Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कृषीमंत्र्याची बैठक उधळण्यापूर्वी कार्यकर्ते ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांची बैठक उधळण्याचा इशारा देणारे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांना शिल्लेगाव पोलिसांनी कायकर्त्यासह ताब्यात घेतले. रविवारी सकाळी हा प्रकार घडला. सायंकाळी उशिरा या सर्वांची सुटका करण्यात आली.

जोपर्यंत बोगस बी टी कापूस बियाणे पुरविण्याऱ्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पाऊल ठेऊ देणार नाही, त्यांची कोणतीही बैठक, सभा होऊ देणार नाही, असा इशारा संतोष जाधव यांनी दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचा औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा होता. विभागीय आयुक्त कार्यालयात खरिप हंगाम आढावा बैठकीसोबतच मराठवाडा विभागातील कर्ज, बोंड अळी नुकसान भरपाई याचा आढावा घेण्यासाठी खोत औरंगाबादला आले होते. या बैठकीपूर्वीच सिल्लेगाव पोलिसांनी संतोष जाधव यांना घरातून ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. यावेळी त्यांच्या सोबत भागीनाथ जाधव, विजय वाघ, योगेश पोपळघट, कडू जाधव, अनिल तिवाडे, पवन पवार, अनिल फाळके, बाबासाहेब औताडे, अणासाहेब जाधव, शिवम जाधव, रोईदास वाघ, सदाशिव नरोडे, शेषराव तिवाडे, शरद पवार, अण्णा चव्हाण, युसूफ पटेल, सोमनाथ गवळी, कडू जगताप, अशोक फाळके, काशीनाथ नरोडे, जालिंदर केरे, पोपट चव्हाण आदींचा समावेश होता. सायंकाळपर्यंत या सर्वांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल चोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील विविध ठिकाणावरून मोबाइल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. थत्ते हौदापासून रविवारी मोबाइल लंपास केल्यानंतर अवघ्या दोन तासांत शोध घेऊन तिघांना शहागंजमध्ये अटक करण्यात आली. हे संशयित आठ वर्षांच्या मुलाच्या मदतीने चोरी करत होते. ते गुजरात, पश्चिम बंगाल व झारखंडचे आरोपी आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे दहा मोबाइल जप्त करण्यात आले.

थत्ते हौदाजवळील भाजीच्या दुकानासमोरून रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सर्फराज सिराज मोहियोद्दीन सिद्दीकी (वय २९, रा. कैसर कॉलनी) याचा मोबाइल चोरीस गेला. त्यांनी तत्काळ बेगमपुरा पोलिस ठाण्यात याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी चोरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले. शहागंज भाजीमंडई परिसरात शोध घेताना तीन संशयित आढळले. पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले पण, त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले. चंदनकुमार उमेश महाथो (वय २८ रा. सुरत, गुजरात), रवीकुमार महावीर शर्मा (वय २१ रा. महाराजपूर, जि. साहेबगंज, झारखंड) व सुनीलकुमार प्यारे पासवान (वय २१ रा. आसनचोल जि. वर्दवान, पश्चिम बंगाल), अशी त्यांची नावे आहेत. या तिघांसोबतच आठ वर्षांच्या एका मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता सर्फराज यांच्या मोबाइलसह इतर नऊ मोबाइल सापडले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल रोडे, सय्यद शकील अहेमद, नामदेव सानप, अविनाश जाधव, श्रीकांत सपकाळ आदींनी केली.

\Bमोबाइल चोरीची पद्धत \B

ही टोळी मोबाइल चोरण्यासाठी आठ वर्षांच्या मुलाची मदत घेत होती. दुकानासमोर उभे राहून खरेदी करणारे त्यांचे लक्ष्य होते. या ग्राहकांच्या मागे व पुढे दोन आरोपी पिशव्या घेऊन खरेदी करत असल्याचे भासवत उभे राहत होते. एक जण दुकानदारासोबत दराबद्दल चर्चा करीत असे. संधी साधून आठ वर्षांचा मुलगा ग्राहकाच्या खिशातून मोबाइल काढून पळून जात होता. त्यानंतर खरेदी न करता ही टोळी तेथून निघून जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी ११-६

$
0
0

- कृषी शास्त्रज्ञ दादासाहेब खोब्रागडे आदरांजली कार्यक्रम.

