Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कचरा टाकण्याच्या दोन साइट बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातून गोळा करण्यात आलेला कचरा टाकण्यासाठी पडेगाव आणि हर्सूल येथील जागा नागरिकांच्या विरोधामुळे बंद असल्याने महापालिकेची भिस्त आता चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील जागांवरच आहे. गेल्या दोन दिवसात पडेगाव येथे कचरा टाकलेला नाही.

वर्गीकरण केलेला कचरा टाकण्यासाठी संनियंत्रण समितीने हर्सूल-सावंगी, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर कचरा टाकून प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रक्रिया करणारी यंत्रे अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे कचरा पडून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने कचरा टाकण्यासाठी नागरिकांकडून विरोध होत आहे. त्याचा परिणाम म्हणून हर्सूल-सावंगी येथील जागेवर कचरा टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून बंदच आहे. पडेगाव येथील जागेवर पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आला, पण त्यानंतर दोन दिवसांपासून या ठिकाणी देखील कचरा पाठवण्यात आला नाही. या प्रकारामुळे चिकलठाणा आणि कांचनवाडी येथील जागांवरच कचरा टाकण्याचा पर्याय महापालिकेच्या समोर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कांचनवाडी येथील जागेवर दररोज वीस ट्रक कचरा टाकला जात आहे. चिकलठाणा येथील दुग्धनगरीच्या जागेवरही कचरा टाकला जात आहे. येथे कचऱ्यावर बायोकल्चरची प्रक्रिया केली जात आहे. हर्सूल-सावंगी आणि पडेगाव येथील जागांवर कचरा टाकणे सुरू झाल्यास शहरातील कचरा साचण्याचे प्रमाण कमी होईल, असे मानले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मानव संमेलनाचा २७ पासून आयोजन

$
0
0

औरंगाबाद: अक्षर मानव या संस्थेतर्फे येत्या २७ जुलैपासून तीन दिवसीय मानव संमेलनाचे आयोजित केले आहे, अशी माहिती संस्थेचे मराठवाडा अध्यक्ष सुरेश सिरसीकर यांनी दिली. हे संमेलन खुलताबाद येथे २७ ते २९ जुलै दरम्यान होणार आहे. प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्यासह साहित्यिक, विचारवंत, शिक्षण, समाजसेवा, चित्रपट, नाट्यक्षेत्रातील नामंकित मंडळी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याकार्यक्रमाच्या माध्यमातून जातपात, धर्म, भाषा या पलिकडे जाऊन माणसं माणसांशी जोडली जावीत, हा यामागील हेतू असल्याचे सिरसीकर यांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन रिक्षा स्टॅण्ड; महापालिका ढिम्म

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने रिक्षा स्टॅण्डची गरज निर्माण झाली आहे. शहर वाहतूक पोलिस व खासगी संस्थेतर्फे करण्यात आलेल्या रिक्षा स्टँण्ड सर्वेक्षण अहवाल महापालिकेला देण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेने अद्याप रिक्षा स्टॅण्ड निर्माण केले नाहीत, अशी पोलिस विभागाकडून देण्यात आली.

शहरातील कचरा, रस्त्यांवरील खड्डे यासोबतच रिक्षा स्टॅण्ड हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. शहरातील वाढत्या रिक्षांच्या संख्येचा विचार करून रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी तत्कालीन वाहतूक पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या कार्यकाळात शहर क्रमांक एकमधील रस्त्यांवरून धावणाऱ्या रिक्षा, प्रवासी संख्या, तात्पुरते रिक्षा थांबे याची संपूर्ण माहिती घेण्यात आली होती. याचा सर्वेक्षण अहवाल शहर वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिला होता, अशी माहिती मधुकर सावंत यांनी पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या सर्वेक्षण अहवालानुसार १२५ रिक्षा स्टॅण्डच्या ठिकाणी फलक लावण्याची मागणी शहर पोलिसांनी केली होती. पण, त्याला चार महिने उलटूनही रिक्षा स्टॅण्डबद्दल कोणताच निर्णय पालिकेने घेतलेला नाही. त्यामुळे रिक्षांमुळे होणारी वाहतूककोंडी अद्यापही कायम आहे.

