रस्ता खड्डेमय

हे छायाचित्र आहे सतत वर्दळीच्या रस्त्याचे. निरालाबाजार ते नागेश्वरवाडी हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांचा झाला आहे. वरील छायाचित्रात दाखविण्यात आलेला खड्डा तर इतका मोठा आहे की वाहने दाणकन आपटतात. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अंधारात तर वाहन पडलेच समजा. महापालिकेने रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

- शरद लासूरकर औरंगाबाद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनुसूचित जाती कल्याण समिती पत्रकार परिषद

0
0

पाली विद्यापीठाची स्थापना करावी

अनुसूचित जाती कल्याण समिती करणार सरकारकडे शिफारस

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाली भाषेच्या शिक्षणाची सुविधा अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, पाली भाषेतील उच्चशिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मध्यवर्ति ठिकाण म्हणून औरंगाबादेत पाली विद्यापीठाची स्थापना करावी, अशी शिफारस सरकारकडे केली जाणार आहे, अशी माहिती अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार हरिष पिंपळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचा तीन दिवसीय दौरा झाला. शुक्रवारी दौरा झाल्यानंतर समिती सदस्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ सदस्य आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, संगीता ठोंबरे, डॉ. मिलिंद माने, लखन मलिक, प्रकाश गजभिये आदी उपस्थित होते.

पिंपळे म्हणाले,"सरकारच्या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची पाहणी आम्ही केली. नोकरभरती, आढावा, अनुशेष याचा आढावा घेतल्यानंतर अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यापैकी काही त्रुटी दूर करण्यात आल्या. औरंगाबादेतील बहुतांश कार्यालयातील अधिकारी नव्याने बदलून आले आहेत. त्यामुळे माहिती मिळण्यास विलंब झाला. काही ठिकाणी आम्ही आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचा अहवाल अधिवेशनात सादर केला जाईल. आम्ही पाटोदा ग्रामपंचायतीला भेट दिली. तेथील सर्व सुविधा पाहिल्यानंतर सरकारकडे अशा प्रकारचे उपक्रम अन्य ग्रामपंचायतीत राबवावे, अशी शिफारस केली जाणार आहे," असे त्यांनी सांगितले.

" भीमनगर भावसिंगपुरा परिसरात १५० फूट रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता झाला तर अनेक दलित वसाहतींसाठी मुख्य रस्ता उपलब्ध होईल. महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी याची पाहणी करून यासंदर्भात आम्हाला अवगत करणार आहेत. काही सरकारी कार्यालयातील विभागांची बिंदूनामावली तपासायची राहिली आहे. ती तपासून योग्य त्या सूचना केल्या जातील. जात वैधता प्रमाणपत्रांची प्रकरणे महिनाभरात निकाली काढावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, यासंदर्भात शिफारस केली जाईल. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी शिष्यवृत्तीचा प्रश्न उपस्थित झाला. त्याठिकाणी याद्याच उपलब्ध नाहीत, तिथे योग्य ती सूचना करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंचे कामकाज चांगले असल्याचे निवेदन एका संघटनेकडून आले आहे. आम्ही विद्यापीठातील कामकाजाचा आढावा घेतला, त्याचा अहवाल अधिवेशनात सादर केला जाईल. साताळा (ता.औरंगाबाद) येथील पाणीपुरवठा योजनेबाबतही योग्य ती कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील परिस्थिती फारच विदारक असल्याचे आमदार हरिष पिंपळे यांनी सांगितले. तीनही वसतिगृहांमध्ये अस्वच्छता आढळून आली. घाणीचे साम्राज्य होते, भोजनगृहही चांगले नव्हते. वीजेच्या तारा उघड्या होत्या. याप्रकरणी पीडब्ल्यूडीच्या इलेक्ट्रिक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली जाईल. शिवाय स्वच्छता करणाऱ्या दोन्ही कंपन्यांनाही काळ्या यादीत टाकावे, अशी शिफारस केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत विमानातून प्रवाशांची सुटका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विमानाचे अपहरण करून ते औरंगाबाद येथे उतरविण्यात येत आहे, अशी माहिती मिळताच विमान आल्यापासून प्रवाशांची सुटका करेपर्यंतची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) विमानतळावर घेण्यात आली. हा सराव सकाळी अकराच्या दरम्यान करण्यात आला.

