Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महिलेने फोडल्या एसटी बसच्या काचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड

एका महिलेने अचानक बसच्या काचा फोडल्याने एस. टी. महामंडळाचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती आगार प्रमुख विजय बोरसे यांनी दिली. या महिलेविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.  

सिल्लोडचा आठवडी बाजार रविवारी असतो, यामुळे बसस्थानकात गर्दी होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सुनीता रवींद्र सुरडकर(रा. सिल्लोड) ही महिला बसस्थानकात आली व तिने फलाटवर उभ्या असलेल्या बसच्या समोरच्या मोठ्या काचा फोडण्यास सुरुवात केली. तिने चार बसच्या काचा फोडल्या. यामुळे बसस्थानकात एकच धावपळ उडाली. वाहतूक नियंत्रक गोराडे यांनी माईकवरून घोषणा करून बंदोबस्तावरील पोलासांना या महिलेला ताब्यात घेण्याची सूचना केली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. बसस्थानकावर फलाटवर उभ्या असलेल्या सोयगाव आगाराची बस (एमएच२० बीएल२३२७),मुक्ताईनगर आगाराची बस (एमएच २० बीएल ३४३८), रावेर आगाराची बस (एमएच २० बीएल २५१९), जळगाव आगाराची बस (एमएच २० बीएल ३४०९) या चार बसच्या समोरच्या काचा महिले फोडल्याने ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहुजनांवरील अन्याय, अत्याचाराचा निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धार्मिक अल्पसंख्याक यांच्यावर दिवसोंदिवस अत्याचार वाढत असून मोठा अन्याय या समाजावर होत आहे. याच्या निषेर्धात शनिवारी तहसील कार्यालयात अव्वल कारकून शहा यांना बहुजन क्रांती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले.

वाकडी ता. जामनेर, रुद्रवाडी ता. उदगीर व नारायणगाव येथे कैकाडी समाजावर झालेला अन्याय, अहमदपूर येथे मुलीवर झालेला अत्याचार, या घटनांची चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे. पुरोगामी महाराष्ट्रात अन्याय, अत्याचारात वाढ होत असून त्यास पायबंद घालावा, या मागणीचे निवेदन  देण्यात आले आहे. या निवेदनावर साहेबराव वाल्हू राठोड, संभाजी ब्रिगेडचे डॉ. सुनील शेजवळ, बहुजन मुक्ती पार्टीचे कडुबा पवार, भिल्ल संघटनेचे पवन सोनवणे, एमआयएमचे शेख याकुब, भारिपचे किरण मोरे, अनिल शिरसाठ, प्रवीण गायकवाड, उत्तम बावस्कर आदींच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलावात अतिक्रमण; अकरा जणांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

तालुक्यातील सवंदगाव येथील लघुसिंचन विभागाने बांधलेल्या पाझर तलावाच्या संपादित क्षेत्रात अतिक्रमण केल्याप्रकरणी उपविभागीय जलसंधारण विभागीय अधिकारी यांनी अकरा जणांना नोटीस बजावली आहे. शासकीय जमिनीवर बेकायदा अतिक्रमण केल्याबद्दल भूसंपादन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

लघुसिंचन विभागाने जवळपास तीस वर्षांपूर्वी सवंदगाव येथील गट क्रमांक ३९९ व गट क्रमांक ४०० मध्ये जमीन संपादन करून त्याठिकाणी पाझर तलाव क्रमांक दोनचे बांधकाम केले आहे. या तलावाचा सांडवा फोडून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलण्यात आल्याने तलावाचे सर्व पाणी घरात व शेतात येत असल्याची तक्रार सवंदगाव येथील निवृत्ती रंगनाथ सोनवणे यांनी केली होती. तलावाच्या संपादित क्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी सोनवणे यांनी उपोषण व पाठपुरावा केल्यानंतर भुमी अभिलेख विभागाने ७ जून रोजी जायमोक्यावर जाऊन मोजणी व सीमांकनाचे काम केले. पण या मोजणीमध्ये अतिक्रमणधारकांना जाणीवपूर्वक अभय देण्यात आल्याचा आरोप करत सीमांकन सदोष असल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. भुमी अभिलेख अधीक्षक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, निवृत्ती सोनवणे यांच्या ताब्यातील गट क्रमांक ३९९ मधील पश्चिम बांधावर तार फेन्सिंग व खड्डे भरण्यातांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त देण्याचे आदेश तहसीलदार सुमन मोरे यांनी पोलिसांना दिले आहेत.