स्थळ : स. भु. शिक्षण संस्था सभागृह, औरंगपुरा

वेळ : सायंकाळी ५.३०

- गणेश सभेतर्फे डॉ. श्रीकृष्ण सिन्नरकर महाराजांचे कीर्तन.

स्थळ : वरद गणेश मंदिर सभागृह, समर्थनगर

वेळ : सायंकाळी ६.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवारी तयार करणाऱ्यास अटक

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील जोगेश्वरी येथे राहत्या घरात बेकायदा तलवारी व धारदार शस्रे तयार करणाऱ्या व्यक्तीला घरावर छापा टाकून अटक करण्यात आली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी त्याच्या घरातून चार तलवारी, एक ढाल व शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव शेख इरफान शेख युसुफ (वय २८, रा़ जोगेश्वरी झोपडपट्टी, ता़ गंगापूर), असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. तो लोखंडी पट्ट्यांपासुन घरातच तलवारी, धारदार शस्रे ग्रॅन्डरच्या साह्याने तयार करत होता़ भरवस्तीत सुरू असलेल्या या कारखान्यातून कोणी शस्रे खरेदी केली, तो किती दिवसांपासून तलावारी करत होता, आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, हेडकॉन्स्टेबल विजय होनवडजकर, पोलिस नाईक शैलेंद्र अडीयाल, बाळासाहेब आंधळे, देविदास इंदोरे, बाबासाहेब काकडे, विशेष पोलिस अधिकारी अंबादास प्रधान यांच्या पथकाने केली आहे़ याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात इरफान शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे हे करत आहेत़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवगिरी एक्स्प्रेसला तब्बल नऊ तासांचा उशिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

इगतपुरी येथे हावडा एक्स्प्रम्ला अपघात झाल्यामुळे मुंबईहून औरंगाबादमार्गे सिकंदराबादकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस तब्बल नऊ तास १२ मिनिटे उशिरा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आली.

देवगिरी एक्स्प्रेस ही रेल्वे मुंबईहून शनिवारी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी निघाली. इगतपुरी येथे झालेल्या अपघातामुळे देवगिरी एक्स्प्रेसला कसारा घाट ते इगतपुरीदरम्यान पाच ते नऊ तास थांबविण्यात आले.

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास पोचणारी देवगिरी एक्स्प्रेस तब्बल नऊ तास १२ मिनिटाने औरंगाबादला पोहोचली. देवगिरी एक्स्प्रेस शिवाय मुंबईहून औरंगाबादमार्गे नांदेडला येणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसवरही परिणाम झाला. ही रेल्वे दोन ते तीन तासाच्या उशिरा औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर पोचल्याची माहिती रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिली.

जनशताब्दी थांबली नाशिकला

हावडा एक्स्प्रेसच्या अपघातामुळे रविवारी सकाळी जालना ते दादर जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादहून वेळेवर निघाली. नाशिक रेल्वे स्टेशनवर ही रेल्वे थांबविण्यात आली. हावडा एक्स्प्रेसच्या अपघातामुळे रेल्वे वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे तब्बल दोन तास ही रेल्वे नाशिकरोड येथे थांबविण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रभारीं’चा फैसला उद्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद निवडणुकीत 'प्रभारी' अधिकाऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार वादात आहे. या निवडणुकीत 'प्रभारी' राजकीय चमत्कार घडवण्याची शक्यता असल्याने त्यांचा मतदानाचा अधिकार वगळण्याच्या मागणीवर उत्कर्ष पॅनल ठाम आहे. दुसरीकडे विद्यापीठ विकास मंच व उत्कर्ष पॅनल यांच्या कात्रीत अडकलेल्या विद्यापीठ प्रशासनाने अंतिम निर्णय घेतलेला नाही. तर 'उत्कर्ष'च्या याचिकेवर हायकोर्टात मंगळवारी (१२ जून) सुनावणी होणार आहे.

