Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शहरातील मंगळसूत्रचोरांची पोलिसांकडून झाडाझडती

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा परिसरात मंगळसूत्र चोरट्याने सध्या धुमाकूळ घालित पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. गुन्हे शाखेच्या वतीने या आरोपींचा शोध सुरू आहे. शहरातील मंगळसूत्र चोरीचे पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची देखील झाडाझडती घेण्यात येत आहे. तसेच श्रीरामपूर येथील मंगळसूत्र चोर देखील पोलिसांच्या रडारवर आहेत.

गेल्या २० दिवसांत सातारा परिसरातील पेशवेनगर भागात एका मंगळसूत्र चोराने धुमाकूळ घातला आहे. २० दिवसात तीन मंगळसूत्र या चोरट्याने लांबवले आहे. वर्णनावरून एकाच आरोपीने हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्याला शोधण्याचे आव्हान आहे. औरंगाबाद शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर बारा मंगळसूत्र चोरणारे गुन्हेगार आहे. या गुन्हेगारांचा शोध घेत त्यांची चौकशीसत्र सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीत यातील काही गुन्हेगारांनी गुन्हेगारी सोडली असून कामधंद्याकडे वळाल्याचे दिसून आले आहे. या गुन्हेगारांपैकी राहुल गायकवाड हा मंगळसूत्र चोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. राहुलचा देखील शोध पोलिसांकडून सुरू आहे. तसेच शहरात श्रीरामपूर येथील कुख्यात मंगळसूत्र चोर नेटके तसेच इराणी गँगच्या सदस्यांनी देखील गुन्हे केल्याचे प्रकार घडले आहेत. गुन्हे शाखेकडून या बाहेरगावच्या देखील गुन्हेगारांची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिडकोत भींत पडली, गारखेड्यात पुल वाहून गेला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसामुळे सिडको वॉर्ड क्रमांक ८० भागातील भींत पडल्याची घटना घडली आहे. याशिवाय गारखेडा भागात जवाहरनगर पोलिस स्टेशनसमोर असलेल्या पुलाचा काही भाग देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. जागोजागी पाणी तुंबल्याच्या तक्रारी देखील शुक्रवारी दुपारच्या नंतर प्राप्त झाल्या आहेत.

गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दुपारच्यानंतर पावसाने औरंगाबादकरांना झोडपून काढले. गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे सिडको वॉर्ड क्रमांक ८० भागातील सी सेक्टरमधील प्लॉट क्रमांक ७ बी येथील भींत पडली. ही भींत नाल्यालगत होती. भूमिगत गटार योजनेचे काम अपूर्ण राहिल्याचा फटका या भींतीला बसला. सिडको एन-पाच येथून वाहत येणाऱ्या नाल्याचा प्रवाह जोरात होता, पण भींतीमुळे पाण्याला पुढे जाण्यास जागा नव्हती. पाणी तुंबून राहिल्याने भींत पडली. भूमिगत गटार योजनेचे काम योग्य प्रकारे न झाल्यामुळे अशा घटना घडत आहेत. पावसाळा आता कुठे सुरू झाला आहे, त्यामुळे या घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून महापौरांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी राहुल इंगळे, विशाल लाहोट, साजन राठोड यांनी केली आहे.

गारखेडा भागातील जवाहरनगर पोलिस स्टेशनच्या समोरून वाहणाऱ्या नाल्यावरील पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला. सहकारनगरात आमदार सतीश चव्हाण यांच्या घराच्या शेजारी एक झाड पडल्याची घटना देखील शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे घडली. नूरकॉलनीच्या नाल्याला पूर आला. त्यामुळे संपूर्ण नूर कॉलनीत पाणी तुंबले होते. तुंबलेले पाणी उपसून काढण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले होते. विश्वभारती कॉलनीत चेतक घोड्याच्या चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. आजुबाजुच्या अपार्टमेंटमध्ये देखील पाणी शिरले. पोलिस आयुक्तांच्या बंगल्यात देखील पाणी शिरल्याची तक्रार अग्निशमन विभागाकडे प्राप्त झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा, देवळाईला पावसाने झोडपले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सातारा, देवळाई परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक वसाहतींत पाणी शिरले. त्याचबरोबर सातारा परिसरात बांधलेल्या बंधाऱ्यांत एकाच पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

