Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महावितरणच्या कर्मचाऱ्याला नारेगावात मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विजेच्या खांबात वीज प्रवार उतरल्यामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत जमावाने महावितरणच्या कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण केली; तसेच चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील कार्यालयाची नासधूस केली. हा प्रकार रविवारी दुपारी तीन ते रात्री ११च्यादरम्यान घडला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या घटनेत तुळशीराम फकिरा सपकाळ (वय २५, रा. मयूरपार्क) यानी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये सपकाळ रविवारी कार्यालयात कर्तव्य बजावत होते. यावेळी नारेगाव येथे विजेच्या खांबात वीज प्रवार उतरल्याने गायीचा मृत्यू झाला असल्याची माहिती फोनवरून देण्यात आली. हा फोन आल्यानंतर सपकाळ व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले. यावेळी तेथे असलेल्या प्रमोद वाळेकर, गणेश गायकवाड व दोन आरोपी (सर्व रा. नारेगाव) यांनी सपकाळ यांना शिवीगाळ करीत रॉडने मारहाण केली. डाव्या कोपऱ्यावर मार लागल्याने सपकाळ जायबंदी झाले. त्यांच्या तक्रारीवरून संशयित चार आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दुसरी तक्रार महावितरणचे इशान नंदकिशोर उबाळे (वय ३०, रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड) यांनी दिली. उबाळे हे रविवारी रात्री साडेआठ वाजता महावितरणच्या कार्यालयात कर्तव्य बजावत होते. यावेळी जमावाने त्यांच्या कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश केला. खांबात वीज प्रवाह उतरल्याने गायीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. या रागातून त्यांनी कार्यालयातील टेबल, खुर्च्या, खिडक्यांच्या काचा, टेलिफोन; तसेच बाहेर उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले. महावितरणने पथदिव्यांचे तोडलेले कनेक्शन पुन्हा जोडणी केली. याप्रकरणी उबाळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकास कामांचा फलक उखडून फेकत महिलांचे रास्तारोको आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला. जाण्या येण्यासाठी कोणताच मार्ग राहीला नाही. वॉर्डाची नगरसेविका आणि महापालिका याकडे लक्ष देत नाही असा आरोप करून वॉर्ड क्रमांक ९७ चा भाग असलेल्या जय बजरंगनगर येथील महिलांनी विकास कामाचा फलक उखडून फेकला. पालिकेच्या झोन कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यावर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

जय बजरंगनगरातील रस्त्याची समस्या फार बिकट आहे. या भागात रस्त्याचे काम करण्याची मागणी नागरिक वारंवार करीत होते. नगरसेविका सीमा चक्रनारायण यांनी या मागणीची दखल घेतली व खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे विनंती केली. खैरे यांच्या विकास निधीतून रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन देण्यात आले. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला, तसा फलक जय बजरंगनगरात लावण्यात आला. कामाचा शुभारंभ होऊनही काम सुरू न झाल्याबद्दल नागरिकांमध्ये रोष होता, त्यातच सोमवारी ( २५ जून) एक महिला चिखलात पडली. त्यामुळे नागरिक संतापले. त्यांनी मंगळवारी रस्त्याच्या कामाबद्दलचा फलक उखडून फेकला. हा फलक घेऊन महिला गारखेडा येथील महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात आल्या. याठिकाणी त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात चंद्रकला नरवाडे, माया निकाळजे, संताबाई मानकरी, बाबासाहेब भंडारे, कांता डोळस, आकाश नरवडे, सुनीता आढागळे, जनाबाई सदावर्ते, छाया खंदारे यांच्यासह अन्य महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक विरोधी कारवाईत दुसऱ्या दिवशी २८ हजार दंडाची वसुली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्लास्टिक विरोधी कारवाईत महापालिकेच्या पथकांनी दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी छापा मारून २८ हजारांचा दंड वसूल केला. सुमारे २५ किलो प्लास्टिक देखील जप्त केले.

राज्य शासनाने संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. या बंदीची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू करण्यातआली, परंतु महापालिकेने शनिवार, रविवार असे दोन दिवस कोणतीच कारवाई केली नाही. सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कारवाईसाठी झोन कार्यालयनिहाय पथकांची स्थापना करण्यात आली आहे. महापालिकेचे नऊ झोन कार्यालय आहेत. त्यानुसार नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. एका पथकात पथकप्रमुखासह चार कर्मचारी आहेत. स्वच्छता निरिक्षकाला पथकप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.

कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी झोन क्रमांक १,२ आणि ३ यांनी काहीच कारवाई केली नाही. झोन क्रमांक चारच्या पथकाने सहा हजार रुपये दंड वसूल करून १३ किलो प्लास्टिक जप्त केले. झोन क्रमांक ५ च्या पथकाने १२.५ किलो प्लास्टिक जप्त केले. झोन क्रमांक ६ च्या पथकाने अडिच हजार रुपये दंड वसुल केला. झोन क्रमांक ७ च्या पथकाने दहा हजार रुपये, झोन क्रमांक ८ च्या पथकाने दीड हजार रुपये तर झोन क्रमांक ९ च्या पथकाने आठ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लास्टिक विरोधी कारवाई उद्या बुधवारपासून अधिक तीव्रपणे राबवली जाईल, अशी माहिती सहाय्यक आयुक्त नंदकिशोर भोंबे यांनी दिली आहे.

महावीर पाटणींची नियुक्ती

प्लास्टिक विरोधी सेलचे प्रमुख म्हणून वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांची नियुक्ती आयुक्तांनी मंगळवारी केली. पाटणी यांना या नियुक्तीचे आदेश देण्यात आले. प्लास्टिक विरोधी सेलला प्रमुख अधिकारी मिळाल्यामुळे कारवाई अधिक तीव्रपणे होईल असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातार, देवळाईत फवारणी

0
0

म. टा. प्रतिनिधी. सातारा

पावसाळा सुरू झाल्यानंतर महापालिकेने सातारा, देवळाई परिसरात फवारणी मोहीम सुरू केली आहे. सातारा परिसरात गेल्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात औषध फवारणी व ऑबेट ट्रिटमेंटची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

सातारा, देवळाई परिसरात खुल्या भूखंडांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागात पाऊस पडल्यानंतर पाणी साचते व गवतही वाढते. त्यामुळे औषध फवारणीची मागणी करण्यात आली होती. सातारा, देवळाई संघर्ष समितीनेही या मागणीचा पाठपुरावा केला होता. गेल्या आठवड्यात शहरात पावसाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर सातारा, देवळाई परिसरात महापालिकेने औषध फवारणीचे काम सुरू केले आहे. गेल्या गुरुवारी मल्हार गल्ली, जुने सातारा गाव, मीनाताई ठाकरे, ज्ञानेश्वर नगर, डिलक्स पार्क, देवळाई परिसर येथे औषध फवारणी व ऑबेट ट्रिटमेंट करण्यात आली. त्याचबरोबर पाणी साचलेले खड्डे व नल्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. शुक्रवारी पुथ्वीनगर, राणा टॉवर, रेणुका पुरम, जंजिरा सोसायटी, संग्राम नगर, विद्या नगर येथे औषध फवारणी व ऑबेट ट्रिटमेंट करण्यात आली आहे. सोमवारी शिल्प नगरी, रेणुका माता मंदिर, विद्यानगर, संग्राम नगर, सरदार एन्क्लेव्ह, सरदार प्राइड, रहीम नगर, देवळाई चौक येथे औषध फवारणी व ऑबेट ट्रिटमेंट केली. या मोहिमेत राज्य राखीव पोलिस बटालियनमधील कार्यालय, निवासस्थाने येथेही औषध फवारणी करण्यात आली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातारा देवळाई परिसरातील विहिरींचीही यादी तयार केली. पथक प्रमुख शेख अन्वर यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी विहिरींची पाहणी केली. देवळाईतील लक्ष्मी कॉलनी, आभूषण पार्क, देवळाई विहीर देवळाई गावातील सरकारी विहिरी, बिलाल कॉलनी, सातारा परिसरातील खंडोबा मंदिर समोरील विहिरी, मनपा क्वार्टर्ससमोरील विहीर, गणेश नगर येथील विहिरींत औषधी टाकण्यात आली.

त्याचबरोबर हिवताप प्रतिबंधासाठी सातारा, देवळाई परिसरातील हौदांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर सातारा, देवळाई परिसरातील मोठ्या नाल्यांची यादीही महापालिकेने तयार केली आहे.

