Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मालवाहतूकदारांचा शुक्रवारपासून संप

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

येत्या शुक्रवारपासून (२० जुलै) मालवाहतूकदारांनी चक्का जाम आंदोलन जाहीर केले आहे. 'संप घोषित केल्यानंतर शासनाकडून मागण्यांबाबत प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे २० जुलैपासून बेमुदत संप सुरू केला जाणार आहे,' अशी माहिती औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने या संपाची हाक दिली आहे. त्याची माहिती देताना फैय्याज खान म्हणाले की, मालवाहतूकदारांच्या संपाची तयारी दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. त्याबाबत असोसिएशनने शासनासमोर विविध मागण्या ठेवल्या आहेत. त्यातच वारंवार डिझेलचे दर वाढत असल्याने मालवाहतूकदारांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. आतापर्यंत १६ रुपयांची वाढ झाली असून दर काही दिवसांआड २० ते ३० पैसे प्रती लिटर वाढ होत आहे. त्यामुळे दर तीन ते सहा महिन्यांत वाढ किंवा कपातीचे नियोजन करावे, मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांसाठी भारतभर टोलमुक्ती असावी, टोलमुक्तीसाठी मालवाहतूकदार रक्कम भरण्यास तयार आहेत. विमा रक्कम दीडशे पट वाढली असून ती कमी करावी, आयकरचे कलम ४४ (ए) (ई) या कायद्यात बदल करून प्रती टन कर लावला जात आहे. पूर्वी वार्षिक ४८ हजार रुपये दर होता. हा कर पूर्ववत करावा, तसेच अनाधिकृत तपासणी नाक्यांवरील वसुली थांबवावी, आदी मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.

या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने मालवाहतूकदारांची अवस्था शेतकऱ्यांपेक्षाही वाईट झालेली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार फैय्याज खान यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेत जयकुमार थानवी, असद अहमद, राजेंद्र माहेश्वरी, एम. जी. इरफानी, रवींद्रसिंह टोटेजा यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

\Bजीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा थांबणार \B

या आंदोलनात सुरुवातीच्या टप्प्यात मालवाहतूक बंद केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा बंद केला जाणार आहे.

…………

\Bदेशातील ९५ लाख ट्रकचा सहभाग

\B

औरंगाबाद जिल्ह्यात साडेचार हजार ट्रक असून राज्यात ही संख्या २० लाखांपर्यंत संख्या आहे. संपूर्ण देशात ९५ लाख ट्रक आहेत. या आंदोलनात सर्व ट्रक सहभागी होणार आहेत. औरंगाबाद शहरात एक दिवस 'चक्का जाम' झाल्यास मालवाहतूकदारांचे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान होते, अशी माहिती ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

…………

\Bई-वे बिलाचा फायदा \B

शासनाने ई-वे बिल प्रणाली सुरू केल्याचा फायदा मालवाहतूकदारांना झाला आहे. पूर्वी औरंगाबाद ते दिल्लीचा प्रवास चार दिवसात होत असे. आता सर्व बिलांची प्रक्रिया ई-वे बिलमधून आधीच क्लिअर होत असल्याने तीन दिवसांत दिल्ली गाठता येते, असे यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंत्राटदार जाधवचा अनेकांना कोट्यावधीचा गंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भागीदाराला ६१ लाखाला गंडा घालणारा आरोपी लहू जाधव याने आणखी इतर काही जणांना देखील लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात मंगळवारी दोन तक्रारदारांनी गुन्हे शाखेत धाव घेत तक्रार दाखल केली. कंपनीच्या नावामध्ये फेरफार करून भागीदारांना जाधव गंडा घालत होता. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिक यामध्ये सूत्रधार असून त्याची पत्नी देखील एका कंपनीत जाधव याच्यासोबत भागीदार असल्याचे समोर आले आहे.

अंकीत मुथीयान या मित्राला ६१ लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी लहू जाधव या ठेकेदाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. जाधव याने या पध्दतीने कोणाला फसवले असल्यास तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी केले होते. या आवाहनाला मंगळवारी प्रतिसाद मिळाला. गुन्हे शाखेकडे या संदर्भात दोन तक्रारी प्राप्त झाल्या. संतोष तायडे व अर्जुन साळुंके या दोन भागीदारांनी निरीक्षक सावंत यांची भेट घेतली. जाधव याने तायडे व साळुंके तसेच सानप यांच्यासह आरटीओ कार्यालयातील एका लिपिकाच्या पत्नीला भागीदारीत घेऊन कंपनी स्थापन केली होती. या कंपनीला कर्नाटकामध्ये १७ कोटीचे रेल्वे मार्गाचे काम मिळाले होते. तायडे, साळुंके व सानप यांच्याकडून त्याने लाखो रुपये घेत भागीदार बनविले. मात्र, कामाचे बिल आल्यानंतर ते कंपनीच्या नावात फेरफार करून स्वत:च्या कंपनीच्या नावावर जमा केले असल्याची माहिती तायडे व साळुंके यांनी दिली. औरंगाबादसह गुजरात राज्यात देखील त्याने अशा प्रकारे फसवणूक केल्याची माहिती या दोघांनी दिली. याप्रकरणी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. तसेच आरोपी जाधव याने धनादेशाद्वारे आणखी एकाची पंधरा लाखांची फसवणूक केली असून त्याने देखील भेट घेतल्याची माहिती निरीक्षक सावंत यांनी दिली.

