Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बँक खात्यावर ऑनलाइन डल्ला

0
0

…म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

औरंगाबाद पोलिस आयुक्तालयात स्थापन करण्यात आलेल्या सायबर पोलिस ठाण्यातील पथकाने दाखल झालेल्या पहिल्याच गुन्ह्यात आरोपीला शोध घेऊन २४ तासांत अटक केली. या आरोपीने एका परिचिताने लाइट बील भरण्यासाठी पेटीएमवर दिलेल्या माहितीचा गैरफायदा घेत त्याने ४६ हजार ७८९ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला होता. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बजाजनगर येथील वसंत आनंदा पाटील (वय ४६) यांनी शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांच्या एचडीएफसीच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून वस्तू खरेदी केल्याचे व पैसे कपात झाल्याचे मेसेज आले होते. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून एकूण ४० वेळा वेगवेगळ्या रक्कमेत ४६ हजार ७८९ रुपये ऑनलाइन कपात झाल्याचे निष्पन्न झाले. या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संदीप गुरमे व पथकाने याप्रकरणी तांत्रिक बाजू तपासली. यामध्ये पाटील यांच्या परिचयाचा असलेला धीरज सुभाष भोंबे (वय २३ रा. बजाजनगर) याने हा प्रकार केल्याचे दिसून आले. पोलिसांनी धीरजला अटक केली आहे.

…ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, एसीपी रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, संजय साबळे, रेवणनाथ शेळके, रवींद्र खरात, सुशांत शेळके, विवेकानंद औटी, अनिल शेवाळे व प्रशांत साकला यांनी केली.

\Bअज्ञानाचा घेतला गैरफायदा

\Bआरोपी धीरज हा उच्चशिक्षित आहे. पाटील यांनी त्याला मार्च महिन्यात ऑनलाइन लाइट बिल भरण्यासाठी सांगितले. त्याच्या पेटीएमवरून त्याने ही रक्कम भरली. याच वेळी त्याने पाटील यांच्या बँक खात्याची माहिती मोबाइलवर सेव्ह करून ठेवली. पाटील यांच्या खात्यातून धीरजच्या पेटीएम वॉलेटवर ही रक्कम जमा होत होती. या वॉलेटमधून धीरज ही रक्कम स्वत:च्या खात्यावर वळती करून घेत होता. मार्च ते जून महिन्यादरम्यान हा प्रकार सुरू होता. पाटील यांनी त्यांच्या मुलीला,'मोबाइलवर काय मेसेज येतात,' अशी विचारणा केली असता तिने त्यांच्या खात्यातून रक्कम कपात होत असल्याचे सांगितले. आपण कोणतीही खरेदी केलेली नसताना हा प्रकार घडत असल्याचे पाटील यांना धक्का बसला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. सायबर सेलने याबाबत सखोल तपास करीत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेंट्रिंग काम करणाऱ्या मजुराचा गळा चिरून खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

सेंट्रिंग काम करणाऱ्या मजुराचा गळा चिरून खून करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी सातारा परिसरातील रेणुका माता कमानीसमोर उघडकीस आला. संतोष जानू चव्हाण( वय २५, रा. हायकोर्ट कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष हा विवाहित आहे. रविवारी सकाळी सेंट्रिंगच्या कामावर जातो, असे सांगत तो घराबाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत संतोष घरी परतला नव्हता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र संतोष सापडला नाही. सोमवारी सकाळी पावणेसात वाजता रेणुका माता कमानीसमोरील मोकळ्या जागेत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुणाला बेदम मारहाण झाल्याचे वळ होते. गळा अर्धवट चिरलेला; तसेच ओठही चिरलेले होते. या घटनेची माहिती मिळताच एपीआय मनोज बहुरे, चेतन ओगले, शेषराव चव्हाण व अर्जुन ढोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या संतोष चव्हाणचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नसून, सातारा पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकची चाके थांबलेलीच

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालवाहतूकदारांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच होता. दिल्लीत सोमवारी मालवाहतूकदार व केंद्र शासनाच्या प्रतिनिधींसोबत केलेली चर्चा निष्फळ ठरल्याने आणखी काही दिवस हा संप सुरू राहणार आहे. या संपामुळे गेल्या तीन दिवसांत ७०० कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल थांबल्याची माहिती औरंगाबाद ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी दिली.

ऑल इंडिया मोटार काँग्रेसने ट्रान्सपोर्टरच्या विविध मागण्यांसाठी देशभरातील बंदची हाक दिली होती. २० जुलैपासून वाहतूकदारांनी बंद आंदोलनाला सुरवात केली. या आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस होता. आषाढी एकादशीमुळे वाळूज पंढरपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असल्यामुळे छोटे-मोठे मालवाहतूकदारांनी माल वाहतूक बंद होती. गेल्या दोन दिवसांपासून माल माल हाताळणी बंद झाल्याने कारखान्यांमध्ये तयार झालेला माल गोदामांत तयार करून ठेवला जात आहे.

