Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘रामकृष्ण उपसा’साठी सल्लागार तज्ज्ञाची नियुक्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बहुचर्चित रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेसाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून सुनील गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी पाच कोटी ७१ लाख रुपयांचा निधी शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मंजूर केला आहे. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. बँकेचे संचालक, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बँकेचे उपाध्यक्ष दामोधर नवपुते, अभिजित देशमुख, माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील आदी उपस्थित होते. सल्लागार पदासाठी सहा अर्ज आले होते. त्यावर चर्चा करून सर्व पात्रता पाहून सुनील गाडेकर यांची या पदासाठी नियुक्ती करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामाचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर काही चाचण्या घेऊन नंतर पंप हाऊस, पाइप लाइनसह आवश्यक ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्धन घोडे खूनप्रकरण; जामीन अर्ज मागे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वर्धन घोडे खून खटल्यातील आरोपी अभिलाष मोहनपूरकर याने हायकोर्टात दाखल नियमित जामीन अर्ज मागे घेतला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. जामीन देण्यास खंडपीठाने नकार दिला, त्यामुळे आरोपीने जामीन अर्ज मागे घेतला.

टिळकनगरातील गुरूकुंज हाऊसिंग सोसायटीतून २७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धन विवेक घोडे या दहा वर्षीय मुलाचे पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. त्याचा दौलताबाद घाटामध्ये गळा आवळून खून करण्यात आला होता. आरोपींनी वर्धनचा मृतदेह श्रेयनगर येथील नाल्यात फेकला होता. पोलिसांनी तपासाअंती अभिलाष सुधीर मोहनपूरकर (रा. टिळकनगर) व श्याम लक्ष्मण मगरे (रा. तडगूर, ता. मदनूर, जि. निजामाबाद, ह. मु. टिळकनगर) या दोघांना २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या होत्या. दोघांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा नियमित जामीन अर्जही जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्याने खंडपीठात नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता स्वप्नील जोशी यांनी जामीन देण्यास विरोध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रवाशांचे दागिने हिसवणारा अटकेत

$
0
0

औरंगाबाद : रेल्वेप्रवाशांचे दागिने व मोबाइल हिसकावणाऱ्या संशयिताला औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सहा मोबाइल व मंगळसूत्र जप्त करण्यात आले.

लोहमार्ग पोलिसांचे उपनिरीक्षक आनंद बनसोडे यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, उमेश अर्जून तोडे (वय ३०, रा. मारुतीनगर, सेलू, जि. परभणी), असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याला सतरा वर्षीय मुलासह ताब्यात घेण्यात आले आहे. अनंत लक्ष्मी इडकुल्ला (वय ५३, रा. हैद्राबाद) या १६ जून रोजी शिर्डी ते सिकंदराबाद असा प्रवास करत होत्या. सेलू येथे उमेश तोडे व त्याच्या साथीदारांनी खिडकीतून हात घालून अनंत लक्ष्मी इडकुल्ला यांचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले होते. यात गुन्हा नोंद झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी शोध घेऊन संशयावरून उमेश तोडे व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून मंगळसूत्र व चोरी केलेले सहा मोबाइल पोलिसांनी जप्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तर अभ्यासक्रम; ३ जुलैला स्पॉट अॅडमिशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेच्या तिसऱ्या फेरीनंतर नऊ हजार ७०० पैकी सुमारे पाच हजार ३०० प्रवेश झाले आहेत. आता तीन जुलै रोजी सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पॉट अॅडमशीन (तत्काळ प्रवेश) देण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.

रिक्त जागांसंदर्भात विद्यापीठातील विभागप्रमुखांच्या गुरुवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, सीईटी समन्वयक डॉ. वाल्मिक सरवदे आदी उपस्थित होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नुकतीच सामूहिक परीक्षा घेण्यात आली असून विद्यापीठाच्या विविध विभागामध्ये तसेच संलग्नित महाविद्यालयामध्ये आरक्षणनिहाय जागेचा तक्ता व प्रवेशपूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसामान्य गुणवत्ता यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्‍ध करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या महाविद्यालयामध्ये किती रिक्त जागा आहेत याची यादीही विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. ही यादी पाहून तीन जुलै रोजी संबंधित विभाग, महाविद्यालयामध्ये सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज सादर करून प्रवेश घेता येणार आहे.

\Bसीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश \B

स्पॉट अॅडमिशन संदर्भातील सर्वांधिकार विभागप्रमुखांना दिले आहेत. या प्रवेश प्रक्रियेत सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनाच सहभागी होता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगावच्या सरपंचपदी उषा साळे यांची निवड

$
0
0

वाळूज महानगर

वडगाव कोल्हाटी बजाजनगरचे सरपंच महेश भोंडवे यानी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत उषा एकनाथ साळे यांची गुरुवारी (२८ जून)  बिनविरोध निवड करण्यात आली.

