Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महापौरांनी जाणून घेतल्या समस्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

देवळाईतील ड्रेनेजचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी दिल्या.

महापौर घोडेल यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज ओम साईनगर, आलोक नगर, औरविलेझ सोसायटी, चंद्रशेखर नगर, आशा नगर या देवळाई परिसरातील वसाहतींना भेट दिली. नागरिकांनी ड्रेनेज आणि रस्त्याचा प्रश्न मांडला. ड्रेनेजसाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना महापौर घोडेले यांनी दिल्या. या कामासाठी सुमारे २० लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो, असे घोडेले यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

देवळाई परिसरात औषध फवारणी व ऑबेट ट्रिटमेंट करण्यात आली आहे; तसेच साचलेले पाणी व नाल्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली आहे. माहापौर घोडेले, सभापती अप्पासाहेब हिवाळे, वार्ड अधिकारी सुरे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जीवशात्रज्ञ डॉ. अर्चना राणे, पर्यवेक्षक जे. आर. बोराडे, डॉ, उनवणे, के. बी. मोरे यांच्यासह अभियंते, पथक प्रमुख शेख अन्वर शेख दादाभाई, एएसआय खरात, जवान शेख मुन्वर, फवारणी कमचारी मनोज जगधने, अमोल दाभाडे, शेख अशपाक, महेश नगरे, कैलास गायकवाड यांच्यासह नागरिक होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शेकाप’चे शहरात राज्य अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) १७ वे राज्य अधिवेशन कर्णपुरा येथील मैदानावर एक व दोन ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील समविचारी पक्षांच्या ऐक्याची भूमिका अधिवेशनातून स्पष्ट होईल, असा विश्वास शेकापचे जिल्हा चिटणीस विकासकाका शिंदे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख असतील. मार्क्‍सवादी पक्षाचे नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तालुका चिटणीस निवृत्ती गायकवाड, गणेश सोनवणे, महेश गुजर, चंद्रकांत सरोदे, युनूस पठाण, अंजन साळवे आदी उपस्थित होते.

अधिवेशनात विधानसभेच्या निवडणूकपूर्वी राज्यातील समविचारी पक्षांच्या ऐक्‍याच्या भूमिकेवर अधिवेशनात मंथन होणार आहे. समारोपप्रसंगी विविध राजकीय ठराव पारित करण्यात येणार असून अनुशेषासंदर्भात मराठवाड्यावर आजवर झालेल्या अन्यायावर व्यापक चर्चा होणार आहे. अधिवेशनात राजकीय ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. तसेच पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील, एन. डी. पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, धैर्यशील पाटील मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विकास शिंदे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर, पुढील आठवड्यात उद्योग बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप बुधवारी सलग सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. या आंदोलनाचा जिल्ह्यातील दहा ते पंधरा टक्के उद्योगांना फटका बसला आहे. संप सुरूच राहिल्यास पुढील आठवड्यात उद्योग बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया मोटार काँग्रेसने २० जुलै पासून मालवाहतूकदारांचा देशव्यापी संप पुकारला आहे. संपामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सध्या चार ते साडे चार हजार वाहने उभी आहेत. वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील उत्पादीत मालाची वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाय कच्च्या मालाचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या संपाचा फटका उद्योजकांना बसण्यास सुरुवात झाली आहे.

कच्च्या मालाचा पुरवठा बंद व तयार मालाची वाहतूक होत नसल्याने स्थानिक उद्योगावर दहा ते पंधरा टक्के परिणाम झाला आहे. येत्या काही दिवसात उत्पादन आणखी कमी होईल. या संपाचा जालना जिल्ह्यातील स्टील उद्योगावरही परिणाम झाला आहे. संप सुरू झाल्यानंतर काही दिवस कंपनीतील कच्च्या मालाच्या साठ्यातून उत्पादन घेण्यात आले. आता हा साठा संपत आल्याने उत्पादन कमी होत आहे, अशी माहिती उद्योजकांच्या संघटनेकडून देण्यात आली.

………

मालवाहतूकदारांच्या संपाच्या सहाव्या दिवशी दहा ते बारा टक्के परिणाम जाणवत आहे. कळंबोली येथून होणारा कच्च्या मालाचा पुरवठा थांबला आहे. संप सुरू राहिल्यास पुढील आठवड्यात औरंगाबादच्या उद्योगातील उत्पादन थांबण्याची शक्यता आहे.

-राम भोगले, अध्यक्ष, सीएमआयए

………

मालवाहतूकदारांचा संपाला शासनाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. शासनाकडून मागण्यांना प्रतिसाद अपेक्षित आहे. शासनाकडून संपात तोडगा काढण्यासाठी कोणतीही कारवाई होत नसल्याने संप सुरू ठेवला आहे.

