Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वारसास्थळे, क्रीडा, शाळा, आरोग्यासाठी तरतूद करा आयुक्तांचे महापौरांना पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील वारसास्थळे, क्रीडा, आरोग्य आणि शाळांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिले. या सर्व क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी १३३ कोटींची तरतूद करण्याची मागणी केली. आयुक्तांनी महापौरांना अशा प्रकारचे पत्र देण्याची ही पहिलीच घटना आहे.

महापौरांना दिलेल्या पत्रात डॉ. विनायक यांनी म्हटले आहे की, 'औरंगाबाद हे शहर ऐतिहासिक शहर आहे. शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी अर्थसंकल्पात ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. शहरातील उद्यानांचा विकास आणि क्रीडा क्षेत्रात विविध दर्जेदार खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा वाव आहे. महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये एका वर्षात किमान दोन उद्याने विकसीत केली तर पुढील काही वर्षात शहरात वेगळेपण दिसून येईल. क्रीडांगणे तयार करणे देखील गरजेचे आहे. क्रीडाक्षेत्रासाठी २० कोटी रुपये तर उद्यानांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करा, अशी मागणीही आयुक्तांनी केली आहे.

शाळा आणि आरोग्य सुविधांसाठी दहा कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३ कोटी रुपयांची, पाणीपुरवठा योजनेत काही तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आयुक्तांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता या कामात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी करावयाच्या कामांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे, प्राणी कल्याण योजनेसाठी देखील दहा कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी आयुक्तांनी महापौरांकडे केली. महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्प मंजूर करताना आयुक्तांच्या सर्व मागण्या मान्य केल्या व अर्थसंकल्पातही त्यानुसार तरतूद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटिझन रिपोर्टर-औरंगाबाद

$
0
0

जळगाव रोड

-

व्हॉल्व्ह फुटल्याने पाणीगळती

-

हडको, एन-११ जळगाव रोडवरील समशान भूमीसमोर व्हॉल्व्हला लागलेल्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. हेच पाणी स्मशानभूमीमध्ये सुद्धा जात आहे. याकडे महापालिकेचे पदाधिकारी बघून दुर्लक्ष करत आहे, तरी व्हॉल्व्हची लवकरात लवकर दुरुस्ती करवी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

- अनिल राठोड, एन-११, औरंगाबाद

---

सिडको

-

माती रस्त्यावर पडून

-

हे छायाचित्र आहे गरवारे मार्गावरील. विन्डसर कॅसल या हॉटेलजवळ अनेक दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. तेथे इमारत उभारण्यासाठी खोदण्यात आलेली माती, मुरून अनेक दिवसांपासून या शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेलाच हा साठविला आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात बाधा टाकणारा हा मुरूम त्वरित उचलावा, अशी जनतेची मागणी आहे.

- शरद लासूरकर, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंडे बंधू-भगिनींची प्रतिष्ठेची लढत ,बाजी कोण मारणार ?

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी ,औरंगाबाद

लातूर-उस्मानाबाद-बीडच्या विधानपरिषदेच्या जागेसाठीची मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होणार आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही मतमोजणी होत आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजता उस्मानाबाद तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली.

निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता .

मंगळवारी सकाळी ८ वाजता उस्मानाबाद तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली. लातूर-उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी तात्काळ घेऊन ,निकाल जाहीर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी सोमवारी सकाळी निवडणूक आयोगाला दिले होते . लातूर -उस्मानाबाद-बीड स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी बीड नगरपालिकेच्या १० सदस्यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अपात्र ठरविले होते.नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकल्याचा ठपका ठेवत एकतर्फी कारवाईस मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते . राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिले. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल आज सकाळी दोन तासांत लागणार आहे.

