Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला कोठडी

$
0
0

औरंगाबाद : मावेजाच्या धनादेशासाठी लाचेची मागणारी करून प्रत्यक्षात सहा हजारांची लाच स्वीकारणारा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावल्याचे लक्षात येताच लाचेच्या रकमेसह पळून जाणाऱ्या लिपिकालका अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटोदकर यांनी दिले.

शेतकऱ्याच्या मावेजाचा धनादेश मिळवून देण्यासाठी पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक व आरोपी रवींद्र राजपूतने सहा हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम आरोपीने स्वीकारली; परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्याचे लक्षात येताच लाचेची रक्कम पँटमधील खिशात टाकून आरोपी पळून गेला. त्याला अटक करून गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या पँटला अँथ्रसीन पावडरचे निशाण असून, ती पँट व लाचेचे सहा हजार रुपये जप्त करणे बाकी आहे. आरोपीचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले आहे व आरोपीच्या आवाजाचे नमुने घेणे बाकी आहे. यापूर्वी २०१५ मध्येही आरोपीला लाच घेताना पकडण्यात आले होते व ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा लाखांची खंडणी मागणारे जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

व्यापाऱ्याला खुनाची धमकी देत मोबाइलवरून दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुरुवारी पोलिसांनी गजाआड केले. पैठण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ही धडाकेबाज कारवाई केली.

११ जानेवारीला शहरातील बबनलाल श्यामलाल गोधा यांना अज्ञात नंबर वरून फोन आला. 'दहा लाख रुपये देना होगा. वरना जानसे मारे देंगे. याद रखना, पुलिसके पास गये तो तुकडे-तुकडे कर देंगे!' असे धमकावले होते. गोधा यांनी खंडणीखोरांच्या धमकीला भीक न घालता याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी तपासाची चक्रे फिरवून सर्वप्रथम सायबर क्राइमला तांत्रिक तपशील सादर केला. अज्ञात व्यक्तीने थेट ७२०८९१८२२१ या मोबाइल क्रमांकावरुन धमकी दिली होती. औरंगाबाद सायबर क्राइमचे संदीप टरमाळे यांनी मोबाईल लोकेशन घेऊन हा नंबर मुंबई येथील असल्याचे कळवले. अधिक चौकशी केली असता सध्या हा नंबर नंदू खरात (रा. पैठण) वापरत असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक आरतीसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड व पोलिस निरीक्षक चंदन इमले यांनी आज सकाळी आरोपींना पकडण्यासाठी व्यूहरचना केली. त्यानुसार कॉल डिटेल्स तपासल्यावर तपासाला दिशा मिळाली. किरण खरात याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. आरोपी खरातने केलेल्या कॉलवर पोलिसांनी कॉल केला. तो नंदू कुंडारे याने रिसिव्ह केला. हा स्वंयपाकी असल्याने त्याला ऑर्डर द्यायच्या बहाण्याने बोलते केले. कॉन्स्टेबल राजू बर्डे व गणेश शर्मा यांनी ट्रॅप लावला. शहरातील लक्ष्मीनगर व नवीन कावसान या भागात सापळा लावल्यावर नंदू कुंडारे हा दुसरा खंडणीबाजही सापळ्यात अडकला. ही महत्वपूर्ण कामगिरी पोलिस कर्मचारी राहुल बचके, गणेश शर्मा, योगेश खंबाट, राजू बर्डे, शैलेश गोटे, जानकीराम शेलार, भीमलाल राठोड, विठ्ठल एडके, गणेश छोरडे, व परवेझ पठाण यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंभीर मारहाण, चौघांना सात वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'लाइनमध्ये ये, तरच पेट्रोल मिळेल' असे म्हणताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर गंभीर वार करून जबर जखमी करणाऱ्या चौघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी गुरुवारी ठोठावली.

