Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कन्नड तालुक्यात पेरण्या रखडल्या

$
0
0

कन्नड : तालुक्यात एक व दोन जून रोजी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी पडल्यानंतर अर्धा अधिक मृग नक्षत्र संपल्यावरही अद्याप पाऊस पडलेला नाही.  खरीप पेरणी अद्याप न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाणी नसल्याने अद्रक, हळद व कापूस पिकांची मान्सूनपूर्व लागवड यंदा दिसत नाही. या तीन पिकांसह तालुक्यात उडीद, मूग व मका पिकांची लागवड रखडली आहे. सतत चार वर्षांपासून कमी पाऊसमान, मोठे, लघु प्रकल्प व सिंचनाचे दरवर्षी घटते प्रमाण, यामुळे बसणाऱ्या आर्थिक फटक्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. यंदा अपेक्षित एक लाख ८३७ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत हमखास सिंचनाची सोय असलेल्या फक्त सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, अद्रक व मका लागवड करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. तालुक्यातील ३८ गावांना ३८ टँकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. यात देवगाव (रंगारी), हतनूर, चापानेर, ताड पिंपळगाव, नाचनवेल या प्रमुख गावांचा समावेश आहे. 

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीए परिषदेची सांगता; सातशे जणांचा सहभाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आयसीएआय'च्या दोन दिवसीय परिषदेची सांगता रविवारी (१७ जून) सीएम संस्थेच्या सभागृहात झाली. या परिषदेनिमित्त सातशेपेक्षा जास्त व्यक्तींनी परिषदेमध्ये सहभाग नोंदविला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुल्का यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले होते. दुसऱ्या दिवशी सीए गिरीश आहुजा, अॅड. कपील आहुजा, सीए हिमांशू किशनंदवाला, सीए उमेश अग्रवाल, सीए गंगाधूर बरुरे, सीए जितेंद्र खंडेलवाल आदींनी वेगवेगळ्या विषयांवर परिषदेत मार्गदर्शन केले आणि रविवारी सायंकाळी परिषदेची सांगता. परिषदेसाठी शहर शाखेचे गणेश शिलवंत, योगेश अग्रवाल, रविंद्र शिंदे, रेणुका देशपांडे, अल्केश रारवतका, रोहन अचलिया, सचिन लाठी आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंतरवासितांचा घाटीत संप सुरुच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंतरवासितांच्या मागण्या तोंडी मान्य केल्या; परंतु लिखित स्वरुपात मान्य न केल्यामुळे आंतरवासियांनी संप सुरुच ठेवला असून, घाटीतील १९० आंतरवासिता संपावर आहेत. विद्यावेतन ५ हजार ८०० रुपयांवरून १२ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याच्या मुख्य मागणीसाठी अस्मी संघटनेने सुरू केलेला संप पाच दिवसांपासून सुरुच आहे. लेखी आश्‍वासन न मिळाल्याने आम्ही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे संघटनेने म्हटले आहे. येत्या मंगळवारपर्यंत अर्थमंत्र्यांकडून लेखी आश्‍वासन मिळण्याची शक्यता आहे. ठोस आश्वासन मिळेपर्यंत संप सुरुच राहील, असे 'असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न'चे (अस्मी) सहसचिव डॉ. किशोर डुकरे

यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात दहा वर्षांपासून पाऊस आरंभशूर

$
0
0

पान एक अँकर

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

मराठवाड्यात नेहमीच आरंभशूर ठरत असलेल्या वरुणराजाने पुन्हा एकदा विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्याच्या प्रारंभापासून तुफान बरसलेला पाऊस गेल्या पाच दिवसांपासून नोंद घेण्यासारखाही बरसला नाही. मराठवाड्यात जून महिन्यात गेल्या दहा वर्षांपासून पावसाची अशीच स्थिती असून दरवर्षी जून महिन्यामध्ये सरासरी केवळ ११ दिवस पाऊस झाल्याची आकडेवारी सांगते.

२००८ ते १५ जून २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये गेल्यावर्षी सर्वाधिक १७ दिवस असा चांगला पाऊस झाला. तर सर्वात कमी म्हणजे केवळ ४ दिवस पाऊस जून २०१४ मध्ये झाला.

दुष्काळी मराठवाड्यामध्ये यंदा जून महिन्याच्या प्रारंभीपासुनच पावसाने जोरदार हजेरी लावली, औरंगाबाद, जालना जिल्हा वगळता १ जूनपासूनच मराठवाड्यावर कृपादृष्टी केल्याने यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, पहिल्या दोन आठवड्यात बरसल्यानंतर पावसाने दडी मारली. या कालावधीमध्ये विभागातील ४२१ मंडळांपैकी तब्बल २७० मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. मात्र, दुसरीकडे औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील ५९ मंडळांमध्ये सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झाला नसल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी ३१ मंडळात २५ टक्क्यांपेक्षा कमी, तर १३ मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी सात मंडळांमध्ये आतापर्यंत २५ टक्केही पाऊस झाला नाही, तर पाच मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. आता गेल्या पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत.

