Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ऑनलाइन बिल भरण्याची वीज ग्राहकांसाठी सोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बिलांचा भरणा सुलभतेने व्हावा म्हणून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने विजेचे बिल भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी क्रेडिट कार्डचा अपवाद वगळता नेट बँकिंग, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड डेबिट कार्ड व यूपीआय पद्धतीने वीज बिल भरण्याची सेवा नि:शुल्क असेल.

महावितरणच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून (www.mahadiscom.in) किवा महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे ग्राहक विजेचे बिल ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे बिलाचा भरणा केल्यास शुल्क आकारण्यात येईल. उर्वरित इतर सर्व पद्धतींच्या माध्यमातून (नेटबँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीज बिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाइलवर 'एसएमएस'द्वारे त्वरित पोच मिळते; तसेच www.mahadiscom.in या वेबसाइटवर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास वीजबिल भरल्याचा तपशील व पावतीही उपलब्ध होते. ऑनलाइन वीजबील भरणा पद्धत अत्यंत सुरक्षित असून, यासंदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकतात.

ग्राहकांनी वीज बिलभरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहून बील भरण्यापेक्षा महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या नि:शुल्क ऑनलाइन सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

……………..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रमजान ईदनिमित्त वाहतुकीत बदल

$
0
0

औरंगाबाद : रमजान ईदनिमित्त छावणी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी होते. त्यामुळे १५ अथवा १६ जून यापैकी ज्या दिवशी ईद साजरा होईल त्या दिवशी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

\B

वाहतुकीत असा बदल

\B- नमाज अदा करण्यासाठी छावणी ईदगाह येथे औरंगाबादच्या उत्तरेकडून (टाउन हॉल, मलिक अंबर चौक, मकई गेट, बेगमपुरा) येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविदयालयाच्या प्रांगणात.

- ज्युबली पार्क, महेमूद दरवाजा, पानचक्कीकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविदयालयाच्या आवारात.

- मिलकॉर्नर, बारापुल्ला गेटकडून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मिलिंद विज्ञान कॉलेजच्या मागील बाजूच्या प्रांगणात करण्यात आली आहे.

- छावणी परिसरातून मिलिंद चौकामार्गे येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या समोरील वाहनतळावर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन ट्रक कचऱ्याचे वर्गीकरण

$
0
0

तीन ट्रक कचऱ्याचे वर्गीकरण

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

प्रभाग क्रमांक दोन सिल्लेखाना येथे बुधवारी कचरा वेचक, स्वच्‍छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुमारे तीन ट्रक कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात आले.

महापालिकेच्या वतीने शहरातील वर्गिकृत कचरा सनियंत्रण समितीने ठरवून दिलेल्या जागांवर टाकण्यात येत आहे. मात्र, काही दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग लागले आहेत. या ढिगाऱ्यात ओला आणि सुका असा एकत्र कचरा असून महापालिकेकडून ज्या जागांवर कचरा टाकण्यात येतो त्या ठिकाणी ओला आणि सुका अशा एकत्रित कचऱ्याला विरोध आहे. त्यामुळे कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. दरम्यान, शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी वेचकांची मदत घेऊन शहर कचरामुक्त करण्याचे महापौरांनी जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत स्वच्छता निरीक्षक यांनी ७० कर्मचारी आणि काही कचरा वेचकांच्या मदतीने जवळपास ३ ट्रक कचऱ्याचे वर्गीकरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांडुरके यांची प्रतिनियुक्ती रद्द

$
0
0

म. टा .प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा कोंडी सोडविण्यासाठी घनसावंगी येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांची तीन महिन्यासाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रमुखपदी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. ही प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आल्यामुळे मांडुरके यांना घनसावंगी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारावा लागणार आहे.