यांना बजावल्या नोटीस

उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांनी सवंदगाव येथील मोहन तुळशीराम शिंदे, शिवाजी तुळशीराम शिंदे, भानदास अहिलाजी शिंदे, उमीनाथ भानदास शिंदे, रमेश भानदास शिंदे, मंजाहरी भानदास शिंदे, अमोल मोहन शिंदे, गणेश शिवाजी शिंदे, नानासाहेब देविदास शिंदे, संतोष नाना शिंदे व यशवंत देविदास शिंदे या अकरा जणांना २५ जून रोजी नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत संपादित क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात यावे, असे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशेष मुलांच्या हक्कांची माहिती हवीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'विशेष मुलांचे हक्क व त्यांच्यासाठीचे कायदे यांची माहिती असणे खूप गरजेचे आहे,' असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या आदिती झा (मुंबई) यांनी केले. त्या पालक व शिक्षकांसाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत बोलत होत्या. आरंभ ऑटिझम सेंटर व उमीद चाइल्ड डेव्हपलमेंट सेंटर मुबंई यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

साद स्पीच आणि हिअरिंग क्लिनिकमध्ये आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. रंजन गर्गे यांनी केले. यावेळी संगीत थेरपिस्ट मंजुषा राऊत, स्पिच थेरपिस्ट सुचिता कुलकर्णी, आरंभ ऑटिझम सेंटरच्या संचालिका अंबिका टाकळकर उपस्थित होत्या. विशेष मुलांचे हक्क व अधिकार याविषयी आदिती झा यांनी माहिती दिली. डिसअॅबिलिटी स्टडीजमध्ये एमएसड्ब्ल्यू करणाऱ्या आदिती सहा वर्षांपासून उमीद चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर येथे सोशल वर्कर म्हणून काम करतात. डिसअॅबिलिटी अँक्ट २०१६ विषयी बोलताना त्या म्हणाल्या, पूर्वी सात प्रकारचे अपंगत्व होते. त्यात आता २१ प्रकारच्या अपंगत्वांचा समावेश केला आहे. ऑटिझम स्वतंत्र अपंगत्व आहे. जेव्हा या मुलांनाही स्वतंत्र प्रमाणपत्र दिल जाव ही मागणी होईल तेव्हाच ते मिळेल. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मात्र रेल्वे किंवा बस प्रवास भाड्यात सवलत मिळते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेत प्रवेश तसेच सरकारी योजना, निरायम इन्शुरन्स स्किम, नॅशनल ट्रस्ट अशा विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ऑटिस्टीक मुलांमध्ये सेन्सरी इंटीग्रेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी या मुलांसाठी सेन्सरी थेरपी मिळायला हवी. औरंगाबादमध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्टची संख्या कमी आहे. त्यामुळे ऑटिस्टिक मुलांचे व्यवस्थापन करणे अवघड आहे असे विचार अंबिका टाकळकर यांनी व्यक्त केले. उमीदतर्फे ऑक्युपेशनल थेरपिस्ट प्रियांका खुजे व सायली परब यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; तीन वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सोयगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत अत्याचाराचा प्रयत्न करणारा आरोपी दत्तू कडुबा माताडे याला तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायायाधीश एच. के. भालेराव यांनी सोमवारी (दोन जुलै) ठोठावली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या पित्याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दोन ऑगस्ट २०१५ रोजी पीडित मुलगी शेतामध्ये उभी असताना मागून आलेला गावातील आरोपी दत्तू कडुबा माताडे (१९) याने मुलीचा हात पकडून तिला शेतात ओढत नेले व अत्याचाराच्या प्रयत्नात असताना मुलीने आरडाओरडा केल्याने मुलीची आजी धावत आली व त्यानंतर आरोपी पळून गेला. आरोपीची तक्रार करण्यासाठी फिर्यादी हा आरोपीच्या घरी गेला असता आरोपीच्या वडिलांनी फिर्यादीला शिविगाळ व मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून सोयगाव पोलिस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४ (अ), 'पोस्को' कायद्याच्या ७, ८, ११, १२ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील उदय पांडे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये पीडितेसह तिच्या आजीची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला ३५४ (अ) कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी, तर 'पोस्को' कायद्याच्या कलम ११ व १२ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन शस्त्रेप्रकरणी दोषींवर कारवाई निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऑनलाइन शस्त्र खरेदी प्रकरणात फ्लिपकार्ट कंपनीच्या दोषींवर कायदेशीर कारवाई निश्चित करण्यात येणार आहे. देशात शस्त्र तयार करणाऱ्या आठ ते दहा कंपन्या असून, यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गांभिर्याने याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