…………

\Bसंयुक्त सर्वेक्षणाचा अद्याप प्रतीक्षा \B

रिक्षा स्टॅण्ड देण्यासाठी शहर वाहतूक पोलिस, आरटीओ, महापालिका आणि रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीसोबत शहरात सर्वेक्षण करण्याची पद्धत आहे. ही समिती कोणत्या ठिकाणी रिक्षा स्टॅण्ड दिले जाऊ शकतात याचा अभ्यास करून रिक्षा थांबे निश्चित करतात. अशा एकाही समितीचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाला लुटणारे १२ तासात जेरबंद

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद :

मुलाखतीसाठी जात असलेल्या एका तरुणाला रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवून लुटण्याची घटना १९ जुलै रोजी कैलासनगर भागात घडली होती. या प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिन्सी पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास करून प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराला अवघ्या १२ तासांत अटक केली. गणेश प्रेमदास पवार (२०, रा. ढाकेफळ तांडा, ता. घनसावंगी, जि. जालना) आणि दीपक अरुण गायकवाड (२५, रा. बार्शीनाका, बीड, दोघेही ह. मु. गल्ली क्र. २, हनुमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

या प्रकरणात जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यात राहणारा विकास भगवान चाटे (२०, रा. मेव्हणाराजा, ता. देऊळगाव राजा) हा विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. नाशिकच्या इंडियन फॅशन असोसिएशन कंपनीत त्याची २० जुलै रोजी सकाळी मुलाखत होती. त्यासाठी तो १९ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कारंजा-औरंगाबाद एसटीने निघून सिडको बसस्थानकावर रात्री पावणेअकराच्या सुमारास पोहोचला. तेथून मध्यवर्ती बसस्थानकावर जायचे असल्याने तो गणेश पवार याच्या एलपीजी रिक्षात (एमएच-२०-ईएफ-३७२९) बसला. त्यावेळी रिक्षा चालक गणेशचा साथीदार दीपक गायकवाड हा देखील त्याच्यासोबत होता. गणेशने मध्यवर्ती बसस्थानकाकडे घेऊन जात असल्याचे सांगत विकासला कैलासनगरातील स्मशानभूमीतील मोकळ्या मैदानात आणले. तेथे पवार आणि गायकवाडने त्याला चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांनी खिशातील मोबाइल, तीन हजार रुपये, शैक्षणिक कागदपत्रे आणि कपडे असलेली बॅग हिसकावत पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर विकासने जिन्सी पोलिस ठाणे गाठून तिथे तक्रार नोंदविली.

असा लागला शोध

जिन्सी पोलिसांनी विकासकडे दोघांबाबत माहिती विचारली असता त्याने रिक्षात चालकाच्या हॅन्डलसमोर साईबाबांची मूर्ती असल्याचे सांगितले. तसेच हे दोघेही तुटकीफुटकी हिंदी भाषा बोलत असल्याचे सांगितले. लुटणारे दोघे जण मराठीच असल्याचे सांगितले. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, साईनाथ गिते, उपनिरीक्षक शेख रफीक, जमादार शेख हारुण, संपत राठोड, संजय गावंडे, गणेश नागरे, सुनील जाधव आणि बाळू थोरात यांनी खबऱ्यांना कामाला लावले. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दोघांना आकाशवाणी चौकात रिक्षासह पकडण्यात आले.

दोघांकडून साहित्य जप्त

रिक्षा प्रवासी विकासकडून लुटलेले दोन्ही मोबाइल, शैक्षणिक कागदपत्रे, बॅग, कपडे, नऊशे रुपये रोख आणि रिक्षा जप्त केली आहे. पवार आणि गायकवाड हे शेजारी शेजारी रहातात. त्यापैकी गायकवाड हा सेंट्रिंगचे काम करतो, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनी हिसकावलेली उर्वरित रक्कम कोठे खर्च केली, तसेच यापूर्वी त्यांनी आणखी कोणाला लुटले आहे का, याची माहिती पोलिस घेत असून असे अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यातील आमदारांविरुद्ध बोंब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासंदर्भात निवेदन करावे अशी मुख्यमंत्र्यांकडे एकाही आमदाराने मागणी न केल्यामुळे सर्व आमदार तसेच मंत्र्यांच्या विरुद्ध रविवारी (२२ जुलै) आंदोलकांनी बोंब मारली. हे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनात करण्यात आले.