या निवडणुकीत १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता .
बीड -३६१मतदार ३६० मतदान
उस्मानाबाद -२९१
लातूर -३५३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लातूर-बीडमधून भाजपचे धस विजयी

$
0
0

बीड:

अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या लातूर-उस्मानाबाद-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. पुरेसे संख्याबळ असूनही या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा पराभव झाला असून भाजपचे उमेदवार माजी मंत्री सुरेश धस विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या प्रतिष्ठेच्या लढाईत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना मात दिली असून या विजयामुळे पंकजा यांचं भाजपमधील महत्त्व वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी धस यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याने अशोक जगदाळे पराभूत होणार असल्याची चिन्हे दिसत होती. अपेक्षेप्रमाणे झालेही तसेच. धस यांनी ७६ मतांचं मताधिक्य मिळवत जगदाळे यांचा पराभव केला. धस यांना ५२६ तर जगदाळे यांना ४५१ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मिळून एकूण मते ५२७ होती. भाजपपेक्षा दोन्ही काँग्रेसकडे १३ मते जास्त असतानाही धस यांनी राष्ट्रवादीच्या उमदेवाराला पराभूत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, तब्बल १८ दिवसानंतर ही मतमोजणी झाली. यावेळी सांकेतिक आकडे लिहिलेले असल्याने २५ मते बाद ठरवण्यात आले. त्यामुळे काही वेळ मतमोजणी थांबली होती. निवडणूक निर्णय अधिकारी व उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मध्यस्थी केल्यावर सुरेश धस आणि अशोक जगदाळे यांच्यातील वाद मिटला. जगदाळे यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

ही निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली होती. त्यामुळे ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा लागला होता. 'हा मतदारसंघ तीनवेळा काँग्रेसकडे होता. त्यावेळी आमचे फारसे संख्याबळही नव्हते. सध्या तिन्ही जिल्ह्यांत आमचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने या निवडणुकीत उतरलो. अत्यंत ताकदीने निवडणूक लढलो. संख्याबळ आमचे नव्हते तरी ही आम्ही विजय मिळविला आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली तरी आम्हाला चिंतेचे कारण नव्हते,' असे पंकजा मुंडे मुंडे म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-१२जून

$
0
0

मटा इम्पॅक्ट

नागेश्वरवाटी

खड्डा बुजविला

निरालाबाजार ते नागेश्वरवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे, एक खड्डा तर इतका खोल की दुचाकीस्वार आपटतोच. याबाबत 'मटा सिटिझन रिपोर्टर'मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच महापालिकेने तेथे दुरुस्ती केलेली दिसत आहे. याबद्दल 'मटा'चे व बातमीची दखल त्वरित घेतल्याबद्दल महापालिकेचे आभार.

- शरद लासूरकर औरंगाबाद.

हर्सूल टी पॉइंट

रस्त्यात असेलली डीपी धोकादायक

हडको काँर्नर चौकापासुन हर्सुल टी पाँईंट मार्गावर एका डिप्पीने अर्धा रस्ता व्यापलेला आहे प्रमुख राज्य मार्ग असल्यामुळे या मार्गावर २४ तास अवजड वाहनांची वर्दळ असते आता पावसाळा सुरु झाला आहे त्यामुळे डिप्पीचा अंदाज न आल्यास गंभीर अपघात घडु शकतो संबंधित विभागाने सदरिल डिप्पी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांद्वारे होत आहे.

- एक वाचक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदली प्रक्रियेला आव्हान

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषदेमधील बदली प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या शिक्षकांच्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. या याचिकेची सुनावणी १८ जून रोजी होणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद शिक्षक कृती समिती, औरंगाबादचे समन्वयक सदानंद माडेवार व इतर १७८ जणांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य शासन, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना प्रतिवादी केले आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या सहशिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यासंदर्भात २७ फेब्रुवारी २०१७च्या शासन निर्णयाद्वारे धोरण ठरविले आहे. त्यानुसार बदल्या होणे अपेक्षित असताना राज्य शासनाने व जिल्हा परिषदांनी वरील शासन निर्णयानुसार बदल्या केल्या नाहीत. शासन निर्णयानुसार बदल्या करण्याचे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, राज्य शासनाने 'एनआयसी' मार्फत 'ऑनलाइन' प्रक्रिया राबविली. त्यांनी शासन निर्णयानुसार बदल्या केल्या नाहीत. त्यामुळे औरंगाबाद व राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये शासन निर्णयानुसार बदल्या झाल्या नाहीत. शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ आणि भाग-२ निर्माण केले आहेत. दोन्ही संवर्गांना बदलीमध्ये प्राधान्य दिले आहे. हा प्राधान्यक्रम सुद्धा पाळला नाही. भाग-१ मधील शिक्षकांनी दाखल केलेले वैद्यकीय, अपंग, विधवा आदी प्रमाणपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे संबंधित त्या संवर्गातील आहेत किंवा नाहीत याची खातरजमा झाली नाही. असे याचिकेत म्हटले आहे. याचिकाकर्त्यांची बाजू सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मांडली. त्यांना संभाजी मुंढे यांनी सहकार्य केले.