शहरात ११ मे रोजी नवाबपुरा, शहागंज भागात दोन गटात दंगल उसळली होती. यानंतर २८ मे रोजी गुन्हे शाखेच्या पथकांनी नागेश्वरवाडी व जयभवानीनगर येथील इन्स्टाकार्ट कुरियर कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले होते. यामध्ये ग्राहकांनी खेळण्याच्या नावाखाली मागवलेल्या तलवारी, गुप्ती, चाकू आदी शस्त्रे जप्त करण्यात आली होती. फ्लिपकार्ट या ऑनलाइन खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही शस्त्रे मागवण्यात आली होती. याप्रकरणी ग्राहकांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. या गुन्ह्यामध्ये फ्लिपकार्ट व इन्स्टाकार्टच्या अधिकाऱ्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे. यातील दोन आरोपींना नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेत अटकपुर्व जामीन मिळवला आहे. या संदर्भात बोलताना आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दंगलीच्या पार्श्वभुमीवर करण्यात आलेली ही शस्त्र खरेदी गंभीर बाब आहे. फ्लीपकार्टच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत. तसेच देशात आठ ते दहा शस्त्र तयार करणारे कारखाने आहेत त्यांना देखील नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठकीला उशिरा येणारे अधिकारी सभागृहाबाहेर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थायी समितीच्या बैठकीला उशिरा आल्यामुळे सभापती रेणुकादास उर्फ राजू वैद्य यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर थांबवले. बैठक संपेपर्यंत त्यांना सभागृहात प्रवेश नाकरण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सभागृहाच्या बाहेर थांबवण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.

स्थायी समिती सभापती वैद्य यांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता बैठक आयोजित केली होते. त्यानुसार, नियोजित वेळी त्यांनी बैठकीला सुरूवात केली. यावेळी प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, मुख्य लेखाधिकारी एम. आर. साळुंके, मालमत्ता अधिकारी वामन कांबळे आणि विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख हे चार अधिकारीच सभागृहात हजर होते. 'वंदेमातरम्'ने बैठकीला सुरुवात झाल्यानंतर अधिकारी येणे सुरू झाले. मात्र, उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्याला सभागृहात प्रवेश देऊ नका, असे आदेश वैद्य यांनी सुरक्षारक्षकांना दिले होते. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर थांबवले. त्यात कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, मुख्य लेखा परीक्षक दीपाराणी देवतराज यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, वॉर्ड अभियंते यांचा समावेश होता. सुरुवातीला हे सर्व अधिकारी सभागृहाबाहेर उभे होते. मात्र, बराच वेळ उभे राहिल्यामुळे पाय दुखण्यास सुरुवात झाल्या वर त्यांनी सभागृहाच्या शेजारच्या एका दालनाचा आसरा घेतला. या दालनातील खुर्च्यांवर सर्वांनी बैठक मारली.

अधिकाऱ्यांनी बैठकीला वेळेवर आलेच पाहिजे. ते उशिरा आले याचा अर्थ त्यांना बैठकीचे गांभीर्य नाही. त्यामुळे त्यांना बाहेर थांबवले. कारवाईची ही पहिलीच वेळ होती. यानंतर कुणी उशिरा आले, तर कारणेदाखवा नोटीससह दंडात्मक कारवाईचा विचार केला जाईल.

- राजू वैद्य, सभापती, पालिका स्थायी समिती

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंड्यांना आरोग्य सुविधेसाठी ३८ प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पंढरपूर आषाढी वारीसाठी जिल्ह्यातील वारकरी दिंड्यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. यंदा ३८ दिंड्यांनी सुविधा पुरविण्याबाबतचे प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविले आहेत. यातून निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दिंड्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरवावी यासाठी चार वर्षांपूर्वी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. उपकरातून यासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात येते. प्रत्येक दिंडीसोबत एक वाहन, एक आरोग्य कर्मचारी आणि औषधीसाठा दिला जातो. गेल्यावर्षी ३० दिंड्यांसोबत आरोग्य पथक देण्यात आले होते. यंदा ३८ प्रस्ताव आल्याने एकाच मार्गावरून जाणाऱ्या दोन दिंड्यांमध्ये एक पथक देता येईल, काय याची चाचपणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लासूर स्टेशनला दोन्ही डॉक्टर गैरहजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता अचानक भेट दिली. त्यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले.

याबाबत डोणगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची कायम गर्दी असते. याठिकाणी सोमवारी प्रसुतिसाठी रुग्ण होते. पण वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्वच्छता दिसून आलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी एक वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ते निर्देश संबंधितास देण्यात यावे, अनुपस्थितीबाबत योग्य ती कारवाईकरून मला अहवाल सादर करावे, असे या पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर डॉक्टरांचे वेतन बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

सतत गैरहजर राहणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे वेतन देऊ नये व मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले आहेत. या आदेशामुळे सतत गैरहजर राहणाऱ्या व औरंगाबाद येथून ये-जा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