राज्यभरातील मराठा समाजाने सर्वच आमदारांना मतदान केले आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या संदर्भात सभागृहात एकाही आमदाराने मुख्यमंत्र्यांना आरक्षणाबाबत निवेदन करण्याची विनंती केली नाही. त्यामुळे आमदारांविरुद्ध बोंब मारण्यात आली असल्याचे अभिजित देशमुख, रवींद्र काळे तसेच आप्पासाहेब कुढेकर यांनी सांगितले. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य सरकारच्या वतीने केली जाणारी मेगा भरती रद्द करावी, अशी मागणी करत शनिवारपासून क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे. सकाळपासून क्रांती चौकात तरूण कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

\Bआमदार भुमरे यांना विचारला जाब

\B

आंदोलकांची भेट घेण्यासाठी पैठणचे आमदार संदीपान भुमरे दुपारी आले असता त्यांना तरूण कार्यकर्ते तसेच महिलांनी आरक्षणासंदर्भात सभागृहात आवाज का उठवला नाही, मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यासाठी का विचाले नाही, असा जाब विचारला. यावर भुमरे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही तुमच्यासोबत आहोत सभागृहात प्रत्येकाला बोलायला संधी मिळत नाही. मात्र येणाऱ्या काळात सर्व मराठा आमदार एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेटके यांच्यावर कारवाई?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन विभागाने दोन अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी समिती सोमवारी (२३ जुलै) दुपारी अहवाल सादर करणार आहे. या अहवालानुसार प्रभारी परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. चौकशी अहवाल तातडीने सादर करण्यासाठी विविध संघटनांनी जोरदार आंदोलन केले होते.

विद्यापीठाचा परीक्षा विभाग टीकेचे लक्ष्य ठरला आहे. दोन अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. दिगंबर नेटके यांना भोवले आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. दोन दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. तर उत्कर्ष पॅनल आणि इतर संघटनांनी धरणे आंदोलन केले होते. परीक्षा विभाग आणि इतर प्रशासकीय निर्णय वादग्रस्त ठरल्यामुळे जोरदार आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त केली. प्रभारी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. मजहर फारुकी आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्या समितीने पदवी प्रकरणाचा अहवाल तयार केला आहे. मागील आठ दिवसांपासून समिती सविस्तर माहिती घेत होती. परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. संगणकीय चुकीमुळे आठ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती पदवी तयार करणाऱ्या कंपनीला पाठवली गेली. ही तांत्रिक चूक समितीच्या निदर्शनास आली. यानुसार समितीने अहवाल तयार केला आहे. दोन विद्यार्थ्यांना दिलेली पदवी प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. मात्र, चुकीला जबाबदार धरत डॉ. नेटके यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत समितीने निरीक्षण नोंदवले आहे.

\Bकर्मचारी आक्रमक होण्याची चिन्हे

\Bया प्रकरणात दोन पदवी दिलेल्या बजाजनगर येथील हायटेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्सच्या प्राचार्यांचाही जबाब घेण्यात आला आहे. चौकशी अहवालासाठी दबाव वाढला असून समिती सोमवारी अहवाल सादर करणार आहे. सध्या परीक्षा विभागाचे कर्मचारी नेटके यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कामगारांच्या संपाला कोर्टाचे वेसन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेतनवाढीवर नाराजी व्यक्त करत ऐन आषाढी एकादशीच्या काळात आंदोलन करण्याचे संकेत एसटी कामगारांकडून मिळाले होते. या आधारावर एस. महामंडळ प्रशासनाने थेट कामगार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एसटी कामगार व संघटनांना आंदोलन करू नये, असा आदेश दिला आहगे. शिवाय वेतन कराराबाबत मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी चर्चा करण्याचे आदेश दिले.

वेतन कराराबाबत कामगारांमधील नाराजीची माहिती घेण्यासाठी एसटी कामगार संघटनेचे सचिव हनुमंत ताठे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी रविवारी (२२ जुलै) कामगार भवनमध्ये बैठक घेतली. यावेळी ताठे यांना न्यायालयाच्या आदेशाची माहिती विचारली असता, त्यांनी न्यायालयाचा पूर्ण निकाल हाती यायचा असल्याचे सांगितले. मात्र, संघटनेच्या वकिलाने दिली आहे, त्यानुसार एसटी कामगार संघटनेला आषाढी एकादशी यात्रेदरम्यान आंदोलन न करण्याचे व महामंडळ प्रशासनाला मान्यताप्राप्त संघटनेसोबत वेतनवाढीताल त्रुटी दूर करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार, संघटना चर्चेसाठी तयार असल्याचे ताठे यांनी सांगितले.

…………

\Bचर्चा फिसकटल्यास संपाची परवानगी मागणार \B

न्यायालयाच्या आदेशानुसार, संघटना महामंडळ प्रशासनासमोर बाजू मांडणार आहोत. प्रशासनाने घोषित केलेल्या कराराच्या रकमेत कामगारांना जास्तीत जास्त लाभ घेता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. महामंडळाने प्रशासनाला बोलावले नाही, तर न्यायालयात जाऊन संपाची रितसर परवानगी मागू, अशी माहिती एसटी कामगार संघटनेचे सचिव ताठे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात भुरभूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरात रविवारीही दुपारपर्यंत रिमझिम सरी कोसळल्या. शहराच्या विविध भागात सकाळपासून सुरू असलेला पाऊस दुपारपर्यंत सुरू होता.