एअर टर्मिनलवर विमान अपहरण झाल्याची माहिती मिळताच सीआयएसएफचे जवान लगेच तैनात करण्यात आले. विमान आल्याची माहिती मिळाताच कारवाईला सुरुवात झाली. रंगीत तालीम करण्यासाठी सज्ज असलेल्या सीआयएसएफच्या जवानांसह शहर पोलिसांचे एक पथक परिस्थिती हाताळण्यासाठी तैनात होते. विमानरुपी एका बसमध्ये विमान प्रवासी होते. त्यांना सोडविण्यासाचा सराव एक तास करण्यात आला. या कारवाईमधील काही जखमींना रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले. एक तासाच्या रंगीत तालीममध्ये तीन ते चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सीआयएसएफच्या जवानांनी विमान प्रवाशांची सुटका केली. यावेळी पोलिस आयुक्त चिरंजीवी प्रसाद, विमानतळ संचालक डी. जी. साळवे यांच्यासह सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट अलोक कुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

\Bबस बनले विमान \B

विमानतळावर सराव करण्यासाठी विमानाऐवजी बसचा वापर करण्यात आला. या बसमध्ये विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींना प्रवासी म्हणून बसविण्यात आले होते.

…………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यावर पर्जन्यकृपा सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठवड्याभरापासून ‌मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार कृपादृष्टी केली आहे. बुधवारी बरसलेल्या पावसाचे सत्र गुरुवारीही सुरुच होते, शुक्रवारी (८ जून) सकाळपर्यंत लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. तिन्ही जिल्ह्यातील तब्बल ३८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

जून महिन्याच्या प्रारंभीपासून औरंगाबाद वगळता इतर सातही जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी झालेल्या पावसाने गुरुवारीही हजेरी कायम ठेवत लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्याला धुवून काढले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, तामसा, बिलोली, लोहगाव व धर्माबाद, लातूर जिल्ह्यातील औसा, लामजना, किल्लारी, मातोळा, भादा, किनीथोट, बेलकुंड, मोघा, हेर, दवर्जन, वाढवण बु., नागलगाव, शेळगाव, निलंगा, अंबुलगाव, मदनसुरी, कासारबा, लकंदा, निटूर, पानचिंचोली, बोरोळ, शिरुर अनंतपाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी, तुळजापूर, सावरगाव, नळदुर्ग, सालगरा, उमरगा, मुरुम, नागरवाडी, मुळज, डाळीव, लोहारा व जेवळी महसूली मंडळामध्ये ‌अतिवृष्टी झाली. मराठवााड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणीही सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात ५.५५ मिलिमीटर, हिंगोली १२.१४, नांदेड २५.१०, बीड १.८४ , लातूर ५५.५१ तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ३७.८८ मिलिमीटर पाऊस झाला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याांमध्ये किरकोळ पाऊस झाला.

उमरगा तालुक्यात २८.४ टक्के पाऊस

मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसातच उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत तब्बल २८.४ टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनचे आणखी चार महिने शिल्लक असल्याने पावसाचा असाच वेग राहिला तर उमरगा तालुका लवकरच सरासरी ओलांडण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी कोरडे

आठवड्याभरात एकीकडे निम्म्या मराठवाड्याला पावसाने धुवून काढले असताना औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यात मात्र अत्यंत किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांमध्ये परभणी जिल्ह्यात केवळ १० मिलिमीटर, औरंगाबाद जिल्ह्यात ३ मिलिमीटर असा किरकोळ पाऊस झाला. जालना जिल्ह्यात मात्र दोन्ही दिवस पाऊस झाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजाची तस्करी; दोन महिलांना अटक, कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गांजा तस्करीप्रकरणी दोन महिलांना अटक करून शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना सोमवारपर्यंत (११ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. चौधरी यांनी दिले.

कारमधून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती अजिंठा पोलिस ठाण्याच्या पथकास मिळाली होती. त्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक के. डी. आहेर यांच्या पथकाने गोळेगाव-अन्वा रस्त्यावर सापळा रचून कार (एम. एच. ०१ एम. ए. ६४२३) अडवली. त्या कारमध्ये गांजा आढळून आला व कारमधील कल्याण कैâलास सपकाळ (वय ३५, रा. जळगाव सपकाळ, ता. भोकरदन. जि. जालना), फिरोजखान वाहेदखान पठाण (वय ४३, रा. पिंपळगाव रेणुकाई, ता. भोकरदन) व विजय प्रल्हाद बोर्डे (वय ३५, रा. पिंपळगाव रेणुकाई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ३३ हजार ३०० रुपये किंमतीचा सहा किलो ६६० ग्राम गांजा तसेच कार जप्त करण्यात आली. सध्या तिघे आरोपी पोलिस कोठडीत असून कोठडीदरम्यान त्यांनी दोन महिला साथीदारांची नावे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सुधा उर्फ शाहेदा सुब्रमण्यम (वय ४०, रा. तामीळनाडू, ह. मु. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) व शबाना अख्तर पठाण (वय ४०, रा. फत्तेपूर ता. जामनेर, जि. जळगाव) यांना अटक केली. दोघींची चौकशी करणे बाकी असून, आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सहायक सरकारी वकील राजू पहाडीया यांनी कोर्टात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील १४ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढत तिच्या लहान भावाला मारहाण करणारा रिक्षाचालक सागर मंगलदास उबाळे याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ठोठावली.