शहरात कचराकोंडी निर्माण झाल्यामुळे ती सोडविण्यासाठी मांडुरके यांचा घनकचरा व्यवस्थापनातील यापूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन ही प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. तीन महिन्यात मांडुरके यांनी कचऱ्याचा प्रश्न मोठ्या कौश्यल्याने हाताळत शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन केले होते. घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असताना राज्य सरकारने मांडुरके यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांची घनसावंगी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी या मूळपदावर नियुक्ती केली. दरम्यान, महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तपदावर अंबड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नंदकुमार भोंबे यांची बदली करण्यात आली असून त्यांना तत्काळ पदभार घेण्याचे आदेशात नमूद केले आहे. मनपातील सहायक आयुक्त शैला डाके यांची लातूर महानगरपालिकेत सहायक आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कामगारांचा वेतनवाढीबद्दल जल्लोष

$
0
0

औरंगाबाद : एसटी कामगारांसाठी महामंडळाने घोषित केलेल्या एकतर्फी कराराच्या विरोधात कामगारांनी संप सुरू केला होता. या संपानंतर परिवहन मंत्र्यांनी; तसेच एसटी महामंडळाने करारांतर्गत असलेल्या त्रुटी दूर करून समाधान पगार वाढ देण्याची हमी दिली. यामुळे कामगारांचे वेतन वाढणार असल्याने मध्यवर्ती बस स्थानकात फटाके फोडून; तसेच मिठाईचे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी संदीप जाधव, आर. आर. कुलकर्णी, सय्यद नजीब, रहेमान भाई, दीपक बागलाने, के. एन. पवार सोबत महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. हा जल्लोष सोमवारी दुपारी दीडच्या दरम्यान साजरा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. विलास वांगीकर यांचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी नेत्रविभाग प्रमुख डॉ. विलास वांगीकर यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा वर्धापनदिन सोहळा नुकताच झाला. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या अध्यक्ष डॉ. जयश्री मेहता , वैद्यकीय सचिव डॉ. संजय देशमुख , कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर , प्र -कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. वांगीकर यांचा गौरव करण्यात आला.

वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. डॉ. विलास वांगीकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षणाचे कार्य केले याच बरोबर रुग्ण सेवा देत एक लाखावर मोतीबिंदू शस्तक्रिया केल्या, मोतीबिंदू शिबिरे घेऊन ग्रामीण जनतेला आरोग्यसेवा प्रदान केली. अनेक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासक यांना सोबत घेऊन विकासासाठी अनेक उपक्रम राबविले, नेत्रदान अभियानयाद्वारे अनेकांना दृष्टी प्राप्त करून दिली, नवीन अभ्यासक्रम तयार करणे, मूल्यमापन करणे व नवीन योजना तयार करणे यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

डॉ. वांगीकर यांना यापूर्वी दृष्टीदाता, द्रोणाचार्य, सामाजिक नेत्र आरोग्य, बेस्ट टीचर, जीवन गौरव असे विविध सामाजिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर जाळणाऱ्या चौघांना सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घराचा ताबा देण्यास विरोध करताच अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व नंतर घर पेटवून देऊन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघा भावांना पाच वर्षे सक्तमजुरी व साडेतीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी बुधवारी (१३ जून) ठोठावली.

या प्रकरणी शेतकरी शेषराव नामदेव झिम्मन (६७, रा. आडगाव (जेहूर), ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व त्याचा सख्खा भाऊ देविदास यांच्यामध्ये गावातील राहत्या घराचा वाद होता. ते घर देविदास याच्या नावावर होते व त्या घराचा ताबा फिर्यादीकडे होता. दरम्यान, देविदास याने ते घर आरोपी रवींद्र सजन निकम (४७, रा. लोंढरा गाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) व त्याच्या पत्नीच्या नावावर परस्पर करून दिले होते. ५ ऑगस्ट २००७ रोजी आरोपी रवींद्र तसेच आरोपी किरण सजन निकम (३७), आरोपी शरद सजन निकम (३५), आरोपी रावसाहेब बबन निकम (३६, सर्व रा. लोंढरागाव) आणि इतरांनी ट्रॅक्टर, कार, दुचाकी व इतर वाहनांमधून संसारोपयोगी सामान आणून ते घरामध्ये टाकण्याचा प्रयत्न करीत घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्याला फिर्यादीने विरोध करताच आरोपी रवींद्र याने फिर्यादीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाऊस आल्यामुळे काडी विझली आणि फिर्यादीच्या पत्नीने व ग्रामस्थांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी घरात जाऊन बसला असता, आरोपींनी घराचे दरवाजे -खिडक्यांवर रॉकेल टाकून घर पेटवून देऊन फिर्यादीच्या खुनाचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी आग विझवून फिर्यादीची सुटका केली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भादंवि ३०७, ४५२, ३२३, ५०४, ५०६, १४७, १४८, १४९, ३४ कलमान्वये कन्नड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अरविंद बागुल यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये घटनास्थळी पोहोचलेले पोलिस कर्मचारी गणेश काथार व फिर्यादीची साक्ष महत्वाची ठरली. अॅड. सचिन चव्हाण यांनी फिर्यादीच्या बाजुने युक्तवाद केला.

