Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अमरनाथ यात्रेला भाविक रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दरवर्षीप्रमाणे १९९० पासून जाणारे औरंगाबाद जिल्हा तसेच आष्टी तालुक्यातील (जि. बीड) १२० भाविक मंगळवारी (३ जुलै) सचखंड एक्सप्रेसने अमरनाथ यात्रेला रवाना झाले. या भाविकांचा प्रवास अमृतसर, जम्मू, श्रीनगरमार्गे अमरनाथ गुफेकडे होणार आहे.

परतीच्या प्रवासात हे यात्रेकरू वैष्णोदेवी, शिवखोरीसह हिमाचल प्रदेशातील ज्वालादेवी, नयनादेवीसह पाच देवींची यात्रा करुन १६ जुलै रोजी परत येणार आहेत. या यात्रेकरुंसाठी दरवर्षी रोटरी क्लब सेंट्रल व लाठी फार्मा यांच्या वतीने आवश्यक औषधी साहित्य पुरवल्या जाते. एका छोटेखानी कार्यक्रमात ही औषधी देऊन यात्रेकरुंना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी यात्रा पासचे वितरण बँकेचे अधिकारी नागेश शर्मा व गोपाल सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. आष्टीच्या ग्रुपचे संचालक अरुण जिबकाटे व औरंगाबादच्या ग्रुपचे संचालक ताराचंद कहाटे यांच्याकडे पास देण्यात आले. यात्रेसाठी ग्रुपचे विजयकुमार बोथ्रे, अरविंद शेवाळे, सागर बनकर, विजय राजपूत आदी मंडळींनी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे प्रवीण पवार, सचिव भारत चोपडे, लाठी फार्माचे जयनारायण लाठी, बसवराज जिबकाटे, अरुण राव, सुनील कोतकर, डॉ. राजीव मुंदडा, नरेंद्र लड्डा, माजी जिल्हा माहिती अधिकारी सुधाकर भारती आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘समांतर’ चा आज होणार फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनीच्या कामाबद्दलचा फैसला बुधवारी (४ जुलै) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंटकडे शहरातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबादसाठीच्या समांतर जलवाहिनीचा 'पीपीपी' तत्वावरचा करार महापालिकेने रद्द केला. महापालिकेच्या या कारवाईविरोधात जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याशिवाय लवादाच्या समोर देखील या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. जलवाहिनीच्या बद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटावे यासाठी कंपनी, राज्य सरकार आणि महापालिका तसेच काही राजकीय नेते सक्रिय झाले होते. या सर्वांच्या मिळून दोनवेळा बैठका झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण परस्पर सामंजस्याने मिटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी राज्य सरकार व कंपनी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर करण्याची शक्यता आहे. या सेटलमेंटकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास कंपनीने प्रथम जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीचे काम करावे. संपूर्ण काम होईपर्यंत पाणीपट्टीत वाढ करू नये, समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाची वाढीव किंमत व जीएसटीची रक्कम असे एकूण ३७६ कोटी रुपये शासनाने द्यावेत अशा अटी महापालिकेतर्फे घालण्यात आल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एशियन सिटीकेअर हॉस्पीटलचे प्रमाणपत्र चोरीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