मराठवाड्यात एकीकडे दमदार पाऊस होत असताना औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यात अद्यापही बड्या पावसाची प्रतीक्षा आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, सकाळी दहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शहरातील सिडको, हडको, हर्सूल, गारखेडा परिसर, चिकलठाणा, मुकुंदवाडी, विद्यापीठ परिसर, सातारा परिसर तसेच जुन्या शहर परिसरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात जून महिन्यापासून ६७.२ टक्के पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुनलेत या पावसाचे मोजमाप केवळ १६. ८ टक्के आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत ८१.५, परभणी ९७.७, हिंगोली १२७.७, नांदेड ११५.८, बीड ७९.९, लातूर ११२.८, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १०१.५ टक्के पाऊस झाला आहे. सर्व जिल्ह्यांच्या तुलने सर्वात कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभिमत विद्यापीठांच्या शुल्कांना चाप

$
0
0

अशी आहे शुल्कांची कुऱ्हाड

एमबीबीएस.......................१७ ते २७ लाख रुपये (प्रती वर्ष)

एमडी-एमएस (पीजी).........१ ते ३ कोटी रुपये (प्रती वर्ष)

Nikhil.Nirkhee@timesgroup.com

Tweet-@nnirkheeMT

औरंगाबाद : अभिमत विद्यापीठांच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी 'यूजीसी'ने समिती स्थापन केली असून, समितीद्वारे अभिमत विद्यापीठांच्या शुल्कांवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे मानव साधन संपत्ती विकास राज्य मंत्री सत्यपाल सिंग यांनी नुकतेच राज्यभेत सांगितले. त्यामुळेच येत्या काळात अभिमत विद्यापीठांच्या एमबीबीएस; तसेच एमडी-एमएस अभ्यासक्रमांच्या शुल्कावर नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात, राज्य शुल्क नियंत्रण समितीमार्फत या शुल्कांवर नियंत्रण आणण्यात अपयश आले असतानाच 'यूजीसी'च्या समितीमार्फत नियंत्रण आणण्यात कितीपत यश मिळेल, असाही सवाल उपस्थित होत आहे.

देशातील अभिमत विद्यापीठाच्या एमबीबीएस, एमडी-एमएस अभ्यासक्रमांसाठी लाखो-कोट्यवधींचे शुल्क आकारले जाते. सूत्रांनुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी दरवर्षी किमान १७ ते २७ लाख रुपये शुल्क आकारले जाते, तर पीजी अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी किमान एक ते तीन कोटी रुपये शुल्क आकारले जाते. त्याखालोखाल 'बीडीएस' व 'एमडीएस' अभ्यासक्रमांसाठी शुल्क आकारले जाते. त्याशिवाय डोनेशनच्या नावाखाली लाखो रुपये आकारले जातात ते वेगळेच. या शुल्कांवर नियंत्रण येण्यासाठीच 'यूजीसी'मार्फत समिती स्थापन झाल्याची माहिती राज्य सभेत देण्यात आली आहे. या समितीमध्ये 'एम्स'चे माजी संचालक डॉ. आर. सी. डेका, मानव साधन संपत्ती विकास मंत्रालयाचे माजी अतिरिक्त सचिव एस. के. राय, बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवनाले आदींचा समावेश असून, समितीची लवकरच बैठक होणार असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. समितीचा नेमका उद्देश, कार्य, भूमिका हे पहिल्या बैठकीनंतरच स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

\B५० टक्के शुल्कांचे अधिकार कॉलेजांना?\B

'नॅशनल मेडिकल कमिशन' (एनएमसी) बिल पास झाले तर खासगी मेडिकल कॉलेजांना ५० टक्के विद्यार्थ्यांचे शुल्क आकारण्याचे अधिकार मिळणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहेत. त्यामुळेच 'एनएमसी'ला 'आयएमए'कडून कडाडून विरोध होत आहे. त्यातच 'एनएमसी'संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने सुचवलेल्या सुमारे २४ बदलांपैकी अगदीच किरकोळ बदल करण्यात आले आहेत आणि त्याला देशभरात कडाडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभिमत विद्यापीठांचे शुल्क हे सामान्यच नव्हे, तर उच्च मध्यमर्गीयांच्याही आवाक्याबाहेर आहेत. मात्र राज्य शुल्क नियंत्रण समितीला शुल्कांवर नियंत्रण आणता आले नाही, मग 'यूजीसी'च्या समितीला नियंत्रण आणता येईल कशावरून? मु‍ळात 'यूजीसी' बरखास्त करण्यात घाट घातला जात आहे. 'एनएमसी'विरोधाचे एक महत्त्वाचे कारण शुल्कच आहे.