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची निवडणूक वादग्रस्त ठरली आहे. बारा प्रभारी अधिकाऱ्यांचा मतदानाचा अधिकार वादाचे कारण ठरला आहे. या निर्णयाच्या विरोधात उत्कर्ष पॅनलने हायकोर्टात धाव घेतली आहे. निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंच यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. येत्या गुरुवारी (१५ जून) निवडणूक होणार आहे. एकूण आठ जागांपैकी चार जागांवर बिनविरोध उमेदवार निवडण्यात आले. यात तीन उमेदवार उत्कर्ष पॅनलचे आहेत, तर प्राचार्य (ओबीसी) जागा विद्यापीठ विकास मंचने ताब्यात घेतली. प्राचार्य (सर्वसाधारण) प्रवर्गात 'उत्कर्ष'चे डॉ. जयसिंग देशमुख आणि मंचचे डॉ. सुभाष टकले यांच्यात लढत होईल. पदवीधर (सर्वसाधारण) प्रवर्गात प्रा. संभाजी भोसले आणि डॉ. नरेंद्र काळे या दोन्ही 'उत्कर्ष'च्या उमेदवारांचा समावेश आहे. ज्येष्ठतेनुसार निवड करण्याच्या भूमिकेवर भोसले ठाम आहेत, तर काळे यांनीही उमेदवारीवर दावा ठेवला आहे. या दोघात सामंजस्याने मार्ग काढण्याची शक्यता आहे. संस्थाचालक गटात 'उत्कर्ष'चे कपिल आकात, भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर यांच्यात लढत होईल. अध्यापक गटात 'उत्कर्ष'चे डॉ. राजाभाऊ करपे व विकास मंचचे डॉ. गोविंद काळे यांच्यात लढत होणार आहे. अधिसभा निवडणुकीत वर्चस्व मिळवलेल्या उत्कर्ष गटाने व्यवस्थापन परिषद निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीत प्रभारी अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे उत्कर्षने थेट विरोधाची भूमिका घेतली आहे. राज्यातील इतर विद्यापीठानी प्रभारींना मतदानाचा अधिकार दिला नसताना याच विद्यापीठात अधिकार देण्याचे कारण काय असा सवाल करीत कुलगुरुंना कोंडीत पकडले आहे. या वादाचे पडसाद विधीमंडळ अनुसूचित जाती-जमाती समितीसमोरही उमटले. सध्या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी सुरू असल्यामुळे त्यांच्यावर दोन्ही गटांचा दबाव वाढला आहे. या स्थितीत प्रभारी मतदानाबाबत चोपडे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उत्कर्ष पॅनलने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी (१२ जून) सुनावणी होणार आहे. विद्यापीठ कायद्यानुसार प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार देता येत नसल्याचा दावा 'उत्कर्ष'ने केला आहे

\Bअॅकॅडमिक कौन्सिलवर नियुक्त्या\B

विद्यापीठाच्या अॅकॅडमिक कौन्सिलवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दहा प्राचार्यांची नियुक्ती केली आहे. यात डॉ. जगदिश खैरनार, डॉ. शिवाजीराव थोरे, डॉ. वसंत सानप, डॉ. नागा वेंकटराव, डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ. एस. एस. मुळे, डॉ. प्रवीण वक्ते आणि डॉ. एस. जी. गुप्ता यांचा समावेश आहे. विद्यापीठ प्रशासनाने नुकतीच ही नावे जाहीर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-१०जून

$
0
0

\Bटीव्ही सेंटर

सिग्नल झाले सुरू

\Bअनेक महिन्यांपासून या २४ तास गजबजलेल्या चौकातील सिग्नल्स बंद होते. यासंदर्भात 'मटा सिटिझन रिपोर्टर'मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती. शनिवारी हे सिग्नल्स सुरू झालेले दिसत आहेत. महाराष्ट्र टाइम्स व महापालिकेचे आभार.