यावर्षी जून महिन्यात आतापर्यंत एकुण १०७ मिलिमीटर (वार्षिक सरासरीच्या तुलनेत १३.८ टक्के) पाऊस झाला आहे.

---.

वर्षनिहाय पाऊस

वर्ष..........................पावसाचे दिवस

२००८..........................१२

२००९..........................०९

२०१०...........................१६

२०११...........................०८

२०१२............................०८

२०१३............................१८

२०१४............................०३

२०१५............................१३

२०१६............................१५

२०१७............................१७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरची लागवड धोक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

पाऊस लांबल्याने सिल्लोड तालुक्यात लागवड केलेले अडीच हजार हेक्टरवरील मिरचीचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी धास्तवले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे मुळात नाजूक असलेले हे पीक मुबलक  पाण्याअभावी करपत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केली, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ते संकटात सापडले आहेत.

सिल्लोड तालुका निर्यातक्षम मिरची लाववडीसाठी आग्रेसर आहे. सात-आठ वर्षांपूर्वी काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर निर्यातक्षम मान्सूनपूर्व मिरचीची लगवड केली. नियोजन आणि कष्टाच्या बळावर या शेतकऱ्यांना मिरची पिकातून पैसा मिळाल्याने तालुक्यातील  इतर शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला प्राधान्य दिले. त्यामुळे तालुक्यात दरवर्षी प्रत्येक गावात मिरचीचा पेरा वाढत आहे. तालुक्यात आजघडीला शेतकऱ्यांनी अडीच हजार हेक्टरवर मान्सूनपूर्व मिरची लागवड केली आहे. पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात तालुक्यात मिरची लागवड केली जाणार आहे. खर्च करण्याची कुवत, पाण्याची  उपलब्धता, बाजारपेठेचा ठोकताळा यानुसार मे महिन्यापासून तालुक्यात शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे.

मिरची उत्पादनातून पैसा कमविण्याठी मान्सूनपूर्व मिरची लागवडी करण्यासाठी इतर पीक न घेता शेतकऱ्यांनी दिवाळी  पासूनच पाणी राखुन ठेवले होते. मात्र यावर्षी  तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. तरीही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनच्या साह्याने मिरची लागवड केली. या नाजूक पिकावर वातारणाचा परिणाम होऊ नये, निंदणी खुरपणीचा खर्च जास्त येऊ नये यासाठी मल्चिंग पेपरच्या सहाय्याने मिरची लावली. मिरची लागवडीसाठी शेत तयार करण्याकरिता नांगरणी, वखरणी, रेफ्रिजरेटर, शेणखताची मात्रा, ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, मिरची रोप आदीवर शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या विहिरीच्या पाण्याच्या भरवशावर मिरचीची लागवड केली त्यांच्या विहिरींनी केव्हाच तळ गाठला आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी दमछाक होत असतांना मिरची जगविण्यासाठी शेतकऱ्यांना मागेल त्या किंमतीत टँकरने पाणी आणून मिरचीला पाणी द्यावे लागत आहे.

\Bशेतकऱ्यांना भावाची चिंता \B

हवामान विभागाने मान्सून वेळेवर येणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड झाली. शेतकऱ्यांनी मिरची लावली तरी पावसाने पाठ फिरविल्याने या पिकाला मुबलक पाणी मिळत नाही. परिणामी, पाण्याअभावी झाडे करपत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मिरचीचा खर्च वाढला आहे. एवढे लाखो रुपये खर्च करून भाव किती मिळणार या चिंतेनेही शेतकऱ्यांना ग्रासले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माळी समाजातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज करावेत’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगपुरा येथील श्री संत सावता महाराज विद्यार्थी वसतिगृह येथे दहावीनंतर महाविद्यालय, व्यावसायिक शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या माळी समाजातील गरीब, होतकरू, शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या १३ वर्षांपासून मोफत वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी वसतिगृहामध्ये माहिती पुस्तिका उपलब्ध असून, त्यातील अर्जासोबत विद्यार्थ्यांनी जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत, विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आधार कार्डची सत्यप्रत, गुणपत्रिका, शेतजमिनीचा उतारा आणावा किंवा भूमिहीन असल्यास तसे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश पात्र मुलाखतीसाठी ११ ते ११.३० या वेळेत लेखी परीक्षा घेऊनच मुलाखत घेण्यात येईल. वसतिगृह प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी २४ जून रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत मुलाखतीसाठी पालकांसोबत येणे गरजेचे आहे. अर्जासोबत कोणाचीही शिफारस जोडू नये किंवा कोणी शिफारस केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांची यादी २६ जून रोजी वसतिगृहाच्या बोर्डवर लावण्यात येईल, असे वसतिगृहाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटिझन रिपोर्टर-१७जून