या प्रकरणी शहरातील सिडको एन सात परिसरातील पेट्रोल पंपाचे चालक राजेंद्र रावसाहेब आधाने यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नऊ सप्टेंबर २००८ रोजी शहरात पेट्रोल टंचाई असल्यामुळे फिर्यादीच्या पंपावर ग्राहकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. त्यावेळी एक दुचाकीवरील युवक पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आला व लाइन तोडून पुढे येत पंपावरील कर्मचारी शेख हबीब याला 'पेट्रोल भर' असे म्हणाला. त्यावर 'लाइनमध्ये ये, तरच पेट्रोल मिळेल' असे हबीब त्याला म्हणाला. त्यानंतर दहा मिनिटांनी प्रदीप गौतम भिवसने, सतीश सुधाकर भंडारे, सतीश प्रकाश नवगिरे व भीमराव प्रताप इंगळे (सर्व रा. फुलेनगर-आंबेडकरनगर, औरंगाबाद) हे आरोपी दोन दुचाकींवर पंपावर आले आणि त्यांनी हबीबला मारहाण करीत खाली पाडून गज व फावड्याच्या दांड्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत हबीब बेशुद्ध झाला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात भांदवि ३२६, ५०४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक के. के. शिंदे यांनी तपास केला. तापासामध्ये हबीबच्या जखमा व डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे आरोपींविरुद्ध ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) कलम दाखल करण्यात आले होते.

\Bप्रत्येकी ५०० रुपये दंड \B

खटल्यावेळी सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये हबीब व डॉ. भास्कर म्हस्के यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून कोर्टाने कलम ३२६ (जबर मारहाण करणे) अन्वये चौघा आरोपींना ७ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने कारावास, तर कलम ३२३ अन्वये दोन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक पी. जी. आंबुज, सहाय्यक फौजदार बी. बी. कोलते व हवालदार व्ही. के. शिसोदे यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मोबाइल चोरांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मोबाइल चोरांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत (१५ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी गुरुवारी दिले.

पहिल्या प्रकरणात महापालिका सफाई कामगार सनी दशरथ दाभाडे (१८, रा. सिद्धार्थनगर, हडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, नऊ जून २०१८ रोजी फिर्यादी हा हिमायबागेत मित्राला भेटण्यासाठी गेला असता, त्याच्या पाठीमागून आलेला आरोपी शेख शोएब उर्फ डाकू शेख बाबा (रा. हिलाल कॉलनी, औरंगाबाद) याने फिर्यादीला खाली पाडून व मारहाण करीत त्याच्याजवळील १२ हजार रुपयांचा मोबाइल व १५ हजार रुपये रोख असा २७ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे पाटील यांनी सरकारची बाजू मांडली. दुसऱ्या प्रकरणात, विद्यार्थी शैलेश बाबूराव मुंजे (रा. सिडको, एन-सात, औरंगाबाद) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा हडको परिसरातील ताठे मंगल कार्यालय परिसरात मोबाइलवर फोनवर बोलत पायी जात असताना, आरोपी गुलाम अली सिराज अली (रा. परळीवैजनाथ, जि. बीड) व आरोपी अरबाज अली युसुफ अली (रा. भुसावळ, जि. जळगाव) हे दुचाकीवर आले आणि त्यांनी फिर्यादीला हिसका देऊन फिर्यादीचा २० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पळून गेले. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर लोकांनी दोन्ही आरोपींना सुदर्शन नगर चौकात पकडून पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता, दोघांना शुक्रवारपर्यंत (१५ जून) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीतील गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तीन आठवड्यांपासून ते सहा महिन्यांपर्यंत गैरहजर असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली असून, मद्यपान करुन कामावर आलेल्या आठव्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याविरुद्ध कडक भूमिका घेऊन खुलासा मागवण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी त्याहीपेक्षा कितीतरी कर्मचारी गैरहजर असतात, असेही समोर येत आहे.

घाटीत एकीकडे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २३१ पदे रिक्त आहेत आणि मागच्या तब्बल दशकापासून कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. त्यातच दरवर्षी किमान १० ते १५ कर्मचारी निवृत्त होत आहेत व पुन्हा वेगवेगळ्या कारणांनी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. यामध्ये मद्यपी कर्मचाऱ्यांचेही प्रमाण बरेच जास्त असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणावरील रुग्णभार आणि त्यातच मनुष्यबळाची कमतरता, याचा सगळा फटका रुग्णसेवेला बसत असून, ही दरी भरुन काढण्यासाठी प्रशासनाचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही कर्मचारी हे प्रचंड निर्ढावलेले असून प्रशासनाकडे सुटीचा अर्ज न करता, कित्येक दिवसांपासून गैरहजर राहतात. यात प्रशासनाने लक्ष घातले असून, तीन आठवड्यांपासून ते सहा महिन्यांपर्यंत गैरहजर असलेले सात कर्मचारी आढळले असून, त्यांच्यावर प्रशासनाने तातडीने कारवाई करीत त्यांना नोटिस पाठवण्यात आल्या आहेत. दोन दिवसात हजर होण्याचा इशाराही देण्यात आला. त्यातच मद्यपान करुन आलेल्या कर्मचाऱ्यालाही कारवाईचा डोस पाजण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील १२८ मिसाबंदींचे पेन्‍श्नसाठी अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

आणीबाणीच्या काळात लढ्यात कारावास भोगलेल्या (मिसाबंदींना) शासनाने पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यातील १२८ मिसाबंदींनी पेन्शन मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत.