पीठासन अधिकारी म्हणून मंडळ अधीकारी एल़ के़ गाडेकर यानी काम पाहिले. तलाठी पूनमसिंह राजपूत, ग्रामविकास अधिकारी हरिश आंधळे, पोलिस पाटील दिलीप काळे यांनी त्यांना मदत केली़ साळे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकानी फटाके फोडून, गुलाल उधळत मिरवणूक काढून जल्लोष केला. उषा साळे या अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यानी शिवसेनेत प्रवेश केला होता़ येथील ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यांत   शिवसेनेचे १६ व भाजपचा एक सदस्य आहे. यावेळी शिवसेनेने सरपंचपद महेश भोंडवे यांना दिले होते. त्यानंतर इतर सदस्याना संधी देणार, असे ठरले होते, मात्र भोंडवे यांनी त्यांचा कालावधी संपला तरी राजीनामा दिला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर सदस्यानी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यातील एका सदस्याला पळवल्याने ठराव बारगळला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी दबाव टाकून सरपंचांचा राजीनामा घेतला होता़

या पार्श्वभूमीवर नव्या सरपंचांची निवड करण्यात आली. प्रदीप जैस्वाल व महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला़ यावेळी माजी महापौर विकास जैन, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे, माजी सरपंच महेश भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य सचिन गरड, श्रीकृष्ण भोळे, श्रीकांत साळे, बबन वाहूळ, चंदाबाई काळे, वैशाली जीवरग, रमाकांत भांगे, अलका शिंदे, मोहन गिरी, संगीता कासार, सुरेखा लगड, उषा हांडे, मंदा भोकरे आदींची उपस्थिती होती़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब समाधानी तर उत्तम सेवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध सुविधा देऊन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी उत्तम सेवा देण्याचे काम झाले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे कुटुंब समाधानी असेल, तर पोलिस कर्मचारी अधिक चांगल्या सेवा देऊ शकतात, अशी माहिती पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी दिली.

एमजीएमच्या रुख्मिनी हॉलमध्ये गुरुवारी मराठवाड्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता स्नहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मंजुळा सतीश माथुर यांच्यासह विशेष महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र व नांदेड परिक्षेत्र मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, औरंगाबाद पोलिस अधीक्षक आरती सिंह, पोलिस अधीक्षक जालना रामनाथ पोकळे, पोलिस अधीक्षक उस्मानाबाद पंकज देशमुख, बीड पोलिस अधीक्षक एस. श्रीधर, हिंगोली पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, नांदेड पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासह शहर पोलिसांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी दहावी, बारावी व तसेच विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच विशेष प्राधिकारी प्राप्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार माथुर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एकलव्य योजनेतून लघु उद्योगासाठी पोलिस कुटुंबांना पोलिस महासंचालक यांच्या हस्ते कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले. लघु उद्योगासाठी पोलिस कल्याण सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात आली. यावेही महिला बचत गटाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मंजुळा माथूर यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिस महासंचालक माथूर यांनी मराठवाड्यातील पोलिस कल्याण निधीतून घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. सध्या पोलिस विभागात उच्चशिक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले पोलिस अधिकारी येत आहेत. यामुळे गुन्ह्यांचा तपासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे, पण पोलिसांचे कुटुंब समाधानी असेल तरच त्यांची सेवाही चांगली राहिल, असे मत सतीश माथूर यांनी व्यक्त केले.

\Bमहासंचालकांनी टोचले पोलिसांचेच कान

\B

कर्तव्य बजावताना अनेक वेळा परिस्थिती गंभीर होते. अवघड परिस्थितीत लाठी-काठी वापरावी लागले. पण कधी कधी डोकेही वापरावे लागेल. अजूनही तरी डोके वापरण्यासाठी कोणता कर लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आपली वर्तणूक सुधारावी, गुटाखा, दारूचे व्यसन सोडावे, उद्धट भाषा वापरू नये, या सवयी कायम राहिल्यातर भविष्य अवघड राहील. तुमचीच मुले तुम्हाला धडा शिकवतील, या शब्दात पोलिस महासंचालकांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे कान टोचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना सरकारची मोठी मदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री

भाजप सरकार विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.  शेतकऱ्यांना पीक विमा, दुष्काळी मदत, बोंडआळी मदत, कर्जमाफी आदी इतिहासात नोंद करता येईल अशी मदत केली असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.

तालुक्यातील निधोना येथे नाला खोलीकरण व बांदबंदीस्तमध्ये साचलेल्या पाण्याचे जलपूजन करताना ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य, शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल, पंचायत समिती सदस्य संजय त्रिभुवन, नाथा काकडे, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष विकास गायकवाड, हौसाबाई काटकर, रामेश्वर चोपडे, सोमीनाथ भालेराव, यांची प्रमुख उपस्थिती होती.