-फैय्याज खान, अध्यक्ष, औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन

……………

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणासाठी अभूतपूर्व, धडकी भरवणारा शांती मोर्चा काढणाऱ्या आणि मराठा आरक्षणासाठी प्राणत्यागाचे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या औरंगाबाद येथूनच आता मराठा आरक्षणासाठीच आमदारांनी आक्रमक होत बुधवारी राजीनामे देण्याची घोषणा केली. त्यात कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापूरचे राष्ट्रवादी कॉँग्रसेचे आमदार भाऊसाहेब पाटील - चिकटगावकर यांनी बुधवारी आपल्या पदाचे राजीनामे दिले. तर पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमेर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

आमदार जाधव यांनी आपला राजीनामा ई-मलद्वारे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला, तर गुरुवारी जाधव आणि चिकटगावकर दोघेही प्रत्यक्ष भेटून विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. सरकारने बुधवारी दुपारी चारपर्यंत आरक्षणाबाबत अध्यादेश काढावा, अन्यथा राजीनामा देऊ असा इशारा मंगळवारी दिला होता. यापूर्वी जाधव यांनी २०१३मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आपली घुसमट होत आहे, म्हणत राजीनामा दिला होता. त्यानंतरही आपल्या मदारसंघात विकासकामे होत नाही म्हणत त्यांनी दुसऱ्यांदा राजीनामा दिला. या दोन्ही वेळेस त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाधव म्हणाले, 'मराठा आरक्षणासाठी लोक आत्महत्या करत असताना विधानसभेकडून त्यांना कोणतेही उत्तर दिले जात नाही. त्यामुळे मला पदावर राहणे शोभत नाही. जो पर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तो पर्यंत विधानसभेत काम करण्याची माझी इच्छा नाही. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंदर्भात चर्चा सुरू करावी, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी सभागृहामध्ये स्थगन प्रस्तावाद्वारे केली होती. मात्र चर्चा झाली नाही. त्यानंतर चर्चा झाली मात्र मुख्यमंत्र्यांनी ठोस उपाययोजना सांगितली नाही. आता मराठा आरक्षणाचे आंदोलन चिघळले आहे. एकीकडे लोक आरक्षणाची मागणी करत मरत आहेत. आता विधानसभेतील इतर सदस्यांनीही सरकारला अध्यादेश काढण्यासाठी सूचित करावे. सरकारने तरीही ऐकले नाही, तर सामूहिक राजीनामे द्यावे. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढणे ही मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत लहान गोष्ट आहे. मात्र, प्रकरण कोर्टात आहे असे राज्य सरकार सांगते ते पूर्णत: चुकीचे आहे. कायदा तयार करण्याचे काम लोकसभा आणि विधानसभेचे आहे.'

\Bराजीनामा नाही स्वीकारला तर आनंदच...

\Bमराठा आरक्षणला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मग इतर आमदारही राजीनामा देणार काय, या प्रश्नावर जाधव म्हणाले, 'मला इतर आमदारांचे माहित नाही. आपण सामूहिक मुद्द्यांसाठी यापूर्वीही राजीनामा दिला आहे. आता आरक्षण द्या अन्यथा राजीनामा स्वीकारा, अशी आपली भूमिका आहे. अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला नाही तर आनंदच आहे. मात्र, आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीसीटीव्हीमुळे चोर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रोकडिया हनुमान मंदिरातून देवतांचे चांदीचे मुकूट लांबवणारा आरोपी तीन महिन्यानंतर नागरिकांच्या जाळ्यात सापडला आहे. या आरोपीने १६ एप्रिल रोजी ही चोरी केली होती. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार चित्रित झाला होता. हा चोरटा सोमवारी मंदिरात आला असता, नागरिकांनी त्याला ताब्यात घेऊन क्रांतीचौक पोलिसांच्या स्वाधीन केले.

रोकडिया हनुमान मंदिरातून १६ एप्रिल रोजी पद्मावती, बालाजी व लक्ष्मीदेवी यांचे चांदीचे मुकूट चोरट्यानी लांबवले होते. संशयित आरोपी दत्तात्रय दगडू कणसे (वय ४७, रा. कडेठाण, ता. पैठण) याने हा प्रकार केला होता. यापूर्वी देखील त्याने एका महिलेची पर्स लंपास केली होती. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित आरोपीचे चित्रिकरण झाले होते. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी पसार झाला होता. मंदिरातील पुजारी व परिसरातील नागरिक या आरोपीच्या शोधातच होते.

