Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

विजेच्या धक्क्याने मृत्यू

$
0
0

खुलताबाद : शुलीभंजन शिवारात विजेच्या तारेवर आकडा टाकून विद्युतपुरवठा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारत म्हसू जाधव (वय ३२ वर्षे, रा. सुलीभंजन) याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. भारत जाधव याला खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नाईकवाडे यांनी तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तहसीलदारांना निवेदन

$
0
0

वैजापूर : जळगाव जिल्ह्यातील झालेल्या घटनेचा निषेध म्हणून वैजापूर मातंग समाजाने तहसीलदार सुमन मोरे  यांना निवेदन दिले. या निवेदनात अनुसूचित जातीतील मुलांना नग्न करून, धिंड काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व  महाराष्ट्रात अॅट्रॅसिटी कायदा कडक करण्यात यावा, या मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर  विजय त्रिभुवन, धर्मेंद्र त्रिभुवन, रिपाईचे साहेबराव पडवळ, पप्पू सोळसे, मोती वाघ, नगरसेवक राजेश गायकवाड, दिनेश राजपूत, नगर सेवक शैलेश चव्हाण, माथाडी कामगार, हमाल संघ आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट चावडीत शनिवारी ब्लू चित्रपट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमांतर्गत येत्या शनिवारी फ्रेंच भाषेतील ब्लू हा चित्रपट एमजीएम परिसरातील आइनस्टाइन सभागृहात सायंकाळी सहा वाजता दाखविण्यात येणार आहे. रसिकांना चित्रपटाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चव्हाण प्रतिष्ठाणच्या औरंगाबाद केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव निलेश राऊत, सल्लागार समितीचे सदस्य नंदकिशोर कागलीवाल, मुकुंद भोगले, डॉ. भालचंद्र कानगो, प्रा. अजित दळवी, सुनील किर्दक, प्रा. रेखा शेळके, डॉ. श्रीरंग देशपांडे, सुबोध जाधव, शिव कदम यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्पा’ स्थापनेसाठी त्वरित कार्यवाही करावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्कूल ऑफ प्लॅनिंग ऍन्ड आर्किटेक्चर (स्पा) ही आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था औरंगाबाद येथे स्थापन करण्यासंदर्भात शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार चव्हाण यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची संस्था स्थापनेची शासनस्तरावरील कार्यवाही अत्यंत संथ होत असल्याचे लक्षात आणून दिले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जून २०१४ मध्ये देशात सहा नवीन आयआयएम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यावेली औरंगाबादला मंजूर झालेले आयआयएम नागपूरला हलवण्यात आले. त्यावेळी औरंगाबादला स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर देण्याची घोषणा केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या घोषणेला तीन वर्षे उलटली तरी निधी आणि जागा देण्याची कार्यवाही केलेली नाही.

\B'स्पॉ' नागपुरात नेता का? \B

आयआयएम, साई विभागीय केंद्र आदी संस्था नागपूरला गेल्यामुळे 'स्पा' ही संस्था देखील नागपूरला स्थापन करणार की काय, अशी शंका मराठवाड्यातील जनतेत आहे, असे आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्यातीत ४० टक्के लघू उद्योगांचा वाटा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगर

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात आपले नाव कमवायला हवे आणि त्यासाठी या संधीचा जास्तीत जास्त मसिआ सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मसिआचे अध्यक्ष किशोर राठी यांनी बुधवारी येथे केले. निर्यातीमधील ४० टक्के वाटा हा लघू उद्योजकांचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़

वाळूज एमआयडीसी येथील मसिआ संघटनेच्या सभागृहात जागतिक व्यापार दिनानिमित्ताने सूक्ष्म, मध्यम व लघू उद्योजकांसाठी निर्यात संधी या विषयावर बुधवारी (२० जून) एक दिवसाच्या कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गुरलवाल यांनी यावेळी निर्यात क्षेत्राचे महत्त्व सांगितले. या क्षेत्रात लघू उद्योजकांना असणाऱ्या संधी विशेषतः महिला उद्योजकांना शासनाकडून मिळणाच्या सवलती, अनुदान, कर्ज, भूखंड आदींची माहिती दिली. या सवलतींचा जास्तीत जास्त लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे सांगितले.