याावेळी बागडे म्हणाले की, भाजप सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी होते आणि यानंतर ही राहणार आहे. भाजप सरकार शेतकरी समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तालुक्यात कधी नव्हे एवढे विकास कामे होत आहेत. मागील सरकारपेक्षा भाजप सरकार विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, शेतकऱ्यांना पीक विमा, दूष्काळ मदत, बोंडआळी मदत, कर्जमाफी अशी महाराष्ट्रात इतिहासात नोंद होईल एवढी मदत केली आहे. सिंचन व रस्ते यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तालुक्यात 'जलयुक्त शिवार'ची मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून, या नालाखोलीकरणाने आठ वर्षांपासून पाणी नसलेल्या विहिरींना पाणी आले आहे. नालाखोलीकरण केल्याने शेतकरी दुप्पट पीक घेतील व समृद्ध होतील. हे अभियान २० गावांमध्ये १०० टक्के झाले असून, पुढील वर्षात हे नालाखोलीकरण अभियान तालुक्यातील सर्व गावात राबविण्यात येणार आहे.

याप्रसंगी मनोहर सोनवणे,  चंद्रकांत तुपे, रमेश गाडेकर,  बाबासाहेब गाडेकर, विद्या गाडेकर, निधोना येथील मिशन दुष्काळ मुक्त निधोना टीम यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठ वकील संघासाठी आज मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या चार पदांसाठी शुक्रवारी (२९ जून) निवडणूक होत आहे. अध्यक्ष, सचिव, ग्रंथालय समितीचे सचिव आणि महिला सहसचिव या चार पदांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी मतदान आणि दुपारनंतर मतमोजणी करण्यात येईल. या निवडणुकीत १२६३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. अकरापैकी केवळ चार पदांसाठीच निवडणूक होत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अॅड्. श्रीरंग दंडे व अॅड्. संगीता धुमाळ यांनी सांगितले.

अध्यक्षपदासाठी अतुल कराड व नंदकुमार खंदारे यांच्यात सरळ लढत आहे. सचिवपदासाठी ज्ञानेश्वर बागुल आणि कमलाकर सूर्यवंशी रिंगणात आहेत. महिला सहसचिव पदासाठी अनुपमा गंगाखेडकर आणि अलमास अब्दूल कादर यांच्यात चुरस आहे. ग्रंथालय समिती चेअरमन पदासाठी श्रीनिवास गणाचारी आणि कैलास जाधव यांच्यात सामना होईल.

वकील संघाची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वकील, कर्मचारी असे तीस जण कार्यरत असल्याचे अॅड्. दंडे यांनी स्पष्ट केले. ही कार्यकारीणी केवळ एक वर्षांसाठी निवडली जाते. अतुल कराड गतवर्षीच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार होते आणि त्यांचा निसटता पराभव झाला होता. नंदकुमार खंदारे यांनी सरकारी वकील म्हणून खंडपीठात काम केलेले आहे.

\Bयांची निवड बिनविरोध\B

या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी राम शिंदे यांचा एकमेव अर्ज आलेला आहे. महिला उपाध्यक्षासाठी मंजुषा जगताप, सहसचिव महेश तौर, ग्रंथालय समितीचे चेअरमन विनायक सोळुंके, महिला सदस्य सुश्मिता दौंड, सुनीता सोनवणे, सदस्य पुरूष पदासाठी साईसागर अंबिलवादे, ब्रह्मानंद धनुरे, दत्ता मडके, फयाझ पटेल, अशोक राऊत, महेश शिंदे, प्रशांत सुकाळे आदींचा समावेश आहे. सर्व उमेदवारांच्या विरोधात कुणाचाच अर्ज नसल्याने यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा बाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पावसाअभावी पेरण्या संकटात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

सिल्लोड तालुक्यात करण्यात आलेली ५५ टक्के पेरणी पावसाने ओढ दिल्याने धोक्यात आली आहे. बियाणे उगवण्याच्या स्थितीला पाऊस गायब झाल्याने दुबार  पेरणी करावी लागते की या चिंतेने शेतकऱ्याला ग्रासले आहे. तालुक्यात करण्यात आलेली धुळपेरणी देखील संकटात सापडली आहे. पावसाने ओढ दिल्याने जोरदार पाऊस नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकात तुटा पडल्याने शेतकऱ्यांना पेरणी करावी लागत आहे.

सर्वत्र पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी हा पाऊस मान्सूनचाच आहे, असे गृहित धरून पडलेल्या कमी अधिक पावसावर पाऊस येईल या आशेवर मका, सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग, तूर यांसह ज्वारी, बाजरी आदींची पेरणी केली. जोरदार पाऊस पडलेला नसतानाही अन्य शेतकऱ्याने पावसाच्या आशेवर  पेरणी केली. महागडे बियाणे शेतात टाकले त्यानंतर पावसाने ओढ दिली. गेल्या आठ दिवसांपासून फक्त ढगाळ वातावरण आहे. पाऊस गायब झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. तालुका कृषी विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यात खरीप पिकांची ५५ हजार हेक्टरवर (५५ टक्के) पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात काही गावांत कमी अधिक पाऊस पडला आहे, तर काही गावांत अद्यापही पावसाचा थेंब पडला नसल्याची स्थिती आहे. एका गावात पाऊस पडलेला आहे, तर त्याच्या शेजारील गाव कोरडे आहे, अशी स्थिती यावर्षी आहे. लवकर पेरणी साधण्यासाठी पाऊस येईल याआशेवर  उपलब्ध असलेल्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. ती पेरणी आता संकटात सापडली आहे. जोरदार पाऊस नसल्यामुळे बियाणे उगवण्यास अडचण निर्माण होत आहे. पाऊस नसल्यामुळे उगवलेले पीक किटक कृमी खात आहेत. त्यामुळे उगलेल्या पिकात तुटा पडत आहे. या तुटा लावण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज आहे.