\Bवेगवेगळ्या कलमांन्वये शिक्षा

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने चौघा आरोपींना कलम ३०७ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावास, कलम ३२३ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, कलम ४५२ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, कलम ५०४ व ३४ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी तसेच कलम ५०६ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा खून, पतीला जन्मठेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

माहेरून कॅमेऱ्यासाठी २० हजार रुपये आणले नाही म्हणून पत्नीचा गळा आवळून खून करणारा आरोपी पती राधाकिसन ऊर्फ राधाकृष्ण अण्णा बनकर याला मरेपर्यंत जन्मठेप व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. तपकीरे यांनी बुधवारी (१३ जून) ठोठावली.

या प्रकरणी बारकू धोंडू दिवेकर (४६, रा. बळेगाव, ता. वैजापूर. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीची कन्या सविता ऊर्फ वंदना हिचे लग्न हे खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे राहणाऱ्या राधाकिसन ऊर्फâ राधाकृष्ण बनकर (३५, रा. राजवाडा, वेरूळ, ता. खुलताबाद) याच्यासोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर काही महिने सविताला चांगले वागवण्यात आले. मात्र त्यानंतर 'तुला घरकाम येत नाही', असे म्हणत तिचा शारीरिक-मानसिक छळ करण्यात येऊ लागला. त्याचवेळी कॅमेरा घेण्यासाठी माहेरून २० हजार रुपये घेऊन ये, असा तगादा सविता हिच्या मागे लावण्यात आला. सविता हिने माहेरून पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली व १ जून २०१० रोजी तिचा गळा आवळून खून केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून खुलताबाद पोलिस ठाण्यात राधाकिसनसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहायक लोकअभियोक्ता अनिल हिवराळे यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये वैद्यकीय अधिकारी व चुलत भवाची साक्ष महत्वाची ठरली.

\Bसासू, सासरा, नणंदेला सोडले

\Bदोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने आरोपी राधाकिसन यास भादंवि ३०२ कलमान्वे मरेपर्यंत जन्मठेप व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास, भादंवि ४९८ कलमान्वये १ वर्ष सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील आरोपी अण्णा भिकाजी बनकर (सासरा), गंगुबाई अण्णा बनकर (सासू) व उषा गणपत धनेधर (नणंद) यांना कोर्टाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलीवर बलात्कार, भाऊजीला कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आणि मातृत्व लादणाऱ्या मुलीच्या अल्पवयीन चुलत भावासह भाऊजी व आरोपी ज्ञानेश्वर गणेश इंगळे याला मंगळवारी (१२ जून) अटक करण्यात आली. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी भावाला बाल न्यायालयात हजर करण्यात आले, तर आरोपी भाऊजीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात येऊन शुक्रवारपर्यंत (१५ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी दिले.

या प्रकरणी कन्नड तालुक्यातील गावातील १५ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी मुलगी ही वडिलांसोबत शेतात राहते व शेजारीच चुलत्याचे घर आहे. संबंधित मुलगी शेतात झोपली असता, तिच्या चुलत भावाने येऊन तिला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, पोट दुखत असल्यामुळे तिला दवाखान्यात नेले असता, ती सात-आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मुलीने दिलेल्या जबाबानुसार, एप्रिल २०१७ ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान मुलीच्या चुलत भावाने तसेच भाऊजी व आरोपी ज्ञानेश्वर गणेश इंगळे (रा. शिरोडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी आरोपी भावाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात हजर करण्यात आले, तर आरोपी भाऊजीला मंगळवारी अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले.

\Bपितृत्व सिद्धतेसाठी डीएनए चाचणी

\Bसुनावणीवेळी, संबंधित मुलगी प्रसूत झाली असून तिने बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे बाळाचे पितृत्व सिद्ध करण्यासाठी 'डीएनए' चाचणी करावयाची आहे आणि त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत (१५ जून) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन प्रवाशांचे पाकीट लांबवले; एक खिसेकापू जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिडको बसस्थानकामध्ये दोन प्रवाशांचे खिसे कापून साडेनऊ हजार रुपये लांबवण्यात आले. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला. पोलिस व नागरिकांच्या दक्षतेमुळे एका खिसेकापूला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार पसार झाला आहे.