अनेक उद्योजकांनी वाहतूकदारांशी चर्चा करून कंपनीत तयार करण्यात आलेला माल उचलण्याची मागणी केली आहे. याशिवाय अनेक कंपन्यांमध्ये विविध राज्यातून होणाऱ्या कच्च्या मालाची आवक थांबली आहे. यामुळे आगामी दोन दिवसांत कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातावर काम राहणार नसल्याची भिती उद्योजकांना पडलेली आहे. गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सूरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत ७०० ते ८०० कोटी रुपयांची उलाढाल थांबली असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फैय्याज खान यांनी दिली. जिल्ह्यात साडेतीन हजार ट्रकची वाहतूक बंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

………

\Bआषाढीच्या प्रसादाचे वाटप\B

आषाढी एकादशीनिमित्त संपात सहभागी झालेल्या ट्रक चालक आणि क्लीनर यांच्यासह पंढरपूराला जाणाऱ्या भाविकांसाठी आषाढी एकादशीच्या यात्रेकरूंसाठी ट्रान्सपोर्टरतर्फे प्रसाद तयार करण्यात आले होते. या प्रसादाचे वाटपही वाळूज भागात करण्यात आले.

……

\Bजीवनावश्यक वस्तुंबाबत निर्णय नाही\B

सध्या मालाची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा बंद करण्याबाबत सोमवारी (२३ जुलै) निर्णय घेण्यात येणार होता, मात्र शासनाने चर्चा सुरू केल्याने सध्या जीवनावश्यक वस्तुंच्या मालवाहतूक थांबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून देण्यात आली आहे.………………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा आज फैसला?

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवाहिनी प्रकल्प पुनरुज्जीवनासाठी कंपनीचा प्रस्ताव आणि त्याआधारे महापालिका आयुक्तांनी तयार केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी (२४ जुलै) विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. यासभेत समांतर बद्दलचा आदेश 'मातोश्री'हून येणार आहे, तर प्रस्तावातील विविध कलमांबद्दल भारतीय जनता पक्ष पालिका आयुक्तांकडून खुलासा मागण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे 'पीपीपी'तत्वावरच्या या योजनेला विरोधाची भूमिका एमआयएम व काँग्रेसने घेतली आहे.

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलीटी कंपनीने चार जुलै रोजी योजनेबद्दल प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, योजना पुनरुज्जीवन प्रस्तावाबद्दल शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुखांनी काही सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. कराराचे पुनरुज्जीवन करायचेच असेल, तर कंपनीला मनमानी पध्दतीने काम करता येणार नाही, असा निर्णय घ्या. कंपनीला तसूभरही हालचाल करण्यासाठी जागा देऊ नका, असे पक्षप्रमुखांनी स्पष्ट केल्याचे कळते. परंतु ठोस आदेश आला नसून तो सभा सुरू होईपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे.

कंपनीच्या प्रस्तावात अनेक मुद्दे अनुत्तरित आहेत. त्याबद्दल पालिका आयुक्तांच्या प्रस्तावातही पुरेसा खुलासा नाही. त्यामुळे अनुत्तरित मुद्यांबाबत सर्वसाधारण सभेत आयुक्तांनी खुलासा करावा, प्रशासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपकडून होणार आहे.

\Bमहापौरांकडून विशेष सल्लागार नियुक्त \B

या विशेष सर्वसाधारण सभेसाठी अॅड. रमेश शेलार यांना महापौरांचे विधी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनीच दिली. समांतर जलवाहिनीचा विषय महत्त्वाचा असून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. त्यामुळे निर्णय घेताना कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याने विशेष विधी सल्लागारांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.

कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाबद्दल प्रशासनाचे मत पूर्णपणे समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आयुक्तांना प्रशासनाचे मत स्पष्टपणे मांडायला सांगू. त्यांनी मत मांडल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.

-प्रमोद राठोड (गटनेता, भाजप)

उद्या मंगळवारी सकाळी दहा वाजता शिवसेना पक्षाची प्री जीबी आयोजित केली आहे. त्यात सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पक्षप्रमुखांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.

-विकास जैन (सभागृहनेता)

'पीपीपी' तत्वावरच्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला एमआयएमचा पूर्वीही विरोध होता आताही आहे. खासगीकरणातून प्रकल्पाचे काम न करता शासनाच्या माध्यमातून काम झाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

-नासेर सिद्दिकी (गटनेता, एमआयएम)

पुन्हा त्याच कंपनीच्या माध्यमातून काम करून घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. दोन वर्षात कंपनी काहीच काम करू शकली नसल्याने तिच्याबद्दल शंका आहे. प्रकल्पाबद्दल नागरिकांचे मत जाणून घेतले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय आहेत हे विचारणार आहोत.

-भाऊसाहेब जगताप (गटनेते, काँग्रेस)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फडणवीस सरकारच डळमळीत, पालिका काय बरखास्त करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार डळमळीत आहे; ते काय महापालिका बरखास्त करणार,' असा चिमटा खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. कचराप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत पालिका बरखास्तीचा इशारा दिला आहे. त्यावरून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना संतापली आहे.

