Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भिक्खू ट्रेनिंग सेंटरचे आज लोकार्पण

0
0

औरंगाबाद : येथून जवळ असलेल्या चौका या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. याच ठिकाणी प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे. रविवारी (२२ जुलै) या प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण केले जाणार आहे. हा कार्यक्रम अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कार्यक्रमास भदंत संघसेना महाथेरो (लदाख), भदंत शिवली महाथेरो (श्रीलंका), भदंत मेधंकर महाथेरो (श्रीलंका), भदंत विनयरक्खिता थेरो (बेंगलोर), डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो (पूर्णा), थायलंडचे मुंबई येथील कॉन्सिल जनरल एकपोन पून पिपट उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते बोधीवृक्षाच्या परिसरात सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. या परिसरात तथागत गौतम बुद्धांची ४५ फुटांची मूर्ती उभारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्ष संवर्धन वारी सर्वांची

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाड्याला हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धनाची वारी करणे महत्त्वाचे आहे. वनराईचे संगोपन, संवर्धन आणि वृक्ष लागवडीत वाढ करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. याबाबत विभागांना उद्दिष्टे दिले आहेत. त्यापेक्षा पुढे जाऊन अधिकाऱ्यांनी कार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह येथे शनिवारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष, फळ, तुती लागवड आणि जलयुक्त शिवार आदी योजनांचा विभागस्तरीय आढावा कार्यशाळा घेण्यात आली त्याप्रसंगी डॉ. भापकर बोलत होते. कार्यशाळेस मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांच्यासह विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. भापकर म्हणाले, मराठवाड्यात पाच हजार ५६ एकर क्षेत्र रेशीम लागवड योग्य क्षेत्र आहे. तर २०१८ या वर्षात तीन हजार ७०० एकर रेशीम लागवड लक्षांक आहे. सद्यस्थितीत तुतीची ४.८६ कोटी रोपे तयार केली आहेत. त्यामुळे रेशीम लागवडीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मनरेगांतर्गत वृक्ष लागवड, रेशीम लागवड, हरित टेकडी अभियान आदी कामे करण्यावर सर्व अधिकाऱ्यांनी भर द्यावा. ग्रामसंपर्क अधिकारी, तालुका संपर्क अधिकारी यांनीही गाव, तालुका विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला द्यावी. त्यांचा लाभ मिळवून द्यावा. ग्रामसेवक, तलाठी, कृषीसेवक यांनी समन्वयातून गाव विकासावर भर द्यावा. हरित टेकडी..., माझी शाळा, माझी टेकडी ...वन अच्छादन वाढीवर लक्ष देऊन मराठवाड्याला हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही डॉ. भापकर यांनी केले. याप्रसंगी मुख्य वन संरक्षक प्रकाश महाजन यांनी उपस्थितांना वृक्ष लागवड अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वर्षा ठाकूर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलीवर अत्याचार, आरोपीला तीन वर्षे कारावास

0
0

म. टा. प्रतिनिधी ,औरंगाबाद

अकरा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा यशवंत गंगाधर निकाळजे (६५) याला सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी तीन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला.

नाचनवेल येथील पीडिता १० जून २०१६ रोजी सकाळी नऊ वाजता बकरी सोडण्यासाठी गावाबाहेर गेली होती. ती परत येताना आरोपी यशवंत त्याच्या घरासमोर उभा होता. त्याने हाक मारून मुलीला बोलावले. ती येताच त्याने तिला घरात ओढून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला धक्का मारून मुलगी पळून गेली. तिने तिच्या आईला घटनेबद्दल सांगितले. यासंदर्भात पिशोर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक ए. एस. मोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार खंडाळकर यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी यशवंतला शिक्षा व दंड ठोठावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा दोनशे खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांना महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दोनशे खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव शनिवारी सादर केला. या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन चौबे यांनी दिले.

खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने चौबे शहरात आले होते. यावेळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. शासनातर्फे महापालिकेच्या क्षेत्रातील आरोग्य सेवांसाठी दहा कोटींचा निधी देण्याची मागणी करण्यात आली. निधी देण्यापेक्षा प्रस्ताव द्या, त्यासाठी मदत करू असे चौबे यांनी सांगितल्यावर दोनशे खाटांच्या दवाखान्याबद्दलच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. दोनशे खाटांच्या दवाखान्यासाठी आवश्यक ती संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितले. रुग्णालयाबरोबरच कार्डियाक अँब्युलन्स, प्रधानमंत्री डायलिसिस सेंटर, रुग्णालयासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग याचीही पूर्तता करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. आरोग्य राज्यमंत्र्यांनी सूचविल्यानुसार रुग्णालयाच्या संबंधिचा सविस्तर प्रस्ताव महापालिकेतर्फे लवकरच पाठवला जाणार आहे. आरोग्य सेवेसाठी केंद्र सरकारकडून मदत मिळाल्यास शहराला मोठा दिलासा मिळेल, असे महापौर म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेच्या धडकेत गाय झाली जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या एका गायीच्या मदतीसाठी अग्रवाल युवा मंचाने धाव घेतली. जखमी गायीवर उपचार करण्यात आले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिची रवानगी गो शाळेत करण्यात आली.

शिवाजीनगर येथील रेल्वे फाटकाजवळ धडक बसल्यामुळे एक गाय जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. या अपघातामुळे गायीला जागेवरून उठता सुद्धा येत नव्हते. भर पावसात गाय जागेवरच पडून होती. याच भागातील रहिवासी नंदकिशोर अग्रवाल यांना या घटनेची कल्पना मिळतात त्यांनी अग्रवाल युवा मंचच्या व्हॉट्सअॅप ग्रुप वर मदत मागितली. त्यावर मंचाचे अध्यक्ष दीपक अग्रवाल व उपाध्यक्ष शिरीष अग्रवाल यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. सोबत त्यांनी डॉक्टरांनाही नेले. त्यानंतर गायीला एका गाडीतून पुढील उपचारासाठी नेण्यात आले. औषधोपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ती गाय गुरू गणेश गोशाळेमध्ये सोडण्यात आली, अशी माहिती शिरीष अग्रवाल यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वतंत्र लिगायत धर्माची शिफारस; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्वतंत्र लिंगायत धर्माच्या संदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करण्यासाठी मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले. कर्नाटक सरकारने स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी तयार केलेला ३७० पानांचा नागमोहन समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, प्रदीप बुरांडे, वीरेंद्र मंगलगे यांनी सादर केला. यावेळी महात्मा बसवेश्वर महाराजांची मूर्ती व ग्रंथ देवून ज्येष्ठ लेखक अशोक मेनकुदळे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या शिष्टमंडळात चंद्रशेखर कते, उद्धव तवडे(लातूर), सकलेश बाभूळगावकर(सोलापूर), राजू व्हनकोरे, समन्वयक कैलास वाघमारे, नीलेश शेट्टे, जयेश हातगावकर, मंगेश शेटे, सुरेंद्र मेनकुदळे, संजय तोटकरी, महेंद्र ठोंबरे, राजू पुणेकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिजनल जेरियाट्रिक्स’ची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

0
0

औरंगाबाद: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) वार्धक्यशास्त्र (जेरियाट्रिक्स) हा नवीन विभाग पीजी अभ्यासक्रमासह सुरू झाला असून, 'रिजनल जेरियाट्रिक्स सेंटर'ची मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनीकुमार चोबे यांच्याकडे करण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांनी रविवारी (२२ जुलै) घाटीला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला असता त्यांच्याकडे मागणीचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. या वेळी घाटीविषयीचे प्रेझेंटेशनही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी केले. याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, जेरियाट्रिक्स विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, डॉ. वर्षा कागिनाळकर, डॉ. रश्मी भट्टाचार्य आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनशिक्षण’तर्फे स्वच्छता पंधरवडा