शहरातील मुलगी १० फेब्रुवारी २०१० रोजी दुपारी आपल्या दोन लहान भावांसोबत पायी शाळेत जात असताना रिक्षाचालक आरोपी सागर उबाळे याने तिचा रिक्षातून पाठलाग केला. त्या मुलीला रिक्षात बसण्याचा आग्रह केला असता मुलीने नकार दिला. नकार दिल्यामुळे आरोपी सागरने मुलीच्या भावास मारहाण केली. मारहाण केल्यामुळे तिघे घरी परत गेले आणि घडला प्रकार आईला सांगितला. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भादंवि ३५४ (ड), ३२३, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या ११ (१) व १२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपीला भादंवि ३५४ कलमान्वये एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, भादंवि ३२३ कलमान्वये सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दंडातील पाच हजार रुपये नुकसान भरपाईपोटी पीडित मुलीला देण्याचे आदेश कोर्टाने दिले.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूळ गुणपत्रिका देण्याचे वेळापत्रक हुकले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या मूळ गुणपत्रिका देण्याचे वेळापत्रक लांबण्याची शक्यता आहे. शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, मूळ गुणपत्रिकांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. सात दिवसांत गुणपत्रिका देऊ, असे सांगणाऱ्या मंडळाचे गुणपत्रिकेचे वेळापत्रक हुकले आहे.

मंडळाने १ ते २४ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. निकाल दुपारपासून विद्यार्थ्यांना पहायला मिळाला. निकाल लागल्याने पुढच्या प्रवेशासाठी पालकांची लगबग सुरू होते, परंतु खरी प्रक्रिया सुरू होते मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडल्यानंतर, परंतु यंदा मूळ गुणपत्रिका केव्हा मिळणार हे मंडळाने निकालासोबत जाहीरच केले नाही. ऑनलाइन निकाल जाहीर होतो त्याचवेळी गुणपत्रिका केव्हा वाटप करणार याची तारीख मंडळ जाहीर करते. ऑनलाइन निकालानंतर सात दिवसात मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणे अपेक्षित असते, परंतु हे वेळापत्रक पुरते बिघडले आहे. यंदा बारावीचा निकाल ३० मे रोजी जाहीर झाला. त्याच्या गुणपत्रिका १२ जूनला मिळतील. दहावीच्या गुणपत्रिका केव्हा मिळतील याचे स्वतंत्र वेळापत्रक कळविण्यात येणार आहे. मंडळाने आज निकालासोबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख व कलचाचणीचा कल अहवाल यांचे वाटपाची तारीख स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. ऑनलाइन निकाल प्रक्रियेनंतर एवढ्या वर्षात पहिल्यांदा मंडळाला मूळ गुणपत्रिकांची तारीख जाहीर करता आलेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रयोगांमुळे लांबली प्रक्रिया

ऑनलाइन निकालाच्या प्रक्रियेत गुणपत्रिका त्याच दिवशी देण्याची मागणी अनेकदा पुढे आली. त्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले, परंतु आता सात दिवसांचा कालावधीही लांबत चाललेला आहे. 'एटीकेटी', 'कौशल्य विकासास पात्र' असे दहावी प्रक्रियेत होत असलेले वांरवार बदल, त्याचे परिणाम अशाप्रकारे समोर येत असल्याचे बोलले जाते. दहावीच्या गुणपत्रिकेसह कलचाचणीचे अहवालही यंदा कधी मिळणार याचे वेळापत्रक नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेजल पाटील शंभर टक्के गुणांसह अनंत भालेराव शाळेतून प्रथम