दरम्यान, हा आरोपी सोमवारी सायंकाळी मंदिराच्या आवारात आला. तेथील नागरिकांनी त्याला तात्काळ ओळखले. स्थानिक रहिवासी प्रदीप वाघ, मयूर सवई व जयराज शेवतेकर यांनी त्याला गप्पात गुंतवून ठेवले व ही माहिती क्रांतीचौक पोलिसांना कळविली. क्रांतीचौक पोलिसांनी रोकडिया हनुमान मंदिर गाठून आरोपी कणसेला ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी प्रदीप वाघ यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

\Bहनुमान जयंतीच्या दिवशी लांबवला मोबाइल\B

आरोपी कणसे हा एका खासगी सिक्युरिटी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. रोकडिया हनुमान मंदिरात त्याने ३० मार्च रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी देखील चोरी केली होती. यावेळी त्याने एकाचा मोबाइल लंपास केला होता. त्या घटनेच्या वेळी देखील आरोपीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रिकरण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरा प्रक्रिया यंत्र खरेदी निविदा अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नऊ झोन कार्यालयाच्या क्षेत्रात २७ यंत्र खरेदीची निविदा अंतिम टप्प्यात आहे. या निविदा मंजुरीचे चित्र एक ऑगस्ट रोजी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

झोन कार्यालयाच्या क्षेत्राच प्रक्रिया करून कचरा जिरवण्यासाठी महापालिकेने श्रेडिंग, बेलिंग आणि स्क्रिनिंग यंत्र खरेदीचा निर्णय घेतला आहे. एका झोन कार्यालयाच्या क्षेत्रात ही तीन यंत्रे उभाण्यात येणार आहेत. त्यानुसार, नऊ झोन कार्यालयाच्या क्षेत्रात २७ यंत्र खरेदीची प्रक्रिया निविदा प्रसिद्ध करून सुरू करण्यात आली. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवारी (२४ जुलै) होती. परंतु, मराठा आरक्षण आंदोलनामुळे मंगळवारी इंटरनेट सेवा बंद केल्याने पालिकेचा ई-टेंडर विभागाचे कामकाज बंद राहिले. त्यामुळे ऑनलाइन निविदा सादर करण्यासाठी दोन दिवस वाढवून दिले आहेत. त्यानुसार निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार असून त्यानंतर ३० व ३१ जुलै रोजी निविदा उघडून त्या अंतिम केल्या जातील.

\Bदोन ठिकाणची प्रक्रिया दोन दिवसांत

\B

देशमुखनगर व रमानगर येथे विकेंद्रीकरण पद्धतीने प्रत्येकी १६ टन क्षमतेचे यंत्र खरेदी करण्यासाठीही पालिकेने निविदा काढली होती. प्राप्त निविदांचे टेक्निकल बीड उघडण्यात आले. येत्या दोन दिवसात फायनान्शियल बीड उघडून निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीची चाके रुतलेलीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी एसटी बसची ८० टक्के सेवा बंद राहिली. जालना, तसेच जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बससेवा सुरू होती. पुणे, अहमदनगर जळगाव, मुंबई, लातूर, बीड आणि परभणी या मार्गावरील बस बुधवारी बंद ठेवण्यात आल्या.

कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील काकासाहेब शिंदे यांनी सोमवारी (२३ जुलै) जलसमाधी घेतल्यामुळे आरक्षण मागणीचे आंदोलन भडकले आहे. कायगाव टोका येथील पुलावरील आंदोलनामुळे सोमवारपासून बंद झालेला औरंगाबाद-पुणे मार्ग मंगळवारी सायंकाळी खुला झाला. शिवाय महत्त्वाच्या शहराकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. दरम्यान, बुधवारी सकाळी सिडको बसस्थानकातून परभणी व बीडकडे काही बस पाठवण्यात आल्या. मात्र, परभणी येथे आंदोलन तीव्र झाल्याने त्या परत आल्या. मध्यवर्ती बसस्थानकातून सिल्लोड, पैठण, कन्नड, वैजापूर, सोयगाव या मार्गावर बस सोडण्यात आल्या. पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे या मार्गावरील भागात बुधवारी बंद पुकारण्यात आल्याने या भागात बस गेल्या नाहीत. जळगावहून एकमेव बस सकाळी आली. दरम्यान, बुधवारी रात्री पुणे, नाशिकसह इतर मार्गावर बस पाठणार असल्याचे शहरांकडे पाठवणार असल्याची माहिती एस. टी. महामंडळाकडून देण्यात आली.

