Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बारा संचालकांना कोर्टाचा झटका

0
0
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगला झटका दिला आहे. गुन्हा रद्द करण्याची आणि अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. तीन महिला संचालक व एका तज्ज्ञ संचालकास दिलासा मिळाला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्या. नरेश पाटील व न्या. एम. टी. जोशी यांनी मंजूर केला आहे.

मागितली सीडी आणली शिडी!

0
0
घाटीच्या रेडिऑलॉजी विभागात हल्ली सिटी स्कॅन, एमआरआयच्या प्रिंट देण्याऐवजी ‘सीडीमध्ये घेऊन जा’ असे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातल्या रुग्णांना एरव्ही काही गोष्टी माहिती होत नाहीत. त्यात आता बाहेरून ‘सीडी’ आणण्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक शिक्षक समितीचे १० जानेवारीला अधिवेशन

0
0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन दहा जानेवारी रोजी महाबळेश्वर येथे होणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष शालीग्राम खिस्ते यांनी दिली.

तीन दिवसांपासून मका खरेदी बंद

0
0
शेतकऱ्यांच्या मालास चांगला भाव मिळावा, हमी भावपेक्षा कमी किंमतीत खरेदी होऊ नये, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत असतानाच केवळ एका शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे जाधववाडी येथील भरड धान्य खरेदी केंद्रच गेल्या तीन दिवसापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका

0
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) भरती प्रक्रिया राबविण्यात आली. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कंत्राटी पद्धतीने प्रक्रिया राबविताना गोंधळ झाला.

चांगल्या रस्त्याला डांबर फासण्याचा डाव फसला

0
0
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत कधी कोणती कामे जादूई पद्धतीने मंजूर होतील चांगल्या रस्त्याला पुन्हा डांबर फासण्याचा डाव फसला हे सांगता येत नाही. दुरुस्तीच्या कुठेही स्थितीत नसलेल्या रस्त्याला पुन्हा एकदा डांबर फासून उखळ पांढरे करून घेण्याचा डाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत फसला.

महिला अत्याचाराच्या बीडमध्ये ३ घटना

0
0
बीड जिल्ह्यात बुधवारी तीन महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये धारूर तालुक्यात बलात्कारास विरोध करणाऱ्या तरुणीला विहिरीत फेकून दिल्याने मृत्यू झाला तर, तालुक्यातील चऱ्हाटा फाट्यावर २० वर्षीय तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचे समोर आले.

उजनी पापुतील गैरव्यवहाराची चौकशी सुरू

0
0
उस्मानाबादसाठीच्या उजनी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची व निकृष्ट कामाची चौकशी आता उस्मानाबाद येथील अॅन्टीकरप्श्न ब्युरो कार्यालयाकडून करण्यात येत असल्यामुळे राजकीय नेते मंडळी नगरपालिकेतील पदाधिकारी व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

उस्मानाबाद शहराला पंचतारांकित ‘लूक’

0
0
शहराचा आ‌‌र्थिक, औद्योगिक किंवा सामाजिक विकास आज ना उद्या होईलच असे गृहितच धरून सध्या उस्मानाबाद शहराला ‘लूक’ देण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे.

रस्त्यांचे ‘भाग्य’ उजळणार

0
0
महापालिकेची कमकुवत झालेली आर्थिक स्थिती. शासनाकडून रस्ते बांधणासाठी न मिळणारे अर्थसाहाय्य या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते बांधणीसाठी आगामी काळात उद्योजक, स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्याची भूमिका पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

चेलिपुरा अतिक्रमण : पालिकेची पोलिसांत तक्रार

0
0
चेलिपुरा येथील त्या अतिक्रमणाच्या संदर्भात महापालिकेने अखेर सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या अतिक्रमणाच्या संदर्भात शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली होती.

विद्यापीठाच्या भरतीत घोळच घोळ

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत रोज नवे वाद समोर येत आहेत. मुलाखतीसाठी आमंत्रित केलेल्या काही उमेदवारांचा मूळ संवर्गच विद्यापीठाने बदल्याचा प्रकार समोर आला आहे.

तेंडल्याच्या तिकिटांमुळे पोस्टाची ‘विकेट’

0
0
क्रिकेट रसिकांच्या मनावरील जादू कायम ठेवत निवृत्त झालेल्या सचिन तेंडुलकरच्या नावातच जादू आहे. त्याच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी पोस्ट खात्याने प्रकाशित केलेली तिकिटे आता औरंगाबादच्या मुख्य टपाल कार्यालयामध्येही उपलब्ध झाली आहे.

कॅन्सर केंद्रात दुप्पट खाटांचा प्रस्ताव

0
0
घाटी हॉस्पिटलअंतर्गत मराठवाडा विभागीय कॅन्सर विशेषोपचार केंद्रात आता रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उपलब्ध जागा कमी पडत असल्याने वाढीव १०० खाटांचा प्रस्ताव केंद्राकडून वैद्यकीय शिक्षण खात्याकडे पाठविण्यात आला आहे.

प्रलंबित फायलींना नोटीस द्यायला सभापती धजेनात

0
0
एलबीटीच्या एनओसीसाठी प्रलंब‌ित असलेल्या फायलींना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात नोटीस देण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे हात आखडता घेत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘टॉवरच्या फसव्या जाहिरातीपासून सावधान’

0
0
छतावर, शेतामध्ये मोबाइल टॉवर बसवा अशा स्वरुपाच्या जाहिरातीपासून नागरीकांनी सावध राहावे असे आवाहन पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नागरीकांना करण्यात आले आहे.

गोदामाला मिळणार ऑफिसचा ‘लूक’

0
0
पालिकेच्या स्थानिक संस्थाकर विभागाच्या कार्यालयाचे आता नुतनीकरण केले जात आहे. या नुतनीकरणामुळे एका गोदामाला ऑफिसचा लूक मिळणार आहे. जकात कर रद्द होऊन शासनाने एलबीटी लागू केला. औरंगाबाद महापालिकेत या कराची वसूली १ जून २०११ पासून सुरू झाली.

जेल आवारातून गुन्हेगाराचा सुंबाल्या

0
0
पोलिसांच्या रेकॉर्डवरील आंतरराज्य टोळीतील गुन्हेगार ज्ञानेश्वर पिंपळे याने मंगळवारी रात्री नऊ वाजता हर्सूल जेलच्या आवारातून बेडीसह पलायन केले. राहता येथील कोर्टाची तारीख आटोपून पोलिस मुख्यालयाचे तीन कर्मचारी त्याला पुन्हा जेलमध्ये सोडण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.

खुनाच्या आरोपीला कोठडी

0
0
ट्रकचालकाचा खून करून मृतदेह पेटवून देणाऱ्या आरोपी क्लिनरला पोलिसांनी बुधवारी ‌कोर्टात हजर केले. या आरोपीला चार‌ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू, तसेच लपवलेला ट्रक देवळाई येथून ताब्यात घेतला आहे.

घरफोड्या वाढल्या

0
0
शहरात वर्षभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या चोऱ्या घरफोड्याच्या संख्येत वाढ झालेली पोलिसांच्या रे‌‌कॉर्डवरून दिसत आहे. तब्बल घरफोड्यांचे सव्वादोनशे, तर चोऱ्यांचे हजारांवर जास्त गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images