गेल्या आठवड्यात राबविलेल्या औषध फवारणी मोहिमेचा प्रारंभ नगरसेविका सायली जमादार, अप्पासाहेब हिवाळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जीवशास्त्रज्ञ डॉ. अर्चना राणे, पर्यवेक्षक जे. आर. बोराडे, के. बी. मोरे, पथक प्रमुख शेख अन्वर, परिसरातील रहिवासी सोमनाथ शिराणे, पद्मसिंह राजपूत यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्ट, तक्रारी, चौकशातच चालला आमचा वेळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्याध्यापकांच्या काही ना काही अडचणी आहेत. आमचा पूर्णवेळ माहिती अधिकार, कोर्टातील प्रकरणे, तक्रारी, चौकशा, अभ्यागतांमध्येच जात आहे. मात्र, तुमच्या स्तरावर चांगले काम करा, असे सांगत शाळांमधील गैरप्रकाराचे पाढे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत वाचले.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या नियोजनबाबत मुख्याध्यापक, प्राचार्यांची बैठक मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गजानन सुसर, प्रियाराणी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळाबाह्य कामांचा शिक्षकांना होत असलेल्या त्रासाची चर्चा होते. पण, शाळास्तरावर चांगले काम होण्याची गरज असल्याचे या बैठकीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळांनी विद्यार्थ्यांचा विचार करत नवनवीन उपक्रम राबवावेत, भविष्याचा विचार करून त्या दृष्टीकोनातून आखणी करावी. माध्यमिक स्तरावर 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' उपक्रम चांगल्या प्रकारे राबवावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी केले. 'आमचा वेळ माहिती अधिकार, कोर्टातील प्रकरणे, तक्रारी, चौकशातच जात आहे. पण, तुमच्या स्तरावरच चांगले काम केले तर या अडचणी येणार नाहीत,' असे गजानन सुसर यांनी सांगितले. प्रियाराणी पाटील म्हणाल्या, शाळेत तक्रार पेटी आवश्यक आहे. काही छोट्या तक्रारी असतील, तर शाळा व्यवस्थापन समिती समोर ठेवून त्या सोडविल्या जाव्यात.

या बैठकीत शिष्य़वृत्ती, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री व सेवनास बंदी आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 'बुके ऐवजी बूक' ही संकल्पना राबवित उपस्थितांचे स्वागत पुस्तक देऊन करण्यात आले.

\Bबायोमेट्रिक हजेरी \B

कनिष्ठ महाविद्यालयांमधील विज्ञान शाखांच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. त्यानुसार कॉलेजांनी प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या. बायोमेट्रिक हजेरीबद्दल लवकरच सूचना येतील असेही सांगण्यात आले. बायोमेट्रिक हजेरी प्रक्रियेत औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपातप्रकरणी डॉक्टरचा जामीन फेटाळळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नियमबाह्य गर्भपातप्रकरणी सिल्लोड येथील डॉ. अरुणा गोविंद राजपूत हिचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी मंगळवारी (२६ जून) फेटाळला. या प्रकरणात एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल असून, यातील एकजण अटकेत, तर आरोपी डॉ. गोविंद राजपूत याच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल भागिनाथ सांडू वाघ यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, रघुनाथ गाडेकर (५५) व भिकाबाई गाडेकर (४७) यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये असताना, भिकाबाईला तिसऱ्यांदा गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सिल्लोड येथील राजपूत हॉस्पिटलमधील डॉ. अरुणा राजपूत हिने नियमबाह्य गर्भपात करून देण्यासाठी आधी २५ हजार रुपये व नंतर १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर दोन जून २०१८ रोजी राजपूत हॉस्पिटलमध्ये १५ हजार रुपये डिपॉझिट करून भिकाबाई गाडेकर हिला दाखल करण्यात आले व त्याच दिवशी तिचा गर्भपात करण्यात आला. मृत अर्भक एका प्लास्टिकच्या पिशवीत रघुनाथ गाडेकर याच्याकडे सुपूर्द करण्यात आले. हे मृत अर्भक रघुनाथ याने केळगाव परिसरातील शेतामध्ये जमिनीत पुरल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय दंड संहितेच्या ३१५, ३१८, ३४सह पीसीपीएनडीटी कायद्याच्या २३, एक कलमान्वये रघुनाथ गाडेकर, भिकाबाई गाडेकर, डॉ. अरुणा राजपूत व डॉ. गोविंद राजपूत या चौघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

\Bसात वर्षांपूर्वीही सील केली होती सोनोग्राफी मशीन

\B'पीसीपीएनडीटी' कायद्यान्वये २०११मध्येही डॉ. अरुणा राजपूत हिचे सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले होते. वरील संबंधित प्रकरणात डॉ. अरुणा हिने पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापरल्याचे दिसून आले आहे व याच पोर्टेबल उपकरणाच्या सहाय्याने अनेक गर्भपात केले असावेत, या दृष्टीनेही तपास केला जाणार आहे.