डॉक्टरांची सतत गैरहजरी, औषधी नसणे, अपघातामधील पेशंटना औरंगाबादला पाठवणे, सर्पदंशाची औषधी नसणे, पिण्याचे पाणी नसणे, रुग्णालयातील स्वच्छतागृह व परिसरातील अस्वच्छता आदी तक्रारींमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी वैजापूर येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात गैरसोयीचे ठरले आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करुनही उपयोग होत नसल्याने काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे ग्रामीण तालुकाध्यक्ष मंगेश भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली. त्यानंतर आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे व डॉ. अर्चना भोसले यांनी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला व प्रत्येक विभागासाठी एक डॉक्टर व परिचारिका नेमून अहवाल मागवला. मात्र दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात जवळपास १५ डॉक्टर गैरहजर असल्याचे महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात दिसून आले. त्यामुळे अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे मंगेश भागवत यांनी औरंगाबाद येथे आरोग्य उपसंचालकांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थिती वरिष्ठांच्या आदेशानंतरही 'जैसे थे' असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याची दखल घेऊन आरोग्य उपसंचालक डॉ. लाळे यांनी गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांचे वेतन देऊ नये, असे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. याशिवाय जे डॉक्टर्स मुख्यालयी राहत नाहीत त्यांचा घरभाडे भत्ता का थांबवण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यात पावसाची दडी, खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांत दमदार पाऊस असतानाही कृषीच्या लातूर आणि औरंगाबाद विभागात केवळ ३३.६६ टक्के खरीप पेरणी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या खंडामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

लातूर विभागात लातूर, नांदेड, उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात ३६.९६ टक्के, तर औरंगाबाद विभागात तुलनेत कमी पाऊस असल्यामुळे औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात केवळ २८.८३ टक्के पेरणी झाली. जून महिन्यात लातूर, उस्मानाबाद तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झाला होता. मात्र गेल्या आठवड्याभरपासून पावसाने दडी मारली आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस असल्याचा फटका पेरण्यांना बसला आहे. जून महिन्यात १७ दिवस पाऊस झाला असला तरी पेरणी करण्यास बळीराजा अद्याप पुढे आलेला नाही.

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या केल्या, मात्र पावसाचा मोठा खंड आणि बोंडअळीचे आक्रमण यामुळे बहुतांश खरीप पीक होरपळले. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी यंदाच्या परिस्थितीत पेरणी करण्यास धजावत नाहीत. आतापर्यंत लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी ओलांडली आहे. दमदार पाऊस असतानाही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यासाठी हात आखडता घेतला आहे. आतापर्यंत खरिपाची २०४८ हेक्टरवर सर्वाधिक (५३ टक्के) पेरणी हिंगोली जिल्ह्यात झाली आहे. दमदार पाऊस झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी १०९२.१६ हेक्टरवर (२३.११ टक्के) पेरणी झाली. औरंगाबाद विभागात १०२३ हेक्टरवर खरीप तृणधान्य, ५२७ हेक्टरवर कडधान्य, ८९७ हेक्‍टरवर गळीत धान्य, तर पाच हजार ५३५ हेक्टरवर कापूस पेरण्यात आला आहे. विभागात ८७४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. लातूर विभागात ४५९ हेक्टरवर तृणधान्य, २३८४ हेक्टरवर कडधान्य, ५३०२ हेक्टरवर गळीत धान्य, तर १० हजार ७८७ हेक्टरवर कापूस पेरण्यात आला.

----.

जिल्हानिहाय पेरणी (जून अखेर)

जिल्हा....................... प्रत्यक्ष पेरणी हेक्टर..................... टक्के

औरंगाबाद........................२३१६.५८...............................३२.९२

जालना...........................१३६६.०९.............................२३.५८

बीड...............................२०६२.०४...............................२९.०७

एकूण औरंगाबाद विभाग.........५७४४.७१.........................२८.८३ टक्के

लातूर................................१०३२.६५..............................२३.७३

उस्मानाबाद..........................१०९२.१६........................२३.११

नांदेड....................................४४२२.५६.........................५३.६२

परभणी................................१७९१.७६........................२८.३४

हिंगोली................................२०४८.७३........................५३.२१

एकूण लातूर विभाग.................१०७७८.८६......................३६.९६टक्के

---------------------------------------------------------------.

एकूण मराठवाडा......................१६५३२.५७ ........................३३.६६ टक्के

----------.

आतापर्यंत झालेला पाऊस (२ जुलै पर्यंत)

जिल्हा...............पडलेल्या पावसाची टक्केवारी.......... वार्षिक सरासरीशी टक्केवारी

औरंगाबाद...............७३.२.....................१५.४ टक्के

जालना....................६९.९....................१५.२ टक्के

परभणी...................१२२.२..................२२.१ टक्के

हिंगोली...................१३२.१...................२८.४ टक्के

नांदेड....................१४०.००..................२६.७ टक्के

बीड....................९३.४........................१९.४ टक्के

लातूर.................१५५.८.......................३०.७ टक्के

उस्मानाबाद.........१०६.३.......................२३.६ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलाचा ताबा अखेर आजोबा-आजीकडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील दहा वर्षीय मुलाचा ताबा देण्यासंदर्भातील पित्याचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. गिरधारी यांनी फेटाळला. हा मुलगा त्याच्या आजी-आजोबांकडे राहतो. त्याचा ताबा मिळण्यासाठी त्याच्या वडिलांनी अर्ज दाखल केला होता.

