Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

'विरोधी पक्षाला अर्थशास्त्राच्या पुस्तकांची गरज'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात ४७ वर्षे २ महिने १ दिवस काँग्रेसची सत्ता होती. आम्ही गेल्या साडेतीन, पावणेचार वर्षांत सत्तेत आहोत. तरी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याकडून अधिकचे काम अपेक्षित आहे, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले काम करत आहोत, पण त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास कमी आहे. त्यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींना स्वागताच्या वेळी फुलाऐवजी अर्थशास्त्राची पुस्तके देण्याची आवश्यकता आहे, असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगाविला.

वन विभागातर्फे राज्यात १३ कोटी वृक्षालागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. यासंदर्भात आढावा बैठकीस आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याचा आरोप होत आहे, याबाबत काय असे विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, " राज्यावर ४ लाख ६१ हजार कोटींचे कर्ज असल्याचे म्हटले जाते. याबाबत अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची गरज आहे. जीएसडीपी च्या तुलनेत किती कर्ज आहे, हे पाहिले तर अनेक गोष्टी समोर येतील. मागच्या सरकारच्या काळात १५ वर्षे जीएसडीपी २५.२ टक्के होता. आता १६.५ टक्के आहे. याचा अर्थ कर्जभार कमी झाला आहे. दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. विकासदर वाढला आहे. कृषी क्षेत्रात २२ टक्क्यांची वाढ आहे. त्यांच्या काळात कृषी क्षेत्राचा विकास खुंटला होता. सर्व क्षेत्रात सरस कामगिरी करत आहोत.मी विधीमंडळात याबाबत खुलासा केला. तेव्हा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मंडळींना काही आक्षेप नव्हता. जेव्हा काहीच मुद्दे उरले नाहीत, तेव्हा अशा गोष्टी पसरवल्या जातात. त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास कमी आहे. अधिक अभ्यास व्हावा, यासाठी अर्थशास्त्राची पुस्तके भेट देण्याची आ‌वश्यकता आहे," असा टोला त्यांनी लगाविला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, नारायण कुचे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्थायी समिती सदस्यांची निवड रद्द करण्यासाठी याचिका

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्य नियुक्तीची प्रक्रिया नियमांना धरून न झाल्याने ही सभा रद्द करण्याची तसेच या सभेमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्थायी समिती सदस्यांची निवड रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

नगरसेवक कैलास गायकवाड यांनी ही याचिका केली आहे. दरवर्षी स्थायी समितीमधील आठ सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती होते. यामध्ये महापालिकेत असलेले विविध नोंदणीकृत मान्यताप्राप्त गटांचे नेते हे त्यांच्या गटातील सदस्यांची निवड करून त्यांची नावे विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी नगरसचिवांकडे बंद लिफाफ्यात देतात तसेच सभेमध्ये तीच नावे असलेला लिफाफा महापौरांना देतात. दोन्ही लिफाफे उघडून महापौर सदस्यांची निवड घोषित करतात.

औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेना आणि अपक्ष यांचा एक गट असून गटनेता राजेंद्र जंजाळ, भाजपचा एक गट असून गटनेता भगवान घडामोडे, एमआयएमचा एक गट असून गटनेता जावेद सिद्दीकी आणि एक गट शहर विकास आघाडीचा असून गटनेते गजानन बारवाल आहेत.

सदस्य निवडीच्या सभेपूर्वी शहर विकास आघाडीतर्फे कैलास गायकवाड आणि गोकुळ मलके यांची नावे निश्चित करण्यात आली होती. मात्र, विशेष सर्वसाधारण सभेला आघाडीचे गटनेता गजानन बारवाल अनुपस्थित राहिले आणि महापौरांनी गजानन बारवाल आणि सत्यभामा शिंदे यांची निवड झाल्याचे घोषित केले. याला नगरसेवक राजू शिंदे यांनी आक्षेप घेतला असता, या सदस्यांची नावे असलेला लिफाफा आपल्याला आधीच प्राप्त झाल्याने त्यांची नावे जाहीर केल्याचा खुलासा त्यांनी केला. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे देखील सभेला अनुपस्थित होते. त्यांनीही लिफाफा दिला नसताना त्यांच्या दोन सदस्यांची नावे घोषित करण्यात आली. भाजपच्या गटनेत्यांनीही नावांचा लिफाफा दिला नसताना त्यांच्या गटातील दोन नावे घोषित करण्यात आली.

या सर्वसाधारण सभेचे सर्वच कामकाज बेकायदा झाले असल्याने ती रद्द करावी, त्याच अनुषंगाने नियुक्त सदस्यांची निवडही रद्द करावी आणि नव्याने सदस्य नियुक्ती करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये राज्य शासन, महापालिका आयुक्त, महापौर, सर्व गटनेते आणि नवनियुक्त सदस्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेची सुनावणी २० जूनला होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरप्रकार अहवाल खंडपीठात

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

चोवीस कोटींच्या रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराबद्धल नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नवी मुंबई महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदे आणि नगरविकास विभागाचे उपसचिव या समितीने उच्च न्यायालयाच्या २६ एप्रिल २०१८ च्या आदेशानुसार पालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांची कार्यशैली आणि कार्यप्रणालीची चौकशीचा अहवाल शुक्रवारी (१५ जून) खंडपीठात सादर केला. न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. के. कोतवाल यांनी या याचिकेची सुनावणी २६ जून रोजी ठेवली आहे.