\Bपोर्टेबल मशीन जप्त करणे बाकी

\Bआरोपी डॉ. अरुणाच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी, आरोपी डॉक्टरचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करणे बाकी असून, या पोर्टेबल मशीनच्या सहाय्यने इतर महिलांचे गर्भपात केले आहेत का, याचाही तपास करायचा आहे. हे प्रकरण गंभीर असून, तपासासाठी आरोपीच्या अटकेची गरज आहे. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी महाराज पुतळा समितीचे सदस्य अमृतसर, मुंबईचा दौरा करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे सदस्य अमृतसर, मुंबई, ठाणे आणि जळगाव या शहरांचा दौराकडून तेथील पुतळ्यांच्या संदर्भात अभ्यास करणार आहेत. महापालिकेत मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याबद्दल व सुशोभीकरणाच्या संदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, उपमहापौर विजय औताडे, सभापती राजू वैद्य, सभागृहनेते विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेवक राजू शिंदे, राजेंद्र जंजाळ, शिवाजी दांडगे, राज वानखेडे यांच्यासह पृथ्वीराज पवार, अभिजीत देशमुख व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. पुतळा समितीची पुढील बैठक ५ जुलै रोजी होणार आहे. दरम्यानच्या काळात समितीच्या काही सदस्यांनी विविध शहरांचा दौराकडून तेथील पुतळ्याची पाहणी करावी असे ठरविण्यात आले.

पुतळ्याची उंची वाढवताना पुतळ्याला शोभेल, असे खांबांचे डिझाईन असावे, खांबांच्या चारही बाजूला राजमुद्रा असावी, किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात यावी, चबुतऱ्यासाठी वापरण्यात येणारा दगड ग्रेनाईड किंवा मार्बलचा असावा, दगडाची निवड डिझाईन नुसार करण्यात यावी. पुतळ्याच्या ठिकाणी ध्वनी व्यवस्था करण्यात यावी, उड्डाणपुलाच्या खाली खुल्या जागेवर टुरिझम प्लेस व उद्यान विकसीत करण्यात यावे, पुतळ्याची उंची वाढवण्याच्यासाठी जो कालावधी लागेल त्या कालावधीत पुतळा सिद्धार्थ उद्यानात स्थलांतरीत करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगररचनाच्या सहाय्यक संचालकांचा कार्यभार पुन्हा खरवडकरांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद -

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकपदाचा कार्यभार पुन्हा सुमेध खरवडकर यांच्याकडे आला आहे. शासनाने दिलेल्या आदेशामुळे आयुक्तांना बॅकफूटवर येऊन खरवडकर यांना कार्यभार द्यावा लागला.

नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकपदावर शासनाचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर असावा यासाठी तत्कालीन आयुक्तांनी शासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार शासनाने अधिकाऱ्याची नियुक्ती केली, परंतु या अधिकाऱ्यावर महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक नाराज होते. शासनाचे अधिकारी काम करीत नाहीत, फायली तुंबून राहिल्या आहेत अशा तक्रारी करून त्यांनी महापालिकेच्याच अधिकाऱ्याला सहाय्यक संचालकपदाचा कार्यभार द्या, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी डॉ. डी. पी. कुलकर्णी यांच्याकडे सहाय्यक संचालकपदाची सूत्रे दिली. डॉ. कुलकर्णी यांनी काम सुरू केले. त्यातच मंगळवारी (२६ जून) शासनाच्या नगररचना विभागाचे नगररचनाकार सुमेध खरवडकर महापालिकेत दाखल झाले. शासनाच्या आदेशानुसार आपण सहाय्यक संचालकपदाची सूत्रे घेण्यासाठी आलो आहोत, असे त्यांनी संबंधितांना सांगितले. सहाय्यक संचालकपदावर डॉ. कुलकर्णी कार्यरत असताना खरवडकर यांना त्याच पदावर कसे नियुक्त करून घ्यायचे असा प्रश्न प्रशासनाच्या समोर निर्माण झाला, परंतु शासनाचे आदेश घेऊन आलेल्या खरवडकर यांना सहाय्यक संचालकपदावर नियुक्त करून घेण्याशिवाय आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या समोर दुसरा पर्याय नव्हता, त्यांनी खरवडकर यांना रुजू करून घेतले. डॉ. डी. पी. कुलकर्णी यांना सहाय्यक संचालकपदावरून कार्यमुक्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठ अभ्यासिकेत अभिवादन

0
0

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडर मराठवाडा विद्यापीठात स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या वाचनालयासमोर अभिवादन सभा झाली. यावेळी सोनाली मस्के यांनी शाहू महाराजांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. आजच्या काळात शाहू महाराज यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेवर भाष्य केले. या अभिवादन कार्यक्रमाला समाधान बारगळ, स्टालिन आडे, आकाश व्हावळे, गीता गाडेकर यांची उपस्थिती होती. मारोती राऊत यांनी सूत्रसंचालन केले आणि लोकेश कांबळे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Plastic ban: एक पिशवी द्या; १ रुपया घ्या!