रजत श्रीवास्तव यांनी, इंजिनीअरिंग क्षेत्रामध्ये लघू उद्योजकांसाठी असलेल्या निर्यात संधीबाबत माहिती दिली़ यावेळी आपण नेहमी ठराविक देशांमध्येच निर्यात संधी आहेत, असे मानतो, परंतु लॅटिन अमेरिका, कोलंबिया, रशिया, फिलिपाइन्समध्येही निर्यातीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध असून, त्याकडे लघू उद्योजकांनी जायला हवे, असे त्यांनी सांगितले.

रुपेश कुमार यांनी एक्झिम बँक लघू उद्योकांना निर्यात क्षेत्रामध्ये व्यापारासाठी असलेले बँकेचे कर्ज, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती आणि इतर बाबतीत असलेल्या सुविधांची माहिती दिली. लघू उद्योग हा भारतीय उद्योगक्षेत्राचा मूलभूत पाया असल्याने त्यांना मदत करण्यासाठी आमची प्राधान्य असल्याचे सांगितले़ सुरेश तोडकर यांनी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील संधींबद्दल माहिती दिली.

या कार्यशाळेला  ८० उद्योजकांनी सहभाग घेतला. लघू उद्योजक आता निर्यात क्षेत्राकडे वळायला नक्कीच ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार असल्याचेही उपस्थितांनी सांगितले. या कार्यशाळेसाठी माजी अध्यक्ष संदीप नागोरी, अध्यक्ष राठी, उपाध्यक्ष अभय हंचनाळ, सचिव गजानन देशमुख, मनिष गुप्ता, राहुल मोगले, सुमित मालानी, अनिल पाटील, अर्जुन गायकवाड, नारायण पवार, विकास पाटील, अनिल बोडखे, राजेश मानधनी, आशिष नरवडे, रवींद्र कोंडेकर, मनिष अग्रवाल, अब्दुल शेख यांची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छावणीत जलवाहिनी तुटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीच्या पाइप लाइन मंगळवारी रात्री आलेल्या जोरदार पावसामुळे तुटली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. छावणीला पाणीपुवठा करणारी जलवाहिनी ज्या मोठ्या सिमेंटच्या पाईपवर अंथरलेली आहे त्या सिमेंटच्या पाईपांनी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आपली जागा सोडली आणि त्यात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे दोन पाइप तुटले, मात्र त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली व पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

छावणीला खाम नदीतून गेलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये याच जलवाहिनीतून दूषित पाण्याचा पुरवठा होऊन गॅस्ट्रोचा उद्रेक झाला होता आणि दहा हजारांवर नागरिकांना गॅस्ट्रोचा फटका बसला होता. त्यानंतर या जलवाहिनीची दुरुस्ती होऊन जलवाहिनीचा पाणीपुरवठा सुर‍ळीत करण्यात आला होती, मात्र मंगळ‍वारच्या पहिल्याच जोरदार मोसमी पावसामुळे खाम नदीतून पाण्याचे लोंढे वाहू लागले आणि ज्या सिमेंटच्या पाइपवरून ही पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे, ते सिमेंटचे पाइप पाण्याच्या प्रवाहामुळे दूर गेले. त्यामुळे अंथरलेल्या जलवाहिनीचे दोन पाइप खाली घसरले आणि तुटले. ही बाब सकाळी लक्षात येऊन तातडीने काम सुरू करण्यात आले व दुपारपर्यंत दोन्ही पाइप बदलण्यात आले. त्यामुळे छावणीचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला. यासंदर्भात, दोनच पाइप तुटले होते, ते तातडीने बदलण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजकुमार नायर यांनी सांगितले.

