Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘समांतर’ प्रस्ताव; सोमवारी सादर करणार

0
0

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाबद्दल महापालिकेचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी अभ्यास सुरू केला असून, सोमवारी ते प्रस्ताव सादर करतील अशी शक्यता आहे.

समांतर जलवाहिनीबद्दल न्यायालयाबाहेर तडजोड करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यादृष्टीने समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीने चार जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात नवीन प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची गुणवत्ता तपासून त्या बद्दलचा अभिप्राय १३ जुलै रोजी सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाची गुणवत्ता तपासून त्याचा अभिप्राय सादर करताना प्रस्तावाबद्दल सर्वसाधारण सभेचा निर्णय देखील सर्वोच्च न्यायालयात सादर करा, अशी सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना केली आहे. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवण्याचा प्रस्ताव तयार करा, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले व ११ जुलै रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वसाधारण सभेसमोर ठेवायचा समांतर जलवाहिनीबद्दलचा प्रस्ताव आयुक्त शनिवारी महापौरांना देणार होते, पण त्यांचा या बद्दलचा अभ्यास सुरू आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत आयुक्त समांतर जलवाहिनीबद्दलचा प्रस्ताव देतील. त्यांनी दिलेला प्रस्ताव सर्व नगरसेवकांना अभ्यास करण्यासाठी वितरित केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबरहिल येथे युवकाची आत्महत्या

0
0

औरंगाबाद : अंबरहिल येथे अमोल अशोक मिसाळ (वय २४) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा एका पिझ्झाच्या शोरूममध्ये काम करीत होता. मात्र काही काळापासून त्याने तेथील नोकरी सोडली होती. तेव्हापासून तो घरीच होता. शुक्रवारी रात्री अमोलने जेवण केले. काही वेळ टीव्ही पाहिल्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपायला गेला. शनिवारी सकाळी अमोल खोलीतून बाहेर न आल्याने पाहण्यासाठी गेले असता अमोलने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचे काम सुसाट

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पूर्वी चार चार मुख्यमंत्री यायचे आणि जायचे, पण इमारतीचे काम पूर्ण व्हायचे नाही. आमच्या काळात सरकारचे काम वेगात असून, पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन माझ्याच काळात झाले, अन् इमारतीचेही उद्घाटनही माझ्याच्या हस्ते होत आहे,' अशी टोलेबाजी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पोलिस आयुक्तालय इमारत उद्घाटन कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, गृहराज्यमंत्री रणजितसिंह पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, अतुल सावे, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलिस महासंचालक (गृहनिर्माण) बिपीन बिहारी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्तालयाची इमारत तयार करणाऱ्या गंगामाई कन्स्ट्रक्शनचे रणजित मुळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात पोलिसांसाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'डिजिटलाइजेशनमुळे पोलिसांचे उत्तरदायित्व वाढलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढल्याने गुन्हे प्रकटीकरणही वाढले आहे. पोलिसांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. पोलिसांनी कायदा राबविताना धर्मनिरपेक्ष पद्धतीने कोणतीही जात, पात, धर्म, पंथ न बघता समान अंमलबजावणी करून सर्वांना न्याय मिळवून द्यावा,' असे आवाहन केले.

\Bऔरंगाबादसारखी इमारत हवी

\Bकार्यक्रमात पोलिस महासंचालक (गृहनिर्माण) बिपीन बिहारी यांनी औरंगाबादमध्ये पोस्टिंग असतानाची आठवण सांगितली. 'औरंगाबादेत असताना कधी कारमध्ये तर कधी सिटी चौकामध्ये काम करावे लागत असे. औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाची सुंदर वास्तू उभी राहिली आहे. राज्यभरातून औरंगाबादसारखी इमारत उभारण्याची मागणी होत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद द्यावेत,' असे आवाहनही केले.……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ तास पोलिस ड्युटी; लवकरच निर्णय घेणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्यातील पोलिसांना आठ तास ड्युटी देण्यासाठी विचार सुरू आहे. याबाबत लवकरच हा निर्णय घेऊ,' अशी माहिती पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिली.

…पोलिस आयुक्तालय इमारतीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलताना ते म्हणाले, 'मुंबई पोलिसांची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्यांना सध्या आठ तासांची ड्युटी देण्यात आली. राज्यातील अन्य शहरातही आगामी काळात हा प्रयोग राबवून पोलिसांना अधिक चांगली व उत्तम सेवा देऊ. पोलिसांना बहुपयोगी कामे करण्यासाठी प्रशिक्षण देऊ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने गुन्हे घडण्याचे ठिकाण आणि त्यासंदर्भातील योग्य माहिती पोलिसांना थेट मिळत आहे. शहर वाढले, गुन्हे वाढले की पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी होते. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानात अद्यावत केल्यास नोकर भरतीची गरज भासणार नाही. शहर पोलिसांना सेफ सिटीसह सर्व उपक्रमात मदत करू,' असे आश्वासनही पोलिस महासंचालकांनी दिले.