- डॉ. रवी वानखेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठलपूजा ‘वर्षा’वरच

$
0
0

माझ्यावर दगडफेक करून आरक्षण मिळणार असेल, तर त्यास माझी तयारी आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही. पुरोगामी म्हणवणाऱ्यांचा बुरखा फाटलाय...

वारकऱ्यांमध्ये साप सोडणे, चेंगराचेंगरीतून जीविताला हानी पोहोचवण्याचे मनसुबे आहेत. हे अतिशय वाईट आहे. पुरोगामी महाराष्ट्राला लज्जा आणणारा हा प्रकार आहे...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील शासकीय महापूजेला मुख्यमंत्र्यांना येऊ न देण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिल्याने आंदोलनाच्या भीतीमुळे लक्षावधी वारकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच रविवारी दूर केली. 'आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आपण पंढरपूरच्या महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे', असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. 'काही संघटनांची वारीच्या संदर्भातील भूमिका अत्यंत चुकीची आहे. वारी ही राजकीय व सामाजिक अभिनिवेशापलीकडे असली पाहिजे', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी इशारेबाजांचे कान टोचले.

'सातशे वर्षांपासून महाराष्ट्रात वारीची परंपरा आहे. वारीला छत्रपती शिवाजी महाराजांनीही संरक्षण दिले होते. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे. ही महापूजा राज्यातील १२ कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री करतात. विठ्ठलाचा सेवक म्हणून हा मान मुख्यमंत्र्यांना असतो. पण मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत ७६ हजार पदांची मेगाभरती रद्द करण्याची मागणी करून मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला येऊ देणार नाही, ही काही संघटनांची भूमिका चुकीची आहे', असे फडणवीस म्हणाले. 'महापूजेपासून मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखू शकत नाही. परंतु १० लाख वारकऱ्यांच्या जिवाला धोका होईल, असे प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांकडून तसे संदेश प्राप्त झाले, त्यात वारकऱ्यांमध्ये साप सोडणे, चेंगराचेंगरी होऊन जीविताला हानी पोहोचवण्याचे मनसुबे असून, हे अतिशय वाईट आहे. पुरोगामी महाराष्ट्राला लज्जा आणणारा प्रकार आहे. वारकऱ्यांना धक्का जरी लागला तरी, महाराष्ट्राला कोणी माफ करणार नाही. माझ्या विठ्ठलाची पूजा मी माझ्या घरीही करू शकतो. परंतु अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा प्रकार चुकीचा आहे. वारकऱ्यांना वेठीस धरणारा हा प्रकार आहे. असे लोक छत्रपतींचे मावळे असूच शकत नाही', असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत...

'मराठा आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयात प्रलंबित असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्ग आयोग नेमला आहे. दुर्दैवाने त्या आयोगाच्या अध्यक्षांचे निधन झाले. आता दुसरे अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. जनसुनावणी होऊन काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पाहता पुढचा निर्णय न्यायालयातच होईल. तरीही काही पक्ष, संघटना तेढ निर्माण करण्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा धोक्यात आणत आहेत', असे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणले.

सरकारी भरतीबाबत...

'राज्यात ७२ हजार पदांच्या मेगाभरतीतील १६ टक्के जागा अनुशेषातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेगाभरती थांबली तर एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गाचे नुकसान होईल. खुल्या प्रवर्गातून जे मराठा युवक नोकरीत लागतील, त्यांचेही नुकसान होईल. शाहू, फुले, बाबासाहेब आंबेडकर, शिवरायांचे नाव घेणाऱ्या पण त्यांच्याच विचारांना हरताळ फासणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही', असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोज एक कोटींचा मालमत्ता कर वसूल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दररोज एक कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मालमत्तांच्या सर्वेक्षणासोबतच वसुलीचे काम देखील करा, असे निर्देश त्यांनी दिले.