\Bनव्या जलवहिनीचे काम संथ\B

गॅस्ट्रोचा उद्रेक झाल्यानंतर २४ नोव्हेंबरच्या छावणी परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पुलाला समांतर असणाऱ्या नव्या जलवाहिनीला ४५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता व तातडीने काम करण्याचे आदेश तत्कालिन अध्यक्षांनी दिले होते, मात्र निम्मा जून महिना लोटला तरी जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही व हे काम आता होणार तरी कधी, याविषयी वेगवेगळ‍े तर्कवितर्क लढवले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे पुढच्या पावसात पुन्हा सिमेंटचे पाइप आपली जागा सोडणार नाही कशावरून, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनला आग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वे स्टेशनच्या फूड ट्रॅक या 'आयआरसीटीसी'च्या कॅन्टीनच्या स्वंयपाक घरात आग लागल्याची घटना बुधवारी (२० जून) सकाळी घडली. कॅन्टीन कर्मचारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.

जालना ते मुंबई जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून गेल्यानंतर, अंदाजे सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरील कॅन्टीनच्या स्वयंपाक घरात आग लागली. खाद्यपदार्थ तळताना अचानक भडका उडाला. यामुळे व्हेन्टिलेशनसाठी असलेल्या चिमणीला आग लागली. त्यामुळे रेस्टॉरंचमध्य धूर पसरला. ही आग वाढत असल्याने तरूणांनी कॅन्टीन रिकामे करून, स्वयंपाकघरातील सामान कॅन्टीनमध्ये आणून जमा केले. यानंतर तथील गॅसचे सिलिंडर बाहेर आणले. आग आणखी पसरू नये, यासाठी अग्निरोधक यंत्राचा वापर करण्यात आला.

या घटनेची माहिती रेल्वे विभागाकडून अग्निशामक विभागाला दिल्यानंतर काही मिनिटांतच बंबही पोचले. आग लागली त्यावेळ कन्टीनमध्ये जास्त प्रवासी नव्हते, अशीमाहिती कॅन्टीन चालक अमीत सिंह यांनी दिली.

…………

ती आठवण पुन्हा डोळ्यासमोर आली

साधारणत: तीन वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनच्या नवीन इमारतीमधील डॉर्मेट्री रूमला आग लागली होती. यात काही प्रवासी बचावले होते. ही आग बघता सर्वत्र पसरली होती. कॅन्टीनमध्ये लागलेली आगीमुळे तीन वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण अनेकांना आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिरबावडा येथे २५ मेंढ्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

पीरबावडा येथील मेंढपाळ शेतकरी बाबासाहेब पाराजी बकाल यांच्या आठ दिवसांच्या कालावधीत २५ मेंढ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे जवळपास सव्वा लाखाचे नुकसान झाले असून, कळपातील ३० ते ४० मेंढ्यांना घटसर्पाची लागण झालेली आहे.

बाबासाहेब बकाल यांच्या मेंढ्यांची आठ दिवसापूर्वी तब्येत बिघडली होती. काही मेंढ्याचा मृत्यू झाला होता. यानंतर त्यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घेतले. त्यानंतरही काही मेंढांचा काल मृत्यू झाला, तर काहींचा आज सकाळी झाला.

वडोद बाजार येथील पशुवैद्यकीय डॉ आर. ए. डावरे यांना या घटनेची माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यवस्थ मेंढ्यावर तात्काळ उपचार केले. त्यानंतर त्यांनी मेंढ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. घटनास्थळी तलाठी भरत दुतोंडे यांनी पंचनामा केला. मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने असून, एक लाख ३० हजारांचे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे

आठ दिवसापूर्वी काही मेंढ्यांची प्रकृती बिघडली. एक-दोन दिवसांत सुधारणा होईल, असे वाटले, परंतु काही मेंढ्यांचा  मृत्यू झाला असता मी वडोद बाजार येथील डॉ. मुळे यांना उपचारासाठी आणले. त्यांनी लसीकरणही केले. त्यानंतर काही दिवसांनी परत काही मेंढ्या अत्यवस्थ झाल्या. मी काही आयुर्वेदिक उपचार करून पाहिले, परंतु फरक पडला नाही. परत पुन्हा चार आणि आज तीन मेंढ्यांचा मृत्यू झाला. माझे नुकसान झाले असून, शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी बाबासाहेब बकाल यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागर परिसरात पेरणीला सुरुवात