औरंगाबाद शहराच्या तुलनेत गुरुवारी रात्री सातारा, देवळाई परिसरात पावसाचा जोर जास्त होता. साताऱ्यातील गट क्रमांक १६०, १६१मधील नाला बुजविल्यामुळे यश लोटस पार्क, एस. के. प्राइडसह लगतच्या घरांत पाणी शिरले, गट क्रमांक १६३मधील डिलक्स पार्क वसाहतीमध्येही नाला बुजविल्यामुळे पाणी शिरले. लक्ष्मी कॉलनीतही पावसाचे पाणी तुंबले आहे. त्याचबरोबर राधा मंगल कार्यालयापासून पुढे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. रेणुका माता मंदिर कमान ते चाटे स्कूल हा रस्ता चिखलमय झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना नागरिकांना कसरत करावी लागली. याच रस्त्यावर महावितरणच्या उपकेंद्राजवळील नाल्यावरील पुरावर पावसामुळे माती मोठ्या प्रमाणात वाहून आली होती.

सातारा, देवळाई परिसरात डोंगरालगत अनेक बंधारे बांधण्यात आले आहेत. उन्हाळ्यात हे बंधारे कोरडे पडले होते. या पावसामुळे बंधाऱ्यांत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारात जांभ‌ळं २०० रुपये किलो

0
0

(जांभळांचा फाइल फोटो वापरणे)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आवक कमी असल्याने रानमेवा असलेल्या जांभळाला सुगीचे दिवस आले आहेत. जांभळांना घाऊक बाजारात क्विंटलमागे ३ हजार ५०० रुपये ते ७ हजार रुपये असा भाव असून किरकोळ बाजारात १६० ते २०० रुपये प्रती किलो या दराने जांभूळची विक्री होत आहे.

काळीभोर, टपोरी तसेच रसरशीत जांभळं बाजारात गेल्या काही दिवसापासून विक्रीस आली आहेत, परंतु या जांभळांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांना खिसा मात्र भरपूर रिकामा करावा लागत आहे. जाधववाडी येथील बाजार समिती आवारात स्थानिकसह जळगाव, चाळीसगाव, नाशिक आदी भागातून जांभळाची आवक होत आहे, पण ती तुलनेत कमी आहे. १८ व १९ जून रोजी १३ क्विंटल आवक झाली होती. २० जूनला १० तर २१ जून रोजी २५ क्विंटल आवक झाल्याचे बाजार समिती अधिकाऱ्यांनी सांगितले. आवक कमी व मागणी जास्त असल्याने जांभळाचे भाव गगनाला भिडले आहेत. ठोक बाजारात ३ हजार ते ७ हजार रुपये प्रती क्विंटल असा दर तर किरकोळ बाजारात एका किलोसाठी १६० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत भाव द्यावा लागत आहेत. चढे दर असले तरी आस्वाद घेणाऱ्यांची कमी नसल्याचे फळ विक्रेते सलीम शेख यांनी सांगितले. आवक वाढेपर्यंत दर वाढलेलेच राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यात पडून बुलेटस्वाराचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जयभवानी नगर येथील घटना ताजी असतानाच नाल्यावर ढापे बसविण्यात महापालिकेने केलेल्या हलगर्जीपणामुळे आणखीन एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी रात्री शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सिडको एन-सहा सिडको भागात घरी जात असलेला एक बुलेटस्वार मोठ्या नालीत पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. गेल्या दीड वर्षापूर्वीही याच भागात एक व्यक्ती नाल्यात वाहून गेला होता. याप्रकरणी चौकशीचे आदेश महापौरांनी दिले आहे. दरम्यान, या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा आमदार अतुल सावे यांनी दिला.

नाल्यात पडून मृत झालेल्या व्यक्तीचे नाव चेतन रत्नाकार चोपडे (वय ३८ रा. टेलिकॉम हौसिंग सोसायटी, सिडको एन सहा) असे आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास कॉलनी परिसरातून ते दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पावसाचे पाणी साचले होते. घर हाकेच्या अंतरावर असतानाच ते बुलेटसह रस्त्यालगत नाल्यात पडले. गंभीर मार लागल्याने ते बेशुद्ध झाले व पाण्यात बुडाले. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड केली. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक शिवाजी दांडगे, मकरंद कुलकर्णी, सुनील दांडगे, पवन कासलीवाल, सचिन सुशील यांच्यासह सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल जे. ए. महेर, सहायक फौजदार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाल्यातील पाण्यात डुबलेल्या त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. खिशात असलेल्या आधारकार्डवरून बुलेटस्वाराचे नाव चेतन चोपडे असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना तातडीने घाटीत नेले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, असे सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले. नगरसेवक दांडगे व कुलकर्णी यांनी आधारकार्डावरून चोपडे यांच्या घराचा शोध घेत नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. महापौर नंदकुमार घोडले यांनी मध्यरात्री घाटीत धाव घेतली.

\Bदोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी \B

आमदार सावे यांनी शुक्रवारी एन सहा सिडको परिसरातील घटनास्थळाची पाहणी केली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी, सिकंदर अली, वॉर्ड इंजिनिअर सुनील जाधव आदी अधिकारीही घटनास्थळी आले. सावे यांच्यासह अधिकाऱ्यांनी टेलिकॉम कॉलनीपासून माता मंदिरापर्यंत नाल्याची पाहणी केली. नाला हा माता मंदिर परिसरात ब्लॉक झाला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून, ते दूर करून मोठे आउटलेट काढण्याच्या सूचना गेल्याच वर्षी दिल्या होत्या. त्यावर कोणताही कार्यवाही का झाली नाही, असा जाब आमदार सावे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. नगरसेवक दांडगे, कुलकर्णीही आक्रमक झाले.

\Bमहापौराचे कारवाईचे आदेश \B

दरम्यान, महापौर नंदकुमार घोडले, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृह नेते विकास जैन यांनी घटनास्थळाची दुपारी पाहणी केली. चोपडे मृत्युप्रकरणी शहर अभियंता सखाराम पानझाडे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई निश्चितच होईल, अशी माहिती महापौरांनी दिली. जयभवानी नगरात भगवान मोरे यांचा मृत्यू नंतर चार दिवसांत घडलेली हि दुसरी घटना आहे. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी दक्षता बाळगण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. उघड्या नाल्यांवर ढापे टाकले जातील, जाळ्या बसविल्या जातील. निधीअभावी तातडीने कामे थांबणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. अधिकाऱ्यास झालेल्या मारहाण प्रकरणी त्यांनी अधिक माहिती घेऊनच बोलता येईल, असे सांगत अधिक भाष्य टाळाले.

\Bचोपडे यांच्यावर अंत्यसंस्का\B

चेतन चोपडे यांच्यावर मुकुंदवाडी येथील स्मशानभूमीत दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्षीची एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. चेतन एन सहा भागात दोन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत. त्यांची आई व भाऊ म्हाडा परिसरातील श्रद्धा कॉलनी येथे राहतात. चेतन हे वाळूज येथील एका कंपनीत कामाला होते. दोन वर्षांपूर्वी ते नाशिकहून येथे आले होते. गेल्याच वर्षी चेतन यांच्या वडिलांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएसबीएस शाळेचा स्लॅब कोसळला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

जालना रोडवर असलेल्या पीएसबीए शाळेच्या इमारतीच्या व्हरंड्याचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. स्लॅब कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्धा ते एक सात शाळेच्या बाहेर मैदानात उभे करण्यात आले होते. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही. या घटनेमुळे उद्या शनिवारी होणारी पालकसभा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. व्हरंड्याचा स्लॅब कोसळल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे पालिकेची लक्तरे वेशीवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली. शहराच्या विविध भागातील शेकडो घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिकेचे स्थापन केलेले नियंत्रण कक्ष नावापुरतेच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

शहर व परिसरात गुरुवारी रात्री दहा वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला. हा पाऊस रात्री एकनंतरही सुरू होता. या पावसाने काही मिनिटांत रस्त्यांवर साचून पाणी वसाहतींमध्ये घुसले. नागरिकांनी मदतीसाठी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला, परंतु नागरिकांना मर्यादित स्वरुपाचीच मदत मिळाली. अग्निशमन विभागाशिवाय पालिकेची इतर यंत्रणा मदत करण्यासाठी सज्ज नव्हती. या विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. रात्री साडेअकरा वाजता निरालाबाजारात तापडिया नाट्यमंदिरासमोरील अपार्टमेंट, सिडको एन ७ येथील नरेंद्र हौसिंग सोसायटीमधील घरांत पाणी शिरले. समतानगरमध्येही पावसाच्या पाण्यामुळे हाहाकार उडाला. या भागातील एका ड्रॅायव्हिंग स्कूल जवळील घरांत पाणी शिरल्याने नागरिक रात्रभर जागे होते. या घरांतील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चंपा चौकातील मीर साहब दर्ग्याजवळी सुमारे पन्नासपेक्षा जास्त घरांत पाणी शिरले. फाजलपुरा येथील रुपमहल मंगल कार्यालयाच्या शेजारील घरांतही अशीच स्थिती होती.