मालमत्ता कर वसुलीसाठी शनिवारी पालिकेच्या मुख्य सभागृहात महापौरांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी उपमहापौर विजय औताडे, स्थायी समिती सभापती रेणुकादास (राजू) वैद्य, नगरसेवक नितीन साळवी, मनोज बल्लाळ, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. पी. कुलकर्णी, कर निर्धारक व संकलक वसंत निकम, उपायुक्त महावीर पाटणी, गुंठेवारी विभागप्रमुख जयंत खरवडकर उपस्थित होते. दररोज एक कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टिने नियोजन करा. मालमत्ता सर्वेक्षणासोबतच वसुलीचे कामही झाले पाहिजे. कर आकारणी बाबत वाद, खटले निकाली काढण्यासाठी कर आदालतीचे आयोजन करावे, तीन दिवसात एका कर्मचाऱ्याने किमान २५ मालमत्तांचे सर्वेक्षण करून वसुली करावी. थकबाकी वसुलीसाठी मालमत्तांची जप्तीची कार्यवाही १५ दिवसांत सुरू करावी.मोबाइल टॉवर, व्यायसायिक कर आकारणीबाबतचे खटले न्यायालयाबाहेर सोडवण्याचा प्रयत्न करावा, यासाठी न्यायालयाची मान्यता घेवून कर अदालतीचे आयोजन करावे, आदी सूचना त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महेश अर्बन बँकेच्या मॅनेजरची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

दहा दिवसांपूर्वी अजिंठा अर्बन बँकेच्या व्यवस्थापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकाने सोमवारी (२३ जुलै) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. शहरातील सिडको एन-तीन परिसरात सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली. मात्र आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

अशोककुमार माहेश्‍वरी (५८, रा. प्लॉट क्र. १४२, एन-३, सिडको) असे आत्महत्या केलेल्या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. या संदर्भात पुंडलिकनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोककुमार यांची पत्नी कामानिमित्त जालना येथे गेली होती, तर मुलगा नोकरीनिमित्त बाहेरच असतो. घरात कोणीही नसताना सोमवारी अशोककुमार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, कामानिमित्त पत्नीने त्यांना फोन केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांच्या पत्नीने शेजारच्यांना फोन करून घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी आतून दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर अशोककुमार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह घाटीत हलविला. मात्र उशीर झाल्याने मंगळवारी शवविच्छेदन होणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात तगडा बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद

एका आंदोलकाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाल्याने शहर व जिल्ह्यात कडेकोड पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोमवारी दुपारी नक्षत्रवाडीमध्ये एका बसवर अज्ञात जमावाने तुफान दगडफेक केली. क्रांती चौकातील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनस्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी ठाण मांडून बसले आहेत.

काकासाहेब शिंदे यांनी कायगाव टोका येथे गोदावरीत उडी मारून सोमवारी दुपारी जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन भडकले आहे. परिणामी, क्रांती चौकातील आंदोलनस्थळी सायंकाळी बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, एसीपी रामेश्वर थोरात, डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, अनिल आडे यांच्यासह दंगा काबु पथक तैनात करण्यात आले. नक्षत्रवाडी येथे दगडफेकीत बसच्या मागील काचा फुटल्या. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थीती आटोक्यात आणली.

शहरात काही अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. शहरात फिक्स पॉइंट वाढवले असून गस्त वाढवली आहे. स्ट्रायकिंग फोर्स सज्ज आहे.

-डॉ. दीपाली धाटे घाडगे, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायगावचा पूल सहा तास बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर कायगाव टोका येथील पुलावरील वाहतूक संतप्त आंदोलनकांनी सोमवारी (२३ जुलै) दुपारी रोखली. त्यामुळे दुपारी दोन वाजेपासून ते रात्री आठपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहिली. परिणामी, पुलाच्या दोन्ही बाजुने दहा किलोमिटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण पोलिसांनी वाहतूक वळविल्यानंतरही औरंगाबाद-नगर रोडवरील वाहतूक सहा तास ठप्प झाली.

औरंगाबाद ते नगर मार्गावर गोदावरी नदीवर हा पूल आहे. येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शिंदे यांनी जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलकांनी पुलाचा ताबा घेतल्याने पोलिसांना रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. आंदोलनामुळे एकीकडे भेंडाळा फाट्यापर्यंत, तर दुसरीकडे देवगडपर्यंत वाहनांची रांग लागली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देईपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

………………

\B२००६ नंतर पूल बंद

\B

गोदावरी नदीला आलेल्या पुरामूळे २००६मध्ये कायगाव टोका येथील पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याच्या तब्बल बारा वर्षानंतर सोमवारी शिंदे यांनी जलसमाधीनंतर घेतल्यानंतर पहिल्यांदाच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप’तर्फे खिचडी वाटप

$
0
0

औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना भाजपतर्फे साबुदाणा खिचडी, चहा वाटप करण्यात आले. तसेच येणाऱ्या हजारो भाविकांसाठी लोखंडीपूल ते गोलवाडी स्वच्छतागृहाची सोयही करण्यात आली होती. भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी पुढाकार घेत सोमवारी हा उपक्रम राबविला.