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

तेजल पाटील ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून अनंत भालेराव विद्या मंदिर या शाळेतून सर्व प्रथम आली आहे. दहावीच्या परीक्षेत या शाळेतील ७९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. त्यापैकी ४१ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा जास्त गुण घेवून, तर तेरा विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. व्दितीय श्रेणीत एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. या यशाबद्दल स्नेहमयी महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला बोराडे, सचिव बकुल देशपांडे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका श्रुती कुलकर्णी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराष्ट्र पब्लिक स्कूल (महेशनगर) - दहावी गुणवंत

0
0

महाराष्ट्र पब्लिक स्कूल (महेशनगर)

---

१ भक्ती पांडव (९९.२०)

२ कीर्तीका झनझन (९८.४०)

३ श्रेया कुलकर्णी (९८.२०)

४ तेजल पाथ्रीकर (९७.२०)

५ तनया सोनकुल (९७)

६ वैष्णवी पाचरंडे (९५.८०)

७ नंदिनी पाटील (९६.८०)

८ ओम निकम (९६)

९ आदिती पाटील (९६)

१० विराग बोरुंडिया (९६)

११ आकांक्षा देशमुख (९५.८०)

१२ अभिजित तोष्णीवाल (९५.८०)

१३ विनीत बोरुंडिया (९५.८०)

१४ वैष्णवी बंडापल्ले (९५.६)

१५ सेजल काला (९५.६०)

१६ सार्थक कुलकर्णी (९५.४)

१७ वैष्णवी नलावडे (९५.२०)

१८ वरद देशपांडे (९५.२०)

१९ कल्याणी देशमुख (९५)

२० ऋचा सोनवणे (९४.८०)

२१ प्रेरणा पाटील (९४.८०)

२२ अथर्व पाटील (९४.८०)

२३ किशोरी गायकवाड (९४.६०)

२४ लावण्यश्री खैरनार (९४.६)

२५ शंतनू काळे (९४. ६)

२६ आदित्य पाटील (९४.२०)

२७ गौरी घुगे (९४.२०)

२८ अभिषेक पाटील (९४)

२९ अनुराग निकम (९३.८०)

३० वैष्णवी सोळशे (९३.८०)

३१ प्रथमेश देव (९३.६०)

३२ यश महाले (९३.६०)

३३ ऋषभ पोतरवार (९३.४०)

३४ प्रतीक ब्रह्मपूरकर (९३.४०)

३५ मधुरा हराळकर (९३.४०)

३६ पूनम बागला (९३.२०)

३७ साक्षी अब्बू (९३)

३८ ऋतुजा साळुंके (९२.८०)

३९ पार्थ कुलकर्णी (९२.८०)

४० माधव मुंदडा (९२.६)

४१ हर्षल शेवाळे (९२.६०)

४२ तन्मयी मगर (९४.२०)

४३ सायली जामकर (९२.२०)

४४ सुश्रृत सांगळे (९२.२०)

४५ सिद्धांत दांडगे (९१.४०)

४६ अंजली जाधव (९१.२०)

४७ गौरांगी मालुंजकर (९१.२०)

४८ चेतश्री जगताप (९१)

४९ वैष्णवी मिसाळ (९१)

५० विशाखा गावंडे (९१)

५१ पराग वाबळे (९०.४०)

५२ अमेय कुलकर्णी (९०.४०)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा चालकाच्या मुलाने मिळविले ९३.४० टक्के

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इकरा बॉईज सकुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या नुरूल्लाह आबेदूल्लाह यांने ९३.४० गुण घेत दहावी परिक्षेत यश मिळविले. त्याच्याशी संवाद साधला असता त्याने सांगितले की, त्याचे वडील मोहम्मद उबेदुल्लाह खान हे रिक्षा चालवितात. मागील काही वर्षे त्याने शालेय परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळविल्यानंतर रोशनगेट भागातील एका कोचिंग क्लासेसने त्याला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. शाळेतील शिक्षकांसह क्लासेसच्या शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे दहावी परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ शकलो.

नुरूल्लाह याला आयआयटीत जायचे आहे. यासाठी शहरातील एका कोचिंग क्लासेसने दहावीच्या निकालाआधी शिष्युवृत्ती परीक्षा ठेवली होती. त्यात तो चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. त्या क्लासेसच्या कॉलेजमध्येच त्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढवळे यांच्या अटकेचा निषेध