\Bबदली प्रक्रिया रद्द करा

\Bपती-पत्नी एकत्रिकरणामध्ये दोघेही जिल्हा परिषदेमध्ये सेवेत असतील तरच त्यांची बदली केली जाते. परंतु दोघांपैकी एक खासगी सेवेत असेल तर बदली केली जात नाही. अशा प्रकरणात दोघांपैकी एकाला 'विस्थापित' घोषित करणे आवश्यक होते, तसे केले नाही. बदलीस पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे आवश्यक असताना तसे केले नाही. शिक्षकांकडून जिल्ह्यातील २० शाळांचा पसंतीक्रम घेणे आवश्यक असताना तसे केले नाही. शासन निर्णयानुसार टप्पा क्रमांक १,२,३,४ व ५ नुसार बदल्या करणे आवश्यक असताना तसे केले नाही. बदली प्रक्रिया शासन निर्णयाच्या विरोधात केल्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द करून नव्याने शासन निर्णयानुसार बदली प्रक्रिया राबवावी, अशी विनंती याचिकेत केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी-बारावीनंतर काय, आज मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी झपाटून आणि कठोर मेहनत घेत अभ्यास करुनही अनेकांना यश मिळत नाही. नेमके कुठे चुकते आणि काय चुकते, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शनासह अभ्यासाचा हिशेब कशा पद्धतीने ठेवता येऊ शकतो आणि त्याचा उपयोग व रुपांतर यशामध्ये व उत्तम करिअरमध्ये कसे करता येऊ शकते, या विषयी विद्यार्थ्यांना नेमकेपणाने मार्गदर्शन करण्याच्या हेतुने 'महाराष्ट्र टाइम्स', 'डीएफसी' व 'एमजीएम'च्या वतीने बुधवारी (१३ जून) 'दहावी -बारावीनंतर काय' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहाला एमजीएमच्या रुक्मिणी हॉलमध्ये होणार आहे.

बारावीनंतर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या क्षमतेनुसार विविध क्षेत्रांत असलेल्या करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती व्हावी; तसेच बुद्धिमत्ता, अभिरुची, व्यक्तिमत्व अशा निकषांवर स्वतःला ओळखता यावे, करिअरचे योग्य क्षेत्र निवडता यावे, याबाबत व्यापक मार्गदर्शन करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम होत आहे. बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. बारावीनंतर काय करावे, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असते. भविष्यातील संधी ओळखत, कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा या उपक्रमागचा हेतू आहे. 'डीएफसी'चे संचालक गोविंद काबरा, 'एमजीएम'चे लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे हे या उपक्रमात मार्गदर्शन करणार आहेत. 'इंजिनिअरिंग', 'हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट', 'आयटी', 'कम्प्युटर सायन्स', 'अॅनिमेशन' अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील संधी, कॉलेजांची माहिती, याबाबत मार्गदर्शन करण्यासह विद्यार्थी-पालकांशी संवाद साधण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहेगाव बंगला दुकान फोडी फोटो


झेडपी सदस्यांना आता विकास निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद सदस्यांना आपापल्या गटामध्ये विकास कामे करण्यासाठी पाच लाखांचा स्थानिक विकास निधी ठेवण्याचा ठराव मंगळवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला. जिल्हा परिषद उपकरातून ही तरतूद केली जाणार आहे. अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी प्रस्तावित निधीतून या हेडसाठी निधी वळविण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींसारखा स्वेच्छा निधी जिल्हा परिषद सदस्यांना मिळत नाही. किंबहुना तशी तरतूद नाही. जालना जिल्हा परिषदेत यावर तोडगा काढत स्थानिक विकास निधी ठरविण्यात आला. त्या धर्तीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेतही तरतूद करावी, असा मुद्दा मनसे सदस्य विजय चव्हाण यांनी मांडला.

मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे. बी. चव्हाण यांनी याबाबत सांगितले, की जिल्हा परिषद कायद्यात स्वेच्छा निधी ठेवण्याची तरतूद नाही, मात्र जालना जिल्हा परिषदेत सदस्यांनी एकत्रितपणे बसून स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून प्रत्येक गटासाठी ठराविक रक्कम ठरविली. संबंधित विषय समिती व सभापतींकडे जिल्हा परिषद सदस्याने पत्र देऊन कामे वाटपाची संमती घेतली जाते.

या धर्तीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेतही ठराव मंजूर करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्यास मधुकर वालतुरे व सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला.

यासंदर्भातील निर्णय अर्थ समिती सभापती विलास भुमरे यांच्यावर सोपविण्यात आला. भुमरे यांनी या प्रस्तावास संमती दर्शविली. अर्थसंकल्पात केलेल्या काही तरतुदींमधून उपकरातील रक्कम यासाठी वळवू, त्यास सर्वांची मान्यता आहे काय ? अशी विचारणा केली. त्यावर सर्व सदस्यांनी संमती दर्शविली. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या ६२ सदस्यांना स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

\B४७ कोटींचा उपकर

\Bजिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमीन महसूल उपकर, वाढीव उपकर, पाणीपट्टी, व्याजाच्या रकमा, मुद्रांक शुल्क अनुदानाच्या रुपातून रक्कम जमा होते. यंदा ही रक्कम ४७ कोटीपर्यंत जाते. त्यातून सिंचन, बांधकाम, महिला व व बालकल्याण विभागासह अन्य विभागांमध्ये विकास कामांसाठी उपकरातून निधीची तरतूद करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर आज झालेला निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंजाळला सशर्त जामीन सशर्त

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

राजाबाजार परिसरात पेंटचे दुकान व वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली अटक केलेला युवासेनेचा उपसचिव नगरसेवक राजेंद्र जंजाळ याचा नियमित जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव पाटील यांनी १५ हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर सशर्त मंजूर केला.

मोहमद शोहेब अब्दुल मुनाफ (२८, राजाबाजार) यांच्या तक्रारीवरुन राजेंद्र जंजाळच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात भादंवि १४७,१४८,१४९, ४३६,४३५,४२७ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला होता. १५ मे रोजी शिवाजीनगर येथील घरातून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला १८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. २१ मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या निर्णयास जंजाळ याने औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. जंजाळच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली असता खंडपीठाने १५ हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करत तपास अधिकाऱ्यास वेळोवेळी सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटी शर्तीचे उल्लंघन करू नये असे आदेशात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहव्यापारास भाग पाडले, दोघांचा जामीन फेटाळला

$
0
0

औरंगाबाद : छत्तीसगढहून कामासाठी शहरात आणलेल्या २० वर्षीय तरुणीला देहव्यापारास भाग पाडल्याप्रकरणी एका महिला आरोपाचा नियमित जामीन अर्ज, तर दुसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी फेटाळला.

या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, कामासाठी २० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीला बिलासपूरहून (छत्तीसगढ) शहरात आणले आणि देहव्यापारास भाग पाडले. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आल्याची तक्रार संबंधित तरुणीने केली होती. या प्रकरणी आरोपी व दलाल अनिता रमेश बनसोडे (रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद) हिला नऊ मार्च २०१८ रोजी अटक करून तिची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी अनिता हिने नियमित जामिनासाठी, तर फरार आरोपी आकाश सीताराम राऊत (रा. गारखेडा, औरंगाबाद) याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. दोघांच्या अर्जावरील सुनावणी होऊन कोर्टाने दोघांना अर्ज फेटाळला. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेज कौन्सिलमध्ये डॉ. येळीकर यांचा सत्कार

