Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

'जीटीएल'ने पुन्हा नखे बाहेर काढली

$
0
0
‘ज्या भागात ग्राहक वेळेवर बिले भरतील, त्याच भागात तक्रार निवारण केंद्र उघडले जातील,’ असे मग्रुर उत्तर ‘जीटीएल उर्जा’चे स्थानिक प्रमुख जगदीश चेलारामाणी यांनी दिले आहे. ‘वीज बिलांचा विषयही सार्वत्रिक न करता वैयक्तिक तक्रारी कराव्यात,’ असे उद्दामपणे म्हणत महापालिकेसह सगळ्यांनीच वेळेवर पैसे भरावेत, असा दम त्यांनी भरला.

रस्त्याच्या मध्यभागी खांब; कंत्राटदार म्हणतो अजून थांब

$
0
0
‘विजेचे खांब हलवणे वाटते तेवेढे सोपे काम नसते. त्यात अनेक तांत्रिक अडचणी असतात. त्यामुळे नागरिकांनी थोडा संयम पाळावा,’ असा उपदेश महापालिकेचे वीज कंत्राटदार एन. बी. कुलकर्णी यांनी दिला आहे.

'एनआरएचएम'च्या भरतीत गोंधळ

$
0
0
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेंतर्गत (एनआरएचएम) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात महिला आरोग्य सेवक (एलएचव्ही) पदासाठी कंत्राटी पद्धतीने करावयाच्या भरती प्रक्रियेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. अर्हता नसताना सामावून घेण्याची मागणी उमेदवारांनी प्रशासनासमोर केली.

मनातलं चांदणं

$
0
0
प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा बुधववारी (२५ डिसेंबर) ७५वा वाढदिवस. वैजापूर येथे बोराडे सर प्राचार्य होते. त्यावेळी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी आशा काळे यांनी दिलेला आठवणींना पत्ररूप उजाळा...

जुन्या वादातून महिलेवर चाकूहल्ला

$
0
0
जुन्या वादातून महिलेला व तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार रविवारी रात्री राजनगर, मुकुंदवाडी भागात घडला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेडपी शिक्षकांची मनमानी थांबवा

$
0
0
बिडकीन परिसरातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांकडून नियम डावलून कामे होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या खेळ थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सर्वपक्षीय विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.

९९ लाख रुपयांचा दंड, २५ लाख रॉयल्टी वसूल

$
0
0
औरंगाबाद तालुक्यातील स्टोन क्रशर, खदानधारकांनी उत्थननाची रॉयल्टी व दंडापोटी मिळून सुमारे सव्वा कोटी रुपये तहसील प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाने दगडाच्या उत्थननासाठी एका महिन्याचे तात्पुरते परवाने देण्यास सुरुवात केली आहे.

‘जीवनदायी’ कार्डांचे पोस्टाद्वारे वाटप

$
0
0
दारिद्र्य रेषेखालील लोकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी शासनाने राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात केली आहे. ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पोस्टाची मदत घेण्यात येणार असून आगामी काळात पोस्टातून जीवनदायी योजनेचे कार्ड दिले जाणार आहे.

औरंगाबाद-कन्नड बस सर्व स्टॉपवर थांबणार

$
0
0
औरंगाबाद ते सिल्लोड मार्गावर सर्व थांब्यांवर थांबणाऱ्या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता असाच प्रयोग कन्नड मार्गावरही सुरू केला जाणार आहे. येत्या पंधरा दिवसात ही बस सुरू होईल.

महिला कामगार संघटनेचा धडक मोर्चा

$
0
0
घरेलू महिला कामगारांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र शहा छप्परबंद महिला कामगार संघटनेने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

NOC च्या फायली अखेर निकाली निघू लागल्या

$
0
0
एलबीटीच्या एनओसीसाठी दाखल केलेल्या फाईल निकाली काढण्यासाठी लुटमार सुरू असल्याचे वृत्त ‘मटा’ ने प्रसिद्ध केल्यावर कालपासून (सोमवार) या फाईल निकाली काढण्यास सुरूवात झाली आहे.

२ चिमुरड्यांचा विहिरीत फेकून खून

$
0
0
दोन चिमुरड्या बहिण-भावांचे अपहरण करून त्यांची विहिरीत फेकून हत्या केल्याची घटना सेवली येथे घडली. या घटनेची माहिती आशी की, २३ डिसेंबर रोजी गयाबाई भगवान तळेकर (वय २८) या गावात कीर्तनासाठी मंदिरात गेल्या होत्या.

अत्याचार प्रकरणातील संवेदनशील गावे शोधणार

$
0
0
मागासवर्गीयांवर अत्याचाराची प्रकरणे जास्त घडत असलेला संवेदनशील गावांची यादी तयार करून सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा स्वरुपाची गावातील भांडणे मिटविण्यासाठीच्या उपाययोजनाही सुचविण्यात येणार आहेत.

अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला सशर्त परवानगी

$
0
0
गरवारे स्टे‌डियम वर २ ते ५ जानेवारी दरम्यान अॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पो प्रदर्शनाला सशर्त परवानगी देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद बोर्डे व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत. तसेच मंगळवारी डॉ. रूचिता बैनाडे यांच्या विवाह सोहळ्यास परवानगी देण्यात आली.

अभिप्रायामुळे अधिकारीही अडचणीत

$
0
0
बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र मिळावे, यासाठी दाखल करण्यात आलेल्या फायलींवर उपायुक्तांनी मोठमोठे अभिप्राय नोंदवल्यामुळे नागरिकांसह पालिकेचे अधिकारीही अडचणीस सापडले आहेत.

बीडमधून सुनील केंद्रेकरांना लोकसभेसाठी ‘आप’ची गळ

$
0
0
चांगली माणसे राजकारणात आली पाहिजेत. सर्वसामान्य माणूस राजकारणात आल्याशिवाय राजकारणातील कुप्रवृत्ती संपणार नाहीत. त्यामुळे आम आदमी पक्ष बीडचे गाजलेले जिल्हाधिकारी आणि सध्या सिडकोचे प्रशासक सुनील केंद्रेकर यांना बीडमधून लोकसभा निवडणूक लढवन्यासाठी गळ घालणार असल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

अनुभवी कुस्तीपटूंना विद्यापीठ संघातून वगळले

$
0
0
आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुस्ती संघातून जेनिफर रॉड्रिग्ज आणि शबनम शेख या दोन अनुभवी खेळाडूंना धक्कादायकरित्या वगळण्यात आले आहे.

बेंद्रे यांचे जात प्रमाणपत्र अवैधच

$
0
0
लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक व्यंकटराव बेंद्रे यांचे खाटीक अनूसुचित जातीचे प्रमाणपत्र विभागीय जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते.

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

$
0
0
केंब्रिज स्कूल ते हर्सूल सावंगी रस्त्यावर सोमवारी जळालेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह उमरावती ता. फुलंब्री येथील एका ट्रकचालकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

क्रिकेट,हॉकी खेळून मनसेचे आंदोलन

$
0
0
पालिका प्रशासन व सत्ताधा-यांच्या उधळपट्टीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अनोख्या पद्धतीने निषेध केला. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या समोर कार्यकर्ते क्रिकेट खेळले, हॉकीही खेळले व त्यांनी पालिकेच्या एकूणच कारभाराचा धिक्कार केला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images