- शरद लासूरकर, सिडको, औरंगाबाद

\Bसावंगी

मुलांची शोधाशोध\B

सावंगी परिसर येथे खडी केंद्रावर मुलांचे सर्वेक्षण केले असता, अनेक बालकामगार आढळून आले. विविध सामजिक संघटक व शाळा प्रतिनिधी यांनी बालकामगार शाळेपासून वंचित राहू नये, म्हणून विकास संस्था व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प आंतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळवले आहे. बालकामगार दिसल्यास कंपनी मालकावर करवाई केल्या जाईल.

- निवृत्ती दाभाडे, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी पुन्हा धावली

$
0
0

फोटोंसह मेनलीड करणे

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

दोन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी केलेला संप अखेर परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर मिटला. आणि एसटीची चाके फिरली. त्यामुळे राज्यभरात लालपरीच्या भरवशावर असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दोन दिवसांनंतर रविवारी एसटी बस स्थानकांवर पुन्हा गर्दी झालेली दिसली. दोन दिवस मात्र प्रवाशांचे हाल झाले होते. संप मिटल्याने व प्रवाशांची संख्या वाढल्याने अनेक मार्गावर जादा बसची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून सुरू झालेल्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी शहरातील सिडको आणि सिबीएस बस स्थानकातून मात्र वाहतूक सुरूच होती. शनिवारी मात्र सिबीएस, सिडकोसह गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, सोयगाव आणि पैठण आगारही बंद होते. गेल्या दोन दिवसांत एसटीच्या गाड्या बंद असल्याने एसटी महामंडळाचा ऐंशी ते नव्वद लाखांपर्यंतचा महसूल बुडाला. करारामुळे नाराज झालेल्या एसटी कामगारांनी संप पुकारला होता. या संपामूळे शनिवारी प्रवाशांचे खूप हाल झाले. प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी परिवहन विभागाने खासगी गाड्यांची व्यवस्था केली होती. मात्र, ही व्यवस्थाही प्रवाशांसाठी कमी पडली. अनेक प्रवाशांनी खासगी गाड्यांमधून प्रवास करणे टाळले.

शनिवारी रात्री एसटी बसचा संप मिटल्याची घोषणा होताच एसटी बस पुन्हा वेगाने सुरू झाल्या. रविवारी सकाळी औरंगाबाद ते पुणे तसेच औरंगाबाद शहरातून अन्य गावांना जाणाऱ्यांची चांगलीच गर्दी बस स्थानकावर होती. या प्रवाशांसाठी जादा बसची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे कालपर्यंत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे एसटी चालक आणि वाहकांनी या प्रवाशांसाठी जादा बस वाहतूक करून प्रवाशांना सुखकर प्रवास देण्यासाठी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या पुलावरून कंटेनर कोसळला

$
0
0

  म. टा. प्रतिनिधी, पैठण

 औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर पैठण-पाचोड रस्त्यावरील पुलावरून रविवारी सकाळी कंटेनर कोसळला. अपघातानंतर कंटेनर पुलाच्या मुरुमात रुतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 आंध्र प्रदेशातून औरंगाबाद शहराकडे माल घेऊन जाणारा कंटेनर (एम एच २० बी टी ४१२५) रविवारी सकाळी नव्याने तयार करण्यात आलेल्या पुलावरून कोसळला. दोन तीन वेळा उलटून कंटेनर रस्त्याच्या बाजुला असलेल्या माती मुरूमाच्या भरावात जावून रुतला. त्यामुळेच जीवीतहानी झाली नाही. कटनेरचे मोठ्या प्रमाणातील संभाव्य नुकसानही टळले. हे निदर्शनास येताच तेथे आजूबाजूला उपस्थित असलेले स्थानिक शेतकरी व इतर नागरिकांनी मदत करत कंटेनरचालक व क्लिनरला सुखप बाहेर काढले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याला मिळाले आठ उपजिल्हाधिकारी