0
0

म. टा. प्रतिनिधी, बीड

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात असून, बीड जिल्ह्यात तर शालेय विद्यार्थ्यात या निर्णयाविषयी जागरूकता व्हावी, यासाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. स्काऊट-गाइडच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. जिल्ह्यात २५ जून ते १५ जुलै या काळात जिल्ह्यातील स्काऊटचे विद्यार्थी प्लास्टिक पिशव्या गोळा करण्याचे काम करणार आहेत. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या एका प्लास्टिक पिशवीच्या मोबदल्यात त्याला स्काऊट-गाइड कार्यालयाच्या वतीने एक रुपया दिला जाणार आहे.

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे महत्त्व जनतेला कळावे, यासाठी स्काऊट-गाइडने पुढाकार घेतला आहे. बीडमधील स्काऊट आणि गाइड जिल्हा कार्यालयाने अनोखी योजना आखली असून, त्यानुसार जिल्ह्यातील कब-बुलबुल, स्काऊट-गाइडच्या पथकात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी घरातील, परिसरातील वापरलेल्या प्लास्टिक पिशव्या गोळा करायच्या आहेत. या पिशव्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील स्काऊट विभागामध्ये किंवा स्काऊटच्या जिल्हा कार्यालयात जमा करणार आहेत. जमा केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला एका पिशवीसाठी एक रुपया जिल्हा स्काऊटकडून मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशवी गोळा करून जमा केल्याबद्दल स्काऊटकडून खरी कमाईचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या योजनेत बीड जिल्ह्यातील सर्व स्काऊट-गाइड विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाची माहिती देताना स्काऊट-गाइड विभागाचे संतोष मानूरकर म्हणाले, 'प्लास्टिक बंदीची चळवळ समाजात रुजवण्यासाठी हा उपक्रम राबवत असून, आजपासून प्लास्टिक पिशव्या येण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थी, शिक्षकाकडून या उपक्रमासंदर्भात विचारणा होते आहे. या पिशव्या गोळा करून थांबणार नाहीत, तर आमच्याकडे ज्या पिशव्या जमा होणार आहेत त्या संदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. या विद्यार्थ्यांकडील पिशव्या रस्ते निर्मितीसाठी उपयोगात याव्यात असा प्रयत्न सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संशोधन संस्था महिन्यात कार्यान्वित’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण समस्यांचे संशोधन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने संस्था स्थापन झाली आहे. ही संस्था महिनाभरात कार्यान्वित करण्याचा निर्णय याविषयी स्थापन केलेल्या समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे यांनी दिली. या संस्थेसाठी ५० लाख रूपयांची तरतूद केली आहे.

विद्यापीठाच्या २० मार्च रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे मराठवाड्याच्या विकासातील योगदान असल्यामुळे त्यांच्या नावाने विद्यापीठात संशोधन संस्था स्थापन करण्याचा ठराव घेतला होता. या ठरावानुसार याविषयीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीची पहिली बैठक बुधवारी (२७ जून) झाली. या बैठकीला समितीचे सदस्य पंकज भारसाखळे, विजय सुबुकडे उपस्थित होते. विलासराव देशमुख संशोधन संस्थेच्या कार्याची दिशा ठरविण्यासाठी खासगी संस्थेकडून महिनाभरात एक सविस्तर अहवाल तयार करून घ्यावा, संस्थेचा संचालक नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी आणि विलासराव देशमुख यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच संस्थेच्या मान्यतेसाठी एक प्रस्ताव राज्य सरकारला आणि निधीसाठीचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. देहाडे यांनी दिली. या समितीची पुढील बैठक २० जुलै रोजी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरियातील प्रशिक्षणासाठी डॉ. पोले निमंत्रित

0
0

औरंगाबाद: दक्षिण कोरिया येथील सेओल राष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने कर्करोगासंबधीच्या अद्ययावत प्रशिक्षणासाठी एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे इंटरव्हेश्नल कार्डिओलॉजिस्ट डॉ. शिवाजी पोले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी देशभरातील केवळ सहा डॉक्टरांना निमंत्रित करण्यात आले असून, २७ ते ३० जून दरम्यान हे प्रशिक्षण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चकमकीचा तपास करणाऱ्या पथकाला २५ हजारांचे बक्षीस जाहीर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चकमकीचा तपास करणाऱ्या पथकाला पोलिस महासंचालकांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सेवानिवृत्तीपूर्वी औरंगाबादेत दाखलझाल्यानंतर पोलिस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते गुरुवारी (२८ जून) पथकाला प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देण्यात येणार आहे.

या चकमकीत जखमी झालेले जमादार आरेफ शेख यांचे निधन झाले. त्यांची आठवण यानिमित्ताने पुन्हा ताजी झाली. तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्याचे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक ए. एस. नांदेडकर, हवालदार गोकुळ वाघ, रामदास गाडेकर, एस. एम. महेर, सुनील मुळे यांना २५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे.