विभागीय आयुक्तालयात सोमवारी शिवसेनेचे खासदार खैरे यांच्या उपस्थितीत घनकचरा सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर, महापालिका आयुक्‍त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले, स्थायी समिती सभापती राजू वैद्य, सभागृह नेता विकास जैन, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

'कचरा प्रश्न केवळ औरंगाबादचा नाही, तर संपूर्ण देशाचा आहे. दिल्लीतील तीन्ही महापालिकेत भाजपचे महापौर आहेत. तेथे कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून वर्तमानपत्रे तेथील कचऱ्याविषयांच्या बातम्यांनी भरलेले असतात. ‌औरंगाबाद पालिकेत शिवसेनेचा महापौर असल्यामुळेच केवळ बदनामी करण्यात येत आहे,' असा आरोप खैरे यांनी केला. दरम्यान खैरे यांनी कचराप्रश्नाचा आढावा घेऊन सनियंत्रण समिती, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 'सध्या मुख्यमंत्री सरकारी यंत्रणा घेऊन पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. हेलिकॉप्टरमधून फिरताना त्यांच्या बैठका कमी आणि प्रचारच जास्त असतो. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही विमान किंवा हेलिकॉप्टरनेच फिरत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.

सनियंत्रण समितीने ठरवून दिलेल्या पाच जागांपैकी हर्सूल आणि पडेगाव येथील जागांवर कचरा टाकण्यास अडचणी येत असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. 'लोकांचा महापालिकेवर विश्वास नसल्याने पडेगाव येथे कचरा टाकण्यास विरोध होत आहे. त्यामुळे पडेगावला कचरा टाकू नये,' अशी आमदार संजय शिरसाट यांनी केल्याचे कळते.

\Bअधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात \B

पाच महिन्यांपासून समिती काय करते, असा सवाल करत कचरा न उचलल्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांवरच लोकप्रतिनिधी गुन्हा दाखल करू शकतात याची जाणीव करून दिली. शासनाने निधी दिला, राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी येथे येऊन निर्देश दिले, तरीही कचरा 'जैसे थे' आहे. महापालिकेचे अधिकारी झोपा काढतात काय? अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे, आम्ही २४ तास काम करतो तरीही आम्ही नोकर आणि अधिकारी मालक अशी अवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचरा टाकल्यानंतर दुर्गंधी येते. मग पाच महिन्यांपासून नागरिक दुर्गंधीतच जगत आहेत, त्याचे काय?, असा सवाल करत खैरे यांनी रोष व्यक्त केला.

\Bदोन दिवसात कचरा हटवणार: डॉ. भापकर\B

सनियंत्रण समितीने ठरवून दिलेल्या पाच जागांवरच कचरा टाकण्यात येणार आहे. त्यात बदल होणार नाही. यंत्रणांनी कंबर कसली असून दोन दिवसांत शहरातील शंभर टक्के कचरा ठरवलेल्या जागांवर टाकण्यात येईल, असे विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले. हर्सूल येथील जागेवर अडचण नाही. पडेगावबाबतही चर्चा झाली आहे. त्या पाच जागांवर वर्गीकरण करूनच कचरा घेऊन जाण्याचे निर्देश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आषाढीनिमित्त शाळांमध्ये दिंडी सोहळा

0
0

म. टा. प्रतिनिधी फुलंब्री

आषाढी एकादशीनिमीत्ताने पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीत दिंडी सोहळा रंगत असतो. त्याप्रमाणे आषाढीनिमित्ताने तालुक्यातील गावांमध्ये विविध शाळांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्यांनी विठ्ठल, रुख्मिणी व वारकऱ्यांची वेशभूषा करत टाळ मृदुंगासह पालखी मिरवणूक काढली.

\Bसमता विद्यालय

\Bसमता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फुलंब्री शहरात दिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई यांची वेशभूषा साकारली होती. 'विठ्ठव... विठ्ठल जय हरि विठ्ठल'च्या जयघोषाने शहर दुमदुमले होते. यावेळी मुख्याध्यापिका मालती शिरसाठ, दामोधर पाथ्रे, राम बनसोड यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते.

\Bज्ञानेश्वरी गुरुकुल

\Bज्ञानेश्वरी गुरुकुलच्या प्ले ग्रुपच्या चिमुरड्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. विद्यार्थ्यांनी गावातून दिंडी काढली याप्रसंगी प्रा. अक्षय न्यायाधीश यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

‌\Bगोरक्ष विद्यालय

\Bखामगावच्या गोरक्ष विद्यालयने गावात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत होते. काही विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी घेतल्या होत्या. विठ्ठल नामाच्या जयघोषाने दिंडी परिसर दुमदुमला होता. काही भक्तांनी अभंगही सादर केले. याप्रसंगी मोहन सोनवणे, अभिलाष सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी कचरा, मग लोकसभा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'आधी शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडवा आणि त्यानंतरच लोकसभा अधिवेशनाला जा,' असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे खासदार चंद्रकांत खैरे सोमवारी संनियंत्रण समितीच्या बैठकीत सांगितले.