आणीबाणीला विरोध केल्याने कारावास भोगलेल्यांना शासनाने दरमहा पेन्शन द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून लावून धरलेली होती. कारवास भोगलेल्या मिसाबंदींना दहा हजार रुपये व त्यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नीस पाच हजार, तसेच एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या मिसाबंदींना पाच हजार रुपये आणि त्यांच्या पश्‍चात पत्नीला अडीच हजार रुपये दरमहा पेन्शन देण्याचा निर्णय बुधवारी (१३ जून) मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य शासनाने घेतला. या निर्णयानंतर मिसाबंदींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यासदंर्भात तहसीलदार राजू शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मागील तीन-चार महिन्यांत जिल्ह्यातील औरंगाबाद शहर व तालुका, वैजापूर, कन्नड, सिल्लोड या तालुक्यातील १२८ जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केलेले आहेत. या अर्जांच्या अनुषंघाने हर्सूल कारागृह प्रशासनाला पत्र पाठवून माहिती मागवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची दरवाढीचा मुहूर्त टळला

$
0
0

औरंगाबाद :

डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळ तोट्यात आले आहे. यामुळे १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १५ जूनच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ केली जाणार होती. एसटीच्या दरवाढीबाबत कोणतीही पूर्वसूचना स्थानिक अधिकारी यांना देण्यात आली नव्हती. यामुळे गुरुवारी दुपारी एसटी महामंडळाच्या मुख्यालयातून एक आदेश देण्यात आला. या आदेशानुसार एसटीची दरवाढ १५ जून ते १८ जून दरम्यान कधीही लागू करण्यात येऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे. यामुळे एसटीच्या दरवाढीचा मुहूर्त टळल्याची चर्चा एसटी महामंडळ परिसरात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवनीत कौर यांनी जाणून घेतल्या पेन्‍शनर्सच्या समस्या

$
0
0

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी गुरुवारी पेन्‍शनर्स कार्यालयास सदिच्छा भेट देऊन जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांच्या (पेन्‍शनर्स)समस्या जाणून घेतल्या. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची पेन्‍शनर कार्यालयास भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी पवनीत कौर यांनी यावेळी उपस्थितांना शासन सेवेमुळे विकास वाढला काय ? असा प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी पेन्‍शनर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व विभागप्रमुखांना लवकरात लवकर माहिती काढण्याचे आदेश देत, पेन्‍शनर्सचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष वसंत सबनीस व मराठवाड्याचे अध्यक्ष एस. आर. कुलकर्णी यांनी पवनीत कौर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संघटनेचे रखमाजी जाधव, पी. डी. कुलकर्णी, जी. एम. गोदे, कैलास घोडके, डी. एम. होळकर, एन. ए. घुगे तसेच पेन्‍शनर्स कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेल्समनला ट्रकने चिरडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने चिरडल्याने दुचाकीवरील सेल्समन जागीच ठार झाला. गुरुवारी दुपारी तीन वाजता बीड बायपासवरील निशांत पार्क हॉटेलसमोर हा अपघात घडला. श्याम छगनलाल बाहेती (वय ३५, रा. गादिया पार्क, गारखेडा परिसर) असे मृताचे नाव आहे.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाहेती एका खासगी एजन्सीमध्ये सेल्समन म्हणून कामाला होते. गुरुवारी दुपारी ते दुचाकीवर बीड बायपासवरून जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या ट्रक (टीएन १० टी ४२०९) चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवत बाहेतींच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये डोके ट्रकच्या चाकाखाली येऊन बाहेती जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच सातारा पोलिस व वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाहेती यांचा मृतदेह झाकण्यात आला. घटनास्थळी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक सोडून पलायन केले. पोलिसांनी वाहने बाजूला घेत बाहेती यांचा मृतदेह घाटी रुग्णालयामध्ये हलवला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार शेषराव चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा विद्यार्थी ‘नेट’ उत्तीर्ण