सिडको एन चार भागातील निर्मळकुमार गोलखंडे (वय ४८) हे मंगळवारी सायंकाळी सिडको बसस्थानक येथे गेले होते. तेथील वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याकडे ते बसची चौकशी करीत असताना त्यांच्या पँटच्या खिशातून चोरट्यानी १८०० रुपये लांबवले. तसेच तेथील दुसरे प्रवासी विजयकुमार सोनाजी भोसले यांच्या खिशातून साडेसात हजार रुपये व एटीएम कार्ड लंपास केले. हा प्रकार गोलखंडे यांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नागरिक व तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी सरताज सिकंदर सय्यद (वय २८ रा. रशीदपुरा) याला पकडले. गर्दीमध्ये त्याचा साथीदार संधी साधून पसार झाला. या प्रकरणी आरोपी सरताजविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर वार करून १५ हजार लुबाडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणावर शस्त्राने वार करीत मोबाइल व पंधरा हजार रुपये लुबाडण्यात आले. शनिवारी सायंकाळी पाच वाजता हिमायत बागेजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सनी दशरथ दाभाडे (वय १८ रा. सिद्धार्थनगर, टीव्ही सेंटर, हडको) हा तरुण शनिवारी सायंकाळी मित्राला भेटण्यासाठी हिमायतबागेत गेला होता. यावेळी त्याच्या पाठीमागून संशयित आरोपी शेख सोहेब शेख बाबा उर्फ डाकू आला. या आरोपीने सनीला पाठीमागून पकडून ठेवत त्याच्या डोक्यावर, पाठीवर व डोळ्याजवळ वार केले. यामध्ये सनी जखमी झाला. यानंतर आरोपी सोहेबने त्याच्या खिशातील रोख पंधरा हजार व मोबाइल बळजबरीने काढून घेत पसार झाला. या प्रकरणी मंगळवारी सनीच्या तक्रारीवरून आरोपी सोहेब उर्फ डाकूविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जमादार राठोड या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागडेंच्या उपस्थितीत इफ्तार

$
0
0

औरंगाबाद : राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सद्भावना कार्यक्रमांतर्गत जिन्सी पोलिस ठाण्यातर्फे व्हीआयपी फंक्शन हॉल येथे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलिस आयुक्त नागनाथ कोडे, एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रमजाननिमित्त शुभेच्छा दिल्या; तसेच पोलिस आयुक्तांनीही पवित्र रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अशरफ मोतीवाला ,इब्राहीम पटेल यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉनक्लेव्हमध्ये औरंगाबाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पर्यटनवाढीसाठी सारनाथ, बोधगया येथे तीन ते पाच दिवस होणाऱ्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्‍क्लेव्हचे आयोजन करण्यात येते. पाच दिवस होणाऱ्या या कॉनक्लेव्हचा कार्यक्रम एक दिवस वेरुळ-अजिंठा येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटन विभागाचे सहसचिव सुमल बिल्ला यांनी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली.

जगप्रसिद्ध अजिंठा, एलोरा लेण्यांना भेट देण्यासाठी जागतिक स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, तसेच त्या दूर करण्यासाठी काय पावले उचचली पाहिजेत, यावर दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेत पर्यटनाच्या विविध विषयांवर ऊहापोह झाला. या कार्यशाळेला केंद्रातील पर्यटन, पुरातत्व विभागाचे सहसचिव, जपान सरकारचे मंत्री, अधिकारी, एमटीडीसीचे अधिकारी तसेच औरंगाबादचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. दिल्लीस्थित जपानच्या दुतावासातील मंत्र्यांनी, व केंद्रातील पुरातत्व खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सकारात्मकता दर्शवल्याने येत्या काही महिन्यात अजिंठा तसेच वेरुळ येथे मोठे बदल दिसून येतील, अशी अपेक्षा चौधरी यांनी व्यक्‍त केली आहे.