कचरा प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात संनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. याबैठकीत त्यांनी विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 'कचराकोंडी फोडण्यासाठी संनियंत्रण समिती काहीच का करीत नाही? सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाला जाऊ नका, अगोदर औरंगाबादची कचराकोंडी सोडवा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत,' असे खैरे विभागीय आयुक्तांना उद्देशून म्हणाले. 'कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र खरेदी करायचे होते, त्याचे काय झाले. ही यंत्र खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लोकसभेच्या अधिवेशनाला जाणार नाही,' असे त्यांनी पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना सांगितले.

यंत्र खरेदीवरून आयुक्त टार्गेट

संनियंत्रण समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना यंत्र खरेदीवरून टार्गेट केले. 'डीपीआर' होवून पाच महिने झाले. त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने ९१ कोटींचा निधी दिला, असे असताना कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्र खरेदी का होत नाही. ही खरेदी प्रक्रिया तत्काळ करा, ही प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार ते सांगा, अशा प्रश्नांचा भडिमार पालिका आयुक्तांवर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाऊल’ कलाविष्कार रंगला

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आध्यात्म आणि लोकसंगीताचा उत्कट आविष्कार असलेल्या 'बाऊल' कला प्रकाराने रसिकांना मोहीत केले. पार्वती बाऊल यांच्या खड्या आवाजातील गायनाने सभागृह भारावून गेले. पश्चिम बंगालची लोककला रसिकांसाठी वेगळी पर्वणी ठरली.

महागामी नृत्य संस्थेचा 'परस्पर' हा ओडिसी व बाऊल नृत्याचा कार्यक्रम लक्षणीय ठरला. शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्याची मैफल डोळ्याचे पारणे फेडणारी होती. पहिल्या सत्रात पार्वती दत्ता यांनी ओडिसी नृत्य सादर केले. मुद्राभिनय, पदलालित्य आणि दुर्मिळ रचनांनी ओडिसी उठावदार झाले. वैशिष्ट्यपूर्ण रचनांनी ओडिसी पाहणे हा आनंददायी अनुभव होता. 'दशावतार', 'गीतगोविंद अष्टपदी', 'सर्पजनानम' आणि बंगाली रचनेने पहिले सत्र रंगले. कृष्णविलापात व्याकूळ राधेचे वर्णन 'अष्टपदी'त करण्यात आले. 'नाथ हरे सिदती राधा वासगृहे' रचनेतून हा विलाप सादर झाला. दुसऱ्या सत्रात पार्वती बाऊल यांचे 'बाऊल' सादरीकरण झाले. सनातनदास बाऊल यांच्या शिष्य पार्वती यांनी 'बाऊल'द्वारे बंगाली लोककला प्रभावीपणे ऐकवली. एकतारी, डुग्गी आणि घुंगराच्या नाद माधुर्यात पार्वती यांनी बाऊल गायले. खडा आवाज आणि आध्यात्मिक वातावरणाशी तादात्म्य पावणारे गायन ऐकताना रसिक भारावून गेले. हा लोककलाविष्कार सर्वांसाठी वेगळी अनुभूती ठरला. या कार्यक्रमाला रसिकांची मोठी उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागांना ‘ग्रेड’ देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी विभागांचे शैक्षणिक ऑडिट करणार आहे. 'नॅक' मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर विभागांना 'ग्रेड' देऊन सुधारणा केल्या जाणार आहेत, असे कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे यांनी सांगितले. विभागाच्या अॅकॅमिक ऑडिटला सोमवारी सुरुवात झाली असून तीन दिवस प्रक्रिया चालणार आहे.

येत्या सप्टेंबर महिन्यात विद्यापीठाचे 'नॅक' मूल्यांकन होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे पूर्वपरीक्षण (प्री-रिव्ह्यू) करण्यासाठी प्रशासनाने देशातील १२ तज्ज्ञांना निमंत्रित केले आहे. या तज्ज्ञात शास्त्रज्ञ, माजी कुलगुरू, प्राध्यापक यांचा समावेश आहे. २३ ते २५ जुलै या तीन दिवसात तज्ज्ञ कॅम्पसमधील प्रत्येक विभागाला दीड तास भेट देऊन अहवाल सादर करणार आहेत. विभागाची कामगिरी, विद्यार्थ्यांची प्रगती तज्ज्ञ समजून घेणार आहेत. विशेष म्हणजे प्राध्यापकांचे वैयक्तिक योगदान गृहीत धरले जाणार आहे. विभागांची बलस्थाने आणि उणिवांचा रिपोर्ट समिती सुपूर्द करणार आहे. तसेच बुधवारी (२५ जुलै) तज्ज्ञांची कार्यशाळा होणार असून विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. 'नॅक'ला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञ सूचना करणार आहेत. विशेष म्हणजे विभागांचे ऑडिट झाल्यानंतर विद्यापीठ आपल्या पातळीवर 'ग्रेड' देणार आहेत. 'ए' ++ ते 'डी' अशा आठ श्रेणीत विभागांचा दर्जा निश्चित केला जाणार आहे. विद्यापीठाच्या प्रगतीत विशेष योगदान असलेल्या विभागाला विशेष दर्जा मिळणार असून त्यांना आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. तर कमी ग्रेड मिळालेल्या विभागांना सुधारणा करण्यास सांगितले जाईल असे प्र-कुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले. यावर्षी महाविद्यालयांचे शैक्षणिक ऑडिट केले जाणार आहे. येत्या ३० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत ऑडिट पूर्ण करण्यात येईल. किमान ३० टक्के महाविद्यालयांचे परीक्षण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे तेजनकर यांनी सांगितले.