जून महिना सरत आला तरी तालुक्यात मोठा पाऊस नसल्याने नदीाला पूर पाणी आला नाही. तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे. शेत शिवारात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जनावारांना पाणी पाजण्यासाठी  शेतकऱ्यांना रानोमाळ भटकंती करावी लागते आहे.

\Bअर्थचक्र संकटात\B

शेत शिवारात पाणी नाही. खाण्यास काही नाही. यामुळे हरिणी, काळवीट, निलगायी, माकडे आदी मिरची, मान्सूनपूर्व लागवडीची कपाशी खाऊन फस्त  करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून रात्रीचा खडा पहारा देऊन प्राण्यांपासून  ही पिके संभाळावी लागत आहेत. येत्या दोन दिवसांत जोरदार पाऊस न पडल्यास करण्यात आलेली पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे. दुबार पेरणी करावी लागली, तर तालुक्यातील शेतकऱ्यांना कोटी रुपयाचा आर्थिक फटका बसून शेतकऱ्याचे अर्थचक्र कोलमडणार  आहे.

\Bमिरची संकटात\B

उपलब्ध पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व निर्यातक्षम मिरचीची लागवड मे महिन्यापासूनच केली आहे. आहे त्या विहिरी सांळ्यावर आल्या आहेत. काही विहिरीचे पाणी संपले आहे. पिकांची वाढ होऊन भूक मोठी झालेली असताना पाणी मिळत नसल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी या नाजूक पिकावर लाखो रुपये खर्च केले, मात्र पावसाअभावी हे पीक संकटात सापडले आहे. तालुक्यात चार हजार हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आलेली आहे. पाणी संपल्यामुळे काही शेतकरी टँकर विकत आणून मिरची जगवित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातातील जखमी कामगाराचा मृत्यू

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील कपंनी कामगार कामावर जात असताना दुचाकीने धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान गुरुवार (२८ जून) त्यांचा मृत्यू झाला.

रामदास बाळाहरी सोनवणे (रा़ अयोध्यानगर, बजाजनगर, ता़ औरंगाबाद) असे मृताचे नाव असून, ते एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामगार होत़े  सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास सोनवणे कामावर जात असताना अयोध्यानगर ते मोहटादेवी रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने (क्रमांक एमएच २० डीआर ८२२३) त्यांना धडक दिली. त्यांना जखमी अवस्थेत घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना डॉक्टरानी त्याना तपासून मृत घोषित केले़ संतोष सुभाष काळे (रा़ बजाजनगर) हा दुचाकी चालवीत होता. रंगनाथ सोनवणे यांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंदविण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक रोडे करीत आहेत.    

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैध गौणखनिज उत्खनन; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पैठण

ढोरकीन शिवारातून मुरुमाचे विनापरवाना उत्खनन व वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर गुरुवारी महसूल विभागाने कारवाई केली. यावेळी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.

 ढोरकीन शिवारातील शासकीय जमिनीतून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे विनापरवाना उत्खनन होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या भागातील बेकायदार गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार सावंत यांनी महसूल विभागाचे पथक स्थापन केले. तहसीलदार सावंत यांनी गुरुवारी स्वतः पथकात सहभाग घेत  ढोरकीन शिवारात छापा टाकला. यावेळी महसूल विभागाच्या पथकाने, विनापरवाना मुरुमाचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरच्या विरोधात कारवाई केली.

या कारवाईक चार ट्रॅक्टर व जवळपास ४० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून , याप्रकरणी कठोर कार्यवाही प्रस्तावित करणार असल्याची माहिती तहसीलदार सावंत यांनी दिली. गौणखनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्याच्या विरोधात महसूल विभागाची कार्यवाही सुरूच राहणार असल्याचे तहसीलदार म्हणाले. कारवाई करणाऱ्या पथकात लोहगावचे मंडळ अधिकारी थोटे, ढोरकीनचे तलाठी हुग्गे, पोलिस कर्मचारी घोळवे, ढोरकीनचे कोतवाल बादाडे, शिपाई  माणिक जाधव यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समितीती शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

चिंचखेडा तांडा (ता. कन्नड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दोन दिवसांपूर्वी महिला सरपंचासह ग्रामस्थानी शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शाळेला कुलूप ठोकूनही शिक्षण विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाला कंटाळून कायमस्वरुपी दोन शिक्षकांसाठी  पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयातच गुरुवारी (२८ जून) ग्रामस्थ पालक व पदाधिकारी यांनी सकाळी ११ वाजता प्राथमिक शाळेच्या ५३ विद्यार्थ्यांची शाळा  भरवून  सर्व शिक्षा अभियानाचा फज्जा उडाल्याचे  दाखवून दिले.

 जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत असताना आदिवासी बहूल भागांतील विद्यार्थ्यांचा कल जिल्हा परिषद शाळाकडे असतो. त्यांच आदिवासी, डोंगरी भागात शिक्षण विभागाचे कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधासाठी दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जेहूर केंद्रांतर्गत येत असलेल्या या शाळेत केंद्र प्रमुख ए. डी. शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीवरून,  चिंचखेडा तांडा येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत दोन शिक्षकी शाळा आहे. या शाळेत धर्मा मांगू राठोड या शिक्षकासह प्रंशात हनुमंतराव बारलावार या शिक्षण सेवकाची  नियुक्ती करण्यात आली होती. यातील प्रंशात बारलावार हे  शिक्षण सेवक तात्कालीन वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने  'बीएलओ' म्हणून प्रतिनियुक्तीवर विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत आहे. या कर्मचाऱ्याचे वेतन याच शाळेतून अदा करण्यात येत आहे. यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियुक्त दोन शिक्षकाऐवजी एकाच शिक्षकावर या शाळेचा भार आहे.

शिक्षक नियुक्तीसाठी वांरवार पाठपुरावा केला, परंतु यश न आल्याचे त्यांनी सांगितले आहे. चिंचखेडा तांडा ग्रामस्थांनी या शिक्षण सेवकास कार्यमुक्त करून दुसऱ्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शिक्षण विभागाकडे वारंवार  पाठपुरावा केला होता. त्याचा उपयोग होत नसल्याने शेवटी सरपंच वंदना राजू जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष भास्कर राठोड, नवनाथ राठोड, लक्ष्मण  गोरख जाधव, स्थानिक पालक व ग्रामस्थानी मंगळवारी (२६ जून) सकाळी दहाच्या सुमारास शाळेला कुलूप लावले. दोन दिवस उलटूनही शिक्षण विभाग दाद देत नसल्याने गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवली. या ठिकाणी कार्यालयीन कर्मचारी वगळता जबाबदार अधिकारी नसल्याने गट शिक्षण अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालत निषेध नोंदवला.   जेहूरचे केंद्रप्रमुख शिरसाठ यांनी गट शिक्षण अधिकारी हुमेरा सिद्दिकी यांच्याशी विचारविनीमय करून दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध करून देण्याचे हमीपत्र दिले. त्यावर पदाधिकारी व पालकांचे समाधान न झाल्याने शेवटी गट शिक्षण अधिकारी हुमेरा सिद्दिकी यांनी शुक्रवारी (२९ जून) प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन त्याच दिवशी शिक्षकाची नियुक्ती करण्याचे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याने दुपारी तीनच्या सुमारास गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील भरलेल्या शाळेला सुटी देण्यात आली.

आंदोलनाचा इशारा

या शाळेला शिक्षक उपलब्ध न केल्यास औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शाळा भरवण्याचा मानस पालकांनी व्यक्त केला. यावेळी सरपंच वंदना जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भास्कर राठोड यांच्यासह पालक, ग्रामस्थ व पदाधिकारी या कार्यालयात ठाण मांडून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीच्या खुनात सहभाग; पत्नीचा जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेकटा शाखेचे शाखाधिकारी जितेंद्र नारायण होळकर यांच्या खून प्रकरणात मयताची पत्नी व मुख्य आरोपी भाग्यश्री होळकर हिचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव पाटील यांनी फेटाळला.

या प्रकरणात मृत जितेंद्र यांचा भाऊ प्रदीप होळकर यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार ९ सप्टेंबर २०१७ ला मध्यरात्री तीक्ष्ण हत्याराने गळा कापून जितेंद्रची हत्या करण्यात आली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी जितेंद्रची पत्नी भाग्यश्री आणि किरण गणोरे यांना अटक केली. त्यांनी शेख तौफिक शेख इब्राहीम आणि शेख हुसेन उर्फ बाबू शेख बशीर यांची नावे सांगितली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. तसेच या हत्येसाठी भाग्यश्री आणि किरण गणोरे यांनी सुपारी दिल्याची माहिती दिली. प्रकरणात पोलिसांनी चारही आरोपीना अटक केली. तेव्हापासून आरोपी तुरुंगात आहेत. यापूर्वी अन्य आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आला होता. जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर जामीनासाठी भाग्यश्री होळकरने खंडपीठात अर्ज दाखल केला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता स्वप्नील जोशी यांनी युक्तिवाद केला. सीसीटीव्हीमधील फुटेजमध्ये भाग्यश्री होळकर आरोपी गणोरेसोबत दिसली. घटनेच्या दिवशी घरात मयत, आरोपी व त्यांचा मुलगा होता. मुलाने घराचा मुख्य दरवाजा लावला होता. त्यामुळे घराचा दरवाजा आरोपीनेच उघडल्याचे तपासात समोर आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनावणीअंती खंडपीठाने भाग्यश्री होळकरचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर दोन्ही पक्षाचे नुकसान होणार आहे. निवडणुका एकत्र लढवल्या तर ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा प्रथम अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री व नंतर दुसऱ्या पक्षाचा अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करता येईल. यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री करणे शक्य होईल, असा पर्याय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (२८ जून) सूचविला. औरंगाबाद येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भाजपाध्यक्ष अमीत शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, अद्यापही शिवसेनेचे समाधान झाले नाही, असे दिसते. तथापि, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदी आपला उमदेवार बसवायचा असेल तर त्यांनी भाजपसोबत युती करावी, जागा वाटपानंतर ज्या पक्षाच्या जागा जास्त निवडून येतील त्यांचा पहिल्या अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री व दुसऱ्या पक्षाचा उपमुख्यमंत्री राहील दुसऱ्या अडीच वर्षांमध्ये दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री राहील असा पर्याय राहू शकतो. शिवसेना व भाजप वेगवेगळे लढले तर दोन्ही पक्षाचे नुकसान आहे. या संदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. शिवसेनेला केंद्रामध्ये १ कॅबिनेट तसेच राज्यामध्ये १ किंवा २ मंत्रीपदे तसेच काही महामंडळे दिल्यास अडचणी दूर होऊ शकतात, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. अॅट्रॉसिटी अॅक्टबाबत आठवले म्हणाले की, सरकारी नोकरीमध्ये प्रमोशनमध्ये अडचणी येत असून या संदर्भात आरक्षणाला कायमस्वरुपी संरक्षण द्यावे, अशी मागणी एससी, एसटी पार्लमेंट फोरमची असून या संदर्भात सर्व मागासवर्गीय मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो आहोत.