बोधगया येथे होत असलेल्या इंटरनॅशन बुद्धिस्ट कॉन्‍क्लेव्हमध्ये जगभरातील टूर ऑपरेटर तसेच पर्यटक हजेरी लावत असतात, वेरुळ अजिंठा येथे कॉन्क्लेव्हचा एक दिवस देण्याच्या निर्णय पर्यटनवाढीसाठी सकारात्मक ठरणार आहे. या कॉनक्लेव्हचा एक दिवस औरंगाबादला देण्यात यावा या विषयीचा प्रस्ताव यापूर्वीच एमटीडीसीने पाठवला होता. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही कॉनक्‍लेव्हसाठी किमान एक दिवस मिळावा, अशी मागणी यावेळी केली. अजिंठा लेणीच्या परिसरात पर्यटन वाढीसाठी कोणकोणत्या सोई असाव्यात याचा आढावा घेण्यासाठी दिल्ली येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची उपस्थिती होती.

या कार्यशाळेमध्ये पर्यटन समस्येवर गांभिर्याने चर्चा झाली. स्थानिक पातळीवर प्रशासनाने करावयााच्या वि‌विध कामांमध्ये सहकार्य केले जाणार असल्याचे आश्वासन यावेळी चौधरी यांनी दिले.

दिल्लीवरून औरंगाबादला थेट विमानाची सोय नसल्याने अडचण होत असल्याचे मत जपान दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले. या कार्यशाळेमध्ये एमटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी प्रेझेंटेशन केले.

बुद्धिस्ट सर्किटला तत्वत: मान्यता

केवळ उत्तर भारत आणि बिहारचा दबदबा असलेल्या बुद्धिस्ट सर्किटमध्ये आता अजिंठा आणि वेरुळचाही समावेश करण्यात आला असून याला तत्वत: मान्यता देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार ही तीन राज्ये बुद्धिस्ट सर्किटद्वारे जोडली गेलेली आहेत. औरंगाबाद बुद्धिस्ट सर्किटला जोडण्यात आल्याचे केवळ चर्चा होती. आता तत्वत: मान्यता मिळाल्याने आता उत्तरप्रदेश, बिहार तसेच मध्यप्रदेश सोबतच अजिंठा-वेरुळमुळे महाराष्ट्राचेही नाव जोडले गेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नैराश्य कलंक नव्हे केवळ आजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सत्तर टक्के आत्महत्या या नैराश्यातून होतात. आजमितीस १५ ते २० टक्के नागरिक हे नैराश्यग्रस्त आहेत तर ३० टक्के नैराश्यग्रस्त नागरिक हे कधीही आत्महत्या करू शकतात किंवा आत्महत्या करतात. त्यामुळेच नैराश्य हा मानसिक आजार आहे हे ओळखा, कलंक न मानता मोकळेपणाने स्वीकारा आणि लवकरात लवकर उपचार घ्या. कुणालाही कधीही नैराश्याचा आजार जडू शकतो आणि त्याचवेळी कुठल्याही पातळीवरच्या नैराश्यावर उपचार होऊन नैराश्यमुक्त होता येते हे लक्षात घ्या, असा बहुमोल सल्ला वाढत्या आत्महत्यांच्या प्रकारांवर मनोविकारतज्ज्ञांनी दिला आहे.

सामाजिक, अध्यात्मिक तसेच राजकीय क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या भय्यू महाराज यांनी मंगळवारी (१२ जून) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आणि असंख्य लोकांना जबर धक्काच बसला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांना नैराश्याने ग्रासल्याचा स्पष्ट उल्लेख होता, असेही समोर येत आहे. सर्वकाही असतानाही अवघ्या पन्नाशीत भय्यू महाराजांना आत्महत्या का करावी वाटली, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांनीही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे अलीकडे अगदी चौथी-पाचवीपासून ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांपर्यंत आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या प्रमाणावरील शेतकरी आत्महत्यांसह वृद्ध-ज्येष्ठ-मध्यमवयीन व्यक्तींमध्येही आत्महत्या होत आहेत, झाल्या आहेत. परिणामी, वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण अंतर्मुख व्हायला भाग पाडत असतानाच, मनोविकारतज्ज्ञांनी नैराश्याकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून लक्ष वेधले आहे. मनोविकारतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख यांच्यानुसार, ताण (स्ट्रेस), अतिताण (डिस्ट्रेस) व आजार (डिसॉर्डर) अशा नैराश्याच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे ताण हाताळता आला नाही की त्याचे रुपांतर अतिताणात होते व अतिताणाचे रुपांतर नैराश्य या आजारामध्ये होते. जैविक (बायोलॉजिकल), मानसशास्त्रीय (सायकोलॉजिकल) व सामाजिक (सोशल) कारणांचा एकत्रित परिणाम हा नैराश्यामध्ये होतो. यामध्ये तिन्ही घटक तितकेच महत्वाचे असले तरी जैविक कारण हे जास्त प्रभावी ठरू शकते. जेव्हा मेंदूमध्ये सिरोटोनिन या रसायनाचे प्रमाण कमी होऊन जो काही असमतोल निर्माण होतो तो नैराश्याला कारणीभूत ठरतो, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. अयोग्य विचारसरणी, दृष्टीकोनामुळे ताण हाताळता न आल्याने मानसशास्त्रीय प्रश्न निर्माण होतात व नैराश्याला कारणीभूत ठरू शकतात. तसेच बाहेरील परिस्थिती, सामाजिक कारणे-विवंचनांमुळेही ताण वाढून व्यक्ती नैराश्यग्रस्त होऊ शकते, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