\Bरस्त्याचे उदघाटन

\B'नॅक' मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात विकासकामांना वेग आला आहे. वाय कॉर्नर ते वृत्तपत्र व जनसंवाद विभाग या मुख्य रस्त्याचे सोमवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार अतुल सावे, कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे, प्र-कुलगुरु डॉ. अशोक तेजनकर, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आदी उपस्थित होते. महिनाभरात हा सिमेंट रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावणे हेच प्रशासनाचे ध्येय आहे. त्यामुळे विभागाचे आणि महाविद्यालयांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून विभागाच्या प्रगतीचा नेमका आढावा घेणे सोपे होईल.

- प्रो. बी. ए. चोपडे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्याच्या नावावर दिली परीक्षा; दोघांना अटक

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अन्न व नागरी पुरवठा खात्यातील पदांसाठी घेण्यात आलेली ऑनलाइन परीक्षा दुसऱ्याच्या नावावर देण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील आरोपी निलेश संतोष लक्कस व आरोपी अश्रुब बापुराव खार्डे यांना अटक करून सोमवारी (२३ जुलै) कोर्टात हजर करण्यात आले असता, त्यांना गुरुवारपर्यंत (२६ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले.

याप्रकरणी परीक्षेचे निरीक्षक अतिक अहमद सिद्दिकी मुजफ्फोद्दिन सिद्दिकी (२७, रा. किराडपुरा, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, २२ जुलै २०१८ रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागातील पदासाठी 'एआयआयटी' ही ऑनलाइन परीक्षा होती व परीक्षेचे केंद्र नाथ प्रांगण (कालिका मंदिर) येथे होते व तिथे फिर्यादी निरीक्षक होते. यावेळी आरोपी निलेश संतोष लक्कस (रा. नवजीवन कॉलनी, एन-११, सिडको) हा आरोपी अश्रुब बापुराव खार्डे (रा. आळंद, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) याच्या नावावर परीक्षा देत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांना पकडण्यात आले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी निलेश याला रविवारी (२२ जुलै), तर आरोपी अश्रुब याला सोमवारी अटक करण्यात आली.

\Bतोतया परीक्षार्थींचे रॅकेट?\B

दोन्ही आरोपींना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले असता. आरोपींनी तोतया परीक्षार्थी बनून आतापर्यंत किती परीक्षा दिल्या, त्यांचे कोणी साथीदार आहेत का आदींचा तपास करावयाचा बाकी असून, यासंदर्भात मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती बालाजी गवळी यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करून कोर्टाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘समांतर’चा नागरिकांवर बोजा नको: भाजपची भूमिका

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलवहिनी योजनेबद्दल महापालिका आयुक्तांनी आधी ठोस भूमिका मांडावी. त्यानंतरच त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घ्यावा, अशी रणनिती भारतीय जनता पक्षाने आखली आहे. याच दिशेने नगरसेवकांनी आपली मते सभेत मांडावीत, असे निर्देश भाजप नेत्यांनी नगरसेवकांना दिले आहेत. यासंदर्भात शहराध्यक्ष तनवाणी यांना संपर्क केला असता पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली लागावा, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. नागरिकांवर त्यांचा अतिरिक्त बोजा पडता कामा नये, अशी भूमिका असल्याचे नमूद केले.

महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात सोमवारी प्री मिटिंग घेण्यात आली. या बैठकीला शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, संघटक भाऊराव देशमुख यांच्यासह नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला अनुसरून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कंपनीने प्रस्तावात दिलेले सेवास्तर जास्त सुस्पष्ट असावेत, दर वर्षाला उपलब्ध करावयाचे मानक स्पष्ट असावेत, असे प्रशासनाचे मत आहे. तसेच प्रचलित पाणीपट्टीचे दर सप्टेंबर २०२२ पर्यंच कायम ठेवण्यास हरकत नसल्याचे मत नोंदविण्यात आले आहे.