---.

आरपीआयला जागा वाढवून द्या

आगामी विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर आरपीआयला २५ ते ३० जागा व जर निवडणुका शिवसेनेसोबत लढवल्या तर किमान १५ जागा पक्षाला द्याव्या. यामधील निम्म्या जागा आम्ही खुल्या प्रवर्गासाठी सोडणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

नाणार, बुलेट ट्रेनला पाठिंबाच

विकास करायचा असेल तर नाणार प्रकल्प झाला पाहिजे, मात्र या प्रकल्पामध्ये जे शेतकरी प्रभावित होणार आहेत अशा लोकांचे पुनर्वसन करावे, त्यांचे नुकसान नको, कोणताही प्रकल्प सुरू करताना पुनर्वसन करण्यासाठी स्वतंत्र बजेट असावे, त्याचा आराखडा असला तर बाधितांना समाधानकारक मदत मिळते, असे म्हणत बुलेट ट्रेनलाही विरोध करणे योग्य नसल्याचे आठवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'केवळ जोश नको, होशमध्येही कामे करा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष सर्व जाती, समाजाचा कसा होऊ शकेल याचा विचार करणे आवश्यक असून पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे व माझ्या मंत्रीपदाचा उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

गुरुवारी (२८ जून) आठवले यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मराठवाडा विभागाची बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी पक्षाचे भूपेश थुलकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, उपाध्यक्ष मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, नागराज गायकवाड, संजय ठोकळ आदींची उपस्थिती होती.

यावेळी आठवले म्हणाले की, 'पक्ष वाढवण्यासाठी गाव तेथे शाखा स्थापन करा, पक्षामध्ये सर्व समाजातील लोकांना एकत्र करा, बोर्ड लावा, झेंडा लावा, दलितेत्तर समाजाला जवळ करा, असे सांगत येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या सत्तेत वाटा मिळवण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. आपण सत्तेत आहोत त्यामुळे आपल्यापदरी काहीतरी पडेल हे निश्चित, मात्र प्रत्येकाला काहीतरी मिळेल या आशेवर राहू नका. स्वत:ला काहीतरी मिळेल या उद्देशाने कामे करू नका. सत्तेपेक्षा समाजाचा सन्मान मोठा आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.'

पक्षासोबत सर्व जाती-धर्माचे लोक जोडले गेले पाहिजेत ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे, असे सांगत बाबुराव कदम म्हणाले की, जोपर्यंत पक्षात सर्व समाजातील लोकांना एकत्र आणत नाही तोपर्यंत पक्ष सत्तेत प्रबळपणे सहभागी होऊ शकत नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षबांधणीचे काम केले पाहिजे. आगामी निवडणुकीमध्ये औरंगाबाद पश्चिम विधानसभेची जागा लढवण्याची संधी द्यावी तसेच मराठवाड्यातील इतर जागांमध्येही झुकते माप मिळावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. यावेळी भुपेश थुलकर, मिलिंद शेळके यांचीही भाषणे झाली.

बैठकीसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हास्तरीय तसेच तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुतणीच्या डीएनए चाचणीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जिल्ह्यातील पिंपळवाडी पिराची (ता. पैठण) गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपत्याचे खोटे प्रमाणपत्र दाखल करून आपली मुलगी भावाची असल्याचे सांगितल्याने भावाची मुलगी बुशरा हिची डीएनए चाचणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिले. याप्रकरणी यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यासह त्याच्या चार अपत्यांच्या डीएनए चाचणीचे आदेश दिले होते.