हिमायतबागेत २६ मार्च २०१२ रोजी दहशतवादी मोहंमद अबरार उर्फ मुन्ना, अकिल खिलजी, खलिल खिलजी उर्फ शाकेर यांच्याशी चकमक झाली होती. दहशदवाद विरोधी पथकाचे तत्कालिन अधिक्षक नवीनचंद्र रेड्डी, पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यासह जमादार आरेफ शेख हे पथकासह दाखल झाले होते. दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला होता. सुनावनीनंतर न्यायालयाने दहशदवाद्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी तपास पथकाला बक्षीस जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावतेंसमोर बँक अधिकाऱ्यांचे गाऱ्हाणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

पुनर्गठन केलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली नाही, सुमारे दोनशे कोटी रुपयांचे कर्जच माफ होऊ शकले नाही. परिणामी पीककर्ज वाटपात अडचणी येत असल्याचे गाऱ्हाणे बँक अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना समितीचे सदस्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर मांडल्या.

दिवाकर रावते यांनी बुधवारी (२७ जून) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, कर्जमुक्ती व कर्ज उपलब्‍धीसंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी बँक अधिकाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि कुटूंब घटक धरून केलेल्या कर्जमाफीऐवजी एका घरातील दोन व्यक्तींची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ केली जावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगितले. मात्र या संदर्भात कोणत्याही सूचना जिल्हास्तरावर पोचल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये सांगितले. या योजनेबाबत समितीचे सदस्य म्हणून आपण समाधानी असूच शकत नाही, मात्र सरकार कर्जमाफीबाबत गंभीर असून, व्यवस्था निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, असेही त्यांनी सांगितले.

गेल्यावर्षी जिल्हाभरात २५८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. बँकांनी अनुत्पादक खात्यांची संख्या कमी करण्यासाठी या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या दीड लाखांवर कर्ज असलेल्या खातेदारांची यादी तयार करावी, शेतकऱ्यांमध्ये शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी मार्गदर्शनपर मेळावे आयोजित करावेत, असेही रावते यांनी सांगितले. या बैठकीमध्ये जिल्ह्याचे बँकनिहाय खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट, कर्ज वाटपाबाबत बँकांची कामगिरी आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. तुकाराम मोटे आदी अधिकारी उपस्थित होते.

\Bशेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल असे काम करावे\B

कर्जमाफीच्या अर्जासाठी ३० जूनपर्यंतची मुदवाढ देण्यात आली आहे. आपण ही मुदवाढ जुलै अखेरपर्यंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत रावते म्हणाले की, आतापर्यंत जिल्ह्यातील बँकांनी विविध पदाधिकाऱ्यांच्या सहयोगाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि इतर शासकीय योजनेविषयी बळीराजाला देणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढेल, असेही रावते यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौताळ्यात विधवेवर सामुहिक बलात्कार; अटक अन् कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मृत पतीच्या नावावर असलेली एक एकर शेतजमीन नावावर करुन देण्याचे आमीष दाखवून तसेच स्वतःशी दुसरे लग्न केले नसल्याच्या रागातून विधवेला गौताळा परिसरात नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करणाऱ्या तिघांपैकी आरोपी कैलास अमरसिंह चव्हाण याला बुधवारी (२७ जून) अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, सोमवारपर्यंत (२ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी दिले.

या प्रकरणी पीडित विधवेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी कैलास अमरसिंह चव्हाण (३३, रा. उंबरखेड, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा फिर्यादीच्या पतीचा मित्र होता व त्याचे घरी येणे-जाणे होते. फिर्यादीच्या पतीचे २०१४ मध्ये निधन झाले. त्यानंतर पतीच्या नावावर असलेली एक एकर शेतजमीन फिर्यादीच्या नावावर करुन देण्याचे आमीष आरोपीने फिर्यादीला दाखविले. दरम्यान, डिसेंबर २०१७ मध्ये फिर्यादीचे दुसरे लग्न ठरले. त्यानंतर २६ डिसेंबर २०१७ रोजी शेतजमीन नावावर करुन देण्यासाठी आरोपीने फिर्यादीला कन्नड बसस्थानकावर बोलावले आणि तिथून फिर्यादीला पिशोर रोडवरील कोळसवाडी येथे नेले. तिथे आरोपीचे दोन साथीदार आधीपासून थांबलेले होते. 'आत्ता येतो' असे सांगून आरोपी तिथून निघून गेल्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादीची छेडछाड काढत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अर्धा तासानंतर आरोपी तेथे पोचल्यानंतर फिर्यादीने घडलेला प्रकार आरोपीला सांगितला असता, 'तू माझ्याशी लग्न केले नाही म्हणूनच तुझ्यावर बलात्कार करण्यास मी साथीदारांना सांगितले होते,' असे आरोपी फिर्यादीला म्हणाला आणि त्यानंतर त्यानेही फिर्यादीवर बलात्कार केला. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०१८ रोजी फिर्यादीचे दुसऱ्याशी लग्न झाले आणि फिर्यादीने दुसऱ्या पतीला विश्वासात घेऊन घडला प्रकार सांगितल्यानंतर फिर्यादीने २४ जून रोजी कन्नड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३७६ (ड), ३५४ (अ), ५०४, ५०६ कलमांसह अॅट्रॉसिटी कायद्याच्या ३(२)(व्हीए) कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी कैलास याला बुधवारी अटक करण्यात आली.