$
0
0

म. टा. प्रति‌निधी, औरंगाबाद

शासनाने काही दिवसांपूर्वी राज्यातील ४८ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली आहे. या उपजिल्हाधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश शासनाने शुक्रवारी काढले. यातील आठ उपजिल्हधिकाऱ्यांना मराठवाड्यात नियुक्‍ती मिळाली आहे.

औरंगाबाद विभागात एम. ए. किरवले (उपजिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी), आरती सरवदे (विशेष भूसंपादन अधिकारी, बीड), सुनील भुताळे (उपजिल्हाधिकारी, बीड), वैशाली लभांते (जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जालना) नितीन वाघमारे (उपजिल्हाधिकारी एमएमआरडीए, प्रपत्र पदोन्नती, मुंबई), सुकेशिनी कांबळे-पगारे (जिल्हा पुरवठा अधिकारी, परभणी), रामचंद्र चोबे (उपजिल्हाधिकारी रोहयो, उस्मानाबाद), तर पवन चांडक यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे.

मराठवाडा विभागात एकूण १०४ उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, तब्बल २३ पदे रिक्त आहेत. त्यात जालना, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रत्येकी तीन, हिंगोली व लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी दोन आणि परभणी, बीड जिल्ह्यांत प्रत्येकी पाच पदे रिक्त आहेत. शासनाच्या आदेशानंतर यातील सहा पदे भरली गेली असून, परभणी व बीड जिल्ह्यांला प्रत्येकी दोन, तर जालना व उस्मानाबादला प्रत्येकी एक उपजिल्हाधिकारी मिळाले आहेत. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक १५ उपजिल्हाधिकारी नागपूर विभागाल मिळाले असून, पुणे व औरंगाबाद विभागाला प्रत्येकी आठ, कोकणाला सहा, तर नाशिक व अमरावती विभागाला प्रत्येकी पाच अधिकारी मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसीपी कोळेकरांच्या हस्ते वृक्षारोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद

दंगलीमध्ये गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर नुकतेच बाँबे हॉस्पिटलमध्ये उपचार करून स्नेहनगर येथील घरी परतले. स्नेहनगर येथील रहिवाशांनी कोळेकर व रामेश्वर थोरात, जिल्हा सत्र न्यायधीश ए. आर. कुरेशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कोळेकर यांच्या प्रकृतीबाबत सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी सुनील कोळसे, राजपाल कांबळे, बाळाराम राजपूत, अमितकुमार बागुल, रमेश राऊत, अजय मोरे, केशव केळे, सुनील तेलुरे, संदीप ठुबे, निकम, सानप यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पावसाची दमदार सलामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुष्काळी मराठवाड्याला गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चिंब केले आहे. विभागात जोरदार बरसत असलेल्या पावसाने कोकणालाही मागे टाकले असून, यंदाच्या मोसमात कोकणात आठ दिवस तर औरंगाबाद विभागामध्ये सलग नऊ दिवस पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत मात्र अद्याप पावसाचे प्रमाण कमी आहे.