नारेगाव येथील अजीम कॉलनीमधील अनेक घरांतील साहित्य पाण्यावर तरंगत होते. येथील नागरिकांनी अग्निशमन विभागाकडे मदत मागितली. चिकलठाणा आठवडी बाजाराच्या शेजारील मोतीवाला कॉलनीच्या गल्ली क्रमांक एक मधील घरांमध्ये पाणी साचले, याच भागातील इतर घरांची अवस्था विदारक होती. गारखेड्यातील रिलायन्स मॉललगतच्या दिशा संकुलची पार्किंग, एमजीएम हॉस्पिटलमागील घरे, या घरांच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. जयविश्वभारती कॉलनी येथील चेतक घोड्याजवळच्या घरांमध्ये शिरलेले पाणी उपसण्याचे काम शुक्रवारी दुपारीही सुरू होते. सिडको एन ५ येथील मसलेकर हॉस्पिटललगतच्या काही घरांत पाणी शिरून नुकसान झाले. पुंडलिकनगरचा रस्ता व रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रस्त्याशेजारील कॉम्प्लेक्सच्या अंडरग्राउंडमध्ये पाणी शिरून गोदाम, दुकानांचे मोठे नुकसान झाले.

\Bनियंत्रण कक्ष नावापुरतेच

\B

पावसाळ्यात नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी महापालिकेने वॉर्ड कार्यालयनिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. नऊ वॉर्ड कार्यालयात नऊ नियंत्रण कक्ष आणि मुख्यालयात एक नियंत्रण कक्ष, असे दहा नियंत्रण कक्ष स्थापन केले जातील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले होते. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे हे नियंत्रण कक्ष नावापुरतेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूद्रवाडीप्रकरणी सीआयडी चौकशी करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रुद्रवाडी (जि. लातूर) येथे मातंग समाजाचे लोक मंदिरात गेले म्हणून गावगुंडांनी मारहाण केली. वाकडी (जि. जळगाव) येथे विहिरीत पोहण्याच्या कारणावरुन मातंग समाजाच्या दोन लहान मुलांना मारहाण करण्यात आली. या घटनेतील गावगुंडांना कडक शासन करावे अशी मागणी फकिरा ब्रिगेडने केली.

रुद्रवाडी येथील घटनेत पोलिसात तक्रार दिल्यानंतर गावाने मातंग समाजावर बहिष्कार टाकला. या प्रकारात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. दबाव वाढल्यानंतर १६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. वाकडी गावात विहिरीत पोहण्याच्या कारणावरुन सचिन चांदणे व राहुल चांदणे या मुलांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संबंधित घटनेची सीआयडी चौकशी करावी असे फकिरा ब्रिगेडने म्हटले आहे. याबाबत प्रा. डॉ. संजय शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकशी समितीसमोर ७३ शिक्षकांची हजेरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा परिषद जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये सोयीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी काही शिक्षकांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. अशा ७३ शिक्षकांना नोटीस देऊन जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. या शिक्षकांनी गुरुवारी आपले म्हणणे सादर केले. बदली प्रक्रियेत नोंदविलेल्या नियमात अनेक संभ्रम असल्याने या शिक्षकांवर काही कारवाई होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये सोयीच्या पदस्थापना मिळाव्यात म्हणून शिक्षकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्या शिक्षकांची चौकशी समिती समोर सुनावणी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बदलीसाठी सोयीच्या पदस्थापनेबाबत वैद्यकीय कारणात हृदयशस्त्रक्रिया, असा उल्लेख आहे. काही शिक्षकांची अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाली आहे. अशांनी कागदपत्रे जोडली होती. त्यामुळे बायपास झालेल्यांनाच प्राधान्य असणार की नाही? हे समिती सदस्यांनाही ठाऊक नव्हते. पती पत्नी एकत्रीकरणासाठी असलेल्या निकषावरही संभ्रम आहे. एकूणच बदल्यांवरून भविष्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकूणच शिक्षक बदल्यांचे हे प्रकरण जिल्हा परिषद प्रशासनात कायम वादग्रस्त विषय राहणार आहे.

\Bअंतराचा मुद्दा कळीचा \B

काहींनी खाजगी नोकरीतील जोडीदाराची कागदपत्रे दिली आहेत. ही ग्राह्य धरणार की नाही?, असा प्रश्न आहे. अंतराचा मुद्दा सर्वात कळीचा ठरणार आहे. बहुतांश शिक्षकांनी सादर केलेली कागदपत्रे निकषानुसार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा रद्द करण्यासाठी दमानिया हायकोर्टात, खडसेंना नोटीस

0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी, औरंगाबाद

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी यावल पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एफआयआर रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केली आहे. या याचिकेची सुनावणी ५ जुलै रोजी होणार आहे.