अर्जानुसार संबंधित मुलाच्या वडिलांचा पहिला विवाह आठ मे २००७ रोजी झाला होता व दोघांपासून हा मुलगा झाला होता. २८ जुलै २०११ रोजी अर्जदाराच्या पत्नीचे सर्प दंशामुळे निधन झाले. तेव्हापासून मुलगा हा त्यांच्या सासू-सासऱ्यांकडे राहतो. त्याचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. चैतन्यचे आजोबा बंडू रंधे व आजी पद्माबाई रंधे यांच्या वतीने अ‍ॅड. संदीप राजेभोसले यांनी बाजू मांडली. अर्जदाराने पत्नीला रक्कम मागितल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अर्जदाराने दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे सावत्र आई त्याची काळजी व संगोपन योग्यप्रकारे करु शकणार नाही, असा युक्तीवाद अ‍ॅड. राजेभोसले यांनी केला.

मुलाचा वडिलांकडे राहण्यास विरोध

या प्रकरणात मुलगा चैतन्य याची साक्षही कोर्टात नोंदविण्यात आली. त्याने वडिलांकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्या इच्छेविरुद्ध वडिलांकडे पाठविणे हा त्याच्या मनावर मानसिक आघात ठरू शकतो, अशी बाजू मांडण्यात आली. सुनावणीअंती कोर्टाने अर्जदाराचा मुलाला ताब्यात देण्याचा अर्ज फेटाळला. अ‍ॅड. राजेभोसले यांना अ‍ॅड. सुधीर घोंगडे, अ‍ॅड. गायत्री राजेभोसले, अ‍ॅड. प्रशांत इंगळे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत महिला ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता बीड बायपास रोडवरील पटेल लॉन्स समोर हा अपघात घडला. शुभदा सुधीर कुपटेकर (वय ४८, रा. रो हाऊस क्रमांक १६, बी देवडानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

सोमवारी शहानूरवाडी भागात आठवडी बाजार होता. शुभदा कुपटेकर या त्यांच्या किरायेदार उज्वला संघा यांच्यासोबत मोपेडवर भाजीपाला खरेदीसाठी घरून निघाल्या होत्या. देवडानगराच्या कमानीतून त्या बीड बायपास रोडवर आल्या. यावेळी महानुभाव आश्रमाकडून ट्रक (एचआर ३८ डब्ल्यू ६०६४) चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कुपटेकर यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी पाठीमागे बसलेल्या कुपटेकर रोडवर फेकल्या गेल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला व कंबरेला गंभीर मार लागला. नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. उज्वला संघा यांनी ही माहिती सातारा पोलिसांना कळवली. नागरिकांनी पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकाला जागीच पकडले. डॉक्टरांनी तपासून कुपटेकर यांना मृत घोषित केले. घाटी रुग्णालयामध्ये त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपटेकर यांचे पती 'एलआयसी'मध्ये नोकरीला असून त्यांना दोन मुले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद जिल्ह्यातील २४२ टँकर सुरू ठेवण्यास हिरवा कंदील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

टंचाई आराखडा ३० जून रोजी संपुष्टात आल्यानंतर मराठवाड्यात सुरू असलेल्या ९७३ टँकरपैकी ६५९ टँकर बंद करण्यात आले आहेत. सध्या सर्वाधिक टंचाई असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात २४२ टँकर सुरू ठेवण्यात आले आहेत.

तांत्रिकदृष्ट्या टंचाई संपुष्टात आली असली, तरी औरंगाबाद व जालना जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी, या गावांची तहान भागवण्यासाठी टँकर सुरू ठेवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसह हिंगोली, नांदेड, बीड तसेच लातूर जिल्ह्यातील टँकर सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांत औरंगाबाद वगळता इतर जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळेही टँकरची संख्या घटली आहे.

यंदा निम्म्या मराठवाड्यात जून महिन्यातच पावसाने दमदार 'ओपनिंग' केली. त्यामुळे टँकरच्या संख्येत घट होणे अपेक्षित होते. त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विभागातील ६५९ टँकर बंद करण्यात आले. बंद करण्याात आलेल्या टँकरमध्ये सर्वाधिक ३८८ टँकर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. टंचाई आराखडा संपुष्टात येण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी सदर टँकर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