रस्ते निविदा प्रक्रिया प्रकरणाचा सीलबंद अहवाल १३ जूनलाच सादर केल्याचे औरंगाबाद खंडपीठातील सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी कोर्टाला सांगितले. त्या अहवालाची प्रत महापालिकेला सुद्धा देण्याची व लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली. अहवालाची प्रत पालिकेला मिळाल्यास योग्य ते आदेश होण्यासाठी तत्काळ सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. नगरसेवक विकास एडके यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात यापूर्वी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून मनपातील शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या चुकांमुळे महापालिकेचे एक कोटी ६७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला होता. त्याअनुषंगाने काही अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. मात्र यापूर्वीचा प्राथमिक चौकशी अहवाल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. तर खातेनिहाय चौकशीसाठी नियुक्त अधिकारी हा उपजिल्हाधिकारी या संवर्गातील म्हणजेच प्राथमिक चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे करून त्या अहवालाआधारे होणारी खातेनिहाय चौकशी कनिष्ठ अधिकाऱ्यामार्फत होणे हे कायदा व नियमाला धरून नाही, हा याचिकाकर्त्याचा आक्षेप स्वीकारून उच्च न्यायालयाने विभागीय चौकशी स्थगित केली आहे. प्रधान सचिवांच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानंतर न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार विभागीय चौकशी होणार आहे. याचिकाकर्त्याच्यावतीने नितीन त्रिभुवन, बी. एल. सगर किल्लारीकर, शासनातर्फे सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे आणि महापालिकेतर्फे असिस्टन्ट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे हे काम पाहत आहेत.

\Bसध्या चौकशी स्थगित

\Bविभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून पालिकेतील शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या चुकांमुळे पालिकेचे एक कोटी ६७ लाखांचे नुकसान झाल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला होता. यापूर्वीचा प्राथमिक चौकशी अहवाल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. प्राथमिक चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे करून त्या अहवालाआधारे होणारी खातेनिहाय चौकशी कनिष्ठ अधिकाऱ्यामार्फत होणे हे कायदा व नियमाला धरून नाही, हा याचिकाकर्त्याचा आक्षेप स्वीकारून उच्च न्यायालयाने विभागीय चौकशी स्थगित केली आहे.

\B

रस्ते पुराण

\B- २६ एप्रिल २०१८

- अहवाल देण्याचे आदेश

- १५ जून २०१८

- कोर्टात अहवाल सादर

- २६ जून २०१८

- याचिकेवर पुढील सुनावणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘झलक दिखलाजा’मध्ये प्रकटले आई- मुलाचे नाते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रॅम्प वॉक, स्टेजवर आपण आजवर अनेक जोड्या पाहिल्या. त्यांना दाद दिली. टाळा वाजवल्या. आज झालेल्या कार्यक्रमात मात्र आईसोबत मुलांनी रॅम्प वॉक केला. तर कुणी नृत्याद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आई-मुलाचे हे धम्माल सादरीकरण पाहून रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिला.

तापडिया नाट्य मंदिरामध्ये शुक्रवारी 'झलक दिखलाजा' कार्यक्रम घेण्यात आला. महेशनवमीच्या निमित्ताने माहेश्वरी बहू मंडळाच्या वतीने आई व मुलांच्या जोडीसोबत हा कार्यक्रम घेतला. यावेळी माहेश्वरी बहू मंडळाच्या अध्यक्ष प्रेरणा मंत्री, अर्चना काबरा, राजेश्री बाहेती, मीना सोनी, रूपाली सोनी, अर्पिता दरख, राजेश्री बाहेती, सीमा दरख, पूनम सारडा उपस्थित होत्या. इंट्रोडक्शन, कॅट वॉक, गेम टास्क व जोडीनेच नृत्य असे राउंड यात होते. आई-मुलगी किंवा आई आणि मुलगा अशी स्पर्धेची अट होती. आदिती तोष्णीवाल व नेहा दरक यांनी परीक्षण केले. आई व मुलाच्या नात्याला व्यक्त करताना स्पर्धकांनी सुंदर परफॉर्मन्स दिले. अर्चना तोष्णीवाल, शीतल दहाड, दीपिका बांगड, कल्पना भूतडा आदींनी सहकार्य केले. माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद तोतला, सचिव अनिल बाहेती, गोपाल जाजू, नितीन तोष्णीवाल, महिला मंडळाच्या अध्यक्ष रेखा मालपाणी, मीना नावंदर, रेखा राठी, माधुरी धुप्पड, शोभा बागला, तारा सोनी, सूर्यमाला मालपाणी, पुष्पा सोमाणी यांनी मार्गदर्शन केले.