$
0
0

म्हसोबनगर

नवी 'डीपी' बसविली

हर्सूल टी पॉइंट भागातील म्हसोबा नगर व परिसरातील वीजपुरवठा अखंडित, सुरळीत राहावा याकरिता श्री म्हसोबा मंदिर जवळ नुकतीच नवीन डीपी सुरू करण्यात आली आहे. उपमहापौर विजय औताडे यांच्या विशेष पुढाकाराने आणि या भागाचे नगरसेवक बन्सी जाधव यांच्या प्रयत्नाने डीपी सुरू करण्यात आलेली आहे. डीपी नवीन असतानाही १६ जून रोजी या भागातील वीजपुरवठा रात्री खंडित झाला होता हे विशेष! आतातरी या भागातील वीजपुरवठा सुरळीत करून नागरिकांनी विद्युत खांबावर चालू बंद करण्यासाठी बसविलेले बटणे काढून आता विद्युत खांबावरील दिवे स्वयंचलित यंत्रणेने चालू, बंद व्हावेत, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन विजेचा अपव्यय होणार नाही याबाबत जागरूक राहावे, असे मत व्यक्त होत आहे.

- रवींद्र तायडे, हर्सूल

....

सिडको

पथदिव्यांचे खांब, केबल्सचा भार

आपल्या शहरात सर्वत्रच जुने पथदिवे काढून नवीन एलईडी दिवे बसविण्यात येत आहे. हे काम करताना त्यावरील केबल्स मात्र खालीच लोंबकळतांना दिसत आहेत. ते रस्त्यावर तुटूनही पडत आहेत. काही ठिकाणी असा गठ्ठा बांधून ठेवलेला दिसत आहे. या केबल्सच्या वजनामुळे मूळ खांबच उखडला जाऊ शकतो. योग्यप्रकारे ब्रँकेट लावून ही समस्या सोडवावी अन्यथा नुकसान व अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेने यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी.

- शरद लासूरकर, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावंडे, कटके यांना नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

निलंबित निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे; तसेच उपजिल्हाधिकारी देवेद्र कटके यांना निलंबनानंतर पुन्हा शासनसेवेत पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. गावंडे यांना परभणी येथे व कटके यांना जालना येथे रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिलिंग, वर्ग दोन जमिनींच्या विक्री व हस्तांतराला परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार वापरले. कागदपत्रे न तपासता विक्रीची नियमबाह्य परवानगी दिल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना सहा महिन्यांपूर्वी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केले होते.

कूळ, सिलिंग, इनाम, गायरान, महार हाडोळा व इतर हस्तांतरासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे जिल्ह्यात वर्ग दोन जमीन विक्री परवानगी आदेश देताना अनियिमितता झाल्याची तक्रार विभागीय आयुक्तांना प्राप्त झाली होती. यामुळे विभागीय आयुक्‍तांनी चौकशीसाठी दोन उपजिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार, नायब तहसीलदारांचा समावेश असलेल्या पाच अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली होती. या समीतीने आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून गावंडे, कटके हे नियुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्नात होते. कटके यांना जालना येथे विशेष भूसंपादन अधिकारीपदी आणि गावंडे यांना परभणी येथे विशेष भूसंपादन अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

कटकेंनी केले होते आयुक्तांवर आरोप

या प्रकरणात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी केला होता. आयुक्तांनी पैसे मागितल्याची व जातीवाद केल्याचेही या तक्रारीत म्हटले होते. यासंदर्भात त्यांनी पोलिस ठाण्यातही अर्ज दिला होता. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रारअर्ज पाठविला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

$
0
0

वाळूज महानगर: वाळूज महानगरमध्ये शनिवारी मिरवणूक काढून महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवराणा चौक ते महाराणा प्रताप चौक या दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी़ खासदार उत्तमसिंह पवार यांची उपस्थिती होती.