\Bऔरंगाबादची अवस्था वाईट\B

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड तालुक्यात २४२ टँकर सुरू असून पावसाअभावी येत्या काही दिवसांमध्ये या टँकरमध्ये भर पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या टँकरच्या गावांमध्ये टंचाई आहे, टंचाई आराखडा संपुष्टात आला असला तरी अतिरिक्त टँकरचा खर्च स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ बाय सहात प्रसादची यशाला गवसणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दिवसा पेंटर, तर रात्री वॉचमन म्हणून आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या पित्याच्या पोटी जन्मलेल्या आणि पार्किंगच्या जागेत अवघ्या आठ बाय सहा खोलीमध्ये गुणवत्तेची भक्कम इमारत उभी करणाऱ्या प्रसादने दहावीत तब्बल ९४ टक्के गुण मिळवले. कोणतीही शिकवणी नसताना गणितात १०० पैकी १०० व संस्कृतमध्ये १०० पैकी ९९ गुण पटकावित सर्व प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत गुणवत्तेची मोहोर लावली. सर्वोत्कृष्ठ मेकॅनिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रसादला हवा आहे समाजाच्या मदतीचा हात.

प्रसाद अशोक गोसावी याचे चौथीपर्यंत शिक्षण श्री विद्या मंदिरमध्ये, तर पाचवीपासून श्री सरस्वती भुवन प्रशालेत झाले. प्रसाद पहिल्यापासूनच चुणचुणीत. त्याने कधीच ८५-९० टक्क्यांपेक्षा कमी गुण घेतले नाहीत, हे विशेष. शिकवणी तर त्याला कधीच माहीत नाही. अर्थात, शिकवणी लावण्यासारखी परिस्थितीही त्याची कधी नव्हती. हे लक्षात आल्यानंतर अनेक शिक्षकांनी प्रसादच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याच्याकडे अधिक लक्ष दिले. अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचे संपूर्ण शालेय शिक्षण हे पार्किंगमधील आठ बाय सहाच्या छोट्या खोलीत झाले. स्टेडियमसमोरच्या उद्योग अलंकार अपार्टमेंटचे वॉचमन असलेले प्रसादचे वडील अशोक गोसावी हे गेल्या १३ वर्षांपासून याच ठिकाणी कामाला आहेत. त्यापूर्वीही ते आणखी एका ठिकाणी वॉचमन होते व तिथेही ते पार्किंगच्या जागेत राहात होते. ते मूळचे नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील कांबी या गावचे असले तरी आता गावाकडे पडके धाब्याचे घर वगळता काहीही शिल्लक नाही. याच छोट्या खोलीत व खोलीमागच्या छोट्या जागेत गोसावी कुटुंबाचा संसार आहे. आतल्या छोट्या खोलीत फार वेळ बसणेही शक्य नसल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा संसार बाहेरच असतो. प्रसादचा अभ्यासदेखील खोलीबाहेरच चालतो. त्यातच मोठा पाऊस आला की संपूर्ण पार्किंगमध्ये पाणी साचते आणि तरंगणाऱ्या सामान-साहित्यासोबतच प्रसादला अभ्यास करावा लागतो. अशा प्रत्येक प्रतिकुल परिस्थितीवर प्रसादने यशस्वी मात केली आणि यशाला गवसणी घातली.

वडिलांना मदत अन् तबल्याचा ठेका

वेळोवेळी वडिलांना पेंटिंग व इतर कामांत मदत करणारा प्रसाद हा तबल्यामध्ये आणि बुद्धीबळातही रमतो. घरकामात आईलाही मदत करतो. संपूर्ण परिस्थितीची तीव्र जाणीव असलेल्या प्रसादला हीच परिस्थिती बदलण्याचा ध्यास आहे. आधी पॉलिटेक्निक करुन 'बीई'सह पुढे शिकण्याची प्रसादची इच्छा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दपार आरोपींवर करडी नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या आठ दिवसांपासून शहरात घरफोड्यानी धुमाकूळ घातला आहे. सिडको एन-तीन भागात रविवारी सकाळी घरफोडी करून २५ हजारांचा ऐवज लांबवण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चोऱ्या, घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी दिली.

सिडको एन-तीन भागात आनंद दगडू सुखदरे (वय ७०) या जेष्ठ नागरिकाचे निवासस्थान आहे. सुखदरे यांचा मुलगा मुंबईला राहतो. त्याला भेटण्यासाठी २८ जून रोजी सुखदरे मुंबईला गेले होते. त्याच रात्री चोरट्यांनी सुखदरे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील रोख २५ हजार रुपये घेऊन चोरटा पसार झाला. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्याने हा प्रकार सुखदरे यांना कळवला. सुखदरे रविवारी सकाळी घरी आले. त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पीएसआय सय्यद सिद्दिकी या घटनेचा तपास करीत आहेत.

\Bहद्दपार घरफोडे रडारवर\B

शहरात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. सातारा व वेदांतनगर पोलिस ठाण्याला चोरट्यांनी टारगेट केले आहे. पोलिसांनी सध्या शहरातून हद्दपार असलेले घरफोडीचे गुन्हे करणारे गुन्हेगार शहरात वास्तव्य करीत आहे का, याचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अशा एका संशयित हद्दपार आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्याच्यावर हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हेगार पुन्हा भूमिगत झाला आहे. या गुन्हेगाराच्या शोधासाठी पथके नेमण्यात आली असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकारांना दिली.