\Bस्पर्धेतील विजेती

\Bमोठा गट - दीपाली कलंत्री, नीती भट्टड, वैशाली करवा

लहान गट - भाग्यश्री सोनी, स्मिता जेठलिया, मनीषा लोया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंबेडकरांच्या नावामागे 'महाराज' जोडले

$
0
0

औरंगाबाद:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यवाहक रजिस्ट्रारने आंबेडकरांच्या नावामागे 'महाराज' शब्द जोडल्याने या रजिस्ट्रारला निलंबित करण्यात आले आहे. सिनेटच्या बैठकीत सदस्यांनी हंगामा केल्यानंतर कुलगुरुंना ही कारवाई करावी लागली.

साधना पांडे असं या कार्यवाहक रजिस्ट्रारचं नाव आहे. सिनेट सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी पत्रकारही उपस्थित होते. या बैठकीला संबोधित करताना पांडे यांनी आंबेडकरांच्या नावामागे 'महाराज' शब्द जोडला. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेल्या सिनेट सदस्यांचा पारा चढला आणि त्यांनी बैठकीत प्रचंड गोंधळ घातला. पांडे यांनी हेतूपुरस्सर आंबेडकरांच्या नावामागे 'महाराज' हा शब्द जोडला असून त्या उजव्या विचारसरणीच्या असल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केले. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी सिनेट सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे कुलगुरू बी. चोपडे यांनी अखेर पांडे यांना निलंबित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात ‘सीएं’ची कमतरता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अर्थव्यवस्थेचा विस्तार लक्षात घेता देशात चार्टर्ड अकाउंटंट्सची मोठी गरज आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात फिरणारे एकीकडे आणि दुसरीकडे 'सीए'ची कमतरता अशी स्थिती आहे,' असा दावा शनिवारी अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केला. ते दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.

'आयसीएआय'च्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली. संस्थेच्या सभागृहात उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर 'आयसीएआय'चे उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, केंद्रीय परिषद सदस्य अनिल भंडारी, उमेश शर्मा, सचिन लाठी यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे राज्यमंत्री शुक्ला म्हणाले, 'सीए देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहेत. 'जीएसटी'नंतर उद्योजक, व्यापारी आधी 'सीएं'कडे गेले. देशभरात औद्योगिक विस्तार, 'जीएसटी'सारखी धोरणे विचारात घेत 'सीएं'ची संख्या मर्यादित आहे. दोन, तीन टक्केच विद्यार्थीच उत्तीर्ण होत आहेत. ज्या देशातील एका राज्यामध्ये ५० ते ६० हजार विद्यार्थी लाखो रुपये खर्च करून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरतात. तेथे तीन लाख सीए हा आकडा भूषणावह नाही. ही संख्या वाढण्याची गरज आहे. 'जीएसटी' लागू करण्यापासून त्यात काय अडचणी आल्या याचा मी साक्षीदार आहे. तुम्ही सुचवलेले बदल मान्य केले. एकाहून एक सुविधा देण्यावर केंद्र सरकारचा भर आहेत. परंतु, त्या नागरिकांना त्याचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात,' असे शुक्ला म्हणाले. उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड यांनी आपल्या भाषणात विविध मागण्या, प्रश्न मांडले.

\Bविश्वासार्हता वाढवा

\B'सीएं'नी आपली विश्वासार्हता वाढवली, उद्योजक, व्यवसायिकांना योग्य दिशा दाखवली तर देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. 'जीएसटी'मध्ये आम्ही महिन्याला रिटर्न भरण्याची आम्ही सुविधा दिली, परंतु अपेक्षित तेवढे रिटर्न मिळत नाही. योग्य ते रिटर्न मिळत नसेल तर, सरकारला कर कसा मिळेल ते सांगा. तुमचा व्यवसाय हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही उद्योजक, व्यावसायिकांना योग्य तो मार्ग दाखवा, त्यातच देशाचे भले आहे,' असे आवाहनही शुक्ला यांनी यावेळी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाकडीचे ‘राजकारण’ तापले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाकडी येथे दलित मुलांना विहिरीत पोहण्याच्या कारणावरून घडलेली मारहाणीची घटना पुरोगामी महाराष्ट्राची मान खाली घालणारी आहे. पण, हा वाद दलित-सवर्ण नाही. या घटनेचे काही लोक राजकारण करीत आहेत अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. तर वाकडीतील मारहाणीची घटना जातीयवादातूनच घडली आहे. केंद्र व राज्यात भाजप सत्तेत येताच दलितांवर अत्याचार वाढल्याची टीका माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केली. वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी घटनेची निराळी कारणे सांगितली.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी वाकडी (जि. जळगाव) येथे पीडित मुलांची भेट घेतली. या दौऱ्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी वाकडीच्या घटनेचे विरोधक राजकारण करीत असल्याची टीका केली. 'विहिरीत पोहल्यामुळे १० जून रोजी विहिरीचा मालक ईश्वर जोशी याने दोन मातंग मुलांना मारहाण केली. विहिरीत बरीच मुले पोहत होती. इतर मुले पळाल्यानंतर या दोघांना पकडण्यात आले. त्यांना केलेली मारहाण महाराष्ट्राला बदनाम करणारी आहे. या मुलांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक लाख रुपये आणि रिपाइंच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रुपये मदत केली. तसेच संबंधित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्याची सूचना केली' असे आठवले म्हणाले. वाकडी गावातील वाद दलित-सवर्ण नसून पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहल्याने हा प्रकार घडला. अर्थात, नग्न करून मारहाण करणे निषेधार्ह आहे. या प्रकरणात ईश्वर जोशी आणि सोन्या लोहार यांना पोलिसांनी अटक केली. पण, विरोधक घटनेचे राजकारण करीत आहेत असा आरोप आठवले यांनी केला.