0
0

औरंगाबाद: जनशिक्षण संस्थाच्या माध्यमातून 'स्वच्छता पंधरवडा'अंतर्गत पालखेड (ता. वैजापूर) येथे स्वच्छता फेरी व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा नंदकिशोर जाधव, उपसरपंच अंबादास घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदुरीकर, 'जनशिक्षण'चे अध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पनाताई झंवर, डॉ. मेहेर, 'जनशिक्षण'चे संचालक रणधीर गायकवाड आदींची उपस्थिती होती. यानिमित्त पालखेड येथील जिल्हा परिषद शाळा व श्री पारदेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता फेरी काढली. यावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. तसेच श्री पारदेश्वर मंदिरात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येऊन डेंगी, मलेरियाविषयी वैद्यकीय अधिकारी डॉ. आढाव यांनी माहिती दिली. उपक्रमासाठी शिला लखमाल, सुरेशा कौशिके, पौर्णिमा कुलकर्णी, संगीता वायकोस, सोनाली निकम आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंत्र्यांकडून ‘रॅन’चा गाजावाजा; महाराष्ट्र योजनेबाबत अनभिज्ञ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'राष्ट्रीय आरोग्य निधी'मार्फत (रॅन) दुर्धर आजारांसाठी बीपीएल रुग्णांना दहा लाखांपर्यंतचा निधी मिळू शकतो आणि 'टाटा'अंतर्गत तब्बल २६ लाखांपर्यंतचा निधी देण्यात आला आहे. मग तुम्ही लाभ का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित करीत योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चोबे यांनी रविवारी (२२ जुलै) घाटीत केले खरे, परंतु 'रॅन' या योजनेपासून महाराष्ट्राचा आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे या योजनेच्या लाभ महाराष्ट्राने घेतलाच नसल्याचे शासकीय बेवसाइटवरूनही स्पष्ट झाले आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये दुर्धर आजारांसाठी उपचार घेणाऱ्या बीपीएल रुग्णांसाठी 'रॅन'अंतर्गत दहा लाख किंवा त्यापेक्षाही जास्त निधी मिळू शकतो आणि दोन लाख रुपये तात्काळ मंजूर करण्याचे अधिकार थेट वैद्यकीय अधीक्षकांना असल्याचे चोबे यांनी स्पष्ट केले आणि या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी घाटीच्या डॉक्टरांना केले. मात्र या राष्ट्रीय योजनेविषयी केवळ स्थानिक नव्हे तर सार्वजनिक आरोग्य विभाग; तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फारशी माहिती नसल्याचे समोर आले. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या वेबसाइटवरील वृत्तानुसार, वेगवेगळ्या राज्यांतील ५९१ केसेसमध्ये २८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी योजनेअंतर्गत मिळाला खरा, परंतु महाराष्ट्रातील एकाही रुग्णाने या योजनेचा लाभ घेतला नाही. त्याचवेळी 'नॅशनल इलनेस फंड' जमा झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे व त्याचीही बेवसाइटवर नोंद आहे. त्यामुळेच महाराष्ट्र या योजनेपासून कसा अनभिज्ञ राहिला, असा प्रश्न आहे.

\B'सुपरस्पेशालिटी'ला सप्टेंबरची डेडलाइन\B

केंद्र-राज्याच्या १५० कोटी रुपयांमधून उभे राहात असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटललाही केंद्रीय मंत्र्यांनी भेट दिली. मात्र रुग्णालय उभे करण्यासाठी तब्बल पाच महिने उशीर झाल्याबद्दल त्यांनी कंत्राटदाराला झापले आणि सप्टेंबरपर्यंत रुग्णालयाचे काम पूर्ण करा, नाहीतर दंडात्मक कारवाई करू, असा इशाराही दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बौद्धधर्मीय राष्ट्रांत भारताबद्दल जिव्हाळा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची भारत ही जन्मभूमी. ही ऐतिहासिक भूमी आहे. त्यामुळे बौद्धधर्मीय राष्ट्रांचे भारताविषयी जिव्हाळयाचे संबध आहेत. थायलंडच्या नागरिकांच्या मनात भारताविषयी आदर कायम आहे,' असे प्रतिपादन थायलंडचे कौन्सिलेट जनरल इकापोल पोलपिपाट यांनी केले. त्यांच्या हस्ते चौका येथे उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण रविवारी करण्यात आले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत सदानंद महास्थवीर हे होते. यावेळी भदंत संघसेना महाथेरो (लडाख), भदंत शिवली महाथेरो व भदंत मेधंकर महाथेरो (श्रीलंका), भदंत विनयरक्खिता थेरो (बंगळुरू), डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो (पूर्णा), चंदरबोधी महाथेरो, बुद्धघोष महाथेरो, भंते काश्यप आदी भिक्खू संघाची उपस्थिती होती. याप्रसंगी गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची दीप व धुपाने पूजा करण्यात आली. पुष्पवर्षाव करून भिक्खु प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी बोलतना पोलपिपाट म्हणाले, बुद्ध धम्माच्या वाटचालीसाठी मदतीला थायलंड केव्हाही तयार आहे. उपासकांच्या परिश्रमातून प्रशिक्षण केंद्राची निर्मिती तसेच लोकार्पण करण्यात आले असून बुद्ध धम्माच्या प्रसार-प्रसारासाठी प्रशिक्षित भिक्खुची देशाला गरज होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारत उभा राहणार आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. पुनपिपात यांच्या भाषणाचा अनुवाद डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हिंदीतून केला. त्यानिमित्त उपासिका रोजाना व्हॅनिच-कांबळे, डॉ. हर्षदीप कांबळे, संदीप कांबळे तसेच कांबळे परिवार, नपडोन, अभिन्या, वरादिता यांचा संयोजकांनी सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हार्डवर्क’सोबतच ‘स्मार्टवर्क’ महत्वाचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कोणत्याही क्षेत्रात करिअर करताना सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा, ध्येयनिश्चित करताना 'हार्डवर्क'सोबतच 'स्मार्टवर्क'ही महत्त्वाचे आहे,' असे प्रतिपादन 'युपीएससी' परीक्षेत यश मिळवलेल्या वल्लरी गायकवाड यांनी केले.