\B१६ बसचे नुकसान \B

मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारलेल्या महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. या आंदोलनात एकूण १६ एसटी बस फोडण्यात आल्या. त्यापैकी नऊ बसला औरंगाबाद जिल्ह्यात लक्ष्य करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवरायांची शपथ! मी आरक्षण दिलं असतं: पंकजा मुंडे

$
0
0

बीड:

'मराठा आरक्षणाच्या संदर्भातील फाइल माझ्याकडं असती तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिलं असतं,' असं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं.

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या काही भागात आजही आंदोलन सुरूच आहे. बीडमधील परळी इथं मराठा बांधवांनी आज ठिय्या आंदोलन केलं. पंकजा मुंडे यांनी तिथं जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना पंकजा यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ठाम पाठिंबा दर्शवला. 'आरक्षणाच्या प्रश्नावर मी मराठा समाजाच्या सोबत आहे. मी मराठा बांधवांची दूत बनणार आहे. आरक्षण मिळावं यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन,' असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अज्ञात वाहनाच्या धडकेत वाळूजमध्ये एक विद्यार्थी ठार

$
0
0

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी येथील एका करिअर अ‍ॅकॉडमीचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी जात असताना महावीर चौकात बुधवारी (२५ जुलै) पहाटे चारच्या सुमारास पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, तिघे गंभीर जखमी झाले. राहुल साहेबराव पाटील (वय २१, रा़ रायपूर, ता़ साक्री, जि. धुळे) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ करिअर अ‍ॅकॉडमीचे विद्यार्थी पोलिस भरती व लष्कर भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी रोज पहाटे मैदानाकडे जातात़ सर्व विद्यार्थी बुधवारी पहाटे मैदानाकडे जात असताना चारच्या सुमारास हा अपघात झाला. यात चार जण जखमी झाले होते. उपचारादरम्यान गुरुवारी राहुल पाटील याचा मृत्यू झाला. वैभव बाबासाहेब काळे, शाम भागवत पंडित, विनोद माणिकराव शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत झालेला राहुल हा शेतकरी कुटुंबातील आहे. लवकरच नोकरीला लागेल या आशेने त्याला शिक्षणासाठी पाठवले होते़ या अपघाताची तक्रार वैभव काळे यांनी वाळूज पोलिस ठाण्यात दिली असून, अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चौधरी हे करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - कल्याणी रहाटकर, भाजपयुमो प्रदेश उपाध्यक्ष

आरक्षणासाठी आंदोलक जलकुंभावर चढले

$
0
0

फुलंब्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी फुलंब्री येथे जलकुंभावर चढून गुरुवारी (२६ जुलै) आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक आमदार व खासदारांनी येथे येऊन भूमिका स्षप्ट केल्याशिवाय जलकुंभावरून उतरणार नाही, असे आंदोलकांनी जाहीर केले आहे.

फुलंब्री टी पॉइंट येथे मंगळवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू असून त्याकडे स्थानिक आमदार, खासदार फिरकले नाहीत. त्यामुळे सुधाकर शिंदे, शैलेश बोरसे, प्रमोद गायकवाड, प्रभाकर भुसारे, काकासाहेब जाधव, नंदू मोटे, ज्ञानेश्वर जाधव या सात कार्यकर्त्यांनी जलकुंभावर आंदोलन सुरू केले आहे. या विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व खासदारमधून भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे प्रतिनिधीत्व करतात. या दोघांनी भूमिका स्पष्ट केली नाही, तर उडी मारून जीव देणार असल्याचे आंदोलकांनी जाहीर केले आहे. त्यांनी सोबत रॉकेल, कीटकनाशक, माईक सिस्टिम नेली आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले, तहसीलदार संगीता चव्हाण, नायब तहसिलदार उद्धव नाईक, प्रशांत काळे, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, नगरपंचायत मुख्याधिकारी योगेश पाटील आदींनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना अपयश आले.

बागडेंना दिली माहिती

या आंदोलनााची माहिती प्रशासनाने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिली. मात्र, रात्री नऊपर्यंत बागडे यांच्यासोबत चर्चा झाली नसल्याने आंदोलक जलकुंभावरच होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महात्मा फुले’तून चार रुग्णालये हटविली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