0
0

औरंगाबाद: भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान आघाडीचे राज्य समन्वय समिती सदस्य आंबेडकरी कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना बुधवारी अटक करण्यात आली. कोरेगाव भीमा येथे बहुजन समाजावरील जातीयवादी हल्ल्याचे सूत्रधार मनोहर (संभाजी) भिंडे आणि मिलिंद एकबोटे आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुलेआम भिडे गुरुजीचे समर्थन करताना दिसून आले आहेत. हिंदुत्त्वाच्या अजेंड्यासाठी काम करणाऱ्या भिडे-एकबोटे यांच्यावर नवपेशवाईचे भाजप सरकार कारवाई करणे शक्य नाही. म्हणून त्यांनी जातीअंतासाठी काम करणारे सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग यांना अटक केल्याचे सांगत भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियानाने निषेध नोंदवला. या कार्यकर्त्यांची तत्काळ सुटका करावी. अन्यथा, आक्रमक आंदोलन झाल्यास सरकार जबाबदार असेल, असे रवी गायकवाड, अॅड. रमेशभाई खंडागळे, प्रा. सुनील वाकेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदम मला आयुष्यातून उठवणार होते

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रामदास कदम यांनी मला आयुष्यातून उठवण्याची शपथ घेतली होती. लोकसभा निवडणुकीत मला पाडण्याचे त्यांनी ठरविले, पण मी विरोधकांबरोबर स्वकियांच्या विरोधात लढलो आणि जिंकून आलो,' असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते, तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात केला.

गिते म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत मी २१०० मतांनी निवडून आलो. माझेच लोक माझ्या पराभवासाठी टपले होते. राष्ट्रवादी काँग्रसचे सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील माझ्या विरोधात होतेच, पण त्यांच्या बरोबरच आमचे रामदास कदम देखील माझ्या विरोधात होते. तटकरे, पाटील आणि कदमांच्या विरोधात मी लढलो. लोकसभा निवडणुकीत मला पराभूत करण्याचा निर्धार कदम यांनी केला होता. मी त्यांच्या विरोधात लढलो आणि निवडून आलो. माझ्या सारखी स्थिती राज्यात अन्य कुणावरही येऊ नये. कदमांचा विषय आता संपला आहे. वाद निवडणुकीपुरते असावेत. मी जिंकल्यावर कदम दिलगिरी व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आले. कदमांना त्यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोलीतून आमदार करायचे होते. त्यामुळे ते माझ्याकडे आले होते. त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याची शपथ घेतली होती, पण मी योगेशला आमदार करण्याची शपथ घेतली. वाद, मतभेद शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये असू नयेत,' असा उल्लेख गिते यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामाच्या ताणामुळे बस चालकाचा मृत्यू?

0
0

हिंगोली

सलग दोन दिवस काम केल्यानंतर पुन्हा कामावर हजर होण्यासाठी प्रशासनाने दबाव आणल्यामुळे ४५ वर्षीय बस चालकाचा हिंगोली बस डेपोत आज दुपारी १ च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. भास्कर अवचार असे मृत्यू पावलेल्या चालकाचे नाव आहे.

या घटनेनंतर सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणी प्रशासनाने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

भास्कर अवचार हे गेल्या ११ वर्षांपासून हिंगोली आगारात चालक म्हणून काम करीत होते. बुधवारच्या साप्ताहिक सुटीनंतर ते कर्तव्यावर आले होते. गुरुवारी हिंगोली-रिसोड मार्गावर त्यांनी काम केले. त्या नंतर शुक्रवारी पुन्हा याच मार्गावर त्यांची ड्युटी लावण्यात आली. शुक्रवारी काम केल्या नंतर आज (शनिवारी) ते आगारात आले होते. या वेळी ड्युटी मॅनेजरने त्यांना पुन्हा याच मार्गावर आज काम करण्याची सूचना केली. मात्र, आपली तब्येत ठीक नसल्याचे सांगत आपल्याला सुटी देण्यात यावी अशी विनंती अवचार यांनी विनंती केली. काही वेळानंतर त्यांना छातीत दुखू लागले. यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या नंतर आगारातील संतप्त कर्मचार्यांनी सर्व गाड्या डेपोत उभ्या करून जो पर्यंत अवचार यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आगार प्रमुखांनी आरोप फेटाळला

दरम्यान आगार प्रमुख बाळासाहेब झरीकर यांनी या बाबतचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अवचार यांना सलग ३ दिवस सुटी हवी होती, म्हणून त्यांनी शुक्रवारी स्वतः हून कामावर येण्याचा निर्णय घेतला असे झरीकर यांनी सांगितले. अवचारांना शनिवारी कुठलेही काम सांगण्यात आले नसल्याचेही झरीकर म्हणाले. अवचारे यांच्यासंदर्भात कर्मचारी संघटनांचे सर्व आरोप चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images