$
0
0

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॉलेज कौन्सिलमध्ये अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना अधिष्ठाता पदावरील सेवेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त डॉ. येळीकर यांचा मंगळवारी (१२ जून) छोटेखानी सत्कार करण्यात आला. डॉ. येळीकर यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळात नवनवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांपासून ते विविध सेवा-सुविधांपर्यंत झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव यानिमित्त प्राध्यापक वर्गाकडून करण्यात आला. या प्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच सहयोगी व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषधी वाटपातून वाढदिवस साजरा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घाटी रुग्णालयात मोफत औषधी वाटप, विभागीय रक्तपेढीत रक्तदान शिबिर, श्री बाबासाहेब एड्सग्रस्त बाल अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना अन्नदान व ब्लँकेट वाटप तसेच संत गाडगेबाबा धर्मशाळेत वृद्धांना चादर वाटप करुन सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ गरंडवाल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी संतोष जाटवे, संजय जाटवे, भरवान तरटे, अवधुत अंधारे, अजय दहिफळे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गायकेंची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील मणक्यांचे शल्यचिकित्सक डॉ. चंद्रशेखर विजय गायके यांची 'ए. ओ. स्पाईन असोसिएशन'मार्फत मणक्यांवरील शस्त्रक्रियांच्या उच्च शिक्षणासाठी (फेलोशिप) निवड झाली आहे. त्यासाठी डॉ. गायके हे १६ जून ते १४ जुलै २०१८ या काळात इंग्लंडला जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचा आवाज - नागरिकांना किमान पायाभूत सुविधा द्या !

$
0
0

औरंगाबाद : महापालिकेने ३८८ रुपये कोटी रुपयांनी फुगवलेला अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षीप्रमाणे नागरिकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने किमान पायाभूत सुविधा द्याव्यात अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

---

महापौर नंदकुमार घोडेले यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प तब्बल ३८८ कोटी ८० लाख रुपयांनी फुगवला आहे. तब्बल १८६४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. एवढे बजेट ऐकून औरंगाबादकरांना आश्चर्य वाटेल. मात्र, फुगवलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात येणे कठीण आहे. सध्या शहर पायाभूत सुविधांपासून वंचित असताना महानगरपालिका पोकळ आश्वासने देऊन बोळवण करीत आहे.

- संदीप यादव

महापालिकेच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी विशेष तरतूद करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, बाळासाहेब ठाकरे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाचे सुशोभिकरण, मोफत अंत्यसंस्कार योजना, कन्या सुरक्षा योजना मुदतठेव योजना अशी बरीच आश्वासने आहेत. या योजनांसाठी निधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

- आशुतोष पाटील

औरंगाबाद शहराची दुर्दशा होण्यास महापालिका प्रशासन जबाबदार आहे. कचरा आणि खड्डेमय रस्त्यांनी शहर भरून गेले आहे. तरीसुद्धा महापौर आणि आयुक्तांना चिंता वाटत नाही. बघता बघता तीन महिने उलटल्यानंतरही कचरा प्रश्न सुटला नाही. या समस्यांवरून लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी अर्थसंकल्प फुगवला गेला आहे. मात्र, अशी दिशाभूल नागरिकांसाठी नवीन नाही.

- राम झिंजुर्डे

जवळपास चारशे कोटी रुपये वाढवून फुगवलेला अर्थसंकल्प महापालिकेने मांडला. विकासकामांसाठी पुरेसा निधी देण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक, चांगले रस्ते, दररोज पाणीपुरवठा, नियमित स्वच्छता आणि सुरक्षितता यावर महापालिकेने भर द्यावा. अस्मितेच्या नावाखाली पुतळ्यांवर आणि इतर योजनांवर विनाकारण खर्च करू नये. हा अर्थसंकल्प सार्थ ठरावा.

- प्रा. संतोष तांदळे

फुगवलेला अर्थसंकल्प शहराच्या लौकिकाला साजेसा आहे. प्रत्येक गोष्ट फुगवून आणि वाढवून सांगण्याची लोकप्रतिनिधींची हातोटी आहे. त्यामुळे महापौर फार चुकीचे वागले असे म्हणता येणार नाही. शहराच्या लौकिकानुसार हा प्रकार आहे. फुगवलेला अर्थसंकल्प शहरासाठी मारक आहे. पायाभूत सुविधासांसाठी काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे.

- सार्थक खुल्लोडकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ रंगले अरेरावीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या भांडणांनी पुन्हा चर्चेत आहे. संशोधन विभागात विद्यार्थी नेत्यांचा उपद्रव वाढल्यामुळे वाद वाढत आहेत. परीक्षा विभागातील अधिकारी मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू आहे, तर पदव्युत्तर विभागात अपंग विद्यार्थिनीला कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याने वाद झाला. विद्यापीठ अरेरावीत रंगलेले असूनही प्रशासनाने कारवाईशून्य भूमिका घेतली आहे.