महाराणा प्रताप यांच्या जीवनावर पवार यांनी मार्गदर्शन केले. महाराणा प्रताप यांच्यापासून तरुणांनी प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजय केणेकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा नांदूरकर, अनिल चोरडिया, मीरा पाटील, राजू पाटील, विनोदसिंह राजपूत यांची प्रमुख  उपस्थिती होती़  यावेळी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तरुणांना व्यसनापासून  दूर राहण्याचे आवाहन केले. यावेळी चरणसिंग राजपूत, राहुल महाले, आनदसिंग पवार, महेंद्र खंडाळकर, विलास राजपूत, संजय इंगळे, पुंडलिक चव्हाण, कृष्णा इंगले, प्रकाश पवार, अभय शिंद, ज्ञानेश्वर मोरे, भारत पवार, डिगांबर पवार, प्रवीण शिंदे, गणेश राजपूत आदींसह हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिह युवा मंच मित्र मंडळ, बजाजनगरचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅप्टन कोळेकर यांना मेजर पदी पदोन्नती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलीत जखमी झालेले सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांचा मुलगा कॅप्टन प्रवीण कोळेकर यांची मेजर पदावर पदोन्नती झाली आहे. ते सध्या भारत-चीन सीमेवर तैनात आहेत. दरम्यान, कोळेकर यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. कोळेकरांचा आवाजही परत आल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात असताना ही सुवार्ता आल्याने आनंद दुणावला आहे.

कोळेकर यांना आई, दोन भाऊ, बहीण, पत्नी, तीन मुले, एक मुलगी व सुना असा परिवार असून सर्वात लहान मुलगा प्रवीण यांची बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर एनडीए, खडकवासला, पुणे येथे निवड झाली. प्रशिक्षणानंतर दीक्षांत समारंभात त्यांना बेस्ट पीटीमध्ये रौप्यपदक मिळाले. देहरादुन येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पासिंग आउट परेडमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. त्यांची रांची झारखंड येथे प्रशिक्षणार्थी लेफ्टनंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पठाणकोट येथे पहिली पोस्टिंग मिळाली. थोड्याच दिवसात कॅप्टन पदावर पदोन्नती झाली. पाकिस्तानी दहशतवाद्याकडून पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या झालेल्या भ्याड हल्ल्यावेळी कॅप्टन प्रवीण यांनी मोलाची कामगिरी बजावली. प्रवीण यांचे कर्नल सतीश हंगे, सेवानिवृत्त कर्नल ठाकूर, पोलिस निरीक्षक अनिल आडे आदींनी अभिनंदन केले आहे. कोळेकरांचा मोठा मुलगा सचिन हा वकील, दुसरा मुलगा नितीन हा सिव्हिल इंजिनीअर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील चोरांच्या अफवेचे लोण शहरी भागात देखील पसरले आहे. पडेगाव, वाळूज परिसरात दोन दिवसांपूर्वी संशयितांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवली असून या अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावर अफवांच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने, त्या पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या वीस दिवसांपासून चोरांच्या तसेच मुलांचे अपहरण करणाऱ्यांच्या टोळ्या आल्याच्या अफवा पसरत आहेत. खेडी, वस्ती, शेतवस्ती आदी ठिकाणी या अफवांचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये वैजापूर परिसरातील चांडगाव, लाख, पानवी खंडाळा, रोटेगाव, जरूळ तसेच गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत भेंडाळा, मुद्देश वडगाव, शिंगी, मेंढी, बाबरगाव, बोलेगाव, मालूंजा, हमीदपुरवाडी, शिल्लेगाव पोलिस ठाणे हद्दीत वसुसायगाव, खडक नारळा, डोणगाव, दिनवाडा, भालगाव, बुट्टे वडगाव, सिद्धनाथ वडगाव आदी ठिकाणी चोर आल्याच्या अफवा मोठया प्रमाणात पसरल्या होत्या. कन्नड व खुलताबाद तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर या अफवांनी धुमाकूळ घातला होता. शहर परिसरातील सातारा परिसर, पडेगाव भागात देखील चोरांच्या अफवा पसरल्या आहेत.

\Bनागरिकांची गस्त

\B

अफवांमुळे नागरिकात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तरुण गटागटाने विविध ठिकाणी गस्त घालत आहेत. रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्याला फोन आल्यास पोलिस तत्काळ घटनास्थळी धाव घेत आहेत.

\Bसंशयितांना चोप

\B

नागरिकांच्या गस्तीमध्ये कोणी संशयित आढळल्यास त्याच्यावर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत. वैजापूर परिसरात जमावाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पडेगाव येथे दोन बहुरुप्यांना बेदम चोप देण्यात आला होता. वाळूज-कमळापूर भागात भाड्याची खोली शोधणाऱ्या महिलेला विनाकारण मारहाण करण्यात आली होती.

\Bतीन गुन्हे दाखल

\B

व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर अफवा पसरवण्यात येत असल्याचे दिसून आहे. या अफवांच्या पोस्ट अनेक ग्रुपमधून व्हायरल होत असल्याने भीतीचे वातावरण जास्त निर्माण होत होते. सोशल मीडियावर अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल करण्यात येत असून असे तीन गुन्हे आतापर्यंत दाखल करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर अफवांच्या पोस्ट टाकल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवा व्हॉट्स अॅपवर पसरवू नये, अशा स्वरुपाचे तीन गुन्हे आतापर्यंत दाखल करण्यात आले आहेत.

-डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराला आग; होरपळून वृद्धाचा मृत्यू

$
0
0

वाळूज महानगर: गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथील ९० वर्षीय वृद्धाचा घराला लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे साडे चारच्या सुमारास घडली. बाळकृष्ण रामभाऊ पवार, असे त्यांचे नाव आहे.

मृत पवार हे जुन्या लाकडाच्या घरात एकटेच झोपलेले होते. आंघोळीकरिता पाणी तापवण्यासाठी चुल पेटवताना आग लागली असावी, असा अंदाज आहे़ पवार यांना पहाटे लवकर उठण्याची सवय होती. कुटंबातील सदस्य शेजारच्या घरात झोपलेले होते. पावसाळा सुरू झाल्याने घरात सरपण ठेवले होते. त्यामुळे आग वाढली असावी, त्यात घर लाकडाचे असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे पहाटे पाचच्या सुमारास शेजाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र घराची लाकडे जळाल्याने ते घर पडले. मृत पवार यांच्या मागे पत्नी, दोन मुले, चार मुली व एक मुलगा आहे. मुलगा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो. त्यांचा मुलगा अशोक पवार यांच्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप काळे हे करत आहेत़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी १८-६

$
0
0

-महेशनवमीनिमित्त फोटो हंट स्पर्धा.

स्थळः तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार

वेळः सकाळी ६.३०

-महिला लोकशाही दिनाचा कार्यक्रम.

स्थळः जिल्हाधिकारी कार्यालय

वेळः सकाळी ११

-महेशनवमीनिमित्त 'दिल की आवाज भी सून' कार्यक्रम.

स्थळः तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार

वेळः सायंकाळी ७

-'योगशास्त्रः वैद्यकीय दृष्टीकोन'वर डॉ. मकरंद कांजाळकर यांचे व्याख्यान.

स्थळः मराठवाडा सांस्कृतिक मंडळ सभागृह

वेळः सायंकाळी ५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमचा आवाज

$
0
0

कायदा हातात घेऊ नये

मटा प्रतिनिधी, औरंगाबाद

…शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अफवांचा सुळसुळाट सुरू आहे. या अफवेमुळे दोन जणांचा वैजापूर तालुक्यात बळी गेला आहे. अनेक भागात संशयित असल्याच्या आरोपावरून नाहक मारहाणीच्या घटना घडत आहेत. महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागात हे प्रकार जास्त घडत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकार कायदा हातात घेऊ नये, असे संशयित आढळल्यास त्यांना मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरीकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वैजापूर तालुक्यात जमावाच्या हल्ल्यात दोन ठार झाले आहेत. सोशल मीडियावर पसरत असल्याच्या अफवांचे हे बळी ठरले आहेत. यामध्ये जमावावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी चोरांच्या भीतीमुळे गस्त वाढवावी. मात्र, संशयिताची शहानिशा करीत त्याला पोलिसांच्या स्वाधीन करावे, कायदा हातात घेऊ नये.

सतीश मुंढे

अफवा पसरवण्याचे मूळ कारण सोशल मीडिया ठरत आहे. फेसबुक, व्हॉटसअपचा गैरवापर होत आहे. जागरूक नागरिकांनी सोशल मीडियावर अफवा पसरवू नये. पोलिसांच्या वतीने अशा अफवा पसरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईची मोहीम अजून कडक राबवल्यास या अफवांवर अंकूश बसण्याची शक्यता आहे.

भास्कर गाडेकर

सध्या चोरांच्या, लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या आल्या असल्याच्या अफवेने धुमाकुळ घातला आहे. मुख्य म्हणजे या अफवा व्हॉटसअप जास्त येत आहे. आलेली पोस्ट काहीही खात्री न करता पुढे फॉरवर्ड करण्यात येत असतात. त्यामुळे अशा पोस्ट अपलोड करणाऱ्या मंडळीवर गुन्हे दाखल करावेत.

अमोल नरवडे

चोरांच्या अफवेमुळे संशयित समजून कोणालाही जमावाकडून मारहाणीच्या घटना घडत आहेत. ही बाब भयावह आहे. यामुळे फेरीवाले, सेल्समन याना धोका निर्माण झाला आहे. हे प्रकार थांबले पाहिजे. सुजाण नागरिकांनी चौकशी करून शंका आल्यास पोलिसांना बोलावले पाहिजे.

राहुल भोंबे

वैजापुर,पडेगाव, वाळूज भागात जमावाकडून कायदा हातात घेण्याचा प्रकार घडला आहे. संशयितांना मारहाण करण्याच अधिकार जमावाला नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे, तसेच व्हॉटसअप या अफवा पसरवणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले पाहीजे.