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड यासह इतर संघटनांतर्फे रविवारी (२२ जुलै) दहावी, बारावी, पदवी तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वल्लरी गायकवाड यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्त त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, विंग कमांडर टी. आर. जाधव, संभाजी ब्रिगेडचे डॉ. शिवानंद भानुसे, रमेश गायकवाड, डॉ. विजय देशमुख, संगीता भुजंग, प्रा. भाऊसाहेब शिंदे आदी मान्‍यवरांची उपस्थिती होती.

गायकवाड म्हणाल्या की, आज इंटरनेटचा जमाना आहे, सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्‍ध होते. या इंटरनेटच्या युगाचा उपयोग करून घ्या. कोणतेही करिअर करण्यापूर्वी ध्येय निश्चित करा, त्याची योग्य आखणी करा व शंभर टक्के झोकून देऊन मेहनत करा, असा सल्ला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला. आपल्या लोकांनी केलेला सत्कार मोलाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना विश्वंभर गावंडे म्हणाले की, यशाचे शिखर गाठताना प्रत्येक जण इतरांपेक्षा वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. या गुणवंतांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक पाहताना इतर विद्यार्थी प्रेरणा घेऊ शकतील. गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या पाहून मराठी पाऊल पुढे पडत असल्याचा आनंद झाल्याचे गावंडे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले की, यशाच्या ध्यास घेऊन पुढे जाताना नकारात्मक भावना बाजुला सारणे आवश्यक आहे. कोणतेही यश मिळवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता येत नाही. यश आणि अपयशाचाही शिल्पकार आपण स्वत: असतो असेही भानुसे यांनी सांगितले.

\B१२७ जणांचा सत्कार \B

'युपीएससी' परीक्षेत यश मिळवलेल्या एक, 'एमपीएससी' परीक्तेत यश मिळवलेल्या १२, दहावी, बारावी तसेच इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमात यश मिळवलेल्या एकूण १२५ विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेसाठी भाजपचे जिल्ह्यात ‘मायक्रो प्लॅनिंग’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 'मायक्रो प्लॅनिंग'वर भर दिला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे वर्ग, बैठका घेत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम जोमाने सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत ३५० खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ठेवले आहे. युतीमध्ये जे विधानसभा मतदारसंघ भाजप लढवत नाही, तेथे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शिवसेनेने स्वबळाची भाषा यापूर्वीही केली आहे. त्यातच मोदी सरकार विरोधातील अविश्वास ठरावावेळी शिवसेना तटस्थ राहिला. तरीही भाजपने मोठ्या संख्येने ठराव फेटाळला. शिवसेनेसोबतच्या युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, मात्र पक्षसंघटन बांधणी, विस्तार या दिशेने काम सुरू आहे, असे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव आणि शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

\B१४०० बुध बांधणी\B

लोकसभा मतदारसंघातील १७६५ पैकी १४०० बुथची बांधणी भाजपने केली आहे. एका बुथमागे २५ कार्यकर्ते असून बुथ प्रमुख, सहाय्यकाच्या नियुक्त्या केल्या आहेत. पेज प्रमुख, सहाय्यक म्हणून कार्यकर्त्यांची निवडी केली जात आहे. भाजप श्रेष्ठींनी आदेशाने आखलेले 'मायक्रो प्लॅनिंग'यशस्वी होईल, असा दावा केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालाची चढ-उतार बंद; धावत्या ट्रकची संख्या घटली