याचिकेच्या प्राथामिक सुनावणीअंती न्या. संभाजी शिंदे आणि न्या. व्ही. के. जाधव यांनी मूळ तक्रारदार व राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह राज्य शासन, मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक या प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या जनसंपर्क अधिकारी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात आपण एकनाथ खडसे यांच्याकडे पैसे ठेवायचे आणि त्यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे, अशी ऑफर अंजली दमानिया यांनी आपल्याला दिली होती, असा दावा केला होता.

या मुलाखतीआधारे एकनाथ खडसे यांनी पोलिसांत अंजली दमानिया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यात भादंवि कलम १८६, १२० ब, १४९, आदी कलमान्वये बळजबरी घरात शिरणे, शासकीय काम करण्यास अडथळा आणणे, बेकायदा जमाव जमविणे, कट रचणे आदी कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला.

या तक्रारीच्या अनुषंगाने काहीही घडलेलेच नाही, त्यामुळे एफआयआर रद्द करावा, अशी विनंती करण्यात आली. मूळ तक्रारदार एकनाथ खडसे यांनाही प्रतिवादी करण्याचे निर्देश देत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावल्या. याप्रकरणी दमानिया यांच्यातर्फे सतेज जाधव, राज्य शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे, तर एकनाथ खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ विनायक दीक्षित हे काम पाहत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारने उडवून लुटले दागिने; आरोपीला मोक्का कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दुचाकीवर सोन्या-चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला कारने उडवून पाच लाखांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला गुरुवारी (२१ जून) फेरअटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी कोर्टात हजर करण्यात आले असता गुरुवारपर्यंत (२७ जून) मोक्का कोठडीत ठेवण्याचे आदेश मोक्का कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दिले.

या प्रकरणी प्रकाश तुकाराम थोरात (४२, रा. कुंबेफळ, ता. केज, जि. बीड) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, १३ फेब्रुवारी २०१८ रोजी सोने-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी (मृत) विक्रम उर्फ विकास गौतम थोरात (३५, रा. कुंबेफळ) हे दागिने सोबत घेऊन केजवरुन कुंबेफळकडे दुचाकीवरुन येत होते. त्यावेळी कारमधून आलेल्या आरोपींनी विक्रम यांच्या दुचाकीला केज-अंबाजोगाई हायवेवर जोराची धडक देऊन पाच लाखांचे दागिने ठेवलेली बॅग पळविली. यात विक्रम हे गंभीर जखमी होऊन कोसळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता, त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भादंवि ३०२, ३९७, ३९४, १२० (ब), ३४ कलमान्वये तसेच संघटित गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यावरुन मोक्का कायद्याच्या ३(१)(२), ३(२), ३(४) कलमान्वये केज पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात महादेव रमेश डोंगरे (१९), अतुल रमेश जोगदंड (२३, दोघे रा. सोनीजवळा, ता. केज, जि. बीड), अमोल उर्फ प्रवीण संभाजी मोहिते (२६, रा. हासूर-कापशी, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांना १४ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक करण्यात आली होती व सध्या तिघे कारागृहात आहेत, तर आरोपी अमर लक्ष्मण सुतार (३९, रा. निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) याला गुरुवारी (२१ जून) फेरअटक करण्यात आली. आरोपी अमर याला कोर्टात हजर करण्यात आले असता, गुन्हा गंभीर असून, मोटारसायकल तसेच कार कुणाची होती, या प्रकरणात काही कट रचण्यात आला होता का व रचला होता तर कुठे रचला होता, आरोपींना कोणी मदत केली, तसेच आरोपींच्या संपत्तीची माहिती घेणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला सात दिवस मोक्का कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला बुधवारपर्यंत (२७ जून) मोक्का कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले.

....

प्रेमसंबंधांवरुन खून?

या प्रकरणात आरोपीच्या बहिणीचे मृताशी प्रेमसंबंध होते का आणि त्यावरुन त्याला कारने उडवून त्याचा खून करण्यात आला होता का, याचाही तपास करण्यात येणार आहे. या कारणामुळे तर कटकारस्थान रचण्यात आले नव्हते ना, ही बाबही तपासली जाणार आहे.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसुन मुलीचा विनयभंग, सक्तमजुरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिकवणीवरुन दुचाकीवर घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपी मोहम्मद शफीक शेख अब्दुल हमीद याला तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी शुक्रवारी (२२ जून) ठोठावली.