$
0
0

कन्नड : कन्नड तालुक्यात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सर्वदूर पावसाच्या सरी कोसळल्या. नागद परिसरात ३५ ते ४० मिलीमिटर पाऊस कोसळल्याने खरीप पेरणीला सुरवात झाली आहे, तर उर्वरित मंडळांत १० ते १५ मिलीमीटर पाऊस झाल्याने खरीप पेरण्या खोळंबलेल्या आहेत. नागद परिसरात झालेल्या पावसामुळे लहान-मोठ्या प्रकल्पांत काही प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतकऱ्यांचा कापसाऐवजी मका पिकाकडे पेरणीचा कल दिसून येत आहे. तालुक्यात देवगाव (रंगारी) येथे दोन मिली मीटर, चापानेर दहा, चिकलठाण १२, कन्नड १७, पिशोर १४, करंजखेडा ३४, नाचनवेल १६, चिंचोली (लिंबाजी) मंडळात २० मिलीमीटर पाऊस पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या धक्क्याने बैल मृत्युमुखी

$
0
0

वाळूज महानगर : औरंगाबाद तालुक्यातील वळदगाव येथे मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या. त्यावरून बैलगाडी गेल्याने बुधवार सकाळी सहाच्या सुमारास शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला.

शेख मुसा शेख भिकन (रा़ परदेशवाडी, वळदगाव, ता़ ,औरंगाबाद) यांचा गाडीला जुंपलेला बैल विजेच्या शॉक लागल्याने मृत्युमुखी पडला. एका बैलासह त्यांची पत्नी आणि मुलगी यांचा यात जीव वाचला. शेख  दूध विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी व मुलगी दुभत्या जनावराना चारा आणण्यासाठी बैलगाडी घेऊन वळदगाव शिवारातील गट क्रमांक ३५ येथे जात होत्या. रात्री पाऊस झाला असल्याने तेथे विजेच्या तारा तुटल्या होत्या. बैलगाडीची चाके लोखंडी होती. ती तारावरून गेल्यावर गाडीत वीज प्रवाह उतरला. यावेळी शॉक लागताच महेमुदा शेख व शमा या माय-लेकी बाजुला गेल्या मात्र एका बैलाच्या पायात तार अडकल्याने त्याचा मृत्यू झाला़ आराडाओरडा केल्याने नागरिक त्यांच्या मदतीला आले. त्यांनी महेमुदा शेख व शमा यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शेख यांच्यावर अचानक ओढावलेल्या संकटात आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी पोलिस पाटील प्रकाश म्हस्के यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर तलाठी सुनील निकम, भगवान पवार, पोलिस पाटील प्रकाश म्हस्के, हरिश शिंदे, आकाश झळके यांच्यासह  महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी येथील महावीर चौकातील तिरुपती हॉस्पिटलसमोर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (१९ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. विकास जाधव (२३, रा़ सलामपुरेनगर, पंढरपूर, ता़ औरंगाबाद) असे अपघातात जखमी तरुणाचे नाव आहे. तो कामानिमित्त दुचाकीवरून (एमएच २० डीयू २७२६) जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विकास गंभीर जखमी झाला आहे. त्यास जखमी अवस्थेत रवी जाधव व  १०८ रुग्ण वाहिकेचे डॉ. अमोल कोलते यांनी प्राथमिक उपचार करून त्यास घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या अपघाताची नोंद  वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश अंतरप हे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. कराड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या नऊ वर्षांपासून रिक्त असलेल्या मराठवाडा विकास मंडळाच्या अध्यक्षपदी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी महापौर डॉ. भागवत कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी जाहीर केला. सध्या अध्यक्षपदाचा पदभार विभागीय आयुक्तांकडे होता.