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालवाहतूकदारांचा संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. वाळूज, शेंद्रा भागातून मालाची वाहतूक शंभर टक्के बंद झाली आहे. याशिवाय कच्च्यामालाची आवकही थांबली आहे. याचा फटका सोमवारपासून उद्योग, व्यवसायावर होण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया मोटार काँग्रेसने शुक्रवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारीही संपात सामील झालेल्या ट्रक चालकांची भेट घेतली. याशिवाय मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती घेतली असता दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रकची संख्याही कमी झाल्याचे आढळले. वाळूज, शेंद्रा भागातून रविवारी मालाची आवक-जावक पूर्णत: थांबली. ट्रकमधून माल उतरवणे बंद झाले आहे. दरम्यान, संपात सहभागी झालेल्या ट्रक चालकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने सोमवारी मागण्यांवर निर्णय दिला नाही, तर मंगळवारपासून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद करण्याचे संकेत देण्यात आले. केंद्र शासनाने शनिवारी टोल नाके व महत्त्वाच्या एन्ट्री पॉइंटवरून ट्रकची माहिती मागवली आहे. संपाचा परिणाम टोल नाका कंत्राटदारांनाही बसला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी औरंगाबादहून मुंबई आणि पुण्याकडे जाणारी मालवाहतूक बंद केली होती. प्रत्येक जिल्ह्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रक थांबवले आहेत. बीड, लातूर, जळगाव, धुळे तसेच इतर मार्गावर जाणारे ट्रक थांबवण्यात आले आहेत.

\Bडिझेल विक्रीत घट \B

मालवाहतूक बंध झाल्याचा परिणाम शहरातील डिझेल विक्रीवर झाला आहे. दररोज सरासरी तीन लाख लिटर डिझेल विकले जात होते. ही विक्री सध्या दीड लाख लिटरवर आली आहे.

………\Bसंप चिघळणार \B

देशात अनेक ठिकाणी संपाला झुगारून मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांच्या ट्रकचे नुकसान करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबाद येथे सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सोमवार पासून ही परिस्थिती चिघळण्याची शक्यता ट्रान्सपोर्टरने व्यक्त केली आहे.

\B…………उद्योगांवर उद्यापासून जाणवेल परिणाम \B

मालवाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा उद्योगावर परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली आहे. वाळूजमधील अनेक उद्योगांना सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त सुटी आहे. त्यामुळे मंगळवारपासून संपाचा परिणाम मोठ्या उद्योगांना जाणवणार आहे.

वाळूज, रेल्वेस्टेशन, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत अनेक मोठे उद्योग आहेत. या उद्योगांना लागणारा कच्चा माल स्टॉकमध्ये ठेवला जातो. मात्र हा स्टॉक चार दिवसांपेक्षा जास्त नसतो. अनेक उद्योगांकडे सोमवारपर्यंत पुरेल एवढा कच्चा माल असू शकतो. मात्र त्यानंतर जर संप सुरूच राहिला तर उद्योगांची अडचण सुरू होणार आहे.

अजून संपाचा परिणाम दिसून आला नाही. मात्र मंगळवारपासून त्याची तीव्रता जाणवायला सुरू होईल. स्टॉक शिल्लक असल्याने आतापर्यंत फारशा अडचणी उद्योगांना आल्या नाहीत.

-राम भोगले, अध्यक्ष सीएमआयए

लघुउद्योजकांच्या मालाचा पुरवठा करण्यास सध्या तरी अडचणी नाहीत. अनेक ठिकाणी मोठ्या ऑर्डर गुरुवारपूर्वी दिल्या गेल्या. मालवाहतूकदारांच्या मागण्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे.

-किशोर राठी, अध्यक्ष मासिआ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेट बँक फोरमच्या मेळाव्यास प्रतिसाद

0
0

औरंगाबाद: स्टेट बँक ऑफ हैदराबाद रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर फोरमच्या वतीने सेवानिवृत कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व मासिक सभा नुकतीच महसूल प्रबोधिनी येथील सभागृहात पार पडली. फोरमतर्फे वर्षभर आरोग्य तपासणी शिबिर, योगाभ्यास, गुणवंताचा सत्कार, असे विविध उपक्रम राबविण्यात आले. याच सभेत प्रसिद्ध गायक प्रसाद साडेकर यांची सूरदरबार मैफल रंगली. साडेकर यांच्यासह कविता वतनी व धनश्री सरदेशपांडे यांनी मैफलीत विविध गीते सादर केली. कलाकारांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोरमचे अध्यक्ष बडवे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी. एम. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व भराडकर, सुभाष येवलेकर, विनय अभ्यंकर, मंगेश देशपांडे, प्रमोद बेंडे, नागेश राव, देगलूरकर, सिद्दिकी व गणोरकर यांनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक शुल्कात निम्मी सवलत