या प्रकरणी शहरातील १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २६ फेब्रुवारी २०१६ रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास फिर्यादी मुलगी शिकवणीवरुन दुचाकीवर घराकडे निघाली होती. त्यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी व आरोपी मोहम्मद शफीक शेख अब्दुल हमीद (२०, रा. हर्षनगर, औरंगाबाद) हा तिचा पाठलाग करत होता व ते लक्षात येताच मुलगी वेगात घरी पोहोचली. मात्र ती घरी पोहोचल्यानंतर आरोपी तिच्या घरात घुसला आणि तिच्या हातात दोन अमेरिकन डॉलर देऊन लज्जास्पद कृत्य करीत तिचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर मुलीचे आई-वडील धावत आले आणि त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरुन भादंवि ४५२, ३५४, ३५४ (ड), तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को)७ व ८ कलमान्वये सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

... तर दीड महिना अतिरिक्त शिक्षा

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील आर. सी. कुलकर्णी यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्षपुराव्यांवरुन कलम ४५२ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त सक्तमजुरी, तर 'पोस्को'च्या कलम ७ व ८ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदपींनी खंडणीची मागणी करीत पाच हजार लुबाडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मद्यपींनी दारुची व खंडणीची मागणी करीत मॅनेजरला मारहाण करीत पाच हजार रुपये लुबाडले. गुरुवारी सकाळी दहा वाजता टाऊन हॉल येथील देशी दारुच्या अड्ड्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी चार आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाऊन हॉल परिसरात सत्यनारायण जैस्वाल यांचे देशी दारुचे दुकान आहे. या दुकानात अय्युबखान युसूफखान (वय ४२, रा. टाऊन हॉल) हे मॅनेजर म्हणून काम करतात. गुरुवारी सकाळी त्यांच्या दुकानात चार तरुण आले. या तरुणांनी अय्युबखान यांना दारुच्या बाटल्यांची मागणी केली. अय्युबखानने त्यांना पैसे मागितले. यावेळी या तरुणांनी 'तुला सांगितले होते ना, दुकान चालवायची असेल तर रोज आम्हाला एक हजार रुपये द्यावे लागतील. आम्हाला दारुचे पैसे मागतो' का असे म्हणत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. यावेळी एका आरोपीने तेथील दारुची रिकामी बाटली उचलून अय्युबखान यांच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच दुकानाच्या गल्ल्यातील रोख पाच हजार रुपये काढून घेत पसार झाले. या प्रकरणी अय्युबखानच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गुड्डू, माजेद, जावेद उर्फ जेके व अझहर यांच्या विरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएसआय बांगर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीडित महिलेने जन्म दिलेल्या चिमुकल्याचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बलात्कार झालेल्या पीडितीने गर्भवती राहील्यानंतर जन्म दिलेल्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी घाटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी सुरुवातीला उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून वैजापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

या २४ वर्षाच्या पीडित तरुणीने गुरुवारी या प्रकरणी तक्रार दाखल केली. वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे १ ऑक्टोंबर २०१७ रोजी ही तरुणी एकटी घरी होती. यावेळी संशयित आरोपी नीलेश शेषराव जाधव (वय २८, रा. लासूरगाव) याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी गर्भवती राहिली. नुकताच तिने घाटी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला होता. मात्र, उपचारादरम्यान या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला घाटी हॉस्पिटलच्या पोलिस चौकीमध्ये नोंद करण्यात आली होती. या नोंदीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सुरुवातीला आरोपी जाधव विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, घटना वैजापुर पोलिस ठाणे हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा वैजापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात २० जुलै रोजी चक्काजाम

0
0

मोठी सिंगल

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पेट्रोल डिझेलची सातत्याने होणारी दरवाढ थांबवून शासनाने विक्री जीएसटी प्रणालीत आणावी, या मागणीकरीता २० जुलै रोजी देशभरात चक्का जाम आंदोलन घेण्यात येणार आहे. या आंदोलनाचे रुपरेखा ठरवण्यासाठी शुक्रवारी एएस क्लब येथे ट्रान्सपोर्ट असोसीएशनी बैठक घेण्यात आली.