\Bइतर आरोपींना अटक करणे बाकी\B

आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता, प्रकरणातील इतर दोन आरोपींची नावे निष्पन्न करुन त्यांना अटक करावयाची आहे. तसेच आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे बाकी आहे. घटनास्थळाचीही तपासणी करावयाची आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला सोमवारपर्यंत (दोन जुलै) पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दंगलीतील आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यातून अटक अन् कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दंगलीतील आरोपी खुशतर अहमद उर्फ सईद शेख कैसर पाशा याला दुसऱ्या गुन्ह्यातून अटक करून बुधवारी (२७ जून) कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला शुक्रवारपर्यंत (२९ जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंजुम शेख यांनी दिले.

या प्रकरणी हॉटेलचालक दिपक मन्नालाल जैस्वाल (६८, रा. गारखेडा) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे राजाबाजार येथे हॉटेल; तसेच जुने घर आहे. दंगलीच्या काळात फिर्यादीच्या हॉटेल, घराचे नुकसान करण्यात आले होते. हॉटेलातील दारुच्या बाटल्याही चोरल्या होत्या आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी खुशतर याला दुसऱ्या गुन्ह्यातुन मंगळवारी (२६ जून) अटक करण्यात येऊन बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या साथीदारांचे पत्ते निष्पन्न करून त्यांना अटक करणे; तसेच चोरलेली दारू जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील शोभा विजयसेनानी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यचे आदेश कोर्टाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी दुपारी सव्वातीन वाजता देवळाई चौकात घडला. भास्कर तोताराम आढाव (वय ४५ रा. खंडोबा मंदिराजवळ, सातारा) असे या मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे.

सातारा पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार; भास्कर आढाव हे मिस्त्री काम करीत होते. ते बुधवारी दुपारी कामानिमित्त ते बाळापूर फाटा येथे गेले होते. कामाच्या ठिकाणावरून साहित्य घेऊन ते दुचाकीवर घरी परतत होते. यावेळी झाल्ट्याकडून महानुभाव आश्रम चौकाकडे भरधाव वेगाने कंटेनर जात होता. देवळाई चौकात या कंटेनरने आढाव यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मागच्या चाकाखाली चिरडल्याने आढाव गंभीर जखमी झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

अपघातानंतर कंटेनरचालक रामकिसन शिंदे पलायन करण्याच्या तयारीत होता, मात्र नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आढाव हे मुळचे टाकळी (ता. कन्नड) येथील रहिवासी असून, गेल्या आठ वर्षांपासून सातारा परिसरात राहत होते. त्यांच्या मागे आई वडील, चार भाऊ, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी जमादार शेषराव चव्हाण तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातंग क्रांती मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वाकडी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून कडक शिक्षा करण्यात यावी, यासह अन्य मागण्यासाठी मातंग क्रांती मोर्चा या संघटनेने बुधवारी विभागीय आयुक्तलयावर धडक मोर्चा काढला. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मातंग समाज राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.

'अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे', यासह अन्य घोषणा देत सकाळी साडेअकरा वाजता क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. संजय ठोकळ, बाबुराव कदम, जालिंदर शेंडगे, बाबा तायडे, मिलिंद शेळके, दिनकर ओंकार, गौतम खरात, जयश्री कुंदलकर, किशोर थोरात, ‌श्रवण गायकवाड, सुभाष वाघुले, राजु आमराव, सुनील आहिरे, विनोद साबळे आदी उपस्थित होते.