\Bहल्ले रोखण्यासाठी जनजागृती अभियान

\Bराज्यभरात ठिकठिकाणी केवळ व्हॉट्सअॅपवरून अफवा पसरवून जमावाकडून निरपराधावर हल्ले झाल्याच्या घटना झाल्या. यात धुळे येथे पाच जणांचा मृत्यू झाला. यावर बोलताना पोलिस महासंचालक म्हणाले, 'जमावाकडून अफवांवरून होणारे हल्ले रोखण्यासाठी कसे नियंत्रण आणता येईल याचा विचार सुरू आहे. हल्ले रोखण्यासाठी पोलिस विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदलीप्रकरणी चौकशीची मागणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षक बदलातील अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे सर्व प्रस्ताव मंजूर करून आदेश काढा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने शनिवारी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन केले. दरम्यान, आंदोलन सुरू होताच मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या दालनात चट्टोपाध्याय वेतन श्रेणी प्रश्नी आढावा बैठक सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.

२७ फेब्रुवारी २०१७च्या शिक्षक बदली धोरणाची अंमलबजावणी करताना प्रचंड प्रमाणात नियमाची पायमल्ली झाली. हायकोर्टाने दिलेल्या निर्देशाचे पालन झाले नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांचा आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत शिक्षकांनी दुपारी तीन वाजेपासून झेडपी परिसर दणाणून सोडला. सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, कार्याध्यक्ष संतोष आढाव, लक्ष्मण ठुबे, सदानंद माडेकर, दीपक ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते. अन्यायकारक शिक्षकांनी सादर केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. नियमबाह्य केलेल्या बदल्या रद्द करा, फेर बदलाची चौकशी करा, संवर्गनिहाय जिल्हास्तरावर बदली यादी त्वरीत प्रसिद्ध करा यासह अन्य मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. दरम्यान, खासदार चंद्रकांत खैरे यांनी सायंकाळी आंदोलनकर्त्यांना प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे भेट घेऊन आश्वासन दिले. त्यानंतर शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. देवयानी डोणगावकर उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमटीडीसीत अवैध वृक्षतोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वृक्ष लागवडीसाठी शासनस्तरावर एकीकडे महाअभियान राबविले जात असतानाच दुसरीकडे मात्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या गेस्ट हाउस परिसरात अवैध वृक्षतोड केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. हा प्रकार लक्षात येताच पर्यावरणप्रेंमींनी धाव घेत उर्वरित वृक्ष वाचवले. याप्रकरणी एमटीडीसी विभागाला नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे वृक्ष प्राधिकरण समितीने सांगितले.

रेल्वे स्टेशन रोडवर एमटीडीसी विभागाचे कार्यालय व गेस्ट हाउस आहे. या परिसरात अनेक मोठी झाडे आहेत. त्यापैकी काही वृक्ष सकाळी अकरानंतर तोडण्याचे काम येथील प्रशासनाने हाती घेतले. काही वृक्षाच्या फांद्या तोडण्यात आल्या, तर एक-दोन वृक्ष संपूर्णत: तोडण्यात आले. हा प्रकार वृक्षप्रेमी विवेक ढाकणे यांच्या लक्षात आला. त्यांनी पर्यावरणप्रेमी रवी चौधरी यांना याबाबत माहिती दिली. तसेच घटनेची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागालाही देण्यात आली. त्यानंतर ढाकणे, चौधरी यांच्यासह उद्यान विभागाचे कर्मचारी डी. आर. निंबाळकर, नामदेव राऊत यांनी एमटीडीसीत धाव घेत अवैध वृक्षतोड रोखली. मात्र, तोपर्यंत सफेदा, सुबाभूळचे प्रत्येकी एक झाड तोडण्यात आले होते.

विना परवानगी वृक्षतोड

यासंदर्भात एमटीडीसीचे व्यवस्थापक विजय जाधव यांना संपर्क केला असता, त्यांनी काही वृक्ष जुने झाल्याने धोका निर्माण झाला होता, सुरक्षेसाठी गुलमोहरासह काही झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याचा दावा केला. त्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे अर्ज केल्याचाही दावा केला. मात्र, अद्याप तसा कोणताही अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे उद्यान विभागाचे कृषी सहाय्यक डी. आर. निंबाळकर यांनी सांगत अवैध वृक्षतोडप्रकरणी कारवाई केली जाईल, त्यासाठी प्रथम नोटीस बजााविण्यात येईल, अशी माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... अन्यथा स्वबळावर ४८ जागा लढवू: आंबेडकर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राज्यात वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या १२ जागा सोडण्याचा प्रस्ताव काँग्रेसला जाहीरपणे दिला आहे. अटी मान्य असतील तर काँग्रेससह समविचारी मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवू. अन्यथा, स्वबळावर ४८ जागा लढण्याची तयारी आहे' असे प्रतिपादन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते पत्रकार परिषदेत केले.

राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीची संवाद यात्रा सोमवारी शहरात झाली. यानिमित्त सुभेदारी विश्रामगृहात आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'येत्या १४ जुलैपर्यंत संवाद यात्रा आहे. ठिकठिकाणी प्रतिसाद असून राजकीय भूकंप घडत आहे. हा दौरा झाल्यानंतर पुरोगामी मित्रपक्षांची चर्चा करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या ताठर भूमिकेत बदल होईल. कर्नाटकात मैत्री ग्रुपने काँग्रेसला काही जागा मागितल्या होत्या. या जागा दिल्या असत्या तर काँग्रेस बहुमतात असते. महाराष्ट्रात काँग्रेसची भूमिका वेगळी राहील. आम्ही १२ जागांचा प्रस्ताव दिला असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अटी मान्य असतील तर सोबत निवडणूक लढवू. अन्यथा, स्वबळावर लढण्याची तयारी आहे' असे आंबेडकर यांनी सांगितले. बारामती लोकसभा मतदारसंघातही आघाडीचा उमेदवार लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पुरोगामी आणि प्रतिगामीसुद्धा आहेत. ते शेतकऱ्यांचे नेते नाहीत अशी टीका आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीचे समीकरण मायावती यांच्या बसपसारखे नाही. मायावती यांनी अभिजन जातींबरोबर जातीय मांडणी केली होती. आम्ही अभिजन जाती वगळून वैचारिक मुद्द्यावर मांडणी करीत आहोत असे आंबेडकर म्हणाले. राजकारणात जातीचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी राजकीय पक्ष विधायक मांडणी करीत नसल्याची टीका त्यांनी केली. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपसोबत जाण्याचा मुद्दाच नसल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेडकर मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

भटक्यांच्या एकाही लोकप्रतिनिधीने संसदेचे तोंड पाहिले नाही. या वर्गातील उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विजयी करू असे आघाडीचे पदाधिकारी लक्ष्मण माने यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत ७० ते ८० जागा निवडून आणण्याची क्षमता आहे. या माध्यमातून अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. वंचित घटकांची शक्ती मोठी आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.

संभाजी भिडे यांचा निषेध

ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. 'मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्याकडे दंगल घडवण्याची सुपारीच देण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांना लाखो वारकऱ्यांसमोर तुच्छ लेखण्याचे काम भिडे यांनी केले. या तुच्छतेच्या राजकारणाचा निषेध करतो. भिडे यांच्या माध्यमातून आरएसएसची द्वेषाची मानसिकता पुन्हा दिसून आली' असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा दूध संघाचे संकलन ७ हजार लिटरने घटले

0
0

(दुधाच्या बातमीत चौकट)

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दूध आंदोलनाचा फटका जिल्ह्यातील दूध संकलनावर झाला आहे. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे सकाळच्या सत्रातील दुधाचे संकलन तब्बल सात हजार लिटरने कमी झाले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूध वाहतूकीसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सायंकाळी संघाचे तीन टँकर चोख बंदोबस्तात मुंबईला रवाना झाले.

गायीच्या दुधाला प्रती लिटर पाच अनुदान रुपये देण्यात यावे, यामागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. त्याचा जिल्ह्यातील दूध संकलनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. दररोज सकाळच्या सत्रात जिल्हा संघाचे सरासरी ५४ हजार लिचर दुधाचे संकलन होते, परंतु आंदोलनामुळे सोमवारी सकाळी ४७ हजार लिटर दूध कमी आले. यात प्रामुख्याने पैठण तसेच बनशेंद्रा येथील केंद्रावर दूध कमी संकलित झाल्याचे संघाने सांगितले. दरम्यान, संघातर्फे दररोज ३६ वाहनाद्वारे दुधाची वाहतूक केली जाते. तर दररोज मुंबई येथील महानंदाला टँकरद्वारे दुधाचा पुरवठा केला जातो. आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संघाने ग्रामीण पोलिसांकडे बंदोबस्ताची लेखी मागणी केली होती. त्यानुसार बंदोबस्त पुरविण्यात आला असून सायंकाळी ३० हजार लिटर दूध घेऊन तीन टँकर चोख बंदोबस्तात मुंबईकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घर दाखवले म्हणून मारहाण; चौघांच्या कोठडीमध्ये वाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समन्स बजावण्यात आलेल्या व शेजारी राहणाऱ्या आरोपीचे घर दाखवले म्हणून लोखंडी रॉडने मारहाण करुन गळ्यातील एक ग्राम सोन्याचे ओम हिसकावून घेणारे अमोल अरुण दांडेकर, अक्षय अरुण दांडेकर, योगेश गोदीराम सतुके व गणेश संजय हजारे या आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (१८ जुलै) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. साबळे यांनी सोमवारी (१६ जुलै) दिले.