सातत्याने होत असलेल्या दरवाढीचा ट्रान्सपोर्ट चालकांना फटका बसत आहे. या दरवाढीला ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेने पूर्वीपासून विरोध केला आहे. या विरोधामुळे २० जुलै रोजी देशभरात चक्का जाम करण्यात येणार आहे. वाहन टोलनाका हा १०० किलोमीटर अंतरावर करावा, राज्यांच्या सीमारेषेवर आरटीओ व पोलिसांचा त्रास कमी करण्यासाठी कायम स्वरुपी तोडगा काढावा, ट्रान्सपोर्टच्या वाहनांचा थर्ड पार्टी इंन्सुरंसचा प्रिमीयम कमी करावा, या मागण्यासह इतर मागण्या ट्रान्सपोर्ट संघटनेच्या आहेत. या चक्का जाम आंदोलनात सुरुवातीला जिवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला मुभा देण्यात येणार आहे. मात्र, सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला ऑल इंडिया मोटर्स ट्रान्सपोर्ट काँग्रेस मुंबई महासंघाचे पदाधिकारी प्रकाश गवळी, बालमीतसिंग, अमृतसिंग, योगेशसिंग, औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी फय्याजखान, जयकुमार थानवी, असद अहेमद, वाळूज ट्रान्सपोर्टचे पी.एस. पुणीया, एम.जी. इरफानी यांच्यासह इतरांची उपस्थीती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाचे दमदार आगमन

0
0

(ग्रामीण पान मेनलीड. गंगापूर व फुलंब्री नदीचे फोटो वापरणे)

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंधरा दिवस दडी मारल्यानंतर जिल्ह्यात गुरुवारी रात्री पावसाचे दमदार आगमन झाले. दिवसभर १८.२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाअभावी रखडलेल्या खरीप पेरणीला या आठवड्यात वेग येणार आहे. फुलंब्री तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला. काही ठिकाणी पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे नुकसान झाले.

जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले होते. विशेषत: धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. तर ९० टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी झाली नव्हती. पैठण, वैजापूर व गंगापूर तालुक्यात सर्वाधिक भीषण स्थिती होती. गुरुवारी सायंकाळी उशिरा अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला. रात्री पावसाचा जोर वाढल्यानंतर नदी-नाले खळाळून वाहिले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर फुलंब्री तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडला. कांचनवाडी मंडळात ९० मिलीमीटर, महालगाव मंडळात ६४ मिमी, सिद्धनाथ वाडगाव ५२ मिमी आणि पाचोड मंडळात ४७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ६० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले होते. बहुतेक मंडळात अपेक्षित पाऊस झाल्यामुळे वाफसा होताच पेरणीला सुरुवात होणार आहे. सोयगाव, सावळदबारा, गारज, आमठाणा या मंडळात अत्यंत कमी पाऊस झाला. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प कोरडे असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पहिल्या पावसाने आशा पल्लवित झाल्या आहेत.

दरम्यान, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने पेरणीला उशिर झाला आहे. पुढील पावसात सातत्य राहिल्यास पिके चांगली येतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

----------पावसाची शक्यता

जिल्ह्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे. नदी-नाल्यांना जोराचा प्रवाह राहिल्यास खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषत: नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

-----जिल्ह्यात दमदार पाऊस

तालुका पाऊस

औरंगाबाद ४२.३०

फुलंब्री ४.५०

पैठण १७.८०

सिल्लोड १०.३८

सोयगाव १५.३३

कन्नड १६.७५

वैजापूर २४.३०

गंगापूर २०.५६

खुलताबाद १२.६७

सरासरी १८.२९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही शहरात धुवांधार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपले. सायंकाळी तासभर धुव्वाधार पाऊस झाला, मात्र चिकलठाणा परिसरात अत्यल्प पाऊस असल्यामुळे चिकलठाणा वेधशाळेत ०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर गुरुवारी दिवसभरात ६०.८ मिलीमीटर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.

गुरुवारी रात्री कोसळलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. रस्त्यावर पाण्याचे तळे साचल्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले. नाल्याला पूर आल्यामुळे काही वसाहतीत गैरसोय झाली. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे अनेक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित झाला. तब्बल चार तास जोरदार पाऊस कोसळला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मुसळधार पाऊस पडला. शहराच्या विविध भागात पाऊस पडला असला तरी चिकलठाणा भागात अत्यल्प पाऊस होता. त्यामुळे चिकलठाणा वेधशाळेत पावसाची फक्त ०.६ मिलीमीटर नोंद झाली. इतर भागात पावसामुळे पुन्हा नागरिकांचे हाल झाले. बहुतेक रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे पाणी साचत आहे. या पाण्याचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळून किरकोळ दुखापत होण्याचे प्रकार घडले. खडकेश्वर ते निराला बाजार रस्ता, सातारा परिसर, विद्यापीठ रस्ता, सिडको, शिवाजीनगर अशा अनेक रस्त्यांवर नागरिकांचे हाल सुरू आहेत.