पिणु मुरदारे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीपात्रात छापा; ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

 महसूल विभागाने रविवारी सकाळी तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करत चार ट्रॅक्टरसह ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, महसूल विभागाच्या वाहनाचा अपघात झाला. मात्र, कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती माहिती उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दिली.

 नायगाव येथील नदीपात्रातून केणी मशीन व ट्रॅक्टरच्या साह्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून रविवारी सकाळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व तहसीलदार महेश सावंत यांनी वाळू विरोधी पथकात सहभागी होत छापा मारला. वाळू विरोधी पथकाने सरकारी वाहनाऐवजी खाजगी वाहनाचा उपयोग केल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या लक्षात येण्याअगोदर चार ट्रॅक्टरसह वाळू उपसा करण्यासाठी उपयोगात येणारा ६५ लाखांचा ऐवज जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरच्या मालकाकडून १५ लाखांचा दंड वसूल करण्यात येणार असून यापुढेही अवैध वाळू उपशाविरुद्ध कार्यवाही सुरूच राहणार असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली. पथकात, तलाठी जोशी, महालकर, राजपूत, गोजरे कोतवाल, अनिल घोडके यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरुंच्या चौकशीवरून आरोपांची राळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी वादात अडकली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत चोपडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, या मागणीसाठी मराठवाडा विकास कृती समितीचे उपोषण सुरू आहे. तर संधीसाधू उपोषणार्थींवर कारवाई करण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी उपोषणार्थींची भेट घेतली.

उच्च शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या कुलगुरू चौकशी समितीने तिसऱ्यांदा विद्यापीठाचा दौरा केला. माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्यासह तीन सदस्यांची समिती चौकशी करीत आहे. अभ्यास मंडळावर नियमबाह्य नियुक्त्या केल्याचा वाद विधान परिषदेत गाजला होता. या वादानंतर चौकशी सुरू झाली. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार, 'रूसा' साहित्य खरेदी, उत्तरपत्रिका निविदा, नियमबाह्य नियुक्त्यांचे आरोप आहेत. आरोपांची शहानिशा करण्यासाठी समितीने तीन वेळेस विद्यापीठाचा दौरा केला आहे. मात्र, चौकशी योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत चोपडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी मराठवाडा मराठवाडा विकास कृती समितीचे प्रा. दिगंबर गंगावणे यांनी केले आहे. या मागणीसाठी सात दिवसांपासून गंगावणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. कुलगुरुंच्या सक्तीच्या रजेच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या भाडोत्री, संधीसाधू आंदोलकांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. शंकर अंभोरे, डॉ. किशोर साळवे, डॉ. बाळासाहेब लिहिणार, डॉ. प्रशांतकुमार वनंजे, प्रा. प्रकाश इंगळे, नीलेश आंबेवाडीकर, डॉ. ज्ञानेश्वर मानेराव आदी उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी उपोषणार्थींची भेट घेतली. शेकापप्रणित पुरोगामी शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड यांनी उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी अॅड. सतीश साळवे, सतीश शिंदे, मयूर सोनवणे, अमोल दांडगे, दत्ता भांगे उपस्थित होते.

\Bराजकीय हस्तक्षेप?\B

चौकशी प्रक्रियेत कुलगुरू चोपडे यांच्या पाठिशी एक गट उभा राहिल्याची चर्चा आहे. राजकीय वजन वापरून चोपडे यांच्यावरील बालंट टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या हिताचे निर्णय घेण्यासाठी चोपडे सकारात्मक प्रतिसाद देत असल्याने संबंधित गटाने समर्थनाची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. शैक्षणिक संघटना आणि राजकीय संघटन यांचा वापर करीत चोपडे यांचा बचाव करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या लेकीचे धुमधडाक्यात स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुली शिकून कितीही मोठ्या झाल्या तरी वंशाला दिवा हवा म्हणून मुलाला प्राधान्य ही समाजातील मानसिकता आजही दिसून येते. अशावेळी मुलीला मुलाप्रमाणे मानणारेही समाजात आहेत. त्यापैकी एक जैस्वाल कुटुंब. या कुटुंबाने जन्माला आलेल्या कन्यारत्नाचे स्वागत सोमवारी मोठ्या थाटामाटात केले.