मराठवाड्यात सरासरी ७७९ मि‌लिमीटर पावसाच्या तुलनेत दहा जूनपर्यंत विभागात ४८.६२ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात आतापर्यंत विभागात ८८.६३ ‌मिलीमिटर पाऊस झाल्याची नोंद आहे. राज्यभरातील सहा महसुली विभागामध्ये सर्वाधिक पाऊस कोकण विभागात बरसतो, मात्र या वेळी औरंगाबाद विभागात पावसाने दमदार सलामी दिली आहे. कोकणात सलग आठ दिवस पावसाच्या तुलनेत मराठवाड्यात नऊ दिवस अत्यंत जोरदार पाऊस झाला. या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, निलंगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, नांदेड जिल्ह्यातील हदगाव, बिलोली या भागात पावसाने दमदार हजेरी लावली. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्याने जून महिन्यातच सरासरीच्या २८ टक्के पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात यंदा सुरुवातीपासूनच पुर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्‍ह्यांमधील बहुतांश मंडळांना पावसाने धुऊन काढले. पावसाच्या या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावला असून, बहुतांश ठिकाणी पेरण्या सुरू करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत एकूण १४ टक्के पाऊस झाला असून, यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात केवळ २.९, जालना ७.२, परभणी १०.७, हिंगोली १४, नांदेड १२.७, बीड ९.६, लातूर १६.६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात १४.८ टकके पाऊस झाला आहे. दरम्यान, नऊ जून रोजी झालेल्या पावसात रेणापूर तालुक्यातील (जि. लातूर) काळेवाडी येथे एका ४१ वर्षांचा नागरिक; तसेच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एक ३२ वर्षांचा व्यक्ती पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

\Bऔरंगाबाद जिल्हा मात्र कोरडा\B

एकीकडे संपूर्ण मराठवाड्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत असतना औरंगाबाद जिल्ह्यात मात्र किरकोळ पावसामुळे चिंतेचे ढग पसरले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात केवळ तीन दिवस पाऊस झाल्याची नोंद झाली आहे, गेल्यावर्षीही औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता.

राज्यात विभागनिहाय पावसाची सरासरी (दहा जूनपर्यंत)

विभाग.........पावसाची टक्केवारी.....पावसाचे दिवस

कोकण................१२.२................८

नाशिक................१८.७................३

पुणे....................२८.३.................८

औरंगाबाद...........४६.५.................९

अमरावती.............२६.८...............५

नागपूर................१९.६................७

एकूण..................२१.८...............८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगाव-भीमाच्या चौकशी आयोगास मुदतवाढ देण्याची मागणी

$
0
0

औरंगाबाद,

कोरेगाव भीमा प्रकरणात घडलेल्या घटनांमध्ये केवळ ३० दिवसांत संबंधितांकडून कागदपत्र पुरावे आयोगाकडे पाठवणे शक्य होणार नसल्यामुळे शपथपत्रांच्या स्वरुपातील निवेदने आणि कागदपत्रे स्वीकारण्याची मुदत आयोगाने एक महिना पुढे वाढवून द्यावी, अशी मागणी दलित अत्याचार विरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.

पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांचा भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनेमध्ये सहभाग असल्याचा एकही पुरावा नसताना चळवळीतील व त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली याचाही निषेध समितीने केला. अटक असलेले कार्यकर्ते सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, शोभा सेन, रॉनी विल्सन व इतरांची तत्काळ मुक्तता करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणाऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये अॅड. बी.एच. गायकवाड, कॉ. भीमराव बनसोडे, सुभेदार मेजर सुखदेव बन, बुद्धप्रिय कबीर, कॉ. सांडू जाधव, कबीरानंद गजहंस, प्रा. भारत सिरसाट, उदय रगडे, माधव बनकर, शेख खुर्रम, विनोद झारे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ हजार कपड्यांचे वाटप

$
0
0

औरंगाबाद :