या प्रकरणी सागर भागवत भास्कर (२१, जाधववाडी, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, आरोपी अमोल अरुण दांडेकर (२१) याच्यावर कोर्टाने समन्स बजावले होते व कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणीसाठी करण्यासाठी पोलिस हे आरोपी अमोलचे घर शोधत होते. त्यावेळी फिर्यादीच्या घराजवळच राहणाऱ्या आरोपी अमोलचे घर फिर्यादीने दाखविले. त्याचा राग मनात ठेऊन आरोपी अमोल याच्यासह आरोपी अक्षय अरुण दांडेकर (२१, रा. सुरेवाडी, जाधववाडी), आरोपी योगेश गोदीराम सतुके (२२, रा. गोकुळनगर, जाधववाडी) व आरोपी गमेश संजय हजारे (२२, सुरेवाडी) यांनी फिर्यादीला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्याचवेळी फिर्यादीच्या गळ्यातील एक ग्राम सोन्याचे ओम हेदेखील आरोपींनी हिसकावून घेतले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन हर्सूल पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता व आरोपींना १३ जुलै रोजी अटक करुन सोमवारपर्यंत (१६ जुलै) पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

रॉड जप्त करणे बाकी

पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे चौघा आरोपींना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, सोन्याचे ओम तसेच रॉड जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सैय्यद शेहनाझ यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चोर असल्याचे समजून नागरिकांना मारहाणीच्या घटना घडत आहे. अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवू नयेत. या संदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अफवाना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले.

राज्यात नागपुर, धुळे, नंदूरबार तसेच औरंगाबाद परिक्षेत्रात औरंगाबाद ग्रामीण, जालना उस्मानाबाद तसेच वैजापूर येथे मुले पळविणारी टोळी समजून नागरिकांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या गोष्टीचे गांभिर्य लक्षात घेऊन विविध उपाययोजना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व पोलिस अधिक्षक कार्यालयांना त्यांच्या हद्दीत जनजागृती करणारे व्हिडिओ, ऑडीओ संदेश, व्हॉटसअॅप, फेसबुक तसेच इतर सोशल मीडियावर जनजागृती करावी, तसेच आठवडी बाजारामध्ये देखील लाऊड स्पीकरद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रभारी पोलिस ठाणे अधिकारी यांच्यामार्फत पोलिस पाटलांची बैठक आयोजित करून गावामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती करणारे भित्तीपत्रक लावण्यात येत असून स्थानिक वर्तमानपत्रे, केबल चॅनल, एफएम रेडिओवर देखील मेसेज प्रसारित करण्यात येत असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये व कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन डॉ. सुहास वारके यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी नदीला पूर

0
0

औरंगाबाद: जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. मागील पंधरा दिवसांत धरण ५० टक्के भरले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून धरणातून विसर्ग सुरू आहे. धरणातून सुरुवातीला १५७२ क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. पाण्याची आवक वाढल्यानंतर तीन हजार १४४ क्सूसेकने विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी एक वाजता विसर्ग चार हजार ७१६ क्यूसेकवर पोहचला आहे. गंगापूर धरणाचे पाणी जायकवाडी धरणात पोहचण्यास ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाटे समुहातर्फे ११, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी व बारावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चाटे समूह 'गुरुमाता ज्ञानदान' योजना राबवणार आहे. शिष्यवृत्तीसह गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण व निवास सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून चाटे शिक्षण समूह गेल्या अनेक वर्षांपासून मातोश्री भागाबाई हनुमंतराव चाटे प्रतिष्ठाण अंतर्गत अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवत आहे. दहावीत ९५ टक्क्यांहून अधिक गुण तसेच गणित व विज्ञान विषयात दोनशेपैकी १९६ पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी परीक्षेसह आयआयटी-जेईई, नीट, सीईटी या स्पर्धात्मक परीक्षांपर्यंतचे शिक्षण व निवास व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही योजना औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर या विभागांतील चाटे क्लासेस व ज्युनिअर कॉलेजसाठी लागू राहाणार आहे.

या वर्षीदेखील दहावीची परीक्षा दिलेल्या व या योजनेअंतर्गत सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह या योजनेविषयी प्रत्यक्ष भेटून माहिती घ्यावी. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी चाटे स्कूल, रेणुकामाता मंदिर रोड, सातारा परिसर, बीड बायपास या ठिकाणी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन चाटे समुहातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला लोकशाही दिनास तक्रारींचा पाऊस

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गेल्या काही महिन्यांमध्ये महिला लोकशाही दिनाकडे पाठ फिरवणाऱ्या महिला तक्रारदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला लोकशाही दिनात गर्दी केली. या लोकशाहीदिनात सात तक्रारी प्राप्त झाल्या.