$
0
0

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्री-आयएएस मार्गदर्शन केंद्राच्या १० विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेत यश मिळविले. या केंद्रातर्फे नेट - सेट मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांत राधिका टिळेकर (पत्रकारिता), चेतना वालाकरंजकर (पर्यावरणशास्त्र), दीपक हुजरे (भूगोल), पूर्वा पंडित (वाणिज्य), मंदा मस्के (अर्थशास्त्र), श्रीकांत भालेराव (नाट्यशास्त्र), लक्ष्मण गनगे (इतिहास), जया बागुल (ग्रंथालयशास्त्र), स्वप्नील ठाकरे व सुधाकर सानप (संस्कृत) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्रा. सांत्वना मिश्रा, प्रा. सतीश पद्मे व प्रा. सुनील कांबळे यांनी मार्गदर्शन केले. केंद्र संचालक डॉ. यशवंत खिल्लारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी रवींद्र साठे, तुषार जाधव व अजय पवार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित मणेरीकर यांचे उद्या शहरात गायन

$
0
0

औरंगाबाद : ज्येष्ठ गायक पंडित मधुसूदन भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंडित राजेंद्र मणेरीकर यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता मैफल होईल. या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीपीसी हॉल’चा मुहूर्त हुकला

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद,

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या नूतनीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली दहा जूनची डेडलाइन हुकली असून, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितल्याने आता ते कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करतात याकडे लक्ष आहे.

सभागृहाचे काम अत्यंत संथगतिने होत असल्याने जिल्हाधिकारी चौधरी यांनी वारंवार तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा त्यांनी नियोजन सभागृह; तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या नूतनीकरणाची पाहणीही केली. वारंवार अधिकाऱ्यांना सूचना केल्या तरीही वेळेत काम पूर्ण होत नसल्याने त्यांनी नियोजन सभागृहाच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला दहा जूनची डेडलाइन दिली होती, मात्र यातील निम्म्यापेक्षा अधिक कामकाज पूर्ण होणे अद्यापही बाकी आहे. या ठिकाणी ध्वनी यंत्रणा, बैठक व्यवस्था, फ्लोअरिंग आदींची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजित १५ जून रोजी बैठक असून, त्यापूर्वी काम पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या, मात्र कामाच्या कासवगतीमुळे सभागृहाचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.

सभागृहातील आसनव्यवस्था, विद्युतीकरण, वातानुकूलन यंत्रणेवर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात येत आहेत, मात्र हे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. सभागृहातील ध्वनीव्यवस्था अत्यंत वाईट दर्जाची असल्यामुळे तत्कालिन पालकमंत्री रामदास कदम यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर कदम यांनी सभागृहाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मान्यता दिली होती. त्यानुसार सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे, पण ते कधी संपणार हे अनिश्चित आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह प्रशासनाच्या बहुतांश बैठका याच ठिकाणी होतात. या बैठकांना अधिकारी, पदाधिकाऱ्यांची एकाच वेळी मोठी गर्दी होते, मात्र अयोग्य बैठक व्यवस्था, सभागृहाचा मोठ्या आकार, साउंडप्रुफ नसल्याने उपस्थितांना अधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश, बैठकीमधील चर्चा व्यवस्थित ऐकू येत नाही. विद्युत विभागाच्याही अनेक अडचणी असून, त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. प्रामुख्याने आसन व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात येत आहे.

\B३० जूनपर्यंत काम होणार पूर्ण\B

गेल्या काही दिवसांपासून सभागृहाचे काम अहोरात्र करण्यात येत असून, साउंडप्रुफ यंत्रणेसाठी अधिक कालावधी लागला, जिल्हाधिकारी कामाचा वेळोवेळी आढावा घेत असून आम्ही ३० जूनपर्यंत सभागृहाचे काम पूर्ण करु असा विश्वास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

\Bअसा आहे नूतनीकरणावरील खर्च \B

९९ लाख रुपये

बैठक व्यवस्था

८ लाख ६५ हजार रुपये

ध्वनी व्यवस्था व विद्युतीकरण

१ लाख ३९ हजार रुपये

वातानुकूल यंत्रणा

६ लाख ५९ हजार रुपये

अग्निशमन यंत्रणा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मोबाइल चोरांना बेड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मोबाइल चोरांना अटक करून कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत (१५ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