उस्मानपुरा येथील एशियन सिटीकेअर हॉस्पिटलचे प्रमाणपत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार एक जानेवारी २०१८ ते एक मे २०१८ या कालावधीत हॉस्पिटलच्या आवारात हा प्रकार घडला. महापालिकेच्यावतीने बाँबे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार हे प्रमाणपत्र हॉस्पिटलला मिळाले होते. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. योगेश बळीराम वरंगटवार (वय ४९ रा. उस्मानपुरा) यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार सिटी केअर सुपर स्पेशिलीटी हॉस्पिटल २००८ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी पालिकेकडून या नावाने प्रमाणपत्र घेतले होते. हे प्रमाणपत्र त्यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या केबीनशेजारी डिसप्ले बोर्डवर लावले होते. दरम्यान २०१५ मध्ये सिटी केअर हॉस्पिटलचा मे. विघ्नहर्ता हेल्थ प्रा. लि. कंपनीसोबत लिव्ह अँड लायसन्सचा करार झाला होता. यामध्ये डॉ. वरंगटवार संचालक होते. यानंतर हॉस्पिटलचे नाव बदलून एशियन सिटीकेअर सुपर स्पेश्लिटी, असे करण्यात आले. यासाठी डॉ. वरंगटवार यांच्या नावाचेच प्रमाणपत्र वापरण्यात आले. यावेळी डॉ. वरंगटवार यांच्यासमवेत शहरातील काही डॉक्टरांचा समावेश होता. दरम्यान, काही दिवसापूर्वी डॉ. वरंगटवार सोबत असलेले काही डॉक्टर एशियन हॉस्पिटल नावाने मोतीवाला कॉम्पलेक्स येथे नवीन दवाखाना उघडणार असल्याची माहिती डॉ. वरंगटवार यांना मिळाली. त्यामुळे वैयक्तिक नवीन हॉस्पिटल उघडण्यासाठी डॉ. वरगंटवार यांनी कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली. यावेळी डिस्प्लेमध्ये लावलेले त्यांच्या नावाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यांनी पालिकेकडे माहिती अधिकाराखाली कागदपत्रे मागितली. यावेळी त्यांच्या नावाचे प्रमाणपत्र रद्द करून ते डॉ. हाश्मीच्या नावाने देण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी डॉ. वरंगटवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅटोमोबाइलचे गोदाम फोडून ऐवज लांबवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अॅटोमोबाइलचे गोदाम फोडून चोरांनी लोखंडी पाटे व वॉसिंग सेंटर मशीन असा सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी शनिवार ते सोमवारच्या दरम्यान झाल्टा शिवारात झाली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गोरखनाथ हरिभाऊ डिघोळे (वय २६, रा. भालगाव ता. औरंगाबाद) यांचे झाल्टा शिवारात रामकृष्णहरी अॅटोमोबाइल नावाने दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागे माल ठेवण्यासाठी गोदाम आहे. शनिवारी रात्री दुकान व गोदाम बंद करून डिघोळे घरी गेले होते. रविवारी सुटी असल्याने त्यांनी सोमवारी सकाळी दुकान उघडले. यावेळी गोदामाच्या शटरचे कोंडे तुटलेले दिसले. आत जाऊन पाहणी केली असता त्यांना वाहनांच्या लोखंडी पाट्याचे २०५ नग व वॉसिंग सेंटर मशीन, इलेक्ट्रॉनिक मोटार, असा सव्वादोन लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले. या प्रकरणी डिघोळे यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेखाचित्रावरून लुटारुंना २४ तासांत अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिद्धार्थ उद्यानात तरुणाला लुबाडण्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने रेखाचित्र तयार करून अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना गजाआड केले आहे. याप्रकरणातील कुख्यात गुन्हेगार पसार झाला आहे.

ज्ञानेश्वर दिगंबर पितळे (वय २६ रा. नवजीवन हॉस्पिटल, पैठणगेट) हा तरूण शनिवारी सायंकाळी मित्रासह सिद्धार्थ उद्यानात गेला होता. यावेळी तीन आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत मोबाइल व चांदीची साखळी असा २३ हजारांचा ऐवज लुबाडून ते उद्यानामागील भिंतीवरून उड्या मारून पळून गेले होते. गुन्हे शोध पथकाने पितळे व त्याच्या मित्रांनी सांगितलेल्या वर्णनानुसार रेखाचित्र तयार केले. या रेखाचित्रानुसार कुख्यात गुन्हेगार छोटा बोक्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. तसेच एका रेखाचित्रामध्ये पडेगाव येथील शेख समीर सारखा आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे पोलिसांनी शेख समीर (रा. प्रियदर्शनी कॉलनी, पडेगाव) तसेच त्याने दिलेल्या माहितीवरून सय्यद सोहेल सय्यद ऐजाज व अरबाजखान यांना अटक केली. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पसार आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. जी. पवार, राजेश फिरंगे, राजेश चव्हाण, सतीश जाधव, अजीज खान, संतोष रेड्डी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेवर बलात्कार; आरोपीस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करणारा आरोपी शेख निसार शेख गफार याला सोमवारी (२ जुलै) अटक करून मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, त्याला शुक्रवारपर्यंत (६ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