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची १९९४ मध्ये स्थापना झाली आहे. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र, मधूकर चव्हाण यांच्यानंतर १५ डिसेंबर २००९ पासून हे पद रिस्त होते. मंडळाचे प्रभारी म्हणून विभागीय आयुक्तांकडे जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान, युती सरकारने उशिरा का होईना, डॉ. कराड यांच्या रुपाने मंडळाला अध्यक्ष दिला आहे. यापूर्वी कमलकिशोर कदम, दिवाकर रावते, प्रतापराव बांगर व मधुकर चव्हाण यांनी १५ डिसेंबर १९९९ ते १५ डिसेंबर २००९ याकाळात अध्यक्षपद भुषवले. त्यांच्यानंतर आघाडी सरकारने लोकप्रतिनिधींची अध्यक्षपदावर नियुक्ती केली नव्हती. मध्यंतरी दिवंगत अर्थतज्ज्ञ र. पु. कुरुलकर यांच्याकडे प्रभारीपद होते.

मराठवाडा विकास मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी पक्षश्रेष्ठींनी दिली. या पदाला पुरेपुरे न्याय देण्याचा प्रयत्न करू. मराठवाड्याचा सर्वांगिण विकासाकरिता सर्वांना सोबत घेत कसोशीने प्रयत्न केले जातील.

\B-डॉ. भागवत कराड, नवनियुक्त अध्यक्ष\B

\Bडॉ. कराड यांचा परिचय \B

महापौर (२००० -२००१ व २००६-२००७), उपमहापौर (१९९७-१९९८), भाजप शहर सरचिटणीस (१९९७-२०००), शहराध्यक्ष (२००१-२००४), भाजप भटके विमुक्त मोर्चा प्रदेशाध्यक्ष (२०१०-२०१३)भाजप प्रदेश चिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, चेअरमन नवकेतन फार्माचे, संचालक भगवान शिक्षण प्रसारक मंडळ, संचालक धन्वंतरेय एज्युकेशन ट्रस्ट.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. मारोती तेगमपुरे यांची निवड

$
0
0

औरंगाबाद - प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची 'एमफुक्टो'च्या (महाराष्ट्र्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना) केंद्रीय कार्यकारी मंडळावर निवड करण्यात आली. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकारिणीत बदल करण्यात आले. अंबड येथील गोदावरी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख तेगमपुरे यांच्यासह डॉ. संजय कांबळे व डॉ. अताउल्ला जहागिरदार यांची केंद्रीय कार्यकारी मंडळावर निवड झाली. तर डॉ. बप्पासाहेब म्हस्के यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, डॉ. सूर्यकांत जगदाळे, डॉ. सुनंद तिडके, डॉ. विठ्ठल मोरे, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अशोक ढवळे, बाबासाहेब पवार, डॉ. पुरुषोत्तम जुन्ने यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हेरिटेज वॉक’ला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हेरिटेज वॉक घेण्यात आला. औरंगाबाद शहराचे ऐतिहासिक वेगळेपण सांगणाऱ्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. शहराच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासाला उजाळा देण्यात आला.