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आर्थिकद्दृष्ट्या मागास घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ असेल, तर निम्मे शुल्क घ्यावे. सवलत असताना पूर्ण शुल्क घेतले असल्यास नियमाप्रमाणे परत करावे, अशी सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना केली आहे. या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याचा अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे. शुल्कात निम्मी सवलत देणे बंधनकारक असताना अनेक महाविद्यालये पूर्ण शुल्क घेत आहेत. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. निम्मे शुल्क भरण्याचा अध्यादेश कुणासाठी आहे, याचा उलगडा प्रशासन करीत नसल्याने संघटनांनी निवेदन देऊन प्रश्न मार्गी ला‌वण्याची मागणी केली. मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची शनिवारी भेट घेतली. महाविद्यालये ईबीसी सवलतीस पात्र विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क वसूल करीत आहेत. शुल्क न दिल्यास प्रवेश नाकारत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाच्या प्रयत्नानंतर शासनाने ईबीसी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्कात सूट दिली, पण, महाविद्यालये परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगून विद्यार्थ्यांकडून शुल्क उकळत आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय सुरू असल्याने संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करावी. तसेच घेतलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. सर्व महाविद्यालयांना शासन निर्णयाची माहिती कळवून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना देण्याचे निर्देश डॉ. तेजनकर यांनी शैक्षणिक विभागाला दिले. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्यासह मनोज गायके, कल्याण शिंदे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, सुनील कोतकर, विजय काकडे आदी उपस्थित होते.

महाविद्यालयांनी शासन निर्णयाची अंमलबजवाणी करावी यासाठी सूचना देण्यात येतील. याबाबतचे पत्र सोमवारी सर्वांना देणार असून, त्यानंतर तक्रारी आल्यास कारवाई करण्यात येईल.

- डॉ. अशोक तेजनकर, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनुभवले चंद्रावरील पहिले पाऊल

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. यानिमित्त अंतराळ विश्वाची सैर घडवणारे पाच माहितीपट दाखवण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

महात्मा गांधी मिशनच्या ए. पी. जे. अब्दुल कलाम विज्ञान केंद्राच्या वतीने 'मानवाची चंद्रझेप - सुवर्ण महोत्सवी वर्षाचा' उपक्रम घेण्यात आला. एमजीएम कॅम्पसमधील आइन्स्टाइन सभागृहात रविवारी सकाळी हा उपक्रम झाला. मानवाने २१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. या घटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. यानिमित्त विज्ञान केंद्राने पाच माहितीपट दाखवले. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांनी उपक्रमाचे उदघाटन केले. यावेळी केंद्र संचालक श्रीनिवास औंधकर, समन्वयक भाग्यश्री केंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रावर उतरलेल्या एईगल या चांद्रयानाच्या प्रतिकृतीचे कदम यांनी अनावरण केले. वर्षभरात रॉकेट निर्मिती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध अंतराळ यान निर्मिती कार्यशाळा घेण्यात येईल, असे औंधकर यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. अशोक क्षिरसागर यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\Bमाहितीपटांना प्रतिसाद

\Bया उपक्रमात 'नासा'कडून मिळालेले पाच माहितीपट दाखवण्यात आले. या माहितीपटात चंद्रावर गेलेल्या रॉकेटची निर्मिती, चांद्रयान, स्पेस सूट, इगल यान व चंद्र बग्गीबद्दल माहिती आहे. या माहितीपटामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विश्वाची सैर घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कट प्रॅक्टिस विधेयकास तिसऱ्यांदा ‘कट’

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कट प्रॅक्टिस'ला प्रतिबंध करणारा आणि दोषींना सक्तमजुरीपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असणारा बहुप्रतिक्षित कट प्रॅक्टिस कायद्याचा मसुदा अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न तिसऱ्यांदा निष्फळ ठरला. विधी व न्याय विभागाने उपस्थित केलेल्या शंका व काढलेल्या त्रुटींचे समाधान होऊ न शकल्याने विधी व न्याय विभागाकडून मसुद्याला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे हा मसुदा अधिवेशनात मांडला नसल्याचे सांगण्यात आले. त्रुटी दूर करण्यासाठी लवकरच समिती स्थापन केली जाणार आहे.