शहरातील २१ वर्षीय विवाहिता ही आठवडी बाजारात जात असताना तिचे आरोपी शेख निसार शेख गफार याने २८ जून २०१८ रोजी तिच्या मुलासह अपहरण केले आणि विवाहितेस बुलढाणा येथे नेऊन मुलास जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची तक्रार विवाहितेने दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात शेख निसार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला सोमवारी अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, विवाहितेची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे. घटनास्थळ बुलढाणा येथे असल्यामुळे तिथे जाऊन पंचनामा करावयाचा आहे, तसेच अपहरण करण्यासाठी कोणी मदत केली का, याचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवाड यांनी केली. ही विनंती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांच्या पीएचे वाहन उचलणारे निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आमदार अतुल सावे यांच्या स्वीय सहायकाचे वाहन उचलणाऱ्या वाहतूक शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. हा प्रकार सोमवारी पुंडलिकनगर भागात घडला होता. याप्रकरणी आमदार सावे यांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाऊन कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईनंतर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यात नाराजी पसरली आहे.

सिडको वाहतूक शाखेचे जमादार शेख रज्जाक व निहालसिंग ठाकूर यांनी सोमवारी पुंडलिकनगर भागात वाहने उचलण्याची कारवाई केली होती. यामध्ये आमदार सावे यांच्या स्वीय सहायकाची तसेच नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्या दुचाकीचा देखील समावेश होता. ही वाहने उचलण्यावरून कार्यकर्ते व पोलिसात वाद झाला होता. यावेळी पोलिसांनी आमदार सावे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वाक्य उचारल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर आमदार सावे यांनी एन ९, रेणुकामाता मंदिराजवळील वाहतूक शाखेचे कार्यालय गाठले होते. संतप्त कार्यकर्त्यांनी दोषी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी जमादार शेख रज्जाक व ठाकूर यांना निलंबित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी अखेर फेरनिविदा निघाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिका प्रशासनाने दीडशे कोटींच्या रस्त्यांसाठी अखेर मंगळवारी फेरनिविदा काढली. त्यामुळे एक वर्षापासून खोळंबलेली रस्त्यांची कामे लवकरच सुरू होतील, असे मानले जात आहे. बचतीच्या पैशातून साइड ड्रेन आणि फूटपाथची कामे केली जाणार आहे. संबंधित कंत्राटदाराला १५ ऑगस्टपर्यंत कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) दिले जातील.

औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने २७ जून २०१७ रोजी शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले. त्याशिवाय महापालिकेने ५० कोटी रुपये किंमतीच्या डिफर्ड पेमेंटच्या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकूण दीडशे कोटी रुपये किंमतीची रस्त्यांची कामे होतील, असे जाहीर करण्यात आले. त्याच्या निविदा देखील काढण्यात आल्या. निविदा प्रक्रियेला काही कंत्राटदारांनी कोर्टात आव्हान दिले. रस्त्यांची यादी तयार करून त्याची निविदा काढणे याला सुमारे आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटला. दरम्यानच्या काळात जिल्हा दरसूची व राज्य दरसूचीच्या किंमती घसरल्या. नवीन किंमतीनुसार काम करणे महापालिकेला बंधनकारक आहे, असा मुद्दा माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी मांडला आणि फेरनिविदा काढण्याची मागणी केली. तुपे यांच्या सूचनेला महापौर नंदकुमार घोडेले यांनीही समर्थन दिले व फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार एक महिन्यापासून पालिकेचे प्रशासन फेरनिविदा काढण्यावर काम करीत होते, अखेर मंगळवारी (तीन जुलै) फेरनिविदा काढण्यात आली. निवीदा दाखल करण्याची सात ऑगस्ट ही शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे. याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निविदा उघडल्या जातील. त्यानंतर त्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवल्या जातील. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर १५ ऑगस्टच्या सुमारास संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुलगुरू पुन्हा गोत्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अधिकारांचा सर्वाधिक दुरुपयोग केला. अधिसभा निवडणुकीत एका गटाच्या समर्थकासारखे वागले. डॉ. जे. एफ. पाटील समिती कुलगुरुंची चौकशी करीत आहे. विद्यापीठाच्या १४ प्रभारी अधिकाऱ्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पावसाळी अधिवेशनात करणार आहे,' असे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. विद्यापीठाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे आमदार इम्तियाज जलील यांनीही सांगितले. दोन आमदारांनी प्रश्न उचलल्यामुळे कुलगुरू चोपडे पुन्हा अडचणीत सापडले आहेत.