परीक्षा विभागात नितीन गायकवाड व सतीश दवणे यांच्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. हा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. या प्रकरणाची प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी मंगळवारी दोघांना समोर बसवून चौकशी केली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. डी. आर. नेटके उपस्थित होते. कार्यालयीन वेळेत अधिकारी भांडण करीत असल्याने विद्यापीठाची बदनामी होत आहेत. या प्रकाराला रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार असे विचारल्यानंतर पांडे यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले. 'हे घरातील भांडण असून असे प्रकार घडतच असतात' असे पांडे म्हणाल्या. कारवाई नसल्यामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांची हिंमत वाढल्यास जबाबदार कोण असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर पांडे सारवासारव केली. मारहाण प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असून कायद्यानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी प्राध्यापक नेते आणि कर्ममचारी नेते सरसावले असल्याने कारवाईची शक्यता मावळली आहे. दुसरीकडे संशोधन विभागात मागील काही दिवसांपासून विद्यार्थी नेत्यांचा उपद्रव वाढला आहे. मौखिक चाचणीचे पत्र काढण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. कुलगुरुंची स्वाक्षरी झाल्याशिवाय पत्र देता येत नाही. याबाबत कुलगुरुंना कर्मचाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नेत्यांचा उपद्रव तापदायक ठरला आहे. विद्यापीठात सर्व विभागात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अरेरावी सहन करावी लागत आहे. या प्रकाराकडे कुलगुरू, प्र-कुलगुरु, प्रभारी कुलसचिव यांनी डोळेझाक केली आहे.

\B'पीजी' विभागात पुन्हा वाद

\Bपदव्युत्तर विभागात 'टीसी' मागण्यासाठी आलेल्या अपंग विद्यार्थिनीला सहकार्य केले नसल्यामुळे मंगळवारी वाद झाला. सतत चार तास विभागात हेलपाटे मारत होते. एकाही कर्मचाऱ्याने योग्य व पुरेशी माहिती दिली नाही. माहिती विचारल्यास कामात असल्याचे उत्तर दिले. संताप अनावर झाल्यामुळे विचारणा केल्यावर कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरली असे इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी वर्षा त्रिभुवन यांनी सांगितले. प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांना वाईट वागणूक मिळत असल्याचे प्रकार घडत असूनही प्रशासन उदासीन आहे.

संशोधन विभागात विद्यार्थी नेते त्रास देत असतील, तर कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार करावी. कुणालाही त्रास होऊ, नये अशी प्रशासनाची भूमिका आहे.

डॉ. साधना पांडे, प्रभारी कुलसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गळ्यात हात टाकत पसार वाहेदला घेतले ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिन्यापूर्वी घाटी रुग्णालयातून पोलिसांच्या हाताला झटका देत पसार झालेला कुख्यात गुन्हेगार वाहेदला अखेर छावणी पोलिसांनी जेरबंद केले. मंगळवारी दुपारी कोर्टाच्या परिसरात आलेल्या वाहेदला पोलिसांनी गळ्यात हात टाकल्यानंतर आपण अडकल्याचे लक्षात आले.

छावणी पोलिसांनी आरोपी शेख वाहेद शेख असद (रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) याला गेल्या महिन्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती. चार मे रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आले होते. यावेळी रात्री अकराच्या सुमारास बंदोबस्तावरील पोलिसांच्या हाताला झटका देत वाहेद पसार झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या महिन्याभरापासून वाहेदचा शोध सुरू होता. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान मंगळवारी दुपारी वाहेद कोर्टाजवळ येणार असल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचला. वाहेद आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, एसीपी ज्ञानोबा मुंडे, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पीएसआय सचिन मिरधे, कॉन्सटेबल सोळुंके व क्षीरसागर यांनी केली.