वेगवेगळ्या गैरप्रकारांवर आक्षेप घेत शहरातील अॅपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, काबरा हॉस्पिटल, सुयश नर्सिंग होम व माणिक हॉस्पिटल यांच्यावर कारवाई करण्यात येऊन, हे चारही हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून हटविण्यात आले आहेत. त्याचवेळी दोन रुग्णालयांमध्ये ही योजना नव्याने लागू झाली असून, सध्या शहर तसेच जिल्ह्यातील २० रुग्णालयांमध्ये ही योजना लागू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१२ मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना संपूर्ण राज्यात लागू झाली आणि सुरुवातीच्या टप्प्यात शहर तसेच जिल्ह्यात १५पेक्षा जास्त रुग्णालयांमध्ये ही योजना लागू झाली. ९००पेक्षा जास्त उपचार प्रक्रिया तसेच शस्त्रक्रियांचा समावेश असलेल्या योजनेमुळे अँजिओप्लास्टी-बायपास, कर्करोगावरील उपचार-शस्त्रक्रिया व इतर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांबरोबरच मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियाही मोठ्या प्रमाणात होत गेल्या. अलीकडे याच योजनेचे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असे नामांतर झाले खरे; परंतु अपेक्षित बदल मात्र झालेच नाहीत. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे सेवा न दिल्यामुळे काही रुग्णालयांवर कारवाई होऊन योजनेतून हटविण्यात आली, तर काही रुग्णालये स्वतःहून योजनेपासून दूर गेल्याने योजना लागू असलेली जिल्ह्यातील रुग्णालये ३० वरुन २० पर्यंत घटली आहेत.

अद्ययावतीकरणाचे काय?

अपेक्षेप्रमाणे रुग्णांना सेवा न देणे, रुग्णांना योजना लागूच न करणे, रुग्ण-नातेवाईकांकडून अतिरिक्त शुल्क वसुली करणे यासारखे गंभीर आक्षेप घेत चारही रुग्णालयांना योजनेतून हटविण्यात आले खरे; परंतु २०१२ रोजी सुरू झालेल्या योजनेचे पॅकेजेस हे वेळ-काळ-परिस्थितीनुसार वाढणार कधी, अपडेट होणार कधी आणि नवनवीन उपचार प्रक्रिया-शस्त्रक्रियांचा योजनेत समावेश होणार कधी, हाही तेवढाच गंभीर प्रश्न असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. या अपेक्षित बदलांशिवाय गोरगरीबांना लाभ होणार कधी-कसा, असाही सवाल उपस्थित होत आहे.

रुग्णांना अपेक्षेप्रमाणे सेवा न मिळामुळे चार रुग्णालयांवर कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. अपेक्षांची पूर्तता झाल्यास पुन्हा योजना लागू होण्याचा निर्णयही वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो.

- डॉ. योगेश लोखंडे, जिल्हा समन्वयक

आम्ही काही केसेस योजेनेअंतर्गत करण्यासाठी नाकारल्या, हा आमच्याविरुद्ध प्रमुख आक्षेप आहे. मात्र मेंदुच्या अनेक क्लिष्ट, गुंतागुंतीच्या व तातडीच्या शस्त्रक्रिया या योजनेअंतर्गत करण्यासाठी रुग्णांना न्याय देता येत नाहीत. अशा शस्त्रक्रियांसाठी योजनेतील पॅकेज खूप कमी आहे. त्यामुळे अशा शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत करण्यासाठी नाकारण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहात नाही.

- डॉ. भावना टाकळकर, संचालक, अॅपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

आगीच्या प्रकारानंतर रुग्णालयातून योजना निलंबित करण्यात आली होती व पुन्हा ऑडिट करुन योजना लागू करण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतर ना ऑडिट झाले, ना आम्हाला संधी देण्यात आली. परिणामी, अनेक रुग्णांना ट्रान्स्प्लान्टची परवानगी मिळूनही त्यांच्यावर योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याने हा गोरगरीब रुग्णांवर एक प्रकारचा अन्याय आहे.

- डॉ. उल्हास कोंडपल्ले, संचालक, माणिक हॉस्पिटल

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची स्थिती

- २० रुग्णालयात जिल्ह्यात योजना

- ६८,२३१ आतापर्यंतचे लाभार्थी

- १,५०,६०८ योजनेअंतर्गत उपचाराच्या केसेस

(आकडेवारी २०१३ पासूनची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रूपी’ संचालकांवर गुन्हे दाखल करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