विद्यापीठ अधिसभा निवडणूक, नियमबाह्य नियुक्त्या, आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यांवर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सतीश चव्हाण यांनी आवाज उठवल्यानंतर पाटील समिती स्थापन करण्यात आली. मात्र, चौकशी सुरू असल्यामुळे चोपडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातही आमदार सतीश चव्हाण प्रस्ताव मांडणार आहेत. राज्यातील नऊ विद्यापीठे कायद्याचा एक अर्थ काढतात आणि चोपडे वेगळा अर्थ काढतात. हा प्रकार कसा होऊ शकतो ? अधिसभा निवडणुकीत चोपडे एका गटाच्या समर्थकासारखे वागले. विद्या परिषदेत ब्लॅकमेलर आणून बसवले. विद्यापीठाला ५० वर्षे मागे नेणाऱ्या कुलगुरुंना त्वरित रजेवर पाठवण्याची मागणी करू, असे चव्हाण यांनी सांगितले. चोपडे यांना चांडाळ चौकशीने घेरले आहे. नियमबाह्य कामाचे लाभार्थीच कुलगुरुंच्या समर्थनासाठी मोर्चे काढतात. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान, 'एमआयएम' पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी मंगळवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेतली. विद्यापीठाचे प्रशासकीय आणि शैक्षणिक प्रश्न जाणून घेतले. विद्यार्थ्यांशी चर्चा करून काही प्रश्न समजून घेतले. अधिवेशनापूर्वी वेगवेगळ्या विभागाला भेट देत असतो. विद्यापीठाचे प्रश्न अधिवेशनात मांडणार आहे, असे जलील यांनी सांगितले.

\Bप्रभारी अधिकाऱ्यांची चौकशी\B

विद्यापीठातील १४ प्रभारी अधिकाऱ्यांचे कामकाज संशयास्पद असून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे पुरावे आहेत. या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी करणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. भारतातील हे पहिले विद्यापीठ आहे, जिथे येण्यास कुणीही तयार नाही अशी टीका त्यांनी केली. प्रभारी अधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रिक्त जागा त्वरित भरा यासह अन्य मागण्यांसाठी टपाल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी येथील मुख्य कार्यालयासमोर समोर तीव्र निदर्शने केली.

अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेने येत्या २० जुलैपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे विभागीय अध्यक्ष सय्यद रियाज, सचिव देवेंद्र परदेशी, कार्याध्यक्ष मोतीलाल चुंगडे, सुनील जैन, दिलीप कुलकर्णी, एस. आर. सुरडकर, प्रदीप अवचार, ए. एन. साळवे, डी. एस. वाघ आदी उपस्थित होते. पोस्टमन व एमएटीएस प्रवर्गातील रिक्त जागा थेट भरतीद्वारे भरा, अनुकंप तत्वावरील तसेच खेडाळू कोट्यातील रिक्त जागा भरा, ई कॉमर्सची नोडल डिलेवरीमार्फतची वितरण पद्धत त्वरित बंद करा, आउटसोर्सिंग पोस्टल एजंट पद्धत त्वरित बंद करा, रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनात सुधारणा करून त्यांना अर्धवेळ कंत्राटी कामगाराचा दर्जा द्या यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांडगाव खूनप्रकरणी आणखी चौघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

चांडगाव येथील जमावाकडून चोर समजून झालेल्या मारहाणीत दोघांचा खून झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी आणखी चौघांना बेड्या ठोकल्या. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या तेरा झाली आहे.

पोलिसांनी मंगळवारी गोविंद आबासाहेब राहणे (वय २९), प्रमोद उत्तमराव गायकवाड (वय ४२), नानासाहेब उत्तमराव गायकवाड (वय ५३) व राजेंद्र कारभारी बावचे (वय ४०, सर्व रा. चांडगाव) यांना अटक केली. त्यांना लवकरच येथील सत्र न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. तालुक्यातील चांडगाव पानव शिवारात चोर समजून जमावाने आठ जणांच्या टोळीला जबर मारहाण केल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. या घटनेत औरंगाबाद येथील दोघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी जवळपास ४०० जणांविरुद्व खून व दंगलीचा गुन्हा नोंदवला आहे.