विहिरीत पोहण्याच्या कारणावरून मातंग समाजाच्या दोन तरुणांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे नुकताच घडला. उदगीर तालुक्यातील रुदवाडी येथे मंदिरात दर्शन घेतल्याच्या काराणावरुन एका दाम्पत्यास मारहाण झाली. मातंग समाजातील कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला. सरकार कोणतेही असले तरी अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत, असा आरोप मोर्चाचे नेते ठोकळ यांनी केला. मोर्चाच्या माध्यमातून या लढ्यास सुरुवात झाली आहे. यापुढे कोणताही अत्याचार, अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पैठणगेट, सिटी चौक, शहागंज मार्गे काढण्यात आलेला मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकला. तिथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. याप्रसंगी ठोकळ यांच्यासह अन्य नेत्यांचे भाषणे झालेत. दरम्यान, मातंग मोर्चातर्फे विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सुनील नाडे, राजु अहिरे, रमेश चांदणे, कमलेश चांदणे, बबन दाभाडे, शेषराव नाडे, एकनाथ शरणागत, आनंद लोखंडे, अजित पाल, ईश्वर दणके आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

वाकडी प्रकरणातील आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करा. पीडीतांना १० लाखांची मदत करुन त्यांच्या कुटुंबाचे पुर्नवसन करा.

भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करा. पुजा सगट हत्येची सीबीआयमार्फत चौकशी करा.

रुद्रवाडी प्रकरणातील आरोपींवर अॅट्रासिटी कायद्यानव्ये कारवाई करा.

क्रांतीगुरु लहुजी साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक त्वरीत बांधा.

क्रांतीगुरु लहुजी साळवे आयोगाच्या सर्व शिफारशीची त्वरीत अंमलबजावणी करा.

अण्णाभाऊ साठे महामंडळाला २०० कोटी रुपयांचा निधी देऊन कर्ज प्रकरणे सुरु करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस उपायुक्तावर बलात्काराचा गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद शहर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात बलात्कार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसाच्या बावीस वर्षांच्या मुलीवर नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. हा प्रकार फेब्रवारी ते जून महिन्याच्या दरम्यान घडला. पीडित तरुणीने पोलिस आयुक्तालयाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. उपायुक्त राहुल श्रीरामे सध्या सक्तीच्या रजेवर आहेत.

या तरुणीने २१ जून रोजी महिला तक्रार निवारण केंद्राच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर तक्रार पाठवली होती. त्यानुसार, ही तरुणी एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. फेब्रुवारीमध्ये गरवारे स्टेडियमवर उपायुक्त श्रीरामे यांच्यासोबत तिची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत श्रीरामे यांनी पोलिस शिपायाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत चार ते पाच वेळा बलात्कार केला, यावेळी ते दारूच्या नशेत होते, हा प्रकार फेब्रुवारी २०१८ ते जून २०१८ या कालावधीत घडल्याचे नमूद केले आहे. प्रोझोन मॉल समोरील मिलेनीयम पार्क अपार्टमेंटमधील श्रीरामे यांच्या फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला. यानंतर श्रीरामे यांनी या पीडित तरुणीला भेटणे टाळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे या तरुणीने श्रीरामे यांना पोलिसात तक्रार देणार असल्याचे सांगितले. यानंतर

आठ जून रोजी या तरुणीला घरी बोलावून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. तसेच पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे व कैलास प्रजापती यांनी घरी येऊन तक्रार न करण्याबाबत धमक्या दिल्याचा दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. व्हॉटस्अॅपवर तक्रार आल्यानंतर या तरुणीचा शोध घेण्यात आला. मात्र ती सापडली नाही, तसेच तिच्याशी संपर्क देखील झाला नसल्याने व्हॉटस्अॅपच्या तक्रारीवरून उपायुक्त राहुल श्रीरामेविरुद्ध बलात्कार, फसवणूक, धमक्या देणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे हे तपास करीत आहेत.

\Bआयुक्तांचे 'नो कॉमेंट' \B

याप्रकरणी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारली. यावेळी आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दोन्ही बाजुने प्रकरण संवेदनशील आहे. यावर मी जास्त आता बोलणार नाही, तपास करून योग्य वेळ आल्यावर बोलू, असे म्हणत या विषयावर बोलणे टाळले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरिबॅग वापरणारांना १५ हजार रुपयांचा

0
0

वाळूज महानगर : गंगापूर येथे प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर नगर परिषदेने मंगळवारी (२६ जून) कॅरिबॅग वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करून पहिल्याच दिवशी १५ हजारांचा दंड वसूल केला आहे़

कामधेनू जनरल स्टोअर्स, बालाजी कलेक्शन, प्रेम सागर स्वीट या दुकानदारावर प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारून पुन्हा कॅरिबॅगचा वापर करू नका, अशी तंबी दिली आहे़ व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी कॅरिबॅगचा वापर करू नये, यासाठी नगर पालिकेने जनजागृती करण्यात येत आहे. सर्व शहरात दंवडी देण्यात आली आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले़ यावेळी नगर परिषदेचे  मुख्याधिकारी संतोष आगळे, कार्यालीन प्रमुख रुस्तुम फुलारे, अधिकारी पठाण, फैसलराजे, कर्मचारी गायकवाड, खाजेकर आदींनी ही कारवाई केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images