योग दिनानिमित्त आयोजित हेरिटेज वॉकला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून सुरूवात झाली. बीबी का मकबरा परिसरात स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे संचालक डॉ. वि. ल. धारुरकर यांनी मार्गदर्शन केले. 'औरंगाबाद जिल्हा हा सुरक्षेच्या सामर्थ्याने बलाढ्य असल्यामुळ तुघलकांनी भारत देशाची राजधानी दौलताबादला केली. या भागातील बागबगिचे, तलाव, निसर्गसौंदर्याने नटलेले असल्यामुळे औरंगाबाद शहर दख्खनचा स्वर्ग म्हणून ओळखले जाई' असे धारुरकर म्हणाले. राजतडाग ते औरंगाबाद असा समग्र पट त्यांनी उलगडला. सातवाहन, यादव, तुघलक यांचा कालखंड तसेच मलिक अंबरचे औरंगाबाद उभारणीतील योगदान याची माहिती धारुरकर यांनी दिली. लेणी, मंदिर, किल्ले, नहरी, मकबरे, बगिचे यावर चर्चा झाली. हेरिटेज उपक्रमाला भारतीय पर्यटन विभागाचे अधिकारी अक्षय कल्याणकर, संजय पाइकराव, सुधीर सेवेकर, सुभाष जाधव, डॉ. कामाजी डक, मयुरेश खडके, डॉ. ह. नि. सोनकांबळे, डॉ. किशोर धाबे, डॉ. चंद्रशेखर जाफरे, डॉ. किरण काळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिकबंदीसाठी वॉर्ड कार्यालयनिहाय पथके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्य शासनाने प्लास्टिकबंदीच्या केलेल्या घोषणेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पालिका प्रशासनाने देखील तयारी केली असून, वॉर्ड कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली आहे. एकूण दहा पथके प्लास्टिकबंदीसाठी काम करणार आहेत.

शासनाने २३ जूनपासून संपूर्ण राज्यात प्लास्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध शहरांमध्ये प्लास्टिकबंदीची कारवाई केली जाणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी महापौर घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत बैठक झाली. बैठकीला स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, माजी सभापती दिलीप थोरात यांच्यासह आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, वॉर्ड अधिकारी उपस्थित होते. प्लास्टिकबंदी सक्तीने करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. शहरातील कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण सुमारे ४० टक्के असते. प्लास्टिकबंदीची कारवाई काटेकोरपणे केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे मत महापौरांनी यावेळी व्यक्त केले.

प्लास्टिकच्या विविध मायक्रॉनच्या कॅरिबॅग व अन्य वस्तुंच्या विक्रीवर, हाताळण्यावर व वापरावर बंदी घातली जाणार आहे. ही बंदी झुगारून उत्पादकाने, विक्रेत्याने किंवा सामान्य नागरिकाने प्लास्टिकच्या वस्तू हाताळल्यास पहिल्यावेळेस पाच हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे, दुसऱ्यावेळेस दंडाची रक्कम दहा हजार रुपये असेल. प्लास्टिक बंदी अंमलात आणण्यासाठी वॉर्ड कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नऊ वॉर्ड कार्यालयांची नऊ पथके आणि एक केंद्रीय पथक अशी दहा पथके यासाठी काम करणार आहेत. प्लास्टिक बंदी अंमलात आणण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर व सभापतींनी केले आहे.

प्लास्टिक वस्तुंचे उत्पादक: सुमारे ३००

प्लास्टिक वस्तुंचे ठोक विक्रेते : सुमारे ५०

प्लास्टिक विक्रीतून रोजची उलाढाल : दीड ते दोन कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिटिझन रिपोर्टर-२१जून

$
0
0

हर्सूल टी पॉइंट

रस्त्याचे डांबरीकरण करा

हर्सूल टी पॉइंट परिसरात अनेक नागरी वसाहती स्थापन झाल्या आहेत, परंतु रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांची या भागात वानवा असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हर्सूल टी पॉइंट ते ऑडिटर्स सोसायटी हा कमी अंतराचा रस्ता मंजूर झाल्याचे सांगत असले तरी पावसाळा सुरू होऊनही या रस्त्याचे काम झालेले दिसत नाही. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनांची मोठ्या प्रमाणात आदळआपट सुरूच आहे. अंतर्गत नागरी वसाहतीमधील रस्तेही पक्के नसल्याने पाण्याचे टँकर अशाप्रकारे चिखलामध्ये फसत आहेत या भागातील सर्व कच्चा रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी योगेश्वर निकम, साहेबराव पाटील, किरण भदाणे, पद्माकर कांबळे, पंडित मस्के, विनोद म्हस्के, प्रा. अर्जुन तायडे, शंकर गतखणे, किरण मस्के, राजू सपकाळ, प्रा. अनिल लहाने, प्रा. रामदास वनारे आदींनी केली आहे.