\Bढगफुटी सदृश्य पाऊस?\B

गुरुवारी रात्री कोसळलेल्या पावसाने रौद्र रूप धारण केले होते. पाऊस पडण्याचा सरासरी वेग १४० मिमी नोंदला गेला. फक्त ४० मिनिटात७२ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. हा परिस्थिती ढगफुटी सदृश्य होती. कारण ताशी १०० मिलीमीटर पाऊस झाल्यास ढगफुटी म्हणतात. रात्री साडेनऊ ते साडेअकरापर्यंत ८५ मिली मीटर पावसाची नोंद झाली, असे औंधकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फस्ट रिस्पॉन्स टीमची स्थापन करा : आयुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

पावसामुळे घडत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी वॉर्डनिहाय फस्ट रिस्पॉन्स टीम स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विभागप्रमुखांना दिलेल्या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे आहे की, जयभवानीनगर येथे १९ जून रोजी भगवान मोरे यांचा नाल्यावरील मेनहोल उघडे असल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. उघडे मेनहोल तात्काळ बंद करण्यात यावीत. बहुतांश ठिकाणी नाल्याचा प्रवाह बंद असल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते. त्यामुळे जीवित हानी व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. वॉर्डनिहाय फस्ट रिस्पॉन्स टीमची नियुक्ती करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’ चा फैसला २ जुलैला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीचा निर्णय येत्या दोन जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सरकार आणि कंपनीतर्फे नवीन कराराबद्दल शपथपत्र सादर केले जाणार असून त्यानंतर न्यायालयाबाहेर तडजोडीचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात आहे.

पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) करार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत रद्द केल्यानंतर समांतर जलवाहिनीचे काम बंद पडले आहे. या निर्णयाविरोधात जलवाहिनीच्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यानच्या काळात याप्रकरणी न्यायालयाबाहेर तडजोड करून प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले गेले. यासाठी राज्य शासनाच्या पातळीवर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन बैठका झाल्या. काही अटींच्या आधीन राहून त्याच कंपनीकडून जलवाहिनीचे काम करू घेण्यास लोकप्रतिनिधींनी सहमती दर्शवली. कंपनीचे अधिकारी, राज्य शासनाचे अधिकारी यांनी एकत्र बसून नवीन कराराचा मसुदा तयार करावा. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयात मांडावा. न्यायालयाने त्यास मान्यता दिल्यास तो मसुदा अंतिम मान्यतेसाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवावा. सभेची मान्यता घेऊन जलवाहिनीचे काम त्याच कंपनीमार्फत करावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी व राज्य सरकार यांच्यात कराराचा मसुदा तयार झाला आहे. तो दोन जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाल्यावर तो लगेच सर्वसाधारण सभेत ठेवला जाईल. राज्य सरकार आणि कंपनी यांच्या समन्वयाने नवीन कराराचा मसुदा तयार केल्यामुळे तो मंजूर होईल, असे मानले जात आहे.

\Bराजकीय नेत्यांचे गुडघ्याला बाशिंग \B

हा मसुदा सर्वोच्च न्यायालयात मंजूर व्हावा व लगोलग त्याला सर्वसाधारण सभेतही मंजुरी मिळावी यासाठी काही राजकीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सप्टेबर महिन्यात समांतर जलवाहिनीचे काम सुरू होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंजना नदीच्या पुरात दोन वाहून गेले

0
0

कन्नड : तालुक्यातील पिशोर, नाचनवेल परिसरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे सारोळा गावाजवळ अंजना नदीला पूर आला. या पुरात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सारोळा येथील दोन तरूण वाहून गेले. त्यांच्यापैकी सत्तार सरदार पठाण (वय ३२) यांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. सचिन माधवराव माकवन (वय २६) हे बेपत्ता आहेत. पठाण यांना पुढील उपचारासाठी सिल्लोडला पाठवले आहे. दरम्यान, बेपत्ता सचिनचा ग्रामस्थ व पिशोरचे पोलिस निरीक्षक जगदीश पवार हे कर्मचाऱ्यांसह शोध घेत आहेत. रात्रीची वेळ असल्याने त्यात अडथळे येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images