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती ढेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद निरकले, पोलीस उपनिरीक्षक अमोल शिर्के, संरक्षण अधिकारी नीलेश दहीकर, पोलीस आयुक्तालयातील अनिल जोशी उपस्थित होते. खास महिलांसाठी घेण्यात येणाऱ्या महिला लोकशाही दिनात तुरळक तक्रारी दाखल होत असत. यावेळी मात्र महिलांनी मोठा प्रतिसाद देत तक्रार दाखल केल्या. यामध्ये एक तक्रार कौटुंबिक हिंसाचारासंबंधी होती. तक्रारदार महिलेने मारहाण करणाऱ्या पतीचे समुपदेशन करा, अशी मागणी केली. एक तक्रार उत्पादन शुल्क विभागाविरुद्ध होती. वडिलांची मालमत्ता परस्पर आपल्या नावाने करणाऱ्या सख्ख्या भावाविरुद्ध महिलेने तक्रार दाखल केली. आपल्यासह अन्य नऊ भावा-बहिणींचा हक्क डावलून भावाने फसवणूक केली. संपत्तीवर हक्क सांगितल्यावर भाऊ जीवावर उठला. भावाच्या त्रासाला कंटाळून जिन्सी पोलिस स्टेशनमध्ये वारंवार तक्रार करूनही उपयोग झाला नाही. आताही माझ्या जीवाला धोका असून न्याय द्यावा, अशी तक्रार तिने केली.

सर्व तक्रारी याच लोकशाही दिनात दाखल झाल्याने त्यांवर संबंधित विभागाचा खुलासा मागवला जाईल व पुढील लोकशाही दिनात ही प्रकरणे येतील, असे विभागाने सांगितले.

\Bरमाई योजनेचा लाभ देण्यात टाळाटाळ\B

या लोकशाही दिनातली एक तक्रार महापालिकेविरुद्ध होती. हिराबाई आव्हाड या महिलेला रमाई घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झाले, पण तिला घर मिळाले नाही. त्यांनी ११ नोव्हेंबर २०१३मध्ये पालिकेच्या लोकशाही दिनात तक्रार केल्यावर नंतरच्या टप्प्यांत घरकुल मिळेल, असे सांगण्यात आले, पण पाच वर्षे उलटूनही घरकुल मिळाले नाही. पालिका घरकुल देण्यास टाळाटाळ करत असल्याने तिने महिला लोकशाही दिनात दाद मागितली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरबऱ्याचे पैसे कधी मिळणार?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या हरबऱ्याचे पैसे देण्यास शासनाला विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वादोन हजारच्यावर शेतकऱ्यांकडून यंदाच्या हंगामात हरबरा खरेदी करण्यात आला. त्याची देणी सुमारे साडेदहा कोटींच्यावर असून अद्यापही एकाही शेतकऱ्यांचे पैसे झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

जाधववाडी येथील बाजार समिती आवार, पैठण, गंगापूर, वैजापूर तसेच खुलताबाद येथे शासनाने खरेदी केंद्र सुरू केले होते. हरबऱ्याला यंदा ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल अशी आधारभूत किमंतीत शासनाने जाहीर केली होती. २ हजार ५७६ शेतकऱ्यांनी हरबरा विक्रीसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार २२८ शेतकऱ्यांचा एकूण २३ हजार ५४७ क्विंटल हरबरा या केंद्रावर खरेदी झाला. त्यापोटी सुमारे १० कोटी ३६ लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना अदा करणे आवश्यक आहे, पण माल खरेदी करुन अनेक दिवस झाले तरी शासनाने अद्यापही शेतकऱ्यांचे पेमेंट अदा केले नसल्याचे समोर आले आहे. खरिप पेरणींसाठी शेतकऱ्यांना पैशांची मोठी निकड असतानाही शेतकऱ्यांना मात्र हक्काच्या पैशांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

खरेदी केंद्राचे नाव - शेतकरी संख्या - हरबरा खरेदी (क्विंटल)

जाधववाडी ता. औरंगाबाद - १५७ - १५६५

पैठण - ६३६ - ७७४०

गंगापूर - ७७६ - ७९५६

वैजापूर - ३७४ - ३६९५

खुलताबाद - २८५ - २५९१

एकूण २२२८ - २३,५४७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दमदार पावसाने शहर चिंब, ३७.८ मिमी पावसाची नोंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दोन आठवड्यांपासून शहरातून गायब झालेल्या पावसाने सोमवारी (१६ जुलै) सकाळपासून हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरवासीयांची तारांबळ उडाली. रात्री साडेआठपर्यंत शहरात ३७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