\Bपुन्हा अटकसत्र \B

याप्रकरणात सुरुवातीला नऊ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी हर्सूल येथील कारागृहात करण्यात आली. त्यांना जामीन मिळाला आहे. अन्य आरोपी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन चौघांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैरे यांनी पिठाची गिरणी चालवून दाखवावी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'हिंदुत्वाचा फुलोरा फुलवून खासदार चंद्रकांत खैरे निवडून येतात. हिंदुत्वाच्या चार वाक्यांशिवाय ते दुसरे काही बोलत नाहीत. मतदारसंघात सुधारलेले एक गाव किंवा वॉर्ड खैरे यांनी दाखवावा. हिंदुत्वाने लोकांचे पोट भरत असल्यामुळे विकासाचा मुद्दाच नसतो. २० वर्षांत मतदारसंघात राष्ट्रीय दर्जाची एकही संस्था खैरे आणू शकले नाही. किमान त्यांनी पिठाची एक गिरणी तरी चालवून दाखवावी,' अशी टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नागपूर येथे बुधवारी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत संवाद साधला. वैद्यकीय प्रवेश, उच्च शिक्षणातील रिक्त पदे, विद्यापीठाचा गैरव्यवहार, कृष्णा खोरे पाणीप्रश्न, क्रीडा संकुल, आयपीएस प्रशिक्षण केंद्र, सिंचन योजना, उद्योगांच्या अडचणी, औरंगाबादचा कचरा या मुद्द्यांवर सभागृहात आवाज उठवणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी तारांकित प्रश्नांची सविस्तर माहिती दिली. 'औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न गंभीर झाला आहे. रस्ते कामासाठी आणि कचरा निर्मूलनासाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये असूनही महापौर निष्क्रिय आहेत. अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे काम रखडले असून ते फक्त व्याज खात आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांनी कचरा प्रश्नावरुन नगरसेवकाला घेराव घातला. या चिघळलेल्या परिस्थितीवर आवाज उठवणार आहे' असे चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस सलग चार वेळेस पराभूत झाल्यामुळे वरिष्ठ पातळीवर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याची चर्चा सुरू आहे. प्रश्नांवर मौन बाळगणारे खासदार खैरे यांनी जिल्ह्यात काहीच केले नाही. पेट्रोलियम विभागाच्या समितीत असून पेट्रोल दरवाढीवर बोलले नाही. शेती प्रश्नावर बोलत नाहीत. आई तुळजाभवानी, माननीय बाळासाहेब, उद्धवजी आणि आदित्यजी एवढेच चार शब्द ते बोलतात. हिंदुच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगतात, पण लोकप्रतिनिधी कुणा एका समाजाचा नसतो,' अशी टीका चव्हाण यांनी केली.

भाजप सरकारने ग्रामीण भागाला वाऱ्यावर सोडले. शहरातील गर्दीच्या अस्वस्थतेचा फायदा घेत भाजप सोशल मीडियाच्या बळावर सत्तेत आले. मात्र, २०१९ मध्ये सत्तांतर होईल' असा दावा चव्हाण यांनी केला. मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर विधान परिषदेत आवाज उठवणार आहे. सरकार आश्वासन पूर्ण करू शकले नसल्याने मंत्री महादेव जानकर यांच्यावर तोंड लपून फिरण्याची वेळ आली अशी टीका चव्हाण यांनी केली.

मराठवाड्यावर अन्याय

२०१४ मध्ये औरंगाबाद येथील प्रस्तावित आयआयएम संस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला पळवली. त्यानंतर मराठवाड्याला 'एसपीए' संस्था देण्याची घोषणा केली. चार वर्षांनंतरही हालचाल केली नाही. मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे लिहूनही उत्तर मिळाले नाही. केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारला संस्था उभारण्याची सूचना मिळाली. तरीसुद्धा मराठवाड्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संताजी गृहनिर्माण संस्थेत मिटकर पॅनल विजयी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कांचनवाडी येथील संताजी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष जे. यू. मिटकर यांचे पॅनल विजयी झाले.