ए. एस क्लब सिग्नल येथे भाजपतर्फे सात क्विंटल खिचडी, चहा वाटप करण्यात आले. आमदार अतुल सावे यांच्या हस्ते खिचडी वाटपाचे उद्घाटन करण्यात आले. संयोजक बाळासाहेब गायकवाड, सतीश पाटील, नगरसेविका जयश्री कुलकर्णी, मुकुंद दामोदरे, सुरेंद्र कुलकर्णी, विकास कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी, सागर नीळकंठ, सुनील राठी, जालिंदर शेंडगे यांच्यासह गायकवाड मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...कोणी शाळा देते का शाळा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कोणी आम्हाला शिकायला शाळा देते का शाळा...असा आर्त टाहो सोमवारी इंड्स वर्ल्ड स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात फोडला. या शाळेतील विद्यार्थ्यांचे समायोजन झाले नसल्याने त्यांचे हाल सुरू आहेत.

चिकलठाणा परिसरातील इंड्स स्कूल बंद पडले, तेव्हा येथील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येईल असे आश्वासन शिक्षण विभागाने दिले. मात्र, या विद्यार्थ्यांचे समायोजन कोणत्याच शाळेत झाले नाही. आता उशिरा जागे झालेल्या शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचे समायोजन जवळपास १२ किलोमीटर दूर असलेल्या शाळेत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संताप आहे. इतक्या दूर मुलांना कसे पाठवायचे असा प्रश्न आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. विद्यार्थ्यांनी हाती 'कोणी शाळा देता का शाळा' अशा आशयाचे फलक घेत रस्त्यावर उतरले. आमच्या भवितव्याचे पुढे काय, मुलगी शिकली, प्रगती झाली, हे फक्त कागदापुरतेच का, शैक्षणिक वर्ष सुरू होवून दोन महिने उलटले तरी, आमची शाळा बंदच...अशा संदेशही फलकांवर होते.

शिक्षण विभागामुळे नुकसान

शिक्षण विभाग मोफत प्रवेशांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहे. मात्र, जवळच्या शाळेऐवजी दूरच्या शाळा दिल्या जात आहेत, असा आरोप पालकांनी केला. आरटीई कक्ष वेगळा सांगतो, शिक्षणाधिकाऱ्यांचा अहवाल वेगळा. या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही दिवसांत चाचणी परीक्षा सुरू होतील. विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. निवेदनावर इंद्रजीत पवार, संजय पवार, संजीव सोनकांबळे, सतीश खरात, अशोक सोणोणे, रवी नन्नावरे आदींची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमान प्रवाशाच्या बँगेत आढळसी जिवंत काडतुसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

एअर इंडियाच्या औरंगाबाद दिल्ली विमानाने जाणाऱ्या एका विमान प्रवाशाच्या बॅगेत दोन जीवंत काडतूस सापडल्याची घटना औरंगाबाद विमानतळावर सोमवारी (२३ जुलै) घडली. याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने या प्रवाशाला एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या औरंगाबाद-दिल्ली विमानाने जाणाऱ्या लखविंदर सिंग (वय ४७, रा. दिल्ली) हा प्रवासी विमानतळात दिल्ली प्रवासासाठी चारच्या सुमारास आला होता. विमानतळात प्रवास करताना सीआयएसएफच्या जवानाने लखविंदर सिंह यांच्या सामानाची तपासणी केली. लखविंदर सिंगच्या हँडबॅगेत १२ एमएमची दोन जिवंत काडतुसे आढळली. त्यांनी लखविंदर सिंग याला ताब्यात घेऊन सिडको एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. सिडको पोलिसांनी लखविंदर सिंग याची चौकशी केली असता, त्याच्याकडे शस्त्र वापरण्याचा परवाना असल्याची माहिती दिली. शस्त्र वापरण्याचा परवान्याची तपासणी केल्यानंतर संबंधित विमान प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.

\Bचुकून राहिले काडतूस

\Bया प्रकरणात विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाने काडतूस सापडल्यानंतर लखविंदर सिंग याची चौकशी केली. संबंधित विमान प्रवाशांने आपल्या हँडबॅगेत जीवंत काडतूस चुकून राहिल्याचे सांगितले.