\Bघटना जातीयवादातून : हंडोरे

\Bमाजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी वाकडीची घटना जातीयवादातूनच घडल्याचे सांगितले. वाकडी येथे दौरा केल्यानंतरही हंडोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. 'विहिरीत १०-१२ मुले पोहत असताना फक्त दोघांना मारहाण करण्यात आली. कारण ते मातंग जातीचे होते. घटना घडलेली विहीर एक असताना पोलिसांनी दुसऱ्याच विहिरीचा पंचनामा केला. पोलिसांवरही राजकीय दबाव असल्याचे समोर आले. पीडित कुटुंबाला काँग्रेस व भीमशक्ती संघटना घर बांधून देईल' असे हंडोरे यांनी सांगितले. भीमा कोरेगाव दंगल, उना प्रकरणाने दलितांवर अत्याचार वाढल्याचे सिद्ध झाले. गेल्या चार वर्षात दलितांवर दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या असा आरोप हंडोरे यांनी केला. या पत्रकार परिषदेला दिनकर ओंकार, अॅड. डी. एस. पगारे, शांतीलाल गायकवाड, पंडीतभाई नवगिरे, किशोर जाधव, राहुल सावंत आदी उपस्थित होते.

\Bभिडेंच्या सभा बंद करा

\B'पुण्यातील एल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगलीचा संबंध नाही. ही दंगल पूर्वनियोजित होती. संभाजी भिडे यांच्याविरोधात पोलिसांना पुरावे सापडल्यास ते कारवाई करतील. तूर्तास, भिडे यांच्या सभांना परवानगी देऊ नये. आपल्या भाषणातून भिडे सामाजिक तेढ निर्माण करीत आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. धर्मनिरपेक्षतेला बाधा आणणारी भाषणे थांबविण्याची गरज आहे' असे आठ‌वले म्हणाले. तसेच, भिडे यांचा आंबा खाल्ला नसल्याचे आठवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी प्रवास पुन्हा महागला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अखेर घोषित केलेली एसटी प्रवासाची १८ टक्के दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली. त्यामुळे आता तिकिटाच्या प्रत्येक टप्प्यासाठी आकारण्यात येणारी सात रुपयांची रक्कम नऊ रुपयांवर पोहचली आहे. एसटी महामंडळाला तोट्याततून बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलले असून, त्यातून दीड हजार कोटींचा महसूल वाढेल असा दावा महामंडळातर्फे करण्यात येत आहे. डिझेल दरवाढ, कामगारांचा वेतन करार, सुट्या भागांचे दर आदी कारणामुळे एसटीवरील तोट्यात भार वाढत आहे. त्यामुळे ही दरवाढ करण्यात येत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले होते.