पहिल्या प्रकरणात महापालिका सफाई कामगार सनी दशरथ दाभाडे (रा. सिद्धार्थनगर, हडको) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, नऊ जून २०१८ रोजी फिर्यादी हा हिमायबागेत मित्राला भेटण्यासाठी गेला असता, त्याच्या पाठीमागून आलेला आरोपी शेख शोएब उर्फ डाकू शेख बाबा (रा. हिलाल कॉलनी, औरंगाबाद) याने फिर्यादीला खाली पाडून व मारहाण करीत त्याच्याजवळील १२ हजारांचा मोबाइल व १५ हजार रोख असा २७ हजारांचा ऐवज हिसकावून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला कोर्टात हजर केले असता, त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील भागवत काकडे पाटील यांनी सरकारची बाजू मांडली.

\Bआरडाओरड करून पकडले

\Bदुसऱ्या प्रकरणात, विद्यार्थी शैलेश बाबूराव मुंजे (रा. सिडको, एन-सात, औरंगाबाद) याने फिर्याद दिली होती. त्यानुसार, फिर्यादी हा हडको परिसरातील ताठे मंगल कार्यालय परिसरात मोबाइलवर फोनवर बोलत पायी जात असताना, आरोपी गुलाम अली सिराज अली (रा. परळीवैजनाथ, जि. बीड) व आरोपी अरबाज अली युसुफ अली (रा. भुसावळ, जि. जळगाव) हे दुचाकीवर आले आणि त्यांनी फिर्यादीला हिसका देऊन फिर्यादीचा २० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून पळून गेले. फिर्यादीने आरडाओरड केल्यानंतर लोकांनी दोन्ही आरोपींना सुदर्शन नगर चौकात पकडून पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोन्ही आरोपींना गुरुवारी अटक केली. त्यांना कोर्टात हजर केले असता शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील जे. एस. जाधव यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घाटीत आंतरवासितांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरुच

$
0
0

औरंगाबाद : विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी आंतरवासितांनी सुरू केलेला संप गुरुवारीही सुरुच होता. मात्र संपाचा कोणताही परिणाम रुग्णसेवेवर झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाच हजार ८०० रुपयांवरुन १२ हजार रुपयांपर्यंत विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी 'असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटनर्स' (अस्मी) या संघटनेच्या वतीने राज्यभरात संप सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत घाटीतील १९० पैकी १७ आंतरवासिता डॉक्टर कामावर असून, इतर १७३ कर्मचारी संपावर आहेत. या संदर्भात, आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप सुरुच राहणार आहे, अशी संघटनेने भूमिका घेतली असून, दुसऱ्या दिवशीही संप सुरुच होता. दरम्यान, आंतरवासितांच्या संपाचा घाटीतील रुग्णसेवेवर परिणाम झालेला नाही, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवस्थापन परिषद निवडणूक आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवडणूक शुक्रवारी होणार आहे. प्राचार्य, पदवीधर, संस्थाचालक आणि अध्यापक गटात चुरशीची लढत होणार आहे. निवडणुकीत ७० मतदार असून प्रभारी अधिकाऱ्यांनाही मतदानाची संधी मिळाली आहे.

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. व्यवस्थापन परिषदेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उत्कर्ष पॅनल आणि विद्यापीठ विकास मंच यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. आठ जागांपैकी चार जागेवर बिनविरोध उमेदवार निवडण्यात आले. यात तीन उमेदवार उत्कर्ष पॅनलचे आहेत. तर प्राचार्य (ओबीसी) जागा विद्यापीठ विकास मंचने ताब्यात घेतली. प्राचार्य (सर्वसाधारण) प्रवर्गात 'उत्कर्ष'चे डॉ. जयसिंग देशमुख आणि मंचचे डॉ. सुभाष टकले यांच्यात लढत होईल. पदवीधर (सर्वसाधारण) प्रवर्गात प्रा. संभाजी भोसले आणि डॉ. नरेंद्र काळे या 'उत्कर्ष'च्या उमेदवारांचा समावेश आहे. संस्थाचालक गटात 'उत्कर्ष'चे कपिल आकात, भाऊसाहेब राजळे आणि संजय निंबाळकर यांच्यात लढत होईल. अध्यापक गटात 'उत्कर्ष'चे डॉ. राजाभाऊ करपे व विकास मंचचे डॉ. गोविंद काळे यांच्यात लढत होणार आहे. अधिसभा निवडणुकीत वर्चस्व मिळवलेल्या उत्कर्ष गटाने व्यवस्थापन परिषद निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे.