सारासार विवेकावर होतो परिणाम

तब्बल ३० टक्के नैराश्यग्रस्त व्यक्ती हे आत्महत्या करू शकतात किंवा आत्महत्या करतात. मुळात नैराश्यामध्ये सारासार विवेकावर परिणाम होतो, विवेक कमजोर होतो आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला नैराश्याने ग्रासले आहे आणि नैराश्य हा एक मानसिक आजार आहे, याची जाणीवच अशा व्यक्तींना नसते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार होण्यासाठी इतरांनी प्रयत्न करणे गरजेचे असते, हेही लक्षात घेतले पाहिजे. साधारणतः २५ ते ३० आणि साठीतील व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. संजीव सावजी म्हणाले.

प्रभावी नि पूर्ण उपचार शक्य

नैराश्य हा सगळ्या मानसिक आजारांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आहे. मात्र कोणत्याही पातळीवरच्या नैराश्यावर उपचार शक्य आहेत आणि नैराश्य हा आजार पूर्णपणे बरा होतो. अलीकडे नवनवीन व प्रभावी औषधे तसेच इलेक्ट्रो कन्व्हल्झीव थेरपी (ईसीटी), डीबीएस, आरटीएमएस आदी प्रभावी उपचार पद्धतीही विकसित झाल्या आहे. इतर उपचार पद्धती अजूनही भारतात नसल्या तरी 'ईसीटी' (ज्याला शॉक ट्रिटमेंट असेही म्हटले जाते) ही सर्वांत प्रभावी उपचार पद्धती कमीत कमी शुल्कात पद्धत सर्वत्र उपलब्ध आहे. मात्र गैरसमजातून या पद्धतीला विनाकारण विरोध केला जातो, असेही डॉ. सावजी म्हणाले.

अशी आहेत नैराश्याची लक्षणे...

-उदास-निराश वाटणे, विनाकारण थकल्यासारखे वाटणे

-वाईट-नाकारात्मक विचार मनात येणे, भूक कमी किंवा जास्त होणे

-एकाग्रता कमी होणे, आत्मविश्वास ढासळणे

-वारंवार आत्मत्येचा विचार मनात येणे, तसा विचार बोलून दाखवणे

(वरील लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असल्यास नैराश्य मानले जाते)

काही गैरसमज....

- आत्महत्या करणारी व्यक्ती आधी वाच्यता करते, त्याकडे दुर्लक्ष करायला नको

- अशी व्यक्ती जेव्हा जीव देण्याविषयी बोलते ते गांभीर्याने घेऊन निदान-उपचार गरजेचे

- आत्महत्येला खूप मोठा निर्धार लागतो, हाही गैरसमज असून कोणीही आत्महत्या करू शकतो


जागतिक आरोग्य संघटनेनुसार नैराश्य हा सध्या तिसरा किंवा चौथा क्रमांकाचा आजार आहे आणि २०३० मध्ये पहिल्या क्रमांकाचा आजार होऊ शकतो, अशीही भीती 'डब्ल्यूएचओ'ने व्यक्त केली आहे. त्यामुळे नैराश्याकडे दुर्लक्ष करणे आत्मघातकी ठरू शकते.
- डॉ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ


१० नैराश्यग्रस्त व्यक्ती जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यातील एकाचा प्रयत्न दुर्दैवाने यशस्वी होतो. नैराश्य हा बरा होणारा आजार आहे. त्यामुळे आजार ओळखून त्यावर लवकरात लवकर उपचार घेणेच हिताचे ठरते. आज अनेक लोक उपचार घेऊन नैराश्यमुक्त होत आहे.
- डॉ. संजीव सावजी, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ


दीपिका पदुकोणसारख्या आघाडीच्या अभिनेत्रीने स्वतचःच्या नैराश्याची जाहीर कबुली दिली होती व उपचार घेऊन ती पुन्हा धडाडीने चित्रपटांमधून काम करीत आहे. त्यामुळे आता तरी मानसिक आजारांकडे कलंक म्हणून न पाहता उपचार करुन घेण्याची गरज लक्षात घेतली पाहिजे.
- डॉ. विनय बाऱ्हाळे, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-१४जून

$
0
0

हडको, एन-११

---

मातीचा ढीग उचला

---

जळगाव रोडवरील सौभाग्य चौकातील एन-११ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ पाइप लाइनचे काम करताना रोडवरच मातीचा भलामोठा ढीग असा टाकण्यात आल्याने व तो वेळेवर न उचलल्याने पादचारी, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे; तसेच अंत्यविधीमध्ये सहभागी होणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. हा मातीचा ढीग लवकरात लवकर उचलण्यात यावा, अशी मागणी संजय अवसरमोल, अनुराधा अवसरमोल, रामकृष्ण अवचार, रामकृष्ण वाघ, अंभोरे, विजय बावस्कार, श्रीमती लांडगे आदींनी केली आहे.

- रवींद्र तायडे, हर्सूल

सिडको

---

कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त

---

हे छायाचित्र आहे सिडकोतील. पोलिस चौकीजवळ, रेणुका माता मंदिराजवळ व हनुमान मंदिरासमोरील भरगच्च कचराकुंडीचे. कायम वर्दळीच्या या रस्त्यावरील या कचऱ्यामुळे पोलिस, भक्तगण व सामान्य नागरिक फार हैराण झाले आहेत. सर्वांच्याच आरोग्याचा विचार करून महापालिकेने दररोजच साफसफाई करावी व जनतेनेही कचरा गाडीतच कचरा टाकावा.

- शरद लासूरकर, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजचा वाढदिवस - डॉ. रामचंद्र काळुंखे

वनमंत्री मुनगंटीवार आज शहरात

$
0
0

औरंगाबाद : राज्याचे वित्तमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (१५ जून) १३ कोटी वृक्षलागवडीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्‍था (वाल्मी) कांचनवाडी येथे सकाळी एक ते पाच वाजेपर्यंत मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांचा मुनगंटीवर आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह आठही जिल्ह्यातील संबंधित अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशाल साळुंके लेफ्टनंट

$
0
0

औरंगाबाद : भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट होण्याचा बहुमान शहरातील विशाल साळुंके याला मिळाला. एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून विशाल रुजू झाला आहे. सैन्य दलात सेवा करण्याची घरातील परंपरा विशालने कायम राखली आहे. विशाल रामजी साळुंके यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाली. नऊ जून रोजी इंडियन मिलिटरी अॅकॅडमी येथून विशालने एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. 'टीजीसी-१२५' मध्ये त्याची निवड झाली. खेळात पारंगत असलेल्या विशालने मुंबईच्या वीर जिजामाता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर सैन्य दलाच्या 'इंजिनिअर्स युनिट'मध्ये त्याची निवड झाली. धानोरा (ता. फुलंब्री) येथील मूळ रहिवासी असलेल्या विशालचे वडील रामजी साळुंके भारतीय सैन्य दलात सुभेदार पदावरून निवृत्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुना अभ्यासक्रम माथी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुन्हा जुन्या अभ्यासक्रमावर वर्ष रेटण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा अभ्यास मंडळाच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले नाही. दुसरीकडे व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीचे कारण सांगत प्रशासनाने चालढकल केली. त्यामुळे सलग सहाव्या वर्षी जुना अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या माथी मारला जाणार आहे.