---

असे असतील नवे तिकीट दर

---

मार्ग साधी बस सेमीलक्झरी

दर नवीन/जुने नवीन/जुने

औरंगाबाद ते मुंबई - ४७८/ ४०४ ६४६/ ५५०

औरंगाबाद ते नाशिक - २५४/२१५ ३४३/२९२

औरंगाबाद ते बोरवली - ४७८/ ४०४ ६४६/ ५५०

औरंगाबाद ते अलिबाग - ४७०/ ३९८ ६३६/ ५४२

औरंगाबाद ते ठाणे - ४४१/ ३९८ ५९६/ ५०७

औरंगाबाद ते कोल्हापूर - ५८२/ ४९२ ७८८/ ६७१

औरंगाबाद ते पुणे - २९२/ २४७ ३९४/ ३३५

औरंगाबाद ते अहमदनगर - १४३/ १२१ १९२/ १६३

औरंगाबाद ते धुळे - १९५/१६५ २६३/ २२४

औरंगाबाद ते अकोला - ३२१/२७२ ४३४/३७०

औरंगाबाद ते अमरावती - ४४८/ ३७९ ४३४/ ३७०

औरंगाबाद ते नागपूर - ६३४/ ५३७ ८५९/ ७३१

औरंगाबाद - लातूर - ३७४/ ३१६ ५०५/ ४३०

औरंगाबाद ते उस्मानाबाद - ३२९/ २७८ ४४४/ ३७८

औरंगाबाद ते तुळजापूर - ३५९/ ३०३ ४८५/ ४१३

औरंगाबाद ते सोलापूर - ४१८/३५४ ५६६/४८२

औरंगाबाद ते जळगाव - २१०/ १७७ २८३/ २४१

औरंगाबाद ते भुसावळ - २४७/२०९ ३३३/२८४

औरंगाबाद ते नांदेड - ३६६/३१० ४९५/४२१

औरंगाबाद ते परभणी - २६२/२२२ ३५४/३०१

---

शिवशाही आणि व्हॉल्वोचे दर

---

मार्ग शिवशाही व्हॉल्वोचे दर

दर नवीन/जुने नवीन/ जुने

औरंगाबाद ते नाशिक ३७५/३१९ ------

औरंगाबाद ते बोरिवली ७१०/६११ ------

औरंगाबाद ते कोल्हापूर ८६५/६४२ ------

औरंगाबाद ते पुणे ------ ७७५/ ६६६

औरंगाबाद ते अहमदनगर ------ ३८०/ ३२५

औरंगाबाद ते अकोला ४७५/ ४०४ ------

औरंगाबाद ते नागपूर ९४०/ ८०८ ------

औरंगाबाद ते नांदेड ५४०/ ४६१ ------

औरंगाबाद ते मुंबई ७४०/ ६४९ ------

औरंगाबाद ते अजिंठा ------ ६९५/ ६०६ (राउंड ट्रिप -औरंगाबाद - अजिंठा - औरंगाबाद )

औरंगाबाद ते वेरूळ ------ ३४५/ २७६ (राउंड ट्रिप -औरंगाबाद - वेरूळ - औरंगाबाद )

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जगभर शांतता नांदावी; दैन्य दूर व्हावे!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जगात शांतता आणि सुव्यवस्‍था नांदावी, पीडितांना न्याय मिळावा, त्यांचे दैन्य दूर व्हावे अशी प्रार्थना करत शनिवारी छावणीतल्या इदगाह मैदानावर लाखो मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली. एकमेकांना शुभेच्छा देत शहरात मोठ्या उत्साहात ईद उल फित्रचा सण साजरा करण्यात आला.

इदगाह मैदानावर ईद उल फित्रच्या विशेष नमाजासाठी सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. नमाजपूर्वी विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच मुस्लिम धर्मगुरूंनी रमजान ईदचे धार्मिक महत्व या विषयी मार्गदर्शन केले. जमात-ए-इस्लामीचे इलियास फलाही यांनी कुराण शरीफनुसार जीवन जगण्याचे आवाहन केले. नुमांईदा कौन्सिलच्या मौलाना नुमान नदवी यांनी ठराव सादर केले. यात काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या दंगलीत दोन जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली. मौलाना नसिम मिफ्ताई रमजान ईदचे महत्व सांगितले. तसेच मौलाना मोईजोद्दीन फारूखी यांनी मुस्लिम बांधवांना वर्षभर रमजान महिन्यासारखी इबादत (प्रार्थना) कायम ठेवण्याचे आवाहन केले.

इदगाह येथे इदची नमाज जामा मशीदीचे मौलाना हाफिज जाकीर सहाब यांच्या नेतृत्वात अदा करण्यात आली. त्यानंतर जगात शांतता आणि सुव्यवस्‍था नांदो, पीडितांना न्याय मिळो, त्यांचे दु:ख दूर व्हावे अशी दुआ अल्लाहकडे करण्यात आली. या नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी इदगाह मैदानावर विशेष नमाज अदा केली. नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांशी नेत्यांनी भेट घेतली. यावेळी आमदार इम्तियाज जलील, आमदार सुभाष झांबड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती होती.

\Bपोलिस बंदोबस्त चोख

\Bछावणी इदगाह सह शाहशोक्ता इदगाह मैदान, रोजा बाग इदगाह आणि उस्मानपुरा इदगाह यासह शहरातील विविध मशीदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली. छावणी इदगाह मैदानावर येणाऱ्या भाविकांच्या गाड्यांच्या पार्किंगची ठिकठिकाणी सोय करण्यात आली होती. याशिवाय ईदच्या नमाजासाठी शहरात आणि इदगाह मैदानावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय पार्किंगची विशिष्ट सोय करण्यात आली. तसेच पोलिस बंदोबस्त उत्तम ठेवण्यात आला होता. महिन्याभराच्या उपवासानंतर रमजान ईदचा सण साजरा करण्यात येत असतो. रमजान ईदनंतर एकमेकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा देत आज शिरखुर्रमावर अनेकांनी ताव मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जावयाने सासऱ्याचं 'नाक' कापलं

$
0
0

लातूर:

बायको माहेरून परत येत नसल्यामुळे वैतागलेल्या जावयानं चक्क सासऱ्याचं नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडणाऱ्या या जावयाचा शोध सुरू केला आहे.