चौकट

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकाशी लहू जाधव याचे घनिष्ठ सबंध आहे. या लिपिकाची पत्नी देखील एका कंपनीत भागीदार आहे. तायडे, सोळुंके यांची ओळख या लिपिकानेच जाधव यांच्यासोबत करून दिली होती. हा लिपिक जाधव याला भागीदार म्हणून सावज शोधून देण्याचे काम करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आर्थिक विवंचनेतून आत्महत्येचा निर्णय

जाधव याने फसविल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यापैकी एका भागीदाराने आर्थिक विवंचनेपोटी आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्या सहकाऱ्याने व पत्नीने त्यांना यापासून परावृत्त केले. भागीदारासोबतच लेबर, वाहनचालक आदींना जाधव याने गंडा घातल्याचेही अनेक प्रकार घडले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेताना महिला भूमापक गजाआड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नगर भूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक सुनीता पोफळे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन हजारांची लाच घेताना अटक केली. मंगळवारी दुपारी नगर भूमापन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. घराचा फेरफार उतारा देण्यासाठी पोफळे यांनी ही तीन हजाराची लाच स्वीकारली होती.

एका तक्रारदार महिलेने आईचा मृत्यू झाल्याचे फेरफार उताऱ्यावरून आईचे नाव कमी करून बहिणींचे नोंदवण्याबाबत भूमापन कार्यालयाकडे अर्ज दिला होता. या अर्जावर फेरफार नोंदवून देण्यासाठी सुनीता पोफळे यांनी तीन हजारांची लाच मागितली होती. या प्रकरणी तक्रारदार महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी लाचेची रक्कम घेऊन भूमापन कार्यालयात तक्रारदार महिलेला बोलाविण्यात आले होते. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला होता. लाचेची रक्कम घेतल्यानंतर आरोपी सुनीता सुदाम पोफळे (वय ५२, रा. पारिजातनगर, एन चार, सिडको) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक वर्षाराणी पाटील, निरीक्षक अनिता वराडे, संदीप आव्हाळे, हरिभाऊ कुऱ्हे, विजय बाम्हंदे, सुनील पाटील व संदीप चिंचोले यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांच्या प्री-बिडमध्ये सात इच्छुकांचा सहभाग

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या कामांसाठी महापालिकेत झालेल्या प्री-बिड बैठकीत सात इच्छुक कंत्राटदारांनी सहभाग घेतला. जॉइंट व्हेंचर करण्याची परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी यावेळी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने महापालिकेला शंभर कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले आहे. त्याशिवाय ५० कोटी रुपये किंमतीचे डिफर्ड पेमेंटच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे एकूण १५० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामासाठी यापूर्वी निविदा काढण्यात आली होती. निविदा प्रक्रियेबद्दल काही कंत्राटदारांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयातील आव्हान याचिका मागे घेतल्यामुळे महापालिकेने या कामासाठी फेरनिविदा काढली. फेरनिविदेनुसार मंगळवारी (१७ जुलै) इच्छुक कंत्राटदारांची प्री-बिड बैठक घेण्यात आली. या बैठकीला सात इच्छुक कंत्राटदार उपस्थित होते. त्यात ए. एस. कंस्ट्रक्शन्स, चार्निया कंस्ट्रक्शन्स, आर. के. कंस्ट्रक्शन्स, अशोका एजन्सी, गुरुनानक एजन्सी, वंडर एजन्सी, जे. के. कंस्ट्रक्शन्स यांचा समावेश होता. जॉइंट व्हेंचर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यापैकी बहुतेकांनी केली. अन्यही काही सूचना करण्यात आल्या.

इच्छुक कंत्राटदारांनी केलेल्या सूचना तपासून पाहून त्याचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख सात ऑगस्ट आहे.