मदनलाल जैस्वाल यांचा टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. मदनलाल यांना निरल ही सहा वर्षीची पहली मुलगी आहे. त्यांच्या पत्नीने चार दिवसांपूर्वीच दुसऱ्या मुलीला जन्म दिला. निरल पाठोपाठ पुन्हा कन्यारत्न प्राप्त झाल्याने मदनलाल व त्यांची पत्नी श्वेता यांचा आनंद द्विगुणित झाला. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती तशी या समाजात जुनीच आहे. अशा लोकांच्या मनातील हे जळमट दूर व्हावे, भेदभाव करू नये, असा संदेश इतरांना देण्याचे या दापत्यांने ठरविले. हॉस्पिटलमध्ये मिठाईचे वाटप केल्यानंतर दुपारी बाँड-बाजाच्या गजरात आणि सजवलेले कारमधून जैस्वाल यांनी मुलीसह नाथनगर येथील घराकडे यांनी प्रस्थान केले.

सोबतीला जैस्वाल कुटुंबातील सदस्यांसह त्यांचे मित्रमंडळी होती. आंनदोत्सव साजरा करत ही मिरवणूक नाथनगरात पोचली त्यावेळी परिसरातील नागरिकांना जैस्वाल यांना कन्यारत्न प्राप्त झाल्येच समजले. लेकीचे अशा अनोख्या पद्धतीने स्वागत केले जात असल्याचे समजातच नागरिकही त्यांच्या या आंनदात सहभागी झाले. लेकीच्या स्वागतासाठी जैस्वाल यांनी घराही फुले, फुगे, छायाचित्रांनी सजविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्मलदादांना जीवनगौरव

$
0
0

औरंगाबाद : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुकुल मंदिरचे संस्थापक निर्मलदादा ग्यानानी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय शिक्षण मंडळाने हा पुरस्कार जाहीर केला असून, २३ जून रोजी मुकुल मंदिर शाळेच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी कमांडर अनिल सावे असतील. आमदार अतुल सावे, भारतीय शिक्षण मासिकाचे संपादक डॉ. वा. वा. गोगटे उपस्थित असतील, अशी माहिती संयोजन समितीचे दत्तात्रय पदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याची रस्ता कोंडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नागरी वसाहत वेगाने वाढत असलेल्या सातारा परिसरातील रस्त्यांच्या कामांना महापालिकेने ऐन पावसाळ्याचा मुहूर्त काढला आहे. त्यामुळे ही कामे सुरू झाल्यानंतर रखडण्याचीच शक्यता जास्त आहे. त्याचबरोबर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही सातारा परिसरातील नागरिकांना येणाऱ्या पावसाळ्यातही खड्डे आणि चिखलमय रस्त्यातून मार्गक्रमण करावे लागणार आहे. महापालिकेच्या प्रशासकीय दिरंगाईचा फटका या रस्त्यांच्या कामांना बसला आहे.

सातारा परिसरात गेल्या दशकात नागरी वसाहती वेगाने उभारल्या. या परिसराला बीड बायपास मार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्याच्या घोषणाही झाल्या, मात्र प्रत्यक्ष कामे सुरू करण्यात आली नाहीत. रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया लांबली. त्याचा फटका या परिसराला बसला आहे. सातारा परिसरातील नागरिकांकडून सिडकोने

भूखंड 'एनए-४७ ब' करण्यासाठी शुल्क वसूल केले होते. सिडकोकडे सातारा परिसरातून सुमारे साडेआठ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर सातारा, देवळाई परिसराचा समावेश महापालिकेत झाला. सातारा, देवळाई परिसराील नागरिकांनी शुल्कापोटी भरलेल्या सुमारे साडेआठ कोटी रुपयांतून रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.

रेणुका माता मंदिर कमानीपासून सातारा परिसरात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार निधीतून या रस्त्याचे काम केले गेले. हा रस्ता एका वर्षातच उखडला. नागरिकांच्या तक्रारींनंतर या रस्त्यावर डांबरीकरणातून खड्डे बुजविण्याचे काम काम करण्यात आले. काही महिन्यांतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली. या पार्श्वभूमीवर सातारा - देवळाई संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने महापालिकेवर चार महिन्यांपूर्वी मोर्चा काढला होता. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर महापालिकेने रस्त्याच्या कामाचा निर्णय घेतला. रस्त्यांचे काम काँक्रिटीकरणातून करण्याचा नागरिकांचा आग्रह होता. परिसरात जलवाहिन्या, ड्रेनेज लाइन यांची कामे केलेली नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम डांबरीकरणातून करावे, अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. यासंदर्भात मार्च महिन्यात नागरिकांची नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे आणि सायली जमादार यांच्या उपस्थितीत बैठकही घेण्यात आली होती. या बैठकीत नागरिकांनी डांबकीरकरणाला संमती दर्शविली. त्यावेळी रस्त्याचे काम काही दिवसांत सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नाही. महापालिकेत आयुक्तांच्या बदलीमुळे निविदा प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींची मुदत संपल्यामुळेही काम लांबल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष काम कधी सुरू होते याची प्रतीक्षा आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे रस्त्याचे काम सुरू होईल का, याबाबत परिसरातील नागरिकांना शंका आहे. एमआयटी महाविद्यालयापासून सातारा गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम काही आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. काही दिवसांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्याचबरोबर कमलनयन बजाज हॉस्पिटलपासून सुधाकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे.