\Bआठ दिवसापासून फिल्डिंग\B

पीएसआय मिरधे व त्यांचे पथक गेल्या आठ दिवसांपासून पसार वाहेदच्या मागावर होते. आठ दिवसांपूर्वीच तो हातात येण्यापासून बचावला होता. कोर्टाजवळ तो येणार असल्याची माहिती मिळाली होती. वाहेद आल्यानंतर गर्दीमध्ये असलेल्या मिरधे व सहकाऱ्यांना तो ओळखू शकला नाही. त्याच्या गळ्यात हात टाकत वाहेदला आपल्याला पोलिसांनी पकडल्याचे लक्षात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस आयुक्तालयात शोषणाची चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहर पोलिस दलातील एका उपायुक्ताविरुद्ध तरुणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणाबाबत बोलण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवत चुप्पी साधली आहे. मात्र, कनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यामध्ये या प्रकरणाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो असे आश्चासन देत पोलिस उपायुक्ताने २१ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. ही पीडित तरुणी महिला पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी आहे. या उपायुक्ताने तरुणीला लग्नाचे देखील आमिष दाखवले होते. मात्र नंतर लग्नाला नकार दिल्याने या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची तक्रार घेण्यात आली नव्हती. या तरुणीने तक्रार करावी त्यानंतर चौकशी करून कारवाई करू, अशी प्रतिक्रिया आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी दिली आहे. दरम्यान पोलिस दलात या घटनेने अधिकारी व कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अधिकारी कानावर हात ठेवत आहेत. दरम्यान याप्रकरणातील उपायुक्त सध्या रजेवर आहेत. या पीडित तरुणीने अद्याप लेखी तक्रार दाखल केलेली नाही. मात्र पोलिस दलातील कनिष्ठ कर्मचाऱ्यामध्ये या प्रकरणाची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा हजारांची लाच घेताना लिपिक जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पैठण फुलंब्री येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेला लिपिक रवींद्र राजपूत याला सहा हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी मुकुंदवाडी येथील बीएसएनएलच्या कँटीनमध्ये ही कारवाई करण्यात आली. डीएमआयसीमध्ये संपादित जमिनीची संचिका तयार करून त्याचे बिल ट्रेझरीला पाठवण्याकरिता त्याने लाचेची मागणी केली होती.

जांभळी शिवारातील शेतकऱ्याची गट क्रमांक १०६मध्ये शेती आहे. ही जमिन डीएमआयसीकरीता शासनाकडून संपादित करण्यात आली आहे. जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शेतात असलेल्या झाडे व विहिरीचा मावेजाचे धनादेष त्यांना मिळणार होता. या धनादेषाचे काम लिपिक रवींद्र राजपूतकडे होते. या जमिनीची संचिका तयार करून त्याचे बिल ट्रेझरीला पाठवण्यासाठी त्यांनी शेतकऱ्याकडे दहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सहा हजार रुपयाची लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मंगळवारी दुपारी मुकुंदवाडी येथील बीएसएनएलच्या कँटीनमध्ये सहा हजार घेऊन शेतकऱ्याला बोलावण्यात आले होते. कँटीन समोरील पॅसेजमध्ये ही लाच स्वीकारताना राजपूत (रा. राजे संभाजी कॉलनी, जाधववाडी) पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भरत राठोड, अनिता वराडे, गणेश पंडुरे, भीमराज जीवडे, अश्वलिंग होनराव, मिलिंद इप्पर, संदीप चिंचोले आदींनी केली. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनावरे चोरणारी टोळी गजाआड

$
0
0

औरंगाबाद : जिल्ह्यातून जनावरे चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या. या टोळीने अनेक गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून रोख एक लाख व चोरीसाठी वापरण्यात येणारी चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

कन्नड पोलिस ठाण्यात सोमवारी शेख इलियास शेख अहेमद या शेतकऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्याच्या शेतातून दोन बैल व लहान वासरे पळवण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्यामागे शेख मुक्तार शेख चांद (रा. नायगाव ता. फुलंब्री) याचा हात असून साथीदारासह तो स्वत:च्या मालकीच्या तसेच भाड्याने वाहन घेऊन जनावरे चोरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सापळा रचून आरोपी शेख मुक्तार, शेख सत्तार शेख चांद, सय्यद हकीम सय्यद शहानूर (दोघे रा. नायगाव), नसीम मोहम्मद पठाण (रा. हर्सूल) व बाबा सुलेमान कुरेशी (रा. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली. या टोळीने जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, अजिंठा, वडोदबाजार, करमाड, पाचोड, गंगापूर, पिशोर, बिडकीन व बदनापूर येथून जनावरे चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पीएसआय विवेक जाधव, सचिन कापुरे, भगतसिंग दुलत, रोहित बेंबरे, जमादार गणेश मुळे, बाळू पाथ्रीकर, सुनील शिराळे, संजय भोसले, शेख नदीम, बाबासाहेब नवले, विनोद तांगडे व ज्ञानेश्वर मेटे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images