या रस्त्यांची होणार कामे

शंभर कोटींच्या निधीतील रस्ते

१) चिकलठाणा शासकीय रुग्णालय ते चौधरी कॉलनी

२) बजरंग चौक ते चिश्तीया कॉलनी

३) जय भवानीचौक ते सैनिक वे ब्रीज

४) चिकलठाणा आठवडी बाजार ते सावंगी बायपास

५) एन १ पोलीस चौकी ते प्रोझोन मॉल

६) आंबेडकर चौक ते मिसारवाडी

७) महाराष्ट्र डिस्टिलरीज ते ब्ल्यू बेल्स रेसिडेन्सी

८) सोहम मोटर्स ते महालक्ष्मी चौक

९) शाहूनगर ते मोरया मंगल कार्यालय सिडको १२वी योजना

१०) कामगार चौक ते हायकोर्ट

११) धूत हॉस्पिटल ते मूर्तीजापूर

१२) अहल्याबाई होळकर चौक ते विश्रांतीनगर

१३) जानकी हॉटेल ते मेहरसिंह नाईक शाळा

१४) सेव्हन हिल्स ते टी.व्ही. सेंटर

१५) पीरबाजार ते जानकी हॉटेल

१६) हर्सुल टी पॉइंट ते डॉ. भोपळे यांचे घर

१७) हॉटेल पंचवटी ते कोकणवाडी

१८) मकई गेट ते बीबी का मकबरा

१९) निराला बाजार ते महापालिका कार्यालय

२०) संताजी पोलिस चौकी ते गंगासागर सोसायटी

२१) इटखेडा महापालिका शाळा ते नाथ व्हॅली शाळा

२२) हर्सूल वॉर्ड क्रमांक-एकमधील विविध रस्ते

२३) औरंगाबाद बुक डेपो ते शनी मंदिर अंगुरीबाग

२४) सिद्धार्थ चौक ते ताज हॉटेल

२५) विजय चौक ते कालीकामाता मंदिर ते राज कॉर्नर

२६) आझाद चौक ते बजरंग चौक

२७) सिटीचौक ते पैठणगेट

२८) माउली चौक ते गंगाबावडी

२९) शहागंज चमन ते निझामुद्दिन चौक

डिफर्ड पेमेंट अंतर्गत रस्ते

१) आकाशवाणी ते त्रिमूर्तीचौक ते गजानन महाराज मंदिर ते चेतक घोडा

२) अमरप्रीत चौक ते शहानूरमियॉ दर्गा चौक

३) चौसरनगर ते शिव मंदिर

४) आझाद चौक ते महापालिका कार्यालय

५) महात्मा फुले चौक ते नेहरूभवन

६) पोलिस मेस ते कटकट गेट

७) नवामोंढा ते मोंढानाका

८) एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर

९) जवाहर पोलिस चौकी ते सावरकर चौक

१०) सतीश नागरे यांचे घर ते वंजारी समाजाचे मंगल कार्यालय

११) सिद्धार्थ चौक ते एमआयटी कॉलेज

१२) संग्रामनगर उड्डाणपुल ते प्रतापनगर

१३) जुना बाजार ते किलेअर्क

१४) सिल्लेखाना ते लक्ष्मणचावडी

१५) छाबडा टायर्स ते श्रद्धा हॉस्पिटल

१६) एकनाथ रंग मंदिर ते गुरू तेग बहाद्दूर शाळा

१७) अग्रसेन चौक ते एक्साइज ऑफिस

१८) एसबीओए शाळा ते अंबिकानगर

१९) हर्सूल जेल ते स्मृतिवन

२०) हनुमान मंदिर जयभवानीनगर ते झेंडा चौक

२१) ओंकारेश्वर चौक ते संत एकनाथ हॉस्पिटल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदारांनी जनतेला वेठीस धरले

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचरा कोंडीला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेच जबाबदार आहेत. कचरानिर्मूलन कामात ते अडकाठी आणून जनतेला वेठीस धरत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आणि प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी केला, तर 'हे किरकोळ लोक आहेत. त्यांना उत्तर काय द्यायाचे,' असा पटलवार खासदार खैरे यांनी दिला.

खासदार खैरे यांनी कचरा कोंडी प्रश्नी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना विनाकारण लक्ष करत आहेत. खरे तर या प्रश्नाला खासदार खैरे हेच जबाबदार आहेत, असा आरोप भाजप नेत्यांनी केला. बागडे यांनीच पुढाकार घेत नारेगाव येथील जनतेकडून चार महिन्यांचा अवधी मागितला होता, मात्र त्या चार महिन्यांच्या कालावधीत खासदार खैरेंना हा प्रश्‍न सोडविता आला नाही. कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. रोगराई पसरण्याची भीती आहे. सर्वांनी एकत्र येत हा प्रश्न सोडविल पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे, पण प्रश्न सोडविण्याऐवजी खासदार खैरे हे महापालिकेच्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतात, असा आरोपही डॉ. कराड यांनी केला. कचरा प्रश्नी नागपूर येथे आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, कचरु घोडके, प्रा. डॉ. राम बुधवंत आदी उपस्थित होते.

\Bठोस इशारा नाहीच\B

भाजप नेत्यांनी कचरा प्रश्नावरून खासदार खैरे यांना लक्ष्य केले. प्रश्न गंभीर असूनही भाजप महापालिकेत शिवसेनेसोबत का? सत्तेतून बाहेर पडणार का? खासदार खैरे लोकसभेला उमेदवार म्हणून नकोच, अशी भूमिका घेणार का? असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. त्यावर मात्र, भाजप नेत्यांनी मौन साधले. कचरा प्रश्नी ठोस निर्णय काय? असे विचारले असता डॉ. कराड यांनी,'जनता खासदार खैरे यांना माफ करणार नाही,' असे उत्तर दिले.