रूपी सहकारी बँकेचे कर्ज बुडविणारे कर्जदार, सभासद, कर्मचारी आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रूपी बँकेतील ठेविदारांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत केली. रिझर्व्ह बँकेकडून प्रकरणावर संथ गतीने कारवाई होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ठेविदारांना ठेवी काढता येत नसल्याने यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठेविदारांचा लढा सुरू आहे. बँकेची आर्थिक स्थिती गंभीर झाल्याने २०१३मध्ये आरबीआयने निर्बंध लादले. तेव्हापासून ठेविदारांना त्यांच्या ठेवी काढता आलेल्या नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या निरीक्षणात बँकेत गैरव्यवहार झाल्याने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करण्यात करण्यात आले. यासह बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे वचनपत्र सादर करण्याचे सांगितले. मात्र, ते करण्यात आले नाही. यासह निर्बंधामुळे ठेविदारांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संचालक, कर्ज बुडव्यांमुळे ठेविदारांची हेळसांड का, असा प्रश्न ठेविदारांनी केला आहे. शासन, आरबीआयकडूनही या प्रश्नावर तोडगा काढला जात नसल्यामुळे ठेविदारांमध्ये प्रचंड संताप आहे. अशा कर्ज बुडव्या तसेच बँकेला बुडविणाऱ्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. औरंगाबादमध्ये साडेसहा हजार ठेविदार आहेत. फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत ठोस निर्णयासाठी पुन्हा तीन ऑगस्ट रोजी (शुक्रवारी) ठेविदारांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला शहरातील ठेविदारांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सरकारला सुबुद्धी मिळो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

आरक्षण देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळो अशा घोषणा देत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (२६ जुलै) क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास १०१ प्रदक्षिणा घातल्या. आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी शक्ती मिळावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेले क्रांती चौकातील आंदोलन गुरुवारी सहाव्या दिवशीही सुरूच राहिले. कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण देण्यासाठी सरकारला सद्बुद्धी मिळो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. या उपक्रमात समन्वयक, तरूण तसेच महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्य शासनाची मेगा भरती रद्द करावी व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलक दररोज वेगवेगळ्या मार्गाने शासनाचा निषेध करून आरक्षणाची मागणी करत आहेत. समन्वयकांनी बुधवारी मुंडण आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. औरंगाबाद जिल्ह्यात दोघांना जीव गमवावा लागल्याने आंदोलन तीव्र झाले आहे. राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनांना मराठवाड्यात हिंसक वळण लागले असून गुरुवारी परभणीमध्येही आंदोलकांनी सरकारी मालमत्तांना लक्ष्य केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंदेच्या बंधुंना ‘मशिप्र’नोकरी

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी कायगाव टोका येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या भावाला आमदार सतीश चव्हाण यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेमध्ये लिपिक पदी नेमणूक करून नोकरी दिली.

आमदार चव्हाण यांनी गुरुवारी (२६ जानेवारी) शिंदे कुटुंबाची कानडगाव येथे जाऊन भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आमदार चव्हाण यांनी काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे यांची भेट घेऊन त्यांना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये नोकरी दिली. यावेळी अभिजित देशमुख, अभय पाटील चिकटगावकर, बाळासाहेब औताडे, प्रशांत माने, वाल्मिक शिरसाठ, विश्वजित चव्हाण आदींची उपस्थिती होती. शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी कायगाव टोका येथे गोदावरीत जलसमाधी घेतली. त्यानंतर औरंगाबादसह राज्यात आंदोलन उग्र झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यानगरात रस्ते कामाला सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यानगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे महापौर नंदकुमार घोडले यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. विद्यानगर वॉर्डचे नगरसेवक, स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी महापौरांनी वैद्य यांच्या कामाची स्तुती केली. वैद्य यांच्या प्रयत्नामुळे वॉर्डाचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला किशन गवळी, सदाशिव दिंडोरे, जालिंदर शिरसाट, दीपक ऋषीकर, लालसिंग पदारकर, सुदर्शन जोशी, विश्वनाथ दांडगे, ए. एम. जमादार, नारायण घोनेवडे, भास्कर चिमटे, प्रशांत ढिगुळे, जयवंतराव आहेर, साहेबराव शेळके, संगीता तोंडे, नयना डोईफोडे, शिला साळवे, अनिता बोगाने, लता वागचुरे, हेमलता बक्षी आदी उपस्थित होते.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगाव रोड रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

हर्सूल गावातून अजिंठ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात गुरुवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्तांच्या मोबदल्यात संबंधितांना जागा देण्याचा प्रस्ताव आठ दिवसांत पाठवा, असे आदेश बागडे यांनी यावेळी दिले.