कंपनीच्या प्रस्तावावर प्रशासनाने नमूद केलेले मत ठोस नाही, अनेक बाबी तांत्रिक असून काही मुद्यावर कायदेशीर सल्ला घेऊन मांडल्या जाणे आवश्यक आहे, असे मत बैठकीत अनेकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून जिल्हाधिकारी लक्ष्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावरून अडचणीत आलेल्या शिवसेनेने झाल्टा व दौलताबाद घाटात झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य केले. विभागीय आयुक्तालयात सोमवारी झालेल्या घनकचरा सनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी या अतिक्रमणाकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

'झाल्टा परिसरात २५ एकरवर अतिक्रमण झाले आहे, शिवाय दौलताबाद घाटात डोंगराच्या पायथ्याला झालेल्या अतिक्रमणाकडे जिल्हा प्रशासन सर्रास दुर्लक्ष करत आहे. कचऱ्यासोबतच या अतिक्रणाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुर्लक्ष होत आहे,' अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. शहरात कचराप्रकरण तापले असून आता या प्रश्नाला राजकीय वळण लागले आहे. पालिका बरखास्तीच्या इशाऱ्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कचरा टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला होता. यामुळे संतापलेल्या जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कचरा टाकणाऱ्या शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून चिडलेल्या शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचे दिसते.

'दौलताबाद घाटाजवळ डोंगर पोखरून अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी सपाटीकरणही केले आहे. येथे माळीण सारखी घटना घडू शकते. या अतिक्रमणांना तत्कालिन उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार जबाबदार आहेत. या प्रकरणांकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून आपण त्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना बोललो आहे,' असे खसादार खैरे यांनी सांगितले.

\Bजिल्हा प्रशासनापुढे पेच \B

चिकलठाणा महसूल मंडळातील झाल्टा येथील जालना रोडकडून बीडकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शासकीय २५ एकरातून दहा एकर जागा म्हाडाला देण्याचा प्रस्ताव आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये येथे काहीजणांनी अतिक्रमण केले. दरम्यान, तहसीलदार तसेच पोलिसांच्या पथकाने हे अतिक्रमण काढले. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्याच ठिकाणी पुन्हा अचानक शेकडो लोकांनी अतिक्रमण करून स्वतःच प्लॉट आखणी करून घेतली. येथे त्यांनी साड्या, प्लास्टिक, पत्र्याचे शेड आदींद्वारे जागेवर कब्जा केला आहे. ग्राहक शोधून पाच ते पंचवीस हजार रुपयांना बेकायदा प्लॉट विक्रीचे प्रकार घडले आहेत. तेथे केवळ तात्पुरते शेड असून पक्के बांधकाम नसल्याने त्याला अतिक्रमण ठरवायचे की नाही, असा पेच प्रशासनासमोर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जासाठी समांतर योजनाच तारण ठेवण्याचा कंपनीचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

समांतर जलावाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज काढावे लागणार आहे. या कर्जासाठी समांतर जलवाहिनी प्रकल्पाची मालमत्ता वित्त पुरवठादार संस्थेकडे तारण ठेवण्याचा प्रस्ताव कंपनीने महापालिकेला दिला आहे.

योजनेच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने पालिका प्रशासनाला प्रस्ताव सादर केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिन्या, बांधण्यात येणारे जलकुंभ व योजनेनुसार उभारण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा प्रकल्पाच्या मालमत्तेत समावेश होतो. या मालमत्ता कर्जासाठी गहाण ठेवण्याचा उल्लेख कंपनीच्या प्रस्तावात आहे.

कंपनीने चार जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, योजनेच्या पुनरुज्जीवनाबद्दल कंपनी महापालिकेस प्रस्ताव सादर करीत आहे. त्यामुळे याप्रकरणात पुढील तारीख मिळावी. कंपनीने सादर केलेला प्रस्ताव व या प्रस्तावाचा अभ्यास करून पालिका आयुक्तांनी तयार केलेला प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. कंपनीने चार जुलै रोजी दिलेल्या प्रस्तावात 'फायनांशियल क्लोजर'च्या परिच्छेदात पालिका आणि कंत्राटदार (कन्सेशनर) प्रकल्पासाठी निधी उभा करण्यासाठी संयुक्तरित्या सर्व शक्यतांची पडताळणी करतील अशी अट टाकली आहे. वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थेकडे प्रकल्पाच्या मालमत्ता व सुविधा गहाण ठेवण्याची परवानगी पालिकेने द्यावी, असा उल्लेख केला आहे.