\Bते किरकोळ लोक : खैरे\B

भाजपने केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर खासदार खैरे यांना संपर्क साधला असता त्यांनी डॉ. कराड, बोराळकर यांचे नाव न घेता,'ते किरकोळ लोक आहेत. त्यांना उत्तर काय द्यायाचे,' अशी तोफ डागली. त्यांना उत्तर महापौर नंदकुमार घोडेले हेच देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत सर्व पक्षीय बैठकीला आज उपस्थित होतो, असेही खासदार खैरे यांनी सांगत 'चिल्लर लोकांना महत्त्व देत नाही,' असे प्रत्युत्तर भाजप नेत्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

……मनसे प्रमुख राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आठ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहे. ते १८ जुलै ते २५ जुलै या कालावधीत मराठवाड्यात थांबणार आहेत. त्यांचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन होणार आहे. या आठ दिवसात औरंगाबाद, जालना, बीड परभणी या चार जिल्ह्यांत ते भेटी देणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे यांच्या कार्यकर्ता मेळावे, मान्यवरांची संवाद आदी कार्यक्रमाचा समावेश आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे, राजू पाटील, ठाकरे यांचे स्वीय सहायक हर्षल देशपांडे, निरीक्षक जावेद शेख यांचे मंगळवारीच शहरात आगमन झाले. मनसे नेते राजू पाटील व हर्षल देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली. ठाकरे याचे बुधवारी सायंकाळी शहरात आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी तापडिया नाट्य मंदिर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर शहरातील मान्यवरांशी ते संवाद साधणार आहेत. ते शुक्रवारी सकाळी पैठण येथे नाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतील व बिडकीन येथील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. रविवारी सकाळी जालना दौऱ्यात ते पदाधिकारी कायकर्ता मेळावा घेणार आहे. सोमवारी परभणी येथे कार्यकर्ता मेळाव्याला त्यांची उपस्थिती असणार आहे. मंगळवारी केज येथे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या होणार असून, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयाना शिवणयंत्रांचे वाटप राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मंगळवारी बीड येथे पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार असून, बुधवारी (२५ जुलै) ते बीड येथून पुण्याला रवाना होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेला मंगळवारपासून (१७ जुलै) सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद विभागीय मंडळांतर्गत दहावीच्या परीक्षेसाठी ५३४९ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी ४१ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत, तर १८ परीरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मराठी, हिंदी आणि उर्दू या माध्यमाचे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागीय मंडळाच्या अंतर्गत ७७९७ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी १८ परीरक्षक आणि २२ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पहिल्या भाषा विषयाचा पेपर होता. दहावीची परीक्षा दोन ऑगस्टपर्यंत, तर बारावीची परीक्षा चार ऑगस्टपर्यंत चालणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्याचे विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

\Bपरीक्षार्थी

दहावी ५३४९

बारावी ७७९७\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - मदनभाई जालनावाला यांचे निधन

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

प्रख्यात व्यापारी, सुपारी हनुमान मंदिर रोड येथील रहिवासी मदनभाई नवनीतदास जालनावाला (वय ७१) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. कैलासनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर आज (बुधवारी)अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या मदनभाई, व्यापाऱ्याच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी शेवटपर्यंत सक्रिय होते. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी उपाध्यक्ष, इलेक्ट्रिकल मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष, इंडस्ट्रीयल सप्लायर्स असोसिएशन संस्थापक सदस्य अशी विविध पदेही त्यांनी भुषावली. तसेच लायन्स कल्बचेही ते सभासद होते. उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना नुकतेच गौरविण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज कचऱ्याबद्दल नागपूरमध्ये बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (१७ जुलै) नागपूर येथे औरंगाबादेतील कचराकोंडीबद्दल बैठक होणार आहे. या बैठकीसाठी संनियंत्रण समितीचे सर्व अधिकारी, महापालिका आयुक्त, महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी यांना बोलावण्यात आले आहे. कचराकोंडी फोडण्यासाठी शासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला, 'डीपीआर'च्या अंमलबजावणीसाठी ९१ कोटी रुपयांचे अनुदानही मंजूर केले, पण अद्याप कचराकोंडी फोडण्याच्या दृष्टीने प्रभावीपणे काम सुरू झाले नाही. या पार्श्वभूमीवर नागपूरात होणारी बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटीबससाठी पुन्हा टाटांचीच निवीदा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सिटीबससाठी पुन्हा टाटा कंपनीचीच एकमेव निविदा प्राप्त झाली आहे. फेरनिविदा काढल्यानंतरही एकच निविदा प्राप्त झाल्याने प्राप्त झालेली निविदाच अंतिम करून सिटीबस खरेदीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. स्मार्टसिटी योजनेच्या माध्यमातून सिटीबस सेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने घेतला आहे. त्यानुसार शंभर बस खरेदी करण्याची निवीदा देखील काढण्यात आली. निविदेच्या पहिल्या प्रयत्नात टाटा या कंपनीची एकच निविदा आली होती. त्यामुळे फेरनिविदा काढण्यात आली. फेरनिविदेनंतरही टाटा कंपनीचीच निविदा प्राप्त झाली. या निविदेबद्दल आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव खर्च सरकारने केला तरच समांतरचा नवा करार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'वाढीव खर्चाची जबाबदारी सरकारने घेतली, तरच समांतर जलवाहिनीबद्दलचा नवीन करार करण्यास आम्ही सहमती देऊ, महापालिकेतील शिवसेनेची ही भूमिका असेल,' असे स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांनी स्पष्ट केले.