शहरात सोमवारी पहाटेच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी काहीवेळ उघडीप दिल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसल्यानंतर अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर सहा वाजता पुन्हा सुरू झालेला पाऊस रात्री साडेआठपर्यंत सुरूच होता. शहरातील सर्वच भागांमध्ये हा पाऊस झाला. शहरात सकाळी रिमझिम पाऊस असताना चिकलठाणा, शेंद्रा या भागामध्ये मात्र दमदार पाऊस पडला. अनेक दिवसांनंतर झालेल्या पावसामुळे रस्‍त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले. सिडको, हडको, महापालिका परिसर, मौलाना आझाद चौक ते टीव्ही सेंटर, नारळीबाग रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची कोंडी झाली होती. हवामान विभागाने रविवारपासून पुढील दोन दिवस शहरात दमदार पावसाचा अंदाज वर्तवला होता.

\B

कचरा पाण्यात

\B

महापालिका कार्यालयामागील कब्रस्थानाला लागून कचऱ्याचे मोठे गठ्ठे बांधून ठेवले होते. ते सोमवारी झालेल्या पावसात रस्त्यावरील खड्ड्यात पडले. मुख्य पोस्‍ट कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेचा कचऱ्याचा ढिगारा पाण्यात गेला. पाण्यात कचरा मिसळत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

\Bआजही पावसाचा इशारा

\B

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारी (१७ जुलै) जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहुन काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयभवानीनगरात अतिक्रमण हटविण्यास सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेचे आयुक्त डॉ. निपूण विनायक यांनी पाहणी केल्यानंतर जयभवानीनगरात नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईस लगेचच सुरूवात करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही महिन्यांपासून नाल्यावरचे अतिक्रमण पाडण्याचे काम बंद पडले होते.

जयभवानीनगरातील नाल्याच्या पात्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून बांधकाम करण्यात आले आहे. त्यातच पालिका प्रशासनाने या नाल्यातून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले. त्यामुळे नाल्याची स्थिती अधिकच बिकट झाली. परिणामी नागरिकांचा जीव देखील टांगणीला लागला. गतवर्षी पावसाळ्यात या नाल्याला आलेल्या पुरामुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. त्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी नाल्यावरची बांधकामे पाडण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. परंतु, महापालिका प्रशासनाने या आदेशाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नाल्यावरची बांधकामे पाडण्यात आली नाहीत. सर्वसाधारण सभेत या संदर्भात भाजपचे गटनेते प्रमोद राठोड, नगरसेविका मनीषा मुंडे यांनी आवाज उठवल्यावर आयुक्त डॉ. विनायक यांनी नाल्याच्या पात्रातील बांधकामे पाडण्याची जबाबदारी उपायुक्त रवींद्र निकम यांना दिली. निकम यांनी या कामात वेळकाढूपणा केला. त्यामुळे डॉ. निपूण विनायक यांनी त्यांना निलंबित केले. निकम यांच्या निलंबनानंतरही पालिकेचे प्रशासन हलले नाही. त्यामुळे डॉ. विनायक यांनी सोमवारी (१६ जुलै) जयभवानीनगरला भेट दिली. यावेळी आमदार अतुल सावे, प्रमोद राठोड उपस्थित होते. नाल्यावरची बांधकामे तत्काळ पाडा, असे आदेश त्यांनी दिले.

\Bमार्किंगची गरज नाही\B

अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकामांवर नगररचना विभागाने मार्किंग केले नाही असे सांगितले. नाल्याच्या पात्रातील इमारतीला मार्किंगची गरज नाही. बांधकाम पाडण्याचे काम तत्काळ करा, असे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. इमारतीचा काही भाग पाडण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्‍ली, बंगळुरूसाठी ऑक्टोबरपासून विमानसेवा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनाचे महत्त्व ओळखून जेट ऐअरवेजने येत्या ऑक्टोबरपासून दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली ही थेट, तर अन्य एका विमान कंपनीने दिल्ली-औरंगाबाद- बंगळुरू विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. औरंगाबाद येथील विमानसेवा व्यापक करण्याच्या दृष्टीने सोमवारी (१६ जुलै) घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दोन कंपन्यांनी यासंबंधीची घोषणा केली. बंगळुरू ये‌थे विमानसेवा सुरू होणार असल्याने औरंगाबादचा संपर्क हवाईमार्गे दक्षिण भारतासोबत होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना तेथून चेन्नई तसेच कोलंबो, क्वालालांपूर येथे सहज जाता येणार आहे.

केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, रुबिना अली, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिएल अॅण्ड अॅग्रीकल्चरचे राम भोगले, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, एअर ‌इंडिया, जेट एअरवेज, झूम एअरवेज, एअर एशिया, इंडिगोसह इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अजिंठा, वेरुळ, बुद्धिस्ट सर्किट औरंगाबादच्या पर्यटन क्षेत्राला थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर अधारेखित करते. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतून विविध विमान कंपन्यांची सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होणे हे औरंगाबादच्या पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासाठी आवश्यक आहे. तसेच व्यावसायिकदृष्ट्या संबंधित कंपनीलाही ते लाभदायक ठरणार असल्याचे सांगत उषा पाधी यांनी विविध विमान कंपन्यांना औरंगाबाद येथे आवश्यक त्या सुविधा, पायाभूत गोष्टींची उपलब्‍धता प्रशासन, संबंधित यंत्रणेमार्फत पुरवण्यात येईल, विमानसेवा वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या सर्व पूरक गोष्टी आर्थिकसाह्य विभागामर्फत शासन उपलब्‍ध करून देईल असे सांगितले.

यावेळी 'सीएमआयए'चे राम भोगले यांनी औरंगाबाद येथे औद्योगिक व कृषी या दोन्ही क्षेत्रातून कार्गो सेवा सुरू करण्यास पूरक वातावरण असून याद्वारे विमान कंपन्यांचे अर्थकारणही लाभदायक असल्याचे सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली- औरंगाबाद- बंगळुरू ही विमानसेवा सुरू करण्यासाठी झूम एअरवेजने तयारी दर्शवली आहे. दरम्यान, इतर विमान कंपन्यांनी औरंगाबाद विमानतळाचे सर्वेक्षण करून तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता भविष्यात विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विमानसेवा सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आवश्यक ते सहकार्य आणि पाठिंबा मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीसाठी विमान प्राधिकरण तसेच हॉटेल, रेस्टॉरंगट व्यावसायिक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधींचीही उपस्थिती होती.

\Bया ठिकाणी विमानफेऱ्या वाढवण्याची संधी\B

यावेळी सीएमआए व इतर सर्व संघटनांच्या वतिने जयपूर-औरंगाबाद-हुबळी, अहमदाबाद-बंगळुरू-चेन्नई, हुबळी-जयपूर, उदयपूर-वाराणसी- बोधगया व सध्या सुरू असलेली औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-दिल्ली यासाठी अतिरिक्त विमानफेऱ्या वाढवण्याची संधी असल्याचे सांगितले. थायलंड व कोलंबो येथून येणाऱ्या पर्यटकांना बोधगया सोबतच औरंगाबादमध्ये घेऊन येता येईल असेही सूचवण्यात आले.

\Bजेटचा प्रस्ताव 'डीजीसीए'कडे

\B

जेट एअरवेजचे अहमद जलील म्हणाले की, औरंगाबाद-दिल्‍ली-औरंगाबादसाठी थेट विमान सुरू करण्याची आमची तयारी आहे. या संदर्भातील प्रस्ताव आम्ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) पाठवला असून त्यांनी स्लॉट उपलब्‍ध करून दिल्यास आम्ही येत्या ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू करण्यास तयार असल्याचे जलील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला जाळले, पतीला जन्मठेप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

चारित्र्याच्या संशयावरुन लग्नानंतरच्या एका वर्षात २० वर्षीय पत्नीवर रॉकेल टाकून तिचा जा‍ळून खून करणारा पती व आरोपी सचिन निळकंठ मोरे याला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी ठोठावली. ही घटना २५ जून २०१२ रोजी घडली होती.

या प्रकरणी मृत पत्नी शिल्पा सचिन मोरे (२०) हिच्या मृत्युपूर्व जबाबावरुन छावणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. तिच्या जबाबानुसार, मृत शिल्पा व आरोपी सचिन निळकंठ मोरे (२५, मूळ रा. कर्माटक, ह. मु. लक्ष्मीनारायण कॉलनी, छावणी, औरंगाबाद) यांचे लग्न २७ मे २०११ मध्ये झाले होते. लग्नानंतर ७-८ दिवस आरोपीने शिल्पाला चांगले वागवले; परंतु त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी तिला वारंवार शिविगाळ, मारहाण करत होता. त्यामुळे कंटाळून आरोपीच्या आई-वडिलांनी शिल्पाला तिच्या माहेरी सोडले होते व आरोपी मुलगा शांत झाल्यावर परत घेऊन जाऊ, असे सांगितले होते. त्यानंतर शिल्पा बरेच दिवस तिच्या माहेरी राहात होती. घटनेच्या पाच-सहा दिवसांपूर्वी आरोपी व त्याचे वडील हे शिल्पाच्या घरी गेले आणि यापुढे तिला चांगले वागवले जाईल, असा शब्द देऊन शिल्पाला सासरी घरी घेऊन आले. त्यावेळी शिल्पासोबत तिची आई आली होती. दरम्यान, आरोपी हा वाळूज येथील कंपनीत कामाला लागला असल्याचेही शिल्पाच्या माहेरी सांगण्यात आले होते. २५ जून २०१२ रोजी आरोपी सचिन हा सकाळपासूनच दारू प्यालेला होता आणि त्यातच आरोपी व शिल्पामध्ये दुपारी वादविवाद झाले. चारित्र्याच्या संशयावरुन आरोपीने तिला मारहाण केली व सिगारेटचे चटके दिले आणि त्याचवेळी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. शिल्पाच्या ओरडण्यामुळे बाहेरच्या खोलीत असलेल्या तिच्या आईने आतल्या खोलीत धाव घेतली आणि तिची आई तसेच घरमालकाने तिला घाटीत दाखल केले. छावणी पोलिस ठाण्याचे अंमलदार एस. पी. वाघ यांनी शिल्पाचा मृत्युपूर्व जबाब नोंदविला. आर. बी. किर्तीकर यांनी तपास केला. तपासादरम्यान विशेष न्यायदंडाधिकारी सखाराम मुकुंदलाल गोखले यांनीही जबाब नोंदविला. उपचारादरम्यान ३ सप्टेंबर २०१२ रोजी शिल्पाचा मृत्यू झाला.