हर्सूल गावातील रस्ता रुंदीकरणासंदर्भात उपमहापौर विजय औताडे आठ महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत. रस्ता रुंदीकरणासंदर्भात औताडे यांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. बैठकीला बागडे यांच्यासह औताडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक सुमेध खरवडकर, उपअभियांता ए. बी. देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल औताडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'हर्सूल गावातून जाणारा रस्ता ९० ते १०० फुटांचा करण्याचे नियोजन आहे. यासाठी १२३ मालमत्तांचे भूसंपादन केले जाणार आहे. जागेच्या बदल्यात जागा देण्याची नागरिकांची मागणी आहे. हर्सील गावात शासनाचे वळू संगोपनकेंद्र आहे. या केंद्राची सुमारे २५ एकर जागा आहे. यापैकी दोन एकर जागा मिळाल्यास मालमत्ताधारकांना जागेच्या बदल्यात जागा मिळू शकेल, असे चर्चेतून स्पष्ट झाले. जागेच्या बदल्यात जागा देण्याबद्दलचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर करा, असे आदेश बागडे यांनी दिले. भूसंपादनासाठी जी बांधकामे पाडण्यात येतील, त्यांचा मोबदला दिला जाणार आहे.'

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ले-आउटबद्दल देखील बैठकीत चर्चा झाल्याचे औताडे यांनी सांगितले. आठ दिवसात ले-आउट करून देऊ, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

\Bवाहतूक कोंडी दूर होणार\B

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्यात येतो. त्याचबरोबर या मार्गावर शैक्षणित संस्थाही आहेत. नव्या गृहनिर्माण संस्था, वसाहती या परिसरात उभारल्या आहेत. हर्सूल गावातून हा रस्ता अरूंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. रुंदीकरणासाठी मालपत्तांचे संपादन करणे आवश्यक आहे. मोबदल्याविषयी सहमती नसल्याने भूसंपादन रखडले होते. या निर्णयामुळे जळगावरोडवरी कोंडी आता दूर होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागीदाराची जागा हडपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

भागीदाराचे निधन झाल्यानंतर त्याचा फायदा घेत बनावट कागदपत्र तयार करून जागा हडप करण्यात आली. ३१ मार्च २००६ रोजी हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरशान अलीखान मुन्वर अलीखान (वय ३० रा. लेबर कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. आरशान खानचे वडील मुन्वर अलीखान व त्यांच्या ओळखीचे सोहेल कादरी आबेदउल्ला कादरी (रा. हिमायतबाग) या दोघांनी मिळून इंदिरानगर, बायजीपुरा भागात २००४मध्ये जागा विकत घेतली होती. त्यांनी २००६मध्ये ही जागा सर सय्यद शाळेला भाडेतत्वावर दिली होती. या जागेचे भाडे मुन्वर अलीखान यांना नियमित येत होते. या जागेवर २०१३मध्ये आरसीसी बांधकाम करण्यात आले. यानंतर पाच मार्च २०१३ रोजी मुनवरअलीखान व सोहेल कादरी यांनी 'डिक्लेरेशन डिड' तयार केले होते. यावर साक्षीदार म्हणून आरशान अलीखान व सोहेल कादरी यांचा मुलगा शोयेब कादरी यांच्या सह्या होत्या.

फेब्रुवारी २०१४मध्ये मुनवर अलीखान यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर खान यांना सोहेल कादरी यांच्यााकडून येणारे जागेचे भाडे येणे बंद झाले. आरशान अलीखान व त्याच्या आईने सोहेल कादरी यांची भेट घेत भाड्याचे पैसे मागीतले. यावेळी या जागेवर तुमचा काही हक्क नाही, असे म्हणत त्यांना पाठवून देण्यात आले. आरशानने महापालिकेमध्ये माहिती अधिकारात या जागेसंदर्भात माहिती घेतली. यामध्ये ३१ मार्च २००६ रोजी मुनवर अलीखान हयात असताना त्यांच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावून शंभर रुपयाच्या बाँडपेपरवर मुन्वर अलीखान यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या; तसेच मुन्वर अलीखान यांच्या नावावर असलेली जागा संस्थेच्या नावावर संमतीपत्रा आधारे केल्याचे दाखविले. या बाँड पेपरवर अध्यक्ष म्हणून मुन्वर अलीखान, तर सचिव म्हणून सोहेल कादरी यांची सही आहे. साक्षीदार म्हणून फय्याज खान अहेमदखान, महम्मद अय्युब शेख हबीब व सय्यद खलील सय्यद अकबर यांच्या सह्या आहेत. याप्रकरणी आरशान अलीखान यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सोहेल कादरी यांच्यासह इतर तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकरणी चौकशी केली. पीएसआय संदीप शिंदे या प्रकरणी तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदारांनी एकत्र येऊन आरक्षण पदरात पाडून घ्यावे

$
0
0

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. एकीकडे आमदारांनी राजीनामे देणे सुरू केले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी राजीनामे देण्याऐवजी सर्व आमदारांनी एकत्र येऊन आरक्षण पदरात पाडून घ्यावे, असे मत शहरवासीयांनी 'मटा'कडे बोलताना व्यक्त केली.