\Bखासगी हॉटेलात मतदारांची व्यवस्था

\Bमहत्त्वाचे मतदार गुरुवारी शहरात सायंकाळी दाखल झाले असून खासगी हॉटेलात त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ७६ मतदार असून पाच जागा रिक्त आहेत. राज्यपाल मतदानाला येण्याची शक्यता नसल्यामुळे ७० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठक झाल्यानंतर दुपारी १२ वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे. तर दुपारी दोन वाजता निकाल जाहीर करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


औरंगाबाद दुबई विमान लवकरच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

फ्लाय दुबई कंपनीची 'औरंगाबाद ते दुबई' विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सिव्हिल एव्हिएशन विभागाकडे दाखल करण्यात आला आहे. लंकन एअरवेज विमानसेवाही औरंगाबादला सुरू करण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू आहेत.

शहरात एका खासगी कार्यक्रमासाठी नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू शहरात आले होते. यावेळी शहरातील उद्योजकांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवा औरंगाबादहून सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर या प्रस्तावाबाबत औरंगाबादच्या उद्योजकांची दिल्लीत नागरी उड्डयन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योगपती राम भोगले, उल्हास गवळी, मुनीष शर्मा, आशिष गर्दे यांची उपस्थिती होती. यावेळी नागरी उड्डयण मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अंकुर गर्ग, कार्गो सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. के. मेहरोत्रा, दीपक सेजवान, वंदना अग्रवाल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी औरंगाबाद विमानतळावरील कार्गो सेवा सुरू करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी आगामी १५ दिवसांत कार्गो सुरू करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत शिष्टमंडळाला दिले.

या बैठकीत औरंगाबाद शहर बुद्धिस्ट सर्किटशी जोडल्यानंतर बौद्धगयाला येणारी विमाने औरंगाबादला येण्याची शक्यता असल्याची माहिती उद्योजकांनी दिली. यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेतल्यास औरंगाबादहून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू होण्यास अडचण राहणार नाही, अशीही माहिती गर्ग यांनी शिष्टमंडळाला दिली.

औरंगाबादहून फ्लाय दुबई या विमान कंपनीचा प्रस्ताव आला असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे आगामी काळात सीएमआयए तसेच शहरातील उद्योगपतींच्या पुढाकारामुळे ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

ओपन स्काय नीती अंमलात आणा

सार्क देशांनी ओपन स्काय ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्क देशामधील कोणतेही विमान देशात उतरू शकते. ही योजना अंमलात आणून लंकन एअरवेजसारख्या कंपनीचे विमान औरंगाबादला उतरू शकते, अशी माहितीही अरूण गर्ग यांनी दिली.

…………उद्योगपती पुढाकार घेणार

औरंगाबादच्या उद्योग वाढीसाठी स्थानिक उद्योगपतींनी पुढाकार घेतला आहे. स्कोडा, इंड्रेस हाऊजरसारखे उद्योग औरंगाबादला आणण्यात यश आले आहे. शहरातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाची दिल्लीतील बैठक यशस्वी झालेली आहे. आगामी काळात सूरत पॅटर्न राबवून औरंगाबाद शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू

उल्हास गवळी, उद्योजक, औरंगाबाद

फ्लाय दुबईचा असा आहे प्रस्ताव

- प्रस्ताव १ जुलै ते १७ ऑक्टोबर काळासाठी

- दर महिन्यास १ ते ७ तारखेदरम्यान विमानाचे उड्डाण

- दुबईहून औरंगाबादकडे उड्डाण : सकाळी ८.३०

- औरंगाबादला पोहोचण्याची वेळ दुपारी १२.५०

- औरंगाबादहून दुबईकडे उड्डाण - दुपारी ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा परिसरात पुन्हा मंगळसूत्र चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरात दुचाकीस्वार चोरट्याने महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण लांबवले. हा प्रकार गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास वाजता घडला. महिलेच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडून सहा जून रोजी मंगळसूत्र पळवण्यात आले होते. त्याच प्रकाराची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रेखा अभिजीत काकडे (वय ३०, रा. वृंदावन कॉलनी, सातारा परिसर) यांनी तक्रार दिली. काकडे या ११च्या सुमारास त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा राजवीर याला आणण्यासाठी मोपेडवर शाळेत गेल्या होत्या. त्याला शाळेतून घेऊन त्या परत येत होत्या. यावेळी बँक कॉलनीत (गट क्रमांक ९२, प्लॉट क्रमांक ६३) त्यांच्या मोपेडच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर एक दुचाकीस्वार आला. या दुचाकीस्वाराने काकडे यांच्या दुचाकीला धक्का दिला. यामुळे काकडे दुचाकीसह खाली कोसळल्या. यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पलायन केले. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काकडे यांना मदत केली, मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार पसार झाला होता. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bअसे आहे चोराचे वर्णन \B

या मंगळसूत्र चोर अंदाजे २० ते २२ वर्षे वयोगटातील आहे. त्याला ढेरी असून, अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला आहे. त्याच्या जवळ काळ्या रंगाची दुचाकी आहे.

\Bचोरीची पध्दत एकच\B

सहा जून रोजी सकाळी मयुरी मुडेपल्ली (वय ३२, रा. ज्योती प्राईड, सातारा परिसर) या शिक्षिकेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यानी लंपास केले होते. रेखा काकडे यांच्याप्रमाणेच मुडेपल्ली यांच्या दुचाकीला देखील धक्का देऊन खाली पाडण्यात आले होते. गुरुवारी देखील चोरट्याने अशाच पद्धतीने मंगळसूत्र पळवल्याने दोन्ही प्रकरणातील आरोपी एकच असल्याची शंका व्यक्त होत आहे.

\Bनागरिकांना सहकार्याचे आवाहन\B

हा मंगळसूत्र चोर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही व वर्दळ कमी आहे, असे ठिकाण हेरून मंगळसूत्र पळवत आहे. परिसरातील नागरिकांना अशा कोणी संशयित व्यक्तीविषयी माहिती असल्यास गुन्हे शाखा किंवा सातारा पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरतीची पुन्हा चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (एडीसीसी) नोकर भरतीमुळे चांगलीच अडचणीत आली आहे. बँकेत २००१ ते २००३ या कालावधीत झालेल्या ३१५ उमेदवारांच्या भरतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. यामुळे बँकेच्या अडचणी वाढल्या आहेत.

जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष रामकृष्णबाबा पाटील, संचालक नितीन पाटील यांना बेकायदा नोकर भरती प्रकरणात अटक झाली होती. विद्यमान अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासह इतर संचालक व अधिकारी, अशा ३० जणांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मध्यंतरी हे प्रकरण मागे पडले होते. राज्य सरकारने गेल्या महिन्यांत आदेश दिल्यामुळे बँकेच्या अडचणी वाढणार आहेत.

गैरमार्गाने नोकरी मिळविणाऱ्यांना सेवेत राहण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २००७मध्ये दिला होता. त्याचा आधार घेत अॅड. सदाशिव गायके यांनी बँकेतील ही नोकर भरती रद्द करावी, अशी मागणी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे १९ मार्च व १२ एप्रिल रोजी केली होती. त्यानंतर देशमुख यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. औरंगाबाद जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्थेने ११ जून रोजी पाठविलेल्या पत्रात, सहकारी कायद्यानुसार समिती नेमली आहे. त्यात एस. के. गायके, यू. पी. जोशी, डी. एच. चव्हाण या वर्ग दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने दहा दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आहेत.

\Bमान्यता ३००ची भरती ४५०

\Bजिल्हा बँकेला ३०० पदांच्या भरतीची मान्यता होती. प्रत्यक्षात ४५० पदे भरली गेली. भरतीत नियम पाळले गेले नव्हते. पदवीधर शैक्षणिक पात्रता असलेल्या पदावर बारावी, बारावी पात्रतेच्या पदावर दहावी उत्तीर्ण उमेदवार घेण्यात आले. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप बँक पदाधिकाऱ्यांवर झाला होता. याप्रकरणी पुन्हा एकदा सविस्तर चौकशी होणार असल्याने जिल्हा बँकेची अडचण होणार आहे. मुलाखती देणाऱ्या परंतु नोकरीस न लागलेल्या उमेदवारांकडून पैसे घेतल्याचाही आरोप आहे. उमेदवारांच्या गुणांमध्ये खाडाखोड करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेबांना टार्गेट करण्याचा सरकारचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