रमजान इद निमित्त हारुण मुकाती फाऊंडेशनच्या वतीने २१ हजार जोडी कपड्यांचे वाटप सोमवारी (११ जून) करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम हारुण मुकाती फाऊंडेशन जिन्सी बायजीपुरा येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कपड्यांच्या वाटपाचा कार्यक्रम पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी-बारावीनंतर काय?; बुधवारी मार्गदर्शन कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी झपाटून आणि कठोर मेहनत घेत अभ्यास करुनही अनेकांना यश मिळत नाही. नेमके कुठे चुकते आणि काय चुकते, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शनासह अभ्यासाचा हिशेब कशा पद्धतीने ठेवता येऊ शकतो आणि त्याचा उपयोग व रुपांतर यशामध्ये व उत्तम करिअरमध्ये कसे करता येऊ शकते, या विषयी विद्यार्थ्यांना नेमकेपणाने मार्गदर्शन करण्याच्या हेतुने 'महाराष्ट्र टाइम्स', 'डीएफसी' व 'एमजीएम'च्या वतीने बुधवारी (१३ जून) 'दहावी -बारावीनंतर काय' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहाला एमजीएमच्या रुक्मिणी हॉलमध्ये होणार आहे.

बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार विविध क्षेत्रांत असलेल्या करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती व्हावी; तसेच बुद्धिमत्ता, अभिरुची, व्यक्तिमत्व अशा निकषांवर स्वतःला ओळखता यावे, करिअरचे योग्य क्षेत्र निवडता यावे, याबाबत व्यापक मार्गदर्शन करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम होत आहे. बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. बारावीनंतर काय करावे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असते. भविष्यातील संधी ओळखत, कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा या उपक्रमागचा हेतू आहे. 'डीएफसी'चे संचालक गोविंद काबरा हे या उपक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. 'इंजिनिअरिंग', 'हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट', 'आयटी', 'कम्प्युटर सायन्स', 'अॅनिमेशन' अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील संधी, कॉलेजांची माहिती, याबाबत मार्गदर्शन करण्यासह विद्यार्थी-पालकांशी संवाद साधण्यात येणार आहेत. यासंदर्भात काबरा म्हणाले, 'विद्यार्थी फार मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा देतात, परंतु फार कमी विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळते. निम्म्यापेक्षा जास्त मुले खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करतात. कठोर मेहनत घेतात आणि तरीही त्यांना यश मिळत नाही. काहीतरी नक्कीच चुकते. नेमके काय आणि कुठे चुकते, याचा विचार केल्याशिवाय खऱ्याअर्थाने यशस्वी होता येणार नाही आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना नेमकेपणाने मार्गदर्शन केले जाणार आहे. 'अभ्यासाचे अकाउंटिंग' म्हणजेच अभ्यासाचा हिशेब ठेवला जाऊ शकतो आणि उत्तम यशासाठी असा हिशेब ठेवला पाहिजे, या हेतूने विद्यार्थ्यांना टिप्स दिल्या जातील.'

मार्गदर्शनक : गोविंद काबरा, संचालक 'डीएफसी'

स्थळ : रुक्मिणी सभागृह, एमजीएम महाविद्यालय, सिडको

तारीख : १३ जून, बुधवार

वेळ : सायंकाळी सहा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.

लैंगिक छळाची तक्रार, दरोगा ढाकणे निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणी परिषदेतील महिला सफाई कामगाराने दरोगा मिलिंद ढाकणे यांच्याविरुद्ध दिलेल्या लैंगिक छळाच्या लेखी तक्रारीची उशिरा का होईना दखल घेऊन दरोगा ढाकणे यांना निलंबित करण्यात आले आहे. ढाकणेंविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती म्हणूनच संबंधित महिला कामगाराने जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यानंतर परिषदेच्या समितीची मॅरेथॉन बैठक होऊन तसेच दोघांचे जबाब नोंदवून ढाकणे यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.