समांतर जलवाहिनीबद्दलच्या नवीन कराराबद्दल सध्या महापालिकेत चर्चा सुरू आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने समांतर जलवाहिनीचे काम नव्याने सुरू करण्याबद्दलचा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. हा प्रस्ताव कंपनीच्या वकिलांच्या माध्यमातून महापालिका आयुक्तांना मिळाला. आयुक्तांनी या प्रस्तावाचा अभ्यास करून महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव तयार केला. कंपनीचा प्रस्ताव आणि महापालिका आयुक्तांनी तयार केलेला प्रस्ताव यावर चर्चा करण्यासाठी महापौरांनी पुढील आठवड्यात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

या संदर्भात बोलताना सभापती राजू वैद्य म्हणाले, समांतर जलवाहिनीच्या कामाची किंमत सुमारे चारशे कोटींनी वाढली आहे. ही रक्कम शासनाने दिली पाहिजे. कंपनीने शासनाकडून चारशे कोटींबद्दलची हमी लिहून आणली, तरच समांतर जलवाहिनीचा नवा करार मान्य करता येईल. महापालिकेची आर्थिक स्थिती चारशे कोटींचा बोजा पेलण्यासारखी नाही. त्यामुळे शासनाचीच मदत घ्यावी लागणार आहे, असे वैद्य यांनी स्पष्ट केले. खर्चाची वाढीव रक्कम शासनाने देण्याबरोबरच पाणीपट्टीत वाढ न करणे आणि दररोज पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटरची सक्ती न करणे या अटी मान्य असतील तरच करार मान्य करता येईल. याउपर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार भूमिका घ्यावी लागेल. पक्षश्रेष्ठी देखील जनहिताच्या विरोधात जाणार नाहीत, असा विश्वास वैद्य यांनी त्यांनी व्यक्त केला.

\Bमहापालिकेतील शिवसेनेच्या अटी \B

वाढीव खर्चाच्या चारशे कोटींची हमी कंपनीने शासनाकडून आणावी

दररोज पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत मीटरसक्ती नको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्यातील सहा मंडळात अतिवृष्टी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एकीकडे निम्म्या मराठवाड्याला चिंब करणारा पाऊस औरंगाबादवर मात्र रुसला होता. मात्र, दोन दिवसांपासून शहरात पावसाने सातत्य ठेवले असून मंगळवारी (१७ जुलै) सकाळी तसेच दुपारीही काही वेळ झालेल्या पावसाने शहराला चिंब केले. शहरातील सर्वच भागांमध्ये हा पाऊस झाला. दरम्यान, मराठवाड्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यातील पूर्णा (९८ मिमी), पाथरी (७९ मिमी), मानवत (६८ मिमी) तसेच नांदेड जिल्ह्यातील तुप्पा (७० मिमी), बरसनी (८३ मिमी) व लिंबगाव (८० मिमी) मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक ३०.३२ मिलिमीटर पाऊस परभणी जिल्ह्यात, तर सर्वात कमी ११.६३ मिमी पाऊस लातूर जिल्ह्यात झाला. औरंगाबाद जिल्ह्यात १२.२५, जालना १४.९०, हिंगोली १९.७५, नांदेड १८.३०, बीड १४.८२ व उस्मानाबाद जिल्ह्यात १५.७६ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यात आतापर्यंत अपेक्षित सरसरीच्या तुलनेत १०८.३ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३५.४ टक्के पाऊस झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण हटविण्यास विरोधात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अतिक्रमण हटविण्यासविरोध करीत एका महिलेने जयभवानीनगरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेनंतर महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई तूर्तास थांबवली आहे.

जयभवानीनगर येथील नाल्यावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे करण्यात आली आहेत. यातील काही बांधकामे पाडण्यात आली, पण काही बांधकामांबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी उपायुक्त रवींद्र निकम यांना निलंबित केले. निकम यांच्या निलंबनानंतरही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात केली नाही. त्यामुळे सोमवारी डॉ. विनायक यांनी जयभवानीनगरला भेट दिली. यावेळी आमदार अतुल सावे, महापालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद राठोड उपस्थित होते. नाल्याच्या पात्रातील बांधकामे तात्काळ करा असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार सोमवारी एक इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी दुपारी महापालिकेचे पथक पुन्हा जयभवानीनगरात दाखल झाले. मोजमाप करून इमारत पाडण्याचे काम सुरू करणार इतक्यात शकुंतलाबाई सोळुंके यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सोळुंके यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर महापालिकेच्या पथकाने बांधकामे पाडण्याची मोहीम तूर्तास थांबवली. दरम्यान, याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेचा निषेध

0
0

औरंगाबाद : जवाहरगनर, माणिक हॉस्पिटलच्या शेजारील पूल धोकादायक बनला असून, येथील नाला खोदून ठेवला आहे. याला एक महिना उलटून गेला तरीही महापालिकेचा कोणताही अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाही म्हणून छावा श्रमिक संघटनेने मंगळवारी (१७ जुलै) निषेध केला.