पिंपळवाडी पिराची (ता. पैठण) ग्रामपंचायतीची निवडणूक २०१५-२०१६ मध्ये मुनाफ सुभेदार शेख यांनी लढविली होती. मुनाफ यांनी निवडणुकीत बिलाल इसाक शेख यांना पराभूत केले होते. मुनाफने निवडणुकीपूर्वी अपत्यांसंबंधी सादर करावयाच्या शपथपत्रात दोन मुले असल्याचे नमूद केले होते. मुनाफच्या शपथपत्रावर पराभूत उमेदवार बिलाल यांनी आक्षेप घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे मुनाफच्या अपात्रतेसंबंधी अर्ज सादर केला होता. मुनाफला चार अपत्पये असून त्याचे विवरणही सादर करण्यात आले होते. मुनाफला तिसरे अपत्य २२ मार्च २००४, तर चौथे ३० ऑगस्ट २००६ रोजी झालेले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मुनाफला ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. याविरोधात मुनाफने अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपिल केले असता त्याचे सदस्यत्व बहाल केले. यास बिलालने खंडपीठात आव्हान दिले.

खंडपीठाने चार अपत्यांसह पित्याची डीएनए चाचणीसाठी सोमवारी (२ जुलै) छावणी येथील प्रयोगशाळेत करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी (२८ जून) अॅड. ठोंबरे यांनी आक्षेप घेताना मुनाफने आपली असलेली सायमा उर्फ महेविश भाऊ मिनाजची मुलगी असल्याचे दाखविले आणि मिनाजची बुशरा नामक मुलगी आहे. दोघींच्या जन्मात केवळ ३९ दिवसांचे अंतर आहे. बुशराचा जन्म २१ जुलै २००६ रोजीची नोंद असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. अॅड. सुभाष तांबे यांनी शासनाची, तर याचिकाकर्ते बिलाल शेखतर्फे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले. मुनाफतर्फे अॅड. चंद्रकांत थोरात यांनी बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतपीठ सुरू करा; वारकरी मंडळाची मागणी

$
0
0

औरंगाबाद: सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यासाठी संतविचार महत्त्वाचे आहेत. त्यासाठी पैठण येथील संतपीठ लवकर सुरू करा अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाने केली. याबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ह.भ.प.नवनाथ महाराज आंधळे, डॉ. प्रमोद महाराज कुमावत, न्यायाचार्य विठ्ठलशास्त्री चनघटे, ह.भ.प.एकनाथ महाराज वाघ, ह.भ.प.एकनाथ महाराज चौधरी उपस्थित होते. नागपूर येथे अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे बागडे यांनी आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार रेल्वेगाड्यांत जुलैमध्ये वाढीव डबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दक्षिण मध्य रेल्वेने तपोवन एक्स्प्रेस, हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस, शिर्डी साईनगर, तिरुपती-नगरसोल या रेल्वेचे डबे तात्पुरत्या स्वरुपात वाढवले आहेत. हे डबे जुलै महिन्यात उपलब्ध होणार आहेत.

नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसला एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी डब्बा वाढविण्यात येणार आहे. हा डबा नांदेड येथून एक जुलै ते ३१ जुलै, तर मुंबई येथून २ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान लावण्यात येणार आहे. तिरुपती-साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक एक्स्प्रेसला सेकंड स्लिपर डबा तिरुपती येथून ३, १०, १७, २४ आणि ३१ जुलै रोजी लावण्यात येईल. साईनगर शिर्डी येथून ४, ११, १८, २५ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी डबा वाढवला जाईल. तिरुपती-नगरसोल-तिरुपती विशेष रेल्वेला एक सेकंड स्लिपर डबा तिरुपती येथून ६, १३, २०, २७ जुलै रोजी, तर नगरसोल येथून ७, १४, २१, २८ जुलै रोजी लावण्यात येणार आहे. हैदराबाद-जयपूर-हैदराबाद रेल्वेला थर्ड एसी डबा हैदराबाद येथून २ जुलै व ३० जुलै व अजमेर येथून ४ जुलै ते २७ जुलै या दरम्यान लावण्यात येणार आहे. हैदराबाद-जयपूर-हैदराबाद रेल्वेला एक थर्ड एसी कोच हैदराबाद येथून ६, १३, २०, २७ जुलै, तर जयपूर येथून ८,१५,२२,२९ जुलै रोजी लावण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार दिवसात सर्व टँकरला ब्रेक !

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टंचाई आराखडा ३१ जून रोजी संपुष्टात येणार असल्याने एक जुलैपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याचे ९७३ टँकर बंद करण्यात येणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या टंचाई संपुष्टात आली असली, तरी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी, या गावांची तहान भागवण्यासाठी टँकर सुरू ठेवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे होत आहे.