----

आमदारांनी राजीनामा दिल्याने आरक्षण मिळणार नाही, मात्र याच आमदारांनी सभागृहात एकत्र येऊन, यावर विचार करून प्रश्न सोडवणे शक्य आहे. भावनेच्या आधारावर राजीनामे देण्यात आले आहेत असे मला वाटते. आरक्षण या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येऊन तोडगा काढावा. त्याचा मराठा समाजालाही उपयोग होईल.

- फिरोज पठाण

---

मराठा आमदारांनी आरक्षणासाठी दिलेले राजीनामे योग्य असल्याचे वाटते. आरक्षण प्रश्नावर सर्व आमदारांनी एकत्र आले तर त्याचा उपयोग होईल. आता आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे किमान सरकारवर दबाव निर्माण होईल. मुख्यमंत्रीही बदलण्याची कार्यवाही शक्य आहे. त्यामुळे राजीनामा सत्राचा उपयोग होईल.

- नंदू पवार

---

आमदारांनी राजीनामा देण्याऐवजी विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा करावी. आरक्षणाची समाजाला किती गरज आहे हा विषय अभ्यासपूर्ण मांडावा. राजीनामा देऊन दबाव निर्माण होईल, पण मुख्य प्रश्न सुटणार नाही. हे राजीनामे मंजूर होतील याची शक्यता कमी आहे. आरक्षणाचा अभ्यासपूर्ण मुद्दा सभागृहात मांडल्यास योग्य.

- डॉ. कपिल झोटिंग

---

लोकांच्या भावना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे आमदारांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा सत्रामुळे सरकारवर दबाव निर्माण होऊ शकेल यात शंका नाही. मात्र, यासाठी सर्वच मराठा आमदारांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे करून आरक्षण पदरात पाडून घ्यावे. सरकारला विधिमंडळातही दबाव आणून विधेयक मंजूर करावे.

- मयूर सोनवणे

---

भाजप सरकारने सत्तेत येण्यासाठी निवडणूक जाहीरनाम्यात आरक्षणाचे चॉकलेट दाखवले होते. आता केवळ सरकारने पाठपुरावा केला नाही म्हणून आरक्षण प्रलंबित आहे. शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून मराठा आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत. जेणेकरुन राज्य सरकारवर निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण होईल आणि आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल.

- सागर नलावडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमजीएम’च्या सहकार्याने कचऱ्यावर प्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) सहकार्याने महापालिका कचऱ्यावर प्रक्रिया करणार आहे. एमजीएमच्या क्लिन इंडिया संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे. मध्यवर्ती जकात नाका येथे साचलेल्या कचऱ्यावर गुरुवारी क्लिन इंडिया संस्थेतर्फे प्रक्रिया करण्यात आली. प्रक्रियेनंतर तेथील कचऱ्याचे रुपांतर खतात होणार आहे.

मध्यवर्ती जकात नाका येथे झोन क्रमांक तीनमधील वसाहतींचा कचरा साचवला जातो. साचवलेल्या कचऱ्यातून दुर्गंधी निर्माण झाली असून, माशांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे येथील कचऱ्यावर एमजीएमच्या सहकार्याने प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले होते. प्रक्रिया करण्याच्या उपक्रमाची सुरुवात महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झाली. यावेळी स्थायी समितीचे सभापती रेणुकादास (राजू) वैद्य यांची विशेष उपस्थिती होती.

'एमजीएम'ने विशिष्ट प्रकारचे बायोकल्चर व पाण्यात मिसळून वापरायचे बायो कॅटालिस्ट वापरून कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. 'एमजीएम'च्या संपूर्ण परिसरात याच पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कचऱ्याचे खत होते. याच पद्धतीने मध्यवर्ती जकात नाका येथे साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत महापालिकेचे अधिकारी व क्लिन इडियाचे पदाधिकारी यांची २३ जुलै रोजी बैठक झाली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. त्यानुसार गुरुवारपासून प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी क्लिन इंडियाचे विभागप्रमुख डॉ. आर. आर. देशपांडे व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले. प्रक्रिया उपक्रमाच्या शुभारंभाला महापालिकेचे कार्यकारी अभियंता अफसर सिद्दिकी, वॉर्ड अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.

मध्यवर्ती जकात नाक्या प्रमाणेच चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल, रमानगर येथे साठवलेल्या कचऱ्यावर 'एमजीएम'ने प्रक्रिया करावी. प्रक्रियेसाठी लागणारी रसायने व अन्य साहित्य महापालिका उपलब्ध करून देईल, असे आवाहन महापौरांनी केले. यावर महापालिकेला सहकार्य करण्याची भूमिका डॉ. देशपांडे यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images