मोठ्या रहदारीच्या असलेल्या या मार्गावर दोन हॉस्पिटल असून, येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, महिन्याभरात या पुलावर अनेक लहान मोठे अपघात झाले असून, महापालिकेला जाग कधी येणार, असा सवाल यावेळी करण्यात येत निषेध करण्यात आला. यावेळी शैलेश भिसे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू ‌अहिल्ये, निलेश धस, महादेव प्रधान, राज ठाकूर, लहू राठोड, विजय बेंबडे, ओंकार चव्हाण, सागर कुमावत, सागर नागोडे, मयूर गायकवाड आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची सरासरी अनुमान पद्धत बदलणे गरजचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'पावसाची सरासरी अनुमान काढण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे. पावसाचा अनेकदा मोठा खंड पडतो. त्यानंतर गतवर्षीच्या सरासरी प्रमाणे किंवा जास्त पाऊस झाला, तर सरकारी यंत्रणा आनंदीत होते. पण, शेतकऱ्यांचे नुकसान होते. सरासरी पाऊस व दुष्काळाची सांगड घालणे योग्य नाही,' असे मत ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केले.

सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अॅग्रीकल्चर अॅण्ड अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज (सीटा), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, कृषी विज्ञान केंद्र एजीएम व खरपुडी जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी 'सीटा संवाद' कार्यक्रमाचे जेएनईसी कॉलेज परिसरातील आर्यभट्ट सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुशराव कदम होते. 'सीटा'चे संचालक फिरोज मसानी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील तांबे, दत्ता बाळ सराफ, स्वरुप शेतकरी कंपनीचे दीपक चव्हाण, जालना शेतकरी कंपनीचे भगवान म्हात्रे, महाबँकचे प्रदीप कुतवळ, नाबार्डचे अधिकारी राजेश महाजन, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक पी. बी. अव्हाळे आदी उपस्थित होते.

शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित या कार्यक्रमात बोलताना कृषीतज्ज्ञ बोराडे यांनी सहकारचे गोड फळे चाखता आले नाही म्हणून शेतकऱ्यांना कंपन्याकडे जावे लागत आहे हे लक्षात आणून दिले. परिवर्तन आवश्यक असून शेतकरी आता कंपन्या काढत आहेत. फसगत होणार नाही, याची काळजी आता त्यांनाच घ्यावी लागले. चांगली संधी असून प्रामाणिकपणे वाटचाल करा, 'सीटा' सहकार्य करण्यासाठी आहेच, असे आवाहन त्यांनी केले. पावसाचा खंड पडला की शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. पण यंत्रणा सरासरी पाऊस गृहित धरते. म्हणून सरासरी अनुमान काढण्याची पद्धत बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

'शेती व्यवसाय व्यवस्थित केला, त्यास तंत्रज्ञानाची जोड दिली, तर ती फायदेशीर आहे. मात्र, आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो. ही दरी दूर करण्याचे प्रयत्न, मार्गदर्शन 'सीटा'तर्फे सुरू आहे. त्यासाठी ई-साक्षरता आवश्यक आहे,' असे मत 'सीटा'चे संचालक मसानी यांनी मांडले. शेतकरी कंपनी स्थापन करण्याची पद्धत, प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र व राज्य सरकार तसेच नाबार्डच्या विविध योजना, सल्लागार सेवा आदी सेवा 'सीटा'च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे मसानी यांनी सांगितले. कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तर देत मार्गदर्शन केले. नीलेश राऊत, जी. आर. रेड्डी, विजय कान्हेकर, सुबोध जाधव, डॉ. रेखा शेळके आदी उपस्थित होते.

\Bकर्जासाठी फरफट\B

प्रश्नोत्तरे सत्रात बोलताना जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील शेतकरी काकासाहेब साब‌ळे यांनी कर्जासाठी शेतकऱ्यांची होणारी फरफट यावर भाष्य केले. महाबँक असो की बँक शाखेचे अधिकारी कोणाही लवकर दाद देत नाही, असे विधान त्यांनी करताच उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला. या प्रकारमुळ‌े उपस्थित शासकीय अधिकारी आवक् झाले. त्यावर महाबँकेचे कुतवळ यांनी आवश्यक ती मदत, सहकार्य केले जाईल, असे सांगत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी आत्महत्यांबाबत शासनाकडून कानउघडणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,

आस्मानी संकटामुळे राज्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. आत्महत्या घडल्यानंतर जिलहास्तरीय समितीच्या मंजुरीनंतर वारसाला तत्काळ मदत मिळणे अपेक्षित आहे, मात्र राज्यातील सर्व सहा महसूली विभागांमध्ये गेल्या गेल्या वर्षभरापासून शेतकरी आत्महत्यांचे २९२ प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे तत्काळ निकाली काढा, असे पत्र पाठवून सरकारने सर्व विभागीय प्रशासनांचे कान उपटले आहेत.