यंदा निम्म्या मराठवाड्यात जून महिन्यातच पावसाने दमदार 'ओपनिंग' केली. त्यामुळे टँकरच्या संख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र, औरंगाबाद, जालना, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील गावांना टँकरचा विळखा कायम आहे. ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील ७७६ गावे व १७६ गावांमध्ये ९७३ टँकर सुरू आहेत. यापैकी निम्मे टँकर केवळ औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. टंचाई आराखडा ३१ जूननंतर संपुष्टात येणार असल्यामुळे १ जुलैपासून प्रशासन सर्व गावांमधील टँकर बंद करेल. पण, टँकर बंद करण्यापूर्वीच औरंगाबाद जिल्ह्यातून टँकर सुरू ठेवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे होत आहे.

गेल्यावर्षी वरुणराजाने कृपा केलेल्या लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये यंदाही पावसाने जून महिन्यातच सुरुवात केल्याने या जिल्ह्यांत फारशी अडचण नाही. पण, गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात पाऊस कमीच पडला. त्यामुळे पावसाळ्यात टँकर बंद होण्याऐवजी टँकरची संख्या कायम आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल ६३६ टँकरद्वारे ११ लाख ११ हजार नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. सध्या मराठवाड्यातील ७७६ गावे व १७६ वाड्यांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असून विभागातील तब्बल १६ लाख ७० हजार नागरिकांची तहान ९७३ टँकरद्वारे भागवली जात आहे. या शिवाय टंचाईवर मात करण्यासाठी विभागातील २४४५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

परिस्थिती पाहून टँकर सुरू करण्याचा विचार

३१ जूननंतर सर्व टँकर बंद करण्यात आल्यानंतर पडलेला पाऊस आणि टँकरची आवश्यकता तपासून गरज पडली तरच संबंधित गावासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात येतील. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात टँकर सुरूच ठेवण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असून टँकर सुरू ठेवण्यासाठी नेत्यांचाही दबाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कट प्रॅक्टिस’चा मसुदा अधिवेशनात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कट प्रॅक्टिस'ला प्रतिबंध करणारा आणि दोषींना सक्तमजुरीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कट प्रॅक्टिस कायद्याचा मसुदा मागच्या वर्षभरापासून अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात तरी मसुदा ठेवला जाऊन चर्चा होणार का, असा सवाल उपस्थित होत असतानाच, या कायद्याचा मसुदा निदान तिसरा-चौथ्या आठवड्यापर्यंत तरी ठेवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यादृष्टीने काही प्रमाणात हालचाली सुरू आहेत. अर्थात, विधी व न्याय विभागाची मंजुरी मिळाल्यानंतरच हा मसुदा ठेवला जाऊ शकतो, याकडे लक्ष वेधल्या जात आहे आणि अद्याप तरी मसुदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

मुंबईच्या 'एशियन हार्ट इन्स्टिट्यूट'चे प्रख्यात डॉ. रमाकांत पांडा यांनी कट प्रॅक्टिसला कडाडून विरोध करीत 'ऑनेस्ट ओपिनियन, नो कमिशन टू डॉक्टर्स' असे बॅनर मागे मुंबईच्या रस्त्यावर लावले होते आणि त्यामुळेच समस्त वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. पांडा यांनी आरोग्य मंत्र्यांसह वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही कट प्रॅक्टिसविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष समिती स्थापून कट प्रॅक्टिसविरुद्ध कायदा करता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात आली होती. तसेच सूचनांचे जाहीर आवाहन करण्यात आले होते व त्यातील अनेक सूचनांचा समावेश प्रत्यक्ष कायद्याच्या मसुद्यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर मागच्या पावसाळी तसेच हिवाळी अधिवेशनातही कायद्याचा मसुदा मांडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र विधी व न्याय विभागाकडून मसुद्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी काढण्यात आल्या व मसुद्याला अंतिम मजुरी मिळालीच नाही. परिणामी, अधिवेशनात मसुदा सादर झालाच नाही. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही मसुद्याला विधी व न्याय विभागाची अंतिम मंजुरी मिळालेली नाही. त्यातच चार जुलैपासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यामुळेच मसुद्याला अंतिम मंजुरी मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे; तसेच मसुद्यामध्ये पुन्हा काही त्रुटी काढल्यात आल्यास, त्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी आणखी कालावधी लागणार आणि यामध्ये अधिवेशनाचे सुप तर वाजणार नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे.

\Bतांत्रिक अडचणींचा पेच?\B

थेट कट प्रॅक्टिसला प्रतिबंध करणारा कोणताही कायदा आजपर्यंत नसला तरी या प्रकारच्या गुन्ह्यासाठी दुसऱ्यामध्ये कायद्यान्वये शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे नव्या कायद्यात व जुन्या कायद्यामध्ये कोणतीही विसंगती निर्माण होणार नाही आणि त्याचवेळी कट प्रॅक्टिस करणाऱ्या दोषींना सक्तमजुरीपर्यंतची कठोर शिक्षा करण्याचीदेखील तरतूद असेल, यासाठी कसरत करावी लागत असल्याचे समजते.

'लॉ डिपार्टमेंट'कडून कायद्याच्या मसुद्याला मंजुरी मिळवून हा मसुदा येत्या अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न आहे. निदान तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तरी मसुदा अधिवेशनात मांडला जाईल, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images