Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शासनकर्त्यांकडून धर्म व संतांना बदनाम करण्याचे षडयंत्र

$
0
0
भगवा हा दहशतवाद संपवणाऱ्याचा रंग आहे. केंद्र सरकारमधील काँग्रेसचे नेते व मंत्री ‘भगवा-दहशतवाद’चा शब्दाचा प्रयोग करून हिंदू धर्मासहीत हिंदू संत व साध्वींना नाहक बदनाम करत आहेत, असा आरोप हिंदू जनजागृती समितीचे राज्य स्तरीय प्रवक्ते मनोज खाडे यांनी उस्मानाबाद येथे आयोजित धर्मजागृती सभेत बोलताना केला.

अपक्ष उमेदवारांच्या माघारीसाठी मिनतवाऱ्या

$
0
0
नगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय हवा तापण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी मिनतवाऱ्या करण्यात येत आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराला गर्दी

$
0
0
विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. दोनच्या वतीने २२ ते २५ डिसेंबर या तीन दिवसात वैधता प्रमाणपत्र वितरणासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात एकूण २७ हजार ३०० वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या समितीच्या अंतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे.

इंदिरा आवास योजनेचे अडथळे दूर

$
0
0
इंदिरा आवास योजनेंतर्गत २०१३-१४ साठी सरकारकडून औरंगाबाद जिल्ह्यासाठी नवीन घरकुलांची यादी प्राप्त झाली आहे. यादीच्या पूर्ततेसाठी ग्रामपंचायतींना लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करून देणे अवघड होते.

रोज हवा १.५ लाख किलो भाजीपाला

$
0
0
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. सध्या शहरात दररोज दीड लाख किलो भाजीपाल्याची गरज आहे. त्यातुलनेत पुरेसा भाजीपाला उपलब्ध होत नाही. इतर जिल्ह्यातील भाजीपाल्याची आवक होऊनही भाजीपाल्याचा तुटवडा कायम आहे.

विकासगंगेच्या भूलथापा नको

$
0
0
‘लोकप्रतिनिधींनी फक्त विकासाच्या गंगेच्या भूलथापा न मारता नागरिकांच्या सुख-दुःखातही सामील झाले पाहिजे,’ असा टोला खासदार चंद्रकांत खैरे यांनी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना नाव न घेता लगावला आहे. खासदार खैरे यांच्या हस्ते रविवारी युवा सेनेच्या पाच शाखांचे उदघाटन झाले.

वाळू पट्ट्यांच्या किंमती घटवणार

$
0
0
वाळू पट्ट्यांच्या लिलावाकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे वाळूपट्ट्यांच्या सरकारी किंमती कमी करण्यात येणार आहेत. सरकारी किमतीत २५ टक्के घट करून लिलावाच्या परवानगीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.

जयाजीराव सूर्यवंशी यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

$
0
0
जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीचे निमंत्रक जयाजीराव सूर्यवंशी यांनी रविवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. बीड बायपास रोडवरील सिद्धीविनायक लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयंक गांधी व अंजली दमानिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

मूकबधीर जोडप्याला तिळे

$
0
0
नवरा बायको मूकबधीर. इतकेच नव्हे तर कुटुंबातील जवळचे सहा-सात नातेवाईकही याच विकाराने ग्रासलेले. चार वर्षांपासून आपत्यप्राप्तीसाठी उपचार सुरू होते. त्यास यश आले आणि या जोडप्याला तिळे झाले. डॉक्टरांनी या केससाठी विशेष अभ्यास करून अतिशय सुलभ पद्धतीने बाळंतपण यशस्वीपणे पार पाडले.

...अन् जगण्याशी झुंज सुरू

$
0
0
वरद काळे. मस्क्युलर डिस्ट्रॉफी या दुर्धर आजाराशी लढत असलेला एक मुलगा. या असाध्य, दुर्धर आजारातही चित्रांद्वारे नवनिर्मितीचा ध्यास त्याने घेतला आहे. आजारांच्या वेदनांच्या साथीने नव्हे, तर चित्रांच्या संगतीत तो आजाराशी झुंजत आहे.

लोकाग्रहास्तव उमेदवारी नको

$
0
0
उमेदवारांच्या निवडीमध्ये नागरिकांची मते जरूर आजमावावीत मात्र फक्त तेवढ्याच आधारावर उमेदवारांची निवड करू नये, अशा परखड सूचना आम आदमी पार्टीच्या राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी मांडल्या आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांना या मुद्द्याची दखल घेणे भाग पडले असून त्यावर अंतिम निर्णय सोमवारी घेतला जाणार आहे.

लिपिकांचे प्रमोशन रखडले

$
0
0
जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यातील लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण सत्राचे निकाल गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहेत. त्यामुळे लिपिकांना प्रमोशनपासून वंचित राहावे लागत आहे.

दुहेरी हत्याकांड,आरोपीला जन्मठेप

$
0
0
किरकोळ भांडणावरुन पत्नी व मुलीचा जाळून खून केल्याप्रकरणी रांजणगाव शेणपूंजी (ता. गंगापूर) येथील आरोपीस वैजापूर सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दत्तू येव्हाण साठे (वय ३५) असे या दुहेरी खून खटल्यातील आरोपीचे नाव आहे.

पत्नीला जाळणा-यास जन्मठेप

$
0
0
लग्नाच्या दहा वर्षानंतर आपल्या पत्नीने रॉकेल टाकून जाळणाऱ्यास येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश डी. यू. मुल्ला यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

तुळजापूर:अपघातात तिघांचा मृत्यू

$
0
0
बस व मोटार सायकलची समोरा समोर धडक होवून झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील तीर्थ (ता. तुळजापूर) येथील तिघांचा मृत्यू झाला. तुळजापूर-लातूर मार्गावर खंडाळा (ता. तुळजापूर) पाटीजवळ शनिवारी रात्री हा अपघात झाला.

अण्णांच्या पाठिंब्यामागे षड्‍यंत्र

$
0
0
‘जनलोकपालमधील तीन महत्वाचे मुद्दे वगळल्यानंतरही अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल आश्चर्य वाटते. यामागे कोणाचे तरी षडयंत्र असावे,’ अशी शंका आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मयंक गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

तहसीलची इमारत आता कालबाह्य

$
0
0
औरंगाबाद तहसील कार्यालयाची ऐतिहासिक इमारत आता कालबाह्य झाली आहे. या इमारतीला हेरिटेज वास्तूचा दर्जा असल्यामुळे दुरुस्तीही करणे शक्य नाही. त्यामुळे आता तहसील कार्यालयासाठी प्रशासनाला नव्या जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.

पादचारी चोराचेही आव्हान

$
0
0
समर्थनगर भागातून भांडे घासणाऱ्या मोलकरीण महिलेचे मंगळसूत्र चोरट्यानी पळवल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पायी येऊन आरोपीने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचखोर PSI विरुद्ध गुन्हा

$
0
0
दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना सहकार्य करण्यासाठी आरोपीच्या भावाला सात हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पीएसआय विरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिरातून दानपेटी पळवली

$
0
0
गुलमंडी भागातील रामेश्वर मंदिरात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. चोरट्यांनी एक दानपेटी फोडली असून दुसरी पळवून नेली आहे. शहरात गेल्या दोन महिन्यात मंदिरात चोरी होण्याची ही चौथी घटना आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images