उपसचिवांनी १३ जुलै २०१८ रोजी पुणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सर्व विभागीय आयुक्तांना प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासन निर्णयान्वये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकरण निदर्शनास येते त्या वेळी संबंधित जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांमार्फत त्याचा प्राथमिक तपास करण्यात यावा. तपासानंतर आत्महत्येबाबत चौकशी करण्यासाठी संबंधित तहसीलदार, पोलिस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने जागेवर प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करावी व पथकाने आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना घटना घडल्यापासून आठ दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने त्याआधारे मदत देण्याबाबत निर्णय घ्यावा, असा नियम आहे, मात्र अनेकवेळा आत्महत्यांची प्रकरणे प्रलंबित राहतात. शासनाने पाठवलेल्या पत्रामध्ये २०१५मध्ये ३०, २०१६मध्ये २० व २०१७ मध्ये २९२ आत्महत्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. २०१५मधील ३० व २०१६मधील २० प्रकरणांपैकी १९ प्रकरणे पुणे विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहेत; तसेच २०१७मध्ये कोकण विभागाकडे एक, नाशिक ४३, पुणे २६, औरंगाबाद ८४, अमरावती १०१ व नागपूर विभागाकडे ३७ अशी एकूण २९२ प्रकरणे प्रलंबित आहेत.

विभागीय प्रशासनाकडून पाठवण्यात येत असलेली आकडेवारी वारंवार लोकसभा, राज्यसभा, विधानमंडळ, सचिवालय, मुख्यमंत्री, मंत्री, विधीमंडळाचे सदस्यांना सादर करण्यात येत असल्यामुळे प्रलंबित प्रकरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांबाबत गंभिर्याने तत्काळ कार्यवाही करावी व सुधारित अहवाल तत्काळ शासनाकडे पाठवावा, असेही विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

\Bऔरंगाबाद विभागातील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली\B

जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये औरंगाबाद विभागातील आठही जिल्ह्यामध्ये ९९१ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली होती, यापैकी ७७६ प्रकरणांना पात्र तर २१५ प्रकरणांन समितीने अपात्र ठरवले होते. पात्र प्रकरणातील सर्व ७७६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत वाटपही करण्यात आले. असल्यामुळे औरंगाबाद विभागात २०१७मधील एकही प्रकरण प्रलंबित नाही, असे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरूंची चौकशी अंतिम टप्प्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. तीन सदस्यीय समितीने शुक्रवारी (१३ जुलै) अहवालाचा मसुदा तयार केला. विद्यापीठाचा सहा वेळेस दौरा करूनही कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली नाही. राज्यपाल कार्यालयाकडील तक्रारींची संख्या व आरोपांशी निगडीत कागदपत्रांची संख्या पाहून समितीचे सदस्यही थक्क झाले.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजाबाबत अनेक संस्था, संघटना यांनी राज्यपाल कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची संख्या पाहून उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुलगुरू चोपडे यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली. माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती चौकशी करीत आहे. याबाबत २३ मार्च २०१८ रोजी अध्यादेश काढण्यात आला. या समितीने २२ मे रोजी प्रथम विद्यापीठाचा दौरा करून आरोपाशी संबंधित कागदपत्रांची पाहणी केली होती. आर्थिक गैरव्यवहार, 'रूसा'तील साहित्य खरेदी, उत्तरपत्रिका निविदा, नियमबाह्य नियुक्त्या, अवाजवी किमतीने सॉफ्टवेअर खरेदी, निवासस्थानावरील खर्च, असे प्रमुख आरोप आहेत. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी समितीने तब्बल सहा वेळेस विद्यापीठाचा दौरा केला. साधारणत: तीन दौऱ्यात चौकशी पूर्ण होईल अशी शक्यता होती. मात्र, तक्रारींची संख्या मोठी असल्यामुळे अधिक कागदपत्रांची पाहणी करावी लागली. परीक्षा विभाग, आस्थापना, वित्त व लेखा, निवडणूक विभाग यांनी मागणी केलेली कागदपत्रे समितीला सादर केली. या कागदपत्रांची संख्या पाहून समितीचे सदस्यही थक्क झाले. दोन-तीन दौऱ्यात कागदपत्रे अभ्यासणे कठीण आहे, असे मत सदस्यांनी मांडल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. दरवेळी विद्यापीठाचा स्टेनो समितीच्या सहाय्यासाठी उपलब्ध होता. मात्र, सहाव्या दौऱ्यात शुक्रवारी (१३ जुलै) समितीने आपला स्टेनो सोबत आणला होता. प्रशासकीय इमारतीत येणे टाळून समिती सदस्यांनी गेस्ट हाउसमध्ये कागदपत्रे तपासली. तसेच अहवालाचा मसूदा तयार केला. संबंधित काम गोपनीय असल्यामुळे स्टेनोसह समिती दौऱ्यावर आली होती. ही समिती आणखी एक दौरा केल्यानंतर चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. उत्तरपत्रिका निविदा आणि चार कोटी रुपये बँक खात्यावर वळते करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक प्रक्रियाही वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. एस. एफ. पाटील समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

\Bतब्बल १५ हजार कागदपत्रे\B

चौकशी समितीने कुलगुरू चोपडे यांचा थेट संबंध असलेल्या व्यवहाराची १५ हजारांपेक्षा जास्त कागदपत्रे तपासली. कागदपत्रांचा ढिग पाहून समितीचे सदस्यही थक्क झाले होते. एका सामाजिक कार्यकर्त्याने राज्यपालांना तक्रारीच्या निवेदनासह गैरव्यवहाराची अडीच हजार पाने जोडली होती. जानेवारी २०१६ मध्ये विद्यापीठाचे बारकोड उत्तरपत्रिका खरेदी प्रकरण राज्यभर गाजले होते. तब्बल ७३ लाख रुपयांच्या उत्तरपत्रिकांची खरेदी झाली होती. यात अनियमितता झाल्याच्या आरोपामुळे संजय चहांदे चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशीत चोपडे यांच्यावर कारवाई झाली नव्हती.