लातूरच्या भादा गावात ही घटना घडली. अनेकदा सांगूनही पत्नी माहेरी येत नसल्याने संतोष वैतागला होता. त्यामुळे तो पत्नीला माहेरी आणण्यासाठी भादा येथे आला होता. यावेळी त्याचे आणि त्याचे सासरे नागनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे रागाचा पारा चढल्याने संतोषने सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडला. त्यात नागनाथ शिंदे यांच्या नाकाचा शेंडा तुटला. त्यामुळे घाबरलेल्या संतोषने तिथून पळ काढला. तर नागनाथ यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याच्या टबात बुडून चिमुकलीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पाण्याच्या टबात बुडाल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला. हा प्रकार शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता दलालवाडीमध्ये घडला. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दलालवाडी परिसरात ईश्वर रतनलाल मेघावाले (वय ३५) हे पत्नी व दोन मुलीसह राहतात. मेघावाले यांची मोठी मुलगी साडेतीन वर्षांची असून दुसरी मुलगी पियू दीड वर्षाची होती. मेघावाले यांची पत्नी शनिवारी सायंकाळी स्वयंपाकघरात काम करीत होत्या, तर पियू घरात खेळत होती. खेळता खेळता पियू दुसऱ्या खोलीत गेली. तेथे पाण्याने काठोकाठ भरलेला टब ठेवलेला होता. खेळतांना तोल जाऊन पियू टबात पडली. तोंडाच्या दिशेने पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन पियू बेशुद्ध झाली होती. बराच वेळ झाला तरी पियू आली नसल्याने आईने दुसऱ्या खोलीत जाऊन पाहिले. यावेळी पियू पाण्यात बुडालेली दिसली. तातडीने तिला घाटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री नऊ वाजता तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजमाता जिजाऊंना अभिवादन

$
0
0

औरंगाबाद

राजमाता जिजाऊ यांच्या ३४० व्या पुण्यतिथीनिमित्त बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या टी. व्ही. सेंटर येथील विभागीय कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजित देशमुख यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

राजमाता जिजाऊ यांचे विचार आचरणात आणावे, असे यावेळी प्रदेश सचिव सुरेश वाकडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी प्रदेश सचिव सुरेश वाकडे, मधुकर कांबळे, मनोज गायके, प्रशांत शेळके, गिरीश झाल्टे, प्रकाश भोकरे, श्रीकांत गाडेकर, योगेश देशमुख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेकअप, हेअर स्टाईल प्रशिक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महिलांसाठी मेकअप व अॅडव्हान्स्ड हेअर स्टाईल प्रशिक्षणाचे आयोजन २५ जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले आहे. या वेळी दुल्हन मेकअप स्पर्धा होणार आहे. तसेच अलका चन्ने यांच्या 'सौंदर्य आराधना' या पुस्तकाचे प्रकाशन आसावरी जोशी व गौरव सिपाणी यांच्या हस्ते होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्योदय परिवारातील सूर्याचा झाला अस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सूर्येादय परिवारातील सूर्याचा अस्त झाला, अशा भावना व्यक्त करीत राष्ट्रसंत भय्यू महाराज यांना सूर्योदय परिवाराने श्रद्धांजली अर्पण केली. निराला बाजार परिसरात माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यावेळी अनेक भक्तांची उपस्थिती होती.

भय्यू महाराज यांनी अत्यंत दुर्दैवीरित्या आपले जीवन संपवले. हजारो मुलांना पोरके केले, भक्तांचा गुरू गेला, मुलांचा पिता गेला, लाखोचा पोशिंदा आमच्यातून निघून गेला, त्यांच्या ऐवढे काम कोणत्याही संताला जमत नव्हते, कर्म हेच श्रेष्ठ आहे, तुम्ही कर्म करा हीच शिकवण भय्यू महाराजांची होती, अशी भावना व्यक्त करीत वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ महाराज आंधळे यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. या सभेला सूर्योदय परिवार ट्रस्टचे प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, पृथ्वीराज पवार, अखिल अब्बास, रवी मुसळे, पटेल, विजय देशमुख, शोभा देशमुख, सुनिता आऊलवार, अशोक जैस्वाल, विजय कासलीवाल, सिताराम सुरे, गोपी घोडेले, रवि देशमुख, के.एम. पाटील, बाबासाहेब घुगे, अशोक मोटवाणी, सुभाष दत्तू पाटील, राधेश्याम वर्मा, कृष्णा भोसले, संदीप लिंगायत, राजू मिश्रा, जया गुदगे, ऋषिकेश जैस्वाल, अभिषेक कासलीवाल, ऋषिकेश सोनवणे व शुभम त्रिभुवन यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वाराकडून मंगळसूत्र चोरी