मिटकर यांच्या नेतृत्त्वाखालील संताजी पॅनलमधून कैलास सिदलंबे, दीपक राऊत, कचरादास राऊत, मनोज संतान्से, राजेश शिंदे, दत्तात्रय सर्जे, सचिन वाळके हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून रामदास हिंगे तर महिला प्रवर्गातून अनसूया चौधरी, सविता भोलाने या निवडून आल्या. अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातून कल्पना रामटेके तर भटक्या व विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून हरिश्चंद्र राठोड यांची बिनविरोध निवड झाली. कांचनवाडी येथील तेली समाज मंडळाच्या सभागृहात ही निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून आर. एन. यावलकर यांनी काम पाहिले. सहाय्यक म्हणून सचिन जाधव यांनी भूमिका बजावली. निकालानंतर जे. यू. मिटकर व निवडून आलेल्या संचालकांचे सभासदांनी अभिनंदन केले. या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा तेली समाज मंडळाचे अध्यक्ष बी. टी. शिंदे, एस. के. चौधरी, प्रकाश सिदलंबे, वाल्मिक लोखंडे, सुभाष सोनवणे, अशोक मिटकर, भारत कसबेकर, नानासाहेब खंडागळे, ज्ञानेश्वर रोकडे, हनुमंत गायकवाड, डॉ. शिंदे, विष्णू सिदलंबे, अशोक चौधरी, विजय काळे, योगिता काळे, स्वाती भागवत, संगीता शिंदे, संगीता दळवी, राहुल भागवत, निखिल मिटकर, व्ही. डी. चौधरी, आर. जी. भोलाने, जगन्नाथ हिंगणे, सुभाष मिसाळ, सुनील लोखंडे, योगेश वाघ, लक्ष्मण राऊत, सुभाष थोरात, राजेंद्र घोंगते आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा बारकोड स्टिकरचे आजपासून वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

बारकोड स्टिकर लावण्यावरून रिक्षाचालक आणि आरटीओ विभागात सुरू असलेला वाद बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्या उपस्थितीत सोडवण्यात आला. त्यामुळे स्टिकर वाटपाला गुरुवारपासून (४ जुलै) करोडी येथे फिटनेस चाचणी देण्यासाठी येणाऱ्या रिक्षांपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार रिक्षा किंवा टॅक्सीतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण माहिती असलेले बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार आरटीओ कार्यालयाने रिक्षांची माहिती देणारे स्टिकर तयार केले आहेत. ते एक जुलैपासून वाटप करण्यात येणार होते. पण, स्टिकर लावण्यास रिक्षा संघटनेने विरोध केल्याने वाटप रखडले होते. त्यावर बुधवारी झालेल्या विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकाच जागी स्टिकर लावण्याचे मान्य करण्यात आले. रिक्षाचालकाच्या सिटमागील गजाला पाटी वेल्डिंग करून त्यावर स्टिकर लावण्यास संघटनांनी मान्यता दिली. या बैठकीला निसार अहेमद खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

\B………अर्जाचे आवाहन

बारकोड स्टिकरसाठी \Bरिक्षा परमिटधारक व चालकांची माहिती, फोटोसह आरटीओ कार्यालयात अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन दिवसात ७२ लाख रोपांची लागवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हिरवागार मराठवाड्याचे स्वप्न उराशी बाळगून महा वृक्षलागवड अभियानाअंतर्गत गेल्या तीन दिवसांत ७२ लाख २६ हजारच्यावर रोपांची लागवड करण्यात आली आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्के असून, पावसाचा काही भागात खंड पडल्याने वृक्षारोपण लांबणीवर पडले आहे. यात सर्वाधित वृक्षारोपण नांदेड जिल्ह्यात ५५ टक्के झाले असून, जालन्यात दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेते केवळ पाच टक्के वृक्षारोपण झाले आहे.

मराठवाड्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन क्षेत्राचे प्रमाण तुलनेते कमी आहे. त्यामुळे वन क्षेत्रात कशी वाढ होईल, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. यंदा पावसाळ्यात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड केली जात आहे. यात मराठवाड्यासाठी दोन कोटी ९१ लाख ७४ हजार वक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत, इतर यंत्रणांच्या माध्यमातून एक जुलैपासून हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून, ३१ जुलै दरम्यान वृक्ष लागवड केली जाणार आहे. गेल्या तीन दिवसांत ७२ लाख २६ हजार २५५ रोपांची लागवड करण्यात आली आहे. मराठवाड्यासाठी दोन कोटी ९१ लाख ७४ हजार वक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून त्या तुलनेते आतापर्यंत २५ टक्के उदिष्ट गाठण्यात यश आले आहे. वृक्षारोपणात सुमारे तीन लाख कर्मचारी, वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