\Bकंपनीचे आक्षेप \B

प्रकल्पासाठी नियुक्त केलेल स्वतंत्र इंजिनीअर, ऑडिटरवर कंपनीचा आक्षेप आहे. ही दोन्ही पदे नकोत, असे कंपनीचे मत आहे. कंपनीची मालकी (भागीदार) बदलण्याचा उल्लेख प्रस्तावात आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात बदल करण्याबाबत करारात उल्लेख आहे. जाणकारांच्या मतानुसार साहित्यात बदल केल्यास एओएसजीच्या (अॅन्युअल ऑपरेशनल सपोर्ट ग्रँट) रक्कमेतही बदल होईल. या सर्व मुद्यांबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकासाहेब शिंदे मृत्यू; तहसीलदार निलंबित

0
0

औरंगाबाद:

मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्युप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांना निलंबित करण्यात आलं आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ही माहिती दिली. शिंदेच्या कुटुंबीयांना २५ लाखांची तातडीची मदत देण्यात येणार असून त्यांच्या भावाला आठ दिवसांत शासकीय नोकरी देण्याचे लेखी आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कायगाव टोका येथे गोदावरीच्या पुलावरून सामूहिक आत्महत्येचा इशारा गंगापुरातील मराठा आंदोलांनी सोमवारीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, प्रशासनानं ही बाब गांभीर्यानं न घेतल्यानं सोमवारी दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे (रा. नागड कानटगाव) या २८ वर्षीय तरुणानं गोदापात्रात उडी घेत जलसमाधी घेतली. ग्रामरक्षक दलाचे दशरथ बिरूटे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिंदे यांना शहिदाचा दर्जा देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Maharashtra Bandh: मराठवाड्यात इंटरनेट बंद

0
0

औरंगाबाद:

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळीच संतप्त आंदोलकांनी औरंगाबाद-पुणे मार्ग बंद केला असून ठिकठिकाणी बसेस अडविण्यास सुरुवात केली आहे. या संपाचा सर्वाधिक परिणाम मराठवाड्यात दिसून येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मराठवाड्यातील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय अफवा पसरू नयेत म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. या आठवडाभरात ठिकठिकाणी मोर्चे, ठिय्या आणि धरणे आंदोलने करत आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला होता. सोलापूरमध्ये तर आंदोलकांनी १६ बसेस फोडल्या होत्या. आंदोलकांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला पूजेसाठी जाण्याचंही रद्द केलं होतं. त्यातच काकासाहेब शिंदे या आंदोलक तरुणाने आरक्षण मिळत नसल्याने सरकारचा निषेध म्हणून औरंगाबादमधील गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्याने वातावरण तापले असून क्रांती मोर्चाने आज बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच राज्यभर या बंदचा परिणाम जाणवू लागला आहे. औरंगाबादमध्ये बंदमुळे सरकारी बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. उस्मानाबादमध्येही आंदोलकांनी धरणे आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे उस्मानाबादेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काल रात्री पंढरपूरहून निघालेली वारकऱ्यांची बस बंदमुळे लातूर बसस्टँडवरच फसली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना बसमध्ये तिष्ठत बसावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे बस सुरू होत नसल्याने रात्रभर बसमध्ये थांबावं लागलेल्या वारकऱ्यांनी कंडक्टरला तिकीटाचे पैसे परत मागायला सुरुवात केली असून कंडक्टरने त्यांना पैसे देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना नाईलाजाने बसमध्येच थांबावे लागत आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा होणारा सत्काराचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तर अहमदनगरमध्येच श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे नगर-दौंड रस्त्यावर आंदोलकांनी रास्तारोको सुरू केल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. पाथर्डीतही सर्व व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून खर्डा येथे रास्तारोको करण्यात आला आहे.

पुण्यात जनजीवन सुरळीत

पुण्यात महाराष्ट्र बंदचा फारसा परिणाम झालेला नाही. पुण्यातील दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असून नेहमीसारखीच वर्दळ सुरू आहे. एसटी आणि रिक्षाही व्यवस्थित धावत असून शाळा-महाविद्यालयेही सुरू आहेत. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकमध्येही नाशिक-औरंगाबाद एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार; खैरेंना हाकललं

0
0

औरंगाबाद:

मराठा आरक्षणसाठी जलसमाधी घेणारे आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर कायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. शिंदे यांच्या अंत्यसंस्कारासाठी कायगाव येथे आलेले शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे यांना यावेळी मराठा तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत खैरे यांना अक्षरश: हाकलून लावलं.

गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे आज सकाळी ११ वाजता काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भाऊ अविनाश शिंदे याने काकासाहेबांच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कार सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे घटनास्थळी आले. त्यामुळे मराठा तरूण प्रचंड संतप्त झाले. या तरुणांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली. या तरुणांनी राज्यसरकार आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही तरूणांनी तर खैरेंच्या अंगावर धावून जात त्यांना अक्षरश: हाकलून दिलं. आम्हाला या ठिकाणी कोणताही लोकप्रतिनिधी नकोय, असं या तरुणांनी स्पष्ट केलं. त्यामुळे तरुणांचं रौद्ररूप पाहून खैरे यांनीही घटनास्थळावरून काढता पाय घेतला. दरम्यान, शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना निलंबित करण्यात आलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Maharashtra Bandh: मला मारहाण करण्याचा कट: खैरे

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'कायगाव टोका येथे मला मारहाण करण्याचा त्यांचा कट होता. जिल्ह्याबाहेरचे लोक येऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत,' असे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी 'मटा' शी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणाला शिवसेनेने पाठिंबा दिला असताना आमच्यावर राग कशासाठी, असा सवाल खैरे यांनी केला.