\Bहॉटेल लॉजची तपासणी\B

सध्या सुरू असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहे. शहरातील रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार सध्या भूमिगत झाले आहेत. या गुन्ह्यांमागे बाहेरगावचे गुन्हेगार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील लॉज व हॉटेलची झाडाझडती घेत तेथे थांबणाऱ्या प्रवाशांची माहिती देखील मिळवण्याचे काम गुन्हे शाखेच्या वतीने सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा हा ऊर्जेचा स्रोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शालेय जीवनापासून कचरा ऊर्जेचे स्रोत ठरू शकतो, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे गरजेचे आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. परीक्षित सूर्यवंशी लिखित 'वेस्टपासून बेस्ट' या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात ही चर्चा झाली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने रचनात्मक कार्यात सक्रिय असलेले परीक्षित सूर्यवंशी यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी 'वेस्टपासून बेस्ट' या पुस्तिकेचे लेखन केले. एमजीएम सभागृहात शनिवारी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुशराव कदम, डॉ. श्रीरंग देशपांडे, सचिन मुळे, डॉ. दासू वैद्य, प्रा. अजित दळवी, शिव कदम, प्रा. मुस्तजिब खान, डॉ. भालचंद्र कानगो, नीलेश राऊत उपस्थित होते. विद्यार्थी कचऱ्याची समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याने घरात कचरा वर्गीकरण, कम्पोस्टिंग आणि रिसायकलिंग केल्यास बदल घडू शकतो असा संदेश पुस्तिकेत आहे. जिल्ह्यातील आठशे शाळेत पुस्तिका वितरित करण्यात आली. दरम्यान, अंकुशराव कदम यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे आणि डॉ. श्रीरंग देशपांडे यांनी वयाच्या एकसष्टीत पदार्पण केल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नीलेश राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सुबोध जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. अपर्णा कक्कड, सुहास तेंडुलकर, प्रा. त्रिशूल कुलकर्णी, दीपक जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागा १८ हजार; अर्ज ५६ हजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आयटीआय' प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली असून, विभागात १८ हजार १३९ जागांसाठी तब्बल ५५ हजार ९६० विद्यार्थी रांगेत आहेत. एकूण जागांचा विचार करता प्रत्येक जागेसाठी चार विद्यार्थी अशी स्थिती आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या अर्ज नोंदणीची मुदत सोमवारी संपली. अर्ज भरणे व निश्चिती प्रक्रियेसाठी ३० जून रोजी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती केली. मराठवाड्यातून ५५ हजार ९६० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे विविध ट्रेडला प्रवेश मिळावा यासाठी स्पर्धा वाढल्याने कट ऑफ वाढेल अशी माहिती विभागाचे सहसंचालक बी. आर. शिंपले यांनी दिली. राज्यभरात सव्वा लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी विविध ट्रेडला प्रवेश दिला जातो. तर, मराठवाड्यात ८१ शासकीय आणि ३० खासगी अशा 'आयटीआय'मध्ये अठरा हजार जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.

\Bऔरंगाबादला सर्वाधिक पसंती

\Bविभागात औरंगाबाद शासकीय 'आयटीआय'ला सर्वाधिक विद्यार्थ्यांची पसंती आहे. या 'आयटीआय'मध्ये २७ ट्रेडच्या १०१२ जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी तीन हजार ७९५ विद्यार्थी इच्छुक आहेत. मागील वर्षी हा आकडा तीन हजार २३० पर्यंत होता. विद्यार्थ्यांची संख्या चारशेने वाढली आहे. मराठवाड्यात खासगी पेक्षा शासकीय 'आयटीआय'ला विद्यार्थ्यांची पसंती आहे. यामध्ये औरंगाबाद 'आयटीआय'चा क्रमांक पहिला आहे.

'आयटीआय'मध्ये नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थी अधिक या अभ्यासक्रमांकडे वळतात. प्रात्यक्षिकांचा भाग मोठा असून शिकविण्याची पद्धतही तशा प्रकारे आहे.

- मिलिंद बनसोडे, प्राचार्य, शासकीय आयटीआय, औरंगाबाद

आयटीआयला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागातील अधिक आहे. अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या संधी अधिक असल्याने विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. यंदाही त्यात वाढ झाली आहे.