- रवींद्र तायडे, हर्सूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सुरेश वरकड यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अशोकनगर, गारखेडा येथील रहिवासी डॉ. सुरेश आसाराम वरकड (वय ५६) यांचे गुरुवारी सकाळी निघन झाले. त्यांच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक

मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे. दैनिक पुढारीचे जाहिरात व्यवस्थापक मनोज वरकड यांचे ते वडील होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चोरांच्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेकडून अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोन वेगवेगळ्या कारवायात पोलिसांनी चोरीच्या १४ दुचाकी हस्तगत केल्या. या टोळीतील आरोपींना पुढील तपासासाठी सबंधित पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा येथील कृष्णा छगन राठोड यांची बुलेट चोरट्यांनी घरासमोरून लांबविली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या वतीने तपास सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी योगेश चुन्नीलाल लोधवाल (वय २५, रा. राममंदिर वेरूळ) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी योगेशचे साथीदार शेख शकील शेख शब्बीर (वय २६, रा. हिवरखेडा, ता. कन्नड) व अजमतखान समशेरखान (वय २१ रा. सुलीभंजन, खुलताबाद) यांना अटक केली. या दोघांच्या ताब्यातून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच अजून एक आरोपी शिवाजी विष्णु पायघन (रा. शेवगाव) याला देखील अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून बिडकीन परिसरातून चोरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधिक्षक उज्वला वनकर, पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सचिन कापुरे, विवेक जाधव, भगतसिंग दुलत, जाधव, गणेश मुळे, रतन वारे, विक्रम देशमुख, शेख नदीम, आशिष जमधडे, किरण गोरे, बाबासाहेब नवले, योगेश तरमाळे, सागर पाटील व संजय तांदळे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबालवृद्धांची योग साधना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात अबालवृद्धांनी गुरुवारी योग साधना केली. विशिष्ट प्रकारची लय साधत, ओमकाराचा उच्चार करत अनेकांनी श्वासावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ सनदी अधिकारी, उच्चपदस्थ राजकीय नेत्यांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण योग दिनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.

\Bविभागीय क्रीडा संकुल\B

योग दिनाचा मुख्य कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुलाच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे यजमानपद जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे होते. शहरातील ६५ शाळांच्या सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. सकाळी सात वाजता योग दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपायुक्त विजयकुमार फड, महेंद्र हारपाळकर, वर्षा ठाकूर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, सरिता सुत्रावे, मंजुषा मुथा, दीपक चव्हाण, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, तहसीलदार मुनलोड, विजय राऊत, राजू शिंदे, मुकुंद चिलवंत, उपशिक्षणाधिकारी गजानन सुसर, प्रियाराणी पाटील, एस. पी. जवळकर, उदय कहाळेकर, शरद कचरे, राजाराम दिंडे, हितेंद्र खरात, गुरुदीपसिंग संधू, गोकुळ तांदळे, गणेश पवार, चंद्रशेखर घुगे, भाऊराव वीर, कृष्णा केंद्रे, तनुजा गाढवे, सुभाष मुरकुंडे, गणेश बेटुदे आदी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त आरती पाल यांच्यासह ६५ शाळांचे सहा हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. पतंजलीचे योगगुरू सुभाष वेदपाठक, राम बारस्कर यांनी योगाचे शास्त्रोक्त धडे देऊन त्याचे महत्त्व सांगितले.

\Bसायकल फेरी \B

योग दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेतर्फे सायकल फेरी काढण्यात आली. विभागीय क्रीडा संकुलातून फेरीला प्रारंभ झाला. यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे, सचिव चरणजितसिंग संघा, डॉ. रामदास खोडवे, डॉ. दीपक बोर्डे, विनायक देव, विनायक कुमार कटके, सुशील मापारी, सचिन देशमुख, प्रा. शिंदे आदी सायकलपटू सहभागी झाले होते.