खासदार खैरे म्हणाले, सोमवारी रात्री एक वाजेपर्यंत आम्ही कायगावला होतो. काकासाहेब शिंदे हा शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याने एका वेगळ्या भावनेने आम्ही तेथे गेलो होतो. पोलिस स्टेशनला गेलो, त्यानंतर काकासाहेब शिंदे याचे पोस्टमार्टेम करून घेतले. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. अंत्यसंस्काराला येण्याची इच्छा मी तेथील कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली. त्यांनी परवानगी दिली. फक्त मराठा समाजातील आमदार, खासदारांना येऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यामुळे मंगळवारी सकाळी कायगावला गेलो तेव्हा माझ्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करण्याच्या कट रात्री दोननंतर ठरला असावा. काही जिल्ह्याबाहेरचे लोक तेथे जमले होते, हे त्यांचे कृत्य आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदोबस्तासाठी आलेल्या जमादाराचा मृत्यू

पालिकेवर लोकांचा भरोसा नाय!

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महापालिकेबद्दल शहरातील नागरिकांना विश्वास नाही. त्यांच्या मनात पालिकेची प्रतिमा वाईट आहे, अशी कबुली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांनी घेतलेल्या वर्गात दिली. डॉ. निपुण विनायक यांनी सर्व विभागप्रमुख, वॉर्ड अधिकाऱ्यांचा सोमवारी तब्बल साडेतीन तास वर्ग घेतला.

डॉ. निपुण विनायक यांनी सोमवारी सायंकाळी सात ते रात्री साडेदहापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात सर्व विभागप्रमुख आणि वॉर्ड अधिकारी, अभियंते यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी या अधिकाऱ्यांकडून काही खेळ खेळून घेतले. हसत खेळत काम करा, आत्मविश्वासाने काम करा असा संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. बैठक सुरू झाल्यावर डॉ. विनायक यांनी सर्व अधिकाऱ्यांना कागद दिले आणि महापालिकेची प्रतिमा लोकांच्या मनात कशी आहे, लोकांच्या मनात असलेल्या प्रतिमेत आपण बदल घडवू शकतो का, याबद्दल काय वाटते ते लिहा असे सांगितले. सुमारे वीस मिनिटांचा अवधी अधिकाऱ्यांना यासाठी देण्यात आला होता. एका अधिकाऱ्याला त्याचे जाहीर वाचन करण्यास सांगितले. महापालिकेची प्रतिमा वाईटच आहे, हे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे त्यांनीच लिहिलेल्या मनोगतातून स्पष्ट झाले. महापालिकेच्या कामांना सकारात्मक प्रसिद्धी मिळत नाही त्यामुळे महापालिकेची प्रतिमा खराब झाली आहे, असे मतही बहुतांश अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावर आयुक्त अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, तुम्ही चांगले काम करा, प्रामाणिकपणे काम करा. आपोआप चांगली प्रसिद्धी मिळेल व महापालिकेची प्रतिमा सुधारेल. यानंतर आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दुसरा कागद दिला. त्या कागदावर पेनाने वर्तुळ काढा. या वर्तुळावर ठिपके मारण्यास सांगितले. त्यासाठी अधिकाऱ्यांना एक मिनिटांचा वेळ दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या ठिपक्यांची संख्या मोजली तेव्हा बहुतेकांनी शतक पार केले होते. त्यामुळे आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. जास्त काम करण्याची क्षमता तुमच्यात आहे, पण तुम्ही क्षमतेनुसार काम करीत नाहीत. क्षमता ओळखून काम करा, चांगले काम करा असे आवाहन त्यांनी केले. आपापल्या विभागाअंतर्गत १५ ऑगस्टपर्यंत आणि १५ ऑक्टोबरपर्यंत आपण काय काम करू शकतो हे लिहून द्या, असे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामांची यादी कागदावर लिहिली. ही यादी आयुक्तांनी स्वत: जवळ ठेवून घेतली.

\Bमहापालिकेबद्दल अधिकाऱ्यांची निरीक्षणे

\B- महापालिकेची प्रतिमा वाईट आहे.

- पालिकेत लवकर काम होत नाही असा समज.

- काम करण्यासाठी महापालिका सक्षम नाही.

- महापालिकेवर लोकांचा विश्वास नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी अर्ज भरण्यासाठी एक दिवस मुदतवाढ

0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नव्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस बुधवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बुधवारी दुपारी तीनपर्यंत नव्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसह अर्ज भाग-१, भाग-२ मध्ये अपडेटही करता येणार आहे. अकरावीची प्रवेशाची दुसरी फेरी संपली आहे. त्यानंतर सध्या नव्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यात मंगळवारी मुदत संपली होती. मात्र, आज कॉलेजांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार एक दिवसाची मुदतवाढ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images