- चंद्रकांत परदेशी, विभागीय प्रवेश समन्वयक

---

संस्थांची आकडेवारी

---

जिल्हा..... आयटीआय...... प्रवेश क्षमता.....अर्ज

---

औरंगाबाद १७ २३९९ ९४७४

बीड २२ २९९१ ८०१०

हिंगोली ७ ८७९ ३२८१

जालना ११ १४७८ ३६३६

लातूर १३ २७५३ ९९५४

नांदेड २२ ३६९१ ९८७०

उस्मानाबाद १४ २१८२ ३८५१

परभणी १२ १८७२ ५१५७

---

गोळाबेरीज

---

एकूण आयटीआय..................११८

प्रवेश क्षमता.........................१८१३९

प्रवेश अर्ज निश्चिती................५५९६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सवेरा प्रमोटर्स’ला सव्वालाखाचा दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

छावणीच्या टोलनाक्यांवर अतिरिक्त शुल्क वसुली केली जात असल्याचे तपास पथकाने मारलेल्या धाडीत स्पष्ट झाल्यानंतर टोलनाक्यांचे कंत्राट असलेल्या 'सवेरा प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स'ला एक लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वेगवेगळ्या चार ठिकाणी मारण्यात आलेल्या धाडीमध्ये तीन-तीन पावत्या देण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात कंत्राटदाराला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे.

छावणी परिसरात सहा टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवर अतिरिक्त शुल्क वसुली होत असल्याच्या तक्रारी वारंवर येत आहेत. या संदर्भात छावणी परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही जोरदार चर्चा झाली होती. मागच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांनी असे प्रकार होत असल्याचे परिषदेच्या निदर्शनास आणून दिले होते व त्यावरूनही खडाजंगी झाली होती. तसेच काही संस्थांकडूनही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर परिषदेच्या मागच्या सभेत परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर डी. के. पात्रा यांनी सीईओंना थेट कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एक पावती देणे नियमानुसार अपेक्षित असताना सर्व सहा टोलनाक्यांवर तीन-तीन, चार-चार, पाच-पाच पावत्या दिल्या जातात. या अतिरिक्त शुल्क वसुलीविरोधात अनेक दिवसांपासून तक्रारी केल्या जात असल्या तरी त्याची योग्य ती दखल घेतली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईने छावणीवासियांना काहीअंशी दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले.

\Bसीईओंच्या कारवाईला विरोध?

\B

या प्रकरणात सीईओंनी केलेल्या कारवाईविरोधात परिषदेच्या काही आजी-माजी सदस्यांनी सोमवारी (२ जुलै) विरोध दर्शवल्याचे समजते. या कारवाईमुळेच सदस्यांनी परिषदेच्या कार्यालयात गोंधळ घालून सीईओंना जाब विचारल्याचे समजते. मुळात सीईओंना कारवाई करण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचेही समजते.

चार टोलनाक्यांवर अतिरिक्त शुल्क वसुली केली जात असल्याचे दिसून आले. प्रत्येक ठिकाणी तीन-तीन पावत्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कंत्राटदाराला एक लाख २० हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

- विजयकुमार नायर, सीईओ, छावणी परिषद

मुळात दंडात्मक कारवाईविषयी मला काहीच माहिती नाही. त्यामुळे त्या कारावाईला विरोध करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. इतरांनी कोणी विरोध केल्याचेही मला माहीत नाही.

- प्रशांत तारगे, उपाध्यक्ष, छावणी परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्यताशिवाय फायर एनओसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सक्षम प्राधिकरणाची मान्यता न घेताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ५६ प्रकरणात अग्निशमनची अंतिम एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) दिली आहे. त्रुटींची पूर्तता करण्यात केली आहे की नाही, याची खात्री न करता एनओसी देण्यात आल्या आहेत, असा ठपका लेखा परीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक विभागाने अग्निशमन विभागाचे २०१७-१८ या वर्षाचे लेखापरीक्षण केले. त्याचा अहवाल महापौर व स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य यांना सादर करण्यात आला. वैद्य यांनी त्याचे सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत वितरण केले. पुढील आठवड्यातील बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे.

लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे की, अंतिम एनओसी देण्यापूर्वी भोगवटाधारकास कागदपत्रांचे सादरीकरण करण्याचे आदेश पारीत करणे कार्यालयीन आवश्यक होते, पण तसे न करता एनओसी देण्यात आली. ही मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे, असा ठपका ठेवला आहे.

\Bवैधता तपासणे आवश्यक \B

फायर एनओसी देण्यासाठीची मे. फायस्टार्ड फायर सेफ्टी सोल्युशन्स या संस्थेची वैधता १५ फेब्रुवारी २०१७ रोजीच संपली आहे. त्यानंतरही या संस्थेने फायर एनओसी देणे गंभीर, नियमबाह्य आहे. ज्यांना फायर एनओसी दिली, त्या ठिकाणी जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अग्निशमन विभागाची राहील. या विभागाने अंतिम एनओसी देताना संबंधित एजन्सीच्या लायसन्सची वैधता तपासणे आवश्यक आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images