\Bमहापालिका\B

महापालिकेच्या मुख्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कर निर्धारक व संकलक वसंत निकम, क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, जनसंपर्क अधिकारी अहेमद तौसिफ, अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, कार्यकारी अभिंयता हेमंत कोल्हे, मुख्य लेखाधिकारी रा. मा. साळुंके, जलतरण तलाव व्यवस्थापक अभय देशमुख यांच्यासह विविध भागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पतंजली योग समितीचे डॉ. विशाल शर्मा आणि औरंगाबाद जिल्हा योग असोसिएशनचे योग शिक्षक संगीता तोंडे, शुभांगी जोशी, कोमल सुरडकर, प्रसाद ताकवाले यांनी उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले.

\Bडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\B

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग, योगशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला. विद्यापीठातील क्रीडा विभागाच्या हॉलमध्ये सकाळी योगासाने करण्यात आली. योग शिक्षक अंबादास वाघ व मंगल फरताडे यांनी प्रात्यक्षिक करुन योगाचे महत्त्व सांगितले. यावेळी कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू प्रोफेसर अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव प्रोफेसर साधना पांडे, डॉ. फुलचंद सालामपुरे, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. टी. आर. पाटील, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. संजय साळुंके, डॉ. दिगंबर नेटके यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

\Bपोलीस अधीक्षक कार्यालय\B

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालयात सकाळी सहा वाजता योग शिबिर घेण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरला विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना भारंबे म्हणाले, पोलिसांची दिनचर्या नेहमीच व्यस्त व तनावपूर्ण असते. बऱ्याच वेळा कौटुंबिक जबाबदारीमुळे मानसिक स्वास्थ योग्य प्रकारे सांभाळले जात नाही. त्यामुळे अनेक व्यांधीना सामोरे जावे लागते. पोलिसांनी नियमित थोडा वेळ योगा करण्यासाठी दिल्यास त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. यावेळी अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

\B सिंधी कॉलनीत योगदिन साजरा\B

अंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्याने सिंधी कॉलनी येथे योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय योग संस्थानचे भाऊ सुरडकर यांनी योगाचे प्रकार शिकवत योगाचे महत्त्व आणि जीवनात होणारे फायदे सांगितले. या शिबिराला सिंधी कॉलनीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी टीम जेएसएमचे देशराज डेबरा (राजा), संजय परसवाणी, गिरीश तोलवाणी, गौरव केलाणी, डॉ. बबीता परसवाणी व साक्षी रामचंदानी यांनी परिश्रम घेतले.

\Bक्रिएटीव्ह हायस्कूल

\B

बीड बायपास रोडवरील क्रिएटीव्ह स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग साधनेत अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पंतजली योग विद्यापीठाच्या योग शिक्षिका सुचिता निमकर व अरुणा गरड यांनी योगाचे महत्त्व विशद करत योग प्रात्यक्षिके करुन दाखवली. संस्थेचे अध्यक्ष एस. पी. ज‌वळकर, प्राचार्य पी. गीता, माधवी सोनटक्के, अनिता बोराडे, शीतल नगरे, सागर मगरे, सुनीता गुंड. सविता ढाके, अविनाश हिवराळे, शलखा हिवाळे, वर्षा ठोकळ आदी उपस्थित होते.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवबा संघटनेच्या चौघांना जामीन

$
0
0

औरंगाबाद - कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणाऱ्या शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी आमदार नीलेश राणे यांनी विशेष सहकार्य केले अशी माहिती शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जरांगे यांनी दिली. सिंचन भवन येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील दिड वर्षांपासून राजेंद्र जऱ्हाड, अमोल खुणे, बाबूराव वाळेकर व गणेश खुणे कारागृहात होते. राणे यांनी ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. हर्षद निबाळकर यांच्यावर खटल्याचे काम सोपवले होते. हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने चौघांना जामीन मंजूर केला असे जरांगे यांनी सांगितले. यावेळी गणेश शिंदे, देविदास पाठे, सतीश जगताप, हनुमान मुळीक, बाळासाहेब हिंगे, श्रीराम कुरणकर, ज्ञानेश्वर इंगळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images