राजकीय धुरळा उडालेल्या अभ्यास मंडळाच्या नियुक्त्यांनंतर नवीन अभ्यासक्रम राबविण्याची अपेक्षा होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अभ्यास मंडळाच्या निवडणुकीपूर्वीच आपल्या अधिकारात नियुक्त्या जाहीर केल्या. नियमबाह्य पद्धतीने अभ्यास मंडळे अस्तित्वात आल्याचा आक्षेप कायम राहिला. या प्रकाराची राज्य सरकारची समिती चौकशी करीत आहे. अभ्यास मंडळे स्थापन करण्यात घाई केलेल्या विद्यापीठ प्रशासनाने नवीन अभ्यासक्रम राबविण्याकडे सर्रास दुर्लक्ष केले. नवीन अभ्यासक्रम निर्मितीसाठी अभ्यास मंडळाच्या किमान तीन बैठका होणे अपेक्षित होते. या बैठकीत अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चित करणे, बदल सूचवणे आणि अभ्यासक्रमाला अंतिम मान्यता देणे या प्रक्रियेचा अंतर्भाव असतो. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने बैठकीचे नियोजन केले नाही. परिणामी, मंडळ सदस्यांनी अभ्यासक्रम निर्मितीची तयारी केली असूनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. याबाबत प्रशासनाकडे महिनाभरापासून सतत पाठपुरावा केला, पण व्यवस्थापन परिषद निवडणुकीचे कारण दाखवून प्रशासनाने टाळाटाळ केली, अशी माहिती अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.

विशेष म्हणजे सध्याचा अभ्यासक्रम पाच वर्षांपूर्वी लागू करण्यात आला होता. विद्यापीठ कायद्यानुसार किमान तीन आणि कमाल पाच वर्षे अभ्यासक्रम कायम ठेवता येतो. यंदा सहाव्या वर्षीही जुना अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी किमान अभ्यास मंडळाला स्वतंत्रपणे बैठक घेण्याचे आदेश देणे अपेक्षित होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत विद्यापीठाने दुर्लक्ष केल्यामुळे अभ्यासक्रम राबविणे शक्य झाले नाही. सामाजिकशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य या सर्व विद्याशाखेत यावर्षी जुना अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. येत्या २६ जूनपासून पदव्युत्तर वर्गाच्या तासिका सुरू होणार आहेत. पदवीच्या वर्गांनाही जुना अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे.

दरम्यान, अभ्यासक्रमाचे स्वरूप ठरविण्यासाठी वर्षातून एकदा कार्यशाळा घेण्याची गरज अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयीन प्राध्यापकांचा सहभाग असलेल्या कार्यशाळेतील सूचनांचा विचार करून अभ्यासक्रम आणि धोरण राबवावे, असे सदस्यांनी सांगितले.

\Bतज्ज्ञ सदस्यांना पत्र मिळेना

\Bअभ्यास मंडळावर विविध क्षेत्रातील पाच सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेला एक महिना होऊनही संबंधित सदस्यांना विद्यापीठाचे अधिकृत पत्र मिळाले नाही. त्यामुळे नेमणुकीबाबत तज्ज्ञांमध्ये संभ्रम आहे. शिवाय इतर प्रशासकीय कामे अपूर्ण आहेत. या प्रशासकीय ढिसाळपणावर सदस्यांनी जोरदार टीका केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा परिसरात चोर आल्याची अफवा

$
0
0

औरंगाबाद : सातारा परिसरातील म्हाडा कॉलनीत चोर आल्याची अफवा बुधवारी मध्यरात्री पसरली. पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने परिसर पिंजून काढला. मात्र चोरांचा सुगावा लागला नाही.

सातारा देवळाई परिसरातील म्हाडा कॉलनी भागात मध्यरात्री चोरटे शिरल्याची माहिती पसरली. या टोळीमध्ये महिला असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे वृत्त सगळीकडे पसरले. नागरिकांनी नियंत्रणकक्षाला याबाबत माहिती दिली. सातारा पोलिसांसह जवाहरनगर, उस्मानपुरा व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठले. नागरिकांनी देखील चोरांच्या भीतीने गस्त सुरू केली. पहाटेपर्यंत चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा सुगावा लागला नसल्याने ही अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान या भागात चोर आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. मात्र ती अफवा असावी. खबरदारी म्हणून आम्ही पेट्रोलिंग वाढवली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images