'भीमा कोरेगाव येथे झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडेंना अटक करण्यात आलेली नाही. उलटपक्षी आंबेडकरी नेत्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. सध्याचे सरकार बाळासाहेब आंबेडकरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहे', असा आरोप पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

या पत्रकार परिषदेत अॅड. जे. के. नारायण, गणेशराव पडधन गुरूजी, लक्ष्मण कांबळे, मिलिंद मोकळे, अशोक जाधव, रविनाथ भजन, विजया लासगावकर, कैलास हिवराळे, सुभाष गवारे, संतोष पठारे आदींची उपस्थिती होती.

यावेळी आटोटे यांनी सांगितले की, 'भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना अटक करण्यात सरकार दिरंगाई करीत आहे. या निषेधार्थ राज्य व्यापारी जवाब दो आंदोलन उभारले जाणार आहे. ४ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या नक्षलवादाच्या नावाखाली आंबेडकरी नेत्यांना अटक करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे निदंनीय आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या केसाला धक्का लागला तरी आंबेडकरी जनता शांत बसणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेने ८५ कंत्राटी कर्मचारी काढले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेतील विविध विभागात कंत्राटी पदावर काम करणाऱ्या तब्बल ८५ कर्मचाऱ्यांना महापालिकेने काढले आहेत. यामध्ये विविध विभागात संगणक कक्षामध्ये काम करणारे; तसेच यांत्रिकी, पाणीपुरवठा व आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत. येत्या काही दिवसांमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या आणखी कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार असून, महिन्याभरात उर्वरित कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अतिरिक्त असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेतून कमी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दिले होते. त्यानुसार विविध विभागांनी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते. महापालिकेच्या विविध विभागातील संगणक कक्षात काम करणारे ४१, यांत्रिकी व पाणीपुवठा विभागातील प्रत्येकी २०, आरोग्य विभागातील चार कर्मचाऱ्यांना शुक्रवारी कामावरून कमी करण्यात आल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. शहरात कचराप्रश्न निर्माण झाल्यानंतर काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना घनकचरा विभागात काम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

महापालिकेत विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. पदभरतीही होत नसल्यामुळे अनेक विभागांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. सध्या महापालिकेच्या विविध सहा विभागांमध्ये तब्बल १२५० कंत्राटी कर्मचारी काम करतात. कंत्राटी पदांवर काम करणाऱ्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक, जवळचे कार्यकर्त्यांना संधी मिळाली. कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी अनेक ठिकाणी कर्मचारी अतिरिक्त आहेत अशी महापालिकेत चर्चा सुरू होती. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी सर्व विभाप्रमुखांना पत्र पाठवून कंत्राटी कर्मचारी किती आहेत, आपल्याला किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे व अतिरिक्त कर्मचारी किती याची माहिती मागवून घेतली होती.

महापालिकेला कर्मचारी पुरवण्याचा कंत्राटदारासोबतचा करार पुढील महिन्यात संपत आहे. त्यासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार नाहीत, हे आयुक्तांनी स्पष्ट केल्यामुळे पुढील महिन्यातही या कर्मचाऱ्यांना घरी जावे लागण्याची शक्यता आहे.

\Bमहापौरांचे रिक्त जागांकडे बोट\B

यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, महापालिकेत वर्ग-एक ते वर्ग-चारची सुमारे साडेसहाशे पदे रिक्त आहेत. अशा स्थितीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करावी लागली. आकृतीबंध मंजूर न झाल्यामुळे ही वेळ आली. महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे याच महापालिकेची बचतच होते, मात्र कुठल्या विभागात कर्मचारी अतिरिक्त ठरत असतील, तर ही जबाबदारी प्रशासनाची आहे. भरती प्रक्रिया होईपर्यंत; तसेच आकृतीबंध मंजूर होऊन येईपर्यंत याबाबत आयुक्तांनी भूमिका ठरवावी. आयुक्तांनी केवळ अतिरिक्त कर्मचारी कमी केले आहेत, ही प्रशासकीय बाब आहे. येत्या काही दिवसांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचा करारही संपुष्टात येणार आहे. नवीन धोरणानुसार पुढील कार्यवाही होईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images