$
0
0

औरंगाबाद: लग्न समारंभ आटोपून घरी जाणाऱ्या एका महिलेच मंगळसूत्र हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराने हिसकवून पळ काढला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता बीड बायपासवरील छत्रपतीनगरमध्ये घडली. संध्या किरण नवगिरे या कल्याणी बालक मंदिराजवळून जात असताना त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील गंठणला झटका देत ओढले व भरधाव वेगात पोबारा केला. संध्या यांचे पती किरण यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोकळा परिसर असल्याने चोरांनी वेगात जात पोबारा केला. यात त्यांचे तीन तोळ्याचे गंठण चोरीला गेले असून रात्री उशिरापर्यंत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूसंपादनाला सक्तीची धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी सक्तीने भूसंपादन केले जाईल, या भीतीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचा विरोध आता मावळला असून, भूसंपादनामध्ये घरगुती वाद, मोजणी, सर्वेक्षणातील किरकोळ तक्रारी वगळता शेतकरी महामार्गासाठी जमीन देण्यास तयार झाल्याचे चित्र जिल्ह्यामध्ये आहे. समृद्धी महामार्गासाठी वर्षभरापूर्वी दरनिश्चिती झाल्यानंतर आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १६३० शेतकऱ्यांच्या १००३ हेक्टरचे (७३.२८ टक्के) भूसंपादन करण्यात आले असून, काही गावांमध्ये भूसंपादनाची शंभर टक्के प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद या तीन तालुक्यांत समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन सुरू आहे. वर्षभरापूर्वी दरनिश्चितीनंतर जुलै २०१७मध्ये जिल्ह्यात प्रशासनाला पहिली रजिस्ट्री करण्यात यश मिळाले. त्यानंतर मोठ्या खंडानंतर पुन्हा जमीन देण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार दर्शवला सध्या समृद्धी महामार्गासाठी तिन्ही तालुक्यांतून आवश्यक असलेल्या १३४७.७२ हेक्टरपैकी १००३ हेक्टरचे संपादन करण्यात आले आहे. यातील १२४ हेक्टर जमीन शासकीय आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी, कान्हापूर, फतियाबाद, तळेसमान, पालखेड, महालपिंप्री यांसह इतर काही गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांचा दराच्या तफावतीचा नाराजीचा सूर निवळला असल्याने आता जिल्ह्यातील भूसंपादन वेगाने होण्याची शक्यता आहे. काही गावांमध्ये शंभर टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; सध्या दररोज आठ ते दहा शेतकऱ्यांच्या संमतीने खरेदी करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी संयुक्त मोजणीच्यी अडचणी कायम असून, लवकरच या अडचणी सोडवण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. बागायती जमीन असताना मोजणीमध्ये ही जमीन हंगामी बागायती लावणे, विहिरीची, तसेच झाडांची नोंद न घेणे किंवा चुकीची नोंद घेणे आदी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

\Bसंयुक्त मोजणी संशयास्पद, शेतकऱ्यांच्या खेट्या सुरूच\B

वैजापूर तालुक्यातील अनेक गावांममधील समृद्धीबाधित शेतकऱ्यांची दर वाढवून मिळावेत; तसेच येथे करण्यात आलेली संयुक्त मोजणी उच्चस्तरीय संस्थेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी असून, यासाठी शेतकऱ्यांची उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये खेट्या सुरू आहेत. बागायती जमीन असताना मोजणीमध्ये जमीन हंगामी बागायती दाखवण्यात आली असल्याचेही अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

\B११०० कोटींचे जिल्ह्यात वाटप\B

संमतीच्या तुलनेत प्रशासनाकडून सक्तीने भूसंपादन झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे आता शेतकरी संमतीचा मार्ग अवलंबत आहेत. २५ मे रोजी कलम १५.२ अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार शासनाला शेतकऱ्यांकडून सक्तीने भूसंपादन करता येणार आहे. अधिसूचनेच्या २१ दिवसांच्या कालावधीपर्यंत (१५ जूनपर्यंत) शेतकऱ्यांना फायदा असलेल्या संमतीने सरळ खरेदी प्रक्रियेंतर्गत जमिनीचा व्यवहार करता येणार आहे, मात्र त्यांतर कलम १८ (१)नुसार अंतिम नोटीस निघाली नसल्यामुळे अद्यापही शेतकऱ्यांना फायद्याचा असलेला सरळ खरेदीचा मार्ग मोकळा आहे. ही नोटीस निघाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडून सक्तीने जमीन घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सक्तीच्या भूसंपादनाच्या भीतीमुळे व होणाऱ्या आर्थिक तोट्यामुळे विरोध करणारे अनेक शेतकरी आता जमीन देण्यासाठी संमती देत असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत समृद्धी बाधितांना सुमारे ११०० कोटी रुपयांचा मोबदल्याचे वाटप करण्यात आले आहे.

\Bजिल्हानिहाय भूसंपादन \B

जिल्हा.................टक्केवारी

नागपूर..................९५.२८

वर्धा.....................८८.४४

अमरावती..............८६.९९

वाशिम..................८८.२२

बुलडाणा...............८३.०६

जालना.................७४.३३

औरंगाबाद.............७३.२८

अहमदनगर...........७९.३९

नाशिक.................७१.५८

ठाणे.....................७९.७७

एकूण...................८०.८९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार बदलण्याची वेळ आणा

$
0
0

बामसेफ अधिवेशनाला प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'रोजगार हा जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. बेरोजगारीच्या मूळ कारणावरुन लक्ष हटविण्यासाठी सरकार व भांडवलदार वेगवेगळी कारणे सांगत आहेत. कामगार व बेरोजागारांबाबत सरकारी धोरणे बदलत नसतील तर सरकार बदलण्याची वेळ आणा' असे प्रतिपादन कामगार नेते रंजन दाणी यांनी केले. ते बामसेफ अधिवेशनात बोलत होते.