………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा क्रांती मोर्चाचे कन्नडमध्ये ठिय्या आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी तहसीलदार महेश सुधळकर यांना निवेदन देऊन तहसीलजवळील जुन्या पंचायत समिती इमारतीसमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

परळी मराठा ठिय्या आंदोलनास पाठिंबा देत मराठा समाजास १६ टक्के आरक्षणाचा अध्यादेश जारी करावा, महाभरती तात्काळ स्थगित करावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास दहा लाख रुपये मदत व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी मिळावी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची उंची कमी न करता होऊ घातलेल्या जागतिक स्मारकास निधी उपलब्ध करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, पंढरपूर आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यानी केलेल्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यामुळे समाजाची तात्काळ माफी मागावी, अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. कन्नड तालुका मराठा मोर्चातर्फे मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन बोंब मारणे आंदोलन, मुंडन आंदोलन, घंटानाद आंदोलन आयोजन करण्यात येणार आहे. आरक्षण मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाहीची मागणी आयोजन समितीच्या वतीने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैजापुरात मंदिरात रांगा

$
0
0

वैजापूर : प्रती पंढरपूर म्हणून नावाजलेल्या वैजापूर येथील एकटा विठोबा मंदिरात सोमवारी भाविकांनी रांगा लावून भर पावसात मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त मुंजाबा मित्रमंडळातर्फे महिला व पुरुषांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना महाप्रसादही वाटण्यायत आला. सकाळी मंदिराचे पुजारी जोशी यांनी सावनसिंह राजपूत, कुमोद जेजुरकर, अजय भुजबळ, जवाहर सोमाणी यांच्या उपस्थितित विठोबाची विधिवत पूजा केली. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या स्थानिक कार्यकारणिचे अध्यक्ष विश्वास पाटील, नगरसेवक शैलेश चव्हाण, पालिकेतील गटनेते प्रकाश चव्हाण, रमेश बोरनारे, राजुसिंग राजपूत, पारस घाटे आदी मान्यवरांनी विठ्ठल मंदिरास भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. मुंजाबा मित्र मंडळाचे शांतीलाल संचेती, रवींद्र जेजुरकर, अशोक बोराडे, रवींद्र पेहरकर, गोकुळ जगताप, डॉ. धरमचंद जैन, सागर साखरे, राजु साकला, सचिन राजपूत, भीमसिंग राजपूत, अजय जगताप, पंकज मतसागर, शशिकांत भालेराव, अमोल राजपूत, शेख सलिम आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेवर सामुहिक बलात्कार, जामीन फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पतीच्या निधनानंतर आरोपीशी लग्न केले नाही म्हणून पळ‍सवाडी परिसरात सामूहिक बलात्कार करण्यात आल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास अमरसिंह चव्हाण याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी सोमवारी (२३ जुलै) फेटाळला.

याप्रकरणी पीडित महिलेने (३०, रा. चाळीसगाव तालुक्यातील गाव) फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या पतीचे आजारपणात निधन झाले होते व दुसऱ्यासोबत तिचे लग्न ठरले होते. आरोपी कैलास अमरसिंह चव्हाण (३३, रा. उंबरखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा पहिल्या पतीचा मित्र होता व त्याचे फिर्यादीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. त्यामुळे आरोपी हा फिर्यादीच्या परिचित होता. दरम्यान, पतीच्या नावाची असलेली जमीन फिर्यादीच्या नावावर करून देण्याचे आमीष दाखवून आरोपी कैलास याने फिर्यादीला २६ जून २०१८ रोजी कन्नड येथे बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला पिशोरमार्गे पळसवाडी परिसरातील एका झाडाजवळ नेले. तेथे आधीपासून दोनजण थांबलेले होते. थोड्या वेळेत येतो, असे सांगून आरोपी फिर्यादीला तिथेच सोडून निघून गेला आणि दोनजणांनी फिर्यादीवर सामूहिक बलात्कार केला. थोड्या वेळात तेथे आरोपी कैलास पोचला असता, घडलेली घटना पीडितेने आरोपीला सांगितली असता, 'तू माझ्याशी लग्न केले नाही, मग तुझ्याशी असेच व्हायला हवे होते,' असे म्हणून आरोपी कैलास यानेही तिच्यावर बलात्कार केला व कुणाला सांगितल्यास जिवे मारून टाकेन, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी कैलास याला दुसऱ्या दिवशी २७ जून रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी कैलास याने नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला होता.

\Bआरोपी करू शकतो पुरावा नष्ट\B

अर्जावरील सुनावणीवेळी, गुन्हा गंभीर असून, सामूहिक दुष्कर्माच्या प्रकरणात 'अॅट्रॉसिटी'चाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो फिर्यादीवर दबाव आणू शकतो तसेच पुरावाही नष्ट करू शकतो. त्यामुळे आरोपीला नियमित जामीन मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील कैलास पवार यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन फेटा‍ळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images