दहा हजारांचा दंड

खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये हेड कॉन्स्टेबल एस. बी. वाघ, विशेष न्यायदंडाधिकारी गोखले, मृताची आई लक्ष्मीबाई बाबुराव फिरंगे, राजकुमार दिवेकर यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन कोर्टाने आरोपीला भादंवि ३०२ कलमान्वये जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून बी. वाय. किरड पाटील यांनी काम पाहिले, तर सहाय्यक सरकारी वकील शिरसाठ यांना अॅड. नितीन मोने यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरी, आरोपीस कोठडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या समोरच्या रस्त्यावरुन विद्यार्थ्याचा मोबाईल चोरणारा आरोपी पंकज शिवाजी वाघ याला रविवारी (१५ जुलै) अटक करुन सोमवारी (१६ जुलै) कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीला मंगळवारपर्यंत (१७ जुलै) पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. ए. ए. खतीब यांनी दिले.

या प्रकरणी विद्यार्थी सैफ अली खान निसार खान (१८, रा. बेगमपुरा) याने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीचे वडील एमजीएम रुग्णालयात दाखल असल्यामुळे फिर्यादीचे रुग्णालयात जाणे-येणे सुरू होते. १३ जुलै २०१८ रोजी फिर्यादी हा रुग्णालयासमोरच्या रस्त्यावरुन औषधे आणण्यासाठी जात असताना एका दुचाकीवर तिघे आरोपी आले आणि त्यांनी फिर्यादीच्या हातातील १५ हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. त्यावेळी फिर्यादीने दुचाकीवर मागे बसलेला आरोपी रोहित अनिल बेहडे (१८, रा. सिडको) याला पकडून ओढले असता, आरोपी रोहित खाली पडला आणि इतर दोघे पळून गेले. इतर नागरिकांच्या सहाय्याने आरोपी रोहितला सिडको पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आरोपी रोहितने नाव सांगितल्यानुसार आरोपी पंकज शिवाजी वाघ याला रविवारी अटक करुन सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता, आरोपीकडून मोबाइल हँडसेट जप्त करणे बाकी असून, आरोपीने मोबाइल कुणाला विकला का, कोणी साथीदार आहे का आदींचा तपास करणे बाकी असल्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जनार्दन एस. जाधव यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणावर प्राणघातक हल्ला करीत खुनाचा प्रयत्न

0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

तरुणावर लोखंडी रॉड व बॅटने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. १० जुलै रोजी रात्री पावणेनऊ वाजता पडेगाव भागात हा प्रकार घडला. या घटनेत सागर हिवरडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या मारहाणीचे कारण समजू शकले नसून सहा आरोपींविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सागरचे वडील प्रमोद हिवरडे (वय ४४ रा. देवगिरी व्हॅली, मिटमिटा) यांनी तक्रार दाखल केली. हिवरडे हे १० जुलै रोजी रात्री घरी असताना त्यांचे सहकारी योगेश ब्रम्हकर यांचा त्यांना कॉल आला. हिवरडे यांचा मुलगा सागर याला यश नवकार अपार्टमेंट, नाशिक रोड येथे आठ ते दहा मुले मारहाण करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. हिवरडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांना सागरला मारहाण होत असल्याचे दिसून आले. रोहीत यादव नावाच्या आरोपीने सागरला सोडू नका, जिवंत मारा असे म्हणत त्याच्या डोक्यात बॅटने वार केला. तसेच इतर आरोपींनी सागरला लोखंडी रॉड व लाठ्या काठ्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सागर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. हिवरडे यांनी इतर लोकांच्या मदतीने सागरची सुटका केली. त्याला सेव्हनहिल भागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी प्रमोद हिवरडे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रोहीत यादव, अजहर शेख, अजय म्हस्के, कौशल कांबळे, स्वराज जाधव व इतर चार आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय सचिन मिरधे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images