मुंबईच्या 'एशियन हार्ट इन्स्टिट्यूट'चे प्रख्यात डॉ. रमाकांत पांडा यांनी कट प्रॅक्टिसला कडाडून विरोध करीत 'ऑनेस्ट ओपिनियन, नो कमिशन टू डॉक्टर्स' असे बॅनर मागच्या वर्षी मुंबईच्या मुख्य रस्त्यावर लावले होते. त्यामुळे वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. पांडा यांनी आरोग्य मंत्र्यांसह वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही कट प्रॅक्टिसविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष समिती स्थापन करून कट प्रॅक्टिसविरुद्ध कायदा करता येऊ शकतो का, याची चाचपणी केली. तसेच या कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा, या संदर्भात सूचना करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यातील विविध सूचनांचा समावेश प्रत्यक्ष कायद्याच्या मसुद्यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर मागच्या वर्षीच्या पावसाळी तसेच हिवाळी अधिवेशनातही कायद्याचा मसुदा मांडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र विधी व न्याय विभागाकडून मसुद्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी काढण्यात आल्याने मसुद्याला अंतिम मजुरी मिळाली नाही. परिणामी, अधिवेशनात मसुदा सादर झालाच नाही. त्यामुळेच यंदा तरी मसुदा अधिवेशनात मांडला जाऊन त्यावर साधक-बाधक चर्चा होणार का, या मसुद्याला कायद्याचे स्वरुप येणार का आदींविषयी शंका घेतली जात होती. ही शंका पुन्हा खरी ठरली आहे.

या कायद्यासंदर्भात विधी व न्याय विभागाने उपस्थित केलेल्या विविध शंका व काढलेल्या त्रुटींबाबत विधी विभागाचे समाधान हे राज्याच्या वैद्यकीय विभागाकडून होऊ शकले नाही. त्यामुळेच मसुद्याला विभागाकडून अंतिम मंजुरी मिळाली नाही. परिणामी, सलग तिसऱ्यावेळी कायद्याचा मसुदा अधिवेशनात मांडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.

\Bगरज पटवण्यात अपयश?

\B

थेट कट प्रॅक्टिसला प्रतिबंध करणारा कोणताही कायदा आजपर्यंत नसला तरी या प्रकारच्या गुन्ह्यासाठी यापूर्वीच्या कायद्यान्वये शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे जुन्या कायद्यात शिक्षेची तरतूद असल्याने नव्या कायद्याचीच गरज काय, असा प्रश्न विधी विभागाकडून उपस्थित केला जात आहे. तसेच दोन-दोन कायद्यांमुळे गोंधळ उडू शकतो व विसंगती निर्माण होऊ शकते. त्याचवेळी यापूर्वीच्या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल, तर नव्या कायद्याची अंमलबजावणी होईल कशावरून, असाही सवाल विधी विभागाकडून उपस्थित केला जात असल्याचे समजते. त्यामुळेच नव्या कायद्याची गरज पटवून देता येत नाही, तोपर्यंत मसुद्याला मान्यता मिळण्याची शक्यता कमीच दिसते. हे काम स्थापन होणाऱ्या समितीकडून होणे अपेक्षित आहे.

विधी विभागाकडून काढण्यात आलेल्या त्रुटींचे समाधान होऊ शकले नाही म्हणूनच मसुद्याला अंतिम मंजुरी मिळू शकलेली नाही. या त्रुटी दूर करण्यासाठी व कट प्रॅक्टिसला प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज पटवून देण्याच्या हेतुने येत्या आठ दिवसांत समिती स्थापन होणार आहे. सर्व त्रुटी व शंका दूर करण्याचे काम ही समिती करेल. येत्या हिवाळी अधिवेशनात मसुदा सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, डीएमईआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गिरजा प्रकल्पात धांड नदीचे पाणी वळते करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

गिरजा प्रकलापात धांड नदीचे पाणी वळते करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस कार्यवाही करावी, त्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून खुलताबाद तसेच फुलंब्री तालुक्यातील तहानलेल्या ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते विलास गुजर यांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याप्रश्नी शासकीय स्तरावर केवळ चर्चा होत आहे, ठोस काहीच होत नसल्याचा आरोपही त्यांनी 'मटा'शी बोलताना केला.

गिरजा प्रकल्प १९८७ साली पूर्ण करण्यात आलेला असून सन १९९०-९१ मध्ये व्यवस्थापनाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. सन १९९०-९०१ ते २०१५-१६ या कालावधीत गिरजा मध्यम प्रकल्प फक्त दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरलेला असून चार वेळा ७५ टक्केच्या वर पाणीसाठा धरणात झाला होता. उर्वरित १९ वर्षे धरण ७५ टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने भरले असून यामध्ये ७ वर्षे धरणात काहीच पाणी नव्हते.