''दरोगा ढाकणे हे दारू पिऊन मानहानी करणारे वर्तन करतात, लैंगिक संबंधांची मागणी करतात, लैंगिक शेरेबाजी करतात, मानसिक-शारीरिक-आर्थिक छळ करतात'' यासह विविध गंभीर आरोप सफाईकामगार महिलेने तिच्या लेखी तक्रारीमध्ये केले होते. ही लेखी तक्रार संबंधित महिलेने ४ जून रोजी छावणी परिषदेकडे केली. मात्र कारवाई होण्याची कोणतीही चिन्हे दिसून न आल्याने संबंधित महिने जिल्हाधिकारी यांच्याकडेही लेखी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हास्तरीय स्थानिक तक्रार समितीने बुधवारी (६ जून) छावणी परिषदेच्या कार्यालयात जाऊन प्राथमिक माहिती घेतली होती. दरम्यान, छावणी परिषदेच्या समितीची बुधवारी बैठक झाली व गुरुवारी दुपारपासून रात्री नऊपर्यंत ढाकणे व तक्रारदार महिलेचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. त्यानंतर ढाकणे यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला.

.....

दरोगा मिलिंद ढाकणे यांना निलंबित करण्यात आले आहे. अंतर्गत समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. पुढील कारवाई संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर होईल.

- विजयकुमार नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी घाटीत आल्या खाटा अन् साहित्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुप्रतिक्षित व बहुचर्चित मिनी घाटी अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दोनशेपेक्षा जास्त खाटा व साईड लॉकर, गाद्या-बेडशीटचा व इतर साहित्य व काही उपकरणे दाखल झाली आहेत. काही प्रमाणात लेबर रुमचे कामही पूर्ण झाले असून, रुग्णालयाच्या कामाला काही प्रमाणात गती मिळाली आहे. औषधे ठेवण्यासाठीही वातानुकूलित व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र ही कामे पूर्ण होणार तरी कधी आणि उद्घाटन होऊन रुग्णालय रुग्णसेवेत दाखल होणार तरी कधी, असा सवाल कायम आहे.

......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीड विधानपरिषद: मतमोजणीचे हायकोर्टाचे आदेश

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

विधानपरिषदेच्या लातूर-उस्मानाबाद-बीड मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी तात्काळ करून निकाल घोषित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाला दिले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेच्या १० सदस्यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरवले होते. नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याचा ठपका ठेवत एकतर्फी कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. त्यानंतर खंडपीठानं अपात्र ठरविलेल्या नगरसेवकांना निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी दिली होती. त्यांच्या मतांची मोजणी करावी; परंतु त्यांच्या मतांचा परिणाम निवडणुकीवर होत असेल, तर निकाल जाहीर करण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाच्या अंतरिम निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज निवडणूक मतमोजणी तात्काळ करून निकाल जाहीर करण्याचे आदेश आज सकाळी निवडणूक आयोगाला दिले आहेत. खंडपीठाचे आदेश थोड्याच वेळात जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना मिळतील. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे सुरेश धस आणि अपक्ष अशोक जगदाळे यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत विजयी होणार असल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केला आहे. आज संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपोस्ट पीटस् च्या बांधकामाचे पेमेंट आयुक्तांनी थांबवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंपोस्ट पीटस् च्या बांधकामाचे पेमेंट महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी थाबवले आहे. पेमेंट थांबविण्याचे आदेश आपण शहर अभियंत्यांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

कचराकोंडी फोडण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागात कंपोस्ट पीट बांधले. 'मटा' ने या पीटस् चा आढावा घेतला असता, बहुतेक पीटस् चे बांधकाम सुमार दर्जाचे असल्याचे लक्षात आले. या संदर्भात वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. वृत्ताच्या आधारे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे महापौरांनी कंपोस्ट पीटस् च्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले.

सोमवारी महापौर व आयुक्त यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी आयुक्तांना कंपोस्ट पीटस् च्या बांधकामाच्या चौकशीबद्दल विचारले असता ते म्हणाले, कंपोस्ट पीट्स च्या सर्व साईटस् तपासण्यात आल्या आहेत. अपेक्षेनुसार बांधकाम झाले नसेल तर कंत्राटदाराला पेमेंट केले जाणार नाही. कंत्राटदाराचे पेमेंट थांबवा असे आदेश आजच शहर अभियंत्यांना दिले आहेत. पीटस् च्या बांधकामाची चौकशी केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images