\Bसवलतीच्या दरात रोप

\Bवन महोत्सवाचा काळात लोकांना वृक्ष लागवडीसाठी उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनमार्फत प्रयत्न केले जात असून, वृक्ष लागवडीसाठी त्यांना सवलतीच्या दरात रोप देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यात नऊ महिन्याचे रोप आठ रुपये तर १८ महिन्याचे रोप ४० रुपये दराने शेतकरी, वृक्ष प्रेमींना दिली जात आहेत. खासगी मालकीचे पडीक क्षेत्र, शेत बांधर, रेल्वेच्या दुतर्फा, कालवा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक पडीक क्षेत्र, गायरान आदी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लावगड व्हावी, त्यांचे जतन व संवर्धन केले जावे, असा वन विभागाचा प्रयत्न आहे.

\Bजिल्हानिहाय वृक्षारोपण\B

- नांदेड - ३३ लाख १७ हजार ८३७

- लातूर - ११ लाख १५ हजार ८२९

- बीड - ८ लाख ९१ हजार ६५

- उस्मानबाद - ५ लाख ८६ हजार १०३

- औरंगाबाद - ४ लाख ६४ हजार ११८

- हिंगोली - ३ लाख ३७ हजार ६३९

- परभणी - ३ लाख ३६ हजार ५१६

- जालना - १ लाख ७७ हजार १४८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऐतिहासिक तटबंदीची मोडतोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद

एकीकडे ऐतिहासिक वारसा जपला जात असतांना खुलताबाद शहरात ऐतिहासिक वारसा नष्ट केला जात आहे. नगरसेवकांनी पदाचा गैरवापर करून विकासकामांच्या बाबतीत मनमानी सुरू केली आहे. गट नंबर १४४ मधील वक्फ बोर्डाच्या जागेतील ऐतिहासिक तटबंदी तोडून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यासह चार नगरसेवकांना नोटीस बजावली आहे.

नगरपालिकेच्या ७ मार्च २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा नगरोत्थान अंतर्गत ठराव घेऊन वार्ड क्रमांक चार गट नंबर १४४ मध्ये विकासकामे करण्याचा ठराव घेण्यात आला. ही मालमत्ता वक्फ बोर्डाची असतांना नगर परिषदेने २२ लाख रुपये खर्च करून सिमेंट रस्ता व नाली बांधकाम केले आहे. या कामासाठी ऐतिहासिक तटबंदीची तोडफोड करण्यात आली. याबाबत इकबाल पटेल यांनी चार नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन गट नंबर १४४ वक्फ बोर्डाच्या जागेत ऐतिहासिक तटबंदी तोडून सिमेंट व रस्ता नाली बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाय या बाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनात प्राप्त झाल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अयाज मिर्झा बेग, शेख अब्दुल हाफिज अब्दुल रशीद, शेख मुनीबोद्दीन यांना नोटीस बजावल्याने शहरासह पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कामाबाबतच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. इकबाल पटेल यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांनी नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

\Bदहा जुलै रोजी हजर व्हा \B

मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक अयाज मिर्झा बेग, शेख अब्दुल हाफिज अब्दुल रशीद, शेख मुनीबोद्दीन यांना १० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीस उपस्थितीत राहून म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विक्रम दराडे, पंकज पाटील पालिकेचे सहाय्यक आयुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी शासनाने पंकज पाटील आणि विक्रम दराडे यांची बदली केली आहे. या दोघांनाही तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेत शासनातर्फे प्रतिनियुक्तीवरच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या पदांवर अधिकारी द्या, अशी मागणी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी केली होती. आयुक्तांची मागणी मान्य करीत शासनाने उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांची महापालिकेत उपायुक्तपदावर बदली केली. गेल्या आठवड्यात त्या रुजू झाल्या. त्यानंतर बुधवारी सहाय्यक आयुक्तपदावर दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करणारे पंकज पाटील आणि नगर महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम करणारे विक्रम दराडे यांची औरंगाबाद महापालिकेत बदली करण्यात आली आहे. या दोघांनीही तत्काळ रुजू व्हावे असे शासनाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी ५-७

$
0
0

- अभिनय कार्यशाळा.