\Bचालढकल सुरू

\Bरेणुका माता मंदिर कमानीपासून अहिल्यादे‌वी होळकर चौकापर्यंत रस्त्याचे काम मंजूर केले आहे. त्यासाठी सुमारे दोन कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आठ दिवसांपूर्वी कंत्राटदाराने रस्त्याच्या लेव्हल तपासणीचे कामकेले. त्यानंतर चार दिवसांत काम सुरू होणार असल्याचे सांगिल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्याचे काम होईल काय, याबद्दल शंका आहे.

\Bदर्जेदार काम करावे

\B'रेणुका‌माता मंदिर ते अहिल्यादेवी होळकर चौक या रस्त्याच्या कामाचा गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम करणे अपेक्षित होते. अद्यापपर्यंत काम सुरू करण्यात आलेले नाही. महापालिकेने लवकर काम सुरू करावे. काम चांगल्या दर्जाचे केले पाहिजे. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांना काम सुरू असताना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा,' असे मत सातारा-देवळाई संघर्ष समितीचे सोमिनाथ शिरणे यांनी व्यक्त केले.

रेणुकामाता कमान ते अहिल्यादेवी होळकर चौक या रस्त्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करू. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या लेव्हलची मोजणी केली आहे. रस्ता खोदून खडी व मुरुमाची भर टाकण्यात येणार आहे. या कामामध्ये पावसाचा अडथळा येणार नाही. रस्त्यात खोदकाम करून भर टाकल्याने काम मजबूत होईल. त्याशिवाय घराना फर्निचर, साईनाथनगर, नाईकनगर येथील रस्त्याची कामेही सुरू होणार आहेत.

- अप्पासाहेब हिवाळे, नगरसेवक, सातारा-देवळाई परिसर

एमआयटी कॉलेज ते सातारा गाव या रस्त्याचे काम तांत्रिक कारणामुळे काही दिवसांपासून बंद आहे. हे कामही लवकरच सुरू होईल. परिसरातील अन्य रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात रस्त्याची कामे सुरू होणार आहेत. बेंबडे हॉस्पिटलच्या मागील बाजुच्या वसाहतीतील रस्त्याचे खडीकरणातून मजबुतीकरण करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

- सायली जमादार, नगरसेवक, सातारा परिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक कार्यकर्त्यामुळे अल्पवयीन मुलगी सुखरूप बालगृहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरातून निघून आलेल्या ११ वर्षांच्या मुलीला पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी बालगृहात रवाना केले. मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी सकाळी ही मुलगी रडत बसलेली काही जणांच्या नजरेस पडली होती. जिंतूर तालुक्यातील तिच्या पालकांचा शोध घेण्यात आला असून ते लवकरच तिला घेऊन जाण्यासाठी येणार आहेत.

शनिवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात वाल्मिक नावाच्या तरुणाला एक लहान मुलगी रडत बसलेली दिसून आली. त्याने विचारपूस केली असता ही मुलगी जास्त बोलत नव्हती. त्याने महिला क्रांती मोर्चाच्या अॅड. स्वाती नखाते पाटील यांना या घटनेची माहिती दिली. अॅड. नखाते यांनी या मध्यवर्ती बसस्थानक गाठत मुलीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. ही मुलगी भोगाव देवी ता. जिंतूर येथील असल्याची माहिती तिने दिले. तिचे वडील पेंटर काम करणारे आई शेतमजूर असून घरी दोन लहान भाऊ आहेत. पोलिसांकडे जाण्यास ही मुलगी नकार देत होती. अॅड. स्वाती नखाते यांनी तिची समजूत घातली. सोशल मीडियावर या मुलीच्या पालकांचाा शोध घेता यावा म्हणून व्हिडियो क्लीप तयार करून ती व्हायरल करण्यात आली. यामध्ये अॅड. नखाते यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक दिला होता. दरम्यान, या मुलीला क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सोशल मीडियावर पाठवलेल्या क्लिपचा फायदा होऊन भोगाव देवी गावच्या सरपंचांनी अॅड. नखाते यांच्याशी संपर्क साधला. या मुलीच्या पालकांना घेऊन लवकरच औरंगाबादला येत असल्याची माहिती त्यांनी अॅड. नखाते यांना दिली. तिचे पालक येणार असल्यामुळे सध्या या मुलीला छावणी येथील मुलींच्या बालगृहात ठेवण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images