गिरीजा प्रकल्पाच्या उत्तर दिशेला साधारण ४.५० किलोमीटर अंतरावर धांड नदी असून सदर नदीला साधारणत: दरवर्षी पूर येऊन पुराचे पाणी वाहून जाते. त्यामुळे धांड नदीचे पाणी गिरजा प्रकल्प जोड कालव्याव्दारे वळविण्यात आले तर गिरजा प्रकल्पात पाणीसाठा वाढेल आणि त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल, असे गुजर यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. दरम्यान, ही योजना शासनस्तरावर प्रस्तावित आहे. प्राथमिक पाहणी व सर्वेक्षणामध्ये धांड नदीवरील बाजारसावंगीपासून पाणी वळविणे शक्य असल्याचे समोर आले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही झाल्यास खुलताबाद तालुक्याचा व फुलंब्री शहराचा पाण्याचा प्रश्न सुटून सिंचन क्षेत्रात वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले, पण गेल्या अनेक वर्षांत त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने योजनेला गती मिळत नाही, असा आरोप गुजर यांनी करत योजनेला गती देण्यासाठी ठोस कार्यवाही करा, अशी मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साई भक्तांसाठी विशेष रेल्वे

0
0

औरंगाबाद : शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी हैदराबाद-नगरसोल-हैदराबाद विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे एक फेरी पूर्ण करेल. रेल्वे क्रमांक ०७०६४ हैदराबाद-नगरसोल रेल्वे २६ जुलै रोजी हैदराबाद येथून दुपारी ०३.१५ वाजता सुटून निजामाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे नगरसोल येथे २७ जुलै रोजी सकाळी ०५.५० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्रमांक ०७०६३ नगरसोल येथून २९ जुलै रोजी सायंकाळी ०५.३० वाजता सुटून ३० जुलै रोजी सकाळी ०८.३० वाजता हैदराबाद येथे पोहोचेल.

ही रेल्वे सिकंदराबाद, मलकाजगिरी, मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर आणि रोटेगाव यास्थानकावर थांबेल. या रेल्वेला १९ डब्बे असून त्यापैकी १५ द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि एक द्वितीय श्रेणी वातानुकूलित, दोन डब्बे साधारण श्रेणीचे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलावर उगवली झाडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील पाचही उड्डाणपुलांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बहुतांश उड्डाणपुलांवर झाडे उगवली आहेत. सिडको बसस्टँडजवळील उड्डाणपुलावर तर चक्क मोठे झाड वाढले आहे. सरकारी यंत्रणा मात्र एकमेकांकडे बोट दाखविण्यावर भर देत आहे.

जालना रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एकात्मिक रस्ते विकास योजनेतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सेव्हन हिल, सिडको बसस्टँड, मोंढा नाका, क्रांतीचौक आणि महावीर चौक या पाच ठिकाणी उड्डाणपूल बांधले. एमएसआरडीसीने बांधलेले उड्डाणपूल महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित केल्याचा दावा केला आहे. परिणामी, उड्डाणपुलाची देखभाल व दुरुस्ती महापालिका प्रशासनाकडे आली. मात्र महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे कायम बोट दाखवत असते. उड्डाणपुलांच्या उभारणीनंतर कंत्राटदाराला दोष निवारण कालावधी दिलेला असतो. सेव्हन हिल उड्डाणपूल जुना आहे. मात्र उर्वरित चारपैकी काही उड्डाणपुलांचा दोषनिवारण कालावधी अद्याप संपायचा आहे. परिणामी, एमएसआरडीसीने कंत्राटदारांना सांगून उड्डाणपुलांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासनही त्याकडे लक्ष देत नाही. उड्डाणपुलांची स्वच्छता केली जात नसल्याने सर्व पुलांखाली घाण साचली आहे. पुलांवरील रस्त्यावर झाडे उगवल्याने सरकारी यंत्रणांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

उड्डाणपुलांवर गवत उगवणे नवीन नाही पण चक्क झाडे उगवल्याने भविष्यात अडचणी उद्भवणार आहेत. एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता सुनील देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. महापालिकेचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांना विचारले असता ते म्हणाले, की उड्डाणपूल अजून महापालिकेकडे हस्तांतरित झाले की नाही याबाबत माझ्याकडे माहिती नाही, असे सांगितले.

\B१५ ऑक्टोबरनंतरच दुरुस्ती \B

उड्डाणपुलांच्या खालचे रस्ते तर पूर्णपणे उखडलेले आहेत. जालना रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आली आहे. आता पावसाळा सुरू असल्याने १५ ऑक्टोबरनंतरच जालना रोडच्या दुरुस्तीला सुरुवात होईल. पण आहे त्या रस्त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची अक्षरश: वाट लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images