स्थळः ललित कला भुवन, उस्मानपुरा

वेळः दुपारी ४

- 'महात्मा गांधी व वर्तमान'वर परिसंवाद.

स्थळः महात्मा गांधी भवन, समर्थनगर

वेळः दुपारी ४.३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेक क्लोन करून गुजरातेतही फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चेक क्लोन करून बँकाना गंडा घालणाऱ्या टोळीने गुजरात राज्यात देखील बँकेची चार कोटींची फसवणूक केली होती. गुजरात पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना फेब्रुवारी महिन्यात अटक देखील केली होती. दरम्यान, गुन्हे शाखेने पकडलेल्या टोळीने शहरातील आणखी पाच बँकाना गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र या बँका बदनामीच्या भीतीने तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिली.

बनावट कागदपत्रे तयार करून गारखेडा परिसरातील टीजेएसबी बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात गुन्हे शाखेने हरीश गोविंद गुंजाळ (रा. मानगांव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) मनीषकुमार जयराम मोर्य उर्फ राकेश उर्फ मनीष यादव उर्फ अमित रमेश सिंग (रा. उत्तरप्रदेश), मंदीपसिंग बनारसीदाससिंग (रा. गुरूदासपूर, पंजाब) डब्ल्यू. शेख अरमान शेख (रा. कमलसागर, पश्चिम बंगाल) रशीद इम्तियाज खान (रा. नालासोपारा, पालघर) आणि इसरार खान गुलाम गौस (मूळ रा. वाराणसी ह. मु. नालासोपारा, मुंबई) यांना अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, या टोळीतील काही आरोपींनी गुजरात राज्यात देखील बँकेची फसवणूक केली आहे. टी. पी. नगर भागातील इंड्रसन बँकेत आदेश ट्रेडिंग कंपनीच्या नावाने क्लोन केलेला चेक वटवून चार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सहारणपूर पोलिसांनी १६ फेब्रुवारीला मुंबई पालघर येथून चार आरोपींना तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या बँकेच्या एका अधिकाऱ्याला अटक केली होती. गुन्हे शाखेने पकडलेल्या टोळीने शहरातील आणखी पाच बँकाना गंडा घातला आहे. इंडियन ओव्हरसिज व सिंडीकेट बँकाना संशय आल्याने त्यांनी चेक वटवले नसल्याने त्यांची फसवणूक टळली. ही टोळी मोठी असल्याची शक्यता यावेळी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ते प्रमाणपत्र विघ्नहर्ता हेल्थ कंपनीचे असल्याचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एशिएन सिटीकेअर हॉस्पिटलच्या चोरीस गेलेल्या प्रमाणपत्रावरून सध्या वाद सुरू आहे. हे चर्चेत असलेले प्रमाणपत्र डॉ. योगेश वरंगटवार यांची मालमत्ता नसून विघ्नहर्ता हेल्थ व्हिजनरी कंपनीचे आहे. कंपनीने ही जागा रजिस्टर्ड भाडेकराराने सिटीकेअरकडून एशिएन सिटीकेअर हे हॉस्पिटल चालवण्यासाठी घेतल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात मनपाने दिलेले प्रमाणपत्र विघ्नहर्ता कंपनीची मालमत्ता असून मनपाच्या आरोग्य विभागात ते संचिकेत उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या संदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून जी मालमत्ता डॉ. वरंगटवार यांची नाही, ते तक्रार कशी करू शकतात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ३० सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरसोबत एशियन सिटीकेअर हॉस्पिटल हे नवीन जागी स्थलांतरित होत आहे. दर महिन्याला येणारे भाडे बुडणार व कोणताही सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर सोबत राहणार नसल्याने नैराश्यापोटी डॉ. वरंगटवार यांनी खोटे आरोप केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. डॉ. वरंगटवार यांनी खोटी तक्रार करून पोलिस यंत्रणा व प्रसारमाध्यमांची दिशाभूल केली आहे. या तक्रारी विरूद्ध मानहानीचा दावा करण्याचा विचार विघ्नहर्ता हेल्थ व्हिजनरी कंपनीचे संचालक मंडळ करीत असल्याचे देखील या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images