\Bपाठराखण करणारे कोण?\B

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, चोपडे यांची पाठराखण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा एक गट सक्रिय आहे. चोपडे चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करावी या मताचा दुसरा गट असल्याची चर्चा आहे. समितीच्या अहवालावरच चोपडे यांचे भवितव्य अवलंबून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित आराखडा मंजुरीच्या मार्गावर

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जाधववाडी येथील औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुधारित आराखडा रेखांकनास शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत नाममात्र दराने कर आकारणी करण्यात येऊन तातडीने मंजुरी द्यावी, असा निर्णय नागपुरात बुधवारी आयोजित बैठकीत झाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. विकास शुल्क प्रश्नी विधानसभा अध्यक्ष, सहकार मंत्री तसेच नगरविकास खात्यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्या पुढाकाराने नागपूर विधान भवनातील त्यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उप महापौर विजय औताडे, महापालिका आयुक्त विनायक निपुण, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, सहकार उपनिबंधक अनिल दाबशेडे, उप सभापती भागचंद ठोंबरे आदी उपस्थित होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ अन्वये बाजार समित्यांना स्थानिक प्राधिकरण संस्थांप्रमाणे दर्जा प्राप्त होतो. बाजार समित्या या शेतकरी आणि ग्राहकांना सेवा सुविधा पुरविणाऱ्या संख्या आहेत. नफा कमावणाऱ्या कंपन्या नाहीत. त्यामुळे नगरविकास, नगर नियोजन संदर्भातील वाढीव शुल्क आकारणीच्या तरतुदी बाजार समिती विकास आराखडा, रेखांकन मंजुरी करताना लागू करू नये, असे म्हणणे बाजार समितीतर्फे मांडण्यात आले. तर मनपाने समितीकडे विकास व इतर शुल्कपोटी ९ कोटी रुपयांची मागणी केली आहे. नगररचना अधिनियमप्रमाणे मागणी केल्याचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, नगरविकास विभागाने यासंदर्भात स्पष्टीकरण देऊन तरतुदींमधील तफावत दूर करावी आणि आराखड्याला तातडीने परवानगी मिळेल, असे बघावे, असे याबैठकीत निश्चित करण्यात आल्याचे सभापती पठाडे यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वार्ता - गयाबाई कराड

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समतानगर येथील रहिवासी गयाबाई किशनराव कराड (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी (१७ जुलै) रात्री निधन झाले. पुष्पनगरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नावतंडे असा परिवार आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांचे त्या मातोश्री होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैठक नागपुरात; पदाधिकारी मुंबईत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचराप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात आयोजित केलेल्या बैठकीवर शिवसेनेच्या औरंगाबाद महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अघोषित बहिष्कार टाकला. कचरा प्रश्नावरून शिवसेना, भाजपमध्ये कलगीतुरा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरील बहिष्कारामुळे कलगीतुऱ्याला येत्या काळात अधिक धार चढेल, असे मानले जात आहे.

औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यामुळे निर्माण झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांचा आरोप भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी खोडून काढला आहे. कचरा प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच बुधवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या कचराप्रश्नी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. भाजपचे उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड नागपूरला पोचले. शिवसेनेचे पदाधिकारी मात्र नागपूरऐवजी मुंबईला गेले. त्यात महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, सभागृहनेते विकास जैन यांचा समावेश होता. सभापतिपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वैद्य यांच्या समवेत हे सर्वजण 'मातोश्री'वर पोचले. याचवेळी खासदार खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कनेते विनोद घोसाळकर देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांची बैठक झाली.

कचरा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निधी दिला आहे. आजूनही निधी देण्यास ते तयार आहेत, असे असताना महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला यायला हवे होते, असे मत उपमहापौर विजय औताडे यांनी व्यक्त केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मात्र दोन्ही नेते आमच्यासाठी समान आहेत, असे म्हटले आहे.

\B

'अचानक मातोश्रीवर बैठक का?'\B

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या दिवशीच 'मातोश्री'वरील बैठकीचे आयोजन हा काटशह देण्याचा प्रकार होता का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांची बैठक पूर्वनियोजित होती, असे सांगितले जाते. ही बैठक पूर्व नियोजित असेल तर 'मातोश्री'वरील बैठकीचे अचानक का नियोजन करण्यात आले. नागपूरच्या बैठकीला बगल देण्याचा आणि औरंगाबादेत फक्त आम्हीच हे दाखवून देण्याचा शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images