बामसेफच्या वतीने औरंगाबाद जिल्हा अधिवेशन घेण्यात आले. मौलाना आझाद संशोधन केंद्रात रविवारी दुपारी अधिवेशन झाले. या अधिवेशनाला कामगार नेते रंजन दाणी, अॅड. विजय वानखेडे, संतोष वीरकर, जे. एच. चव्हाण, स. सो. खंडाळकर व बबनराव नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 'मूलनिवासी समाजातील वाढत्या बेकारीसाठी प्रस्थापित शासकवर्ग व त्यांचा भांडवलदार वर्ग जबाबदार आहे' या विषयावर दाणी यांनी भाष्य केले. 'सध्या परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे बेरोजगारीचा भस्मासूर वाढला आहे. ट्रे़ड युनियन चळवळीने कार्यरत कर्मचाऱ्यांचा विचार केला. बेरोजगारांचा विचार केला नसल्यामुळे भांडवलदारी अधिक फोफावली. बेरोजगारांशी नाते सांगितल्याशिवाय चळवळ पुनरुज्जिवीत होणार नाही. राज्यकर्त्यांची धोरणे बदलण्यासाठी कामगार व बेरोजगारांना एकत्र आणावे लागेल. सरकार धोरणे बदलणार नसेल तर सरकार बदलण्याची वेळ आणा. चांगले जीवन जगण्याचा दर्जा असलेला रोजगार स्वप्न ठरला आहे' असे दाणी म्हणाले.

देशात विषमता वाढत असल्याची टीका अॅड. विजय वानखेडे यांनी केली. 'आरक्षण डावलून जिल्हाधिकारी निवडले जाणार आहेत. देशातील ३१४ जिल्हाधिकाऱ्यांसाठी कायदा समान नाही का ? जातबांधवांना व्यवस्थेत घुसवण्यासाठी हे ब्राह्मणी षडयंत्र आहे. आरक्षण डावलले गेले असूनही जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलन केले नाही. तुमच्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी राज्यसत्ता हाती घ्यावी लागेल असे वानखेडे म्हणाले. अधिवेशनाला जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरुंची समितीकडून चौकशी सुरू

$
0
0

दोन दिवस कागदपत्रे तपासली

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या चौकशीसाठी राज्य सरकारची समिती तिसऱ्यांदा विद्यापीठात येऊन गेली. दोन दिवसांच्या दौऱ्यात चौकशी समितीने खर्च ताळेबंद तपासला. परीक्षा विभागाकडून बारकोडींगबाबत कागदपत्रे मागवली.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर नियमबाह्य नियुक्त्या आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली आहे. मार्च महिन्यात नेमलेल्या समितीने मे महिन्यात चौकशीचे काम सुरू केले. माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीने शनिवारी (१६ जून) विद्यापीठात येऊन महत्त्वाची कागदपत्रे तपासली. परीक्षा विभागाकडून समितीने गोपनीय कागदपत्रे मागविली. यात बारकोडिंग आणि उत्तरपत्रिका निविदांची कागदपत्रे होती असे सूत्रांनी सांगितले. विद्यापीठाच्या खर्चाचा ताळेबंद असलेली कागदपत्रे समिती सदस्यांनी सोबत घेतली आहेत. पूर्ण चौकशी करुन समिती रविवारी रवाना झाली. व्यवस्थापन परिषदेची निवडणूक असल्यामुळे समितीने आपला नियोजित दौरा एक दिवस पुढे ढकलला होता.

उपोषण सुरूच

चौकशी समितीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी मराठवाडा विकास कृती समितीने केली आहे. याबाबत प्रा. दिगंबर गंगावणे मागील सहा दिवसांपासून विभागीय आयुक्तालय कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. चौकशी प्रक्रियेत चोपडे हस्तक्षेप करतील, असा आक्षेप गंगावणे यांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहरुख शेख ‘मिस्टर इंडिया’

$
0
0

औरंगाबाद - मॉडेलिंग फिल्ड अँड डान्स फेडरेशन यांच्या वतीने उज्जैन येथे 'मिस्टर अँड मिस इंडिया - २०१८' स्पर्धा घेण्यात आली. औरंगाबाद शहरातील शाहरुख शेख स्पर्धेत विजेता ठरला. या स्पर्धेत १०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पाच दिवस चाललेल्या स्पर्धेत स्पर्धकांची वेगवेगळी चाचणी घेण्यात आली. व्यक्तिमत्त्व आणि सामान्य ज्ञान या फेरीत शाहरुखने बाजी मारली. या स्पर्धेची उत्तम तयारी केली होती. स्पर्धा कठीण असूनही परिश्रमामुळे यश मिळाल्याचा आनंद आहे असे त्याने सांगितले. स्पर्धेचे संयोजक अभिषेक जोशी, सोनी जैस्वाल आणि राजकुमार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवतीभवती - मी आंबा खाल्ला नाही !

$
0
0

शीघ्रकविता आणि चारोळीसाठी रिपाइं नेते रामदास आठवले सर्वपरिचित आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर शनिवारी आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत कोरेगाव भीमा दंगलीच्या संदर्भाने त्यांनी संभाजी भिडे यांच्या सभांवर बंदी आणण्याचा मुद्दा मांडला. या गंभीर मुद्द्यानंतर त्यांनी 'मी भिडे यांचा आंबा खाल्ला नाही. त्यामुळे काय परिणाम होतात ते त्यांनाच विचारावे लागेल' असे म्हणताच हशा उसळला. माझ्या बागेतील आंबा गोड आहे असे त्यांनी सांगितले असते तर चालले असते. पण, भिडे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले अशी टीका आठवले यांनी केली.

(तुषार बोडखे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>